क्रिकेट - ६

Submitted by Filmy on 17 January, 2021 - 10:05

क्रिकेटवरील पहिले पाच धागे -

http://www.maayboli.com/node/1889

http://www.maayboli.com/node/30450

http://www.maayboli.com/node/51908

https://www.maayboli.com/node/60723

https://www.maayboli.com/node/67443

भारत-ऑस्ट्रेलिया टेस्ट मालिका संपत आली आहे. जुन्या धाग्यावरील प्रतिक्रिया ओसंडून वाहत असल्याने परंपरेनुसार २K हून अधिक प्रतिक्रिया असल्याने हा नवा धागा. खेळातला रस निघून जातोय असे वाटत असतानाच नवी पिढी वा जनता असा खेळ करते की गोडी पुन्हा क्रिएट होते. आणि म्हणून हा प्रपंच.

Group content visibility: 
Use group defaults

लॉर्ड्स च्या दुसर्या इनिंगमधे ६०+ स्कोअर करून फॉर्ममधे परत येण्याच्या खुणा दाखवत असलेल्या रहाणेला ........
>>>>>>>

रहाणेबाबत फॉर्ममध्ये येणे वगैरे काही नसते. रहाणेने ईतिहासात सातत्याने फॉर्म कधी दाखवला हे शोधावे लागेल. अपवादाने सापडेल असे उदाहरण. जसे आताच लॉर्डसला ६० धावांची सुंदर खेळी केल्यावर त्याने मागच्या सामन्यात अगदी आधीच्याच पद्धतीने अपयशी होऊन दाखवले.
रहाणे मध्येच एखादी गरजेला चमकदार इनिंग खेळतो. तसेच त्याची हि इनिंग परदेशातही येत असल्याने तिचे मूल्य आणखी वाढते. त्यासाठी तो संघात ठेवतात. पण हे तेव्हाच परवडते जेव्हा त्या आधीचे पुजारा कोहली आणि नंतरचे पंत जडेजा विहारी हे सातत्याने धावा करत असतात. सध्या ते करत नाहीयेत म्हणून रहाणेच्या डोक्यावर तलवार आहे. तरी पुजाराने धावा करायला सुरुवात केलीय हे रहाणेच्याही पथ्यावर पडणार आहे. तेच आता त्याची जागा वाचवू शकते. आणि ती जागा वाचावी याचसाठी तीन वेगवान, आश्विन, विहारी, असे कॉम्बिनेशन असावे असे मला वाटते.

*उमेश ऐवजी ठाकूर ला बॅटींग स्किल्स मुळे प्राधान्य दिलं जायची शक्यता आहे असंही वाटतं.* +1.

*...शर्माने केला असता तर एव्हाना आपण त्याला संघाच्या नाही तर ईंग्लंडच्या बाहेर सोडून आलो असतो * - पुजारा, कोहली व रहाणे हें त्रिकूट तावून सुलाखून आपल्या कसोटी फलंदाजीचा गाभा बनला आहे व इतर कुणीही प्रतिभावान असूनही अजून तरी त्या गाभयाचा भाग बनलेला नाहीं , हें सत्य आहे. म्हणून, त्या तिघांपैकी कुणालाही वगळताना दहादां विचार करणंच शहाणपणाचं.

जसं देव आनंद किंवा सलमान खान चे कट्टर चाहते देखील त्यांच्यावर अभिनयाचा आरोप करत नाहीत तसंच रहाणेवर त्याचे चाहतेसुद्धा सातत्याचा आरोप करत नाहीत. एके काळी प्रचंड क्षमता आहे असं वाटणार्या ह्या खेळाडूची कारकिर्द ह्या टप्प्यावर येणं हे भारतीय क्रिकेटसाठी दुर्दैवी आहे. त्याला वगळावं किंवा नाही ह्याविषयी दुमत असू शकतं. पण त्याला वगळतील का ह्याचा अंदाज बांधताना मला तरी इंग्लंडमधे तसं होईलसं वाटत नाही. जर पुढचे दोन सामने फलंदाजी अयशस्वी ठरली (तसं न होवो), तर न्यूझिलंड जेव्हा भारतात येईल तेव्हा काही प्रयोग घडू शकतील.

ही गेल्या तीन वर्षांत खेळवलेल्या फलंदाजांची कामगिरी. मयांक, पृथ्वी आणि शुभमन हे तिघे सलामीचे फलंदाज. यातल्या दोघांची सरासरी सध्याच्या फॅब थ्री पेक्षा चांगली आहे. नोट - एक नाबाद द्विशतक वगळलं तर कोहलीची सरासरी ३७.१८ होते. म्हणजे नव्या खेळाडूंना पुरेशी संधी द्यायची नाही. ४-५ डाव फेल गेले की नारळ द्यायचा. तेच जुने खेळाडू तशीच किंवा त्याहून खराब कामगिरी करत असूनही पूर्वपुण्याईवर कायम ठेवायचे. रोहितला या वयात सलामीला ढकलण्याचा उद्देश त्याचा बळीचा बकरा करणं हाच दिसतो.
rohit sharma._0.png

हे रोहित, विराट, चेतेश्वर, अजिंक्य यांचे करियर स्टॅट्स
RG1.png

याच चौघांची मागची तीन वर्षे वगळून कामगिरी.
RG2.png

या दोन्ही तक्त्यांत रोहित - अजिंक्य यांची तुलना करता येईल आणि कोणाला किती संधी दिल्या गेल्या तेही दिसेल. चौघांमध्ये रोहितचं वय सगळ्यात जास्त आहे.

