
शेवटचे अद्यतन : ३१/१२/२०२१
मागचा धागा इथे : https://www.maayboli.com/node/78680?page=19
……..
चालू महासाथीचा मागचा धागा काढताना मनोमन अशी इच्छा व्यक्त केली होती की, तो शेवटचा धागा ठरावा आणि लवकरच आजार पूर्ण गाडला जावा. दुर्दैवाने तसे काही होण्याची चिन्हे नाहीत.
गेल्या काही आठवड्यांमध्ये दक्षिण आफ्रिकेतून Omicron नावाच्या करोना विषाणूच्या नव्या उपप्रकाराने तोंड वर काढले आहे. त्याचे नाव ग्रीक वर्णमालेच्या पंधराव्या अक्षरानुसार दिलेले आहे.
( Omicron च्या उच्चाराबाबत भाषातज्ञांमध्ये मध्ये मतभेद आहेत. खुद्द ऑक्सफर्ड शब्दकोशानुसार सुद्धा त्याचे चार उच्चार असून त्यावर एकमत नाही ! इंग्लिश उच्चारानुसार बऱ्याच ठिकाणी "OH-my-kraan असे दिलेले दिसते).
हळूहळू Omicron चा जगभर प्रसार होत आहे. सुरुवातीस दक्षिण आफ्रिकेत आढळलेल्या काही रुग्णांच्याबाबत डॉक्टरांची निरीक्षणे अशी होती :
१. ज्या लसवंतांना नवा संसर्ग झाला आहे त्यांची लक्षणे सौम्य आहेत. अशांवर घरीच उपचार चालू असून परिस्थिती नियंत्रणात आहे.
२. असे अधिकतर रुग्ण तरुण वयातील आहेत
३. जे बाधित रुग्णालयात दाखल झाले आहेत त्यापैकी 90 टक्के बिगर लसवाले आहेत.
अलीकडील बातमीनुसार त्यांच्याकडील रुग्णसंख्येचा आलेख आता कळसबिंदू पार होऊन होऊन खाली खाली येत आहे. एकंदरीत विचार करता हा आजार सौम्य होण्याकडे झुकत आहे.
विषाणूचा Omicron व आधीचा डेल्टा प्रकार यांची पाश्चिमात्य देशांतील एकंदरीत तुलना खालील चित्रातून चांगली समजेल.

सार्स 2 च्या भावी उत्क्रांतीबद्दल वैज्ञानिकांचे अंदाज :
१. एक तर तो सामान्य सर्दीच्या विषाणूप्रमाणे सौम्य होईल किंवा इन्फ्लूएंजाच्या विषाणू प्रमाणे घातकही राहील.
२. विषाणूच्या उत्क्रांतीगणिक तो सौम्य होतो ही एक समजूत आहे. पण काहींच्या मते ते मिथक आहे. वास्तव अधिक गुंतागुंतीचे असते.
३. या विषाणूचे प्राणिजन्य साठे वाढतेच आहेत. मिंक व हरणाच्या एका जातीत त्याचे सातत्यपूर्ण वास्तव्य आणि भ्रमण चालू आहे. त्यातून नवी उत्परिवर्तने होण्याचा संभव राहतो. ही आपल्या दृष्टीने डोकेदुखी ठरते.
नव्या घडामोडींची भर जशी माहिती मिळेल तशी घालत राहू.
* जशी Omi बाधितांची संख्या वाढते आहे तशी काही उपयुक्त माहिती मिळते आहे. यामुळे बाधित असलेल्या काही रुग्णांमध्ये खालील वैशिष्ट्यपूर्ण लक्षणे दिसून आली आहेत:
* मळमळ
* भूक खूप मंदावणे
* रात्री प्रचंड घाम येणे, अगदी शरीर निथळून निघेल इतका.
या रुग्णांमध्ये वास व चव संवेदनेवर परिणाम झालेला नव्हता.
उपचारांच्या आघाडीवर अद्यापही रामबाण असे विषाणूविरोधी औषध मिळालेले नाही. संशोधन चालू आहे.
