गेल्या 25 वर्षांमध्ये पुण्याचा विस्तार अतिशय झपाट्याने झाला आहे आणि तो अजूनही होतच आहे. पुणे आणि आसपासच्या परिसरांमध्ये येऊ लागलेल्या छोट्या-मोठ्या उद्योगांमुळे शहराचा आकार वाढत राहिला आहे. वाढत्या शहरीकरणाचा ताण पुण्यातील उपलब्ध शहरी सार्वजनिक वाहतुकीवर वाढत गेला. हा वाढता ताण ती वाहतूक व्यवस्था पूर्ण करू शकलेली नाही. आजही मागणी आणि सेवेचा पुरवठा यात बरीच तफावत आढळत आहे. मागणी पूर्ण करण्यास सार्वजनिक वाहतूक सक्षम नसल्यामुळे रस्त्यावरच्या खासगी वाहनांची संख्या प्रचंड प्रमाणात वाढत चालली आहे. त्यातच अरुंद रस्त्यांमुळे वाहतुकीचा वेग आणखीनच मंदावत आहे.
मध्यंतरी पुण्यात बीआरटी (Bus Rapid Transit) व्यवस्था सुरू करण्यात आली; पण तिच्या नियोजनातील गोंधळामुळे तीसुद्धा यशस्वी होऊ शकली नाही. आता तर पुण्यातील वाहनांची संख्या पुण्याच्या लोकसंख्येपेक्षाही जास्त झालेली आहे. वाढत्या शहरीकरणाला सक्षम सार्वजनिक वाहतुकीच्या साधनाची जोड देण्याच्या हेतूने 2009-10 पासून पुण्यात मेट्रो सुरू करण्याबाबत विचार सुरू झाला. त्यामध्ये मेट्रो कशी असावी, उन्नत की भूमिगत, गेज काय असावा, रस्ताच्या बाजूने असावी की मधून, डबे कसे असावेत इ. इ. मुद्द्यांवरून सतत फक्त चर्चेतच राहिलेल्या पुणे मेट्रोच्या प्रत्यक्ष कामाला अखेर डिसेंबर 2016 मध्ये सुरुवात झाली. मेट्रोची उभारणी हे तसे अवाढव्य काम आहे. पण तरीही 2019 पर्यंत म्हणजे तीनच वर्षांमध्ये पहिल्या दोन मार्गांचे काम पूर्ण करण्याचे अवघड लक्ष्य ठेवले गेले होते. ती कालमर्यादा पाळणे शक्य नाही हे माझ्याही मनाला पटत होतेच. आज पुण्यातील मेट्रो मार्गांची उभारणी पूर्ण होण्याला अजून बराच काळ लागणार असल्याचे सध्या दिसत आहे. कारण गरवारे महाविद्यालयानंतर पुढे नदीपात्रात गेलेल्या मार्गावर अजून दुसऱ्या टप्प्यातीलच काम सुरू आहे. परिणामी डेक्कन, छत्रपती संभाजी उद्यान, पुणे महानगरपालिका येथील स्थानकांचे कामही प्रथमावस्थेतच आहे. त्यापुढे सत्र न्यायालयाजवळ होत असलेल्या जंक्शनचे कामही बरेच बाकी आहे. तीच अवस्था मंडई, स्वारगेटच्या बाजूलाही दिसते.
