वेबसीरीज २

Submitted by sonalisl on 2 June, 2021 - 19:58

तुम्हाला कोणती मालिका आवडली, नाही आवडली, कुठे पाहिली, पाहता येईल त्यावर चर्चा वेबसीरीज. ( https://www.maayboli.com/node/65774 ) या धाग्यावर सुरू झाली. आता तिथली प्रतिसाद संख्या २०००+ झाल्यामुळे हा नवीन धागा..

Group content visibility: 
Public - accessible to all site users

स्ट्रेजर ठिंग..खूपच मोठी नाही का वाटली? किती एपिसोड आणि सीझन!
लवकर गूढ उलगडत नाही म्हणून कंटाळा आला.... शेवटी होतो का उलगडा एकदम?

प्रा मा रोल साठी मुद्दाम हेवी झाली ( पानसे ने सान्गितल तीला वजन वाढवायला) आणि वेश्यावस्तीत जाउन त्या कशा बोलतात , बसतात ह्याचा अभ्यास करुन हा रोल केलाय. असे तिने कुठेतरि सन्गितलय.

अमेझॉन प्राइम वर सुडल suzhal(की सुळलं) सस्पेन्स थ्रिलर वेबसीरीस रिलीज झाली आहे स्टोरी थोडक्यात इथे पहा

https://youtu.be/ah0BWt03qHE

कधी कधी डोळ्यांना जे दिसत ते सत्य नसतं, सत्य वेगळं कल्पनेच्या पलीकडलं अचंबित करणारं देखील असु शकतं. सिरीजमधल्या पोलीस असणाऱ्या "सक्करई" च्या तोंडी एक वाक्य आहे की मला या छोट्याश्या गावातील सगळी माहिती आहे पण आता अस वाटतंय की काहीच माहिती नाही .आपल्यालाही बऱ्याचदा अस वाटतं पण सत्य कधी कधी वेगळं असू शकतं म्हणतात ना "दिसतं तसं नसतं म्हणून जग फसतं "याचा पुरेपूर प्रत्यय ही सिरीज देते.नेहमीचाच पण महत्वाच्या विषय आहे.क्राईम पेट्रोल बघणार्यांना सस्पेन्स लगेच लक्षात येईल तरी सिरीज शेवटापर्यंत गुंतवून ठेवते.मुन्नारच सौन्दर्य आणि देवीचा उत्सव सुंदररित्या चित्रित केला आहे देवीचा सण आणि त्यामागची आख्यायिका याचा कथेशी सुरेख मेळ घातला आहे.

आज पाहून संपवली पंचायत २. दुसरे सिझन फार कमी वेळा चांगले निघतात, ही त्यातलीच एक. हाही भाग आवडला. काही प्रसंग फार हसू फुटवणारे आहेत ते म्हणजे मुद्दाम सावकाश घरी जाताना एक कदम आगे दो कदम पिछे का काय तो, ,,, तो सारखा त्रास देणारा ब्रह्मराकस तर कमाल आहे, रोडला बवासीर काय, आत्मदाह वाला सीन काय, हशा वसूल आहेत अगदी.

सगळे कलाकार आवडले, सगळेच अभिनयात भन्नाट आहेत. विशेष म्हणजे त्या चार जणांचं बॉंडिंग खूप छान आहे, खरं खुरं वाटतं.

शेवट उगाच दु:खद केलाय असं वाटतं पण. पुढचा सिझन यायला हवा, आवडेल बघायला अजून. त्यात मेन म्हणजे सचिवजींना परीक्षेत, नोकरीत यश आलेले बघायला आवडेल, या भागात अभ्यासच नाही केलाय काही Lol . आणि त्याने आणि गावकऱ्यांनी मिळून विधायकला धडा शिकवलेला दाखवावे.

शेवटी जरी गाव सोडून जाण्याची वेळ आली तरी या लोकांशी जमलेले ऋणानुबंध सचिव कायम जपतो असा असावा. तो त्यांना सोडून गेलेला बघताना वाईटच वाटेल, पण त्याची प्रगती त्याशिवाय होणार नाही असं वाटतं. मनाला फार भिडणारी निखळ मनोरंजन करणारी सिरीज आहे ही.

