
शेवटचे अद्यतन : ३१/१२/२०२१
मागचा धागा इथे : https://www.maayboli.com/node/78680?page=19
……..
चालू महासाथीचा मागचा धागा काढताना मनोमन अशी इच्छा व्यक्त केली होती की, तो शेवटचा धागा ठरावा आणि लवकरच आजार पूर्ण गाडला जावा. दुर्दैवाने तसे काही होण्याची चिन्हे नाहीत.
गेल्या काही आठवड्यांमध्ये दक्षिण आफ्रिकेतून Omicron नावाच्या करोना विषाणूच्या नव्या उपप्रकाराने तोंड वर काढले आहे. त्याचे नाव ग्रीक वर्णमालेच्या पंधराव्या अक्षरानुसार दिलेले आहे.
( Omicron च्या उच्चाराबाबत भाषातज्ञांमध्ये मध्ये मतभेद आहेत. खुद्द ऑक्सफर्ड शब्दकोशानुसार सुद्धा त्याचे चार उच्चार असून त्यावर एकमत नाही ! इंग्लिश उच्चारानुसार बऱ्याच ठिकाणी "OH-my-kraan असे दिलेले दिसते).
हळूहळू Omicron चा जगभर प्रसार होत आहे. सुरुवातीस दक्षिण आफ्रिकेत आढळलेल्या काही रुग्णांच्याबाबत डॉक्टरांची निरीक्षणे अशी होती :
१. ज्या लसवंतांना नवा संसर्ग झाला आहे त्यांची लक्षणे सौम्य आहेत. अशांवर घरीच उपचार चालू असून परिस्थिती नियंत्रणात आहे.
२. असे अधिकतर रुग्ण तरुण वयातील आहेत
३. जे बाधित रुग्णालयात दाखल झाले आहेत त्यापैकी 90 टक्के बिगर लसवाले आहेत.
अलीकडील बातमीनुसार त्यांच्याकडील रुग्णसंख्येचा आलेख आता कळसबिंदू पार होऊन होऊन खाली खाली येत आहे. एकंदरीत विचार करता हा आजार सौम्य होण्याकडे झुकत आहे.
विषाणूचा Omicron व आधीचा डेल्टा प्रकार यांची पाश्चिमात्य देशांतील एकंदरीत तुलना खालील चित्रातून चांगली समजेल.
सार्स 2 च्या भावी उत्क्रांतीबद्दल वैज्ञानिकांचे अंदाज :
१. एक तर तो सामान्य सर्दीच्या विषाणूप्रमाणे सौम्य होईल किंवा इन्फ्लूएंजाच्या विषाणू प्रमाणे घातकही राहील.
२. विषाणूच्या उत्क्रांतीगणिक तो सौम्य होतो ही एक समजूत आहे. पण काहींच्या मते ते मिथक आहे. वास्तव अधिक गुंतागुंतीचे असते.
३. या विषाणूचे प्राणिजन्य साठे वाढतेच आहेत. मिंक व हरणाच्या एका जातीत त्याचे सातत्यपूर्ण वास्तव्य आणि भ्रमण चालू आहे. त्यातून नवी उत्परिवर्तने होण्याचा संभव राहतो. ही आपल्या दृष्टीने डोकेदुखी ठरते.
नव्या घडामोडींची भर जशी माहिती मिळेल तशी घालत राहू.
* जशी Omi बाधितांची संख्या वाढते आहे तशी काही उपयुक्त माहिती मिळते आहे. यामुळे बाधित असलेल्या काही रुग्णांमध्ये खालील वैशिष्ट्यपूर्ण लक्षणे दिसून आली आहेत:
* मळमळ
* भूक खूप मंदावणे
* रात्री प्रचंड घाम येणे, अगदी शरीर निथळून निघेल इतका.
या रुग्णांमध्ये वास व चव संवेदनेवर परिणाम झालेला नव्हता.
उपचारांच्या आघाडीवर अद्यापही रामबाण असे विषाणूविरोधी औषध मिळालेले नाही. संशोधन चालू आहे.
१. Molnupiravir या तोंडातून घ्यायच्या औषधाला मध्यंतरी इंग्लंडने आणि नुकतीच अमेरिकी औषध प्रशासनानेही आपात्कालीन वापराची मान्यता दिली आहे. वय 18 वर्षावरील लोकांसाठी ते वापरायचे आहे. पाठोपाठ भारतीय औषध प्रशासनानेही याला आपात्कालीन वापराची मान्यता दिली आहे.
