कोविड १९ : आव्हान Omicron चे

Submitted by कुमार१ on 2 December, 2021 - 09:07

शेवटचे अद्यतन : ३१/१२/२०२१
मागचा धागा इथे : https://www.maayboli.com/node/78680?page=19
……..
चालू महासाथीचा मागचा धागा काढताना मनोमन अशी इच्छा व्यक्त केली होती की, तो शेवटचा धागा ठरावा आणि लवकरच आजार पूर्ण गाडला जावा. दुर्दैवाने तसे काही होण्याची चिन्हे नाहीत.
गेल्या काही आठवड्यांमध्ये दक्षिण आफ्रिकेतून Omicron नावाच्या करोना विषाणूच्या नव्या उपप्रकाराने तोंड वर काढले आहे. त्याचे नाव ग्रीक वर्णमालेच्या पंधराव्या अक्षरानुसार दिलेले आहे.
( Omicron च्या उच्चाराबाबत भाषातज्ञांमध्ये मध्ये मतभेद आहेत. खुद्द ऑक्सफर्ड शब्दकोशानुसार सुद्धा त्याचे चार उच्चार असून त्यावर एकमत नाही ! इंग्लिश उच्चारानुसार बऱ्याच ठिकाणी "OH-my-kraan असे दिलेले दिसते).

हळूहळू Omicron चा जगभर प्रसार होत आहे. सुरुवातीस दक्षिण आफ्रिकेत आढळलेल्या काही रुग्णांच्याबाबत डॉक्टरांची निरीक्षणे अशी होती :
१. ज्या लसवंतांना नवा संसर्ग झाला आहे त्यांची लक्षणे सौम्य आहेत. अशांवर घरीच उपचार चालू असून परिस्थिती नियंत्रणात आहे.
२. असे अधिकतर रुग्ण तरुण वयातील आहेत
३. जे बाधित रुग्णालयात दाखल झाले आहेत त्यापैकी 90 टक्के बिगर लसवाले आहेत.

अलीकडील बातमीनुसार त्यांच्याकडील रुग्णसंख्येचा आलेख आता कळसबिंदू पार होऊन होऊन खाली खाली येत आहे. एकंदरीत विचार करता हा आजार सौम्य होण्याकडे झुकत आहे.
विषाणूचा Omicron व आधीचा डेल्टा प्रकार यांची पाश्चिमात्य देशांतील एकंदरीत तुलना खालील चित्रातून चांगली समजेल.

omic and delta.jpg

सार्स 2 च्या भावी उत्क्रांतीबद्दल वैज्ञानिकांचे अंदाज :
१. एक तर तो सामान्य सर्दीच्या विषाणूप्रमाणे सौम्य होईल किंवा इन्फ्लूएंजाच्या विषाणू प्रमाणे घातकही राहील.
२. विषाणूच्या उत्क्रांतीगणिक तो सौम्य होतो ही एक समजूत आहे. पण काहींच्या मते ते मिथक आहे. वास्तव अधिक गुंतागुंतीचे असते.
३. या विषाणूचे प्राणिजन्य साठे वाढतेच आहेत. मिंक व हरणाच्या एका जातीत त्याचे सातत्यपूर्ण वास्तव्य आणि भ्रमण चालू आहे. त्यातून नवी उत्परिवर्तने होण्याचा संभव राहतो. ही आपल्या दृष्टीने डोकेदुखी ठरते.
नव्या घडामोडींची भर जशी माहिती मिळेल तशी घालत राहू.

* जशी Omi बाधितांची संख्या वाढते आहे तशी काही उपयुक्त माहिती मिळते आहे. यामुळे बाधित असलेल्या काही रुग्णांमध्ये खालील वैशिष्ट्यपूर्ण लक्षणे दिसून आली आहेत:

* मळमळ
* भूक खूप मंदावणे
* रात्री प्रचंड घाम येणे, अगदी शरीर निथळून निघेल इतका.
या रुग्णांमध्ये वास व चव संवेदनेवर परिणाम झालेला नव्हता.