द बॉईज सिजन ३ संपला. अत्यंत मनोरंजक.

सुपरहिरो पॅरोडिज मस्त आहेत. द डीप हे पत्र म्हणजे ऍक्वामॅन ची मूर्तिमंत थट्टा आहे. त्यात गाल गडोट च्या "इमॅजिन" व्हिडिओसाठी सुद्धा खेचलीये.

आवडलेले वाक्य-
With great power comes absolute certainty that you'll turn into a right cu*t
(स्पायडरमॅन मधल्या सुप्रसिद्ध डायलॉगची थट्टा.)

बॉश (अ‍ॅमेझॉन प्राइम)
पहिल्या सीझनपेक्षा सीझन २ आणि ३ जास्त आवडले.
वेगवान, गुंतागुंतीच्या केसेस,
एकेका पात्राचं वैयक्तिक आयुष्य जेवढ्यास तेवढं तरीही परिणामकारक...

तिसर्‍या सीझनला तर एकात एक गुंतलेल्या ३ केसेस एकत्र आहेत. त्यामुळे पात्रं जास्त आहेत. त्यांच्या नावांवरून अधूनमधून घोटाळा झाला, पण एकूण बघायला मजा आली.

गुन्ह्यांचा अथक आणि बारकाईने केलेला तपास तर फार झकास आहे.

बॉश कोरा चेहरा ठेवून वावरतो, पण देहबोलीतून बारीकसारीक गोष्टी नेमक्या दाखवतो.

स्ट्रेंजर थिंग सेम हिअर. पहिला सीझन संपला पण गूढ नाही उलगडलं.
सुझल चौथ्या भागात कंटाळा आला.

मला तर strange things पहिल्या भागात पहिल्या काही मिनिटातच कंटाळा आला. बघावीशी वाटलीच नाही पुढे.

सुझल चौथ्या भागात कंटाळा आला.>>>>> मधला एक भाग ताणलेला वाटला खरं (तोच ना दोघांचा फ्लैशबैकवाला एपीसोड??)पण तो गरजेचा वाटला..पुढचे भाग आहेत वेगवान.

मला तर strange things पहिल्या भागात पहिल्या काही मिनिटातच कंटाळा आला. बघावीशी वाटलीच नाही पुढे.>>मला पण कंटाळा आला होता. पहिला सीझन नवरा बघतोय म्हणून मी पण पाहिला.
आता ४ सीझन आल्यावर २,३ पूर्ण पाहिले. मग ४ था, तो तर मस्तच जमून आलाय.

मी पण पाहिला सुडल.. सब टायटल्स शिवाय पर्याय नव्हता. हीऱो साधासाच पण छान आहे. डोळ्यांतले भाव चांगले दाखवतो. साऊथ असून बटबटितपणा कमी आहे. मला शेवटाचा अंदाज आला नव्हता, इतके क्राईम पॅट्रोल एपि. पाहिले, वाया Wink
मुन्नारच सौन्दर्य आणि देवीचा उत्सव सुंदररित्या चित्रित केला आहे>> अगदी दॄष्ट लागावी असे गाव आणि चित्रिकरण आहे!! मला १ टाईम वॉच वाटला.

पंचायत सिझन1 परत बघायला मजा येतेय.त्यातले बवासीर, आरव आत्माराम, त्या बाईकवर बसणाऱ्या टपोरी लोकांशी मारामारी हे एपिसोड पूर्ण हहपूवा आहेत.
सुरुवातीला अत्यंत वैतागलेला उखडलेला असलेला हळूहळू सचिव कसा परिस्थिती ला रुळत जातो, हळूहळू प्रधान आणि तो असिस्टंट आणि तो लष्करात मुलगा असलेला यांचा चांगला कंपू कसा जुळत जातो हे बघण्या सारखं आहे.

