कोविड १९ : आव्हान Omicron चे

Submitted by कुमार१ on 2 December, 2021 - 09:07

शेवटचे अद्यतन : ३१/१२/२०२१
मागचा धागा इथे : https://www.maayboli.com/node/78680?page=19
……..
चालू महासाथीचा मागचा धागा काढताना मनोमन अशी इच्छा व्यक्त केली होती की, तो शेवटचा धागा ठरावा आणि लवकरच आजार पूर्ण गाडला जावा. दुर्दैवाने तसे काही होण्याची चिन्हे नाहीत.
गेल्या काही आठवड्यांमध्ये दक्षिण आफ्रिकेतून Omicron नावाच्या करोना विषाणूच्या नव्या उपप्रकाराने तोंड वर काढले आहे. त्याचे नाव ग्रीक वर्णमालेच्या पंधराव्या अक्षरानुसार दिलेले आहे.
( Omicron च्या उच्चाराबाबत भाषातज्ञांमध्ये मध्ये मतभेद आहेत. खुद्द ऑक्सफर्ड शब्दकोशानुसार सुद्धा त्याचे चार उच्चार असून त्यावर एकमत नाही ! इंग्लिश उच्चारानुसार बऱ्याच ठिकाणी "OH-my-kraan असे दिलेले दिसते).

हळूहळू Omicron चा जगभर प्रसार होत आहे. सुरुवातीस दक्षिण आफ्रिकेत आढळलेल्या काही रुग्णांच्याबाबत डॉक्टरांची निरीक्षणे अशी होती :
१. ज्या लसवंतांना नवा संसर्ग झाला आहे त्यांची लक्षणे सौम्य आहेत. अशांवर घरीच उपचार चालू असून परिस्थिती नियंत्रणात आहे.
२. असे अधिकतर रुग्ण तरुण वयातील आहेत
३. जे बाधित रुग्णालयात दाखल झाले आहेत त्यापैकी 90 टक्के बिगर लसवाले आहेत.

अलीकडील बातमीनुसार त्यांच्याकडील रुग्णसंख्येचा आलेख आता कळसबिंदू पार होऊन होऊन खाली खाली येत आहे. एकंदरीत विचार करता हा आजार सौम्य होण्याकडे झुकत आहे.
विषाणूचा Omicron व आधीचा डेल्टा प्रकार यांची पाश्चिमात्य देशांतील एकंदरीत तुलना खालील चित्रातून चांगली समजेल.

omic and delta.jpg

सार्स 2 च्या भावी उत्क्रांतीबद्दल वैज्ञानिकांचे अंदाज :
१. एक तर तो सामान्य सर्दीच्या विषाणूप्रमाणे सौम्य होईल किंवा इन्फ्लूएंजाच्या विषाणू प्रमाणे घातकही राहील.
२. विषाणूच्या उत्क्रांतीगणिक तो सौम्य होतो ही एक समजूत आहे. पण काहींच्या मते ते मिथक आहे. वास्तव अधिक गुंतागुंतीचे असते.
३. या विषाणूचे प्राणिजन्य साठे वाढतेच आहेत. मिंक व हरणाच्या एका जातीत त्याचे सातत्यपूर्ण वास्तव्य आणि भ्रमण चालू आहे. त्यातून नवी उत्परिवर्तने होण्याचा संभव राहतो. ही आपल्या दृष्टीने डोकेदुखी ठरते.
नव्या घडामोडींची भर जशी माहिती मिळेल तशी घालत राहू.

* जशी Omi बाधितांची संख्या वाढते आहे तशी काही उपयुक्त माहिती मिळते आहे. यामुळे बाधित असलेल्या काही रुग्णांमध्ये खालील वैशिष्ट्यपूर्ण लक्षणे दिसून आली आहेत:

* मळमळ
* भूक खूप मंदावणे
* रात्री प्रचंड घाम येणे, अगदी शरीर निथळून निघेल इतका.
या रुग्णांमध्ये वास व चव संवेदनेवर परिणाम झालेला नव्हता.