गरोदर स्त्रियांसाठी त्याचा वापर अत्यंत काळजीपूर्वक करण्यात यावा. त्याचे संभाव्य दुष्परिणाम जुलाब, मळमळ व चक्कर येणे असे आहेत.
2. Paxlovid या नव्या गोळीस आपत्कालीन मान्यता मिळाली आहे. हे २ औषधांचे मिश्रण असून त्या बद्दल अजून काही माहिती:
हे औषध फक्त खालील रुग्णांसाठी वापरायचे आहे :
१. rt-pcr चाचणी होकारात्मक आलेली.
२. ज्यांचा आजार गंभीर होण्याचा धोका आहे त्यांनी.
रोग निदान झाल्यावर हे औषध लगेच चालू करायचे आहे.
संभाव्य दुष्परिणाम :
चव-संवेदना कमी होणे, जुलाब, रक्तदाबवाढ आणि स्नायूदुखी.
नव्या लसी
भारतात नुकतीच दोन नव्या लसीना आपात्कालीन वापराची मान्यता मिळाली आहे. त्या लसी याप्रमाणे :
१. Corbevax : ही प्रोटीन सबयुनिट प्रकारातील स्वदेशी निर्माण झालेली आहे.
२. Covovax : यात नॅनोकणांचा वापर केलेला आहे.
आता भारतात सध्या एकूण आठ लसीना वापरासाठी मान्यता मिळालेली आहे.
नेहमीचे प्रतिबंधात्मक उपाय म्हणजेच त्रिसूत्री अजून बराच काळ चालू ठेवणे हे आपले एक महत्त्वाचे लढण्याचे अस्त्र असेल.
एकंदरीत जगभरात हा संसर्ग वाढत असल्यामुळे विविध प्रशासनांनी लोकांवर काही प्रमाणात संचार निर्बंध लावले आहेत. नाताळच्या दिवशी जगभरात मिळून ६००० विमान उड्डाणे रद्द केली गेली.
…….
लसीकरण : नवे संशोधन
डीएनए प्रकारची लस भारतात लवकरच उपलब्ध होईल असे अलीकडील बातमीवरून दिसते. त्या प्रकाराची शास्त्रीय माहिती :
१. सध्या जगभरात या प्रकारातील बारा लसी प्रयोगाधीन आहेत. त्यातली पहिली ( ZyCoV-D) भारतात उपलब्ध होईल.
२. ही लस सुईविरहित उपकरणाने दाबतंत्राचा वापर करून त्वचेखाली दिली जाते. हे पारंपरिक इंजेक्शन नसल्यामुळे संबंधित व्यक्तीस वेदना खूप कमी होते.
३. भारतातील लस तिच्या प्रयोगादरम्यान २८,००० लोकांवर वापरण्यात आली. त्यादरम्यान विषाणूचा डेल्टा प्रकार जोरात होता. त्या वातावरणात लसीने 67% परिणामकारकता दाखवली आहे.
४. तिचे उत्पादन तंत्रज्ञान सोपे आहे.
५. आरएनए लसींच्यापेक्षा ही लस अधिक टिकाऊ स्वरूपाची आहे.
६. मात्र तिचा पुरेसा परिणाम दिसून येण्यासाठी किमान तीन डोस द्यावे लागतील असे दिसते.
...................................................
तिसरा डोज प्रभावेी आहे की
तिसरा डोज प्रभावेी आहे की नाही? एवढे मतांतर का आहे? सामान्य माणसाने कुणाक्डे पहायचे?
कट ऑफ ४५ to ५०० आहे
कट ऑफ ४५ to ५०० आहे
चिऊ
चिऊ
४५ to ५०० याला रेंज म्हणतात.
कट ऑफ हे डॉक्टर रुग्णपरिस्थितीनुसार ठरवतात.
इथून सल्ला देणे अयोग्यच.
रेव्यू
रेव्यू
तज्ञांमध्येच मतभिन्नता असल्याने मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देऊ शकत नाही
काही विशेष संशोधन वाचनात आल्यास त्यावर लिहिन.
Open letter by 35 doctors
Open letter by 35 doctors from across country states ‘India overdoing testing, medication’
https://timesofindia.indiatimes.com/city/mumbai/open-letter-by-35-doctor...
