क्रिकेट - ६

Submitted by Filmy on 17 January, 2021 - 10:05

क्रिकेटवरील पहिले पाच धागे -

http://www.maayboli.com/node/1889

http://www.maayboli.com/node/30450

http://www.maayboli.com/node/51908

https://www.maayboli.com/node/60723

https://www.maayboli.com/node/67443

भारत-ऑस्ट्रेलिया टेस्ट मालिका संपत आली आहे. जुन्या धाग्यावरील प्रतिक्रिया ओसंडून वाहत असल्याने परंपरेनुसार २K हून अधिक प्रतिक्रिया असल्याने हा नवा धागा. खेळातला रस निघून जातोय असे वाटत असतानाच नवी पिढी वा जनता असा खेळ करते की गोडी पुन्हा क्रिएट होते. आणि म्हणून हा प्रपंच.

Group content visibility: 
Use group defaults

तिघेही चांगले खेळून आऊट झाले आता कोहली बघू काय करतोय. कोहली लवकर आऊट झाला तर सिलेक्टरनी त्याच्या इगोला कुरवाळणे थांबवावे आणि रोहितला कॅप्टनशीप द्यावी.

शर्माने नवीन चेंडू येता पुन्हा तो खेळून काढायची जबाबदारी घ्यायला हवी होती असे वाटते.. शर्मा बाद झाला की एक टेंशनच असते. मग तो दहा मारून बाद होवो वा पन्नास वा सव्वाशे

*नवीन चेंडुनी घात केलाच पुन्हा कोहलीवर दडपण..* खरं तर आज अनपेक्षितपणे पहिल्या सत्रानंतरही आकाश ढगाळलेलं व इंग्लंडच्या अचूक गोलंदाजीला पोषक होतं. अशा परिस्थितीतही आपल्या पोरांनी ( राहूलसहीत) जिद्दीने केलेली फलंदाजी कौतुकास्पद व अभिमानास्पदच. ( साधारण 80 च्या स्कोअरींग रेटने शतक करणारया रोहितने संयम, जिद्द व निश्चयाने 48च्या रेटने शतक केलं, हें विशेष ! )
उद्या हीच जिद्द व जबाबदारीची जाणीव व संयम अनुभवायला मिळेल याची मला खात्री आहे. शुभेच्छा.
( ता.क. - आतां क्षेत्ररक्षण, विशेषत: स्लिपमधील झेल घेणं, इंग्रजानी आमच्या पोरांकडून शिकावं , असं म्हणताना माझ्या सारख्या सिनीयर सिटीझनना काय आनंद होतो , हें इतरांना कळणं कठीण ! )

तीनही फॉरमॅटबद्दल बोलायचे झाले तर इंग्लंडमधील रोहीतचे हे एकूण नववे शतक आहे आणि या प्रकरणात त्याने राहुल द्रविडला मागे टाकले आहे.
राहुलने इंग्लंडमध्ये तीनही फॉरमॅटमध्ये एकूण आठ शतके केली आहेत. यासह, इंग्लंडमध्ये शतक झळकावणाऱ्या परदेशी फलंदाजांच्या यादीत तो विवियन रिचर्ड्सच्या बरोबरीने आला आहे. रिचर्ड्सने इंग्लंडमध्ये एकूण नऊ शतके देखील केली आहेत आणि रोहितने आज त्याची बरोबरी केली आहे.

खेळाच्या तीनही फॉरमॅटमध्ये ईंग्लंडच्या भूमीवर शतक झळकावणारा रोहित दुसरा फलंदाज आहे. त्याच्या आधी केएल राहुल ने हे काम केले आहे. या दोन्ही फलंदाजांनी इंग्लंडच्या भूमीवर कसोटी, टी -20 आणि एकदिवसीय या तीनही फॉरमॅटमध्ये शतके केली आहेत.

ऑल फॉर्मेट प्लेअर आहे शर्मा !
वनडेमध्ये तीन द्विशतके तर २०-२० मध्ये चार शतके.. दोन्ही कोणालाचा न जमलेले पराक्रम. कसोटीतही वेळीच स्थिरावू दिले असते, सलामीवीर म्हणून सेट केले असते तर अजून कैक मोठी शतके बघायला मिळाली असती.

चला एक दिवस पार पडला , आता उद्या पहिले दोन सेशन्स खेळले म्हणजे सामना किमान अनिर्णित राहील असे धरायला हरकत नाही. उद्या पण वेदर चांगलेच आहे हि जमेची बाजू आहे.

