कोविड १९ : आव्हान Omicron चे

Submitted by कुमार१ on 2 December, 2021 - 09:07

शेवटचे अद्यतन : ३१/१२/२०२१
मागचा धागा इथे : https://www.maayboli.com/node/78680?page=19
……..
चालू महासाथीचा मागचा धागा काढताना मनोमन अशी इच्छा व्यक्त केली होती की, तो शेवटचा धागा ठरावा आणि लवकरच आजार पूर्ण गाडला जावा. दुर्दैवाने तसे काही होण्याची चिन्हे नाहीत.
गेल्या काही आठवड्यांमध्ये दक्षिण आफ्रिकेतून Omicron नावाच्या करोना विषाणूच्या नव्या उपप्रकाराने तोंड वर काढले आहे. त्याचे नाव ग्रीक वर्णमालेच्या पंधराव्या अक्षरानुसार दिलेले आहे.
( Omicron च्या उच्चाराबाबत भाषातज्ञांमध्ये मध्ये मतभेद आहेत. खुद्द ऑक्सफर्ड शब्दकोशानुसार सुद्धा त्याचे चार उच्चार असून त्यावर एकमत नाही ! इंग्लिश उच्चारानुसार बऱ्याच ठिकाणी "OH-my-kraan असे दिलेले दिसते).

हळूहळू Omicron चा जगभर प्रसार होत आहे. सुरुवातीस दक्षिण आफ्रिकेत आढळलेल्या काही रुग्णांच्याबाबत डॉक्टरांची निरीक्षणे अशी होती :
१. ज्या लसवंतांना नवा संसर्ग झाला आहे त्यांची लक्षणे सौम्य आहेत. अशांवर घरीच उपचार चालू असून परिस्थिती नियंत्रणात आहे.
२. असे अधिकतर रुग्ण तरुण वयातील आहेत
३. जे बाधित रुग्णालयात दाखल झाले आहेत त्यापैकी 90 टक्के बिगर लसवाले आहेत.

अलीकडील बातमीनुसार त्यांच्याकडील रुग्णसंख्येचा आलेख आता कळसबिंदू पार होऊन होऊन खाली खाली येत आहे. एकंदरीत विचार करता हा आजार सौम्य होण्याकडे झुकत आहे.
विषाणूचा Omicron व आधीचा डेल्टा प्रकार यांची पाश्चिमात्य देशांतील एकंदरीत तुलना खालील चित्रातून चांगली समजेल.

omic and delta.jpg

सार्स 2 च्या भावी उत्क्रांतीबद्दल वैज्ञानिकांचे अंदाज :
१. एक तर तो सामान्य सर्दीच्या विषाणूप्रमाणे सौम्य होईल किंवा इन्फ्लूएंजाच्या विषाणू प्रमाणे घातकही राहील.
२. विषाणूच्या उत्क्रांतीगणिक तो सौम्य होतो ही एक समजूत आहे. पण काहींच्या मते ते मिथक आहे. वास्तव अधिक गुंतागुंतीचे असते.
३. या विषाणूचे प्राणिजन्य साठे वाढतेच आहेत. मिंक व हरणाच्या एका जातीत त्याचे सातत्यपूर्ण वास्तव्य आणि भ्रमण चालू आहे. त्यातून नवी उत्परिवर्तने होण्याचा संभव राहतो. ही आपल्या दृष्टीने डोकेदुखी ठरते.
नव्या घडामोडींची भर जशी माहिती मिळेल तशी घालत राहू.

* जशी Omi बाधितांची संख्या वाढते आहे तशी काही उपयुक्त माहिती मिळते आहे. यामुळे बाधित असलेल्या काही रुग्णांमध्ये खालील वैशिष्ट्यपूर्ण लक्षणे दिसून आली आहेत:

* मळमळ
* भूक खूप मंदावणे
* रात्री प्रचंड घाम येणे, अगदी शरीर निथळून निघेल इतका.
या रुग्णांमध्ये वास व चव संवेदनेवर परिणाम झालेला नव्हता.

