भाषा : अपभ्रंश, बदल, मतांतरे इ.

Submitted by कुमार१ on 14 March, 2021 - 10:39

नुकताच मराठी म्हणींच्या धाग्यावर ‘उसापोटी कापूस जन्मला’ या म्हणीचा अर्थ विचारला गेला होता. त्यावर शोध घेताना मला रोचक माहिती मिळाली. वास्तविक सदर म्हणीत ‘कापूस’ शब्द नसून ‘काऊस’ हा शब्द आहे. त्याचा अर्थ ‘उसाच्या शेंड्याचा नीरस भाग किंवा कुचकामाचा माणूस’. ‘काऊस’ हा जरा विचित्र शब्द असल्याने याचा कापूस असा सोयीस्कर अपभ्रंश झाला असावा.

या निमित्ताने मनात एक कल्पना आली. वरील म्हणीप्रमाणेच आपल्या भाषेत अनेक शब्द, म्हणी अथवा वाक्प्रचार यांचे अपभ्रंश कालौघात रूढ होतात. त्याची अशी काही कारणे संभवतात :

१. एखादा मूळ शब्द उच्चारायला कठीण असतो
२. तो लोकांत खूप अपरिचित असतो, किंवा
३. भाषेच्या विविध बोली अथवा लहेजानुसार त्यात बदल संभवतात.

म्हणी आणि वाक्प्रचार हे कित्येक शतकांपासून भाषेत रूढ आहेत. तेव्हा त्यांचे विविध अपभ्रंश नक्की कधी झाले हे समजणे तसे कठीण असते. मात्र एकदा का ते रूढ झाले, की त्या पुढील पिढ्यांना तेच जणू मूळ असल्यासारखे भासतात. त्यातून बरेचदा संबंधित म्हणीचा अर्थबोध होत नाही. काहीसे बुचकळ्यात पडायला होते तर काही वेळेस काही शब्द हास्यास्पद भासतात. मग या अपभ्रंशांची नवनवीन स्पष्टीकरणे सामान्यांकडून दिली जातात आणि त्यातून काहीतरी नवेच रूढ होते. काही अपभ्रंशांच्याबाबत विविध शब्दकोश आणि भाषातज्ञात देखील मतांतरे अथवा मतभेद असतात. असे काही वाचनात आले की एखाद्या भाषाप्रेमीचे कुतूहल चाळवते. तो त्याचा अधिकाधिक शोध घेऊ लागतो. अशाच काही मजेदार बदल अथवा अपभ्रंशांची जंत्री करण्यासाठी हा धागा.

माझ्या माहितीतील काही उदाहरणांनी (संदर्भासह) सुरुवात करून देतो. नंतर इच्छुकांनी भर घालत राहावी.

१. आठराविश्वे दारिद्र्य
अर्थ : पूर्ण दारिद्र्य

आता १८ ‘विश्वे’ कोणती असा प्रश्न पडतो.
त्याची २ स्पष्टीकरणे मिळाली :

अ) वीस विश्वे (विस्वे) पैकीं अठराविश्वे म्हणजे जवळ जवळ पूर्ण दारिद्र्य. = १८/ २०
(https://bruhadkosh.org/words?shodh=%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BF%...)

ब) 'अठरा विसा' याचा अर्थ १८ x २० = ३६० दिवस, असा होतो. ३६० दिवस म्हणजे एक वर्ष. वर्षाचे सर्व दिवस, सदासर्वकाळ दारिद्रय घरात वसतीला असणे, यालाच 'अठरा विश्वे दारिद्रय' म्हणतात (हणमंते, श्री०शा० १९८० : संख्या-संकेत कोश. प्रसाद प्रकाशन, पुणे)
http://maparishad.com/content/%E0%A4%85%E0%A4%A0%E0%A4%B0%E0%A4%BE-%E0%A...

आहे की नाही गम्मत ! गणितानुसारही चक्क २ वेगळे अर्थ झाले :
१८/२० आणि
१८ गुणिले २० !

२. पुराणातली वांगी पुराणात
अर्थ : उपदेश नुसता ऐकावा, करताना हवे ते करावे ( शब्दरत्नाकर).