स्ट्रें थिं चा शेवटचा भाग पाहताना पावर कट होत होते. पुन्हा दिवे आल्यावर एकदम पुढचा सीजन सुरू झाला. त्यामुळे क्लायमॅक्स आला असताना एकदम फ्लॅशबॅक मधे का गेले म्हणून वैतागलो होतो. नंतर संशय आल्याने पुन्हा चेक केले तेव्हा 7 मिनिटेच रन झाल्याचे दिसले. आता व्यवस्थित समजले सगळे.
गिळगिळीत स्त्रावाची दृश्ये खूप आहेत. 2000 साली दोन महिने समुद्रावर असताना असलेच किडेमकोडें असलेले 200 च्या वर साय फाय मूवीज बॅक टू बॅक पाहिले होते.

त्या बाईकवर बसणाऱ्या टपोरी लोकांशी मारामारी हे एपिसोड >> आठवत नाहिये हा. पुन्हा पहायला हवा Happy

पंचायत सरखीच दुसरी मालिका गुल्लक..निव्वळ करमणूक Happy
नेफ्लि वर शी चा सिझन २ पाहून संपवली. शेवट असा केलाय की वेळ वाया गेल्या ची फीलिंग आली Sad पण कथानक वेगवान आहे, हिरवीन फारच उदास कळाहिन वाटते वर कुणीतरी लिहिलय त्याला अनूमोदन. तिचं लक चांगलं आहे पण. आश्रम मधेही रोल मिळालाय तिला.

सुडल / सुझल आत्ता संपली. मृणालीने सांगितल्याने जिथे सोडली तिथून पुढे पहायला चालू केली. तो कंटाळवाणा फ्लॅशबॅक संपतच आला होता. जेव्हां एखाद्या मालिका / चित्रपटाकडून आपण अपेक्षा ठेवू लागतो तेव्हां आपण त्याला गांभीर्याने घेत असतो. एरव्ही डोक्याला ताप नाही टाईप असते ते. त्यामुळे आपल्या अपेक्षा जर वाढलेल्या असतील तर ती त्या कलाकृतीला पावती असते. इथे बरेच जण त्याला विरोध करताना दिसतात.

एके काळी रहस्यकथा इतक्या वाचल्या, चित्रपट एव्हढे पाहिले कि आता धक्के बसेनासे झाले आहेत. मधल्या काळात देशी रहस्य मालिकांनी तर पूर्ण वाट लावली. रहस्यकथांच्या बाबत आता असे झाले आहे कि सत्यकथा असेल तरीही तो धक्का कुठे ना कुठे येऊन गेलेला असतो. विनोदी आणि रहस्य चित्रपट बनवून प्रेक्षकाचे समाधान करणे कठीण होत चालले आहे.

यात बरीच उपकथानकं शेवटी जुळणार का ही उत्सुकता होती. समलिंगी संबंध / अल्पवयीन मुलामुलींचे शोषण / मानसिक विकृती हे सध्याचे मालिका / चित्रपटवाल्यांचे हुकमी पत्ते झाले आहेत. मानसिक विकृती हे कार्ड भरपूर वापरून झाले आहे. सायकोथ्रिलर मधे आता काय दाखवणार हे प्रेडिक्टेबल झाले आहे.

या मालिकेचा शेवट करताना धक्का देणे हे ध्येय असल्याप्रमाणे केल्याचे जाणवले. त्यामुळे अनेक गोष्टींच्या बाबतीतला तर्क अनुत्तरीत राहतो. पण ते दुर्लक्ष करता येण्यासारखे आहे. मुख्य म्हणजे ही मालिका खिळवून ठेवते. सध्या एव्हढे मिळाले तरी खूप आहे. स्पॉयलर्स बद्दल सावकाश बोलूयात.

स्ट्रेंजर थिंग्स खूप आवडला हा सिजन सुद्धा. पहिल्या 2 सिजन मध्ये जाम टरकायला झालं होतं. लवकर पाचवा सिजन येऊ देत. तो लालभडक रंग आणि ते टायटल म्युजिक एकदम haunting आहे. बिलीला काम असेल असे वाटले होते पण अगदीच 1 -2 सिन मध्ये होता.

नेव्हर हॅव आय एव्हर - सिजन 3, 12 की 13 ऑगस्टला येत आहे Happy मस्त असेलच हा सिजन पण.