शहरांतर्गत चालणारी रेल्वे वाहतूक ‘मेट्रो रेल्वे’ म्हणून ओळखली जाते. ही सेवा जमिनीखाली, जमिनीवर किंवा उन्नत (elevated) अशा कोणत्याही प्रकारे उपलब्ध करून देता येते. ही सेवा सुरक्षित, इंधनाची बचत करणारी, प्रदूषणमुक्त, वेगवान आणि आरामदायक मानली जाते. मेट्रो भूमिगत असेल, तर रस्त्यावरील जागा व्यापली जात नाही, शिवाय उन्नत असेल, तर ती रस्त्यावरील केवळ 2 मीटर रुंद जागा व्यापते. लोहमार्ग आधारित सार्वजनिक वाहतूक प्रवासाचा कालावधी 50 ते 70 टक्क्यांनी कमी करते. तसेच एका प्रवाशाची एक किलोमीटर अंतरापर्यंत वाहतूक करण्यासाठी लोहमार्गावरील वाहतुकीला रस्ता वाहतुकीच्या तुलनेत एक-पंचमांश कमी इंधन लागते. ज्या ठिकाणी पीएचपीडीटी (म्हणजे Peak Hour Peak Direction Traffic) निर्देशांक 20,000 ते 45,000 आहे, तेथे मेट्रोसारखी लोहमार्ग आधारित सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सोयीस्कर ठरते. कारण मेट्रोद्वारे दर 90 सेकंदाला एक याप्रमाणे सेवा उपलब्ध करून देता येते. रस्त्यावरील वाहतूक 8,000 पेक्षा कमी पीएचपीडीटीला उपयुक्त ठरते. पुण्यातील मेट्रोच्या पहिल्या दोन्ही मार्गांचा पीएचपीडीटी निर्देशांक 2031 पर्यंत 10,000 ते 20,000 दरम्यान राहण्याचे अनुमान काढण्यात आले आहे.
सध्या पुण्यात मेट्रोचा 12 किलोमीटरचा मार्ग वाहतुकीसाठी खुला झाला आहे. तरीही या मार्गांवरील स्थानकांचं काम अजूनही अपूर्णच असलेलं दिसत आहे. पुण्यात एकूण 3 मेट्रो मार्ग उभारले जात असून त्यांची लांबी 54.58 किलोमीटर असणार आहे. त्यापैकी पिंपरी-चिंचवड महानगरपालिका भवन ते स्वारगेट (परपल लाईन, लांबी 16.59 किलोमीटर) अशी असून ती खडकीतील रेज हिलपर्यंत उन्नत (elevated) आणि त्यानंतर स्वारगेटपर्यंत भूमिगत असणार आहे. या मार्गावरील फुगेवाडीपर्यंतचा मार्ग 6 मार्चपासून खुला झालेला आहे. दुसरा मार्ग कोथरुडमधील वनाज ते रामवाडी (ॲक्वा लाईन, 14.66 किलोमीटर) असा असणार असून तो पूर्णपणे उन्नत असणार आहे. त्यापैकी वनाज ते गरवारे कॉलेजपर्यंतचा मार्ग वाहतुकीसाठी खुला झालेला आहे. तिसरा मार्गही पूर्णपणे उन्नत असणार असून त्याची लांबी 23.33 किलोमीटर असणार आहे. तो मार्ग हिंजेवाडीतील राजीव गांधी इंफोटेक पार्कपासून सुरू होऊन बालेवाडी मार्गे शिवाजीनगरच्या सत्र न्यायालयापर्यंत जाणार आहे. हे तिन्ही मार्ग सत्र न्यायालयाजवळ एकत्र येणार आहेत.
भारतात मेट्रो रेल्वे सेवेचा विकास आणि विस्तार अतिशय संथ गतीने झाला आहे. त्यासाठी पुढील मुद्दे कारणीभूत ठरलेले आहेत.
• सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेबाबत स्पष्ट धोरणाचा अभाव
• आवश्यक स्रोतांची कमतरता
• देशातील कायदेशीर व्यवस्था
• मेट्रोसंबंधीच्या तज्ज्ञांची कमतरता
• कार्यक्षम संस्थात्मक व्यवस्थेचा अभाव
मेट्रो सेवा सुरू करण्यासाठी देशातील अकार्यक्षम संस्थात्मक व्यवस्था हा सर्वात मोठा अडथळा ठरला आहे. मेट्रो रुळांवर आधारित व्यवस्था असली तरी सध्या तिच्या उभारणीसाठी कोणतेही एक मंत्रालय किंवा केंद्रीय संस्था जबाबदार नव्हती. त्यामुळे हे प्रकल्प मंजूर होऊन प्रत्यक्ष कामाची सुरुवात होईपर्यंतच बऱ्याच अडथळ्यांना सामोरे जावे लागत होते. पण मेट्रो रेल्वे सेवा सुरू करण्याची देशात वाढत असलेली मागणी लक्षात घेऊन 2017 मध्ये मंजूर करण्यात आलेल्या नव्या मेट्रो रेल्वे धोरणामध्ये देशातील मेट्रो रेल्वे विकासाची जबाबदारी केंद्र सरकारच्या आवास आणि शहरी व्यवहार मंत्रालयाकडे सोपवण्यात आली आहे.