१. Molnupiravir या तोंडातून घ्यायच्या औषधाला मध्यंतरी इंग्लंडने आणि नुकतीच अमेरिकी औषध प्रशासनानेही आपात्कालीन वापराची मान्यता दिली आहे. वय 18 वर्षावरील लोकांसाठी ते वापरायचे आहे. पाठोपाठ भारतीय औषध प्रशासनानेही याला आपात्कालीन वापराची मान्यता दिली आहे.
गरोदर स्त्रियांसाठी त्याचा वापर अत्यंत काळजीपूर्वक करण्यात यावा. त्याचे संभाव्य दुष्परिणाम जुलाब, मळमळ व चक्कर येणे असे आहेत.
2. Paxlovid या नव्या गोळीस आपत्कालीन मान्यता मिळाली आहे. हे २ औषधांचे मिश्रण असून त्या बद्दल अजून काही माहिती:
हे औषध फक्त खालील रुग्णांसाठी वापरायचे आहे :
१. rt-pcr चाचणी होकारात्मक आलेली.
२. ज्यांचा आजार गंभीर होण्याचा धोका आहे त्यांनी.
रोग निदान झाल्यावर हे औषध लगेच चालू करायचे आहे.
संभाव्य दुष्परिणाम :
चव-संवेदना कमी होणे, जुलाब, रक्तदाबवाढ आणि स्नायूदुखी.
नव्या लसी
भारतात नुकतीच दोन नव्या लसीना आपात्कालीन वापराची मान्यता मिळाली आहे. त्या लसी याप्रमाणे :
१. Corbevax : ही प्रोटीन सबयुनिट प्रकारातील स्वदेशी निर्माण झालेली आहे.
२. Covovax : यात नॅनोकणांचा वापर केलेला आहे.
आता भारतात सध्या एकूण आठ लसीना वापरासाठी मान्यता मिळालेली आहे.
नेहमीचे प्रतिबंधात्मक उपाय म्हणजेच त्रिसूत्री अजून बराच काळ चालू ठेवणे हे आपले एक महत्त्वाचे लढण्याचे अस्त्र असेल.
एकंदरीत जगभरात हा संसर्ग वाढत असल्यामुळे विविध प्रशासनांनी लोकांवर काही प्रमाणात संचार निर्बंध लावले आहेत. नाताळच्या दिवशी जगभरात मिळून ६००० विमान उड्डाणे रद्द केली गेली.
…….
लसीकरण : नवे संशोधन
डीएनए प्रकारची लस भारतात लवकरच उपलब्ध होईल असे अलीकडील बातमीवरून दिसते. त्या प्रकाराची शास्त्रीय माहिती :
१. सध्या जगभरात या प्रकारातील बारा लसी प्रयोगाधीन आहेत. त्यातली पहिली ( ZyCoV-D) भारतात उपलब्ध होईल.
२. ही लस सुईविरहित उपकरणाने दाबतंत्राचा वापर करून त्वचेखाली दिली जाते. हे पारंपरिक इंजेक्शन नसल्यामुळे संबंधित व्यक्तीस वेदना खूप कमी होते.
३. भारतातील लस तिच्या प्रयोगादरम्यान २८,००० लोकांवर वापरण्यात आली. त्यादरम्यान विषाणूचा डेल्टा प्रकार जोरात होता. त्या वातावरणात लसीने 67% परिणामकारकता दाखवली आहे.
४. तिचे उत्पादन तंत्रज्ञान सोपे आहे.
५. आरएनए लसींच्यापेक्षा ही लस अधिक टिकाऊ स्वरूपाची आहे.
६. मात्र तिचा पुरेसा परिणाम दिसून येण्यासाठी किमान तीन डोस द्यावे लागतील असे दिसते.
...................................................
डेथ रेट ३ मध्ये १ माणूस असेल
डेथ रेट ३ मध्ये १ माणूस असेल तर हे म्हणजे फारच टू मच आहे.
