नुकताच मराठी म्हणींच्या धाग्यावर ‘उसापोटी कापूस जन्मला’ या म्हणीचा अर्थ विचारला गेला होता. त्यावर शोध घेताना मला रोचक माहिती मिळाली. वास्तविक सदर म्हणीत ‘कापूस’ शब्द नसून ‘काऊस’ हा शब्द आहे. त्याचा अर्थ ‘उसाच्या शेंड्याचा नीरस भाग किंवा कुचकामाचा माणूस’. ‘काऊस’ हा जरा विचित्र शब्द असल्याने याचा कापूस असा सोयीस्कर अपभ्रंश झाला असावा.
या निमित्ताने मनात एक कल्पना आली. वरील म्हणीप्रमाणेच आपल्या भाषेत अनेक शब्द, म्हणी अथवा वाक्प्रचार यांचे अपभ्रंश कालौघात रूढ होतात. त्याची अशी काही कारणे संभवतात :
१. एखादा मूळ शब्द उच्चारायला कठीण असतो
२. तो लोकांत खूप अपरिचित असतो, किंवा
३. भाषेच्या विविध बोली अथवा लहेजानुसार त्यात बदल संभवतात.
म्हणी आणि वाक्प्रचार हे कित्येक शतकांपासून भाषेत रूढ आहेत. तेव्हा त्यांचे विविध अपभ्रंश नक्की कधी झाले हे समजणे तसे कठीण असते. मात्र एकदा का ते रूढ झाले, की त्या पुढील पिढ्यांना तेच जणू मूळ असल्यासारखे भासतात. त्यातून बरेचदा संबंधित म्हणीचा अर्थबोध होत नाही. काहीसे बुचकळ्यात पडायला होते तर काही वेळेस काही शब्द हास्यास्पद भासतात. मग या अपभ्रंशांची नवनवीन स्पष्टीकरणे सामान्यांकडून दिली जातात आणि त्यातून काहीतरी नवेच रूढ होते. काही अपभ्रंशांच्याबाबत विविध शब्दकोश आणि भाषातज्ञात देखील मतांतरे अथवा मतभेद असतात. असे काही वाचनात आले की एखाद्या भाषाप्रेमीचे कुतूहल चाळवते. तो त्याचा अधिकाधिक शोध घेऊ लागतो. अशाच काही मजेदार बदल अथवा अपभ्रंशांची जंत्री करण्यासाठी हा धागा.
माझ्या माहितीतील काही उदाहरणांनी (संदर्भासह) सुरुवात करून देतो. नंतर इच्छुकांनी भर घालत राहावी.
…
१. आठराविश्वे दारिद्र्य
अर्थ : पूर्ण दारिद्र्य
आता १८ ‘विश्वे’ कोणती असा प्रश्न पडतो.
त्याची २ स्पष्टीकरणे मिळाली :
अ) वीस विश्वे (विस्वे) पैकीं अठराविश्वे म्हणजे जवळ जवळ पूर्ण दारिद्र्य. = १८/ २०
(https://bruhadkosh.org/words?shodh=%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BF%...)
ब) 'अठरा विसा' याचा अर्थ १८ x २० = ३६० दिवस, असा होतो. ३६० दिवस म्हणजे एक वर्ष. वर्षाचे सर्व दिवस, सदासर्वकाळ दारिद्रय घरात वसतीला असणे, यालाच 'अठरा विश्वे दारिद्रय' म्हणतात (हणमंते, श्री०शा० १९८० : संख्या-संकेत कोश. प्रसाद प्रकाशन, पुणे)
http://maparishad.com/content/%E0%A4%85%E0%A4%A0%E0%A4%B0%E0%A4%BE-%E0%A...
आहे की नाही गम्मत ! गणितानुसारही चक्क २ वेगळे अर्थ झाले :
१८/२० आणि
१८ गुणिले २० !
२. पुराणातली वांगी पुराणात
अर्थ : उपदेश नुसता ऐकावा, करताना हवे ते करावे ( शब्दरत्नाकर).