रोहित नि पुजारा दोघेही मस्तच नि मुख्य म्हणजे अतिशय जबाबदारीने खेळले आज. कुठेही शिस्तशीर गोलंदाजीचे दडपण येउ न देता एकदम चोख फलंदाजी केली. रोहित ने २०१४ मधे ऑफ च्या बाहेरच्या बॉलला मिनिमल फ्रंट फूट मूव्हमेट ठेवत बॉल अंगापासून दुरून ड्राईव्ह करताना स्लिप मधे बाद होणे नि २०२१ मधे त्याच बॉलला - बाहेर जात असेल तर सोडून देणे, सरळ किंवा आत येत असेल तर अंगाजवळ डोक्याखाली खेळणे. ड्राईव्ह करायचाच झाला तर मोठ्या स्ट्राईड घेणे - हे सतत चिकाटीने करणे - जे नॅचरल टेंडन्सी च्या विरुद्ध आहे - हे कौतुकास्पद आहे. तेव्हढे एक ते पुल चे सांभाळले तर मस्त होईल. त्याच शॉट वर तिसर्‍यांदा बाद होणे हा पॅटर्न नोंद ला गेला असेल. दगा न देणारा असा शॉट होता अजून तरी ....

रूट चा पेशन्स किती कमी आहे - विकेट जात नाही दिसले कि फिल्ड लगेच स्प्रेड होते, बॉडी लँग्वेज बदलते हे जाणवते. हवा नि पिच कडून मदत नसेल तर विकेट फोर्स करू शकतील असा पेस असलेला किंवा एक्स फॅक्टर असलेला आरच नि थोडाफार वुड वगळता कोणीच नाही इंग्लंडकडे. फक्त शिस्ती मधे बॉलिंग टाकणे ह्या एकाच डावपेचावर सगळे चालते. तिसर्‍या सेशन च्या सुरूवातीला ओव्हर्टन अराउंद विकेट जात, स्केवर लेग, डिप फॉर्वर्ड शॉर्ट बोल, फ्लाय स्लीप अशी फिलिंड लावून शॉर्ट पिच बॉलिंग करायचा प्रयत्न करत होता तो एंशी च्या स्पीड ला किती कमी पडतो ते जाणवले.

अवांतर :
१. विलो वर वॉन ने स्टेडियम मधले क्रिकेट म्युझियम दाखवले ते बघितले का ? ब्रॅडमन शेवटची इनिंग खेळायला ज्या दरवाजातून गेला त्याला त्याचे नाव दिले आहे. अकरा इंग्लिश खेळाडूंनी आपापल्या टोप्या लाधून त्या ला सलामी देताना चा फोटो. ट्रंपरचा बॅकलिफ्ट मधे शॉट मारतानाचा फोटो. महान . पहिली बॅट जि हॉकी स्टिकसारखी होती ती ठेवली आहे.

२. पुजाराचे अर्धशतक झाल्यावर जाडेजा एकदम उभा राहून टाळ्या वाजवत होता. कोहली मात्र बसून टाळ्या वाजवत होता. रोहित चे शतक झाल्यावर कोहली एकदम उभा राहून हात डोक्यावर नेत टाळ्या वाजवत होता. तिसर्‍या सेषनला बाहेर येण्याअगोदर कोहली नि रोहित एकमेकआंशी काहीतरी बोलत होते तेंव्हा दोन मित्र बोलताना जसे हावभाव होतात तसे होते नि कोहली एकदम रोहोतच्या खांद्यावर हात टाकून होता. "तसे जे निरीक्षणातून सामान्य जनतेला कळते त्याला पुरावा लागत नाही. " वगैरे वगैरे !

रोहित चे शतक झाल्यावर कोहली एकदम उभा राहून हात डोक्यावर नेत टाळ्या वाजवत होता
>>>

अरे वाह.. याचा तर फोटोही वायरल झालाय..

IMG_20210905_011341.jpg

सुज्ञास जास्त सांगायची गरज पडत नाही म्हणतात
दिखावे पे मत जाओ अपनी अकल लगाओ Happy

आज पाचही भारतीय बॅट्समेन मस्त खेळले. उद्या असाच कंट्रोल ठेवून बॅटींग केली तर ह्याच नाही, पुढच्याही मॅचवर त्याचा पॉझिटीव्ह परिणाम जाणवेल (इंग्लिश बॉलर्स ना शारिरीक आणि मानसिक दमवून).

