कोविड १९ : आव्हान Omicron चे

Submitted by कुमार१ on 2 December, 2021 - 09:07

शेवटचे अद्यतन : ३१/१२/२०२१
मागचा धागा इथे : https://www.maayboli.com/node/78680?page=19
……..
चालू महासाथीचा मागचा धागा काढताना मनोमन अशी इच्छा व्यक्त केली होती की, तो शेवटचा धागा ठरावा आणि लवकरच आजार पूर्ण गाडला जावा. दुर्दैवाने तसे काही होण्याची चिन्हे नाहीत.
गेल्या काही आठवड्यांमध्ये दक्षिण आफ्रिकेतून Omicron नावाच्या करोना विषाणूच्या नव्या उपप्रकाराने तोंड वर काढले आहे. त्याचे नाव ग्रीक वर्णमालेच्या पंधराव्या अक्षरानुसार दिलेले आहे.
( Omicron च्या उच्चाराबाबत भाषातज्ञांमध्ये मध्ये मतभेद आहेत. खुद्द ऑक्सफर्ड शब्दकोशानुसार सुद्धा त्याचे चार उच्चार असून त्यावर एकमत नाही ! इंग्लिश उच्चारानुसार बऱ्याच ठिकाणी "OH-my-kraan असे दिलेले दिसते).

हळूहळू Omicron चा जगभर प्रसार होत आहे. सुरुवातीस दक्षिण आफ्रिकेत आढळलेल्या काही रुग्णांच्याबाबत डॉक्टरांची निरीक्षणे अशी होती :
१. ज्या लसवंतांना नवा संसर्ग झाला आहे त्यांची लक्षणे सौम्य आहेत. अशांवर घरीच उपचार चालू असून परिस्थिती नियंत्रणात आहे.
२. असे अधिकतर रुग्ण तरुण वयातील आहेत
३. जे बाधित रुग्णालयात दाखल झाले आहेत त्यापैकी 90 टक्के बिगर लसवाले आहेत.

अलीकडील बातमीनुसार त्यांच्याकडील रुग्णसंख्येचा आलेख आता कळसबिंदू पार होऊन होऊन खाली खाली येत आहे. एकंदरीत विचार करता हा आजार सौम्य होण्याकडे झुकत आहे.
विषाणूचा Omicron व आधीचा डेल्टा प्रकार यांची पाश्चिमात्य देशांतील एकंदरीत तुलना खालील चित्रातून चांगली समजेल.

omic and delta.jpg

सार्स 2 च्या भावी उत्क्रांतीबद्दल वैज्ञानिकांचे अंदाज :
१. एक तर तो सामान्य सर्दीच्या विषाणूप्रमाणे सौम्य होईल किंवा इन्फ्लूएंजाच्या विषाणू प्रमाणे घातकही राहील.
२. विषाणूच्या उत्क्रांतीगणिक तो सौम्य होतो ही एक समजूत आहे. पण काहींच्या मते ते मिथक आहे. वास्तव अधिक गुंतागुंतीचे असते.
३. या विषाणूचे प्राणिजन्य साठे वाढतेच आहेत. मिंक व हरणाच्या एका जातीत त्याचे सातत्यपूर्ण वास्तव्य आणि भ्रमण चालू आहे. त्यातून नवी उत्परिवर्तने होण्याचा संभव राहतो. ही आपल्या दृष्टीने डोकेदुखी ठरते.
नव्या घडामोडींची भर जशी माहिती मिळेल तशी घालत राहू.

* जशी Omi बाधितांची संख्या वाढते आहे तशी काही उपयुक्त माहिती मिळते आहे. यामुळे बाधित असलेल्या काही रुग्णांमध्ये खालील वैशिष्ट्यपूर्ण लक्षणे दिसून आली आहेत:

* मळमळ
* भूक खूप मंदावणे
* रात्री प्रचंड घाम येणे, अगदी शरीर निथळून निघेल इतका.
या रुग्णांमध्ये वास व चव संवेदनेवर परिणाम झालेला नव्हता.