तिसऱ्या (बलवर्धक) डोस
तिसऱ्या (बलवर्धक) डोस संदर्भात काही प्रश्न उपस्थित झालेले आहेत हे खरे. ‘नेचर’ या वैज्ञानिक नियतकालिकातून काही वाचन केले. त्यानुसार तिसरा डोस जर द्यायचा असेल, तर तो खालील दोन प्रकारच्या लसींचा द्यावा असा एक विचारप्रवाह आहे :
1. mRNA
2. purified viral protein
त्यातला 2 हा जो प्रकार आहे त्याचे उत्पादन अजून चालू झालेले नाही. Novavax व Clover हे उद्योग त्याच्या संशोधनात मग्न आहेत.
भारतात आपण ज्या २ लसी वापरलेल्या आहेत त्या वरील दोन्हीपेक्षा वेगळ्या प्रकारच्या आहेत.
जर वरील अनुमानानुसार तिसरा डोस जर एकदम वेगळ्या कंपनीचा द्यायचा ठरला, तर मग तो एकच डोस पुरणार का, असा नवा प्रश्न उपस्थित होतो.
>>>जर वरील अनुमानानुसार तिसरा
>>>जर वरील अनुमानानुसार तिसरा डोस जर एकदम वेगळ्या कंपनीचा द्यायचा ठरला, तर मग तो एकच डोस पुरणार का, असा नवा प्रश्न उपस्थित होतो.?|>>>मग सर्व सरकारांनी काही तरी कृती करायची जाहिरात केली पाहिजे म्हणून ३ रा डोज दिला का?
राष्ट्रीय बालहक्क संरक्षण
राष्ट्रीय बालहक्क संरक्षण आयोग (NCPCR) ने सुप्रीम कोर्टात मोठी माहिती दिली. १ एप्रिल २०२० पासून एकूण १,४७,४९२ मुलांनी कोविड-19 आणि इतर कारणांमुळे आई किंवा वडील किंवा दोघांना गमावले आहे.
https://maharashtratimes.com/india-news/coronavirus-over-1-47-lakh-child...
साद, खरय.
साद, खरय.
...
गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना कोविडबरोबर न्युमोनिया सुद्धा झालेला आहे.
त्यांची तब्येत अधिक बिघडलेली आहे.
https://www.msn.com/en-in/health/wellness/lata-mangeshkar-s-health-worse...
यातून बरे होण्यासाठी त्यांना शुभेच्छा !
जोकोविक याचा ऑस्ट्रेलियाचा
जोकोविक याचा ऑस्ट्रेलियाचा व्हिसा रद्द करण्यात आला आहे, त्यामुळे त्याला ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेत भाग घेता येणार नाही. लस न घेणे हा प्रत्येक व्यक्तीचा वैयक्तिक निर्णय असला, तरी इमिग्रेशनचे नियम काय असावेत हा
प्रत्येक देशाचा अधिकार आहे. दबावाला बळी न पडता त्याचा व्हिसा रद्द करण्याचे धाडस दाखवल्याबद्दल ऑस्ट्रेलियन इमिग्रेशन मिनिस्टर Alex Hawke याचे कौतुक आहे.
The perception that Djokovic opposed vaccination was enough to risk inciting anti-vaxxers in the country, and that the tennis star's apparent disregard for Covid-19 rules meant there was a risk others would emulate his actions and ignore public health orders.
मुंबईत करोनाची तिसरी लाट
मुंबईत करोनाची तिसरी लाट नियंत्रणात आलीय का? या प्रश्नाचं उत्तर होय असंच आहे. मुंबई महापालिकेनेच मुंबई हायकोर्टात ही माहिती दिली आहे.
‘नेचर’ मधील एक ताजा लेख आशा
‘नेचर’ मधील एक ताजा लेख आशा पल्लवित करणारा आहे.
(https://www.nature.com/articles/s41577-022-00678-4/figures/1)
त्यामध्ये ऑक्टोबर 2020 ते आजपर्यंत दक्षिण आफ्रिकेत झालेल्या आजाराचा शास्त्रशुद्ध अभ्यास दिलेला आहे. त्यातून दोन थिअरीज पुढे येतात :
१. ओमायक्रोन हा प्रकार मुळातच डेल्टापेक्षा सौम्य हानिकारक आहे.