जाऊदे अजून माहिती येण्याची वाट पाहू.
@ विमु,
@ विमु,
जर का Ct निर्देशांकवरून विषाणूच्या घनतेसंबंधी खरोखर काही निष्कर्ष काढायचे असले, तर मुळात rt-pcr चाचणी दोन टप्प्यांमध्ये करावी लागते. वास्तवात हे काही होत नाही आणि प्रत्येक रूग्णासाठी करणे शक्य नाही. म्हणून Ct प्रकाराचा बाऊ करू नये असे दिसते.
https://www.sciencedirect.com/science/article/pii/S1876034121002318
एकाच घरात एकाचवेळी सगळेच
एकाच घरात एकाचवेळी सगळेच कोव्हीड पॉझिटिव्ह असतील तरी त्यांनी एकमेकांपासून विलग रहाणे गरजेचे आहे का?
मानव
मानव
या प्रश्नाचे एकच एक उत्तर असणार नाही. त्यात बरेच जर-तर असतील. जसे की,
१. घरातील सर्व बाधितांचे वयोगट
२. सर्व बाधित विषाणूच्या एकाच प्रकाराने (डेल्टा,ओमि इत्यादी) बाधित आहेत का?
३. बाधितांपैकी कोणाला सहव्याधी आहेत/ कोण वृद्ध आहे, त्यानुसार प्रत्येकाचे विलगीकरण कालावधी काहीसे वेगळे असतात.
४. या सगळ्याचा विचार करून संबंधित कुटुंबाला निर्णय घ्यावा लागेल
धन्यवाद.
धन्यवाद.
"दरम्यान, मास्कमुक्त
"दरम्यान, मास्कमुक्त महाराष्ट्र करण्याविषयी आपण कधीच उल्लेख केला नसल्याचं राजेश टोपे म्हणाले. “मास्कमुक्त महाराष्ट्र असं आम्ही कधीही म्हटलेलो नाही.
https://www.loksatta.com/maharashtra/health-minister-rajesh-tope-on-coro...
Omicron जुना झाला, आता नवीन
Omicron जुना झाला, आता नवीन BA.2 आला आहे, नवीन धागा काढावा लागेल आता.
नवा प्रकार हा Omi चाच वंशज
नवा प्रकार हा Omi चाच वंशज आहे.
https://www.washingtonpost.com/health/2022/01/24/covid-omicron-ba2/
Known as BA. 2, the new version of the virus is a descendant of the omicron variant responsible for huge surges of covid-19 in the United States and elsewhere around the globe. Virologists are referring to the original omicron variant as BA. 1.
अद्याप त्याच्या घातकतेबद्दल अभ्यास अपूर्ण आहे
मी बूस्टर घेतला नाही.. मला
मी बूस्टर घेतला नाही.. मला कोविड झाला पण दोन दिवसात ठीक झालो... बूस्टर घेतलेल्या मित्रांनाही झाला आणि त्यांनाही दोन-तीन दिवस लागले ठीक व्हायला... बूस्टर घेण्याचा फायदा नक्की काय???
आय सपोर्ट जोकोविच... वॅक्सीन वगैरे फालतुगिरी आहे...
<< बूस्टर घेण्याचा फायदा
<< बूस्टर घेण्याचा फायदा नक्की काय??? >>
तुम्ही कोविडमुळे मरण्याची शक्यता कमी.
माझा जुना प्र. :तिसऱ्या
माझा जुना प्र. :
तिसऱ्या (बलवर्धक) डोस संदर्भात काही प्रश्न उपस्थित झालेले आहेत हे खरे. ‘नेचर’ या वैज्ञानिक नियतकालिकातून काही वाचन केले. त्यानुसार तिसरा डोस जर द्यायचा असेल, तर तो खालील दोन प्रकारच्या लसींचा द्यावा असा एक विचारप्रवाह आहे :
1. mRNA
2. purified viral protein
त्यातला 2 हा जो प्रकार आहे त्याचे उत्पादन अजून चालू झालेले नाही. Novavax व Clover हे उद्योग त्याच्या संशोधनात मग्न आहेत.
