क्रिकेट - ६

Submitted by Filmy on 17 January, 2021 - 10:05

क्रिकेटवरील पहिले पाच धागे -

http://www.maayboli.com/node/1889

http://www.maayboli.com/node/30450

http://www.maayboli.com/node/51908

https://www.maayboli.com/node/60723

https://www.maayboli.com/node/67443

भारत-ऑस्ट्रेलिया टेस्ट मालिका संपत आली आहे. जुन्या धाग्यावरील प्रतिक्रिया ओसंडून वाहत असल्याने परंपरेनुसार २K हून अधिक प्रतिक्रिया असल्याने हा नवा धागा. खेळातला रस निघून जातोय असे वाटत असतानाच नवी पिढी वा जनता असा खेळ करते की गोडी पुन्हा क्रिएट होते. आणि म्हणून हा प्रपंच.

Group content visibility: 
Use group defaults

सध्याच्या भारतीय फलंदाजांचे फिरकी खेळायचे तंत्र पाहता भारतात खेळणारा शर्मा नसता तर आपण ईंग्लंडशी भारतातही हरलो असतो.>>> +११११ रोहित हा सध्या भारताचा वझीर आहे. तो नसेल तर अर्धा सामना तिथेच हारल्यात जमा आहे. राजा म्हणजे कोहली असून नसून सारखाच. तो धावा पण तशाच सिंगल डीजीट काढतोय. पंत म्हणजे हत्ती लवकर सुटणार नाही सुटला की सगळ्यांना चिरडणार. राहुल म्हणजे उंट बॉलकडे बघत बघत नजर तिरकी ठेऊन धावा काढणार. गोलंदाज म्हणजे घोडेस्वार. पुजारा आणि रहाणे शेवटच्या घरात ना पोहचणारी प्यादी.

कोहली काही टेस्ट कॅप्टनशीप सोडणार नाही आणि ती कुणी काढून घेणार नाही. (जरी मला तस वाटत असल आणि रोहित/अजिंक्य त्याच्यापेक्षा चांगले कर्णधार असले तरी. ) . त्यासाठी अनुष्काला पुनः एकदा मनावर घ्यायला लागेल. Happy
ओव्हलसुद्धा ग्रीन टॉप आहे अस वाचनात आलय. शिवाय पेसर्स नी तिथे जास्त विकेटस घेतल्या आहेत. जडेजा फिट असला तरी अश्विन खेळेल अस वाटतय.
अजिंक्य आउट होत असला तरी प्रत्येक वेळेस तो आउट होईपर्यंत आत्मविश्वासाने खेळत होता.
कोहलीला पुनः टॉस हरला तर बर अस वाटत असेल. Happy

कर्नलची शिकवणी लावली असती तर बर झाल असत. आंधळेपणाने सतत पुढे काय खेळतात हेच मला समजत नाही.

रोहित हा असाधारण प्रतिमेचा, शैलीदार व आक्रमक फलंदाज व माझ्या खूपच आवडीचा आहे , हें मीं विश्वचषकाच्या आधीपासून सागतोय व त्यासाठी इथे टपल्या पण खाल्या आहेत. परंतु, कुठे रोहितचा ऐरावत व कुठे विराटची शामभटाची तट्टाणी, असं कुणी सुचवत असेल तर मात्र तें हास्यास्पद ठरेल. विराटच्या फाॅर्मची सध्या मोठ्ठी गोची झाली आहे हें निर्विवाद. पण कसोटीतली 27 शतकं, 26 अर्धशतकं त्यामुळे पुसून टाकलीं ज1तात का ? जगातला अव्वल फलंदाज तर तो कित्येक वर्षं होताच ना. जो रूटही गेल्या तीन सामन्यांमुळेच ICC ranking मधे क्र. 5 वरून क्र. 1 वर आला ना. येईल कीं विराटही तसाच पुन्हा वर अशी आशा कां करूं नये, आपल्या संघाच्या हितासाठी !