२. एव्हाना लोकांमध्ये नैसर्गिक आजार आणि लसीकरण या दोन्हींच्या संयोगाने चांगली समूह प्रतिकारशक्ती निर्माण झालेली आहे. तिच्यामुळे ओमि. विरुद्ध शरीराचा लढाही चांगला होतोय. या दोन्ही थिअरीजसाठी पुरावे मिळालेले आहेत.
* एकत्रितपणे या दोन्ही मुद्द्यांमुळे समाजातील सर्वसाधारण आजार सौम्य स्वरूपाचा राहिला आहे.
* यापुढेही विषाणूची उत्परिवर्तने होत राहतील. त्यातून निर्माण होणारे नवे प्रकार आपल्याशी सौम्यपणे वागण्याची शक्यता आहे.
सौम्य आहे ही गोष्ट दिलासादायक
सौम्य आहे ही गोष्ट दिलासादायक असली तरी लोक त्यामुळे बिनधास्त झालेत असं वाटतंय! कितीही सौम्य असला, तरी शेवटी माणूस काही दिवस तरी आजारी पडतो, आणि प्रचंड संख्येने माणसं एकाच वेळी आजारी पडणं याचा समाजाच्या पातळीवर परिणाम होणार.
**बिनधास्त झालेत असं वाटतंय!
**बिनधास्त झालेत असं वाटतंय!
>>>+१
सावध राहणे आवश्यक .
कितीही सौम्य असला, तरी शेवटी
कितीही सौम्य असला, तरी शेवटी माणूस काही दिवस तरी आजारी पडतो, >> hyaalaa पर्याय काय?
किती दिवस जगणं थांबवून चालेल?
खूप लोकांच्या रोजगारावर परिणाम झाला आहे, आता शेंडी तुटो वां पारंबी अशा अवस्थेला आलीत माणसं
ज्यांना ऑफिसला जावंच लागतं,
ज्यांना ऑफिसला जावंच लागतं, ते किंवा दुकानदार, सुतार, प्लंबर वगैरे लोकांचं बरोबरच आहे. पण सणसमारंभ, वाढदिवस, हळदीकुंकवं साजरी करण्यावाचून कुणाचं काही अडत नाही. पण हे चालू आहे आणि ज्ये. ना. अशा कार्यक्रमांना हजर रहात आहेत. वर म्हणतात, माईल्ड आहे यावेळचा.
वावे, अगदी सहमत.जास्त संख्या
वावे, अगदी सहमत.जास्त संख्या असलेले कार्यक्रम करणे किंवा हजेरी लावणे, देवस्थाने इथे जाणे हे बिनदिक्कत चालूं आहे.
ओमीक्रॉन सौम्य असला तरी अजून सध्या वाढणाऱ्या रुग्णसंख्येत मुख्य संख्या आधी च्या व्हेरीयंट ची आहे.मला साधा कोव्हीड न होता फोडणी चा कोव्हीडच(म्हणजे ओमीक्रॉन) होऊदे, मग तो सौम्य असेल असा चॉईस देऊन हवं ते इन्फेक्शन निवडता येत नाही.
हे काळजी घेत राहण्याचं मुख्य कारण वाटतं.हातावर पोट आहे, ये जा करणे अटळ आहे त्यांनी करावीच.पण ज्यांना चॉईस आहे त्यांनी ती कमी केली तर ज्यांना अटळ आहे त्यांचा धोकाही काही प्रमाणात कमी होतोय.
जास्त संख्या असलेले कार्यक्रम
जास्त संख्या असलेले कार्यक्रम करणे किंवा हजेरी लावणे, देवस्थाने इथे जाणे हे बिनदिक्कत चालूं आहे. >> +११११
आमच्या इथे जेष्ठ नागरिक काही होत नाही, म्हणून सरळ लग्नाला हजेरी लावत आहेत, वरून ज्ञान देतात नाही गेलो तर कस चालेल, आम्हाला नाती जपावी लागतात तुम्हाला काय कळतंय. तुमच्या मुलाच्या लग्नात कोणी पायही ठेवणार नाही असे वागलात तर, (पण अहो जगलो तर मुलाचे लग्न बघुना (मनातच हे बोलावे लागते))
सरकार अजून ग्रेट सोमवार पासून स्कूल्स सुरु होत आहेत म्हणजे अजून बोलायला मुलं शाळेत जाऊ शकतात तर आम्ही का नाही जाऊ शकत?
टेन्शनच आलंय मुलाला शाळेत पाठवायचं.