उपचारांच्या आघाडीवर अद्यापही रामबाण असे विषाणूविरोधी औषध मिळालेले नाही. संशोधन चालू आहे.
१. Molnupiravir या तोंडातून घ्यायच्या औषधाला मध्यंतरी इंग्लंडने आणि नुकतीच अमेरिकी औषध प्रशासनानेही आपात्कालीन वापराची मान्यता दिली आहे. वय 18 वर्षावरील लोकांसाठी ते वापरायचे आहे. पाठोपाठ भारतीय औषध प्रशासनानेही याला आपात्कालीन वापराची मान्यता दिली आहे.
गरोदर स्त्रियांसाठी त्याचा वापर अत्यंत काळजीपूर्वक करण्यात यावा. त्याचे संभाव्य दुष्परिणाम जुलाब, मळमळ व चक्कर येणे असे आहेत.

2. Paxlovid या नव्या गोळीस आपत्कालीन मान्यता मिळाली आहे. हे २ औषधांचे मिश्रण असून त्या बद्दल अजून काही माहिती:
हे औषध फक्त खालील रुग्णांसाठी वापरायचे आहे :
१. rt-pcr चाचणी होकारात्मक आलेली.
२. ज्यांचा आजार गंभीर होण्याचा धोका आहे त्यांनी.
रोग निदान झाल्यावर हे औषध लगेच चालू करायचे आहे.
संभाव्य दुष्परिणाम :
चव-संवेदना कमी होणे, जुलाब, रक्‍तदाबवाढ आणि स्नायूदुखी.

नव्या लसी
भारतात नुकतीच दोन नव्या लसीना आपात्कालीन वापराची मान्यता मिळाली आहे. त्या लसी याप्रमाणे :

१. Corbevax : ही प्रोटीन सबयुनिट प्रकारातील स्वदेशी निर्माण झालेली आहे.
२. Covovax : यात नॅनोकणांचा वापर केलेला आहे.

आता भारतात सध्या एकूण आठ लसीना वापरासाठी मान्यता मिळालेली आहे.

नेहमीचे प्रतिबंधात्मक उपाय म्हणजेच त्रिसूत्री अजून बराच काळ चालू ठेवणे हे आपले एक महत्त्वाचे लढण्याचे अस्त्र असेल.
एकंदरीत जगभरात हा संसर्ग वाढत असल्यामुळे विविध प्रशासनांनी लोकांवर काही प्रमाणात संचार निर्बंध लावले आहेत. नाताळच्या दिवशी जगभरात मिळून ६००० विमान उड्डाणे रद्द केली गेली.
…….
लसीकरण : नवे संशोधन
डीएनए प्रकारची लस भारतात लवकरच उपलब्ध होईल असे अलीकडील बातमीवरून दिसते. त्या प्रकाराची शास्त्रीय माहिती :
१. सध्या जगभरात या प्रकारातील बारा लसी प्रयोगाधीन आहेत. त्यातली पहिली ( ZyCoV-D) भारतात उपलब्ध होईल.
२. ही लस सुईविरहित उपकरणाने दाबतंत्राचा वापर करून त्वचेखाली दिली जाते. हे पारंपरिक इंजेक्शन नसल्यामुळे संबंधित व्यक्तीस वेदना खूप कमी होते.
३. भारतातील लस तिच्या प्रयोगादरम्यान २८,००० लोकांवर वापरण्यात आली. त्यादरम्यान विषाणूचा डेल्टा प्रकार जोरात होता. त्या वातावरणात लसीने 67% परिणामकारकता दाखवली आहे.
४. तिचे उत्पादन तंत्रज्ञान सोपे आहे.
५. आरएनए लसींच्यापेक्षा ही लस अधिक टिकाऊ स्वरूपाची आहे.
६. मात्र तिचा पुरेसा परिणाम दिसून येण्यासाठी किमान तीन डोस द्यावे लागतील असे दिसते.
...................................................