उपचारांच्या आघाडीवर अद्यापही रामबाण असे विषाणूविरोधी औषध मिळालेले नाही. संशोधन चालू आहे.
१. Molnupiravir या तोंडातून घ्यायच्या औषधाला मध्यंतरी इंग्लंडने आणि नुकतीच अमेरिकी औषध प्रशासनानेही आपात्कालीन वापराची मान्यता दिली आहे. वय 18 वर्षावरील लोकांसाठी ते वापरायचे आहे. पाठोपाठ भारतीय औषध प्रशासनानेही याला आपात्कालीन वापराची मान्यता दिली आहे.
गरोदर स्त्रियांसाठी त्याचा वापर अत्यंत काळजीपूर्वक करण्यात यावा. त्याचे संभाव्य दुष्परिणाम जुलाब, मळमळ व चक्कर येणे असे आहेत.

2. Paxlovid या नव्या गोळीस आपत्कालीन मान्यता मिळाली आहे. हे २ औषधांचे मिश्रण असून त्या बद्दल अजून काही माहिती:
हे औषध फक्त खालील रुग्णांसाठी वापरायचे आहे :
१. rt-pcr चाचणी होकारात्मक आलेली.
२. ज्यांचा आजार गंभीर होण्याचा धोका आहे त्यांनी.
रोग निदान झाल्यावर हे औषध लगेच चालू करायचे आहे.
संभाव्य दुष्परिणाम :
चव-संवेदना कमी होणे, जुलाब, रक्‍तदाबवाढ आणि स्नायूदुखी.

नव्या लसी
भारतात नुकतीच दोन नव्या लसीना आपात्कालीन वापराची मान्यता मिळाली आहे. त्या लसी याप्रमाणे :

१. Corbevax : ही प्रोटीन सबयुनिट प्रकारातील स्वदेशी निर्माण झालेली आहे.
२. Covovax : यात नॅनोकणांचा वापर केलेला आहे.

आता भारतात सध्या एकूण आठ लसीना वापरासाठी मान्यता मिळालेली आहे.

नेहमीचे प्रतिबंधात्मक उपाय म्हणजेच त्रिसूत्री अजून बराच काळ चालू ठेवणे हे आपले एक महत्त्वाचे लढण्याचे अस्त्र असेल.
एकंदरीत जगभरात हा संसर्ग वाढत असल्यामुळे विविध प्रशासनांनी लोकांवर काही प्रमाणात संचार निर्बंध लावले आहेत. नाताळच्या दिवशी जगभरात मिळून ६००० विमान उड्डाणे रद्द केली गेली.
…….
लसीकरण : नवे संशोधन
डीएनए प्रकारची लस भारतात लवकरच उपलब्ध होईल असे अलीकडील बातमीवरून दिसते. त्या प्रकाराची शास्त्रीय माहिती :
१. सध्या जगभरात या प्रकारातील बारा लसी प्रयोगाधीन आहेत. त्यातली पहिली ( ZyCoV-D) भारतात उपलब्ध होईल.
२. ही लस सुईविरहित उपकरणाने दाबतंत्राचा वापर करून त्वचेखाली दिली जाते. हे पारंपरिक इंजेक्शन नसल्यामुळे संबंधित व्यक्तीस वेदना खूप कमी होते.
३. भारतातील लस तिच्या प्रयोगादरम्यान २८,००० लोकांवर वापरण्यात आली. त्यादरम्यान विषाणूचा डेल्टा प्रकार जोरात होता. त्या वातावरणात लसीने 67% परिणामकारकता दाखवली आहे.
४. तिचे उत्पादन तंत्रज्ञान सोपे आहे.
५. आरएनए लसींच्यापेक्षा ही लस अधिक टिकाऊ स्वरूपाची आहे.
६. मात्र तिचा पुरेसा परिणाम दिसून येण्यासाठी किमान तीन डोस द्यावे लागतील असे दिसते.
...................................................

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

खरंय.
त्यांच्या सरकारी धोरणाला शून्य कोविड धोरण असे म्हटलेले आहे.
त्याच्या समर्थनार्थ त्यांचे मुद्दे असे आहेत:

१. ओमायक्रोनमुळे होणारा आजार मध्यम स्वरूपाचा असला तरी तो प्रकार खूप संसर्गजन्य आहे.
२. दर एक लाख संसर्गबाधितांपैकी सुमारे 100 जण मृत्यू पावतात असं त्यांचा होरा आहे.

