गेल्या 25 वर्षांमध्ये पुण्याचा विस्तार अतिशय झपाट्याने झाला आहे आणि तो अजूनही होतच आहे. पुणे आणि आसपासच्या परिसरांमध्ये येऊ लागलेल्या छोट्या-मोठ्या उद्योगांमुळे शहराचा आकार वाढत राहिला आहे. वाढत्या शहरीकरणाचा ताण पुण्यातील उपलब्ध शहरी सार्वजनिक वाहतुकीवर वाढत गेला. हा वाढता ताण ती वाहतूक व्यवस्था पूर्ण करू शकलेली नाही. आजही मागणी आणि सेवेचा पुरवठा यात बरीच तफावत आढळत आहे. मागणी पूर्ण करण्यास सार्वजनिक वाहतूक सक्षम नसल्यामुळे रस्त्यावरच्या खासगी वाहनांची संख्या प्रचंड प्रमाणात वाढत चालली आहे. त्यातच अरुंद रस्त्यांमुळे वाहतुकीचा वेग आणखीनच मंदावत आहे.
मध्यंतरी पुण्यात बीआरटी (Bus Rapid Transit) व्यवस्था सुरू करण्यात आली; पण तिच्या नियोजनातील गोंधळामुळे तीसुद्धा यशस्वी होऊ शकली नाही. आता तर पुण्यातील वाहनांची संख्या पुण्याच्या लोकसंख्येपेक्षाही जास्त झालेली आहे. वाढत्या शहरीकरणाला सक्षम सार्वजनिक वाहतुकीच्या साधनाची जोड देण्याच्या हेतूने 2009-10 पासून पुण्यात मेट्रो सुरू करण्याबाबत विचार सुरू झाला. त्यामध्ये मेट्रो कशी असावी, उन्नत की भूमिगत, गेज काय असावा, रस्ताच्या बाजूने असावी की मधून, डबे कसे असावेत इ. इ. मुद्द्यांवरून सतत फक्त चर्चेतच राहिलेल्या पुणे मेट्रोच्या प्रत्यक्ष कामाला अखेर डिसेंबर 2016 मध्ये सुरुवात झाली. मेट्रोची उभारणी हे तसे अवाढव्य काम आहे. पण तरीही 2019 पर्यंत म्हणजे तीनच वर्षांमध्ये पहिल्या दोन मार्गांचे काम पूर्ण करण्याचे अवघड लक्ष्य ठेवले गेले होते. ती कालमर्यादा पाळणे शक्य नाही हे माझ्याही मनाला पटत होतेच. आज पुण्यातील मेट्रो मार्गांची उभारणी पूर्ण होण्याला अजून बराच काळ लागणार असल्याचे सध्या दिसत आहे. कारण गरवारे महाविद्यालयानंतर पुढे नदीपात्रात गेलेल्या मार्गावर अजून दुसऱ्या टप्प्यातीलच काम सुरू आहे. परिणामी डेक्कन, छत्रपती संभाजी उद्यान, पुणे महानगरपालिका येथील स्थानकांचे कामही प्रथमावस्थेतच आहे. त्यापुढे सत्र न्यायालयाजवळ होत असलेल्या जंक्शनचे कामही बरेच बाकी आहे. तीच अवस्था मंडई, स्वारगेटच्या बाजूलाही दिसते.