दिल्ली मेट्रोमुळे झालेले फायदे
• शहरातील रस्त्यांवरील सुमारे 3,90,000 दैनिक वाहने कमी झाली.
• शहराचा मध्यवर्ती भाग आणि शहराच्या जवळपासची ठिकाणे यांच्यातील प्रवास जलद झाला.
• शहरांतर्गत वाहतुकीतील प्रवासाचा कालावधी 32 मिनिटांनी कमी झाला.
• इंधनाच्या वापरात वार्षिक सुमारे पावणेतीन लाख टनांनी घट झाली.
• दिल्लीच्या हवेतील प्रदुषकांचे वार्षिक प्रमाण पावणेसहा लाख टनांनी घटले.
• दिल्लीतील रस्त्यांवरील गंभीर अपघातांचे प्रमाण वर्षाला 125 ने कमी झाले.
• एकूण रस्ते अपघातांची वार्षिक संख्या 937 ने कमी झाली.
दिल्ली मेट्रो रेल्वे प्रकल्पाची व्यावहारितकता आणि यश लक्षात घेऊन केंद्र सरकारने 2009 मध्ये 20 लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या देशाच्या अन्य प्रमुख शहरांमध्ये मेट्रो रेल्वे सेवा सुरू करण्याला मान्यता दिली. दिल्लीमध्ये मेट्रो सेवा सुरू झाल्यावर तिच्या खात्रीशीर आणि वेगवान सेवेमुळे रस्ता वाहतुकीवर अवलंबून असलेले प्रवासी मेट्रोकडे वळलेले आहेत.
सध्या मेट्रो सेवा उपलब्ध असलेली शहरे
• कोलकाता, मुंबई, पुणे, नागपूर, चेन्नई, जयपूर, नम्मा मेट्रो (बेंगळुरू), तीव्र गती मेट्रो (गुरुग्राम), अहमदाबाद, हैदराबाद, कानपूर, कोची, लखनौ, नोएडा. यातील सर्वच मेट्रो रेल्वे प्रकल्पांची सेवा थोड्या-अधिक प्रमाणात सुरू झालेली आहे. त्याचवेळी त्यांचे विस्तारीकरणही सुरू आहे.
सध्या सेवा सुरू न झालेले, पण उभारणी सुरू असलेले प्रकल्प
• नवी मुंबई, भोज (भोपाळ), इंदूर, पाटणा, आग्रा, सुरत, ठाणे.
मान्यता मिळालेले, पण काम सुरू होण्याच्या स्थितीत असलेले प्रकल्प
• ठाणे, विशाखापट्टणम
लिंक
https://avateebhavatee.blogspot.com/2022/03/blog-post_17.html
पुणे मेट्रोतून मी केलेल्या पहिल्या प्रवासाचा व्हिडिओ खालील लिंकवर पाहता येईल.
https://www.youtube.com/watch?v=JvTZICUysoA
(No subject)
(No subject)
>>किंग सर्कल आणि माहेश्वरी
>>किंग सर्कल आणि माहेश्वरी एकच हे माहीत नव्हते,<<
किंग्ज सर्कल हे माहेश्वरी उद्यानाच्या थोडं अलिकडे (साउथबाउंड रस्त्यावर) आहे. वडाळा, कॉटन ग्रीनला जाणार्या रस्त्याचा (पी. डिमेलो?) फाटा इथे फुटतो. आता फ्लायओवर ने तो सर्कल पोटात घेतलेला आहे. हार्बर लाइनवर किंग्ज सर्कल नावाचं स्टेशनहि आहे. घाटकोपरचं गांधी मार्केट फेमस व्हायच्या आधी किंग्ज सर्कलचं गांधी मार्केट फेमस होतं...
