
Work from home आता अंगवळणी पडलेय..
बरेच जण सध्याच्या काळात घरून काम करत आहेत.
Office सारखी सुविधा घरी नसली तरी flexibility असते.
काही वेगळी आव्हाने असतात. जसं की लहान मुलं, ईंटरनेट connectivity, सतत कॉल्स, proper infra चा अभाव वगैरे.
हे सगळं सांभाळून wfh करणाऱ्यांचं कौतुक
तर idea अशी आहे की, काम करण्यासाठी तुम्ही एखादी शांत आणि net ची range येणारी जागा निवडली असेलच.
येथे तुमचे wfh चे अनुभव लिहा.
काही मजेदार किस्से घडत असतील तर ते share करा आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तुमच्या कामाच्या कोपऱ्याचा (workplace at home) फोटो इथे डकवा.
मला खरंच उत्सुकता आहे की non IT falks घरून काम कसे करतात?
Online lectures घेणाऱ्या शिक्षकांची कमाल वाटते आणि कौतुक ही.. असे विविध क्षेत्रातील अनुभव येथे आले तर मजा ना??
-------------
Desktop wallpaper वरून कंपनी कोणती हे समजले तरी इथे सांगू नये
हो, सध्या अर्धी अर्धीच. किंवा
धन्यवाद..
हो, सध्या अर्धी अर्धीच. किंवा ज्यु. ऋ सुद्धा आपला संसार थाटतो ईथे. महिना सुद्धा नाही झालाय हे अंगण तयार होऊन त्यामुळे मारामारी जोरात आहे. हा फोटो लेकीच्या मॅथ्सचा अभ्यास घ्यायला बसलेलो तेव्हाचा आहे. माझी तास दोन तासांची नुसते कानाला हेडफोन लाऊन ऐकायची मिटींग असते तेव्हा ईथे जाऊन बसतो तंगड्या पसरून. कॅरमही आता ईथेच खेळतो. सुट्ट्यांमध्ये पोरगी मैत्रीणींना घेऊन अड्डा जमवायची. कारण सध्या अशी बाल्कनी सोसायटीत आमच्याच नशीबात आहे. एकदा लाईट गेलेली दुपारचे तेव्हा या जागेला सोन्याचा भाव आलेला.
ईथे वारा बाहेरून आत येत नाही तर आतून बाहेरच्या दिशेला वाहतो. अर्थात हॉलच्या बाल्कनीतून येणारा. त्याचमुळे बहुधा पाऊस सुरू झाला तरी अजून आतला कट्टा काही भिजला नाही. त्यामुळे एखादा चहाचा कप हातात घेऊन न भिजता पावसाचा गारवा अनुभवायला छान जागा आहे. काम वा अभ्यास करतानाही अचानक पाऊस आला तर पळापळ होणार नाही असे वाटते.
जागेच ठीक आहे पण अजूनही ऋ
जागेच ठीक आहे पण अजूनही ऋ सराना वर्क फ्रॉम होम आहे हे वाचून Wow झालं
सुरू झालेय रेग्युलर ऑफिस
सुरू झालेय रेग्युलर ऑफिस केव्हाचेच.
(असे का तो स्वतंत्र धाग्याचा विषय आहे)
पण मी स्पेशल केस आहे
मला आठवड्यातून दोन दिवस आलास तरी खूप असे म्हणतात. पण प्रत्यक्षात मी महिन्यातून तीन दिवस जातो. त्यातही शेवटचे ऑफिसला जाऊन आज चार की पाच आठवडे पुर्ण झाले आहेत.
नवीन घरातील कामाचा कोपरा
नवीन घरातील कामाचा कोपरा
शिस्तीत सगळं गरजेचं setup करून घेतलंय
४ महिने झाले इथून काम करतोय दोघे
पोरांना अभ्यासाला होईल च ही जागा, शाळेत जातील तेव्हा
आज photo काढले finally
आज photo काढले finally
अरे वाह, छान डिजाईन केलेला
अरे वाह, छान डिजाईन केलेला आहे..
तुमचेही अजून वर्क फ्रॉम होम चालूय का?
मस्त कोपरा आहे किल्ली.
मस्त कोपरा आहे किल्ली.
सुंदर आहे कोपरा.
सुंदर आहे कोपरा.