उपचारांच्या आघाडीवर अद्यापही रामबाण असे विषाणूविरोधी औषध मिळालेले नाही. संशोधन चालू आहे.
१. Molnupiravir या तोंडातून घ्यायच्या औषधाला मध्यंतरी इंग्लंडने आणि नुकतीच अमेरिकी औषध प्रशासनानेही आपात्कालीन वापराची मान्यता दिली आहे. वय 18 वर्षावरील लोकांसाठी ते वापरायचे आहे. पाठोपाठ भारतीय औषध प्रशासनानेही याला आपात्कालीन वापराची मान्यता दिली आहे.
गरोदर स्त्रियांसाठी त्याचा वापर अत्यंत काळजीपूर्वक करण्यात यावा. त्याचे संभाव्य दुष्परिणाम जुलाब, मळमळ व चक्कर येणे असे आहेत.

2. Paxlovid या नव्या गोळीस आपत्कालीन मान्यता मिळाली आहे. हे २ औषधांचे मिश्रण असून त्या बद्दल अजून काही माहिती:
हे औषध फक्त खालील रुग्णांसाठी वापरायचे आहे :
१. rt-pcr चाचणी होकारात्मक आलेली.
२. ज्यांचा आजार गंभीर होण्याचा धोका आहे त्यांनी.
रोग निदान झाल्यावर हे औषध लगेच चालू करायचे आहे.
संभाव्य दुष्परिणाम :
चव-संवेदना कमी होणे, जुलाब, रक्‍तदाबवाढ आणि स्नायूदुखी.

नव्या लसी
भारतात नुकतीच दोन नव्या लसीना आपात्कालीन वापराची मान्यता मिळाली आहे. त्या लसी याप्रमाणे :

१. Corbevax : ही प्रोटीन सबयुनिट प्रकारातील स्वदेशी निर्माण झालेली आहे.
२. Covovax : यात नॅनोकणांचा वापर केलेला आहे.

आता भारतात सध्या एकूण आठ लसीना वापरासाठी मान्यता मिळालेली आहे.

नेहमीचे प्रतिबंधात्मक उपाय म्हणजेच त्रिसूत्री अजून बराच काळ चालू ठेवणे हे आपले एक महत्त्वाचे लढण्याचे अस्त्र असेल.
एकंदरीत जगभरात हा संसर्ग वाढत असल्यामुळे विविध प्रशासनांनी लोकांवर काही प्रमाणात संचार निर्बंध लावले आहेत. नाताळच्या दिवशी जगभरात मिळून ६००० विमान उड्डाणे रद्द केली गेली.
…….
लसीकरण : नवे संशोधन
डीएनए प्रकारची लस भारतात लवकरच उपलब्ध होईल असे अलीकडील बातमीवरून दिसते. त्या प्रकाराची शास्त्रीय माहिती :
१. सध्या जगभरात या प्रकारातील बारा लसी प्रयोगाधीन आहेत. त्यातली पहिली ( ZyCoV-D) भारतात उपलब्ध होईल.
२. ही लस सुईविरहित उपकरणाने दाबतंत्राचा वापर करून त्वचेखाली दिली जाते. हे पारंपरिक इंजेक्शन नसल्यामुळे संबंधित व्यक्तीस वेदना खूप कमी होते.
३. भारतातील लस तिच्या प्रयोगादरम्यान २८,००० लोकांवर वापरण्यात आली. त्यादरम्यान विषाणूचा डेल्टा प्रकार जोरात होता. त्या वातावरणात लसीने 67% परिणामकारकता दाखवली आहे.
४. तिचे उत्पादन तंत्रज्ञान सोपे आहे.
५. आरएनए लसींच्यापेक्षा ही लस अधिक टिकाऊ स्वरूपाची आहे.
६. मात्र तिचा पुरेसा परिणाम दिसून येण्यासाठी किमान तीन डोस द्यावे लागतील असे दिसते.
...................................................

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कायमचं नाही बंद करायचंय सोहा. लाट ओसरेपर्यंत संयम बाळगावा एवढीच अपेक्षा आहे. आपल्या एका चुकीच्या निर्णयामुळे कुणाच्या (ज्येष्ठ नागरिक, आजाराने ग्रस्त माणसं) जिवाला धोका होईल अशी शक्यता का निर्माण करायची? अगदी लग्नंही पार पाडावीत, पण लोकांना ऑनलाइन सहभागी होऊ द्या.
जे लोक समारंभ साजरे करतायत, त्यांचा उद्देश परोपकारी गंपूसारखा लोकांना रोजगार मिळावा असा उदात्त नसतो. स्वतःची हौस असते म्हणून करत असतात.
ज्या संस्था हातावर पोट असलेल्या माणसांना मदत करतात, त्यांना आपण आपल्या परीने मदत करू शकतो. दया म्हटलं की तुच्छता दाखवल्यासारखं वाटतं, पण मदत म्हणू शकतो.