आता इथे भाजीतील ‘वांगी ’ कुठून आली हा अगदी स्वाभाविक प्रश्न. मी यासाठी शब्दरत्नाकर व बृहदकोश दोन्ही पाहिले असता त्यात ‘वांगी’ च स्पष्ट लिहिलेले आहे. मात्र ‘वांगी’ हा वानगीचा अपभ्रंश असल्याचे संदर्भ मिळतात. उदा :

यातला मूळ शब्द ‘वानगी’ म्हणजे नमुना हा असावा, ज्याचा नंतर ‘वांगी’ हा अपभ्रंश झाला, असे काही भाषातज्ज्ञांचे मत आहे”.
https://www.loksatta.com/vishesh-news/scientific-research-in-indian-myth...

३. उंसाच्या पोटीं काऊस जन्मला
= हिर्‍याच्या पोटीं गारगोटी. [सं. कु + इक्षु]
https://bruhadkosh.org/words?shodh=%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%8A%E0%A4%B8

इथे कापूस या अपभ्रंशांने खरेच बुचकळ्यात पडायला होते. ऊस श्रेष्ठ असेल तर कापूस कनिष्ठ कसा?

४. परोक्ष
मूळ अर्थ :
एखाद्याच्या पाठीमागें, गैरहजेरींत; डोळ्या-आड; असमक्ष.
मात्र व्यवहारात त्याचा वापर बरोबर उलट अर्थाने ( समक्ष) केला जातो !
हा पाहा संदर्भ :

“अडाणी माणसें परोक्ष याचा समक्ष या अर्थीं उपयोग करतात व असमक्ष करितां अपरोक्ष योजतात”.
(https://bruhadkosh.org/words?shodh=%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%95%...)
. मेत(थ)कूट
याचा सर्वपरिचित अर्थ हा:

तांदूळ, निरनिराळ्या डाळी, मोहऱ्या, मेथ्या इ॰ एकत्र दळून केलेलें पीठ व त्यांत दहीं घालून तयार केलेलें एक रुचकर तोंडीलावणें.
यात मेथ्या असल्याने ते खरे मेथकूट आहे.

पण, ‘मेतकूट जमणे / होणे’ याचा उगम मात्र मित्र + कूट असा आहे.

मेळ; एकी; दृढ मैत्री. 'शिंदे, बाळोबा व भाऊ यांचें मेतकूट झालें होतें.' -अस्तंभा ९६. [सं. मिथः कूट; मित्र-प्रा. मित + कूट] (वाप्र)
दाते शब्दकोश
https://bruhadkosh.org/words?shodh=%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A4%95%...

......
वानगीदाखल मी काही वर दिले आहे.
येउद्यात अजून असे काही. चर्चा रोचक असेल.
**************************************

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

जबाकुसुम - बंगाली उच्चार, जास्वंद.
चीनी बादाम =- शेंगदाणे (बंगालीत)
हल्लागाडी - नगरपालिकेची गाडी, फेरीवाल्यांचा माल जप्त करते ती. (बंगाली सामान्य प्रचलित)

-----
कांस्य (तांबे अधिक जस्त अधिक कथील यांचा मिश्र धातू) सोने चांदी न परवडणाऱ्यांसाठी नसून न गंजणारे , हिरवे पडणारे आहे. लोखंडाच्या कढया गंजतात,पितळेची भांडी हिरवी पडतात. कल्हई करावी लागते . त्यावरचा उपाय आहे. काशाचे तपेले भातासाठी, फोडणीसाठी. बंगाल्यांना लागते.

कांस्य दोनच ठिकाणी पाहिलंय. ऑलिंपिक आदि स्पर्धांमध्ये तिसर्‍या क्रमांकावर आलेल्या स्पर्धकाला कांस्यपदक दिलं जातं.
दुसरं शरीराचा दाह होतो तेव्हा पायाचे तळवे काशाच्या वाटीने घासतात.

जस्त असतं का त्यात? ब्राँझ = तांबे + कथिल copper + tin. असं दिसतंय.

अ‍ॅल्युमिनियम म्हटलंय तिथे काही आ धुनिक कांस्य असे म्हटलेय.
लेखातली दुसरीच ओळ - Modern bronze is typically 88 percent copper and about 12 percent tin.

होय.

तगर शब्दाची गंमत पहा

पुल्लिंगी असताना एडका; मेंढा हा अर्थ
तर
स्त्रीलिंगी असताना ते एक फुलझाड !