>>खोदादाद सर्कल म्हणजेच दादर ट्राम terminus उर्फ दादर T T होते का? मला तसे वाटतेय.<< +१
पुर्वि त्या सर्कल मधुन बेस्टच्या बसेस देखील सुटायच्या. ३८५ - दादर-घाटकोपर...
King circle स्टेशन माहीत आहे
King circle स्टेशन माहीत आहे
वडाळा बांद्रा लाईनच्या मध्ये आहे
सायन , जिटीबी आणि किंग्ज सर्कल ही तीन भिन्न लाईनची स्टेशने सायन हॉस्पिटलच्या तीन बाजूना आहेत
आताच गरवारे कॉलेज त वनाझ आणि
आताच गरवारे कॉलेज त वनाझ आणि रिटर्न ट्रीप करून उतरलो. मोदीजी ंनी खूप भारी काम केले आहे. अशी गोष्ट शोधून काढल्याबद्दल आभार. थॅंक यू मोदीजी.
किंग्ज सर्कल स्टेशनला जवळ
किंग्ज सर्कल स्टेशनला जवळ वडाळ रस्ता फुटतो तिथे अरोरा सिनेमापाशी शेवटचे ट्राम टर्मिनस होते.
किंग्स सर्कल आणि वडाळ्यापासून
किंग्स सर्कल आणि वडाळ्यापासून चर्चा जरा दूर न्याल का.. विजेटीआय आणि फाईव्ह गार्डनच्या आठवणी ताज्या होत आहेत. ईथेच बदाबदा बाहेर आल्या तर पुणे मेट्रोचा धागा पुन्हा त्यात वाहून जायचा
प्रत्येक वेळच्या तिकिटापेक्षा
प्रत्येक वेळच्या तिकिटापेक्षा दिवसभराकरता आणि महिन्याकरता पासेस व काही ठराविक संख्येची टोकन्स देत आहेत का? नेहमीच्या लोकांना ती बरी पडतात.
नाशिक फाटा स्टॉपला भोसरी का म्हणत आहेत्? भोसरी तेथून कितीतरी लांब आहे
तसेच जेथे नाशिक फाटा आहे तेथेच रेल्वेचे कासारवाडी स्टेशन आहे ना? मेट्रोचे कासारवाडी स्टेशन तेथून लांब असावे असे दिसते. फुगेवाडीचा स्टॉप नक्की कोठे आहे? नाशिक फाट्यावरून दापोडीकडे येउ लागलो आधी मधे बर्याच कंपन्या आहेत. मग दापोडी गाव व समोर मिलिटरीचे एक लोकेशन आहे (नक्की काय ते विसरलो). यामधे कोठेतरी असावे.
मोबाईल अॅप डालो केलं तर
मोबाईल अॅप डालो केलं तर तिकीट काढण्यापासून ते फेअर, कनेक्टेड बस टायमिंग हे सर्व मिळते. सध्या पार्किंग आयुर्वेद रसशाळाच्या दारात आहे. नंतर पोलीस क्रेन घेऊन उभे राहती ही भीती आहे. खाली उतरल्यावर पुणे मेट्रो पीएमटीची बस उभी असते. पण ती सगळीकडे नाही जात. रिक्षाही घेता येते बहुतेक. सुरळीत होईल. किमान वनाज ते गरवारे पूल एव्हढ्या प्रवासासाठी उपयोगी पडली तरी खूप झाले.
btw पुणे मेट्रो मध्ये तिकीट
btw पुणे मेट्रो मध्ये तिकीट व्यवस्था कशी आहे? म्हणजे RFID based plastic tokens आहेत की Paper QR tickets आहेत???