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

खरंय, अमेरिकेत दैनंदिन रुग्णसंख्येचा उच्चांक गाठला गेला आहे
परिस्थिती बिकट आहे खरी

पारंपरिक RT PCR test Covid 19 बाधित आहे/नाही दाखवते
नवे Omisure तंत्र कोविड + Omi हे दोन्ही एकदमच निष्कर्ष देते

अमेरिकेतील इलुम्निया या कंपनीने, अमेरिकेतीलच अल्ब्राईट स्टोनब्रिज ग्रुप (ए. एस. जी. - बोस्टन) या संस्थेच्या माध्यमातून एकूण 6 कोटी 40 लाख रुपये किंमतीचे दोन जीनोम सिक्वेसिंग संयंत्र बृहन्मुंबई महानगरपालिकेला दान स्वरुपात दिले आहे.

हे genome अनुक्रम ठरवणाऱ्या मशीन इतक्या महाग आहेत फक्त दोन च मशीन सहा कोटी रुपयांच्या आहेत है वरील बातमी मधून माहीत पडते.
Genome अनुक्रम माहीत पडल्यावर च तो कोणता उत्परीवर्तित विषाणू आहे हे समजत असेल.?
को असे काही नाही.
साध्या टेस्ट नी व्हायरस चा प्रकार कसा काय माहित पडेल.
ही एक शंका

याचे उत्तर मी अगोदरच वरच्या प्रतिसादात दिले आहे ना !
टाटांच्या Omisure या नवीन चाचणी संचाबद्दल इथे वाचता येईल :

https://www.business-standard.com/article/current-affairs/tata-medical-a...

Omeycron भले शरीराच्या प्रतीपिंड ना चकवा देईल पण तो T सेल ल फसवू शकत नाही
T सेल त्याचा खात्मा करणारच.
असे ऑस्ट्रेलिया मध्ये झालेल्या संशोधनात माहीत पडले आहे
Source
आज तक वरील न्यूज. रिपोर्ट

ओमायक्रोन बद्दल अभ्यासकांची काही टिपणे :

१. तो वेगाने संसर्ग करीत असल्याने त्याची लाटही डेल्टपेक्षा अधिक वेगाने ओसरेल.
२. त्याच्या संसर्गामुळे शरीरात निर्माण झालेल्या अँटीबॉडीज डेल्टा विरुद्धही प्रभावी आहेत.

३. शरीरात गेल्यावर त्याची मुख्य वाढ वरच्या श्वसनमार्गातच होते. फुफ्फुसांत त्याचा शिरकाव अत्यल्प असून त्यांना इजा करण्याची क्षमता खूप कमी आहे. त्यामुळे नाका तोंडावाटे त्याचा प्रसार अधिक होणार, परंतु रुग्णाच्या फुफ्फुसांना मात्र इजा होणार नाही

४. या लाटेत एकंदरीत समूह प्रतिकारशक्तीमध्ये बऱ्यापैकी वाढ होईल.

अशी किती लोक ऑक्सिजन bed वर आहेत?
त्यांचे वय किती आहे?
ते अनेक व्याधी नी त्रस्त आहेत का?
ते व्यसनाच्या आहारी गेलेली लोक आहेत का?
ही सर्व माहिती मुंबई पालिका आयुक्त नी दिली पाहिजे होती आणि नंतर ९६% लोकांनी एक पण लसी चा डोस घेतला नाही असे अर्धवट अर्थ निघणारे statement दिले पाहिजे होते

नैसर्गिक रीत्या च covid विषाणू कमजोर झाला आहे.
लसीकरण चा फायदा झाला असेल पण लस दिली म्हणून लोक गंभीर आजारी नाहीत है इतक्या लवकर सखोल अभ्यास न करता म्हणणे अयोग्य आहे.

१०२ जण ऑक्सिजन वर असे खाली दिलेय त्या बातमीत.
पण हा आकडा टक्केवारी काढुन काही निष्कर्ष करण्या इतपत खचितच मोठा नाही.

१९०० म्हटलंय. १०२ एका दिवसाचे.

हेमंत सर , तुम्ही वेगळा धागा काढून तिथे लिहायचं आश्वासन दिलं आहे. करोनाची ही लाट संपेपर्यंत तरी पूर्ण कराल का?

*Allowing the spreading of Omicron is the only option of removing corona fear completely. It will make the public more safe and save Lacs of Crores of public money*

1). *Senior officials in the Health Ministry of Israel have raised the option of switching to a “mass infection model.”*
https://www.timesofisrael.com/as-covid-outbreak-intensifies-israel-said-...