रोहित मस्तच खेळला. पुजाराही. दोघेही उगाचच आउट झाले. जरा चित्त विचलित झाल्यासारखे.
पण नंतर सर आणि विराट्ने काही पडझड होउ दिली नाही हे बरे झाले. आता आज परत पहिला तास महत्वाचा. १० ओव्हर्स झाल्यावर बॉल स्विंग व्हायला लागतो. ( त्याच्यावरच काहितरी (लॅकर) जात म्हणे). रहाणे जरा दाखवा आता.
जरी लवकर ऑल आउट झाला तरी २५० डिफेंड करू शकू अस वाटतय, पण तेवढ्याला डिक्लेयर करता येणार नाही. हवा अशीच राहिली तर (रहाणार आहे) जवळपास दोन्ही दिवस मिळून दीड तास वाया जाइल असे धरले तरी इंग्लंडला कमितकमी चार शेशन मिळतील अस दिसतय. विकेट जरी फिरत असली तरी अजूनही बॉल ३० ओवर जुना झाल्यावर काही करत नाहीये. अशा परिस्थितीत आपल्याला कमित कमी ३०० चे लीड आवश्यक. . लंच नंतर च्या एक तास पर्यंत तरी खेळायला हव. जमल्यास ३५० च लीड आणि टी पर्यंत बॅटींग.

पण एकंदरीतच आपली लोक नेहमी मॅच इंटरेस्टींग करण्यात पटाइत असतात. खूपच वरचढ होतोय वाटल की दोन तीन विकेट देउन परत ठोके वाढवायचे. त्यांची बोलिंग बंडल असेल तर मग रन आउट पण चालतो. अस काही करू नका रे बाबांनो.

*अस काही करू नका रे बाबांनो.* - मीं ज्याना ' पोरांनो' म्हणतों, त्यांनाच जर तुम्ही ' बाबानो' म्हणत असाल, तर असं काही नाहीं करणार तीं ! खेळातलं कांहीं कळत नसलं, तरी संघाचा मूड ओळखण्यात तज्ञ आहे मीं ! Wink
( ता.क. - टिव्ही कॅमेरा केंव्हां कुणावर केंद्रीत असणार हें आतां प्रेक्षकांनाही तोंडपाठ असतं. खेळाडू तर केंव्हां काय हावभाव करायचे, याची तालीमही करत असावेत ! Wink )
शुभेच्छा.

हा रहाणे फक्त मराठी माणसाचं नाव खराब करायला आणि माती(अजून घाण शब्द वापरायची ईच्छा होते) खायला इंग्लंडला गेलाय. ज्यांना अजूनही वाटतंय रहाणे टीममध्ये असावा त्यांचं आयुष्य किती निरस असेल याची कल्पना न केलेलीच बरी.

शर्माचेच द्विशतक व्हायला हवे होते.
रहाणेला अश्या फॉर्ममध्ये पुन्हा खेळवणे आणि त्याने पुन्हा तोंडघशी पाडणे. त्या नादात जडेजाला पुढे पाठवायचा अट्टाहास आणि त्यालाही फ्लॉप करणे. कोहलीचे स्टार्ट मिळवून मोक्याला धोका देत बाद होणे. सारे ठरलेल्या स्क्रिप्टसारखे पुन्हा घडले.

लीड वगळता २१३-६ होते.. २५०-२७० च्या टारगेटची भिती होती.
पण पंत आणि लॉर्ड शार्दुलच्या अर्धशतकांनी आणि शतकी भागीदारीने गेममध्ये ठेवले. आणि आता बुमराह यादव लीड वाढवत आहेत.

ठाकूर ने दोन्ही इनिंग्ज मधे रन्स काढल्यामुळे आणि पंत ने दुसर्या इनिंगमधे जवाबदारीने खेळून रन्स काढल्यामुळे, पाचव्या टेस्टमधे अश्विन (जडेजा च्या जागी) आणि विहारी (रहाणे च्या जागी) चा टीममधे येण्याचा मार्ग सुकर झाला असावा असं वाटतं.(unless जडेजाने ह्या इनिंगमधे खोर्याने विकेट्स काढल्या! Wink )

अजून तरी पीच अगदीच पाटा वाटतय. स्विंग नसेल उद्या सकाळी तर अचानक बॉलर्स ना मॅच सेव्हिंग बॉलिंग करावी लागेल. Happy

आशा तर्हेने इंग्लंड 2-1 ने पुढे. मी जर मॅच रेफ्रि असतो तर मॅन ऑफ द मॅच म्हणून रहाणेला स्टेजवर बोलावलं असतं.