भारतात आपण ज्या २ लसी वापरलेल्या आहेत त्या वरील दोन्हीपेक्षा वेगळ्या प्रकारच्या आहेत.
जर वरील अनुमानानुसार तिसरा डोस जर एकदम वेगळ्या कंपनीचा द्यायचा ठरला, तर मग तो एकच डोस पुरणार का, असा नवा प्रश्न उपस्थित होतो.
Submitted by कुमार१ on 15 January, 2022 - 18:13
……
11 जानेवारीच्या डब्ल्यू एच ओ निवेदनानुसार :
सध्याच्याच लसीचे वारंवार बलवर्धक डोस देत बसणे हे फारसे फायदेशीर नसेल. . त्यातून भविष्यात निर्माण होणाऱ्या विषाणूच्या नवीन उपप्रकारांबद्दल प्रतिकारशक्ती मिळण्याबाबत शंका आहे. खऱ्या अर्थाने बलवर्धक डोस द्यायचे असल्यास नव्या प्रकारच्या लसींचे उत्पादन करावे लागेल. अशा नव्या लसी करोना- सर्वसमावेशक (pan-C) या प्रकारच्या असायला हव्यात.
https://www.nature.com/articles/d41586-022-00200-9
जसे अँटिबायोटिक्स वारंवार
जसे अँटिबायोटिक्स वारंवार घेतले तर जीवाणु त्यावर मात करायला शिकतो तसे लस वारंवार घेतली तर फायदा होण्या ऐवजी विषाणू त्यावर मात करायला शिकेल असे होऊ शकते का?
होय
होय
अप्रत्यक्षपणे नेचर मधील वरील लेखात तेच सुचवले आहे.
सद्य लस 100% संरक्षण देत नाही. अशा परिस्थितीत तीच वारंवार देत बसल्याने फायद्याचा आलेख घसरता राहतो असे त्यांचे म्हणणे आहे.
अर्थात या विषयाबाबत बरीच मतभिन्नता आहे.
खूप मोठा आर्थिक व्यवहार होत
खूप मोठा आर्थिक व्यवहार होत आहे.लस,मास्क,sanitizer,ऑक्साइमीटर
,rtpcr. टेस्ट साठी लागणारे kits. ठराविक औषध,हॉस्पिटल .
ही सोन्याची अंडी देणारी कोंबडी अंडी देत च राहणार .
ती आताच कोणी कापून खाणार नाही
आणि ही किनार पण नक्कीच आहे.covid ला.
Omicron- BA.2 पासून झालेल्या
Omicron- BA.2 पासून झालेल्या संसर्गाची सद्यस्थिती:
हा 56 देशांमध्ये पसरला असून सर्व मिळून सुमारे 25000 लोक त्याने बाधित आहेत. देशानुसार क्रमवारी :
१. डेन्मार्क सर्वाधिक रुग्ण
२. युके
३. भारत. भारतात नव्या संसर्गपैकी सुमारे निम्मे या प्रकारचे आहेत.
अर्थात यामुळे झालेला आजार सौम्य/ मध्यम असा आहे.
करोना साठीचे युनिव्हर्सल
करोना साठीचे युनिव्हर्सल व्हॅक्सिन शोधल्याचा भारतीय शास्त्रज्ञांचा दावा
https://www.business-standard.com/article/current-affairs/designed-vacci...
https://www.loksatta.com
https://www.loksatta.com/mumbai/the-decision-to-admit-only-those-who-hav...