उपचारांच्या आघाडीवर अद्यापही रामबाण असे विषाणूविरोधी औषध मिळालेले नाही. संशोधन चालू आहे.
१. Molnupiravir या तोंडातून घ्यायच्या औषधाला मध्यंतरी इंग्लंडने आणि नुकतीच अमेरिकी औषध प्रशासनानेही आपात्कालीन वापराची मान्यता दिली आहे. वय 18 वर्षावरील लोकांसाठी ते वापरायचे आहे. पाठोपाठ भारतीय औषध प्रशासनानेही याला आपात्कालीन वापराची मान्यता दिली आहे.
गरोदर स्त्रियांसाठी त्याचा वापर अत्यंत काळजीपूर्वक करण्यात यावा. त्याचे संभाव्य दुष्परिणाम जुलाब, मळमळ व चक्कर येणे असे आहेत.

2. Paxlovid या नव्या गोळीस आपत्कालीन मान्यता मिळाली आहे. हे २ औषधांचे मिश्रण असून त्या बद्दल अजून काही माहिती:
हे औषध फक्त खालील रुग्णांसाठी वापरायचे आहे :
१. rt-pcr चाचणी होकारात्मक आलेली.
२. ज्यांचा आजार गंभीर होण्याचा धोका आहे त्यांनी.
रोग निदान झाल्यावर हे औषध लगेच चालू करायचे आहे.
संभाव्य दुष्परिणाम :
चव-संवेदना कमी होणे, जुलाब, रक्‍तदाबवाढ आणि स्नायूदुखी.

नव्या लसी
भारतात नुकतीच दोन नव्या लसीना आपात्कालीन वापराची मान्यता मिळाली आहे. त्या लसी याप्रमाणे :

१. Corbevax : ही प्रोटीन सबयुनिट प्रकारातील स्वदेशी निर्माण झालेली आहे.
२. Covovax : यात नॅनोकणांचा वापर केलेला आहे.

आता भारतात सध्या एकूण आठ लसीना वापरासाठी मान्यता मिळालेली आहे.

नेहमीचे प्रतिबंधात्मक उपाय म्हणजेच त्रिसूत्री अजून बराच काळ चालू ठेवणे हे आपले एक महत्त्वाचे लढण्याचे अस्त्र असेल.
एकंदरीत जगभरात हा संसर्ग वाढत असल्यामुळे विविध प्रशासनांनी लोकांवर काही प्रमाणात संचार निर्बंध लावले आहेत. नाताळच्या दिवशी जगभरात मिळून ६००० विमान उड्डाणे रद्द केली गेली.
…….
लसीकरण : नवे संशोधन
डीएनए प्रकारची लस भारतात लवकरच उपलब्ध होईल असे अलीकडील बातमीवरून दिसते. त्या प्रकाराची शास्त्रीय माहिती :
१. सध्या जगभरात या प्रकारातील बारा लसी प्रयोगाधीन आहेत. त्यातली पहिली ( ZyCoV-D) भारतात उपलब्ध होईल.
२. ही लस सुईविरहित उपकरणाने दाबतंत्राचा वापर करून त्वचेखाली दिली जाते. हे पारंपरिक इंजेक्शन नसल्यामुळे संबंधित व्यक्तीस वेदना खूप कमी होते.
३. भारतातील लस तिच्या प्रयोगादरम्यान २८,००० लोकांवर वापरण्यात आली. त्यादरम्यान विषाणूचा डेल्टा प्रकार जोरात होता. त्या वातावरणात लसीने 67% परिणामकारकता दाखवली आहे.
४. तिचे उत्पादन तंत्रज्ञान सोपे आहे.
५. आरएनए लसींच्यापेक्षा ही लस अधिक टिकाऊ स्वरूपाची आहे.
६. मात्र तिचा पुरेसा परिणाम दिसून येण्यासाठी किमान तीन डोस द्यावे लागतील असे दिसते.
...................................................

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सार्स Cov 2 या विषाणूचा या आजाराशी असलेला संबंध प्रस्थापित होऊन आत्ताशीक दोन वर्षे होत आहेत. हा आरएनए प्रकारचा व्हायरस आहे. हे विषाणू अत्यंत चिवट आणि उपचारांना चकवा देणारे असतात. याच प्रकारचा अन्य एक विषाणू म्हणजे एचआयव्ही.

