
Work from home आता अंगवळणी पडलेय..
बरेच जण सध्याच्या काळात घरून काम करत आहेत.
Office सारखी सुविधा घरी नसली तरी flexibility असते.
काही वेगळी आव्हाने असतात. जसं की लहान मुलं, ईंटरनेट connectivity, सतत कॉल्स, proper infra चा अभाव वगैरे.
हे सगळं सांभाळून wfh करणाऱ्यांचं कौतुक
तर idea अशी आहे की, काम करण्यासाठी तुम्ही एखादी शांत आणि net ची range येणारी जागा निवडली असेलच.
येथे तुमचे wfh चे अनुभव लिहा.
काही मजेदार किस्से घडत असतील तर ते share करा आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तुमच्या कामाच्या कोपऱ्याचा (workplace at home) फोटो इथे डकवा.
मला खरंच उत्सुकता आहे की non IT falks घरून काम कसे करतात?
Online lectures घेणाऱ्या शिक्षकांची कमाल वाटते आणि कौतुक ही.. असे विविध क्षेत्रातील अनुभव येथे आले तर मजा ना??
-------------
Desktop wallpaper वरून कंपनी कोणती हे समजले तरी इथे सांगू नये
सर्वांचे नीटनेटके कोपरे बघून
सर्वांचे नीटनेटके कोपरे बघून फोटो टाकायचा धीर होत नाही. इतके अस्ताव्यस्त टेबल कुणाचेच नसेल. काय म्हणतील सगळे जण!


किल्लीतै ने टाकलेला (झबले
किल्लीतै ने टाकलेला (झबले-झबले-आंगडं-टोपडे घातलेला डेस्कटॉपचा) फोटो पाहुन माझ्या लॅपटॉपनेपण "दुनियादारीतल्या झपाटलेल्या बाहुल्या" सारखा स्वेटरचा हट्ट धरलाय. :))
राभु, माझे असेच टेबल आहे आणि
राभु, माझे असेच टेबल आहे आणि त्यावर यापेक्षा जास्त पसारा आहे
राभु मी पण ,मी पण ,सेम पिंच.
राभु मी पण ,मी पण ,सेम पिंच. काही वाईट वाटून घेऊ नकोस.
राभु सेम हियर. ऑर्गॅनिकली जमा
राभु सेम हियर. ऑर्गॅनिकली जमा झालेला पसारा आहे
अनु, धनुडी, सामो
अनु, धनुडी, सामो