खूप दिवस घरात बंदिस्त
खूप दिवस घरात बंदिस्त राहिल्या मुळे मानसिक स्वस्थ बिघडते.चीड चीड,नैराश्य अशा भावना निर्माण होतात एक प्रकारचा हताश पण येतो
कायम स्वरुपी स्वभावात बदल होण्याची शक्यता असते.
हा लॉक डाऊन च्या दुष्परिणाम वर पण चर्चा,अभ्यास झाला पाहिजेत.
जर पालक मुलांना घेवुन मॉल मधे
जर पालक मुलांना घेवुन मॉल मधे, बाहेर फिरायला जातात तर त्यांना शाळेत पाठवायला काहिच प्रोब्लेम नसावा.शक्य तेवढी काळजी घेवुन नेहमीचे रुटीन सुरु करणे गरजेचे आहे. WFH चा आता दोन वर्षानंतर कंटाळा आला आहे. ऑफिस केव्हा सुरु होइल ह्याची वाट बघतो आहे.
आता बर्यापैकी संख्येने
आता बर्यापैकी संख्येने लोकांचं लसीकरण झालेलं आहे.
लसीकरण झालेल्यांना गंभीर त्रास होण्याचं प्रमाण कमी आहे. ओमिक्रॉन डेल्टाच्या तुलनेत सौम्य असला तरी आधीच्या व्हेरिएंट, ओरिजिनलच्या तुलनेत सौम्य नाही.
एकूण संसर्गग्रस्तांच्या तुलनेत इस्पितळात भरती होण्याचं आणि ऑक्सिजन बेड लागण्याचं प्रमाण लक्षणीय इतकं कमी आहे. ( थोड्या वेळाने मुंबईची आकडेवारी देतो) करोना संसर्ग झालेले सगळेच लोक टेस्ट करत नाहीएत, हे लक्षात घेतलं तर हे प्रमाण नगण्य म्हणावं इतकं कमी आहे.
शाळा आता जवळपास दोन वर्षे बंद असल्यासारख्या आहेत. त्यामुळे शिक्षणाचं प्रचंड नुकसान झालंय. शिवाय परीक्षा न घेता, ऑनलाइन घेऊन पास केलं गेलंय. त्यामुळे हे नुकसान रेकॉर्डेड आहे त्यापेक्षा अनेक पट जास्त आहे.
पण नुसता मास्क लावायचे नियमही लोक पाळत नाहीत, हा मोठा प्रॉब्लेम आहे. शाळेतली मुलं वर्गात लांब बसवली तरी जाता येता गळ्यात गळे घालून असतात.
<<पण नुसता मास्क लावायचे
<<पण नुसता मास्क लावायचे नियमही लोक पाळत नाहीत, हा मोठा प्रॉब्लेम आहे.>>
हो. आणि व्यवस्थीत जागा असूनही अंतर ठेवत नाहीत.
आमच्याकडे दुकानात दोन महिन्यांपूर्वी पर्यन्त बाहेर सॅनीटायझर वापरून, तपमान बघून आत सोडायचे आता ते ही बंद केलंय.
एकंदरीत लोक त्रिसूत्री पाळायलाच कंटाळलेले दिसताहेत.
फोडणीचा कोव्हिड
फोडणीचा कोव्हिड
भरत, हो, हॉस्पिटलमध्ये भरती होण्याचं प्रमाण सगळीकडेच खूप कमी आहे. बंगळूरमध्ये कालची केसेसची संख्या दुसऱ्या लाटेतल्या सर्वाधिक संख्येपेक्षाही जास्त आहे. (३० एप्रिल २०२१) पण त्यावेळी फार वाईट स्थिती होती. बेड मिळायला बराच वेळ लागत होता वगैरे वगैरे. आत्ता एकदम आबादीआबाद आहे.
मुंबईत ३१ डिसेंबर पासून २४४
मुंबईत ३१ डिसेंबर पासून २४४,२३० पॉझिटिव्ह झाले. त्यात १६,८६५ म्हणजे ६.९१% लोकांना रुग्णालयात दाखल केलं गेलं. १६३९ म्हणजे ०.६७% लोकांना ऑक्सिजन बेडची गरज होती.
पण ही टक्केवारी हळूहळू वाढते आहे. कालच्या आकड्यांत ९.६४% रुग्णालयात आणि १.३८% ऑक्सिजन बेड वाले आहेत.
