
Work from home आता अंगवळणी पडलेय..
बरेच जण सध्याच्या काळात घरून काम करत आहेत.
Office सारखी सुविधा घरी नसली तरी flexibility असते.
काही वेगळी आव्हाने असतात. जसं की लहान मुलं, ईंटरनेट connectivity, सतत कॉल्स, proper infra चा अभाव वगैरे.
हे सगळं सांभाळून wfh करणाऱ्यांचं कौतुक
तर idea अशी आहे की, काम करण्यासाठी तुम्ही एखादी शांत आणि net ची range येणारी जागा निवडली असेलच.
येथे तुमचे wfh चे अनुभव लिहा.
काही मजेदार किस्से घडत असतील तर ते share करा आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तुमच्या कामाच्या कोपऱ्याचा (workplace at home) फोटो इथे डकवा.
मला खरंच उत्सुकता आहे की non IT falks घरून काम कसे करतात?
Online lectures घेणाऱ्या शिक्षकांची कमाल वाटते आणि कौतुक ही.. असे विविध क्षेत्रातील अनुभव येथे आले तर मजा ना??
-------------
Desktop wallpaper वरून कंपनी कोणती हे समजले तरी इथे सांगू नये
आधीच्या 1-२ फोटोत footrest
आधीच्या 1-२ फोटोत footrest ठेवलेले आढळले.वर्थ असते ते.
माझा एक सल्ला
माझा एक सल्ला
खुर्ची table online महाग वाटले, same quality चे setup आम्हाला कोपऱ्यावरच्या furniture च्या दुकानात किफायतशीर किमतीत मिळाले
माझी कंपनी टेबल/खुर्ची
माझी कंपनी टेबल/खुर्ची घेण्यासाठी वेगळा अलावन्स देत आहे. मला लवकरच घ्यायची आहे
>>>>
आमच्या कंपनीनेही १५ हजार दिलेत प्रत्येकी.
पण घेतले किती जणांनी शंका आहे.
मी सुद्धा घेतले नाही अजून काही. नवीन घरात सेट झालो की घ्यावे लागेल. आता हे कोरोना फोरोना उर्वरीत आयुष्य चालूच राहणार
हा नवीन घरातील टेंपरवारी
हा नवीन घरातील टेंपरवारी जुगाड
डाईनिंग टेबलवर किचन आणि टीव्ही ठेवायच्या टेबलावर कम्प्युटर
..
धन्यवाद साधना.. कुणीतरी
धन्यवाद साधना.. कुणीतरी खुर्ची बद्दल विचारत होते. ६.५ हजारापासून होत्या दुकानात..(पुणे-SNDT पूलावरुन उतरले की डाव्या हाताला आहे एक दुकान) माझी around 8k आहे. online बघुन comfort कसा आहे ते कळत नाही .. आणि किम्मत पण जास्त वाटली.
निरु यांच्या जागेतल्या
निरु यांच्या जागेतल्या दिव्यांचा वापर, जागा खूप छान आहेत >> +1
या खुर्च्या dismantle करून
या खुर्च्या dismantle करून घरी परत assemble करता येतात का?
माझी तरी तशी नाहीये.
माझी तरी तशी नाहीये.
या खुर्च्या dismantle करून
या खुर्च्या dismantle करून घरी परत assemble करता येतात का? >>>
कुंतल हो. आमच्या ऑफिसमध्ये सप्लायरचा माणुस येऊन असेंम्बल करायचा. स्क्रू ड्रायव्हर, स्पॅनर व्यतिरिक्त ऍलन की किंवा स्पेशल टूल लागु शकते. ऑनलाईन ऑर्डर करताना असेंम्बलीसाठी लागणारे टूल्स सोबत पाठवण्याची अपेक्षा आहे, तसे ते करत आहेत का याची ऑर्डर करण्याआधी खात्री करून घ्यावी.
माहिती बद्दल धन्यवाद
माहिती बद्दल धन्यवाद
(No subject)
बहुपयोगी जागा आहे..कधीकधी इस्त्री करायलाही उपयोग करतो.. पण मग सगळा संसार आवरावा लागतो आधी.:
>> चाकंवाल्या खुर्चीचं मॉडेल
>> चाकंवाल्या खुर्चीचं मॉडेल किंमत वगैरे लिहा ना कोणी तरी
>> Submitted by व्यत्यय on 29 August, 2020 - 00:10
स्टीलचा पाया असलेली खुर्ची घ्या. (वरती एका प्रतिसादात किल्ली यांनी फोटो टाकला आहे). पीव्हीसी प्लास्टिक पाया असलेली अजिबात घेऊ नका. काहीही कारण सबळ कारण नसताना चार-सहा महिन्यात अचानक काड्कन मोडते हे पीव्हीसी.

