क्रिकेट - ६

Submitted by Filmy on 17 January, 2021 - 10:05

क्रिकेटवरील पहिले पाच धागे -

http://www.maayboli.com/node/1889

http://www.maayboli.com/node/30450

http://www.maayboli.com/node/51908

https://www.maayboli.com/node/60723

https://www.maayboli.com/node/67443

भारत-ऑस्ट्रेलिया टेस्ट मालिका संपत आली आहे. जुन्या धाग्यावरील प्रतिक्रिया ओसंडून वाहत असल्याने परंपरेनुसार २K हून अधिक प्रतिक्रिया असल्याने हा नवा धागा. खेळातला रस निघून जातोय असे वाटत असतानाच नवी पिढी वा जनता असा खेळ करते की गोडी पुन्हा क्रिएट होते. आणि म्हणून हा प्रपंच.

Group content visibility: 
Use group defaults

ओके. म्हणजे द्वारकानाथांच्या लेखातही कोण कोणाचा आवडता नावडता करताना पुरावे नसतात हे समजले. >> परत हा जावईशोध कुठून लावलास तू ? मी त्यांना जे माहित आहे त्याच्या शतांशही तुला माहित नाही त्यामूळे 'तू काय बरळतोस' नि 'ते काय बोलतात' ह्या दोन्ही गोष्टींना दिली जाणारी किम्मत वेगळी असणार नि त्यांना तुझ्या पायरीला बसवू नकोस हे तुझ्या डोक्यात घालायचा मूर्खपणाचा प्रयत्न करत होतो. तुझा एकंदर आगाऊपणा पाहता त्यांनी तुझी वायवा घेण्याऐवजी तू त्यांची घेतली असशील ह्यबद्दल मला तीळमात्रही शंका नाही.

आजच्या लेखी परिक्षेत आपलीं पोरं दणक्यात पास झालीं पाहिजेतच !!! शुभेच्छा!>>>

अगदी अगदी!! नुसती तोंडाची वाफ दवडून उपयोग नाही. जो मैदान गाजवेल तोच संघ जिंकेल. तेंव्हा ' क्रियेविन वाचाळता व्यर्थ आहे' ह्या उक्ती नुसार कृती हवी!
रहाणे सहित संपूर्ण संघाला शुभेच्छा! रहाणे आमच्या संगमनेरचा असल्याने त्याला टोपली भरून शुभेच्छा! Happy

एक लक्षात आले का? ह्या चारही सामन्यात आता पर्यंत रहाणे पुजाराच्या अपयशात पंताची फलंदाजी झाकोळली! त्याला मारावे कि सोडावे चेंडूला काहीच कळत नाही त्यामुळे प्रत्येकवेळी तो संभ्रमीत अवस्थेत स्वस्तात बाद झाला.. आज तरी त्याच्यावर फलंदाजीची वेळ न येवो...

मला वाटतंय आपण उद्या संध्याकाळपर्यंत खेळून 400 च्या आसपास टार्गेट देऊ. आणि पाचव्या दिवशी सामना जिंकू.

उद्या संध्याकाळपर्यंत खेळून 400 च्या आसपास टार्गेट देऊ. >> उद्या आपल्या संध्याकाळपर्यंत म्हणजे उद्या लंच नंतरचा एक तास तरी.

*लोकहो, स्टंपाबाहेरचे बॉल सोडा हो. कशाला जाळ्यात फसताय* - हें तिथल्या फलंदाजांसाठी आहे कीं ह्या धाग्यावरच्या !!! Wink

*एक व्यंचि तो बनता है इस बातपे* - मलाही असले चेंडू खेळून बाद होण्याची खोड आहेच ! -

बाहेरचे चेंडू सोडणं वगैरे ठीक आहे पण घरातले टोमणे तसे सोडायला जाल , तर कपाळमोक्ष होईल हें लक्षात आहे ना !!20190115_202830 (1).jpg

भाऊ, Lol

शर्मा राहुल १०० च्या सलामीची अपेक्षा केलेली मी
८३ ची झाली.. राहुल गेला
पण मस्त खेळले दोघे दटून.. बॉलिंग कडक पडत होती

येस. मजा आली पहिल्या तास बघताना. टेस्ट क्रिकेटची मजा औरच.

भाऊ कार्टून भारी. समझनेवालेको इशारा काफी है l Happy

पुजाराचा आता बॅकफूट खवडा बघून त्याचे पॉजिटीव्ह ईंटेशन्स सेम मागच्या सामन्यातील दुसऱ्या इनिंगसारखे आहेत हे समजले. आता फक्त मोठी इनिंग येऊ दे..

आपले कपडे खूपच पांढरेशुभ्र आहेत. वॉशिंग पावडर निर्मा मध्ये धुतल्यासारखे. इंग्लंड साधारण पावडर वापरते असं दिसतंय.

....... शर्माचे शतक व्हावे आणि भारत सामना जिंकावा. तो हे डिजर्व्ह करतोय.

आणि येस्सस ! रो हीट शर्मा .. सिक्स मारून शतक

कसला बेक्कार सिक्स मारला ९४ ला... केवढा तो कॉनफिडन्स.. परदेशातील शतक ज्याची त्याला प्रतीक्षा होती या दौऱ्यात.. पण जराही त्याचा विचार नाही. सत्तरी ओलांडतच तुटून पडलेला नुसता

६२ ते १०० या ३८ धावा ३४ चेंडूत आल्या

शर्माचे शतक झालेय.
पण तो शतक मारून शांत बसणारा प्लेअर नाही.
ये दिल मांगे मोअर.. येऊ दे २००

शर्माच्या विकेटच्या मोहात रूट नेहमी एखादा रिव्यू घालवतोच... आज पुजारा साठी दुसरा.... मजा आली... गल्लीतली पोरं पण असा Review नाही घेणार...

Pages