Covid ची लक्षण असू किंवा नसो.
Covid ग्रस्त असताना मृत्यू होवू किंवा न होवू.
ह्या दोन्ही गोष्टी ल काही जास्त महत्व आता तरी नाही.
Covid मुळे heart attack च वाढत असलेला धोका, रक्त वाहिन्या वर होणारा परिणाम,मेंदू वर होणारा परिणाम हे खूप धोकादायक आहे
कारण हा धोका काही महिन्याने किंवा वर्षाने समजून येतो.
पण असे मृत्यू covid मुळे झाले असे समजले जात नाही.
खरे तर ह्या वर सविस्तर वाचायला आवडेल.
मी आता covid मुक्त झालो हा आनंद किती दिवस टिकेल हे सांगता येत नाही.
अकस्मात मृत्यू ची उदाहरण जगात आहेत.

कारण हा धोका काही महिन्याने किंवा वर्षाने समजून येतो.
>>+११
जे covid-बाधित रुग्णालयात दाखल होते त्यांच्या बाबतीत हा धोका जास्त राहील. माझ्या माहितीत असे काही रुग्ण आहेत.
अर्थात अजून काही वर्षांनी कोविडोत्तर परिणामांचे चित्र स्पष्ट होईल.

Corona व्हायरस हा मानव निर्मित आहे.
जेनेटिक अभियांत्रिकी चा तो प्रकार आहे.
वुहान मधील लॅब मधूनच तो बाहेर आला.
अमेरिका सरकार प्रचंड आर्थिक मदत त्या लॅब ल करते.
अमेरिका आणि चीन हे दोन देश covid साथ पसरविण्यास जबाबदार आहेत.
असा दावा अमेरिकन संशोधक नी केला आहे.

म्हणजे आजकाल विषाणू सुद्धा साथीला साथ देत नाहीत.
माणुसकी केव्हाच संपली, आता विषाणुकीसुद्धा उरली नाही.

चीनमध्ये करोना महासाथीचा उद्रेक होण्याची चिन्हे दिसत असून यामुळे जगभरात चिंता व्यक्त होत आहे. चीनमध्ये करोनाबाधितांमध्ये मोठी वाढ झाल्याचं अनधिकृतरित्या सांगण्यात येत आहे. दरम्यान कमी प्रमाणात झालेलं लसीकरण तसंच प्रतिकारशक्तीचा अभाव या पार्श्वभूमीवर चीनने अवलंबलेलं ‘शून्य कोविड’ धोरण (झिरो कोविड) शिथील केल्यास १० ते २० लाख लोकांचा जीव धोक्यात येऊ शकतो. लंडनमधील जागतिक आरोग्याशी संबंधित कंपनी Airfinity ने हा अहवाल जारी केला आहे.

https://www.loksatta.com/desh-videsh/covid-19-airfinity-report-says-chin...

दरम्यान कमी प्रमाणात झालेलं लसीकरण तसंच प्रतिकारशक्तीचा अभाव >>>
चीनमध्ये वाढणाऱ्या रुग्णसंख्येमागे ही दोनच कारणे असल्यास आपल्याला काळजी करण्यासारखे नाही.

+
सध्या तिथे ओमायक्रॉनचा BF.7 हा उपप्रकार जोरात फोफावला आहे.
अर्थात हा उपप्रकार भारत, अमेरिका आणि युरोपीय देशांमध्येही आढळलेला आहे.

चीन,युरोप,अमेरिका ह्या सारखे प्रगत देश च covid चे माहेरघर आहेत.
आफ्रिकेतील देशात सर्व सुविधा कमी असून पण त्यांना खूप कमी प्रमाणात तुलनेने covid नी त्रास दिला.
Covid हा जैविक हत्यार चाचं एक प्रकार आहे.
जिथे पैसे जास्त कमावता येतील त्याच देशात covid मोठ्या प्रमाणत असतो.