आता इथे भाजीतील ‘वांगी ’ कुठून आली हा अगदी स्वाभाविक प्रश्न. मी यासाठी शब्दरत्नाकर व बृहदकोश दोन्ही पाहिले असता त्यात ‘वांगी’ च स्पष्ट लिहिलेले आहे. मात्र ‘वांगी’ हा वानगीचा अपभ्रंश असल्याचे संदर्भ मिळतात. उदा :
“यातला मूळ शब्द ‘वानगी’ म्हणजे नमुना हा असावा, ज्याचा नंतर ‘वांगी’ हा अपभ्रंश झाला, असे काही भाषातज्ज्ञांचे मत आहे”.
https://www.loksatta.com/vishesh-news/scientific-research-in-indian-myth...
३. उंसाच्या पोटीं काऊस जन्मला
= हिर्याच्या पोटीं गारगोटी. [सं. कु + इक्षु]
https://bruhadkosh.org/words?shodh=%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%8A%E0%A4%B8
इथे कापूस या अपभ्रंशांने खरेच बुचकळ्यात पडायला होते. ऊस श्रेष्ठ असेल तर कापूस कनिष्ठ कसा?
४. परोक्ष
मूळ अर्थ :
एखाद्याच्या पाठीमागें, गैरहजेरींत; डोळ्या-आड; असमक्ष.
मात्र व्यवहारात त्याचा वापर बरोबर उलट अर्थाने ( समक्ष) केला जातो !
हा पाहा संदर्भ :
“अडाणी माणसें परोक्ष याचा समक्ष या अर्थीं उपयोग करतात व असमक्ष करितां अपरोक्ष योजतात”.
(https://bruhadkosh.org/words?shodh=%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%95%...)
५. मेत(थ)कूट
याचा सर्वपरिचित अर्थ हा:
तांदूळ, निरनिराळ्या डाळी, मोहऱ्या, मेथ्या इ॰ एकत्र दळून केलेलें पीठ व त्यांत दहीं घालून तयार केलेलें एक रुचकर तोंडीलावणें.
यात मेथ्या असल्याने ते खरे मेथकूट आहे.
पण, ‘मेतकूट जमणे / होणे’ याचा उगम मात्र मित्र + कूट असा आहे.
मेळ; एकी; दृढ मैत्री. 'शिंदे, बाळोबा व भाऊ यांचें मेतकूट झालें होतें.' -अस्तंभा ९६. [सं. मिथः कूट; मित्र-प्रा. मित + कूट] (वाप्र)
दाते शब्दकोश
https://bruhadkosh.org/words?shodh=%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A4%95%...
......
वानगीदाखल मी काही वर दिले आहे.
येउद्यात अजून असे काही. चर्चा रोचक असेल.
**************************************
उर्दू मधले "पोटातून" निघणारी
उर्दू मधले "पोटातून" निघणारी व्यंजने उदा. खयाल मधला ख. किंवा मल्याळम मधला ळ उदा. कोझिकोडेचा उच्चार .
ड उच्चार आले लक्षात.
ड उच्चार आले लक्षात.
छ दोन्ही उच्चार करता येतात पण त्यातील एक मराठीत वापरतात का?
वाहणे हा देवाला वाहिले या
वाहणे हा देवाला वाहिले या अर्थाने फारच मजेशीर आहे. त्याच्या उगम काही कळत नाही. म्हणजे देवाला वाहायची वस्तू उचलून आणली म्हणून वाहिली कि बळीचे रक्त वाहू दिले दिले म्हणून वाहिली. कि नदीत सोडून दिली म्हणून वाहिली?
त्याचे संस्कृत "वहति" घेतले तर अजून गोंधळ. त्यात वाहन, ओझे वाहने, लग्न करणे (स्त्री ला घरी वाहून नेणे ), गर्भ धारण करणे (मुलाला पोटी वाहून नेणे), अग्नी दिव्य असा सावळा गोंधळ आहे.
देवाचा आणि वाहण्याचा काही संबंध लागत नाही. कोणाकडे अजून काही माहिती आहे का?
वाहणे
वाहणे
= चढविणे, अर्पण करणे (शब्दरत्नाकर)
अर्पण = वाहणें (दाते शब्दकोश)
https://bruhadkosh.org/words?shodh=%E0%A4%85%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AA%...
