माझे घरातले ऑफिस -- कामाचा कोपरा

Submitted by किल्ली on 20 August, 2020 - 06:24
kamacha kopra

Work from home आता अंगवळणी पडलेय..
बरेच जण सध्याच्या काळात घरून काम करत आहेत.

Office सारखी सुविधा घरी नसली तरी flexibility असते.

काही वेगळी आव्हाने असतात. जसं की लहान मुलं, ईंटरनेट connectivity, सतत कॉल्स, proper infra चा अभाव वगैरे.

हे सगळं सांभाळून wfh करणाऱ्यांचं कौतुक Happy

तर idea अशी आहे की, काम करण्यासाठी तुम्ही एखादी शांत आणि net ची range येणारी जागा निवडली असेलच.

येथे तुमचे wfh चे अनुभव लिहा.
काही मजेदार किस्से घडत असतील तर ते share करा आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तुमच्या कामाच्या कोपऱ्याचा (workplace at home) फोटो इथे डकवा.

मला खरंच उत्सुकता आहे की non IT falks घरून काम कसे करतात?
Online lectures घेणाऱ्या शिक्षकांची कमाल वाटते आणि कौतुक ही.. असे विविध क्षेत्रातील अनुभव येथे आले तर मजा ना??
-------------

Desktop wallpaper वरून कंपनी कोणती हे समजले तरी इथे सांगू नये Happy

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Use group defaults

आमच्याकडे असे फोटो काढायचे म्हटले की वस्तू डंप केलेला पृष्ठभाग नसलेला अँगल शोधावा लागतो>>>

म्हणूनच मी आज पर्यंत ईथे माझ्या डेस्कचा फोटो टाकू शकलो नाही !!!

मुलाची रूम आहे, रूमची स्वच्छता ही त्याचीच जबाबदारी.
तुमच्यात महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री/ण व्ह्यायचं पोटेन्शियल आहे. (त्याचा रुम त्याची जबाबदारी..... फक्त कुठे ते किंबहुना वापरता आलं तर बघा जरा, बाकी त्याला"कोमट पाण्याने" टेबल, फरशी पुसायला लावुन एक पॉईंट सर होईल तुमचा)

गेला आठवडा हा असा थाट होता Proud
रिसेप्शनिस्ट म्हणून मान होता ..

1638211368491.jpg

धन्यवाद अमितव
मागच्या संडेला मुलाचा बड्डे होता. त्यावर रिटर्न गिफ्टचा धागा काढलेला एक आठवडा आधी. तब्येत बरी नाही हे फार क्षुल्लक कारण झाले धागा न काढायला Happy

IMG_0639.jpeg

वडलाचा घरी कामाचा कोपरा जिथे नवीन आणि जुन्या वस्तुचा संगम पहायला मिळतो. कोरस चा कार्बन पेपर , स्टेपलर, पंचिंग मशिन, लॅडलाईन फोन, ASDL मॉडॅम, २००९ मध्ये घेतलेला जुना HP1020 प्रिंटर (ज्याची आजही OLX वर चांगली रिसेल वॅल्यु आहे), गाणी ऐकण्यासाठी स्पिकर , रोज काय केले ते लिहण्यासाठी डायरी, कॅल्कुलेटर , काम करता करता बघण्यासाठी टीव्ही.

८० वर्ष वय आहे आणि कामानिमित्त एकटे राहतात . वयाच्या मानाने जास्त बदल चालत नाहीत. आजुनही MTNL लॅडलाईन आणि स्लो नेट वापरतात. अपलोड स्पीड तर २५६kb आहे. डॉक्युमेंट अपलोड होताना शांत बसुन राहावे लागते. भरपुर पेशन्स आहे. निम्म्या पैश्यात २० पटीने फास्ट फायबर नेट मिळत असले तरी ते नको आहे.

बरेच दिवस झाले गेलो न्हवतो. त्यामुळे आधी फोटो टाकता आला नाही गेल्या गेल्या आधी फोटो काढला मग धुळ साफ केली. परत फोटो काढायचा राहिला. Happy

८० व्या वयात चांगलेच अ‍ॅक्टीव्ह दिसतात. माझ्याही वडलांना एमटीएनएलचा फोन अजिबात बदलायचा नव्हता. मग ब्रॉडबॅण्ड घेतलं. त्यातही लॅण्डलाईन फोन येतो. फक्त नंबर बदलला म्हणून काही दिवस तक्रार केली. आता तर नंबर कायम ठेवता येईल बहुधा.

हे माझं ऑफिस.एक्सटेंडेड मॉनिटर मागे एक बंद मॉनिटर दिसतोय तो नवऱ्याचा आहे.ह्या आठवड्यात तो ऑफिसला जातोय.जेव्हा घरून काम करेल तेव्हा माझा लॅपटॉप -मॉनिटर फिरवून एका टोकाला आणि त्याचा दुसऱ्या टोकाला अशी रचना असते. आम्ही दोघे एका खोलीत बसून पैसे कमावतो असं ऑफिस मधले सहकारी चिडवतात. Happy MicrosoftTeams-image (5).png

कामाचा नवीन कोपरा अर्थात डायनिंग टेबल.. डावीकडे किचन आहे म्हणजे उठसूट खाता येतं, उजवीकडे खिडकी आहे त्यामुळे काम करताना बऱयाचदा लक्ष बाहेरच असतं आणि ह्यातून थोडीफार मोकळी हवा घ्यावीशी वाटली की समोरच्या दारातून घराच्या पॅटिओमधे जाऊन तीथून काम करता येतं
7F1DDBBA-51E7-4474-AACF-5656D2330570.jpeg

सगळे जायला लागले का ऑफिसला. आमचे एक आठवडा घरून मग एक आठवडा ऑफिसला जायचे असे हायब्रीड का काय सुरु आहे. दोन्ही बरे वाटते. लोक भेटतात, हास्यविनोद, गप्पा होतात. घरून काम करायचा फायदा म्हणजे वेळ वाचतो. तयारी करा, डबे भरा मग प्रवास. एकदा ऑफिसला पोचल्यावर काही वाटत नाही. पावसाळा तोंडावर आल्यामुळे जीवावर आलंय आता, सगळीकडे चिकचीक होणार.

आधीच्या घरी गच्चीवर खोली बांधून ऑफिस बनवले आहे. आज खूप दिवसांनी इथे काम करताना भावनिक झालो.
20220601_134055.jpg

हा नवीन कामाचा कोपरा.
सध्या याच्या मालकीहक्कावरून घरात बापलेकीमध्ये वाद आहेत Happy

IMG_20220612_184900.jpg

Pages