2) *Indian scientists also gave similar suggestions*
Detaled article published in Outlook.
Link:
https://www.outlookindia.com/website/story/india-news-with-mild-symptoms...
It is a good news for people and bad news for vaccine companies.
Expert opinion on Omicron is that it is a blessing as it is acting like natural vaccine and creating natural immunity. Omicron is going to end the pandemic.
Such immunity is 27 times better, robust and long lasting than immunity developed by vaccines.

3) *Israel senior Doctor's following tweet is also important.*
Afshine Emrani MD FACC (@afshineemrani) Tweeted:
@RWMaloneMD Omicron is literally the vaccine vaccine companies could not make.
It is attenuated.
No hospitalizations.
No critical patients.
No oxygenation.
Everyone will be exposed and will get it.
Within 8 weeks the world will be vaccinated.
Why the panic???
It could've been a lot worse. https://twitter.com/afshineemrani/status/1473398962132422660?s=20

4) *Experts from India also exposed the malafides and double standards of WHO.*

https://www.outlookindia.com/website/story/india-news-omicron-scare-is-w...

5) *Omicron is nature's own vaccine, will be the endgame of COVID-19* *Says the experts*

https://www.news9live.com/india/omicron-is-natures-own-vaccine-it-will-b...

हे अस काहीतरी वाचायला मिळतंय!

Vaccine निर्मिती करणारे देश ब्रिटन आणि अमेरिका हेच जास्त उतेजित झालेले असतात.
वरील सर्व दाव्यात सत्यता असण्याची शक्यता च जास्त असावी

भरत
त्यांनी जो विषाणू प्रसाराचा वेळ वगैरे दिला आहे त्यासाठी अधिकृत संदर्भ काही सापडला नाही.

मुळात हे कसे मोजतात हा क्लिष्ट विषय आहे.
computational fluid dynamics, Stokes' law या प्रकारचे तंत्रज्ञान आणि काही विज्ञानाचे नियम लावतात इतकंच मी सांगू शकतो.
सूक्ष्मजीवशास्त्रज्ञच अधिक सांगू शकतील

धन्यवाद .
सुमारे दीड वर्षापूर्वी यासंदर्भात मी एक सविस्तर प्रतिसाद लिहिला होता. आता तो महासागरात शोधणे अवघड आहे.
या सर्व अभ्यासाची एक मर्यादा बरेचदा दुर्लक्षिली जाते. सर्व अभ्यास हे प्रयोगशाळेमध्ये नियंत्रित वातावरणात केले जातात. त्यात काही वेळेस प्रत्यक्ष जंतूंचे स्त्रोत वगैरे वापरतात.
वास्तवात काय होते की, वातावरणातील तापमान आर्द्रता इत्यादी अनेक घटकांचा त्याच्यावर परिणाम होतो.
पुन्हा, ज्या दोन व्यक्तींमध्ये प्रसार होत आहे त्या दोघांची मूळ तब्येत/सहव्याधी वगैरे मुद्दे पण विचारात घ्यावे लागतात.

अर्थातच.
मी सध्या सर्जिकल + कापडी असे दोन मास्क वापरतोय. आता एन ९५ घ्यावा लागेल असं दिसतं.

माझ्या ऑफिसात एक जण पॉझिटिव्ह आली , तिने सगळ्यांना (अस्मादिकही) कोविडचा प्रसाद दिलाय. सगळ्यांनाच ताप, सर्दी , खोकला , घसा खवखवणे चालू झालेय. लसीकरण झाले असल्याने त्यांतल्या त्यात दिलासा आहे. कोविडवर औषध मिळेल पण मूर्खपणावर कस औषध मिळणार? इतका राग येतोय त्या मूर्ख मुलीचा की बास! स्वतःचा रिझल्ट पेंडिंग असतानाही ऑफिसात येणे , आल्यावरही मास्क न घालणे वगैरे बालिशपणाच वर्तन Angry

जाई
सहमत आहे तुमच्याशी.
आता काळजी घ्या. व्यवस्थित विश्रांती घ्या.
लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा

Pages