..
रच्याकने ..
वाहणें( स्त्रीलिंगी नाम ) = चर्मपादुका
वाहणें( स्त्रीलिंगी नाम ) =
वाहणें( स्त्रीलिंगी नाम ) = चर्मपादुका ??
का वहाण ?
शब्दरत्नाकरनुसारवाहणें,
शब्दरत्नाकरनुसार
वाहणें, वाहाणा ( स्त्रीलिंगी नाम ) = चर्मपादुका
= वहाण
३ पर्याय.
मी बृहद्कोश बघतो आहे.
मी बृहद्कोश बघतो आहे.
Anyway चर्मपादुका हा एकदम भन्नाट सावरकरीय शब्द मिळाला.
वाहणे चा अर्थ सोपा आहे उगम
वाहणे चा अर्थ सोपा आहे उगम कळत नाहीये.
बरोबर.
बरोबर.
इथे इतकीच माहिती दिसतेय:
वाहणें vāhaṇēṃ v c (वाह or वह S) To convey
https://bruhadkosh.org/words?shodh=%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%BE+
वहाण—स्त्री. पायतण; चप्पल;
वहाण—स्त्री. पायतण; चप्पल; पादत्राण. 'वर्णिल कोण शहाणा, आपण काठी करीं पदींहि वहाणा ।' -मोकृष्ण १३.२१. [सं. उपानह; प्रा. वाहणा]
-दाते.
देव डोक्यावरून वाहून नेत होते
देव डोक्यावरून वाहून नेत होते. गणपती अजूनही डोक्यावर आणला जातो. किंवा नवरदेव खांद्यावर बसवून आणला जात होता. त्यामुळे देवाला वाहणे ही एक प्रकारे त्याची पूजा झाली आणि पुढे त्याला अर्पण केलेली गोष्ट म्हणजे त्याची पूजा करणे म्हणजेच त्याला वाहणे असे आले असेल का ?
शक्य आहे.
शक्य आहे.
त्याला फुले वाहा..... त्याच्या सेवेला वाहून घ्या....... इत्यादी
मस्त चर्चा सगळीच. एकदम
मस्त चर्चा सगळीच. एकदम पन्नासांवर प्रतिसाद दिसले.
लगे रहो हर्पा
अर्थवाही हा शब्द वाहणे चा वर
अर्थवाही हा शब्द वाहणे चा वर दिलेल्यांपैकी To convey हा अर्थ सुचवतो.
ल हा हिंदीत दोन प्रकारे उच्चारला जातो. पण लिहिताना एकच चिह्न आहे. एक उच्चार ल आणि ळ ह्यांच्या मधला, थोडा बोबडा वाटणारा असा आहे. जिभेचे टोक थोडे आतमध्ये वळवावयास लावणारा.
छ चा दुसरा उच्चार जुन्या लोकांकडून इच्छा हा शब्द उच्चारताना ऐकू येत असे. इत्सा किंवा इत्झा असा. गंमत आहे. आपल्याकडे वत्सला किंवा वत्सलचे वच्छला आणि वच्छल होत असे आणि इच्छाचे इत्स्सा.
***आपल्याकडे वत्सला किंवा
***आपल्याकडे वत्सला किंवा वत्सलचे वच्छला आणि वच्छल होत असे आणि इच्छाचे इत्स्सा.
>> भारीच!
https://www.esakal.com
https://www.esakal.com/sampadakiya/madhav-rajguru-writes-marathi-languag...
आणखीही बदल झाले आहेत.
मराठी भाषा संस्कृतच्या जोखडात
Submitted by भरत. on 17 November, 2022
मराठी भाषा संस्कृतच्या जोखडात कायमची जखडून ठेवण्याचा प्रयत्न झाला आहे. >> अचूक निरीक्षण
नवीन श आणि व साठीचा सरकारी
नवीन श आणि व साठीचा सरकारी अधिनियम लिंक शोधत आहे.
जालसंदर्भ सापडत नाही हे बरोबर
जालसंदर्भ सापडत नाही हे बरोबर.