कधी कधी मला वाटते आयपीएल वाले जसे ठरवितात तसेच जाहिरातदारांवर देखिल अवलंबून असावे अंतीम संघात कोण कोण खेळवायचे ते. ऐनवेळी जखमी झाल तरच बाहेर किंवा खेळविणे भाग असावे बीसीसीआयला. कारण शेवटी जाहिरातदार खर्च उचलतात सगळा मग त्यांना काही अधिकार नको? त्यातुन कोहली आणि अनुश्का असे दुहेरी जाहिरात करणारे असतील तर कोहलीला कसे कर्णधार म्हणून बाजूला करणार?
वर विक्रम म्हणाले तसे अनुश्काने मनावर घेतले तरच शक्य आहे दौरा अर्धवट सोडणे.. Wink

विराटची शामभटाची तट्टाणी, असं कुणी सुचवत असेल तर मात्र तें हास्यास्पद ठरेल.>>>
भाऊ, तुम्ही म्हणातायं ते बरोबर आहे विराट फलंदाज म्हणून ऐटदार ऐरावत आहे परंतु त्याने सध्या आपल्या गंडस्थळावर रुतणारा कर्णधार पदाचा अंकुश बाजुला ठेवला तर जास्त दिमाखदार होईल असे वाटते सध्यातरी. त्याची फलंदाजीची नजाकत त्या दडपणात सध्यातरी निस्तेज होतेय. गेल्या २-३ वर्षातल्या त्याच्या फलंदाजीतील कामगिरीवरून जाणवतेय.

कोहलीला सध्या त्याच्या आक्रमक शैलीत खेळून देत नाहीत. ओली आणि जिमी अगदी मॅग्राथ सारखी एकाच कॉरीडोर मध्ये अचूक टप्प्यावर बोलिंग करतात. त्याला स्लेजिंग करून जागृत पण करत नाहीत. गुड स्ट्रॅटेजी.

*कोहलीला सध्या त्याच्या आक्रमक शैलीत खेळून देत नाहीत. ओली आणि जिमी अगदी मॅग्राथ सारखी एकाच कॉरीडोर मध्ये अचूक...* - होय, गोलंदाजीला निश्चितच श्रेय जातंच. व्ही व्ही एस म्हणतो, ऑफ स्टंपच्या बाहेर 5-6 व्या स्टंपवरचे चेंडू विराट खेळायला जातो, हाच त्याचा 'वीक पॉईंट' ठरतोय. पण त्याचंही श्रेय अचूक व मोहात पाढणारया गोलंदाजीलाही आहेच.

जोपर्यंत कोहली आहे तोपर्यंत icc स्पर्धा जिंकणे भारताला अशक्य आहे. रोहितच्या कॅप्टनशीपखाली खेळणे त्याला कमीपणाचे वाटत असेल तर त्याने एक लहानसा कोणाला दिसणार नाही असा इयरफोन घ्यावा आणि धोनीने त्याला मार्गदर्शन करावे.

धोनी कश्याला हवा स्लीप मध्ये सोबत रोहित-रहाणे सारखे यशस्वी कर्णधार आहेत ना! त्यांना सल्ला विचारावा? अजुनही तिनही सामन्यात कोहलीने गोलंदाजी बदलात कल्पकता अजिबात दाखविली नाही रूट मुळं रोवून बसला असताना कोहलीने काहीतरी वेगळा प्रयत्न करायला हवा ते दिसलेच नाही. ४ थ्या दिवशी सकाळीच आल्या आल्या नवा चेंडू उपलब्ध व्हावा म्हणून तिसर्‍या दिवशी मुळे ने स्वतः गोलंदाजी करून ८० ष्टके पुर्ण केली त्यामुळी आल्या आल्या कोहली आणि पुजाराला नविन चेंडूला सामोरे जाणे भाग पडले असे काही करताना कोहली दिसतच नाही. फलंदाजीचा क्रम बदलावा स्वतः वन डाऊन येऊन पहावे किंवा बदल म्हणून अचानक डावखुर्‍या पंत किंवा जडेजाला वर पाठवावे जेणे करून गोलंदाजाला चेंडूची दिशा बदलावी लागेल असे काही करताना कोहली अजिबात दिसला नाही...

धोनी कश्याला हवा स्लीप मध्ये सोबत रोहित-रहाणे सारखे यशस्वी कर्णधार आहेत ना! त्यांना सल्ला विचारावा>>>> ते त्याला कमीपणाचं वाटत असेल.

वेळ आली तर लाराचा रेकॉर्ड मोडणार.>>>

३-४ वर्षांपुर्वी कदाचित मोडू शकला असता पण आता ह्या ईन्ग्रजी मार्‍यासमोर ४००+ धावा एकट्याने करणे अवघड आहे त्याला.

