
Work from home आता अंगवळणी पडलेय..
बरेच जण सध्याच्या काळात घरून काम करत आहेत.
Office सारखी सुविधा घरी नसली तरी flexibility असते.
काही वेगळी आव्हाने असतात. जसं की लहान मुलं, ईंटरनेट connectivity, सतत कॉल्स, proper infra चा अभाव वगैरे.
हे सगळं सांभाळून wfh करणाऱ्यांचं कौतुक
तर idea अशी आहे की, काम करण्यासाठी तुम्ही एखादी शांत आणि net ची range येणारी जागा निवडली असेलच.
येथे तुमचे wfh चे अनुभव लिहा.
काही मजेदार किस्से घडत असतील तर ते share करा आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तुमच्या कामाच्या कोपऱ्याचा (workplace at home) फोटो इथे डकवा.
मला खरंच उत्सुकता आहे की non IT falks घरून काम कसे करतात?
Online lectures घेणाऱ्या शिक्षकांची कमाल वाटते आणि कौतुक ही.. असे विविध क्षेत्रातील अनुभव येथे आले तर मजा ना??
-------------
Desktop wallpaper वरून कंपनी कोणती हे समजले तरी इथे सांगू नये
"कोपरा" म्हणल तर किति लहान
"कोपरा" म्हणल तर किति लहान असे आपल्या मनात येते. पण हा कोपरा आपल्याला खुप काही देउन जातो. घरात राहणार्या प्रत्येकाचा एक ठरलेला कोपरा असतो न्हवे तो असायलाच पाहिजे. नक्कीच त्या ठिकाणी ज्याला जे हवे ते मिळत असते. नव्या नवरिला घराची आठवन आली तर हुंदके द्यायला जागा, मुलांना खेळायला, लपायला जागा. कधी कधी आपल्याला हवी असलेली शांतता, लेखकाला लेखन, कवि ला कविता सुचते तर सध्या घरातुन काम करण्याची एक उर्जा ही आता या कोपर्यातून मिळते आहे.
हा माझ्या कामाचा कोपरा
हा माझ्या कामाचा कोपरा
image अपलोड झालीच नाही
.
अनघा, खूप छान
अनघा, खूप छान
खुर्ची मस्त
आणि कोपऱ्यातील हिरवाई सुद्धा
मस्त धागा आहे.
मस्त धागा आहे.
धन्यवाद किल्ली.. हो. त्या
धन्यवाद किल्ली.. हो. त्या हिरवाई मुळे सुखद आहे office पेक्शा
मी माझ्यासाठी एक कोपरा शोधला
मी माझ्यासाठी एक कोपरा शोधला होता, पण नेमकं आमच्या आईसाहेबांना त्याच कोपऱ्यात बरीच कामे करावी लागतात असं लक्षात आल्यावर हे घरच माझे ऑफिस म्हणत कुठेही बसतोय सध्या.. पण वरचा अनघा गोखलेंचा फोटो बघून आपलाही कोपरा सज्ज करावा अशी इच्छा निर्माण होतेय!
छान धागा आहे.
छान धागा आहे.
टीम व्युवर नी ऑफिस सर्वर वर असलेली ई आर पी अॅक्सेस करतो.
घराला ऑफिस चे स्वरुप आलेले आहे. लॅप टॉप असल्या मुळे कोठे ही बसता येतं
गृप मिटींग्स झूम कॉल वर किंवा माय्क्रोसॉफ्ट टीम्स वर होतात.
या काळात एक गोष्ट शिकलो, एव्हरीथिंग इस पॉसिबल, यु जस्ट नीड टु गो दॅट एक्स्ट्रा माईल.
सकाळ ९ ला जे काम चालु होतं
सकाळ ९ ला जे काम चालु होतं ते दुपार १.०० - १.१५ पर्यंत चालु असतं.
नंतर २ ला परत काम चालु होत त्याचे काही लिमीट नाही, रात्री १० - ११ - १२.
या काळात प्रॉड्क्टिविटी खुप वाढली आहे, ऑफिस मध्ये जेव्हढं काम करत होतो, त्या पेक्षा दुप्पट तिप्पट काम होत आहे.
ऑफिस मध्ये ४ टाळकी तरी जमत होते.
अजुन एक गोष्ट.
अजुन एक गोष्ट.