शहरांतर्गत चालणारी रेल्वे वाहतूक ‘मेट्रो रेल्वे’ म्हणून ओळखली जाते. ही सेवा जमिनीखाली, जमिनीवर किंवा उन्नत (elevated) अशा कोणत्याही प्रकारे उपलब्ध करून देता येते. ही सेवा सुरक्षित, इंधनाची बचत करणारी, प्रदूषणमुक्त, वेगवान आणि आरामदायक मानली जाते. मेट्रो भूमिगत असेल, तर रस्त्यावरील जागा व्यापली जात नाही, शिवाय उन्नत असेल, तर ती रस्त्यावरील केवळ 2 मीटर रुंद जागा व्यापते. लोहमार्ग आधारित सार्वजनिक वाहतूक प्रवासाचा कालावधी 50 ते 70 टक्क्यांनी कमी करते. तसेच एका प्रवाशाची एक किलोमीटर अंतरापर्यंत वाहतूक करण्यासाठी लोहमार्गावरील वाहतुकीला रस्ता वाहतुकीच्या तुलनेत एक-पंचमांश कमी इंधन लागते. ज्या ठिकाणी पीएचपीडीटी (म्हणजे Peak Hour Peak Direction Traffic) निर्देशांक 20,000 ते 45,000 आहे, तेथे मेट्रोसारखी लोहमार्ग आधारित सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सोयीस्कर ठरते. कारण मेट्रोद्वारे दर 90 सेकंदाला एक याप्रमाणे सेवा उपलब्ध करून देता येते. रस्त्यावरील वाहतूक 8,000 पेक्षा कमी पीएचपीडीटीला उपयुक्त ठरते. पुण्यातील मेट्रोच्या पहिल्या दोन्ही मार्गांचा पीएचपीडीटी निर्देशांक 2031 पर्यंत 10,000 ते 20,000 दरम्यान राहण्याचे अनुमान काढण्यात आले आहे.
सध्या पुण्यात मेट्रोचा 12 किलोमीटरचा मार्ग वाहतुकीसाठी खुला झाला आहे. तरीही या मार्गांवरील स्थानकांचं काम अजूनही अपूर्णच असलेलं दिसत आहे. पुण्यात एकूण 3 मेट्रो मार्ग उभारले जात असून त्यांची लांबी 54.58 किलोमीटर असणार आहे. त्यापैकी पिंपरी-चिंचवड महानगरपालिका भवन ते स्वारगेट (परपल लाईन, लांबी 16.59 किलोमीटर) अशी असून ती खडकीतील रेज हिलपर्यंत उन्नत (elevated) आणि त्यानंतर स्वारगेटपर्यंत भूमिगत असणार आहे. या मार्गावरील फुगेवाडीपर्यंतचा मार्ग 6 मार्चपासून खुला झालेला आहे. दुसरा मार्ग कोथरुडमधील वनाज ते रामवाडी (ॲक्वा लाईन, 14.66 किलोमीटर) असा असणार असून तो पूर्णपणे उन्नत असणार आहे. त्यापैकी वनाज ते गरवारे कॉलेजपर्यंतचा मार्ग वाहतुकीसाठी खुला झालेला आहे. तिसरा मार्गही पूर्णपणे उन्नत असणार असून त्याची लांबी 23.33 किलोमीटर असणार आहे. तो मार्ग हिंजेवाडीतील राजीव गांधी इंफोटेक पार्कपासून सुरू होऊन बालेवाडी मार्गे शिवाजीनगरच्या सत्र न्यायालयापर्यंत जाणार आहे. हे तिन्ही मार्ग सत्र न्यायालयाजवळ एकत्र येणार आहेत.
भारतात मेट्रो रेल्वे सेवेचा विकास आणि विस्तार अतिशय संथ गतीने झाला आहे. त्यासाठी पुढील मुद्दे कारणीभूत ठरलेले आहेत.
• सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेबाबत स्पष्ट धोरणाचा अभाव
• आवश्यक स्रोतांची कमतरता
• देशातील कायदेशीर व्यवस्था
• मेट्रोसंबंधीच्या तज्ज्ञांची कमतरता
• कार्यक्षम संस्थात्मक व्यवस्थेचा अभाव
मेट्रो सेवा सुरू करण्यासाठी देशातील अकार्यक्षम संस्थात्मक व्यवस्था हा सर्वात मोठा अडथळा ठरला आहे. मेट्रो रुळांवर आधारित व्यवस्था असली तरी सध्या तिच्या उभारणीसाठी कोणतेही एक मंत्रालय किंवा केंद्रीय संस्था जबाबदार नव्हती. त्यामुळे हे प्रकल्प मंजूर होऊन प्रत्यक्ष कामाची सुरुवात होईपर्यंतच बऱ्याच अडथळ्यांना सामोरे जावे लागत होते. पण मेट्रो रेल्वे सेवा सुरू करण्याची देशात वाढत असलेली मागणी लक्षात घेऊन 2017 मध्ये मंजूर करण्यात आलेल्या नव्या मेट्रो रेल्वे धोरणामध्ये देशातील मेट्रो रेल्वे विकासाची जबाबदारी केंद्र सरकारच्या आवास आणि शहरी व्यवहार मंत्रालयाकडे सोपवण्यात आली आहे.
दिल्ली मेट्रोमुळे झालेले फायदे
• शहरातील रस्त्यांवरील सुमारे 3,90,000 दैनिक वाहने कमी झाली.
• शहराचा मध्यवर्ती भाग आणि शहराच्या जवळपासची ठिकाणे यांच्यातील प्रवास जलद झाला.
• शहरांतर्गत वाहतुकीतील प्रवासाचा कालावधी 32 मिनिटांनी कमी झाला.
• इंधनाच्या वापरात वार्षिक सुमारे पावणेतीन लाख टनांनी घट झाली.
• दिल्लीच्या हवेतील प्रदुषकांचे वार्षिक प्रमाण पावणेसहा लाख टनांनी घटले.
• दिल्लीतील रस्त्यांवरील गंभीर अपघातांचे प्रमाण वर्षाला 125 ने कमी झाले.
• एकूण रस्ते अपघातांची वार्षिक संख्या 937 ने कमी झाली.
दिल्ली मेट्रो रेल्वे प्रकल्पाची व्यावहारितकता आणि यश लक्षात घेऊन केंद्र सरकारने 2009 मध्ये 20 लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या देशाच्या अन्य प्रमुख शहरांमध्ये मेट्रो रेल्वे सेवा सुरू करण्याला मान्यता दिली. दिल्लीमध्ये मेट्रो सेवा सुरू झाल्यावर तिच्या खात्रीशीर आणि वेगवान सेवेमुळे रस्ता वाहतुकीवर अवलंबून असलेले प्रवासी मेट्रोकडे वळलेले आहेत.
सध्या मेट्रो सेवा उपलब्ध असलेली शहरे
• कोलकाता, मुंबई, पुणे, नागपूर, चेन्नई, जयपूर, नम्मा मेट्रो (बेंगळुरू), तीव्र गती मेट्रो (गुरुग्राम), अहमदाबाद, हैदराबाद, कानपूर, कोची, लखनौ, नोएडा. यातील सर्वच मेट्रो रेल्वे प्रकल्पांची सेवा थोड्या-अधिक प्रमाणात सुरू झालेली आहे. त्याचवेळी त्यांचे विस्तारीकरणही सुरू आहे.
सध्या सेवा सुरू न झालेले, पण उभारणी सुरू असलेले प्रकल्प
• नवी मुंबई, भोज (भोपाळ), इंदूर, पाटणा, आग्रा, सुरत, ठाणे.
मान्यता मिळालेले, पण काम सुरू होण्याच्या स्थितीत असलेले प्रकल्प
• ठाणे, विशाखापट्टणम
लिंक
https://avateebhavatee.blogspot.com/2022/03/blog-post_17.html
पुणे मेट्रोतून मी केलेल्या पहिल्या प्रवासाचा व्हिडिओ खालील लिंकवर पाहता येईल.
https://www.youtube.com/watch?v=JvTZICUysoA
खोदादाद सर्कल म्हणजेच दादर
खोदादाद सर्कल म्हणजेच दादर ट्राम terminus उर्फ दादर T T होते का? मला तसे वाटतेय.
