Submitted by ऋन्मेऽऽष on 18 October, 2021 - 14:57
आयपीएल संपली आणि वर्ल्डकप आला वर्ल्डकप.. चला माहौल बनवूया
दुनिया हिलाs देंगे हम, व्हिसलपोडू आणि कोरबो लोरबो जितबो रे.. सारे एक होऊया
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
भाऊ मायबोलवरील क्रिकेटची
भाऊ मायबोलवरील क्रिकेटची खोलपर्यंत जाण असलेले एक संतुलित व्यक्तिमत्त्व आहेत. माझ्या आवडत्यांपैकी ते एक आहेत.
मीं दिलगिरी व्यक्त करून तें
मीं दिलगिरी व्यक्त करून तें मान्य करतो. >> दिलगिरी व्यक्त करायची खरच गरज नाही, तुम्ही "बहुतेक" असा उल्लेख केला म्हणून मला आश्चर्य वाटले. असो.
बांग्लादेश इंटरेस्टींग करतेय क्वालीफिकेशन्स असे दिसतेय एकूण.
*कोहली नि रोहित दोघेही ज्या
*कोहली नि रोहित दोघेही ज्या तर्हेने खेळतात ती पद्धत टी २० साठी कालबाह्य होत चालली आहे असे माझे मत आहे* - कांहीं अनुभवी खेळाडूंचा खेळ खरा कस लागणार्या मोठया स्पर्धेत बहरतो, असंही आहेच. रोहितने विश्वचषकात दिमाखात केलेली 5 शतकं हें बोलकं उदाहरणं आहेच. मीं तर हया दोघांकडून येत्या विश्वचषकात निर्णायक ठरावी अशा भरीव कामगिरीची अपेक्षा ठेवून आहे !
लेफ्टी असण्याचा फायदा मिळतो
लेफ्टी असण्याचा फायदा मिळतो किशन नि पंत दोघेहीअ सतील तर पहिल्या पाचामधे. जर विकेट्स स्लो असतील तर लेल्फ्टी राईटी काँबो स्पिनर्स समोरे किती उपयोगी पडेल ह्याचा विचार कर
ते तर पांड्यावरून विषय निघालेला..
>>>>>
माझ्या संघात पंत नाही असे शक्य होईल का
माझी जी पहिलीच पोस्ट आहे त्यातील जो माझा संघ दिला आहे ती पोस्ट व्हॉटसपवर टाकताना मी ईशान, पंत आणि जडेजा या तिघांना स्टार लावून बोल्ड केलेले. ज्याचा अर्थ ठराविक अंतराने पेरलेले लेफ्टी फलंदाज होता. राहुल, ईशान, कोहली, पंत, पांड्या, जडेजा असे आळीपाळीने राईट लेफ्ट आहेत आपल्याकडे..
कोहली नि रोहित दोघेही ज्या
कोहली नि रोहित दोघेही ज्या तर्हेने खेळतात ती पद्धत टी २० साठी कालबाह्य होत चालली आहे असे माझे मत आहे
>>>>>
बरेपैकी सहमत आहे याच्याशी. कालबाह्य म्हणण्यापेक्षा या ईनिंग बिल्ड छापाचे प्लेअर एकाच संघात तुम्हाला जास्त नकोत. हे मागे मी सुद्धा धवनच्या समावेशाबद्दल म्हटलेले. शर्मा, कोहली असताना त्यात पुन्हा धवन हा २०-२० ला आपण ठेवू शकत नाही.
२०-२० हा असा फॉर्मेट आहे की ईथे गोलंदाजांना मदत मिळू लागली तरी त्यांना नेटाने तोंड देणार्या तंत्रशुद्ध अनुभवी फलंदाजापेक्षा इनोवेटीव शॉट खेळून त्यांची लाईन बिघडवणारा जास्त फायदेशीर ठरतो.