एचआयव्हीचा इतिहास पाहिला असता खालील टप्पे दिसतात:
1981 मध्ये प्रथम एका वेगळ्या आजाराची नोंद. त्याला GRID असे नाव.
पुढे त्याला 4H म्हटले गेले.
पुढे तो फंगस किंवा रसायनांमुळे होतो अशी थिअरी होती
नंतर तो एलएव्ही आणि पुढे HTLV या नामांतरातून गेला.
1986 ला तो एचआयव्ही म्हणून प्रस्थापित झाला.
1997 मध्ये खऱ्या अर्थाने प्रभावी अशी औषधे सर्वसामान्यांना उपलब्ध झाली.
...
RNA विषाणूंचा इतिहास बघता निसर्गानुसाच ते चिवट, चमत्कारीक व नियंत्रणात आणायला कठीण असे आहेत. हे एक वर्षापूर्वीही मी लिहिले होते.
हे सर्व पाहता सध्या या विषाणूची उत्क्रांती आणि त्यानुसार संशोधनाची जी काही प्रगती चाललेली आहे त्याकडे आपण सकारात्मक दृष्टीने पाहिले पाहिजे. नकारात्मक दृष्टिकोनातून ( संशोधकांना काही कळत नाही ...इ.) कोणाचेच भले होणार नाही.

आजारासंबंधी आपले व्यक्तिगत अनुभव जरूर लिहा. कुठलेही संशोधन वाचनात आले तर त्यावरील चर्चा होत राहील. फक्त आपण जगातील सर्व जनतेने मिळूनच या संकटाचा सामना करायचा आहे ही भावना मनात असावी.

काही सत्य
1) corona चे सर्व नियम प्रॅक्टिकल मध्ये पाळता येणार च नाहीत.
२} भारत अविकसित राष्ट्र आहे भारता मधील प्रयेक शहरात अती प्रचंड लोकसंख्या आहे.
सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अतिशय बकवास आहे.
एक वर्ग फीट मध्ये तीन लोक ट्रेन मध्ये असतात.
३) अतिशय मागास राज्यात उदा ,यूपी,बिहार,राजस्थान,झारखंड कोणी कसलेच नियम पाळत नाही
ना त्यांच्या कडे आरोग्य सुविधा आहेत
तरी तिथे covid नसतो.
४) भारतातील प्रगत राज्यात आरोग्य व्यवस्था तुलनेने उत्तम आहे,प्रशासन उत्तम आहे तीच राज्य नेहमी चर्चेत असतात तिथे च जास्त केस असतात .

प्रगत देश त्या मध्ये ब्रिटन हाच जास्त बोंब मारत असतो
देशातील अप्रगत राज्य कोरोना पासून मुक्त देशातील प्रगत राज्य कोरोना ग्रस्त.
जगातील फक्त ब्रिटन आणि अमेरिका हेच दोन देश जास्त बोंब मारत आहेत.
का?
का!

बरोबर. तो साठ पानी शोधनिबंध आहे.
त्यात उत्परिवर्तनची क्लिष्ट माहिती आहे.
सारांश वाचला असता एक महत्त्वाचा मुद्दा समजला.
या नैसर्गिक आजारातून मिळणारी प्रतिकारशक्ती ही लसीकरणाच्या दोन डोसने मिळणाऱ्या शक्ती पेक्षा जास्त आहे,
परंतु 3 डोसने मिळणारी प्रतिकारशक्ती या तिघांमध्ये सर्वश्रेष्ठ आहे.

>>या नैसर्गिक आजारातून मिळणारी प्रतिकारशक्ती ही लसीकरणाच्या दोन डोसने मिळणाऱ्या शक्ती पेक्षा जास्त आहे,>>>
मी असे ही त्यात वाचले की पहिले दोन डोज ओमिक्र्~ओनसाठी निरुपयोगी पण तिसरा बलशाली आहे.
वाचलं फक्त
कारण उद्या याच्या विरुध्द काही तरी येईल

https://www.nbcnews.com/science/science-news/covid-rampant-deer-research...
हे आज वाचले. नवर्‍याचे बरेचसे मित्र शिकारीला जातात. या हंटिंग सिझनचे वेनिसन सॉसेज फ्रिजरमधे आहेत. स्वयंपाकात त्याचा वापर करावा की नाही असा प्रश्न पडलाय.