वरील चर्चेत जो सकाळमधील राजगुरूंच्या लेखाचा दुवा आहे त्यात पुरेशी माहिती आहे. बहुतेक प्रमुख मराठी वृत्तपत्रांमध्ये यावर सविस्तर लेख आलेले आहेत.
एक चांगला लेख :जरा विसावू या
एक चांगला लेख :
जरा विसावू या 'विरामा'वर
https://maharashtratimes.com/editorial/samwad/pauses-are-symbols-that-in...
"मेजर थॉमस कँडी यांनी मराठी भाषेत विरामचिन्हे कशी व कोठे वापरावी, याविषयी ‘विरामचिन्हांची परिभाषा’ नावाचे स्वतंत्र पुस्तक लिहून, त्यांची आवश्यकता का आहे, हे पटवून दिले. ...... मूळ मुद्दा हा, की आपण बहुतांश कायदे ब्रिटिशांकडून घेतले; तशीच विरामचिन्हेही घेतली.
"
हे मला नव्याने समजले.
खान या शब्दाच्या उगमाबद्दल
खान या शब्दाच्या उगमाबद्दल काही रंजक माहिती वाचनात आली. या शब्दाचा उगम तुर्की/ चिनी/ मंगोल किंवा कोरियाई अशा कुठल्याही भाषेतील असू शकेल.
चेंगीजखानच्या वंशजांनी जेव्हा हा शब्द वापरला तेव्हा त्याचा अर्थ
खागान = सम्राट
हा होता.
त्यांच्या भाषेत मधल्या गा चा उच्चार होत नाही.
पुढे अर्थातच कालानुरूप या शब्दाचा अर्थ बदलत गेला आणि ते एक सामान्य आडनाव देखील झाले.
मुहुर्तमेढ रोवणे म्हणजे नक्कि
मुहुर्तमेढ रोवणे म्हणजे नक्कि काय? स्पेशली मेढ म्हणजे काय?
मेढ म्हणजे विशेषतः मांडव
मेढ म्हणजे विशेषतः मांडव वगैरे घालण्यासाठी रोवतात तो खांब. अनेकवचन मेढी.
मे(में)ढ-ढी—स्त्री. १ (को.)
मे(में)ढ-ढी—स्त्री. १ (को.) वरच्या टोकास दुबेळकें अस- लेलें, छपरासाठीं, मांडवासाठीं जमिनींत पुरून जें उंच उभें करि- तात. असे लाकूड
छान.
छान.
रच्याकने..
(मेढचा अजून एक अर्थ = ध्रुवीय तारा)
https://bruhadkosh.org/words?shodh=%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%A2
छान चर्चा! मेढचा नवीन तारा हा
छान चर्चा! मेढचा नवीन तारा हा अर्थ आजच कळाला.
मेध = यज्ञ , यज्ञपशू .
मेध = यज्ञ , यज्ञपशू .
यज्ञात पशूला बांधून ठेवावे लागत असे. त्यासाठी चांगली जाडजूड काठी जमिनीत पुरून ठेवीत असत. ती मेधाची काठी अथवा मेढ. प्रत्येक शुभ कार्यात आधी यज्ञ होत असेच. तेव्हा तो मेधाचा ओंडका, सोट पुरून ठेवत असत. आता पशुबळी दिला जात नाही. मेढ मात्र सुरुवातीला पुरली जाते.
मुहुर्त (एक अर्थ) =
मुहुर्त (एक अर्थ) =
दोन घटकांचा काळ.
An hour of 48 minutes.
https://bruhadkosh.org/words?shodh=%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%B9%E0%A5%82%...
मुहुर्त (एक अर्थ) =
मुहुर्त (एक अर्थ) =
दोन घटकांचा काळ. >> बरोबर. मुहुर्त, पळे आणि घटका हे कालमापन वाचलेले आठवतय!
हीरा नेहमीप्रमाणेच छान माहिती. तुमचे प्रतिसाद वाचनीय function at() { [native code] }असतात.
अच्छा, म्हणजे अश्वमेध मधला
अच्छा, म्हणजे अश्वमेध मधला मेध हा तोच खांब आहे का?
Pages