जेव्हा नवोदित व सिनीयर फलंदाजांची तूलना एका विशिष्ट कालखंडातील आंकडेवारीवरून केली जाते, तेंव्हा ती तुलना एक महत्वाचा घटक दुर्लक्षित करत असते -' असे चढ-उतार मोठ्या कारकिर्दीत अपेक्षित असतात.'. सुनील, सचिन सारख्यानाही दोन- तीन वर्षांच्या ' बॅड पॅच' मधून जावं लागलं होतं व कुतसित टीकाही सहन करावी लागली होती. पण निवडसमितीने शहाणपण दाखवलं व त्याचा अमाप लाभ संघाला मिळाला.

जेव्हा नवोदित व सिनीयर फलंदाजांची तूलना एका विशिष्ट कालखंडातील आंकडेवारीवरून केली जाते, तेंव्हा ती तुलना एक महत्वाचा घटक दुर्लक्षित करत असते -' असे चढ-उतार मोठ्या कारकिर्दीत अपेक्षित असतात.' >> +१ .

जाडेजा फिट असेल कि नाही अजून नक्की नसल्यामूळे बरेच बदल होउ शकतील असे दिसतेय. तो फिट नसेल तर अश्व्नि न आत येईल च. पण विह्रारी नक्की नाही कारण कोहली ने सहावा फलंदाज काय दिवे लवणार होता आमच्या पेक्षा वेगळे असे आधीच म्हटलेय.

जडेजा नसेल।तर 5 गोलंदाज खेळावणार नाहीत , पंत 6 वर, अश्विन 7 आणि 4 फास्ट गोलंदाज अशी टीम नाही खेळवणार

फलंदाजीत प्रॉब्लेम असूनही कोहलीला अतिरीक्त फलंदाजही खेळवायचा नसेल आणि आहे त्यांच्यातही बदल करायचा नसेल तर...
जडेजा-ईशांत जोडी बाहेर बसवून आश्विन-शार्दुल जोडी आत घेतील.
हे दोघे आधीच्या दोघांपेक्षा जास्त रन्स काढतील आणि जास्त विकेट घेतील का हा प्रश्न आहे.
विकेट म्हणाल तर येस्स, आश्विन शार्दुल जोडीने गोलंदाजीत विविधता येऊ शकते.

मुळात गोची पंतच्या अपयशाने केली आहे. जडेजा वा सुंदर असा एखादा अष्टपैलू पकडून पाच गोलंदाजांच्या प्लानमध्ये पंतने फलंदाजाची कसर भरून काढणे गरजेचे होते. आधीच्या दोन मालिकात ते झाले. जे आता न झाल्याने टीम कॉम्बिनेशन गंडतेय.
पण यातही कन्फ्यूजन असे आहे की जर हा विचार असता तर पंतचा फलंदाजीचा ॲप्रोचही भिन्न असता. दर वेळी तो सुरुवातीच्या काही चेंडूंना पुढे येऊन खेळतो ते त्याच्या वरच्या अपेक्षित भुमिकेला सूट होत नाही.

जडेजा फिट असेल तर तयाला व अश्विनलाही खेळवून 3 फास्ट ( यांत शारदूल ठाकूर ) व 2 फिरकी (+ थोडं बॅटींग कसब) गोलंदाज हा धाडसी प्रयोगही होवूं शकतो. जो रूटसाठी कदाचित हा प्रयोग उपयुक्त ठरेल.पेस अटॅकवर पूर्ण भर देवून इंग्लंडच्या 20 विकेट मिळवणं अधिकाधिक कठीण होतंय असं मला वाटत.

मला सा. मा. चं मत पटतंय. जडेजा नसेल, तर ५ बॉलर्स चं काँबिनेशन खेळवणं अवघड वाटतंय. खूप मोठं शेपूट आणि आऊट ऑफ फॉर्म मिडल ऑर्डर घातक ठरू शकेल. तसंही फास्ट बॉलर्स चं रोटेशन पण करायला हवंय. त्या केस मधे विहारी, अश्विन, उमेश / शार्दूल आणि आणखी दोन फास्ट बॉलर्स खेळतील कदाचित.

तीनच वेगवान खेळवायचे झाल्यास त्यात शार्दुल असेल का ही देखील एक शंकाच आहे. कारण त्याला मार पडला तर ऑप्शन संपल्यासारखे होतील.

