नुकताच मराठी म्हणींच्या धाग्यावर ‘उसापोटी कापूस जन्मला’ या म्हणीचा अर्थ विचारला गेला होता. त्यावर शोध घेताना मला रोचक माहिती मिळाली. वास्तविक सदर म्हणीत ‘कापूस’ शब्द नसून ‘काऊस’ हा शब्द आहे. त्याचा अर्थ ‘उसाच्या शेंड्याचा नीरस भाग किंवा कुचकामाचा माणूस’. ‘काऊस’ हा जरा विचित्र शब्द असल्याने याचा कापूस असा सोयीस्कर अपभ्रंश झाला असावा.
या निमित्ताने मनात एक कल्पना आली. वरील म्हणीप्रमाणेच आपल्या भाषेत अनेक शब्द, म्हणी अथवा वाक्प्रचार यांचे अपभ्रंश कालौघात रूढ होतात. त्याची अशी काही कारणे संभवतात :
१. एखादा मूळ शब्द उच्चारायला कठीण असतो
२. तो लोकांत खूप अपरिचित असतो, किंवा
३. भाषेच्या विविध बोली अथवा लहेजानुसार त्यात बदल संभवतात.
म्हणी आणि वाक्प्रचार हे कित्येक शतकांपासून भाषेत रूढ आहेत. तेव्हा त्यांचे विविध अपभ्रंश नक्की कधी झाले हे समजणे तसे कठीण असते. मात्र एकदा का ते रूढ झाले, की त्या पुढील पिढ्यांना तेच जणू मूळ असल्यासारखे भासतात. त्यातून बरेचदा संबंधित म्हणीचा अर्थबोध होत नाही. काहीसे बुचकळ्यात पडायला होते तर काही वेळेस काही शब्द हास्यास्पद भासतात. मग या अपभ्रंशांची नवनवीन स्पष्टीकरणे सामान्यांकडून दिली जातात आणि त्यातून काहीतरी नवेच रूढ होते. काही अपभ्रंशांच्याबाबत विविध शब्दकोश आणि भाषातज्ञात देखील मतांतरे अथवा मतभेद असतात. असे काही वाचनात आले की एखाद्या भाषाप्रेमीचे कुतूहल चाळवते. तो त्याचा अधिकाधिक शोध घेऊ लागतो. अशाच काही मजेदार बदल अथवा अपभ्रंशांची जंत्री करण्यासाठी हा धागा.
माझ्या माहितीतील काही उदाहरणांनी (संदर्भासह) सुरुवात करून देतो. नंतर इच्छुकांनी भर घालत राहावी.
…
१. आठराविश्वे दारिद्र्य
अर्थ : पूर्ण दारिद्र्य
आता १८ ‘विश्वे’ कोणती असा प्रश्न पडतो.
त्याची २ स्पष्टीकरणे मिळाली :
अ) वीस विश्वे (विस्वे) पैकीं अठराविश्वे म्हणजे जवळ जवळ पूर्ण दारिद्र्य. = १८/ २०
(https://bruhadkosh.org/words?shodh=%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BF%...)
ब) 'अठरा विसा' याचा अर्थ १८ x २० = ३६० दिवस, असा होतो. ३६० दिवस म्हणजे एक वर्ष. वर्षाचे सर्व दिवस, सदासर्वकाळ दारिद्रय घरात वसतीला असणे, यालाच 'अठरा विश्वे दारिद्रय' म्हणतात (हणमंते, श्री०शा० १९८० : संख्या-संकेत कोश. प्रसाद प्रकाशन, पुणे)
http://maparishad.com/content/%E0%A4%85%E0%A4%A0%E0%A4%B0%E0%A4%BE-%E0%A...
आहे की नाही गम्मत ! गणितानुसारही चक्क २ वेगळे अर्थ झाले :
१८/२० आणि
१८ गुणिले २० !