पुण्याचा संबंध जोडला मी ते
पुण्याचा संबंध जोडला मी ते कुठेच गेलं. ७ मिनिटांचा फरक तुम्हा मुंबईकरांना खुपतोय होय!
आणि चालत कशाला घोड्यावरून जा की! ते कोण म्हणतात ना घोडीचा स्पीड पाठ करतात म्हणे पुण्याची लोकं.
शां मा ( २५-३-२२-- ०२:३२)
शां मा ( २५-३-२२-- ०२:३२)
ह्या प्रतिसादातल्या फक्त एका वाक्याशी असहमत. उपरोध का असेना, पण मुंबईकरांना सांस्कृतिक घडामोडीत भाग घेता येत नव्हता ( आणि एका आयडीमुळे ते चित्र बदलले असावे वगैरे सोडून द्या) ह्या वाक्याशी किंवा वाक्याच्या पहिल्या अर्ध्या भागाशी असहमत.
मुंबईत मराठी सकट इतर अनेक भाषकांचे सांस्कृतिक उत्सव मोठ्या प्रमाणावर साजरे होतात. सभा, संमेलने, गोष्ठी सुरू असतात. प्रत्येक भाषेच्या लोकांनी आपापली मोठमोठी भवने उभी केली आहेत. त्यात त्यांचे त्यांचे कार्यक्रम होत असतात. मराठी, हिंदी गुजराती इंग्लिश वर्तमानपत्रे पुष्कळ खपतात.
मराठी उत्सवांचे केंद्र गिरगाव दादर पासून उत्तरेकडे सरकले आहे हे खरे, पण गोरेगाव, बोरिवली, मुळुंद येथे त्याच्या फांद्या जोमाने वाढल्या आहेत. त्याही पलीकडे वसई, डोंबिवली, ठाणे, पालघर ही केंद्रे ( जरी अगदी महामुंबईतली नसली तरी साधारण mmr मुंबई मेट्रोपॉलिटन रीजनमध्ये आहेत) जोरदार घडामोडी चालू असतात. वसई हे तर प्रमुख केंद्र बनत चालले आहे. अनेक पुस्तकप्रकाशने,
परिसंवाद, नाट्यस्पर्धा, चर्चा ह्या भागात घडत असतात.
मुंबईमध्ये अन्य भाषिक
मुंबईमध्ये अन्य भाषिक पिढ्यानपिढ्या रुजलेले आहेत. आता आता आलेले नाहीत. त्यामुळे मुंबईत विविध धर्मीय, प्रांतीय उत्सवांची फार मोठी परंपरा आहे आणि ते ही अगदी एकमेकांत मिसळून साजरे केले जातात. मुळात मुंबईचा आवाका फार मोठा आहे. यात कमालीची विविधता आहे. बाहेरून काही काळासाठी आलेले लोकं आपल्या वास्तव्यादरम्यान मुंबईचा काही भाग बघतात आणि तेवढीच मुंबई समजून परत जातात. हे म्हणजे त्या हत्ती आणि चार आंधळ्यांच्या गोष्टीसारखे आहे.
मुंबई पण आता राहण्या लायक
मुंबई पण आता राहण्या लायक नाही.फूट पथ वर झोपड्या, रस्त्यावर फेरीवाले,फक्त गर्दी गर्दी
तरी अजून टिकून आहे कारण पाच सहा धरण जी पाणी पुरवठा करतात ,पवई सारखे तलाव,नॅशनल पार्क सारख्या मोकळ्या जागा
पण इतकी गर्दी मुंबई मध्ये काही वर्षात होईल की ती पूर्ण कोलमडून जाईल
एक वर्ष फक्त पावूस नाही पडला तर मुंबई नष्ट होईल इतकी भयानक स्थिती आहे
ईश्वराची कृपा आहे अजून ती वेळ आली नाही.
पण कधी ही येवू शकते .