माझा खरतर ह्या लस निर्मात्यांवर विश्वास नाही. मी anti-vaxxer नाहीय. पण तरीही... मला अजुनही गेल्या वर्षीच्या घटना आठवत आहेत. सर्वात प्रथम astrazeneca चे आकडे प्रसिद्ध झाले. त्यांचा efficacy rate साधारण ६३% च्या आसपास होता. त्यानंतर एक दोन दिवसात pfizer, moderna यांचे आकडे प्रसिद्ध झाले. त्यांची efficacy ९२/९३% च्या आसपास होती. त्या बरोबर astrazeneca चे नवीन प्रेस रिलीज आले. म्हणे एका कुठच्या तरी अभ्यासगटामधे चुकून पहिल्या फेरीत अर्धाच डोस दिलेला. चूक ल़क्षात आल्यावर दुसरा डोस योग्य दिला. आणि त्या अभ्यासगटातले असे निरिक्षण आले की असा अर्धा डोस दिलेल्याची efficacy ९२% आहे. त्याची थोडीफार चर्चा झाली. पण जेव्हा लसीकरण सुरू झाले तेव्हा पुर्ण डोसच दिले गेले. pfizer चीही काही कहाणी आहेच. मध्यंतरी कुणा whistleblower च्या बातम्या आलेल्या त्याचं पुढे काय झाले ते कळालं नाही.
सुरुवातीचे काही आठवडे adverse events after vaccination च्या बातम्या येत. पण प्रत्येक बातमीमधे लसनिर्माते त्याचे विश्लेषणच करत होते. नंतर नंतर तर कुणिही त्यावर बोलणेच सोडून दिले. कुठेही ह्या विश्लेषणाचा सारांश इतक्या दिवसात बघितला नाही.
तसेच दोन डोसमधील अंतर हे देखिल शंकास्पद होते. UK मधे तरी शिस्तीत पुरेशा लोकांचे लसीकरण होइपर्यंत अंतर जास्त ठेवण्याचे ठरवले. पण आपल्या इकडे असे भासवले गेले कि जसे अंतर वाढवल्याने लसिची क्षमता वाढते. मग हे अंतर २८ दिवसावरुन एकदम ८४ दिवस केले गेले.
हे मान्य आहे की लसमुळे मृत्युचे प्रमाण काही देशांमधे कमी झाले. परंतु विषाणू प्रसार मात्र थांबला नाही. पण त्या निमित्ताने herd immunity नाही पण herd mentality मात्र बघितली. प्रत्येक नविन विषाणूचा अवतार आल्यावर लसींची efficacy कमी होतेय आणि आणखी बुस्टर डोसची गरज पडायला लागली आहे. खरतर ओमीक्रॉन मधे ज्या टोकदार प्रथिनांच्यावर सगळ्या लसी निर्माण झाल्यात ते टोकदार प्रथिनच बदलले आहेत. त्यामुळे लसींची प्रतिकारक्षमता, खरोखरच्या संसर्गापेक्षा कमी आहे. पण तरिही लसच कशी तारणहार आहे आणि संसर्ग झालेला असो नसो लसच घेणं कसं आवश्यक आहे ते पटवून देणे, लस न घेतलेल्यांवर निर्बंध घालणे सगळीकडे चालू आहे.
ह्या सगळ्या मधे विज्ञान मागे राहते आहे असे वाटतेय.

हे सर्व पाहता सध्या या विषाणूची उत्क्रांती आणि त्यानुसार संशोधनाची जी काही प्रगती चाललेली आहे त्याकडे आपण सकारात्मक दृष्टीने पाहिले पाहिजे. नकारात्मक दृष्टिकोनातून ( संशोधकांना काही कळत नाही ...इ.) कोणाचेच भले होणार नाही.>> संशोधनाची जी काही प्रगती चाललेली आहे त्याकडे सकारात्मक दृष्टीने पहायाला लोकांची काही हरकत नसावी. पण तुम्हीच दिलेल्या उदाहरणांकडे (एचआयव्ही किंवा सार्स) बघितले तर लक्षात येते की, त्या संशोधनातून खात्रीशीर उपाय सापडायला २०-२५ वर्ष लागू शकतात. मग एवढी वर्ष काय लॉकडाऊन/ सोशल डिस्टंसिंग/International प्रवासावर असलेले निर्बंध हे सगळे लोकांनी सहन करत राहायचे?
एचआयव्ही किंवा सार्स वर संशोधन सुरू होते तेव्हा सर्वसामान्य लोकांना असे वेठीला धरायचे उद्योग राज्यकर्त्यांनी आणि संशोधकांनी आरंभिले नव्ह्यते. त्यामुळे लोकांना संशोधनाबद्दल सकारात्मक दृष्टीकोन ठेवायला जड जात नव्हते.

