कोविड १९ : आव्हान Omicron चे

Submitted by कुमार१ on 2 December, 2021 - 09:07

शेवटचे अद्यतन : ३१/१२/२०२१
मागचा धागा इथे : https://www.maayboli.com/node/78680?page=19
……..
चालू महासाथीचा मागचा धागा काढताना मनोमन अशी इच्छा व्यक्त केली होती की, तो शेवटचा धागा ठरावा आणि लवकरच आजार पूर्ण गाडला जावा. दुर्दैवाने तसे काही होण्याची चिन्हे नाहीत.
गेल्या काही आठवड्यांमध्ये दक्षिण आफ्रिकेतून Omicron नावाच्या करोना विषाणूच्या नव्या उपप्रकाराने तोंड वर काढले आहे. त्याचे नाव ग्रीक वर्णमालेच्या पंधराव्या अक्षरानुसार दिलेले आहे.
( Omicron च्या उच्चाराबाबत भाषातज्ञांमध्ये मध्ये मतभेद आहेत. खुद्द ऑक्सफर्ड शब्दकोशानुसार सुद्धा त्याचे चार उच्चार असून त्यावर एकमत नाही ! इंग्लिश उच्चारानुसार बऱ्याच ठिकाणी "OH-my-kraan असे दिलेले दिसते).

हळूहळू Omicron चा जगभर प्रसार होत आहे. सुरुवातीस दक्षिण आफ्रिकेत आढळलेल्या काही रुग्णांच्याबाबत डॉक्टरांची निरीक्षणे अशी होती :
१. ज्या लसवंतांना नवा संसर्ग झाला आहे त्यांची लक्षणे सौम्य आहेत. अशांवर घरीच उपचार चालू असून परिस्थिती नियंत्रणात आहे.
२. असे अधिकतर रुग्ण तरुण वयातील आहेत
३. जे बाधित रुग्णालयात दाखल झाले आहेत त्यापैकी 90 टक्के बिगर लसवाले आहेत.

अलीकडील बातमीनुसार त्यांच्याकडील रुग्णसंख्येचा आलेख आता कळसबिंदू पार होऊन होऊन खाली खाली येत आहे. एकंदरीत विचार करता हा आजार सौम्य होण्याकडे झुकत आहे.
विषाणूचा Omicron व आधीचा डेल्टा प्रकार यांची पाश्चिमात्य देशांतील एकंदरीत तुलना खालील चित्रातून चांगली समजेल.

omic and delta.jpg

सार्स 2 च्या भावी उत्क्रांतीबद्दल वैज्ञानिकांचे अंदाज :
१. एक तर तो सामान्य सर्दीच्या विषाणूप्रमाणे सौम्य होईल किंवा इन्फ्लूएंजाच्या विषाणू प्रमाणे घातकही राहील.
२. विषाणूच्या उत्क्रांतीगणिक तो सौम्य होतो ही एक समजूत आहे. पण काहींच्या मते ते मिथक आहे. वास्तव अधिक गुंतागुंतीचे असते.
३. या विषाणूचे प्राणिजन्य साठे वाढतेच आहेत. मिंक व हरणाच्या एका जातीत त्याचे सातत्यपूर्ण वास्तव्य आणि भ्रमण चालू आहे. त्यातून नवी उत्परिवर्तने होण्याचा संभव राहतो. ही आपल्या दृष्टीने डोकेदुखी ठरते.
नव्या घडामोडींची भर जशी माहिती मिळेल तशी घालत राहू.

* जशी Omi बाधितांची संख्या वाढते आहे तशी काही उपयुक्त माहिती मिळते आहे. यामुळे बाधित असलेल्या काही रुग्णांमध्ये खालील वैशिष्ट्यपूर्ण लक्षणे दिसून आली आहेत:

* मळमळ
* भूक खूप मंदावणे
* रात्री प्रचंड घाम येणे, अगदी शरीर निथळून निघेल इतका.
या रुग्णांमध्ये वास व चव संवेदनेवर परिणाम झालेला नव्हता.

उपचारांच्या आघाडीवर अद्यापही रामबाण असे विषाणूविरोधी औषध मिळालेले नाही. संशोधन चालू आहे.
१. Molnupiravir या तोंडातून घ्यायच्या औषधाला मध्यंतरी इंग्लंडने आणि नुकतीच अमेरिकी औषध प्रशासनानेही आपात्कालीन वापराची मान्यता दिली आहे. वय 18 वर्षावरील लोकांसाठी ते वापरायचे आहे. पाठोपाठ भारतीय औषध प्रशासनानेही याला आपात्कालीन वापराची मान्यता दिली आहे.
गरोदर स्त्रियांसाठी त्याचा वापर अत्यंत काळजीपूर्वक करण्यात यावा. त्याचे संभाव्य दुष्परिणाम जुलाब, मळमळ व चक्कर येणे असे आहेत.