मुंबई मेट्रो मध्ये सुरु झाली तेव्हापासून covid चा उगम होईपर्यंत RFID based plastic token होती, covid पश्चात unlock झाले तेव्हा Paper QR tickets आली, ज्यामुळे कागदाचा वापर वाढला, स्टेशनवर कचरा वाढला. कारण लोक प्रवास झाल्यावर ते तिकीट कचऱ्यासाठी डबा ठेवूनही इतस्ततः टाकतात. RFID based Plastic Token मध्ये असे होत नाही, कारण गंतव्य स्थानकावर उतरल्यावर ते तिकीट (token) स्थानकातून बाहेर पडण्यासाठी AFC (Automatic Fare Collection) gate मध्ये टाकावे लागते, जिथे ते आत एका डब्यात जमा होते.
मोदींच्या हातात कागदी तिकीट
मोदींच्या हातात कागदी तिकीट होते, असा फोटू कुणीतरी लावला होता मायबोलीवर
मी तिथे लिहिलेही होते , प्लास्टिक कॉइन नाही का म्हणून.
असे असेल तर हे फार चुकीचे आहे
असे असेल तर हे फार चुकीचे आहे, RFID based Plastic Tokens is best option!!! Reusable आहेत, शिवाय आपोआप यंत्रात जमा होत असल्याने कचरा होण्याचा अजिबात प्रश्न नाही.
मी हेच बोललो , तर लोक बोलले
मी हेच बोललो , तर इथले भक्त लोक बोलले ये न्यू इंडिया है
जुने लोक लहानपणी व्यापार
जुने लोक लहानपणी व्यापार खेळले आहेत. त्यामुळे ते पटकन शिकतात नवीन गोष्टी.
स्टेशन परिसरात गिटार किंवा
स्टेशन परिसरात गिटार किंवा इतर काही वाद्य वाजवून कला ऐकवत असतात ते आले का?
(No subject)
<<जुने लोक लहानपणी व्यापार खेळले आहेत. त्यामुळे ते पटकन शिकतात नवीन गोष्टी.>>>
@ फारएण्ड, भोसरी म्हणजे नाशिक
@ फारएण्ड, भोसरी म्हणजे नाशिक फाटा
जिथून भोसरी जवळजवळ 8 किमी आहे, त्यांना ते नाव बदलायला सांगितले आहे, महामेट्रो ने प्रस्ताव दिलाय आता. बुधवार पेठ हे स्टेशन नाव पण बदलणार आहेत. तुम्ही म्हणत आहात ते सी एम इ , ते दापोडीला, तिथपर्यंत नाही अजून झाली मेट्रो. फुगेवाडी म्हणजे ऍटलास कॉपकोचे पहिले गेट आहे तिथपर्यंत, खरे फुगेवाडी जरा पुढे आहे, पी एम टी स्टॉप पण पुढे आहे फुगेवाडीचा
कासारवाडी स्टॉप म्हणजे इंडियन कार्ड क्लोदिग कंपनी जवळ. अगदी जवळ जवळ स्टेशन आहेत. मेट्रोची स्टेशन नावे आणि त्यांचे ठिकाण आणि प्रचलित स्टेशन नावे / ठिकाण ह्यांचा फारच लोचा आहे ह्या मार्गावर 
@ साहिल, सध्या पिंपरी ते
@ साहिल, सध्या पिंपरी ते स्वारगेट असा मार्ग आहे पिंपरी ते निगडी अजून विचाराधीन आहे, मागच्याच आठवड्यात काहीतरी बातमी होती की ह्या बाबू लोकांना अजून 5/6 महिने दिलेत ह्या मार्गासाठीचा अहवाल द्यायला, असं काहीतरी होतं त्या बातमीत. जेंव्हा पहिला खांब उभारत होते पिंपरीत तेंव्हा भक्ती शक्ती चौकात मानवी साखळी आंदोलन केले होते 4 एक वर्षांपूर्वी निगडीकरांनी की पिंपरी मेट्रो निगडी पर्यंत आणा (आठवते का कोणाला?). आता दुर्दैवाने दुसर्या फेजमध्ये जाणार आहे हे काम म्हणजे अजून 5/6 वर्षेतरी हा मार्ग काही होत नाही. निगडीतले लोक पिंपरीला जातील का मेट्रोत बसायला (अंतर 6-7 किमी)? चिंचवडगाव ते मेट्रो पहिला थांबा अंतर 4 कीमी आहे, हेच चिंचवडगाव ते चिंचवड लोकल 2 किमी आहे आणि बसस्टॉप तर अगदीच जवळ. कुठेतरी गाडी पार्क करून किंवा लोकल स्टेशनपर्यंत बस कींवा रिक्षाने प्रवास करणे हे मुंबईत खूप सामान्य असेल पण पुण्यातले / पिंचितले पब्लिक तसा प्रवास करेल का? असो , मेट्रोचे काम लवकर पूर्ण व्हावे आणि लोकांना सलग मोठा प्रवास करायची संधी लवकर मिळो.