**मग एवढी वर्ष काय लॉकडाऊन/ सोशल डिस्टंसिंग/International प्रवासावर असलेले निर्बंध हे सगळे लोकांनी सहन करत राहायचे?
>>>
नक्कीच नाही.
प्रशासकांनी तारतम्याने असे निर्णय घ्यावेत.
वेठीला धरु नये हे मान्य.

दुसरा मुद्दा
एच आय व्ही आणि सार्स यांच्या रोगप्रसाराचे मार्ग पूर्णपणे भिन्न आहेत.
त्यामुळे एच आय वी च्या वेळेस सध्याच्या त्रिसूत्रीचा काही संबंध उद्भवणार नव्हता.
श्वसन मार्गातून पसरणारा आजार थोड्यावेळात कोट्यावधी जनतेपर्यंत पसरतो हा महत्त्वाचा मुद्दा लक्षात घ्यावा
एच आय व्ही चे उदाहरण दिले याचे कारण म्हणजे तो RNA प्रकारचा विषाणू आहे
असे विषाणू नियंत्रण करायला किती चिवट असतात हे सांगण्याचा उद्देश आहे.

>>>>श्वसन मार्गातून पसरणारा आजार थोड्यावेळात कोट्यावधी जनतेपर्यंत पसरतो हा महत्त्वाचा मुद्दा लक्षात घ्यावा>>> +९९९
आज एक नवीन बातमी आहे. इस्रायलमध्ये मात्र नव्याच संकटाने डोकं वर काढलंय. हे संकट आहे, ‘फ्लोरोना’चं.
फ्लोरोनाचा अर्थ होतो करोना आणि इन्फ्लूएन्झाचा एकाच वेळी संसर्ग होणे.

थंडी चे दिवस आहेत सर्दी आणि त्या जाती मधील आजार होणारच .
देवी पासून प्लेग ,पर्यंत किती महा भयंकर रोगांवर लस निर्माण पण केली आणि सर्व लोकांस दिली पण .
आणि ये रोग नष्ट पण झाले
पण आता सारखा गोंधळ आणि बोंबाबोंब झाली नव्हती.
किती corona बाधित आहे ह्या आकड्याला कशा साठी किंमत द्यायची?
तो लाखात असो नाही तर करोडो मध्ये.
असू द्या ना.
लोकांना कशाला त्रास देत आहेत
तज्ञ लोकांनी,who ,सरकार नी फक्त कामावर लक्ष द्यावे.
रोज मीडिया कडे येवून त्यांची मत व्यक्त करू नयेत .
जितकी गरज आहे तितकीच महत्वाची माहिती फक्त प्रसारित केली जावी.
आकड्यांचा बाजार मांडू नये..
निसर्ग नियम नुसार covid व्हायरस जाणारच .
तसेच घडणार तो काही जास्त स्वतः मध्ये बदल करून माणसाचा कर्दन काळ बनणार नाही.

पूर्ण जगाला माहीत होते दक्षिण आफ्रिकेत नवीन उत्क्रांत व्हायरस आला आहे आणि तो वेगाने पसरतो
तरी भारता सहित सर्व देशांनी दक्षिण आफ्रिकेतून देशात येणाऱ्या लोकांना थांबवलं नाही.
नका थांबवू पण सर्रास सर च्या सर्व प्रवासी लोकांना एअरपोर्ट वरून rt pcr न करता समाजात मिसळून दिले.
महाराष्ट्र सरकार नी rt pcr सक्ती ची केल्यावर देशातील उच्च संस्थेने महाराष्ट्राला तशी सक्ती करू नका असा आदेश दिला .
ठरवून सर्व देशांनी हा नवीन व्हायरस पसरू दिला .
आणि आता लसी चा बोलबाला जो कमी झाला होता तो परत वाढवला.
आता मीडिया फक्त लाख आणि करोड कसे बाधित आहेत ह्याचा प्रचार करत आहे.
पण गंभीर बाधित किती आहेत हे मात्र सांगत नाही
औषध ,डॉक्टर्स,बाकी सुविधा ह्या विषयी काय अवस्था आहे हे काही सांगत नाहीत...फक्त बूस्टर डोस घ्या ह्याचाच आग्रह आणि नंतर जबरदस्ती .
बूस्टर डोस म्हणजे covid वरील संजिविनी आहे का?
हे पण सांगत नाहीत.