बांग्लादेशचा रनरेट ओमान
बांग्लादेशचा रनरेट ओमान स्कॉटलंडच्या जोडीला आला
आता त्यांना फक्त जिंकणे पुरावे. ते सुद्धा पप्पा नू गिनीशी
रोहितने विश्वचषकात दिमाखात
रोहितने विश्वचषकात दिमाखात केलेली 5 शतकं हें बोलकं उदाहरणं आहेच >> दोघे क्लच प्लेयर्स आहेत भाऊ ह्याबद्दल शंका नाही फक्त फॉर्मॅट वेगळा आहे हा मह्त्वाचा फरक आहे. जम बसायला घेतलेले ५-६ रिकामे बॉल्स सुद्धा जर ते कॅश इन झाले नाहीत तर महागात पडणारा फॉर्मॅट आहे. पिच नि समोरचा बॉलर न बघता पहिल्या बॉल पासून आंधळेपणाने उचलून मारू शकतील असे पॉवर हिटर ( रसेल, हेटमायर, बटलर, मॅक्स्वेल) असे आपल्याकडे इशान नि पांड्या वगळता कोणी नाही (पंत कुठे आहे ते कळत नाही) त्यामूळे ऋन्मेऽऽष म्हणतोय तसे इनिग बिल्ड करणारे किती प्लेयर आपण संघात एका वेळी अॅफोर्ड करू शकतो हा मुद्दा येतो. पिच स्लगिश असतील तर प्रश्नच मिटला.
३३ वर्षांवरील खेळाडू टी-२०
३३ वर्षांवरील खेळाडू टी-२० मधे नकोतच असं मला वाटतं...
इथे नव्या रक्ताला वाव द्यायची चांगली संधी आहे. आयपीएल, ए टूर्स सोबतच जर डिझर्विंग नवोदितांना इंडिया ब्लू घालून खेळायला उतरवता आलं तर ते त्यांच्या ओव्हरॉल कॉन्फिडन्स डेव्हलपमेंटच्या दृष्टीनीही उपयुक्त ठरेल.
या न्यायानी आत्ता गायकवाड, त्रिपाठी, अय्यर, पटेल, आवेष यांना संधी देता आली असती.
*...असे आपल्याकडे इशान नि
*...असे आपल्याकडे इशान नि पांड्या वगळता कोणी नाही* -
आपण विश्वचषकाच्या संदर्भात चर्चा करत आहोत हा संघनिवडीत खूप महत्वाचा मुद्दा आहे असं मला वाटतं. तिथे प्रत्येक फलंदाजाचा खूपच सखोल अभ्यास करून त्याच्या विरूद्धचे डांवपेच ठरवले जातात व गोलंदाजही आयपीएल सारख्या स्पर्धेपेक्षा कितीतरी अधिक ईर्षैने गेलंदाजी करत असतात. त्यामुळे, ' बॉलर न बघता पहिल्या बॉल पासून आंधळेपणाने उचलून मारू शकतील असे पॉवर हिटर ( रसेल, हेटमायर,)' असे फलंदाज तिथे ' क्लिक ' होण्याची शक्यता इतर स्पर्धांपेक्षा कमी असणंच स्वाभाविक. शिवाय, मोठ्या स्पर्धांत अनेक अनोळखी गेलंदाजां विरूद्ध वेगवेगळ्या खेळपट्टयांवर खेळताना अशा ' पाॅवर हिटर'नाही अडचण तर होणारच. आत्ताच्या आयपीएलचया अनुभवावरून विश्वचषकाचे बरेच, निदान कांहीं,सामनेही ' लो स्कोअरींग' .होण्याची शक्यता असल्याने ' पाॅवर हिटर्स'ची उपयुक्तता कमी असण्याची शक्यता अधिक. उलटपक्षीं, आक्रमक फटकेबाजी करूं शकणारे व अनुभवामुळे डांवपेच ओळखून तात्काळ आपला खेळ ॲडजस्टं करून उंचावूं शकणारे फलंदाज मोठ्या स्पर्धांत अधिक उपयुक्त असावेत. रोहित व कोहली ( विशेषतः, रोहित) या दुसर्या वर्गातले फलंदाज आहेत व त्यांची उपयुक्तता मोठ्या टी20 स्पर्धेतही खूपच महत्वाची व निर्णायक ठरण्याची शक्यता अधिक, असं मला वाटतं.