मीडिया खऱ्या बातम्या न देता एकसुरी बातम्या covid विषयी देत असते.
अतिशोक्ती चे प्रमाण त्या मध्ये जास्त असते
आज च सर्व भारतीय मीडिया मध्ये covid विषयी भीती निर्माण होईल अशा भाषेत बातम्या होत्या.
खरे covid विषयी कोणती ही बातमी ह्या बिनडोक पत्रकार नी देवूच नये.
त्यांना एक तर त्या मधले काही समजत नाही.
एक तज्ञ लोकांचे पॅनल बनवून त्यांनी योग्य भाषेत त्या विषयात न्यूज द्याव्यात

आता तर corona जुना झाला आहे.
त्याची ओळख झाली आहे.
१) मास्क मध्ये काही सुधारणा झाली आहे का?
संशोधक लोकांनी कन्फर्त पण वाटेल आणि रक्षण पण होईल असे मास्क शोधून काढले आहेत का?
२) उपचार पद्धती मध्ये काही नवीन बदल केला गेला आहे का?
खात्री नी विषाणू ची वाढ शरीरात रोखली जाईल अशी औषध किंवा उपचार पद्धती संशोधक लोकांनी शोधून काढली आहे का?
का अजून पण अंधारात च तीर मारले जातील .
आता बहाणा पण करू शकत नाही व्हायरस नवीन आहे म्हणून.

पण अजून तरी काही नावीन्य उपचार पद्धती
उपलब्ध नाही किंवा दक्षता घेण्याच्या उपयात
काही नावीन्य नाही.असे वाचनात आले आहे.
तोच मास्क.
तेच विलागिकरण
तेच खूप वास मारणारे sanitizer.
सर्व काही तेच जुने.

सुपर कॉम्प्युटर,गुणसूत्र अभियांत्रिकी मध्ये प्रगत तंत्र,अतिशय हुशार AI, सर्व सोयी सुविधा आज उपलब्ध आहेत.
माणूस देव च होणार आहे.
जीवन निर्मिती करण्याचे दावे केले जात आहेत.
माणसाची सर्व काम करू शकतील अशी यंत्र आहेत.
अगदी हवं तसे मुल,सुपरमॅन निर्माण करण्याची क्षमता आपण प्राप्त केली आहे असे दावे केले जातात.
मानवी इतिहासात अनेक रोगांच्या साथी आल्या आणि गेल्या.
तेव्हा माणूस हुशार होता पण तंत्र ज्ञान अप्रगत होते?
सुविधा नव्हत्या.
यंत्र नव्हती.
सुपर कॉम्प्युटर नव्हते.
अतिशय हुशार AI नव्हते.
तरी त्या वेळी साथीचे रोग वर्षांवर्ष राहतं नसतं.
कारण लोक प्रामाणिक होती.
Rtpcr टेस्ट मध्ये अनेक दोष आहेत .अनेक निगेटिव्ह लोकांना ह्या टेस्ट नी positive दाखवले आहे .
आणि
अंतिम घटका मोजणाऱ्या रुग्णांना निगेटिव्ह दाखवले आहे.
असंख्य उदाहरणे आहेत.
Rtpcr मधील हे दोष आज पण आहे तसेच असणार.
चीन सोडला तर भांडवल शाही देश च गाजावाजा करत असतात.
वुहान लॅब मध्ये अमेरिका,चीन,बिल क्लिंटन ह्यांचे भांडवल आहे.
जगाला त्या साठी वेठीस धरले जात आहे.
चीन मध्ये जशी लोक रस्त्यावर आली .
तशी जगभरातील लोक रस्त्यावर आली तर covid परत कधीच येणार नाही.