२. पुराणातली वांगी पुराणात
अर्थ : उपदेश नुसता ऐकावा, करताना हवे ते करावे ( शब्दरत्नाकर).
आता इथे भाजीतील ‘वांगी ’ कुठून आली हा अगदी स्वाभाविक प्रश्न. मी यासाठी शब्दरत्नाकर व बृहदकोश दोन्ही पाहिले असता त्यात ‘वांगी’ च स्पष्ट लिहिलेले आहे. मात्र ‘वांगी’ हा वानगीचा अपभ्रंश असल्याचे संदर्भ मिळतात. उदा :
“यातला मूळ शब्द ‘वानगी’ म्हणजे नमुना हा असावा, ज्याचा नंतर ‘वांगी’ हा अपभ्रंश झाला, असे काही भाषातज्ज्ञांचे मत आहे”.
https://www.loksatta.com/vishesh-news/scientific-research-in-indian-myth...
३. उंसाच्या पोटीं काऊस जन्मला
= हिर्याच्या पोटीं गारगोटी. [सं. कु + इक्षु]
https://bruhadkosh.org/words?shodh=%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%8A%E0%A4%B8
इथे कापूस या अपभ्रंशांने खरेच बुचकळ्यात पडायला होते. ऊस श्रेष्ठ असेल तर कापूस कनिष्ठ कसा?
४. परोक्ष
मूळ अर्थ :
एखाद्याच्या पाठीमागें, गैरहजेरींत; डोळ्या-आड; असमक्ष.
मात्र व्यवहारात त्याचा वापर बरोबर उलट अर्थाने ( समक्ष) केला जातो !
हा पाहा संदर्भ :
“अडाणी माणसें परोक्ष याचा समक्ष या अर्थीं उपयोग करतात व असमक्ष करितां अपरोक्ष योजतात”.
(https://bruhadkosh.org/words?shodh=%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%95%...)
५. मेत(थ)कूट
याचा सर्वपरिचित अर्थ हा:
तांदूळ, निरनिराळ्या डाळी, मोहऱ्या, मेथ्या इ॰ एकत्र दळून केलेलें पीठ व त्यांत दहीं घालून तयार केलेलें एक रुचकर तोंडीलावणें.
यात मेथ्या असल्याने ते खरे मेथकूट आहे.
पण, ‘मेतकूट जमणे / होणे’ याचा उगम मात्र मित्र + कूट असा आहे.
मेळ; एकी; दृढ मैत्री. 'शिंदे, बाळोबा व भाऊ यांचें मेतकूट झालें होतें.' -अस्तंभा ९६. [सं. मिथः कूट; मित्र-प्रा. मित + कूट] (वाप्र)
दाते शब्दकोश
https://bruhadkosh.org/words?shodh=%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A4%95%...
......
वानगीदाखल मी काही वर दिले आहे.
येउद्यात अजून असे काही. चर्चा रोचक असेल.
**************************************
देठयुक्त = श
देठयुक्त = श
(डोक्यावर बारीक रेघ).
...
गाठयुक्त = ती रेघ नाही परंतु वरून वर्तुळाकार सुरुवात.
प्रत्यक्षात ती बातमी वाचलेली बरी पडेल कारण त्यांनी दोन्ही प्रकार टंकून दाखवलेले आहेत.
इथे पहावे लागेल पण त्यासाठी
इथे पहावे लागेल पण त्यासाठी ते ईमेल मागत आहेत.
https://epaper.esakal.com/FlashClient/Client_Panel_ipad.aspx?One#currPage=3
बघतो. पण याचा अर्थ मी लिहितो
बघतो. पण याचा अर्थ मी लिहितो तो आणि छापील श चुकीचा ठरतोय की काय?
पाकळीयुक्त ल इथे दिसतोय तो असावा. दुसरा ल - त मध्ये असते तशी उजवीकडे उभी पूर्ण रेघ आणि त एकाला एक जोडलेले दोन अर्ध्या त चे आकार..