तांबे + जस्त = पितळ Brass
तांबे + कथिल = कास्य, कासं Bronze

इति शालेय रसायनशास्त्र

आमच्याकडे दोन काशाच्या थाळ्याही होत्या.
सत्तर ऐशी वर्षांपूर्वी शाळेत तासांचे टोल देण्यासाठी काशाची सपाट ताटली इमारतीच्या प्रवेशद्वाराजवळ टांगून ठेवलेली असे. त्यावर घणासारख्या एका हातोडीने आपटून टोल्यांचा आवाज निर्माण केला जाई.

परंतू हा वाक्प्रचार कसा आला हे नाही दिलं. उल्लू ( घुबड) हा शहाणा,हुशार पक्षी लक्ष्मीचं वाहन समजतात. मग त्याचं पिल्लू/चेला मूर्ख कसं?
गधा/गाढव - आपला अधिकार आहे ती गोष्ट हक्काने न घेणारा. कुंभार गाढवाकडून काम करून घेतो पण खाणं देत नाही. गावचे उकिरडे फुंकायला सोडतो. आणि गाढव त्यात मालकाने आपल्याला खायला सोडलं यात आनंद मानतं.

सगळे जग दिवसा जागे असताना उल्लु झोपलेलं असतं
आणि रात्री जग झोपतं तेव्हा उल्लु जागं असतं
त्यामुळे जेव्हा जे करायचे / करतात ते न करणारा तो मुर्ख अर्थात उल्लु का पठ्ठा

अर्धे जग/ जीवसृष्टी निशाचर आहे मग फक्त उल्लुलाच वेगळं का काढलं?

सूज्ञ पणात आणि श्रीमंतीत आणि जगात पसरलेले सरदार उगाचच जोक्सच्या केंद्रस्थानी कसे? अगदी खुशवंत सिंग यांनीही {आपल्याच} सरदारजी समाजावर जोक्स पुस्तक काढलं.

उल्लू हा घुबड या अर्थाने न घेता कोणी तरी माणूस म्हणून घेतला तर तो मूर्खपणा साठी प्रसिद्ध असू शकेल तर त्याचा शिष्य या अर्थाने तो महामूर्ख असा अर्थ लागतोय. पण आता उल्लू हा कुठल्या नावाचा अपभ्रंश आहे हे शोधले पाहिजे. उलुघ हे एक फारसी नाव आहे. या अर्थाचा कोणी महा मूर्ख होता का ते शोधले पाहिजे. वेडा / येडा महम्मद ज्याप्रमाणे महम्मद तुघलकावरून आले तसा काहीसा प्रकार दिसतोय.

*उल्लू हा कुठल्या नावाचा अपभ्रंश आहे >>
घुबड (उल्लीक)

https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B2%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%...(%E0%A4%89%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A5%82%E0%A4%95)%20%E0%A4%B9%E0%A5%87%20%E0%A4%B2%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A5%80%20%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%87%20%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%A8%20%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%B2%E0%A5%87%20%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%87.

कुमार१ उल्लू हा इथे घुबड म्हणून न घेता कोणाचे तरी नाव म्हणून घेतले पाहिजे. घुबडाचा शिष्य याला काही अर्थ नाही.

उल्लू हा घुबड या अर्थाने न घेता कोणी तरी माणूस म्हणून घेतला तर तो मूर्खपणा साठी प्रसिद्ध असू शकेल तर त्याचा शिष्य या अर्थाने तो महामूर्ख असा अर्थ लागतोय.

हे पटतंय.

हिंदी शब्दकोशांत उल्लू या शब्दाचा घुबड प्रमाणे मूर्ख असाही अर्थ दिसतो आहे. त्याच्या उच्चारामुळे तो अर्थ त्याला चिकटला असावा.

हर्पेन, तोच अर्थ डोक्यात आला होता.

पठ्ठा हे मुलगा या अर्थाने असू शकेल.
कुठल्याशा जुन्या चित्रपटात एक नबाब आपल्या पोराला समजवायला एक शिक्षकाला सांगतो आणि तो त्या पोराला समजवताना "उल्लु के पठ्ठे म्हणतो" नबाबाचे डोळे विस्फारतात,मग चूक लक्षात येऊन शिक्षक ओशाळून माफी मागतो असा विनोद आहे.

शिवाय "गधे की औलाद" वगैरे आहेच. तेव्हा मला उल्लु का पठ्ठा मध्ये सुद्धा तोच अर्थ असावा असे वाटते.

घुबडाला मूर्ख का ठरवलं गेलं? हे बहुधा त्याच्या घु घु अश्या मुक्या माणसासारख्या आवाजामुळे? की उल्लू ला अजून काही अर्थ आहे ?

Pages