आंधळेपणाने सतत पुढे काय खेळतात हेच मला समजत नाही.
>>
अगदी
२०१८ ला त्या मेथडनी विराटला स्विंग किल करता आला. पण सध्या तसं होत नाहिये.
विराटचं पाहून पार शुभमन गिलही क्रीजच्या पुढे उभा राहून खेळत होता.

पण रूटला क्रीजमधून खेळताना पाहून कुणाला काही शहाणपण सुचलेलं दिसत नाही.

पुजारा अन रहाणे त्यांच्या झोन मधे नीट खेळत होते तेंव्हा त्यांच्यावर स्लो खेळतात याचं प्रेशर टाकून त्यांच्या मनात त्यांच्याच टेक्निक बाबत किंतु निर्माण केला, अन चालत्या गाड्याला खीळ घातली.

या टूरच्या आधीपर्यंत मला अवे टेस्ट साठी रोहितच्या ओपनिंगवर बिल्कुल भरवसा नव्हता. पण गेल्या तीन सामन्यांमधे त्याचा खेळ (बाकी टीमच्या खेळाच्या पार्श्वभूमीवर) बघून मला आजच्या मॅचमधे त्याच्याच बॅटिंगवर सर्वाधिक भिस्त वाटते.

रहाणेच्या अधून मधून मोक्याच्या इनिंग्जमधे चांगलं खेळण्याला बघून सिद्धू आठवतो. (टीम मधून हकलणार असं वाटलं की ५०)
टेस्ट चँपिअनशिप मधे भारताकडून सर्वाधिक धावा, फायनल ला टॉप स्कोअरर, लॉर्ड्स वर दुसर्‍या डावात ६३, ईव्हन लीड्सला पहिल्या डावात दुसर्‍या क्रमांकाच्या धावा... हे बघता त्याला काढायला (तितकसं) ठोस कारण दिसत नाही
रहाणे टिकणार अन पुजारा गळणार अशी परिस्थिती असताना पुजारानी लीड्सच्या दुसर्‍या डावात काढलेल्या ९१ मुळे त्याचं आजचं मरण उद्यावर
आणि या दोघांपेक्षा काकणभर आणखीनच वाईट परिस्थितीत असलेला कोहली कॅप्टन म्हणून बाहेर निघत नाही

यातल्या एका, प्रसंगी दोन खेळाडूंच्या खराब फॉर्मवरही आपण तारून नेऊ शकलो असतो, जर तिसरा पूर्ण फॉर्म मधे असता तर.
पण तशी परीस्थिती नसल्यानी सगळा लोचा झालाय
शिवाय बदली खेळाडूंमधे असा ही कुणी नाहिये की जो वरचढ खेळून दोघांचा बॅडपॅच कव्हर करेल

आणि हे हाताळायला कोच अन सपोर्ट स्टाफ ची टीम नालायक आहे.
त्यामुळे या तिघातला किमान एक पूर्ण फॉर्ममधे येईपर्यंत अवघड आहे.

आणि या तिघातल्या एकालाच बाहेर बसवलं तर तो त्याच्यावर अन्याय असेल, कारण बाकी दोघं ही ईक्वली वाईट खेळताहेत.

*....असे काही करताना कोहली दिसतच नाही.* - 100% सहमत. ' केल्याने होत आहे रे ... ' अरे, चुकीचे ठरले तरी कर ना कांहीं बदल, आण कांहीं surprise element, जर नेहमीचं प्रभावी ठरत नसेल तर !!

३९-३

चक्क जडेजाला पाठविले वर खेळायला!

पहिल्या ७ ओव्हर्स मधे २८/०
पुढच्या ७ ओव्हर्स मधे ०/२
आणि त्या नंतरच्या ७ मधे १२/१

शर्मा वोक्सच्या आणि पुजाराह अँडरसनच्या बॉलला कीपरकडे कॅच देऊन गेले.
राहुल एलबीडबल्यू

काहीतरी वेगळं करायचं म्हणून रहाणेच्या आधी जडेजा आलाय (मला वाटलं की चौथा पण गेला की काय)

आपली बॅटिंग जबरदस्त प्रेडिक्टेबल होतिये, अन इंग्लंड त्याच टॅक्टिक्सवर रडवतंय आपल्याला.

चला, जडेजा पुढे आलेला गेला.. ६९-४ .. कोहलीने पुन्हा बाहेरच्या बॉलला बॅट लावलेली. स्लिप कॅच सुटली, अन्यथा ५ असत्या..