दुसरा ल - त मध्ये असते तशी
दुसरा ल - त मध्ये असते तशी उजवीकडे उभी पूर्ण रेघ आणि त>>> होय !
तुमच्या हस्ताक्षरातील श ची सुरुवात वर्तुळाने/ गाठीने होत असेल तर तो मान्यताप्राप्त नाही
मला शहामृगातल्या शची तीन रूपे
मला शहामृगातल्या शची तीन रूपे माहिती आहेत. एक, श, रच्या वरती छोटा गोल काढल्यावर होतो, तो, दुसरा, ज्यावर छोटी रेष आहे आणि तिसरा श्र मधला रकार काढून टाकला की राहतो तो. त्यातला तिसरा श हा कोणी तसा फारसा वापरत नाही (फक्त जोडाक्षरांमध्ये दिसतो - अश्व, श्रम, श्लाघ्य, प्रश्न वगैरे शब्दांत). पण शाळेत असताना छोटी रेषयुक्त श हा जुना आणि छॉटा गोलयुक्त हा नवीन असं शिकवलं होतं. आता ह्यातला देठयुक्त कोणता आणि पाकळीयुक्त कोणता?


ह पा मधला देठयुक्त
ह पा
मधला देठयुक्त
(No subject)
.
अच्छा. शन्यवाद, आपलं ..
अच्छा. शन्यवाद, आपलं .. धन्यवाद, डॉ कुमार.
.
शन्यवाद
शन्यवाद
प्रतिसाद काढलात का? उपयुक्त
.
तो छापील मजकुराचा फोटो होता
ह पा
तो तिसरा श रोचक आहे
विश्व सारखे शब्द लिहिताना तो वापरला जातो.
हे माझे आकलन
हे माझे आकलन
अगदी बरोबर !
अगदी बरोबर !
क्लृप्ति या शब्दातला तो
क्लृप्ति या शब्दातला तो वैशिष्ट्यपूर्ण स्वर वर्णमालेतून वगळण्याची मागणीही समितीपुढे झाली होती.
मात्र तो स्वर कायम ठेवण्याचा निर्णय समितीने घेतला आहे.
मात्र तो स्वर कायम ठेवण्याचा
मात्र तो स्वर कायम ठेवण्याचा निर्णय समितीने घेतला आहे >> योग्य निर्णय. कारण ल ला ऋकार काढून जे अक्षर तयार होईल, त्याचे संधीनियम हे लृ (इथे लिहिता येत नाहीये) या स्वराच्या संधीनियमांपेक्षा वेगळे असतील. ऋ चा र किंवा वृद्धी होताना अर् होतो. लृ स्वराचा ल किंवा अल् होतो. त्या स्वराचं अस्तित्व काढून टाकलं तर कल्पना वगैरे शब्दांची व्युत्पत्ती सांगता येणार नाही.
माझ्या ऐकीव माहिती प्रमाणे त्या स्वराचा मूळ उच्चार जो आहे, त्यात र किंवा ऋ हा उच्चारही येत नाही. पण तो जसा लिहिला जातो त्यानुसार लिपीत साधर्म्य असल्यामुळे आपण तसा तो उच्चार करतो. मूळ उच्चार ल च्या जवळ जाणारा असावा (जीभ ही टाळू, मूर्धा किंवा दातालाही स्पष्टपणे न टेकवता)
माझ्या किबोर्डवर पाकळीचा
माझ्या किबोर्डवर 'श' पाकळीचा दिसतो आणि उमटतो देठाचा. हा तिसरा श्व फक्त जोडाक्षरांसाठीच वापरला जातो, नुसता असा अधांतरी बघितला नाही कधी. 'विद्या' शब्द द् ला य किंवा 'द्य' असा जोडून लिहायचो ,पण दोन्ही ग्राह्य होते.