आजच्या कांगारुंविरुद्धच्या
आजच्या कांगारुंविरुद्धच्या सराव सामन्यात कोहलीने चक्क गोलंदाजी केली!!
*कोहलीने चक्क गोलंदाजी केली!!
*कोहलीने चक्क गोलंदाजी केली!!* -
कर्णधार, फलंदाज म्हणून इथे त्याच्यावर काट मारला जातोय हें कळल्यावर तो बिचारा संघात यायला असं कांहींतरी करून बघणारच ना !!
कर्णधार, फलंदाज म्हणून इथे
कर्णधार, फलंदाज म्हणून इथे त्याच्यावर काट मारला जातोय हें कळल्यावर तो बिचारा संघात यायला असं कांहींतरी करून बघणारच ना !! Wink>>>

नक्कीच मायबोलीच्या चर्चा कानावर गेल्या असणार त्याच्या!!
आजच्या सामन्याचा कर्णधार रोश आहे! त्याने गोलंदाजी करायला लावली!
हार्दिक पांड्याचा बॅकअप
हार्दिक पांड्याचा बॅकअप

बाकीचे 1D प्लेयर नाही म्हंटले असतील बॉलिंग टाकायला मग काय Captain leading from the front
आश्विनची आजची पॉवरप्ले बॉलिंग
आश्विनची आजची पॉवरप्ले बॉलिंग बघून प्रश्न वाढले असतील पुन्हा.. त्यात राहुल चहरनेही चांगली टाकली आणि चर्क्रवर्ती मात्र शेवटी आणला गेला त्याला फटके पडले.. ईंटरेस्टींग झालेय
शर्मा - राहुल २०-२० सलामी
शर्मा - राहुल २०-२० सलामी भागीदारीचे स्टॅट्स
१३ सामने
५८६ धावा
४५.१ सरासरी
१५७ स्ट्राईकरेट
या रेकॉर्डला तुम्ही नजरेआड करू शकत नाही
आजच्या सामन्याचा कर्णधार रोश
आजच्या सामन्याचा कर्णधार रोश आहे! त्याने गोलंदाजी करायला लावली! >> पहिल्या इनिंग मधे कोहली कर्णाधार होता . बॉलिंग चा प्रयोग , विशेषत: पांद्याच्या बॉलिंगबद्दल अनिशिचित्तता असल्यामूळे सहावा बॉलर ह्या अॅम्गलने प्रयत्न करावा लागणार हे काल शास्त्री नि कोहली दोघांनीही सांगितले होते.
कर्णधार, फलंदाज म्हणून इथे त्याच्यावर काट मारला जातोय हें कळल्यावर तो बिचारा संघात यायला असं कांहींतरी करून बघणारच ना !! >>
खेळाडू पण काट मारली जाते असे म्हणून शकता भाऊ.
त्यांची उपयुक्तता मोठ्या टी20 स्पर्धेतही खूपच महत्वाची व निर्णायक ठरण्याची शक्यता अधिक, असं मला वाटतं. >> फेयर पॉईंट भाऊ. मी क्लच प्लेयर हा उल्लेख त्यासाठीच केला होता. आजच्या मॅचचे उदाहरण बघा. एक अँकर नि राहुल, स्काय हे हीटर ह्या भुमीकेतून खेळले. समजा राहुल लवकर बाद होता तर राहुल नि कोहली (असता तर) ह्या मधल्या एकाला गेट-गो पॉवर हिटींग करणे भाग पडले असते.
आपल्या ४ मॅचेस दुबई मधे आहेत. जिथे पिचेस एका बाजूला असल्यामूळे एका बाजूला सीमारेषा जवळ येते. लेफ्ती राईटी काँबो नि स्पिनर ची बॉल वळवण्याची दिशा मह्त्वाची ठरणार.