काल आमच्या इथल्या एका व्यापाऱ्याने १००० च्या आसपास लोक बोलावून लग्नसोहळा केला.
तो बिनबोभाट पार पडावा यासाठी त्याने पोलिसांना मुह माँगी रक्कम दिली.
या बेट्याने अनेकांच्या गरजा भागवल्या असं म्हणायचं

Putham Pudhu Kaalai हा ५ लघुपटांचा मिळून केलेला तामिळ चित्रपट आहे (प्राईमवर).>>>>> पाहिला हा सिनेमा.
मला त्यातली पती पत्नी अबोला धरून एकमेकांशी खाणाखुणा, फळ्यावर लिहून संभाषण करतात ती कथा आवडली. सगळ्या कथा हलक्या फुलक्या आहेत.

मृणाली
होय, मी एक एक कथा सावकाश बघत आहे.

शक्य तेवढी काळजी घेवुन नेहमीचे रुटीन सुरु करणे गरजेचे आहे >>> खरंय.
मानसिक भावनिक गरजा , डी जीवनसत्त्व, हसणं खेळणं - मुलांच्या वाढीसाठी गरजेचे वातावरण.. हे मुद्दे आणि कोरॉना chyaa आताच्या variant chaa परिणाम ह्याचा तुलनात्मक विचार करून निर्णय घ्यावा आता असे वाटते.

आतापर्यंत चां बहुतेक काळ घ रातच काढलाय.. आता पोरां कडे बघून फारच छळ वाटतोय त्यांचा .
ते पण कंटाळले आहेत घरात बसून.

लाट ओसरू दे हे मान्यच आहे. पण ओवरोल मूव ऑन व्हायला हवे असे वाटतेय..

5 दिवसात प्रसार थांबत नाही हे अगदीच मान्य पण मग 7 दिवसात कसा थांबतो?
जवळचे काही लोकं आमचे 7 दिवस झाले, आमचं quarentine संपलं असं म्हणत सर्दी खोकल्या सकट इकडे तिकडे हिंडत बसले आहेत.
असले बंडल रुल्स का काढतं सरकार?
नेमकं किती दिवस आयसोलेशन बरोबर आहे?

Submitted by रीया on 22 January, 2022 - 09:54

मला वाटते बरं वाटून परत टेस्ट करून ती negative येई पर्यंत.
पुढील चर्चा इथे करू या.

Submitted by मानव पृथ्वीकर on 22 January, 2022 - 10:03

-------
यावर कृपया आपले मत सांगा.

मानव
नेमकं किती दिवस आयसोलेशन बरोबर आहे?

यातील विज्ञान आधी पाहू. या विषाणूचा बहुतांश रोगप्रसार एखाद्या व्यक्तीस लक्षणे येण्यापूर्वी दोन दिवस आणि त्यानंतर पुढे तीन दिवसांपर्यंत होतो. म्हणून सध्याच्या परिस्थितीत विलगीकरण कालावधी पाच दिवसांवर रोखण्यात आला आहे.
( संदर्भ: सीडीसी, अमेरिका)

घरी विलगीकरण केलेल्यासाठी महाराष्ट्र कृती दलाच्या शिफारसी अशा आहेत :

१. rt-pcr चाचणी पॉझिटिव्ह आल्याच्या दिवसापासून एकूण सात दिवस विलगीकरण. त्यातले शेवटचे तीन सलग दिवस ताप अजिबात नको.
२. विलगीकरण संपल्यानंतर मास्क वापरत राहणे
३. पुन्हा rt-pcr चाचणीची गरज नाही.

धन्यवाद डॉक्टर कुमार, हे डेल्टा / ओमायक्रॉन कुठल्याही प्रकाराला लागू आहे का?