आम्ही (घरातले सगळे) इतक्या मोठ्याने कॉल वर बोलतो की असे शेजारी बसूच शकत नाही.आता सगळे थेट ऑफिसातच जातो.
स्वच्छ, सुंदर आणि आटोपशीर डिझाईन केलाय कोपरा.
हो अजूनही चालू आहे, मी ह्याच
हो अजूनही चालू आहे, मी ह्याच project मध्ये राहिले तर नेहमीसाठी wfh असेल. कारण project ची odc पुण्यात नाही.
Team chennai ला बसते.
म्हणून मी घरूनच करतेय.
थँक्यू
दार लावून इथे कोंडून घ्यावे लागते काम करताना नाहीतर माझे दोन resources call वर बोलतील
नशिबाने नवऱ्याचं ही wfh आहे अजून, आमचे call एका वेळी सुरु असतील तर एकजण जागा बदलतो. पण हे क्वचित होतं.
@किल्ली >>> भारीच. एकदम
@किल्ली >>> भारीच. एकदम प्रोफेशनल लूक आहे.
आम्ही असे शेजारी काय एक खोलीपण शेअर करू शकत नाही इतके नवर्याचे कॉल्स असतात. पण त्याचं ऑक्टोबरमधेच वर्क फ्रॉम ऑफिस सुरू झालं.
<<आज photo काढले finally>>
<<आज photo काढले finally>> छान मुहूर्त मिळाला. भिंतीवर एखादे ईमारतींचे चित्र चिटकवा म्हणजे आणखी छान वाटेल.
भारीच. एकदम प्रोफेशनल लूक आहे
भारीच. एकदम प्रोफेशनल लूक आहे........ +1.
wow !!!! ऋन्मेष तुमचा हा
wow !!!! ऋन्मेष तुमचा हा कोपरा मला पुष्कळ पुष्कळ आवडला। उगीच उन्हाळ्यातील अनेक वाळवणीचे पदार्थ आठवले।
भिंतीवर एखादे ईमारतींचे चित्र
भिंतीवर एखादे ईमारतींचे चित्र चिटकवा म्हणजे आणखी छान वाटेल-- बाजूच्या खिडकीतून इमारती दिसतातच, मान वळवली की झालं
त्याचाही photo काढून डकवते इथे
ऋ, तुमची जागा आवडली,
ऋ, तुमची जागा आवडली, माझ्याकडे तशी चटई आहे

अजनबी हो, वाळवणीच्या
अजनबी हो, वाळवणीच्या पदार्थांसाठी वापरायचे शिल्लक आहे ती जागा अजून
किल्ली, अशी चटई पोरं असलेल्या घराघरात असावी असे वाटते. एका बाजूला कार्टून, एका बाजूला एबीसीडी वगैरे. मलाही चटई अंथरायची असेल तर मी सुद्धा ही पोरांचीच वापरतो
बाजूच्या खिडकीतून इमारती दिसतातच >>> याचा तर एक वेगळा धागाच हवा. तुमच्या खिडकीतून काय दिसते

स्पेशली पावसाळा सुरू झाले की रोजच ईतक्या भारी छटा दिसतात की मी तर काम सोडून बाहेरच नजर लाऊन बसतो. मग ऊठून एखादा फोटो काढतो. आणि पुन्हा जागेवर बसून कामाला सुरुवात करतो
नेकी और पूछ पूछ
नेकी और पूछ पूछ
होऊन जाऊ द्या खिडकी view धागा, ऋ
हो, मी याच परवानगीची वाट बघत
हो, मी याच परवानगीची वाट बघत होतो. काढतो रात्री काम झाल्यावर
किल्ली मस्त कोपरा. ४ महिने
किल्ली मस्त कोपरा. ४ महिने वापरुनही क्लटर फ्री आहे, मनल पाहीजे तुला.
मी अॅडजस्टेबल डेस्क घेतला. विचार बर्याच दिवसांपासुन होता,पण आता परत ऑफीस मधे जाण्याची शक्यता शून्य झाल्यामुळे घेउन टाकला...