“लोकल प्रवासासाठी लस सक्तीचा माजी मुख्य सचिवांनी घेतलेला निर्णय कायद्यानुसार नव्हता” ; मुंबई उच्च न्यायालयाची टिप्पणी
"आता सध्या नियंत्रणात आलेली करोना परिस्थिती पाहता, मुंबई उच्च न्यायालयाने आज काही टिप्पणी केली. ज्यामध्ये त्यांनी स्पष्ट केलं आहे की आता लोकल ट्रेन्स, मॉल या ठिकाणी जे दोन्ही लसीकरण झालेल्यांनाच केवळ प्रवेश दिला जात होता, तो निर्णय आता मागे घ्यायला हवा. आता परिस्थिती नियंत्रणात आलेली आहे. त्यामुळे केवळ आडमुठेपणा करून राज्याचं नाव जे करोना काळात देशात नावाजलं गेलं होतं, ते नाव आता तुम्ही खराब करू नका."
आपल्याकडे केसेस कमी होताहेत
आपल्याकडे केसेस कमी होताहेत म्हणून हुश्श करावं तर दक्षिण कोरियात रोजच्या रुग्णसंख्येचा नवा उच्चांकी आकडा गाठल्याची बातमी आहे. परवा ९९०००+ तर काल १७१०००+. ओमिक्रॉन तिथे आता पोचलाय असं दिसतं.
ओह!
ओह!
त्यातल्या त्यात तो ओमीक्रोन असेल तर बरं, सगळीकडे लौकर ओसरला, गंभीर आजार-मृत्यू फार कमी.
आता अजून कुठला नवा variant पसरू नये.
माझा अनुभव.
माझा अनुभव.
महिन्याभरा पूर्वी आधी बायकोला झाला. दुसऱ्या दिवसापासून मला तीच लक्षणं ताप वगळून. माझी टेस्ट निगेटिव्ह आली पण लक्षणांवरून कोव्हीड असावा असे दिसत होते.
बायकोला लक्षणे दिसली तेव्हाच आम्ही विलगीकरण पाळणे सुरू केले होते, पण पाच दिवसांनी वरच्या घरात बहिणीला, मग आईबाबांनाही झालाच. सहाव्या दिवशी मी ठणठणीत बरा झालो. वरती सगळे इन्फेक्टेड झाल्यावर वर रहाणे भाग झाले, आपल्याला होऊन गेलाय यांना सगळ्यांना त्यामुळे आपसात मास्क वगळता इतर विशेष पाळले गेले नाही. आणि दोन दिवसांत मला परत तीच लक्षणे आणि सोबत ताप सुद्धा आणि लक्षणे चांगलीच तीव्र. टेस्ट पॉझिटिव्ह आली. बाकी सगळ्यांच्या ताप एक, दोन दिवस होता मला चार दिवस होता. आणि खोकला, अंगदुखी इतरांच्या तुलनेत आता चांगलेच तीव्र होते.
पहिले इन्फेक्शन सौम्य असेल आणि तेव्हा प्रतिकारशक्ती पूर्णपणे ऍक्टिव्ह झाली नसेल तर दुसरे इन्फेक्शन केव्हाही होऊ शकते असे वाचले. बहुतेक तसे झाले असावे.
बाकी सगळे आठ दहा दिवसात पूर्णपणे बरे झाले. मला महिना होऊन गेला, कोव्हीड झाल्यावर सायनस कफने भरले ते अजून पूर्ण क्लिअर झाले नाही, थकवा (fatigue) अजून पूर्ण गेला नाही. विशेष त्रास काही नाही, पण शेपूट अजूनही गेले नाही.
आणि अजून एक. माझा सिटी स्कोअर घरात सगळ्यात जास्त - २२. इतरांचा १६-१८ दरम्यान. (जितका कमी तितका तीव्र).
तेव्हा सिटी स्कोअर वरून काही ठरवता येत नाही याचे हे एक उदाहरण म्हणता येईल.
मानव
मानव
तंदुरुस्तीसाठी शुभेच्छा
बऱ्याच जणांच्या बाबतीत ते शेपूट काही काळ त्रास देत राहत आहे....
मला झाला तेव्हा पण फार त्रास
मला झाला तेव्हा पण फार त्रास झाला नाही.१ दिवस कणकण होती. (९९.९) दोन तीन दिवस अशक्तपणा होता. पाच सहा दिवसात सर्व सुरळीत झाले. मला मधुमेह आहे पण सुदैवाने फार त्रास झाला नाही. रक्तशर्करापण आटोक्यात होती.