2. Paxlovid या नव्या गोळीस आपत्कालीन मान्यता मिळाली आहे. हे २ औषधांचे मिश्रण असून त्या बद्दल अजून काही माहिती:
हे औषध फक्त खालील रुग्णांसाठी वापरायचे आहे :
१. rt-pcr चाचणी होकारात्मक आलेली.
२. ज्यांचा आजार गंभीर होण्याचा धोका आहे त्यांनी.
रोग निदान झाल्यावर हे औषध लगेच चालू करायचे आहे.
संभाव्य दुष्परिणाम :
चव-संवेदना कमी होणे, जुलाब, रक्‍तदाबवाढ आणि स्नायूदुखी.

नव्या लसी
भारतात नुकतीच दोन नव्या लसीना आपात्कालीन वापराची मान्यता मिळाली आहे. त्या लसी याप्रमाणे :

१. Corbevax : ही प्रोटीन सबयुनिट प्रकारातील स्वदेशी निर्माण झालेली आहे.
२. Covovax : यात नॅनोकणांचा वापर केलेला आहे.

आता भारतात सध्या एकूण आठ लसीना वापरासाठी मान्यता मिळालेली आहे.

नेहमीचे प्रतिबंधात्मक उपाय म्हणजेच त्रिसूत्री अजून बराच काळ चालू ठेवणे हे आपले एक महत्त्वाचे लढण्याचे अस्त्र असेल.
एकंदरीत जगभरात हा संसर्ग वाढत असल्यामुळे विविध प्रशासनांनी लोकांवर काही प्रमाणात संचार निर्बंध लावले आहेत. नाताळच्या दिवशी जगभरात मिळून ६००० विमान उड्डाणे रद्द केली गेली.
…….
लसीकरण : नवे संशोधन
डीएनए प्रकारची लस भारतात लवकरच उपलब्ध होईल असे अलीकडील बातमीवरून दिसते. त्या प्रकाराची शास्त्रीय माहिती :
१. सध्या जगभरात या प्रकारातील बारा लसी प्रयोगाधीन आहेत. त्यातली पहिली ( ZyCoV-D) भारतात उपलब्ध होईल.
२. ही लस सुईविरहित उपकरणाने दाबतंत्राचा वापर करून त्वचेखाली दिली जाते. हे पारंपरिक इंजेक्शन नसल्यामुळे संबंधित व्यक्तीस वेदना खूप कमी होते.
३. भारतातील लस तिच्या प्रयोगादरम्यान २८,००० लोकांवर वापरण्यात आली. त्यादरम्यान विषाणूचा डेल्टा प्रकार जोरात होता. त्या वातावरणात लसीने 67% परिणामकारकता दाखवली आहे.
४. तिचे उत्पादन तंत्रज्ञान सोपे आहे.
५. आरएनए लसींच्यापेक्षा ही लस अधिक टिकाऊ स्वरूपाची आहे.
६. मात्र तिचा पुरेसा परिणाम दिसून येण्यासाठी किमान तीन डोस द्यावे लागतील असे दिसते.
...................................................

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

दूरगामी परिणाम तर सर्वच विषाणू पासून आजाराचे होतात.
Tb, नुमोनिया, ह्यांचे तर होतात च होतात.
तसेच covid चे पण होणार
Covid चे दूरगामी परिणाम मानवी शरीरावर होणार ह्या मध्ये आश्चर्य वाटण्या सारखे काही नाही
पण खूप च प्रसार माध्यम लोकांना भीती दाखवत असतात.

मी तर म्हणेन की दोनच्या जागी दहा डोस (इंजेक्शन) द्या पण टेस्टिंग नको!!!
Submitted by विक्षिप्त_मुलगा on 29 December, 2021 - 16:3

>>> मी तर यापुढे जाऊन म्हणेन की,
आगामी नाकातली लस खरोखर यशस्वी होवो. म्हणजे सर्वांनाच ते खूप सोयीचे जाईल आणि वेदनारहित असेल !
Happy

आज मुंबईत २५१० पॉझिटिव्ह निघाले. काल १३७७ होते. म्हणजे आज जवळपास दुप्पट.

भारतात बूस्टर डोस दुसरा डोस झाल्यानंतर ९ महिन्यांनी देणार आहेत. म्हणजे इतक्यात कोणा सामान्य नागरिकांना बूस्टर डोस मिळत नाही. ६०+ नागरिकांचं लसीकरणच १ मार्चला सुरू झालं होतं. आरोग्य कर्मचारी आणि फ्रंटलाइअन वर्कर्सनाच आता बूस्टर डोस मिळू शकेल.

गेल्या १२ महिन्यात गाजावाजा केलेले आणि यशस्वी म्हणून घोषित केलेल्या उपायांपैकी एक देखील अद्यापि अंमलबजावणीत आला नाही.... अगदी त्या हैदराबादच्या ब्रेकथ्रू ड्रग सह........ फार निराशाजनक आहे हे चित्र !!!!