ओरिजनल कोविड लं आपण थांबवू शकलो नाही(आपण म्हणजे सर्व च)
त्याच्या पेक्षा वेगाने प्रसार होणार डेल्टा,आताचा omicron आपण थांबवु च शकत नाही
काही ही काळजी घ्या तो होणारच .
. उगाच panic होवून लॉक डाऊन,मास्क ,sanitizer च अतिरेक करण्याची काही गरज नाही .तो इन्फेक्शन करणार च.
काळजी घ्या किंवा घेवू नका.zero covid policy मुळे चीन धोक्यात आला आहे.
त्यांनी अतिरेक केला होता.
भारतात लसीकरण झाले आहे,अगोदर लोकांना इन्फेक्शन पण झाले आहे.
अनेक स्तरावर संरक्षण भारतीय लोकात निर्माण झाले आहे.
. ज्यांना काहीच लक्षण नाहीत,ज्यांना हॉस्पिटलमध्ये जाण्याची गरज नाही अशा लोकांची काळजी करू नका .
आणि त्यांचे टेस्टिंग करून उगाच आकडे पण वाढवू नका.
तीन चार नाही लाखो covid positive lok आज पण भारतात असतील टेस्टिंग केले की माहीत पडेल.
ज्यांना गंभीर लक्षण आहेत,हॉस्पिटल मध्ये नेण्याची गरज आहे त्यांचीच टेस्ट करा आणि त्यांना सुविधा उपलब्ध करून ध्या.
सरकार नी उगाच फालतुगिरी करायची गरज नाही
जसे चीन सरकार नी केला.
आज औषध पण उपलब्ध आहेत
घाबरून जाण्याचे काही कारणं नाही.
आणि असे पण हवेतून पसरणाऱ्या ह्या व्हायरस पासून किती ही काळजी घेतली तरी कोणी वाचू पण शकत नाही.मग उगाचच panic होण्या च काय फायदा.

अफवा
WApp वर पसरलेला omicron xbb बद्दल चा हा मजकूर खोटा आहे.
( आरोग्य मंत्रालय )

Fake omi  NEW.jpg

गेल्या एक दोन महिन्यांपासून मुलांमध्ये विविध श्वसनविकारांचे प्रमाण वाढलेले दिसते त्यामध्ये Influenza & RSV या विषाणूंचे प्राबल्य आहे. याची कारणमीमांसा अशी आहे:

गेल्या दोन वर्षात टाळेबंदी तसेच दीर्घकाळ असलेली शाळाबंदी या सर्व गोष्टींमुळे लहान मुले एकमेकांमध्ये मिसळणे खूप कमी झाले होते. त्या काळात या श्वसन विकारांचे प्रमाण खूप आटोक्यात राहिले. परंतु त्याचा एक तोटा म्हणजे, नित्य होणाऱ्या या संसर्गापासून मुले दूर राहिली आणि त्याविरुद्धची प्रतिकारशक्ती त्यांच्यात निर्माण झाली नाही.

त्यामुळे आता हे दोन्ही आजार वाढत्या प्रमाणात दिसू लागले आहेत. त्याच्या जोडीला कोविडची महासाथ अद्यापही संपलेली नाही. समाजात या तिन्ही आजारांच्या एकत्रित असण्याला तिहेरी साथ (tripledemic ) असे म्हणतात.

काही प्रश्न कधीच चर्चेत नसतात ते प्रश्न.
1) व्हायरस उत्परीवर्तीत होणार च.
Omicron मुळेच delta पासून लोक वाचली असे पण बोलले जाते हे खरे आहे का?
२)जास्त पसरला व्हायरस की उत्परिवर्तीत होतो इतकेच सांगितले जाते.
पण नवीन variant हा घातक च असेल ह्याची शकतात किती असते.
आणि सौम्य ,मानव फ्रेंडली असेल ह्याची शक्यता किती असते?
३) उत्परीवर्तित होण्यासाठी किती करोड लोकांना बाधा होणे आवश्यक असते.?
टक्केवारी मध्ये नको.
लोकसंख्या ही बदलत असते

अजून दोन प्रश्न आहेत .सध्या हे दोन

जितका वेग जास्त तितकी वेग येण्यासाठी वापरात येणारी ऊर्जा कमी .
अशी उदाहरणे च आहेत जगात.
जितकी गाडी वेगात तितकी इंजिन लं ताकत कमी वापरावी लागते.
जो व्हायरस वेगानं पसरेल तो कमी घातक असण्याची शक्यता जास्त असते.
साधीच्या रोगाचा पसरण्याचा
जास्त वेग आणि जास्त घातक पना हे दोन्ही एकत्र कधीच असू शकतं नाही..

R value १ आहे पण मृत्यू होण्याचे किंवा गंभीर लक्षण दिसण्याचे प्रमाण १०% आहे.
आणि R value 16 आहे आणि मृत्यू होण्याचे किंवा गंभीर लक्षण दिसण्याचे प्रमाण 1% टक्का पण नाही .
तर R value ल किती किंमत दिली पाहिजे.