फारएण्ड, भोसरी म्हणजे नाशिक
फारएण्ड, भोसरी म्हणजे नाशिक फाटा Proud जिथून भोसरी जवळजवळ 8 किमी आहे, त्यांना ते नाव बदलायला सांगितले आहे, महामेट्रो ने प्रस्ताव दिलाय आता. बुधवार पेठ हे स्टेशन नाव पण बदलणार आहेत. तुम्ही म्हणत आहात ते सी एम इ , ते दापोडीला, तिथपर्यंत नाही अजून झाली मेट्रो. फुगेवाडी म्हणजे ऍटलास कॉपकोचे पहिले गेट आहे तिथपर्यंत, खरे फुगेवाडी जरा पुढे आहे, पी एम टी स्टॉप पण पुढे आहे फुगेवाडीचा Happy कासारवाडी स्टॉप म्हणजे इंडियन कार्ड क्लोदिग कंपनी जवळ. अगदी जवळ जवळ स्टेशन आहेत. मेट्रोची स्टेशन नावे आणि त्यांचे ठिकाण आणि प्रचलित स्टेशन नावे / ठिकाण ह्यांचा फारच लोचा आहे ह्या मार्गावर/////
नाशिक फाटा ते भोसरी ५ किमी आहे
फुगेवाडी सँडविक कंपनी गेट जवळ आहे
कासारवाडी मार्शल कंपनी जवळ आहे
इंडियन कार्ड क्लोडिंग जवळ संत तुकाराम नगर स्टेशन आहे
मेट्रो चा रूट वळवायला कुठे
मेट्रो चा रूट वळवायला कुठे अर्ज द्यावा लागेल..
लंपन, सुन्या - धन्यवाद. हो सी
लंपन, सुन्या - धन्यवाद. हो सी एम ई! आत्ता आठवले. काही वर्षे तेथून कंपनीच्या बसने प्रवास केलेला आहे. एकेकाळी सगळा रोड पाठ होता.
मार्शल कंपनी म्हणजे पूर्वी जे एन मार्शल होती तीच असावी. तेथून रेल्वेचे कासारवाडी स्टेशन बर्यापैकी लांब आहे. एकूण मेट्रो वाल्यांनी नावे ठेवताना आजूबाजूला फारसे बघितलेले दिसत नाही
@सुन्या - भोसरी मेन बस्टॉप
@सुन्या - भोसरी मेन बस्टॉप (लांडेवाडी नाही) 8 नाहीतरी 6/7 किमी नक्कीच आहे. सँडविक न कॉपकोची गेट्स एकमेकांना लागून आहेत, पण पुण्यावरून येताना आधी सँडविक लागते त्यामुळे सँडविकच्या गेटपाशी असेल फुगेवाडी
आय सी सी ची पडीक बिल्डिंग आहे ना कासारवाडी पेट्रोल पम्पा समोर? का ती वल्लभनगरजवळ (संतुनगर) आहे?
संपूर्ण पुण्यावर एक छत
संपूर्ण पुण्यावर एक छत बांधावं आणि त्यात अप्पूघर प्रमाणे धडकगाड्या ठेवाव्यात.
शांत माणूस- बोर धागा आहे..
शांत माणूस- बोर धागा आहे.. उगाच बोलावलेत इकडे...