जगातील अनेक देशांमध्ये
जगातील अनेक देशांमध्ये करोनाबाधितांच्या संख्येत मोठी घट होत आहे. करोना महासाथीचा अंत झाला आहे, हे समजण्यासाठी नेमके कोणते निकष, संकेत असावेत याबाबत जागतिक आरोग्य संघटनेत चर्चा सुरू आहे. करोना महासाथ संपुष्टात आल्याची घोषणा इतक्यात तरी होणार नसल्याचे जागतिक आरोग्य संघटनेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
https://www.google.com/amp/s/marathi.abplive.com/news/world/coronavirus-...
जगातील अनेक देशांमध्ये
दु प्र
Who वर जास्त विसंबून
Who वर जास्त विसंबून राहण्याची गरज नाही .श्रीमंत देशाचे खेळणे आहे who.भारताने स्वतःची यंत्रणा निर्माण करावी पण bjp सारख्या अनाडी सरकार ची तू कुवत नाही
चीन मध्ये पुन्हा उद्रेक
चीन मध्ये पुन्हा उद्रेक झाल्याच्या बातम्या येऊ लागल्या आहेत.
+१
+१
खरंय. साथ संपेना
....
वैशिष्ट्यपूर्ण पारदर्शक मुखपट्टी भारतात उपलब्ध : किंमत फक्त 2990 रुपये !
https://www.aninews.in/news/business/business/transparent-face-mask-ceem...
सध्याच्या युरोपीय युद्धामुळे
सध्याच्या युरोपीय युद्धामुळे युक्रेनचे सुमारे 30 लक्ष निर्वासित अन्य युरोपीय देशांमध्ये जमा झालेले आहेत. त्यापैकी सुमारे निम्मी मुले आहेत. या निर्वासितांच्या अन्य प्रश्नांच्या जोडीने आरोग्य समस्याही हाताळाव्या लागताहेत.
त्यादृष्टीने युरोपीय समुदायाने या मुलांच्या लसीकरणाचा कार्यक्रम हाती घ्यायचे ठरवले आहे. त्यामध्ये कोविडच्या जोडीनेच क्षयरोग, पोलिओ आणि गोवराच्या लसींचा समावेश आहे.
युक्रेनमध्ये पूर्वीसुद्धा या सर्व लसी देण्याचे प्रमाण निर्धारित मानकापेक्षा कमीच होते.
युकेमधील 37 वर्षीय एका
युकेमधील 37 वर्षीय एका पुरुषाला कोविडचा उपचार म्हणून याच आजाराची लस दोनदा देण्यात आली. त्याचा योग्य परिणाम दिसला आहे. हा रुग्ण कोविड झाल्याचे सिद्ध झाल्यानंतर सलग सात महिने संबंधित चाचणी पॉझिटिव्ह दाखवत होता. तसेच त्याच्यात या आजाराची लक्षणेही लाटेप्रमाणे अधूनमधून दिसत होती.
या रुग्णाला एक दुर्मिळ जनुकीय आजार झालेला असल्याने त्याची रोगप्रतिकारक शक्ती दुबळी झालेली आहे. या उपचाराच्या प्राथमिक यशानंतर आता वैज्ञानिक या विषयाचा अधिक अभ्यास करत आहेत. प्रतिबंधासाठी काढलेली लस उपचार म्हणून सुद्धा उपयोगी येऊ शकते हे या उदाहरणातून दिसून आले.
https://link.springer.com/article/10.1007/s10875-021-01158-5
जगभरात ओमिक्रॉनच्या नव्या
जगभरात ओमिक्रॉनच्या नव्या व्हेरिएंटचा धुमाकूळ; रुग्णसंख्येत प्रचंड वाढ!
https://maharashtratimes.com/india-news/the-number-of-patients-infected-...
Pages