या व्यतिरिक्त मधला हैड्रोलिक गॅस लिफ़्ट सिलिंडर (उंची कमीजास्त करणारा) कालांतराने खराब होतो. पण त्याबाबत फार पर्याय नाही. कोणत्याही खुर्चीवाल्याकडे तो चार पाचशे रुपयेला बदलून मिळतो (किंवा आजकाल Amazon वर पण मिळत असेल)
बाकी, संगणकावर तासंतास काम करायचे तर अशी खुर्चीच (Revolving Chair) हवी. त्याची उंची व्यवस्थित एडजस्ट केलेली हवी. हे कटाक्षाने पाळायला हवे. अन्यथा पाठदुखी, मानदुखी ठरलेली.
>> Submitted by निरु on 28
>> Submitted by निरु on 28 August, 2020 - 23:48
खूप छान आणि कलात्मक मांडणी.
बाकी सर्व जणांचे पण छान ऑफिस कोपरे. (म्हाळसा, प्राचीन, mrunali.samad, ऋन्मेऽऽष)
म्हाळसा, तुम्ही पण किचन कौंटर
म्हाळसा, तुम्ही पण किचन कौंटर वर आयकियाचा हातोडा आणि स्क्रूड्रायव्हर ठेवता ना!
आमचे घराचे अॅग्रिमेंट आता
आमचे घराचे अॅग्रिमेंट आता रिन्यु होईल मग डेस्क घेउ. कोपरा शोधुन ठेवला आहे. जिथे वारा लाइट इंट र नेट व्यवस्थित आहे. डेस्कच्या मागे लावायला आयकिया च्या गिफ्टी आल्या आहेत आधीच. सेट अप झाले की फोटो टाकता येइल. लेक युनि मध्ये गेल्या मुळे दहावीतले अभ्यासाचे डेस्क वगैरे काढून टाकले होते. आता नव्याने घेणे आले.
पाठ दुखी होउ नये म्हणून एक बॅक सपोर्ट अशी फर्म उशी मिळते. माझ्या ऑफिसात एक नव माता वापरत होती. लॉक डाउन लागल्याने इथे कोणीच नसते म्हणून मी सध्या ती बॅक सपोर्ट उशी बॉरो केली आहे. ती जॉइन झाली की परत करेन विथ थँक्स.
माझे म्हणाल तर जे वर्क फ्रॉम होम करतात त्यांना मी अॅक्चुअल कंपनीतून सपोर्ट करते. तिथे ही दोन तीन लोकेशन्स आहेत. इथ ले फोटो बघुन मस्त वाटले.
@अमा, त्या बॅक सपोर्ट उशीचा
@अमा, त्या बॅक सपोर्ट उशीचा फोटो टाकाल का?
माझ्यासारख्या गरजूंना फायदा होईल.
पाथफाईंडर, ही पाठीच्या
पाथफाईंडर, ही पाठीच्या आधारासाठी Ergonomic उशी..
जोडीला Foot Support असेल तर खूप फायदा होतो. स्वानुभव..
हे बेस्ट आहे
हे बेस्ट आहे
मध्ये मी कार ड्राइव्ह करताना बँक रेस्ट होत ते वापरत होतो घरी काम करताना
त्यामुळे पाठीला घाम येत नाही आणि अंग पण अवघडत नाही
@निरूदा, धन्यवाद.
@निरूदा, धन्यवाद.
माझ्या घरात बेडशेजारी कॉम्पॅक्ट जनरल टेबल आहे जे सध्या WFH ला बेडवर बसून वापरतो. कोरोनापुर्व काळात, कधीकधी अधिकचे काम असेल तर ऑफिसचा लॅपटॉप घरी आणून ३~४ तास काम होत असे. पण आता ८ तास पाठीला विनाआधार बसणे कठीण जाते. (घरातील इतर जागा ईंटरनेट रेंज / पावरप्लग/ आवाज / सिनियर सिटीझन च्या आरामाच्या जागा या कारणास्तव सोयीच्या नाहीत)
मागे एका मराठी मासिकात ( बहूतेक मेनका) पुण्याच्या एका प्रॉडक्ट ची जाहिरात बघीतली होती, ज्यात खुर्चीचे पाय काढल्यावर असेल असा बसायला पृष्ठभाग आणि पाठीला सपोर्ट होता. समतल पृष्ठभागावर ठेवून त्यावर तुम्ही मांडी घालून बसू शकता. प्राणायाम सारख्या आसनांसाठी त्यांनी हे प्रॉडक्ट रेकमेंड केले होते. कुणाला कल्पना असेल तर इथे कळवाल का?
हे असं का?अमेझॉन वर खूप
हे असं का?अमेझॉन वर खूप आहेत
https://www.amazon.in/Meditation-Yoga-Chair-backsupport-Medium/dp/B07MDC...