चीन मधील माहिती जगाला कधीच मिळत नाही.
भारतीय मूर्ख मीडिया फक्त चीन मधील फोटो वापरत आहे.
तेथील लोकांची मत,तेथील सरकार ची मत,तेथील डॉक्टर,संशोधक ह्यांची मत
त्यांच्या तोंडून दाखवत नाहीत.
फोटो चीन चे आणि बकवास भारतीय स्वयं घोषित तज्ञ .
संशोधन,आणि virology ह्यांचा काहीच गंध नसणारे पत्रकार.
आणि दहावी पास मंत्री हेच करत आहेत.

आपण महामूर्ख च आहोत हे परत एकदा भारत सिद्ध करणार च आहे.
मूर्ख मीडिया चा गाजावाजा.
आणि ज्यांना खरेच कळते त्यांचं मत न घेणे.
ह्या मुळे .
१) भारतात विनाकारण हे सरकार लॉक डाऊन करणार.
२) काहीच फायद्याचे नसणारे मास्क, आणि बाकी साहित्य खूप विकले जाणार.
३) अनेक फालतू निर्बंध लावून अर्थ व्यवस्था खड्यात घालवणार.
४)लोकांना त्रास देणार.
पण ऑक्सिजन पासून सर्व औषध ह्यांचा स्टॉक सरकार नी करावा.
फक्त जे गंभीर होतील त्यांना सर्व सुविधा सहज मिळावी म्हणून तयारी करावी.
काळाबाजार करणाऱ्या लोकांना अगोदर च प्रतिबंधित उपाय म्हणून तुरुंगात टाकावे.
इतकेच करावे.
Lockdown च विचार पण करू नये.
आणि rtpcr,मास्क ह्यांची सक्ती पण करू नये

काहीच फायद्याचे नसणारे मास्क, आणि बाकी साहित्य खूप विकले जाणार.>>
ओ हेमंत तुम्ही प्लीज तुमची थेअरी वेगळा धागा काढून तिकडे प्रसवा ना. इथे ती फारच irrelevant वाटत आहे.
बरेच लोक इथे कुमार सरांचे अभ्यासू प्रतिसाद वाचायला येतात.

धन्यवाद !
सकारात्मक दृष्टीकोन महत्वाचा.
भारतीय परिस्थिती :
1. एकंदरीत पाहता भारतीयांना कोविड विरोधात प्राथमिक स्तरावरील संरक्षण चांगले मिळालेले आहे

२. इथून पुढे जे काही विषाणूचे नवे प्रकार येत राहतील त्यांचे जनुकीय क्रमनिर्धारण प्रयोगशाळांमध्ये केले जात आहे. प्रत्येक राज्यात यासाठी विशिष्ट प्रयोगशाळा आणि रुग्णालयांची निवड केली आहे.

३. त्रिसूत्री आणि अन्य प्रतिबंधात्मक उपायांचा तारतम्याने वापर महत्त्वाचा.

या आजाराच्या दीर्घकालीन परिणामांवर सातत्याने अभ्यास चालू आहे. आपल्यातील बऱ्याच जणांनी अनुभवलेला असा एक परिणाम म्हणजे वास घेण्याची क्षमता खूप कमी होणे. काही जणांच्या बाबतीत ती समस्या आता दूर झालेली आहे परंतु अन्य काहींत ती अजूनही सुधारलेली नाही.

अशा काही रुग्णांच्या नाकातील बायोप्सी नमुने घेऊन एक अभ्यास करण्यात आला. त्यातून तिथे घडलेल्या प्रक्रियांवर काही प्रकाश पडला आहे. अशा लोकांच्या बाबतीत नाकामध्ये टी-पेशीजन्य दाह खूप मोठ्या प्रमाणात होतो. त्यातून ऑटोइम्युन प्रक्रिया घडते आणि बऱ्याच वास-चेतापेशींचा नाश होतो.या चेतापेशींची संख्या खूप कमी झाली की वास घेण्याची क्षमता देखील खूप कमी होते.

अशा पेशींच्या नवनिर्मिती संदर्भात काय उपचार करता येतील यावर संशोधन चालू आहे

Pages