माझे घरातले ऑफिस -- कामाचा कोपरा

Submitted by किल्ली on 20 August, 2020 - 06:24
kamacha kopra

Work from home आता अंगवळणी पडलेय..
बरेच जण सध्याच्या काळात घरून काम करत आहेत.

Office सारखी सुविधा घरी नसली तरी flexibility असते.

काही वेगळी आव्हाने असतात. जसं की लहान मुलं, ईंटरनेट connectivity, सतत कॉल्स, proper infra चा अभाव वगैरे.

हे सगळं सांभाळून wfh करणाऱ्यांचं कौतुक Happy

तर idea अशी आहे की, काम करण्यासाठी तुम्ही एखादी शांत आणि net ची range येणारी जागा निवडली असेलच.

येथे तुमचे wfh चे अनुभव लिहा.
काही मजेदार किस्से घडत असतील तर ते share करा आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तुमच्या कामाच्या कोपऱ्याचा (workplace at home) फोटो इथे डकवा.

मला खरंच उत्सुकता आहे की non IT falks घरून काम कसे करतात?
Online lectures घेणाऱ्या शिक्षकांची कमाल वाटते आणि कौतुक ही.. असे विविध क्षेत्रातील अनुभव येथे आले तर मजा ना??
-------------

Desktop wallpaper वरून कंपनी कोणती हे समजले तरी इथे सांगू नये Happy

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Use group defaults

बुद्ध धर्मात कुआन यिन देवी आहे जी की स्त्रीरुप अवलोकितेश्वर मानली जाते. > कधीच ऐकलं नव्हतं. छान दिसतेय देवी. मला लाबंनं बघताना पटकन आपल्या अजंठा वेरूळ लेण्यातली चित्रं आठवली.

>>>लाबंनं बघताना पटकन आपल्या अजंठा वेरूळ लेण्यातली चित्रं आठवली.
त्यांच्याकडील गुंफेतीलच भित्तीचित्र आहे.

अजून चालू आहे का तुझे घरून काम..
मी सुद्धा गेले चार महिने घरूनच आहे..

सध्या आमच्याकडे हे हिट आहे. मी यावरच कामाला बसतो. सिंगल बेड, डबल बेड, सोफा, recliner असे विविध प्रकार यात बनतात. ते सगळे आलटून पालटून वापरतो आणि कधी लोळून तर कधी ताठ बसून काम करतो.

IMG_20240326_174021.jpg

Hybrid आहे माझे काम.
Both worlds. Office and home.
म्हणजे wfo असला की नुसत्या मिटींगा.
ह्या कंपनी त वेगळा monitor वापरायला शिकले आहे.
इथे प्रत्येकाला दोन तीन स्क्रीन आहेत.
घरी monitir घ्या म्हणून कम्पनी ने पैसे दिले मग घेतला. आपल्याला काय

ती गादी खूप छान आहे रुन्मेष. खूप वर्सेटाइल आहे. मला मिळाली नाही मग मी साध्या कॉटन भरलेल्या गाद्या घेतल्या. मी पण बसुन लोळुन फुल टीपी करते. ऑफिसातुन कॉल आला तर घेते. के टी. केस बेसीस वर चालू आहे.

लेकीला एक बसून काम करायचे टेबल दिले तर पाठीवर ताण येणार नाही. माझ्याकडे फॅब इंडियाचे आहे. पण मुलांना अभ्यासाची टेबले मिळतात. चित्रकलेचे साहित्यही ठेवता येइल.

मी घेतलंय रमाला foldable table खुर्ची पण त्याचा वापर खेळण्यासाठी जास्त होतो.
फ्लिपकार्ट वरून मागवलेली

किल्ली ओके

@ स्वान्तसुखाय… हो फोल्डेबल गादी आहे. आरामात सरकवू शकतो. आणि एखादा काडी पेहेलवान माणूस सुद्धा एकटा उचलू शकतो. हा फोटो फेसबूक वरून साभार.. Happy

Screenshot_2024-03-26-20-30-18-66_99c04817c0de5652397fc8b56c3b3817.jpg

लॉकडाऊनला नवीन घरात शिफ्ट झालो तेव्हा आम्ही सोफे बनवून घेतलेले. पण त्या काळात चांगले कारागीर उपलब्ध नसल्याने इतके थुकपट्टीचे काम करून दिले की एव्हाना त्यांची वाट लागली आहे. आता हा आयटम त्यापेक्षा काही पटींनी स्वस्त आहे बघून असे वाटते की तेव्हा हेच घ्यायला हवे होते.

@ अमा,
हो, मुलीचे स्टडी टेबल आहे वेगळे. पण सध्या ते ती वापरत नाही. त्या ऐवजी हॉलमध्ये ठेवलेल्या डायनिंग टेबलवर तिथली खुर्ची घेऊन बसते. त्यामुळे पाठीचा काही प्रोब्लेम नाही. आणि तसेही ती रोज अभ्यास करत नाही. परीक्षेच्या वेळी सुद्धा सलग तासभर अभ्यास केलेले आठवत नाही. तिच्याकडे मुळातच तितके पेशन्स नाहीत.

Pages