धन्यवाद अनु. बघतो.
धन्यवाद अनु. बघतो.
ही बॅक सपोर्ट आम्ही घेतली
ही बॅक सपोर्ट आम्ही घेतली होती, खूप जुनी आहे, पण पाठीला खूप आराम मिळतो
(No subject)
(No subject)
Snig fitting
Snug fitting.
A foot rest is also helpful
_/\_ धन्यवाद सगळ्यांना.
_/\_ धन्यवाद सगळ्यांना.
ऑफिसात किंवा घरी , सलग आठ
ऑफिसात किंवा घरी , सलग आठ किंवा त्यापेक्षा कमीही तास बसून राहू नका.
दर ४५ मिनिटांनी उठून एक फेरी. दोन तीन तासांनी स्ट्रेचिंग करा.
डोळ्यांच्या रिलॅक्सेशनसाठी मायबोलीच्या रेसिडेंट आय सर्जननी एका गणेशोत्सवातच सांगितलेली दर वीस मिनिटांनी वीस सेकंदांसाठी वीस फूट दूरचे पाहणे ही टिप लक्षात ठेवा.
भरत धन्यवाद.
भरत धन्यवाद.
सलग अर्धा तास काम होते, डोळ्यांचे व्यायाम ऑफिसमधे असतानाही करत होतो, अजुनही करतोय. पण खुर्चीमध्ये टेकून जसे काम तसे घरी होत नाही. लवकरच ऑफिस पुर्णपणे चालू होईल ही अपेक्षा. त्यामुळे खुर्चीची इन्व्हेस्टमेंट नको वाटतेय. मध्यममार्ग शोधतोय.
हा आमचा कामाचा कोपरा - भिंत
हा आमचा कामाचा कोपरा - भिंत म्हणा. दिवसावेळी बायडी चं काम (तिला लॅपटॉप आहे निराळा) आणि रेफरन्स करता पुस्तकं.
वर्कस्टेशन माझं आहे. वायफाय इनेबल (अॅडाप्टर वापरून) करून घेतलाय कारण इंटरनेट केबल इथपर्यंत आणणं अशक्य आहे. ब्लूटूथ ही करून घेतला कारण मग डिवायसेस कनेक्ट करायला सोपं पडतं. आणि गूगल मीट, टीम्स चे कॉल्स/ स्क्रीन शेअर इ. एकाच ठिकाणाहून घेता येतात. वायर्ड हेडफोन्स वापरायची गरज पडत नाही.
करड्या रंगाचा स्पिकर श्रवणभक्ती वाले कॉल्स घ्यायला (गाणी ऐकायला पण), बाकी जिथे मी होस्ट आहे किंवा बोलायची गरज असते तेव्हा इअरफोन्स वापरतो.
आयपॅड पुस्तकं वाचायला अधून-मधून. सायकल अशीच चालवतो मनात असेल तेव्हा. बायडी नेमानं दुपारी चालवते.
चेअर आता परवा घेतली. मागच्या महिन्यात माझा डावा खांदा कारण नसतांना फार दुखत होता आणि नेमकं कारण कळत नव्हतं. घरचे करण्यासारखे सगळे उपाय झाले पण काहीही फायदा झाला नाही. पण मग दु:ख आपोआप थांबलही. नंतर काही दिवसांत बायडीला उजवा खांदा आणि पाठीचं दुखणं लागलं सो काम करतांना नीट न बसल्यानी हे होतंय यावर गाडी आली. आधी आम्ही साधी डायनिंग टेबलची हात नसलेली खुर्ची वापरत होतो.
शेवटी जाऊन घेऊन आलो. स्टील बेस आहे, कुठल्याही पोझिशन ला लॉक होते. हायड्रॉलिक्स वर १ वर्ष गॅरंटी आहे. लोकलीच घेतली आहे. किंमत ४५००/-. वर्थ द इनव्हेस्ट्मेंट असंच म्हणेन आता कारण खूपच फरक पडतो. पाठीला सपोर्ट हाताला सपोर्ट इ.
त्यावर चादर का टाकलीय? कारण त्या खूर्चीचे दोन समोरचे टोकं टेबलाच्या दारांना घासून खुर्चीचं रेग्झीन खराब होऊ नये म्हणून
किती क्युट अरेंजमेंट. त्या
किती क्युट अरेंजमेंट. त्या काम करताना तुम्ही तिथे बाइक वर बसुन गप्पा मारत असाल असे चित्र डोळ्यासमोर आले. मेनली आज काय स्वयंपाक करुन बघायचा वगैरे. ती चादर भारी. मी मध्येच गरम चहाचा कप घेउन ती चादर पांघरून रविशंकरची सतार ऐकेन डोळे मिटून. सीनीअर जॉइज.
Pages