लोकसंख्या per km var ह्या वर कडक निर्बंध असायलाच हवे .नाहीतर निसर्गाचा एक फटका करोडो लोकांना यम सदनी पाठवेल
पैसा ,संपत्ती काही वाचवू शकणार नाही.नियोजन बद्घ ,रेखीव ,आखीव शहर भारतात का असू नयेत
प्रचंड लोकसंख्या.
प्रचंड लोकसंख्या.
अनेक समस्या.
कचऱ्याची विल्हेवाट,पाणी पुरवठा,वीज पुरवठा.
आणि मुंबई मधील अती प्रचंड लोकसंख्येला ह्या सुविधा ,सेवा दिल्या जात आहेत
जे जगातील पाहिले आश्चर्य आहे.
खूप अवघड काम आहे हे..
जगात दुसऱ्या कोणत्याच शहरात ही ताकत नाही.
पण असाच लोकसंख्येचा बोजा मुंबई वर पडत गेला तर एक दिवस १००% मुंबई कोलमडून पडणार आहे.
पुणे,नाशिक,पण याच मार्गाने पुढे जात आहेत
विनाश अटळ आहे..
मेट्रो, लोकल ट्रेन ह्या सुविधा खूप नगण्य आहेतं
पुण्यामुम्बइतले लोक आकाशातून
पुण्यामुम्बइतले लोक आकाशातून पडले नाहीत
खेडूत लोकांनी 4 वारस निर्माण केले, दोनजण गावात भांडत बसले, दोन पुण्यामुम्बइत आले
अरे , पुणे मुंबईवरून भांडू
अरे , पुणे मुंबईवरून भांडू नका.

सर नवीन धागा काढतील - असे म्हणणार होतो, तर सरच मला सूचकपणे सांगताहेत काढायला.
पुणे मेट्रोचे शुटिंगवाला
पुणे मेट्रोचे शुटिंगवाला मराठी शिनुमा लवकर येवो. सपनील ( स्वप्निल ) जोशीचाच असणार.
शारूक सुचकपणे नाही तर उघडपणे
शारूक सुचकपणे नाही तर उघडपणे सांगतो नवीन धागा काढा, कारण विषय खोल, दुनिया गोल आहे, मधोमध एक होल आहे, ती आमची मुंबई आहे.
मलाही प्रश्न पडतो नेहमीच, की मुंबई बकाल होत असूनही, म्हणजे असे सारे म्हणत असूनही, आजही मुंबईचे जागेचे भाव का गगनाला भिडलेलेच आहेत? आणि लोकं देखील जास्तीचा पैसा ओतून कसे तिथे घर घेत आहेत? हे प्रश्नही मांडा त्या धाग्यात. मला ऊत्तरे हवी आहेत. म्हणजे आम्हीही मध्यंतरी मुंबईतील एक घर विकत होतो तर मित्रपरीवारातील लोकं कळकळीने सांगत होते अरे मुंबईतील घर कश्याला विकत आहात?? ते देखील अजून दोन असताना त्यांना तीनातले एक विकतोय हे सुद्धा पचनी पडत नव्हते.. काय असे आहे जे आजही मुंबईची क्रेझ कायम आहे?
मलाही खूप प्रश्न पडले आहेर.
मलाही खूप प्रश्न पडले आहेर. गंभीर आणि महत्वाचे.
पण मला उत्तरे नको आहेत. त्यामुळे वेगळा धागा काढण्यास माझे अनुमोदन नाही.
काढला सर धागा.
काढला सर धागा.
शारूक धन्यवाद, ईतर लोकं येऊ
शारूक धन्यवाद, ईतर लोकं येऊ दे तिथे, धागा पेटू दे, मग मी कभी खुशी कभी गम स्टाईल हेलिकॉप्टरमधून एंट्री मारतो.