तरी भारता सहित सर्व देशांनी दक्षिण आफ्रिकेतून देशात येणाऱ्या लोकांना थांबवलं नाही.
नका थांबवू पण सर्रास सर च्या सर्व प्रवासी लोकांना एअरपोर्ट वरून rt pcr न करता समाजात मिसळून दिले.
महाराष्ट्र सरकार नी rt pcr सक्ती ची केल्यावर देशातील उच्च संस्थेने महाराष्ट्राला तशी सक्ती करू नका असा आदेश दिला . >>>

थांबवले होते. कडक नियम होते द. आफ्रिकेतून व इतर २-३ देशांतून येणार्‍यांकरता. महाराष्ट्राला शिथिल करायला सांगितले ते इतर देशांकरता असलेले नियम - जे देशात इतरत्रही तसेच होते. द. आफ्रिकेतून येणार्‍यांकरता टेस्ट पॉझिटिव्ह आली तर क्वारंटाइन सक्तीचे होते मुंबईत व इतरत्रही. बाकी इव्हन इंग्लंड मधे स्टॉपओव्हर असला तरी भारतात आल्यावर टेस्ट करायला लावत. डिसेंबरच्या पहिल्या पंधरवड्यात हे सगळे होते. आता काय आहे माहीत नाही.

व्हायरस पसरवायचाच असेल आणि सरकार त्यात सामील असेल तर इतर असंख्य सोपे मार्ग आहेत. आफ्रिकेत कोणाला तरी देउन मग त्यातील काही लोकांना प्रवास करायला लावून भारतात आणावे वगैरे इतका द्राविडी प्राणायाम करायची गरज नाही.

व्हायरस ची लागण झाल्यावर Rt pcr मध्ये त्याचे अस्तित्व दिसण्यासाठी पण काही दिवस जातात .
हे सर्वच संबंधित लोकांना चांगले माहीत आहे.
आज संसर्ग झाला आणि आज Rt pcr केली की ती negetive च येणार.
दक्षिण आफ्रिकेतील लोकांची विमान तळावर टेस्ट निगेटिव्ह आल्यावर च त्यांना सोडले असे तुम्ही म्हणत आहात.
मग ते घरी पोचल्यावर नवीन उत्परिवर्तीत व्हायरस नी बाधित कसे निघाले.
बातम्या होत्या ना तेव्हा
आफ्रिकेतून आलेला अमका तमका पुण्यात
Omeycron नी बाधित निघाला .
म्हणजे चूक तर झालीच ना.
सक्ती नी pisitive,negetive सर्वांना विलगिकरण मध्ये ठेवले पाहिजे होते ते पण घरी नाही .
खास विलागिकरान कक्षात.

दक्षिण आफ्रिकेतील लोकांची विमान तळावर टेस्ट निगेटिव्ह आल्यावर च त्यांना सोडले असे तुम्ही म्हणत आहात. >>> अ‍ॅक्च्युअली द आफ्रिकेतील लोकांना सक्तीचे institutional quarantine होते. मग सात दिवसांनंतर टेस्ट आणि मगच घरी जायला परवानगी.

बाकीच्यांना निगेटिव्ह टेस्ट आली तर होम क्वारंटाइन.

हे नियम आर्बिट्ररी होते. मार्च २०२० मध्ये सुद्धा अमुक देशां तल्या फ्लाइट्स बंद करा. अमुक चालू ठेवा. असले प्रकार केले. दुबईहून येणार्‍यांना काही पाहिलं नाही आणि महाराष्ट्रातल्या पहिल्या केसेस त्यातल्याच होत्या.
तरीही तिसर्‍या लाटेत काही धडा घेतला नाही. जास्त काळजी घेतल्याने काही बिघडणार नव्हतं. फ्लाइट्स बंद नको. पण क्वारंटाइन हवंच होतं.
अमेरिकेने फक्त आफ्रिकेतल्या फ्लाइट्स बंद केल्या, युरोपात ओमिक्रॉन सापडूनही तिथल्या केल्या नाहीत, यावर बरीच टीका झाली होती.

आता बूस्टर डोसबाबत घोळ घालणे सुरू आहे. एकतर ९ महिन्यांची गॅप. त्यात आधी सांगितलं की को मॉर्बिडिटीजचं सर्टिफिकेट हवं. मग म्हटलं फक्त डॉक्टरी सल्ला घ्या. आता बूस्टर डोसबद्दल नवा निर्णय घेणार आहेत.