पण आज रहाणे खेळेल असे वाटतेय. त्याचा स्वाभिमान डिवचला असेल Happy

*कोहलीला सध्या त्याच्या आक्रमक शैलीत खेळून देत नाहीत. ओली आणि जिमी अगदी मॅग्राथ सारखी एकाच कॉरीडोर मध्ये अचूक...* >> क्रिकिंफो स्टॅटिस्टिशियन वाले अगदी उलट बोलत आहेत. २०१४ नि आत्ता कोहली अधिक आक्रम खेळायला जातोय नि बाहेरचे बॉल जे तो २०१८ मधे खेळायचे टाळत होता ते खेळण्याचा प्रयत्न करत बाद होतोय. "पण त्याचंही श्रेय अचूक व मोहात पाढणारया गोलंदाजीलाही आहेच." ह्या वाक्यात आपण का कमी पडतोय ह्याची खरी गोम आहे. इंग्लंड च्या ण. २ नि ३ क्रमांकाच्या बॉलर्स नी तेव्हढाच डिसिप्लीन दाखवल्यामूळे अँडरसन अजूनच प्रभावी ठरतोय.

मला माहित आहे की इथे रहाणे चे खूप फॅन्स आहेत, पण त्याला का या सामन्यात खेळावतात काही कळत नाही
>>>>

मराठी माणसांच्या मायबोलीवर मराठमोळ्या रहाणेबद्दल सॉफ्ट कॉर्नर असणे हुमायुन नेचरला अनुसरून स्वाभाविक आहे Happy

रहाणे कोहलीचा लाडका आहे. तसेच धोनीचा नावडता होता. धोनी विरुद्ध कोहली कॅप्टनशिप वादात रहाणे कोहलीच्या पार्टीत होता. तेव्हाच्या माझ्या जुन्या पोस्ट शोधल्या तर हे सापडेल. त्यामुळे त्याला एक्स्ट्रा सांभाळून घेतले जाते.

"मला माहित आहे की इथे रहाणे चे खूप फॅन्स आहेत, पण त्याला का या सामन्यात खेळावतात काही कळत नाही" - रहाणे आणि पुजारा - 'ये रे माझ्या मागल्या' झालं अगदीच. पुन्हा एकदा मिडल ऑर्डर मधले हे दोघं संपूर्ण अयशस्वी ठरले. होपफुली भारताकडे चांगले बॅक-अप्स आहेत. कोहली आणि ठाकूरमुळे अगदीच नामुष्की टळली. बुमराह ने दोन विकेट्स घेऊन सुरूवातही चांगली केली. पण आता रूट आणि मालन ने काऊंटर अ‍ॅटॅक करायला सुरूवात केलीय. बुमराह, शामी, अश्विन पैकी दोन बॉलर्स तरी प्लेयिंग-११ मधे हवेत असं वाटतं.

"रहाणे कोहलीचा लाडका आहे. तसेच धोनीचा नावडता होता. धोनी विरुद्ध कोहली कॅप्टनशिप वादात रहाणे कोहलीच्या पार्टीत होता. तेव्हाच्या माझ्या जुन्या पोस्ट शोधल्या तर हे सापडेल. त्यामुळे त्याला एक्स्ट्रा सांभाळून घेतले जाते." - का..ही...ही!!! बळंच कस्न्पिरसी थियरीज मांडणं कधीतरी बंद कर रे. आणि फेव्हरिझम विषयी बोलायचं तर द्वारकानाथ संझगिरी च्या मते रहाणे ला कोहली चा पाठिंबा नाहीये. कोहली ला तो आवडत नाही म्हणून त्याची ही अवस्था आहे. मग कुणाची थियरी खरे मानायची? का कन्स्पिरसी थियरीज बाजूला ठेवून जे समोर दिसतंय त्याविषयी आपली मतं माडून क्रिकेट चा आनंद लुटायचा?

*का कन्स्पिरसी थियरीज बाजूला ठेवून जे समोर दिसतंय त्याविषयी आपली मतं माडून क्रिकेट चा आनंद लुटायचा?*-
हाच पर्याय सर्वोत्तम!'कन्स्पिरसी थियरीज'मधे 'गाॅसिप'चा भाग अधिक असण्याचीच खूपच शक्यता ..

Pages