अजून एक प्रश्न
माझ्या बायकोच्या टेस्ट रिपोर्ट मध्ये N, ORF1ab आणि S हे तिन्ही जीन्स सँडलेत। तर S जीन असल्याने ओमायक्रॉन नाही असे म्हणता येईल का?

मानव,
डेल्टा/ओमि. >>>
https://www.mohfw.gov.in/pdf/RevisedHomeIsolationGuidelines05012022.pdf
इथे तसा वेगळा उल्लेख नाही. त्यामुळे दोन्हीला तेच नियम दिसताहेत.
......
जीन S -ओमि ? >>> यात माझा अभ्यास नाही. बघावे लागेल.

इंग्लंडने मूलभूत त्रिसूत्रीचे निर्बंध हटवले.
आता मुखपट्ट्यांची गरज नाही.
कार्यालयात जाऊन काम करायचे आहे वगैरे....

https://www.hindustantimes.com/world-news/uk-lifts-covid-19-restrictions...

भीती हा माणसाचा सर्वात मोठा शत्रू आहे..
साथीचे रोग येतात तेव्हा भीती लं आपल्यावर हवी होवून देवू नका.
त्याचा फायदा घेणारे दोन दोन इंचावर आहेत.
काळजी घ्या..काही लक्षण दिसली तरी संयम खूप महत्वाचा..
भीती नी बुद्धी गहाण ठेवणे आणि सावध राहणे ह्या मध्ये खूप अंतर आहे.
मला मध्ये अचानक सकाळी सकाळी थंडी वाजून आली .
परत दुसऱ्या वेळी थंडी वाजून आली तर च dr कडे जायचे ते पण फॅमिली डॉक्टर कडे
असेच पक्क मत .परत काही तसे घडले नाही
आणि मी पण भीती नी dr गेलो नाही.
काही झाले नाही पुढे.
एक shink आली थोडा ताप आला,अस्वस्थ वाटायला लागले की covid च झाला असे समजायची बिलकुल गरज नाही
समजा झाला तरी उपचार करू शकतो.
संयम हा असलाच पाहिजे.

सध्याचे हे नियम जे शाळा व ऑफिस मधे पाळायला सांगितले आहेत.
Screenshot_20220122-093111_Yahoo Mail.jpg
लक्षण नसतील तर टेस्टींग नाही व असिम्प्टोमेटिक असाल तर तुम्ही पसरवणार हे नक्की, हे पाच दिवस पुरेसे नाही . फार गोंधळ आहे इथे !!! मास्क पर्यायी आहेत सगळीकडे (डॉक्टर चे ऑफिस सोडून)

@च्रप्स, आम्ही पण मागवलेत.

धन्यवाद.
विविध देशांमधील माहिती समजते आहे.
ज्यांचे कुटुंबीय आजारी किंवा पॉझिटिव आहेत त्या सर्वांना लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा !

सरकार ने 5 सांगितले तरी 10 दिवस आयसोलेशन केलेले बरे(असं व्यक्तिगत मत)
पूर्वी च्या कोव्हीड मध्ये 10 किंवा 12 व्या दिवशी आपण दुसऱ्यासाठी इन्फेक्षीयस होणे जवळजवळ 0 होते असं वाचलं होतं who वर.

सरकार ने 5 सांगितले तरी 10 दिवस आयसोलेशन केलेले बरे(असं व्यक्तिगत मत)>>>+१ अनु...
मी तर याला सामाजिक/नैतिक जबाबदारी /तारतम्याने वागणे समजते.

डॉ. कुमार,
मुंबईतील एका ICSE बोर्डाच्या शाळेच्या मुख्याध्यापिकेने आपल्या शिक्षकांसाठी एक फर्मान काढले आहे. RT-PCR चाचणीचा निकाल सकारात्मक (positive) आला पण त्यातील CT Value 20 पेक्षा जास्त असेल तर त्या शिक्षकांनी घरी न राहता शाळेतच यायचे (कारण CT value 20 पेक्षा जास्त असेल तर विषाणू संसर्गक्षम नसतो म्हणे). जर CT Value 20 पेक्षा कमी असेल तरच शिक्षकांनी घरी थांबून WFH करायचे. तर खरेच असे असते का???

विमु
दीड वर्षांपूर्वीचा माझा हा प्रतिसाद पुन्हा डकवत आहे :

जेव्हा RT-PCR निष्कर्ष + असतो तेव्हा काही प्रयोगशाळा रिपोर्टमध्ये Ct चा उल्लेख करतात.
Ct = threshold cycle value.