तुर्तास हा धागा पुन्हा पुणे मेट्रोच्या ट्रॅकवर जाऊ दे
सर हेलीकाप्टर स्वताच चालवता
सर हेलीकाप्टर स्वताच चालवता का ड्रायवर ठेवला आहे?
आहे त्या लोकसंख्येचा विचार
आहे त्या लोकसंख्येचा विचार करून आपण सार्वजनिक वाहतुकीचे पर्याय निर्माण करतो.
वाहतुकीचा नवीन पर्याय निर्माण झाला की नवीन बिल्डिंग उभ्या राहतात.लोकसंख्या वाढते.
हे दुष्ट चक्र आहे.
ह्याला अंत नाही.
कायम स्वरुपी उपाय एक वर्ग किलोमीटर मध्ये लोकसंख्या किती असावी ह्या विषयी कडक कायदे.
झोपड्या,फेरीवाले,अनधिकृत बिल्डिंग ह्यांना चाप हा आहे.
उद्या 100, मेट्रो मार्ग तयार केले तर पुणे पाच कोटी लोकसंख्येच होईल..
समस्या आहे त्याच राहतील उलट जास्त गंभीर होतील.
कशाला एक्स रे ला पाठवला ?
कशाला एक्स रे ला पाठवला ? इतकी गर्दी ?
पेशंट आमच्यावरच ओरडतात , मी एकच प्रश्न विचारतो , तुम्हाला किती मुले आहेत ?
3
"द्या ढकलून नदीत, आपोआप गर्दी कमी होईल!!"
ह्या गर्दीपायी आमचे जेवण 1 चे 2 ला होते , आणि हे आम्हालाच बोलतात.
140 कोटी म्हणजे 1400
140 कोटी म्हणजे 1400
लाख भारताची लोकसंख्या आहे भारताचा भू भाग 3287263
वर्ग किलो मीटर आहे.
ह्यांना दोन वेळ चे अन्न जरी फक्त भारता वर अवलंबून द्यायचे झाले तरी शक्य आहे का .
अन्न पिकवण्या साठी जमीन तरी पुरेशी आहे का?
रशिया वर जसे जगाने निर्बंध घातले तसे भारतावर घातले तर किती भयानक अवस्था होईल.
तरी अर्ध्या भारताने त्यांच्या लोकसंख्येवर नियंत्रण ठेवले आहे.
त्यांनी पण अडाणी कारभार केला असता तर भयानक स्थिती निर्माण झाली असती.
140 कोटी म्हणजे 1400 लाख >>
140 कोटी म्हणजे 1400 लाख >> परत गणित शिकवण्याचे पण वांधे. खरं आहे, संख्या आणखी वाढली असती तर १४० कोटी म्हणजे किती लाख झाले असते कल्पनाही करवत नाही. (हो! कल्पना ही करवत नाहीच!)
१ कोटी# १००, लाख.
१ कोटी# १००, लाख.
१०# १००० लाख.
१०० कोटी# १०००० लाख.
खूप लाख होत आहेत.
महा प्रचंड संख्या आहे ही.
ह्यांना पोसणे महा कठीण काम.
कोटी म्हणजे प्रकार अशी कोटी
कोटी म्हणजे प्रकार अशी कोटी सुद्धा करवत नाही.
कोटी कळणार नाही असे वाटून लाखात बोलले की त्यास लाखातलं बोललात म्हणावे.
बॉपरे!. इतके अनरीड बघून इथं
बॉपरे!. इतके अनरीड बघून इथं येऊन बघतो तर काय बाफाचे चौपदरीकरण झालेले! कुणाचा पदर कुणाच्या पदरात नाही. ये क्या जगह है दोसतो
https://www.theguardian.com
https://www.theguardian.com/environment/2018/feb/26/brussels-to-make-pub...
ब्रुसेल्स मधे ज्या ज्या दिवशी प्रदूषणाची पातळी वाढेल त्या त्या वेळी पब्लीक ट्रान्स्पोर्ट मोफत करण्याचा निर्णय झाला आहे.