झी५ वर सास बहु आचार सिरिज बघितली. चांगली वाटली. तसा ट्रेलर मधूनच स्टोरीचा अंदाज येतो. प्रेडीक्टेबल आहेच तरीही बघावीशी वाटली.
एका मध्यमवर्गीय कमी शिकलेल्ल्या बाईचा डिवोर्स झाल्यानंतरचा जगण्यासाठीचा स्ट्रगल अमृता सुभाषने छान दाखवलाय. युपीकडची वाटत नाही ती. पण जमलंय समहाऊ. तिची सासू, तिचा बिजनेस मधे मदत करणारा शेजारी शुक्लाजी एकदम अस्सल कॅरेक्टर वठलेत. सासू सुनेचं नातं आवडलं.

सायकोथ्रिलर मधे आता काय दाखवणार हे प्रेडिक्टेबल झाले आहे.-- हो सूडल च हेच गिमिक होतं की तुम्ही काय प्रेडिक्ट करता तसं चित्र उभे केले जात पण सत्य वेगळं दाखवलंय. संशय वेगवेगळ्या लोकांवर टाकण्यात आणि गुंतवून ठेवण्यात सिरीज यशस्वी होते .

सिरीज मध्ये एकच गोष्ट खटकली दोघी बहिणी(नीला नंदिनी) एकमेकींना मेन प्रॉब्लेम बद्दल काहीच कसं शेयर करत नाहीत जनरली बहिणीमध्ये खूप जास्त बॉण्ड असतो वडील एकवेळ पुरुष व शिस्तीचे म्हणून ठीक आहे पण नंदिनीला नीला सत्य का सांगत नाही? हे कळले नाही

या मालिकेत पहिल्या भागापासून कुठल्याशा देवीच्या यात्रेची पार्श्वभूमी सातत्याने आलेली आहे. कणेकर म्हणतात त्याप्रमाणे पहिल्या अंकात जर भिंतीवर रायफल टांगलेली असेल तर तिसर्‍या अंकात तिचा बार उडाला पाहीजे. इथे मात्र त्या देवीच्या यात्रेचा, परंपरांचा, श्रद्धा - अंधश्रद्धांचा कथानकात फारसा फरक पडत नाही. फक्त ती विशिष्ट व्यक्ती देवीच्या मिरवणुकीत सहभागी असते इतकेच कथानकाच्या दृष्टीने महत्व आहे. त्यातल्या नाट्याचा उपयोग शेवटामधे नाट्यमयता वाढवण्यासाठी केला आहे. जर ही पार्श्वभूमी काढून टाकली तरी मालिकेच्या कथानकात फारसा पडत नाही. सुरूवातीपासून दिलेले महत्व पाहता रहस्योद्घाटनामधे महत्वाचे योगदान असायला हवे होते ही अपेक्षा होती.

:स्पॉईलर असू शकतो हा:
>
>
>
>
>

इथे मात्र त्या देवीच्या यात्रेचा, परंपरांचा, श्रद्धा - अंधश्रद्धांचा कथानकात फारसा फरक पडत नाही>>>>>> आम्हाला वाटले हा प्रकार प्रेक्षकांना मिसलीड करण्यासाठी असावा, थोडावेळ आपण बळी वगैरे प्रकार आहे का असा विचार करू लागतो.

मिसलीड करण्यासाठी मोघम उल्लेख ठीक होता. प्रत्यक्षात खूप मोठा हिस्सा या यात्रेने व्यापला आहे.

A suitable boy पहिला भाग बघितला पण काही अंदाज येत नाही. पुढे बघावी अशी उत्सुकता वाटत नाही. ईशान खट्टर वेडा वाटला पहिल्या भागात. ती मोठया डोळ्यांची हिरवीण पण काही आवडली नाही. एवढे लोक फॉरवर्ड होते का त्या काळी की उठसुठ किस करतात, रिविलिंग ब्लाउज घालतात की यांची सामाजिक आणि आर्थिक परिस्थिती तशी होती म्हणून असं दाखवलंय.
गिल्टी माईंडचा पहिला भाग बघितला. चांगला आहे. पुढचे बघेन आता.

Pages