१५ दिवसापुर्वीचा आकडेवारीवरुन
१५ दिवसापुर्वीचा आकडेवारीवरुन ९६% ऑक्सिजन बेडवाले अनवॅक्सीनेटेड आहेत.
५०% (किंवा त्यापेक्षा जास्त ) ऑक्सिजन बेड वॅक्सीनेटेड लोकासाठी आणी जी लोक medically ineligible आहेत त्यासाठी राखीव ठेवले पाहिजेत.
अजून तसलं काही करायची गरज
अजून तसलं काही करायची गरज नाही.
थोडा विरंगुळा
थोडा विरंगुळा
Putham Pudhu Kaalai हा ५ लघुपटांचा मिळून केलेला तामिळ चित्रपट आहे (प्राईमवर).
त्यातील पहिल्या लघुपटाचे नाव ‘किस ओव्हर द मास्क’ असे आहे ! यात कोविड संचार निर्बंधांच्या दरम्यान पोलिसांवर पडत असलेला कामाचा ताण हा विषय घेतला आहे. आपले कार्य बजावत असताना पोलीस कसे रंजन करतात आणि त्यातून एक गुलाबी प्रेमप्रकरण कसे फुलते हे छान दाखवले आहे.
शीर्षकावरून त्याची कल्पना येईलच.....
भारतात delta आला आणि गेला
भारतात delta आला आणि गेला
जे जास्तच who चे समर्थक होते तेच बळी पडले
इथे मानसिक हे कारण असेल.
बिन्धास्त राहणारे covid मुक्त च राहिले..
आकडे वारी data .
आणि त्या वरून अंदाज है साफ चुकले आहेत
महाराष्ट्रात सर्व चालू आहे ,लोकांची गर्दी पण आहे
आणि covid ला गंभीर घेणारी मानसिकता पण संपुष्टात आली आहे.
कोणी गंभीर आजारी नाही
दहा वेळा sanitizer,दोन दोन मास्क वापरणारे आजारी आहेत.
मानसिक धक्का प्रतिकार शक्ती कमजोर करतो.
आणि हे सर्व मानसिक आजाराचे बळी आहेत.
ज्यांना ऑफिसला जावंच लागतं,
ज्यांना ऑफिसला जावंच लागतं, ते किंवा दुकानदार, सुतार, प्लंबर वगैरे लोकांचं बरोबरच आहे. पण सणसमारंभ, वाढदिवस, हळदीकुंकवं साजरी करण्यावाचून कुणाचं काही अडत नाही.>> इतर लोक सणसमारंभ, वाढदिवस, हळदीकुंकवं साजरी करतात म्हणूनच दुकानदार, सुतार, प्लंबर वगैरे लोकांना रोजगार मिळतो. त्यांनी रोजगार बंद करून, लोकांच्या दयेवर (charity) जगावं अशी इच्छा आहे का तुमची? बरं, मग नक्की किती काळ त्यांनी असं charity वर जगावं? सगळं जग करोना मुक्त होईतोवर ?
पहिला लॉकडाऊन झाला त्याला आता २ वर्ष होतील लवकरच. तेव्हापासून सगळे सतत सांगताहेत, गरज नसेल तर घराबाहेर पडू नका. सणसमारंभ, वाढदिवस, हळदीकुंकवं, ही कदाचित माझी गरज नसेल, पण समाजातल्या अनेक लोकांचे रोजगार त्यावर अवलंबून आहेत. त्यांची ती गरजच आहे.
टेन्शनच आलंय मुलाला शाळेत पाठवायचं.>. बिनधास्त पाठवा मुलाला शाळेत. काही होणार नाही.
घरी बसून करोना होणार नाही याची काहीच खात्री देता येणार नाही. पण अजून १ वर्ष online शिक्षण घेतलं तर मुलाचं शिक्षणातलं लक्ष नक्कीच उडेल. शिवाय बाहेर जाऊन, मोकळ्या हवेत खेळून, मित्र मैत्रीणींना भेटल्यानी जी रोग प्रतीकार शक्ती वाढू शकते, ती वाढणार नाही.
माझ्या मुलीला २ र्या लाटेत झाला होता करोना. अगदी माइल्ड लक्षणं होती.
पहिला लॉकडाऊन झाला त्याला आता
बरोबर लोकांचे रोजगार एकमेकां वर अवलंबून आहेत..
Pages