बॉपरे!. इतके अनरीड बघून इथं
बॉपरे!. इतके अनरीड बघून इथं येऊन बघतो तर काय
>>>>
पहिल्याची मायबोली राहिली नाही हेच खरे..
धागा भरकटला तर लोकांना त्याचे अरे बापरे म्हणावे ईतपत आश्चर्य वाटत आहे
धागा भरकटला तर लोकांना >>>
धागा भरकटला तर लोकांना >>> साजिरा म्हणजे मायबोली प्रशासन सदस्य आहेत. आजही त्यांचे शेरे (त्यांनी गंमतीत दिले) तरी वाचून लोक आपले काही चुकले का असा विचार करत असतात. इथे त्यांनी ही कमेण्ट प्रशासक म्हणून केली नाही हे जाणवते. वेमा पण त्यांना वैयक्तिक मतं मांडायची असतील तर अजय या आयडीचा वापर करतात. पण तरी त्यांना लोकांना या कॅटेगरीत घातलेलं पाहून गंमत वाटली.
साजिरा म्हणजे मायबोली प्रशासन
साजिरा म्हणजे मायबोली प्रशासन सदस्य आहेत
>>
अच्छा, हे मला माहीत नव्हते. सांगितल्याबदल धन्यवाद फक्त आता असे कसे माहीत नव्हते म्हणून आणखी अवांतर शंका नको..
अर्थात माहीत असते तरी ती कॉमेंट सामान्य सभासद म्हणून असल्याने माझ्या कॉमेंटमधील लोकांना हा उल्लेख बदलला नसता. त्यात गंमत वाटण्यासारखे काही नाही. ते सुद्धा लोकंच आहेत.
आणि तसेही मुंबई पुणे नवीन धागा काढायची सूचना देत मी या धाग्यावरचा अवांतर ट्राफिक वळवायला मदतच केली आहे
https://www.maayboli.com/node/81359
तसेही मुंबई पुणे नवीन धागा
तसेही मुंबई पुणे नवीन धागा काढायची सूचना देत मी या धाग्यावरचा अवांतर ट्राफिक वळवायला मदतच केली आहे >> ये कब हुआ?
अहो मी 'अॅडमिन टीम' मध्ये
अहो मी 'अॅडमिन टीम' मध्ये होतो काही वर्षांपूर्वी. (मला आठवते त्याप्रमाणे २०११-१२ ते २०१७-१८). पण तेव्हाही मायबोली दैनंदिन कारभार, आयडी आणि बाफ वगैरेंशी माझा संबंध नव्हता. फार तर टीममधल्या चर्चांंमध्ये मत देणे वगैरे, पण तितकेच. खरेदी विभाग सांभाळणे, वार्षिक हिशेब आणि आयटीआर-सीए-सीएस, मायबोलीचे भारतातले उपक्रम इत्यादींमध्ये लक्ष घालणे- हे माझं काम होतं. शिवाय भविष्यातल्या अनेक कार्यक्रमांची आखणी एकुणच अॅडमिन टीमने केली होती. मात्र आता या सार्या कामांचं प्रयोजनच उरलेलं नसल्याने मायबोलीच्या अॅडमिन टीममध्ये मी नाही. (माझ्या माहितीप्रमाणे भारतातले कुणी नाही).
कुणाचा गैरसमज नको, म्हणून हा खुलासा.
अच्छा.
अच्छा.
धागा मूळ track वर आणण्यासाठी.
धागा मूळ track वर आणण्यासाठी....
इतकी सगळी चर्चा सगळेजण करत आहेत पण पुणे मेट्रोचे तिकीट दर किती आहेत ते कोणीच लिहिले नाही.
एका प्रवासाचे वीस ₹ आणि
एका प्रवासाचे वीस ₹ आणि परतीचे काढले तर तीस ₹!
Pages