हो पिंपरी - चिंचवड,
हो पिंपरी - चिंचवड, स्वारगेट -कात्रज, आणि हिंजवडी लाईन वर -हडपसर पर्यन्त ( हे तिन्ही मार्ग विचारात आहेत पण आजुन त्याबद्दल आजुन काही प्लॅन झाला नाही. हे सगळे मार्ग चालु झाल्यावर खर्या अर्थाने मेट्रोचे काम झाले असे म्हणता येईल. सध्या पुणे मेट्रो फोटो काढण्यासाठीच आहे , खास करुन पिंपरी- फुगेवाडी. मला नाही वाटत यात लोक प्रवास करत असतिल.
पिंपरी - स्वारगेट जरी चालु झाली तरी खुप फायदा होईल. चिंचवड गाव , निगडी, पिंपरी वरुन पुण्याला प्रवास करणे सोईचे होईल. पिंपरी - निगडी, पिंपरी - चिंचवड गाव शेअर रिक्षा खुप सोईच्या आहेत ज्या आपला अपमान न करता वापरता येतात. मी तरी वापरतो . कदाचित बालपण मुंबईत गेल्याने बस- रिक्षा वापरायची सवय असेल त्यामुळे पण असेल.
च्रप्स, लंपन तुमचे बालमित्र
च्रप्स, लंपन तुमचे बालमित्र आहेत. त्यांच्यासाठी तरी या. मी कोण लागतो तुमचा ?

मेट्रोचे संत तुकाराम नगर
मेट्रोचे संत तुकाराम नगर म्हणजे एस्टी चे वल्लभनगर. आय सी सी चे खंडहर होते त्याच्या विरुध्द बाजूला. आयसीसी ने निम्मी जागा कमर्शिअल कॉम्प्लेक्स केली. तेच आय सी सी देवी गौरव पार्क. फिलिप्स, टाटा, हरमन, रोल्स रोयास सारख्या मोठ्या कंपन्या त्या संकुलात आहेत. टाटा चे कॉल सेंटर असलेने बराच मोठा स्टाफ तेथे आवागमन करत असतो. त्यांच्या दारातच मेट्रोचा जिना असलेने त्यांना सोयीचे असणार. इकडे निगडी आणि तिकडे स्वारगेट अशी मेट्रो धावू लागली तर बरेच एम्प्लॉइ मेट्रो प्रफर करतील. नाहीतर संध्याकाळी सकाळी नुसती जत्रा असते तिथे. तसाच दुसऱ्या बाजूचा जिना डायरेक्ट वल्लभ नगर स्थानकात उतरवला असता तर बहार झाली असती.
हो अभ्या, मेहबूबानीची चांदी
हो अभ्या, मेहबूबानीची चांदी झाली त्या स्टेशन मुळे, कितीतरी वर्षे ओक्युपन्सी काहीच नव्हती पण जसजसे मेट्रो प्रत्यक्ष सुरू होण्याची बातमी येऊ लागली तसतशा कम्पन्या येऊ लागल्या आणि आता सगळे साईनेज बोर्ड दिसतात पूर्ण पार्कमध्ये. एक जिना कामामुळे बंद दिसत आहे (प्रॉपर शटर ने बंद केलाय)एस टी स्टँड साईडचा तो जास्त सोयीस्कर असावा.
@सुन्या - भोसरी मेन बस्टॉप
@सुन्या - भोसरी मेन बस्टॉप (लांडेवाडी नाही) 8 नाहीतरी 6/7 किमी नक्कीच आहे//// तोच ५ किमी च आहे
१९९२-९३ साली काही वरिष्ठ
१९९२-९३ साली काही वरीष्ठ नागरीक (त्यातील एक आमच्या कंपनीचे डायरेक्टर होते, तेव्हा ५०+) भोसरी-लांडेवाडीला जायला सीएमई मधुन रस्ता द्या अशी मागणी करत होते. मोठी लॉबी नसावी त्यांची कारण पेपर मध्ये त्याबद्दल कधी वाचले नाही. आमचे डायरेक्टर असे म्हणायचे तेव्हा आम्ही उगाच माना डोलवायचो. विषय वाढवायला नको म्हणुन.
Pages