ज्यांनी मार्च, एप्रिल आणि मे महिन्यात सिन्सियरली वर्क फ्रॉम होम सुरु केलेत ते सराईत झाले होते.
काही कलिग्स जुन महिन्यात वर्क होम सुरु केलेत, एप्रिल आणि मे महिना पुर्ण मजा केली.
बट व्हेन इट केम तो शो रिझल्ट्स , डे गेव एक्स्कुसेस ऑफ लॉकडाऊन अॅन्ड सेड नो वन वॉस अवेलेबल, वेरअॅस एव्हरीबॉडी वॉस अवेलेबल, त्यांचं पितळ उघडं पडलं
मी पुर्वी जरी office ला जात
मी पुर्वी जरी office ला जात होते नियमीत तरी घरी करावेच लागे. म्हणून घरी करून घेतला होता कोपरा. lockdown मध्ये खुर्ची मात्र नवीन घेतली. आणि त्यामुळे खुपच फायदा होतोय.
डिस्क्लेमरः पसारा पाहून दचकू
डिस्क्लेमरः पसारा पाहून दचकू नका.तरी आजूबाजूचे दाखवले नाहीय. मला या सर्व वस्तू आजूबाजूला लागतात पर्सनल इलेमेंट यायला.

यातल्या प्रत्येक वस्तूला एक आठवण आहे. मार्बल गणेश सा बां नी घेऊन दिलाय. सांटाक्लॉक्ज एका फ्रेंच कलिग ने दिलाय
चिनीमाती डिश नणंदेने भेट दिलीय.बाकी स्टेशनरी वस्तू आणि टेबल कन्येचे आहे.
मागचा मरुन गणपती म्हणजे माझ्या माव सासूबाईंनी माझ्या नवर्याच्या बाळंतविड्यात भेट दिलेला भरतकाम वाला पडदा आहे तो आम्हाला खूप आवडतो म्हणून फ्रेम केलाय.
मी डायनिंग टेबल च्या खुर्च्या असतात तश्या प्लास्टिकह्खुर्चीवर पाठीला उशी घेऊन बसते.आरामशीर आहे.
(डिसेंबर पर्यंत नक्की वाढणार असेल तर खुर्ची घेण्याचा विचार केला जाईल. )
डिसेंबर पर्यंत नक्की वाढणार
डिसेंबर पर्यंत नक्की वाढणार आहे..खास करून जे wfh करू शकतात (संगणकावर काम असते) त्या सगळ्यांसाठी.
डिसेंबर पर्यन्त आहे wfh असं
डिसेंबर पर्यन्त आहे wfh असं जाहीर केलेलं वाचलंय.
काही ऑफिसेस बोलवत आहेत emp ला, पण जात नाहीये कोणी conpulsory नसल्यामुळे
माझा सल्ला आहे की ती चक्के
माझा सल्ला आहे की ती चक्के वाली खुर्ची घ्याच, खूप फरक पडतो comfort मध्ये.
थकल्यासारखं वाटत नाही, काम करू शकतो सलग.
अनुभव आहे, वफह चा setup घरी होताच आधी आमच्या ह्यांचा कारण आधीपासून त्यांना अध्येमध्ये wfh करावं लागायचं. ती खुर्ची आणि टेबल मी बळकावले, पाठ दुखत असल्यामुळे.
आता त्यांनी त्यांचं नवीन setup लावलं आहे, त्याचाही फोटो देईन कधी.
आमच्या room मध्ये cubicle चा feel आहे आणि आम्ही नवराबायको कमी आणि colluges जास्त झालो आहोत (वेगवेगळ्या कंपनी चे emp असलो तरी)
किल्ली ..मस्त धागा आणि डेस्क
किल्ली ..मस्त धागा आणि डेस्क पण.
@अनघा.. एकदम प्रसन्न कोपरा ... लॅपटॉप,चेअर,नाव ओळखीचं वाटतंय
आपण एकाच कंपनी च्या टाईमकार्ड मध्ये लेबर अवर्स टाकतो कि काय
@अनु- मस्त ...पर्सनल वाल फीलिंग..
आज नवऱ्याने हायजॅक केलेला माझा कोपरा ...
@ए_श्रद्धा खरच की काय?
@ए_श्रद्धा खरच की काय?