१५-१८ मुलांना कोव्हॅक्सिन देणार आहेत. कोव्हॅ क्सिनची एक्स्पायरी मधेच केव्हा तरी ३ की ६ महिन्यांवरून १२ महिने केली आहे.

फ्लोरोना >>

इसराएल मध्ये फ्लोरोना या आजाराचा जगातील पहिला रुग्ण सापडला असा गाजावाजा गेल्या दोन दिवसात माध्यमांनी केला आहे. त्यात तथ्य नाही. गेल्या वर्षी अमेरिकेत सुद्धा कोविड आणि फ्लू हे दोन्ही झालेले रुग्ण आढळले होते.

इसराएल मधील रूग्णाबद्दल थोडक्यात माहिती:
ही गरोदर स्त्री बिगरलसवाली होती. तिला सौम्य लक्षणे होती. तिच्यावर केलेली दोन्ही जंतूंची चाचणी पॉझिटिव्ह आली. त्याची पुन्हा एकदा खात्री करून घेतली.
एक दोन दिवस रुग्णालयात ठेवून उपचार केल्यानंतर ती व्यवस्थित बरी झाली व घरी गेली.

फ्लोरोना या शब्दाचा उगाचच बाऊ करण्याचे कारण नाही

तज्ञ लोकांनी,who ,सरकार नी फक्त कामावर लक्ष द्यावे.
रोज मीडिया कडे येवून त्यांची मत व्यक्त करू नयेत .>१००% पटलं.
vaccination ह्या विषयावर तर पुढचे ६ महिने मिडीयामधून काहीही भाष्य करणे टाळावे. सध्या उपलब्ध असणार्‍या vaccines चा काही उपयोग होतोय का नाही याचा नीट अभ्यास करावा. अभ्यास करून झाला की सरकारी आणि खाजगी रुग्णालयातल्या डॉक्टर्सना फक्त त्या अभ्यासाचे निष्कर्श सांगावेत. कोणत्या लोकांनी, कोणते vaccine, कधी घ्यावे याबाबतचा सल्ला डॉक्टर्सनी लोकांना द्यावा. सरकारने आणि मिडीयाने आता ह्यात ढवळा-ढवळ करणे थांबवावे.

माझा सिंपल फंडा
- मास्क वापरा
- शक्य असल्यास गर्दी टाळा, सार्वजनिक वाहनाने प्रवास टाळा
- जमेल तितके सोशल डिस्टंसींग पाळा (भारतात हे एवढे सोपे नाही आहे)
- Eligible असाल तर लस घ्या
- एवढे करुन कोरोना झालाच तर डॉक्टरांच्यासल्याप्रमाणे वागा आणि बरे व्हा
- जास्त विचार करु नका. त्याचा तसाही काही फायदा नाही

ओमायक्रॉनच्या चाचण्यांसाठी स्वतंत्र किटला ICMR ची मंजुरी, आता RT-PCR मधूनच होणार निदान.
वेगळ्या जनुकीय क्रमनिर्धारणाची गरज नाही .

https://www.icmr.gov.in/pdf/covid/kits/RT_PCR_kits_for_OMICRON_VOC_30122...

पहिल्या पेक्षा दुसऱ्या लाटेत खूप लोक मेली.
प्रत्येक व्यक्तीच्या माहिती मधील दोन तीन लोक तरी covid नी मृत्युमुखी पडली
Delta नी मृत्यू चे तांडव घातले होते हे मात्र सत्य आहे.
ऑक्सिजन ची मागणी अचानक वाढल्या मुळे गोंधळ उडाला.
इंडस्ट्रिअल वापराचे सिलिंडर खाली करून त्या मध्ये ऑक्सिजन भरून त्याचा वापर सर्रास झाला .
आणि काळी बुरशी नी जन्म घेतला आणि ही बुरशी पण लोकांच्या मृत्यू ला कारणीभूत झाली.
पण त्या वर कोणी भाष्य करत नाही.
ना तज्ञ,ना who, ना सरकार,ना मीडिया.
आता काळी बुरशी गायब पण झाली.
खूप तरुण लोक त्या लाटेत मेले.
औषधांचा पण गोंधळ झाला होता .
कधी सांगितले जायचे हे औषध खूप उपयोगी आहे तर काहीच दिवसात तेच औषध प्राण घातक ठरले अशा बातम्या यायच्या.
काही लोकांनी हा गोंधळ बघून घरी च त्रास सहन करणे उत्तम समजले .

Pages