*खेळाडू पण काट मारली जाते असे
*खेळाडू पण काट मारली जाते असे म्हणून शकता भाऊ.* - वाः, मग धाडकन त्याची आंकडेवारी, अप्रतिम क्षेत्र रक्षण , फिटनेस, डेडिकेशन इ.इ. माझ्या थोबाडावर फेकलं जाईल त्याचं काय ! ( शिवाय, प्रत्यक्ष बोकलत यांनी मला ' क्रिकेटची खोलपर्यंत जाण असलेले एक संतुलित व्यक्तिमत्त्व ' म्हटलयामुळे माझ्यावर आतां फार जपून काॅमेंट करायची नको ती मोठ्ठी जबाबदारी येवून पडलीय, हेंही आहेच !
)
*खेळाडू पण काट मारली जाते असे
*
"कर्णधार, फलंदाज म्हणून इथे
"कर्णधार, फलंदाज म्हणून इथे त्याच्यावर काट मारला जातोय हें कळल्यावर तो बिचारा संघात यायला असं कांहींतरी करून बघणारच ना !! Wink" - भाऊंचा आयडी हॅक झाला की काय?
तसंही गेले काही दिवस त्यांच्या प्रतिक्रिया पाहून त्यांच्यावर 'कुणाची तरी' सावली पडतेय अशी शंका यायला लागलीय मला. 
मग धाडकन त्याची आंकडेवारी,
मग धाडकन त्याची आंकडेवारी, अप्रतिम क्षेत्र रक्षण , फिटनेस, डेडिकेशन इ.इ. माझ्या थोबाडावर फेकलं जाईल त्याचं काय >> आणि मग तुम्हीकाय उत्तर द्याल जपून ?
भाऊंचा आयडी हॅक झाला की काय? >>
अफगानिस्तान ची बॅटींग आज चांगलीच बहरली. विंडीज साठी बॉलिंङ चिंतेची बाब होणार असे दिसतेय.
*भाऊंचा आयडी हॅक झाला की काय?
*भाऊंचा आयडी हॅक झाला की काय?* - 'थिल्लरपणा ' हीच माझी आयडेंटीटी आहे व ती कुणीही हॅक करूं शकत नाहीं !
पाकिस्तान सुद्धा गेल्या दोन
पाकिस्तान सुद्धा गेल्या दोन मॅचेस ताकदीनं खेळले आहेत. तगडी टीम आहे ह्यावेळी त्यांची. रविवारी मजा येईल मॅच बघायला.
पाकिस्तान सुद्धा गेल्या दोन
पाकिस्तान सुद्धा गेल्या दोन मॅचेस ताकदीनं खेळले आहेत. तगडी टीम आहे ह्यावेळी त्यांची. रविवारी मजा येईल मॅच बघायला.
>>>>>
अगदी हेच डोक्यात आले त्यांच्या आजच्या सामन्याचा स्कोअर फॉलो करताना.
गेले काही वर्षे पाकिस्तान क्रिकेट फारसे फॉलो केले नाहीये. त्यामुळे एखाद्या नवख्या संघाशीच खेळतोय असे मला बघताना वाटेल. हे बहुतेकांबाबत असेल असे वाटते.
तरी नशीबाने आयपीएलमुळे आपल्याला ईथे खेळायचा सराव झालाय. अन्यथा कागदावर पाकिस्तानच सरस असती या ईथे.
काटे की टक्कर आहे यंदा
एकदिवसीयचे ७-० आणि २०-२० चे ५-० असा टोटल १२-० चा अदभुत रेकॉर्ड आहे आपला.
तेराव्या सामन्यांतर कायम राहतो की हा नंबर अनलकी ठरतो हे बघणे रोचक राहील..
पाकिस्तान हारली
पाकिस्तान हारली

हेच लिहायला आलो होतो...
हेच लिहायला आलो होतो...