हा आकडा जेवढा कमी, तेवढे विषाणूच्या जनुकाचे प्रमाण अधिक असे ते गणित आहे.
पण, त्याला महत्व देऊ नये कारण...

१. हा आकडा चाचणीसाठी वापरल्या गेलेल्या किटनुसार बदलतो. त्यामुळे अमुक एक आकडा निदानात उपयुक्त असे म्हणता येत नाही.
२. हे गणित करताना त्यात काही अंगभूत त्रुटी आहेत.

३. या प्रकाराचे प्रमाणीकरण झालेले नाही.
४. या संदर्भात जी काही ढकलपत्रे फिरताहेत त्यांकडे सरळ दुर्लक्ष करा. चाचणी +/- इतकी माहिती पुरे आहे.

Submitted by कुमार१ on 26 September, 2020 - 10:34

Submitted by कुमार१ on 28 January, 2022 - 14:23
पण मग असे असेल तर केवळ तुमची CT Value 20 पेक्षा जास्त आहे म्हणून तुम्ही positive असलात तरीही शाळेत या असे म्हणणे कितपत योग्य आहे? अशाने त्या बाई लहान मुलांच्या आरोग्याशी खेळतच आहेत ! मुळात सरकारने असे काहीही म्हटले आहे का? जर सरकारने असे काहीही निर्देश दिले नसतील तर या मुख्याध्यापिका बाई कोणत्या आधारावर असे निर्णय घेत आहेत ? आणि त्यांना लहान मुलांच्या आरोग्याशी खेळण्याचा अधिकार कुणी दिला???

सी टी व्हॅल्यू वर आधारित विलगीकरण हवे का नको असे काही ठरल्याचे माझ्यातरी वाचनात नाही.
गेल्या काही महिन्यात अनेक लोक अनेक प्रकारचे फर्मान काढत आहेत.
जर त्या मुख्याध्यापिका बाईंनी कोणा वैद्यकीय तज्ञांचा सल्ला घेतला असेल तर ते त्यांनी सांगायला पाहिजे. समजा त्या डॉ. असे मत असेल तर त्यासाठी त्यांनी योग्य तो संदर्भ दिला पाहिजे

प्रत्येक प्रयोगशाळेची आपापल्या चाचणी संचानुसार ठराविक सिटी प्रमाणित व्हॅल्यू असते. आता शाळेत येणारे सर्व जण काही एकाच प्रयोगशाळेतून चाचणी करून घेणार नाहीत हे उघड आहे.

सारांश : Ct प्रकाराचे प्रमाणीकरण नसल्याने असा सरधोपट निर्णय घ्यायला नको आहे.

दक्षिण आफ्रिकेत एका महिन्यात covid चे रोज चे बाधित खूप कमी झाले.

ह्या वर कोणतीच मीडिया,who का बोलत नाही.
तिथे लसीकरण पण खूप कमी झाले आहे.
ह्याची कारण कुमार sir नी सांगावीत.

Neocov नावाचा नवीन variant आलाय. 1 इन 3 डाय. खूपच खतरनाक दिसतोय. डॉक्टर काय मत आहे तुमचं?

चीन वर जगा नी बहिष्कार टाकावा
सर्व प्रवासी वाहतूक,सामान वाहतूक बंद करावी.चीन पृथ्वी वर चा देश च नाही असे त्याला वाळीत takav.कोणताच नवीन. व्हायरस येणार नाही.

>Neocov नावाचा नवीन variant आलाय
>>>
सध्या असे झाले आहे की, कुठलाही शोधनिबंध अर्ध्याकच्च्या स्वरूपात जालावर प्रसिद्ध होतो. त्यावर तज्ञांची चर्चा होणे ही पुढची महत्त्वाची पायरी असते. त्यानंतरच तो मान्यताप्राप्त होऊ शकतो. परंतु, असे व्हायच्या आधीच माध्यमे जालावरून ती अर्धीकच्ची माहिती उचलतात आणि बोंबाबोंब सुरू करतात.

तूर्त वरील सर्व प्रक्रिया व्हायची वाट पाहूया.
बस, इतकेच.

Pages