उद्या लंच पर्यंत गोलंदाजांनी ठरवायचंय, मॅच जिंकायची कीं नाहीं तें ! पीच साथ देणार नाहीं, आभाळमायेचं कांहीं सांगतां येत नाहीं. जिद्दच खरी कामीं येणार आहे व ती आपल्या पोरांत खच्चून भरलीय, असं शेपटाच्या फलंदाजीवरून स्पष्ट आहे .
शुभेच्छा.

पिच फलंदाजांचे असले तरी प्रेशर म्हणून पण एक फॅक्टर असतो क्रिकेटमध्ये, जो अप्लाय झाला की भले भले गडबडतात. फक्त ते त्यांच्यावर टाकायला उद्या सकाळीच दोनेक विकेट हव्यात. मग पुढच्या विकेट प्रेशरच काढेल आणि त्या विकेटच दिवसभर प्रेशर कायम ठेवतील.
आणि दुसरी गोष्ट म्हणजे स्कोअर ट्रिकी आहे. जिंकायला जावे की अनिर्णित राखायला खेळावे अश्या डबल माईंडमध्येही विकेट येण्याची शक्यता राहते. हे या मॅचमध्ये शेवटच्या सत्रात बघायला मिळू शकते.
थोडक्यात उद्या एक चांगली टेस्ट मॅच बघायला मिळायची पुरेपूर शक्यता आहे

अजून तरी पीच अगदीच पाटा वाटतय. स्विंग नसेल उद्या सकाळी तर अचानक बॉलर्स ना मॅच सेव्हिंग बॉलिंग करावी लागेल. >> हो फक्त जाडेजाच्या शेवटच्या षटकातले काही बॉल्स ग्रिप झालेले तेंव्हा थोडीफार आशा धरूया.

ता.क. - टिव्ही कॅमेरा केंव्हां कुणावर केंद्रीत असणार हें आतां प्रेक्षकांनाही तोंडपाठ असतं. खेळाडू तर केंव्हां काय हावभाव करायचे, याची तालीमही करत असावेत ! >> हो ना, ते फक्त बॅटींग, , बॉलिंग , फिल्डींग, प्लॅनिंग, जिंकणे वगैरे फुटकळ गोष्टीम्कडे लक्ष देत नाहीत. त्या काय बीसीसीआय पैसे देऊन मॅनेज करतेच.

*थोडक्यात उद्या एक चांगली टेस्ट मॅच बघायला मिळायची पुरेपूर शक्यता आहे* - +1
*फक्त जाडेजाच्या शेवटच्या षटकातले काही बॉल्स ग्रिप झालेले तेंव्हा थोडीफार आशा धरूया.*- डाव्या फलंदाजांसाठीं आपलयाला ' रफ'चा फायदा मिळेल, फक्त यावरच लक्ष केंद्रित न करतां, जडेजाने फिरकीचे इतर फसवे प्रयोग करणं अत्यावश्यक. एकच स्पीनर खेळवत असल्याने आज शेवटच्या दिवशी जडेजावरची जबाबदारी खूप मोठी आहे व त्याची भूमिका निर्णायकही ठरूं शकते.

रोहितने त्याच्या कसोटी कारकीर्दीतल्या ३००० धावांचा टप्पा काल आपल्या ७४ व्या डावात गाठला.
विराटने आपल्या ७३ व्या डावात कसोटीतील ३००० धावा पूर्ण केल्या होत्या.
फक्त रोहितला त्यासाठी ९ वर्षं तर विराटला ६ वर्षं लागली.
एकदा कसोटीसाठी निवड झालेल्या खेळाडूला लाँग रोप वगैरे वगैरे.
पुजारा , रहाणेशी सुद्धा तुलना करून पाहायला हवी.

रोहितला आधीच टेस्ट ओपनर्स करायला हवा होता वगैरे म्हणणार्‍यांसाठी एक आठवण :
२०१८ च्या बॉक्सिंग डे टेस्ट मधे आपल्याला ओपनर ची गरज असताना टीम मधे असलेल्या शर्माजींनी ओपनिंग करायला नकार दिल्यानी नवोदित हनुमा विहारीला ओपन करायला पाठवलं होतं

या सिरीजनंतरही त्याचा 'मी ओपन करणार नाही' बाणा होता. पण पुढच्या काही सिरीज टीममधून बाहेर बसायला लागल्यावर अन केवळ ओपनर म्हनूनच टीममधे जागा मिळू शकते हे क्लिअर झाल्यावर त्यानी हट्ट सोडला.

Pages