आता टायपिंगच्या सोयीनुसार अक्षरांची वळणं बदलणार असं दिसतंय. कालाय तस्मै नमः!
'क्लृप्ती' हवाचं, कारण मगं जिथेतिथे 'युक्ती' वापरावा लागेल व तो तितका चपखल नसेल.
हपा, हम्म!
क्लृप्ती' हवाचं, कारण मगं
क्लृप्ती' हवाचं, कारण मगं जिथेतिथे 'युक्ती' वापरावा लागेल व तो तितका चपखल नसेल. >>> +१११
सहज फिरत असताना एका बंगल्याचे
सहज फिरत असताना एका बंगल्याचे नाव 'थेंबोरा ' असे दिसले. प्रथमच हा शब्द ऐकला म्हणून सहज शब्दकोशात डोकावलो तर त्याचे हे दोन अर्थ मिळाले:
१ बिंदु; टिपका.
२ प्रळयकाळचा मेघ
https://bruhadkosh.org/words?shodh=%E0%A4%A5%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%AC%...
आजच्या इंडियन
आजच्या इंडियन एक्स्प्रेसमध्ये श आणि ल बद्दल बातमी आहे. त्यातून कळलेली काही माहिती.
आपण मराठी लिहितो ती बाळबोध देवनागरी लिपी. आता बाद केलेली श आणि ल ची रूपे १९६५ साली देवनागरीच्या सगळ्या प्रकारांचं एकीकरण करताना हिंदी देवनागरीतून टंकलेखनाच्या सोयीसाठी आली आहेत. २००९ साली हे बदल करायला विरोध झाला होता, त्यामुळे एक नवी समिती नेमली गेली.
समितीचे अध्यक्ष सदानंद मोरे आता मान्यता दिलेलं श'चं रूप अस्तंगत झाल्यागत आहे, असं म्हणतात. (मी आणि इतर काहींनी म्हटलं तसं, आम्ही कायम श'चं आता चूक ठरलेलं रूपच वापरत आणि पाहत आलो आहोत.
या बदलांसोबतच चंद्रबिंदूलाही मान्यता दिली आहे. विरामचिन्हांच्या आधी आणि नंतर सोडायच्या जागेबाबतही काही सूचना केल्या आहेत.
**"हिंदी देवनागरीतून
**"हिंदी देवनागरीतून टंकलेखनाच्या सोयीसाठी आली आहेत. २००९ साली हे बदल करायला विरोध झाला होता, >>>>
हे माहिती नव्हते. धन्यवाद !
शंका:
शंका:
प्रमाणलेखनातील चिन्हांमध्ये तीन चिन्हांची भर घातलेली आहे असे सकाळ मधल्या बातमीत म्हटले आहे:
१ व्याप्तीचिन्ह : म्हणजे ( ) हे असावे ? की चौकटी कंस? की अन्य काही?
२. छेदचिन्ह : हे भागाकाराचेच आडवे ना?
३. तिर्यकरेषा : / ही असावी
https://www.loksatta.com/pune
https://www.loksatta.com/pune/confusion-rules-education-sector-questioni...
ल आणि श च्या नियमांमुळे गोंधळ - शिक्षण क्षेत्रात नाराजीचा सूर
+१
+१
मटातही असाच एक लेख आहे
आजचा अग्रलेख : मराठी वळणाची प्रतीकात्मकता
https://maharashtratimes.com/editorial/not-insisting-on-letters-is-more-...
एक उत्सुकता.
एक उत्सुकता.
रोमन लिपीत a व g ही दोन अक्षरे आपण हाताने एका प्रकारची लिहितो. पण ब्रिटिश छापील पुस्तकांमध्ये मात्र ती वैशिष्ट्यपूर्ण वेगळी छापलेली असतात.
या मुद्द्यावरून/ भिन्नतेवरून इंग्लंडमध्ये कधी वाद झालेला आहे काय ?