वॉर्म अप मॅचेसही फिक्स करू लागलेत मेले
जोक्स द अपार्ट
तो वन डर डुसेन की हुसेन भारीच आहे. नुकत्याच्य त्याच्या अश्या चांगल्या खेळी पाहिल्याचे आठवतेय. त्याचे फॉर्मला असणे आफ्रिकेला फायद्याचे. गरज आहे त्या संघाला फलंदाजांच्या फॉर्मची
क्रिकेटच्या टी-20 प्रकारात '
क्रिकेटच्या टी-20 प्रकारात ' फाॅर्म ' हा लहरीपणाचा कळसच गांठतो अशी माझी भावना आहे.. त्यामुळे, प्रत्येक सामना कोण, कधी व कसा फिरवेल हें सांगणं जवळ जवळ अशक्य. ( त्यांतही, फिक्सींगचा किडा डोक्यात वळवळत ठेवला, तर आनंदी आनंदच ! ) म्हणून, क्रिकेटच्या सर्व प्रकारांत टी20 विश्वचषक जिंकणं सर्वात कठीण व त्याविषयीं भाकितं करणं हा तर तोंडघशी पडण्याचा राजमार्गच, असं मला वाटतं. प्रत्येक सामन्याचा स्वतंत्रपणे आनंद लुटावा, हें उत्तम !
चषक जिंकलो तर जल्लोष आहेच. नाही जिंकलो तर कोहली आहेच !!
नाही जिंकलो तर कोहली आहेच !!
नाही जिंकलो तर कोहली आहेच !! Wink>>>
भाऊ, जिंकलो तर धोनी हरलो तर कोहली असे आहे!
*जिंकलो तर धोनी हरलो तर कोहली
*जिंकलो तर धोनी हरलो तर कोहली असे आहे!* -
तसंही चालेल ! कांहीं अगदीं मोजकेच अपवाद वगळतां, मीं बापडा मात्र क्रिकेटमधील जयापजय हा मुख्यतः सांघिक कामगिरीमुळेच असतो हया जुनाट कल्पनेला अजूनही कवटाळून बसलो आहे ! कोण कर्णधार असतांना आपण किती सामने जिंकलो/ हरलो फक्त यावरूनच कर्णधाराचं मूल्यमापन किंवा कर्णधारांची तुलना करणं मला तितकंसं नाहीं रूचत . पण हा झाला माझा वैयक्तिक दृष्टीकोन व त्यावर मतभेद अपेक्षित आहेच आहे.
कोण कर्णधार असतांना आपण किती
कोण कर्णधार असतांना आपण किती सामने जिंकलो/ हरलो फक्त यावरूनच कर्णधाराचं मूल्यमापन किंवा कर्णधारांची तुलना करणं मला तितकंसं नाहीं रूचत >> किती सामने जिंकलो ह्यापेक्षा किती टूर्नामेंट जिंकलो ह्यावर मूल्यमापन होत असते हे उघड आहे.
*किती टूर्नामेंट जिंकलो
*किती टूर्नामेंट जिंकलो ह्यावर मूल्यमापन होत असते हे उघड आहे.* - हो. पण फक्त तोच निकष लावून कर्णधार म्हणून मूल्यमापन करणं योग्य आहे का, याविषयी मीं खरंच साशंक आहे. संघ चांगला असेल तर केवळ कर्णधारामुळे तो हरणं किंवा संघ अगदींच साधारण असूनही केवळ कर्णधारामुळे तो जिंकणं, हें अपवादात्मक आहे, अशी माझी ठाम समजूत आहे. ( अपवादांत मीं अजित वाडेकर व कपिल देव या आपल्या दोन कर्णधारांचा संघ जिंकणयाबाबत समावेश करतो ). हरण्या -जिंकणयात सांघिक कामगिरीला सरसकट कर्णधारापेक्षा दुय्यम स्थान देणं नाही पटत. शिवाय, 'The captain is as good as the team he leads' यातही तथ्य आहेच.
Pages