Corbevax : , . Covovax ला मान्यता देताना कोव्हॅक्सिन सारखाच प्रकार घडला आहे असे वाचले. ट्रायलचा डेटा नाही. तरीही मान्यता. मग जागतिक आरोग्य संघटनेची मान्यता असो वा नसो

नाकातली लस
याची प्रगती कुठवर आलीय ?
>>>> याच्या दोन टप्प्यातील चाचण्या पूर्ण झाल्या असून 2022 मध्ये तिसऱ्या टप्प्यातील चाचण्या सुरू होतील
......
नव्या लसीना घाईने मान्यता दिली गेली आहे खरे

जशी Omi बाधितांची संख्या वाढते आहे तशी काही उपयुक्त माहिती मिळते आहे. यामुळे बाधित असलेल्या काही रुग्णांमध्ये खालील वैशिष्ट्यपूर्ण लक्षणे दिसून आली आहेत:

* मळमळ
* भूक खूप मंदावणे
* रात्री प्रचंड घाम येणे, अगदी शरीर निथळून निघेल इतका.
या रुग्णांमध्ये वास व चव संवेदनेवर परिणाम झालेला नव्हता.

करोना होऊन गेल्यावर कोणाला कम्बरदुखीचा काही त्रास झाला का ? मला तीन आठवड्यापासून होतोय पण आता वेदना जरा कमी आहेत. आधी जिम मारायची बंद झालीच होती आता घरातबी काही करता येईना Sad

ओमिक्रॉन आधीच्या व्हेरिएंटपेक्षा कमी त्रासदायक पण अधिक प्रसारक्षम आहे. तर तो लशीसारखं काम करेल असा एक विचार ट्विटरवर वाचला.

*तो लससारखे काम करेल >>>

असे मत काही तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. त्यापैकी महाराष्ट्र राज्य सर्वेक्षण समितीचे डॉ. प्रदीप आवटे यांचे मत इथे आहे.
https://www.google.com/amp/s/www.livemint.com/v/s/www.livemint.com/news/...

क्षय ,देवी,hiv, प्लेग , कुष्ट रोग ह्या सारख्या रोगासमोर कविड किस झाड की पत्ती आहे
मीडिया लाचार , संशोधक कोणाचे तरी नोकर मालक जे सांगेल तेच खरे,, औषध निर्मिती करणाऱ्या कंपन्या फक्त फायदा कसा होईल अशाच विचार करणाऱ्या ,लस निर्माण करणाऱ्या कंपन्या अतिशय लाचार, who
ही संस्था ,श्रीमंत देश ह्यांची दास .
आणि ह्या सर्वांचा स्वार्थ साध्य होण्या साठी जगाला वेठीस धरले जात आहे.
Who,सर्व सरकार, सर्व नोकर संशोधक ह्यांनी फक्त स्वतः ला सुरक्षित करावे
लोकांना त्यांच्या मताचे गुलाम बनवू नये
होवू द्या आम्हाला covid तुम्ही तुमचे जीव वाचवा.

घरोघरी covid रुग्ण असू द्या काही फरक पडत नाही

सर्वांना covid होवू द्या .
निसर्ग नियम विरुद्ध पृथ्वी वर काय विश्वात काहीच घडत नाही..
निसर्ग नियम नुसार covid ची साथ निघून जाणार आहे
कोणाला च जास्त प्रयत्न करायची गरज नाही.

आताचे सर्व संशोधक हे भांडवल शाही कंपनीचे नोकर आहेत.
स्वतंत्र कोणाचेच गुलाम नसलेल्या संशोधकांचा आदर खूप आहे
पण कोण आहे का असा .
अति बुद्धिवान माणूस श्रीमंत कधीच नसतो .
तो गुलामच असतो

Covid वर चर्चा फक्त स्वतः ला आलेले अनुभव,उपचार कोणते केले त्याची माहिती आणि स्वतः ल आलेला
अनुभव. स्वतः घेतलेला उपचार ह्या वर च असली तर सर्वांना फायद्याची ठरेल
संशोधक,डॉक्टर,who,ह्यांचे विचार काही कामाचे नाहीत.

>>>संशोधक,डॉक्टर,who,ह्यांचे विचार काही कामाचे नाहीत.>>>
योकदम बराबर . हा बघा भारी विचार -
काही प्रसारमाध्यमांनी तर उत्तर कोरियाचा हुकूमशाह किम जोंग-उनने करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी करोनाचा संसर्ग झालेल्या रुग्णांना थेट मारुन टाकल्याच्याही बातम्या दिल्यात. देशामध्ये करोनाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून हे टोकाचं पाऊल उचलण्यात आल्याचं सांगितलं गेलं.
https://www.loksatta.com/photos/trending-gallery/2740882/covid-19-these-...

बाकी सगळं जग येडच म्हणायचं.

हो नक्की
Covid काय तो मला झाला पाहिजे ह्या साठी खूप प्रयत्न केले.
पण होत च नाही.
खूप वेळा rt pcr केल्या पण .नेहमीच निगेटिव्ह.

कल्पनित विश्वात राहू नका.
लोकांनी covid स्वीकारला आहे,, मृत्यू पण स्वीकारला आहे
सार्वजनिक ठिकाणी बघा लोकांची वर्तूनुक कशी आहे.

Pages