मला खरी कारणं जाणून घ्यायला
मला खरी कारणं जाणून घ्यायला आवडेल. लेखात म्हटलंय त्याप्रमाणे जर हिंदीचं आक्रमण हे कारण असेल तर मुळात देवनागरी लिपी तरी का वापरायची? मोडीच वापरा म्हणावं; कारण तीच मराठीची मूळ लिपी आहे. त्यामुळे हिंदीचं आक्रमण हे कारण अजिबात पटलं नाही.
मागे मराठी संख्यावाचनात एकेचाळीस, बेचाळीस ऐवजी चाळीस एक, चाळीस दोन अशा प्रकारचे बदल पाठ्यपुस्तक समितीने गणिताच्या पुस्तकात केले होते. ते ही असेच अजिबात पटले नव्हते, हे समितीच्या अध्यक्षा मंगला नारळीकर यांच्याविषयी आदर असूनही खेदाने नमूद करतो.
**मोडीच वापरा म्हणावं;
**मोडीच वापरा म्हणावं;

>>> तुम्ही एकदम मुळावरच घाव घातला की हो !
सगळ्या लिपींचे प्रमाणीकरण
सगळ्या लिपींचे प्रमाणीकरण करताना हिंदी देवनागरीतली काही अक्षरचिन्हे मराठीला घ्यावी लागली तर मराठीतली काही चिन्हे हिंदीला स्वीकारावी लागली. मराठीतील अ , झ हिंदीने घेतले तर हिंदीतले श, ल मराठीने घेतले. तसेच ॲपलमधला ॲ हिंदी ने स्वीकारला खरा, पण थोडा बदलून. कॉलेज ह्या उच्चारासाठी ते कॅलेज लिहितात. ॲ साठी त्यांनी ऐ हे चिन्ह ठेवले. कारण त्यांच्या खडी बोलीत ऐ चा उच्चार ॲ सारखा होत होता, होतो. पूर्वेकडे मात्र अई असा करतात. म्हणजे अइसन कइसन वगैरे. त्यामुळे बँक ऐवजी ते बैंक लिहितात. आणि काही भागांत त्याचा उच्चार बईंक असा होतो. कॉस्ट साठी ते कास्ट किंवा कोस्ट असा उच्चार स्वीकारतात. पण कॅस्ट लिहू शकतात.
आमच्या हिंदीच्या पुस्तकात
आमच्या हिंदीच्या पुस्तकात जार्ज बर्नार्ड शा असं लिहिलेला एक धडा आठवला. गंमत म्हणजे आता अमेरिकन उच्चार याच्या जवळचे वाटतात.
हो. अमेरिकन उच्चार तसे वाटतात
हो. अमेरिकन उच्चार तसे वाटतात खरे. अँड ला एं ssड वगैरे. सपाट.
क्लृप्ती मधला ल हा स्वर आहे. उर्दू ( मूळ पर्शियन/ अरेबिक),मधल्या नक्ल अस्ल वस्ल कत्ल वगैरेंमधला ल हा व्यंजन नसून स्वर असावा असे मला आपले वाटत असते.
वरील विषयाला अनुसरून आजच्या
वरील विषयाला अनुसरून आजच्या छापील सकाळमध्ये माधव राजगुरू यांचा, “नव्या निर्णयात वर्णमालेचे प्रश्न अनुत्तरितच” हा लेख आहे. त्यातील एक सूचना उद्धृत:
‘ङ’ या अनुनासिककाचा वापर केवळ वाङमय शब्दातच होतो. त्याचा उच्चारही नीट केला जात नाही. या शब्दाला आपण साहित्य हा पर्यायी शब्द रूढ केलेला आहे. हा विचार करता ‘ङ’ हे अनुनासिक मराठी भाषेतून काढून टाकावे. अभ्यासकांनी ते संस्कृत भाषेतच अभ्यासावे”.
.....
‘वाङमय’ वगळता मराठीत त्याचा अन्य शब्द नाही ?
Pages