मेरा प्रतिसाद ही मेरा वचन है
मेरा प्रतिसाद ही मेरा वचन है
तुमच्या खिडकीतून काय दिसते !
https://www.maayboli.com/node/81846
किल्ली तै, भारीच आहे जागा. मी
किल्ली तै, भारीच आहे जागा. मी काही सुचवु इच्छितो,
१. टेबलाच्या उजव्या कोपर्यात वरच्या कपाटाची सावली जिथे पडलीय तिथे आणी त्याच बाजुला भिंतीच्या कॉलममधे असणार्या ९० डि. कोनात, काचेचे त्रिकोण बसवुन घ्या त्यावर काही मुर्त्या, किंवा डिझायनर पीस किंवा घरात वाढणारी झाडे(रोपं) लावा किंवा तुमच्या बाळांचे (ल ते मो ) असे फोटो छोट्या फ्रेम करुन ठेवा.
२. टेबल आणी वरचे कपाट या मधे मोकळी असलेली भिंत..त्यावर स्टिकर(अॅमेजॉन्वर मिळतात, फुलं, गवत किंवा तत्सम) किंवा मोटीवेशनल मेसेज चिकटवा.
खूप दिवसांनी माबोवर चक्कर
खूप दिवसांनी माबोवर चक्कर मारली तर या धाग्याबद्दल कळले. म्हणून धागा शोधला. धाग्याची कल्पना आवडली.


मी लॉकडाऊनच्या आधीपासून घरूनच काम करते आणि अजूनही तसेच करतेय. माझे होम स्टुडिओ/ ऑफिस आहे.
या स्टुडिओत तारेचे काम, स्केचिंग, पेंटिंग, अपसायकलिंग हे सगळे करते. फोटो जुना आहे. कडेला लॅपटॉप दिसतोय ती जागा आता अपसायकलिंग साठी थाटलेल्या टेबलाने घेतली आहे. आणि लॅपटॉपचे टेबल रुममध्येच दुसरीकडे हलवले आहे. त्यापुढे बसून मी लिहिते अर्थात.
डाव्या बाजूला फ्रेंच विंडो व बाल्कनी आहे. तिथून दूरवर समुद्राची कडा दिसते. रोजचा सूर्यास्त दिसतो.
कॅमेऱ्याच्या मागच्या बाजूला पुस्तकांचे कपात आणि इतर स्टोरेज कॅबिनेट्स आहेत.
भिंतीवर आहेत त्या तारेच्या वस्तू सगळ्या वर्क इन प्रोग्रेस किंवा चुकलेला प्रयोग किंवा स्टडी किंवा असंच खेळ म्हणून केलेले तुकडे वगैरे आहेत. त्यामुळे त्यात वेळोवेळी भर पडत असते. तारा ठेवण्यासाठी ताटाळे वापरले आहे. हे असं आणि इतकं आवरलेलं दर 8-15 दिवसांनी असतं. पण आवरल्यापासून परत काम सुरू करेपर्यंत टिकतं.
डिसेंबर 2018 मध्ये आम्ही वसईत आलो तेव्हापासून ही खोली माझा स्टुडिओ आहे. फार प्रिय आहे मला ही जागा.
काही कारणामुळे आता हा होम स्टुडिओ/ ऑफिस घरातून हलवावे लागणार आहे. घर तेच असेल फक्त स्टुडिओ बाहेर पडेल. महिना दीड महिन्यात तो बदल होईल.
मस्त आहे नी. एकदम कलाकाराची
मस्त आहे नी. एकदम कलाकाराची जागा.मला पिक्चर मध्ये पेंटिंग स्टुडियो दाखवतात ते आठवलं.
मला तो वरचा फोटो पटकन किचन कम
मला तो वरचा फोटो पटकन किचन कम डायनिंग वाटले. मागे भिंतीवर भांड्यांच्या शेल्फ वगैरे..
छान आहे. वेगळे आहे. आर्टिस्टीक आहे..
यातली कुठलीच सजावट ठरवून
थँक्यू!
यातली कुठलीच सजावट ठरवून वगैरे केलेली नाही. तारांची भेंडोली टेबलवर पडून राह्यली की कामाला जागाच उरत नाही धड आणि गोंधळ होतो प्रचंड. काही सापडत नाही. ताराही खराब होतात. त्यामुळे काहीतरी व्यवस्था करायची होती. मग घरात माझे ताटाळे पडलेले होते. या घरात किचनमध्ये कॅबिनेट्स असल्याने त्याची गरज नव्हती. मग तेच लावून घेतले भिंतीवर.