@किल्ली - खुर्चीबाबत अगदीच सहमत.. ड्रास्टीक फरक पडतो.
छोटा कन्हैया आवडला. कामाकडे
छोटा कन्हैया आवडला. कामाकडे लक्ष ठेवतो आहे . सर्वांचेच प्रतिसाद फोटो आवडले.
कामच नै कोपरा नै.
मस्त धागा!
मस्त धागा!
पावसाळी हवेत असे मस्त घराच्या खिडकीत बसून गरम गरम चहाचे घुटके घेत काम करण्यातली मजाच काही वेगळी आहे!
(No subject)
हे माझे कार्यस्थळ.... मी आयटी
हे माझे कार्यस्थळ.... मी आयटी मध्ये नाही. ~ ऑन लाईन वर्ग चालवतो, बीई व एम्बीए चे. बरोबरच भाषांतरकार आहे... बाहेरील सृष्टीसौंदर्य पहात वेळ छान जातो.... बरोबरच मुझिक सिस्टीम जोडली आहे.... त्या चाकाच्या खुर्चीने खूप फरक पडतो...
सुरुवातीच्या दिवसात वर्ग चालवताना कित्येकदा मुलामुलींशी डिस्कनेक्ट व्हायचो अन मग अचानक त्यांचे स्पीकर्स ऑन व्हायचे अन मग त्यांच्या कॉमेंट्स ऐकू यायच्या... "पीडा गेली वाटतं".... इत्यादि
आजकालच्या मुलांच्या मानाने
आजकालच्या मुलांच्या मानाने फारच सौम्य कमेंट्स आहेत.
पावसाळ्यात खिडकीशी ठेवून
पावसाळ्यात खिडकीशी ठेवून laptop ला सर्दी खोकला होत नाही का?
वर्क फ्रॉम होम के दुश्मन
वर्क फ्रॉम होम के दुश्मन
घरातले सारे काने कोपरे यांचेच आहेत
म्हणून मी कुठेतरी एक भिंत पकडून बसतो.
पण तिथेही धाड असते
गोड आहेत कुमार ऋ.
गोड आहेत कुमार ऋ.
धागा इतका उशिरा का आला?
धागा इतका उशिरा का आला?

हा माझा ऑनलाइन शाळेचा कोपरा.
हा माझा ऑनलाइन शाळेचा कोपरा.(८वी ते 10वी लैंग्वेज टिचर) कनेक्टिव्हिटी चांगली आहे ईथे.

मुलाने घरात जिथं आवडेल तिथं त्याचे चित्रकला काम चिकटवले आहे.
धागा इतका उशिरा का आला?--
धागा इतका उशिरा का आला?---कारण ते शहाणपण आहे
सगळ्यांचे फोटो सुंदर.. बालगोपालांच्या कामाच्या खुणा फोटो मध्ये दिसत आहेत हे मस्त
Jr ऋ गोड
आमची baby अजून स्वतःच्या पायाने चालत किंवा रांगत येऊ शकत नाही तोपर्यंत आमचे घरातले ofc safe आहे
मस्त विषय आणि मस्त कोपरे.
मस्त विषय आणि मस्त कोपरे.
ऋन्मेष,पिल्लू गोड आहे.
धन्यवाद
धन्यवाद
पण तो गोड पिल्लूच फार कडू अनुभव देतो. कधी त्याला बटण बंद करायची हुक्की येईल सांगता येत नाही
बाकी पुढच्या आठवड्यात नवीन घरात सेट झालो की तिथल्या कोपरयाचा अजून एक फोटो टाकायचा स्कोप आहे माझ्याकडे
तिथेही आतल्या रूमचा कोपरा पकडण्यापेक्षा आताच्यासारखेच हॉलमध्येच उघड्यावर ऑफिस थाटायला आवडेल. पोरं बाळं आजूबाजूला बागडत राहायची सवय झालीय. नाहीतर बाहेर सगळे मजा करताहेत आणि आपण आत एकटे काम करतोय असे नको वाटायला
बाकी वर ज्यांचे ज्यांचे खिडकीशेजारी कोपरे आहेत ते बेहद्द आवडले आहेत. काम करताना अध्येमध्ये जितकी लांब नजर जाईल तितके चांगलेच असते. त्यात हिरवळ दिसत असेल तर डोळे आणखी सुखावत असतील
Pages