थँक्यु थँक्यु. बरं वाटलं अशी मी एकटीच नाही कळल्यावर
परवा त्या टेबल पुढे उभं राहून
परवा त्या टेबल पुढे उभं राहून मी एक (माझ्या मते सुंदर) सेल्फि काढला. लाईट चा चांगला प्रकाश थोबाडावर फक्त त्या दिशेला पडत होता.
तर फोटोत इतका पसारा पाहून मला मोझाईक मारुन मी सोडून मागचं सर्व ब्लर दुधी काच करावं लागलं.
म्हाळसा देवींनी उशी आणि गादीत
म्हाळसा देवींनी उशी आणि गादीत नोटा लपवल्या असाव्यात.
मी जवळपास दोन वर्षे
मी जवळपास दोन वर्षे म्हाळसादेवी बसतात तसाच wfh करतोय. बैठकीपेक्षा ऑफीसचं जास्त काम करणे हे आरोग्यासाठी धोकादायक आहे असं मला वाटतंय.
बैठकीपेक्षा ऑफीसचं जास्त काम
बैठकीपेक्षा ऑफीसचं जास्त काम करणे हे आरोग्यासाठी धोकादायक आहे >>>>
इतके खाली बसून काम केल्याने
इतके खाली बसून काम केल्याने पाठीला बाक येणार नाही याची काळजी घ्या.>> सध्या अजून एक छोटा बॅाक्स वर चढवला आहे त्यामुळे जास्त वाकायची गरज पडत नाहीए.. अधूनमधून ह्या भिंतीची उशी त्या भिंतीला लाऊन हातपाय पसरून काम करते..त्यामुळे सध्या तरी काही लोड नाहीए.
रात्री सॉरी मध्यरात्री पोरीचे
रात्री सॉरी मध्यरात्री पोरीचे स्टडी टेबल ढापतो आणि सोफ्यावर बसून छान गाणी ऐकत काम करतो. सोबतीला दर दोन ते तीन तासांनी कॉफी कंपलसरी
छान आहे फोटो.
छान आहे फोटो.
(No subject)
वर्क फ्रॉम होम सुरू असताना मला सोबत करणारे काही सवंगडी पुढीलप्रमाणे:
(No subject)
(No subject)
वा वत्सला, इतके सुंदर रंगीत
वा वत्सला, इतके सुंदर रंगीत पोपट येतात तुमच्या इथे?
या पक्षांशिवाय मैना, चिमण्या,
या पक्षांशिवाय मैना, चिमण्या, मॅगपाय, डच हनी इटर्स, पारवे, लाल मान-पोट असलेले पांढरे पोपट आणि इतर काही नावं माहीत नसलेले अनेक पक्षी दिवसभर जोडीने/घोळक्याने/एकेकटे येत असतात. काम किंवा मीटिंग सुरू असताना बाहेर बघितलं की यांच्यापैकी एक किंवा अनेकजण गवतात किंवा त्या बर्ड फीड वर बसून खाणे टिपत असतात.
कॅकटूज मात्र फार विध्वंसक वागतात. कधी कधी इतर पक्षांना येऊ देत नाहीत. मग आम्ही मोतीला बाहेर सोडतो. तो तिथे असला की कॅकटु येत नाहीत. मात्र इतर काही पक्षी येतात.
भाग्यवान आहात.
भाग्यवान आहात.
जग जे पक्षी नीट बघायला सिंगापूर मकाव ला जातं ते तुमच्या दारात येतात.
तुमचा सोसायटी परिसर त्यांना अगदी सुरक्षित वाटत असला पाहिजे.
आमच्याकडे फक्त घुबड,सनबर्ड, घारी आणि हिरवे पॅराकीट येतात.
धन्यवाद अनु.
धन्यवाद अनु.
घरामागेच कंपाऊंड ला लागून पार्क आहे आणि तिथे बरीच निलगिरीची झाडं आहेत. त्यामुळे हे पक्षी तिथेच रहात असावेत अस वाटतं आणि काही बाही टिपायला आमच्या बागेत येतात. त्यांना सहज खाणं आणि पाणी उपलब्ध व्हावं म्हणून आम्ही बर्ड फीड आणि बर्ड बाथ लावला उन्हाळ्यात. त्यामुळे आता जास्त जवळून दर्शन होतं.
झू आणि सर्कशीत दिसणारे पक्षी
झू आणि सर्कशीत दिसणारे पक्षी दारात
मस्तच
सुख म्हणतात ते हेच
आपला हेवा वाटतोय
टायपत असताना हे भाऊ आत आले
जपून बरं का या भाऊंपासून.
जपून बरं का या भाऊंपासून. बराच उपद्रव करतात.
हे भाऊ दिसले की हानावासे
हे भाऊ दिसले की हानावासे वाटते.भिकार जमात.
वत्सला खूप मस्त!
वत्सला खूप मस्त!
एक व्हिडिओ शूट करा आणि लिंक द्या.
टायपून झाल्यावर पहिले काम तेच
टायपून झाल्यावर पहिले काम तेच केले (उडवून लावले)
काँक्रीटच्या जंगलातला त्रासदायक पक्षी
वत्सला किती छान photos आहेत
वत्सला

किती छान photos आहेत
ऋ,
ते गाणं माझंही आवडतं आहे
पण मी मध्यरात्री नाही ऐकत
सगळे कोपरे छान.
सगळे कोपरे छान.
ऋन्मेष, बालबच्चे घरात वावरतात हे दाखवणारा कोपरा.
घरातले टकाटक, चकाचक कोपरे बघितले की उगीच गिल्ट येतो मनात.
वत्सला किती छान सवंगडी आहेत.
एक व्हिडिओ शूट करा आणि लिंक द्या. >> +1
ऋन्मेष, बालबच्चे घरात वावरतात
ऋन्मेष, बालबच्चे घरात वावरतात हे दाखवणारा कोपरा.>>>>>>+१००
वत्सला किती छान सवंगडी आहेत.>>>>+१००.
हा आमचा ऑनलाइन शाळेचा कोपरा.
हा आमचा ऑनलाइन शाळेचा कोपरा.

छान स्वच्छ आहे हो कोपरा
छान स्वच्छ आहे हो कोपरा
)
(स्वगतः आमच्याकडे असे फोटो काढायचे म्हटले की वस्तू डंप केलेला पृष्ठभाग नसलेला अँगल शोधावा लागतो.त्यावर छोट्या मेंबर ने उत्तर शोधले.ती एक चांगलीशी चादर बघून वस्तूच्या ग्रुपवर एखाद्या मेजवर पांघरावी तशी नीट चौकोनी आकार करुन पांघरते.गरज ही शोधाची जननी
Pages