त्या तारेच्या वस्तू टाकायच्या नसतात, ठेवायला जागा नसते, डब्यात ठेवाव्यात तर गुंता होतो. मग सरळ भिंतीवर चढवायला सुरुवात केली. बरे दिसले. मग तसेच ठेवले. अर्थात ते बदलत असते.
छान, कलात्मक जागा नीधप
छान, कलात्मक जागा नीधप
कॄष्णानेच गीतेत सांगीतलेले
कॄष्णानेच गीतेत सांगीतलेले आहे ना तुझे व माझे अनेकानेक जन्म झाले , तुला ते आठवत नाहीत मला आठवतात. म्हणजे काय तर जन्माचा फेरा ईश्वरालाही चुकला नाही. '
नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः।
न चैनं क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः।।
अर्थात ना शस्त्राने छेदला जातो, ना आगीने जळतो, पाण्याने ओला होत नाही की वार्याने सुकत नाही.
म्हणजे एकंदर आत्मा अनविनाशी असून, भिरभिरत रहातो. या अस्तित्वाच्या मागची भिंगरी काही सुटत नाही. मग त्यातल्या त्यात प्रयत्न हाच असतो की ही जी काही मॅट्रिक्समधली कैद आहे ती सुसह्य व्हावी. पहायला गेलं तर तर प्रत्येक व्यक्ती अस्तित्व सहज व्यतित करण्याच्या, आपल आपला प्रवास सुसह्य करण्याच्या मागे आहे असेच दिसते. हां कोणी तामसिक मार्गं अवलंबतं तर कोणी राजसिक वा सात्विक. मार्ग भिन्न, गंतव्य एकच. त्यामुळे आपल्याला करता येण्यासारखे एकच - स्वतःच्या सहजसुंदर अस्तित्वाकरता प्रयत्न तर कराच पण अन्य कोणाचा प्रवास सुसह्य करता आला तर जरुर मदत करा. मधुर बोलणे, कोणाच्या व्यवहारात नाक न खुपसणे, मुख्य म्हणजे इतरांना शक्यतो जज न करणे - या काही बाबी आपल्या कक्षेत आहेत, आपल्याला करता येण्यासारख्या आहेत. इतरांच्या उत्तम कृतीची दखल घेणे, त्यांच्याकडुन प्रेरणा घेणे, त्यांना प्रोत्साहन देणे - किती म्हणुन करता येण्यासारखे आहे. 'कोहम' हे कोडे कोणालाच उलगडलेले नाही.
बुद्ध धर्मात कुआन यिन देवी आहे जी की स्त्रीरुप अवलोकितेश्वर मानली जाते. मुलीने परवा चायनाहून तिचे पोस्टर माझ्याकरता आणले. आणि हे सर्व विचार अचानक माझ्या मनात येउ लागले. हा चमत्कार नसेलच. सबकॉन्शसने या कुआन यिनच्या नव्या अस्तित्वाची घेतलेली दखल आहे. ही देवी आहे करुणेची, इतरांना केलेल्या मदतीची. सहसा मोक्षप्राप्तीनंतर प्रत्येक जण बुद्ध बनतो व मग जन्म मरणात परत फिरत नाही. तशी ही देवी बुद्ध बनून निर्वाणपदी जाते वेळी, तिला पृथ्वीवरी मानवांचा आक्रोश ऐकू आला णाइ ती थबकली. तिने संकल्प हा केला की सर्व मानवांना जोपर्यंत बुद्धहुड मिळत नाही तोपर्यंत ती निर्वाण स्वीकारणार नाही. ती इतरांना मदत करणारी अशी दयाळू, करुणेची मूर्ती आहे.
Post वाचायला घेतली आणि वाटले
Post वाचायला घेतली आणि वाटले गल्ली चुकली की काय
नीधपचा कामाचा कोपरा / होम
नीधपचा कामाचा कोपरा / होम स्टुडिओ आवडला.
हा धागा दोन वर्ष बघितला नव्हता, आश्चर्य च आहे.
ती तारेची कामं किती सुरेख दिसताएत.
>>>>>Post वाचायला घेतली आणि
>>>>>Post वाचायला घेतली आणि वाटले गल्ली चुकली की काय Happy

Pages