हो मलाही तसेच वाटते. बुम्रा, शमी, सिराज, इशांत, यादव ह्यातले तीन जण नक्की असतील. बाकी तीन जण - अश्विन, जाडेजा, शार्दुल, विहारी, जडेजा ह्यामधून येईल.

मार पडण्याबाबत यादव सुद्धा शार्दुल कॅटेगरी आहे. त्यामुळे तीनच वेगवान खेळवायचे झाल्यास जसे शार्दुल रिस्की तसेच यादवही रिस्कीच आहे. शार्दुल लगेच पिक झाला तर मार खातो, तर यादवची एक स्पेल आड लाईनलेंथ बिघडून तो सुद्धा मार खायची शक्यता राहते. मध्यंतरी भारतात जुन्या बॉलने तो फार चांगली बॉलिंग टाकायचा, पण शमी बुमराज सिराज ते काम चोख बजावत आहेत.

बहुधा कुर्‍हाड ईशांतवर पडेल. उर्वरीत दोन जागा जडेजा आश्विन उमेश शार्दुल यातून भरतील असे वाटते.

कोहलीने आमची फलंदाजी सक्षम आहे असा जो अ‍ॅटीट्यूड दाखवला आहे ते तो कायम ठेवत पाच गोलंदाज खेळवणार हे मात्र आता नक्की वाटतेय. आणि तो कायम ठेवणेच उत्तम असे मलाही वाटते.

सीनियर फलंदाजांना काढा असे लिहिले नसतानाही तो अर्थ लावून वाक्यातील नवोदित फलंदाजांना तशाच किंबहुना त्यापेक्षा बर्‍या कामगिरीवरही लगेच डच्चू दिला जातो या पूर्वार्धाला ऑफ स्टंप बाहेरच्या चेंडू सारखं सोडून देण्याचं कसब काही खास नाही.

*सीनियर फलंदाजांना काढा असे लिहिले नसतानाही ...*
भरतजी, कोणत्याही थर्ड अंपायरला विचारा कीं या तुमच्या वाक्यातून तुम्हाला काय वेगळं म्हणायचंय असं समजायचं तें , - /म्हणजे नव्या खेळाडूंना पुरेशी संधी द्यायची नाही. ४-५ डाव फेल गेले की नारळ द्यायचा. तेच जुने खेळाडू तशीच किंवा त्याहून खराब कामगिरी करत असूनही पूर्वपुण्याईवर कायम ठेवायचे. >

मलाही इशांत आणि जडेजाच्या जागी शार्दूल आणि अश्विन येतील अस वाटतय. शार्दूल जमलेली जोडी ब्रेक करतो नेहमी. आश्विनने रूटला खेळू दिल नाही तरी बास होइल.
तिसर्‍या टेस्टला मी कलकत्ता रिपिट होइल अशी मोठी आशा बाळगून होतो. पण ठिक आहे. अजून सिरीज बाकी आहे.
इंग्लिश लोक फारच सुरेख गोलंदाजी करतात त्यांच्या वातावरणात व पीच वर. आपल्या स्पीडचा काही उपयोग झाला नाही तशाच वातावरणात.
पूजाराने नविन गवसलेल्या शैलीत खेळावे. नाहीतर ८० ओव्हर्स मधे स्कोअर होतो २०० ( ३ आउट) व परत दुसर्‍या नविन बॉलवर अजून ५०, हे रडगाण चालूच राहील.
या सध्याच्या टीमला ग्रेटेस्ट एव्हर टीम म्हणण आता धाडसाच ठरेल.
विरू, गंभीर, द्रविड, सचिन, लक्ष्मण, सौरभ, धोनी, कुंबळे यांच्या बरोबर सध्याच्या बॅटींग लाइन अपची तूलना पण होउ शकत नाही.
कपिलच्या तोडीचा ऑलराउंडर अजून मिळाला नाही. (सॉरी, कोणीतरी जडेजा, अश्विन ची नावं घेतली का?. Happy )
तस फॅब फोर पण परत कधी मिळतील कुणास ठाउक.

*तस फॅब फोर पण परत कधी मिळतील कुणास ठाउक.* -
'फॅब फोर' हा एक दुर्मिळ योगच असतो व आपण तो अनुभवला हें भाग्य समजायचं. हा संघ देखील समतोल आहे, जिद्दी आहे व फलःदाजीतला फाॅर्मचा लपंडाव जरा कमी झाला तर जबरदस्त पण आहे. मीं खूप आशावादी आहे या संघाच्या भविष्याबद्दल, अगदी या दौरयाच्या उर्वरित भागाबददलही !

प्रसिध कृष्णा ला राखीव खेळाडूंमधून squad मध्ये ऍड केले आहे. म्हणजे शमी किंवा बुमराह ला विश्रांती देऊन त्याला खेळवू शकतात.

पुजारा, रहाणे, आणि बुमरा आऊट ऑफ फॉर्म आहेत. पुजारा आणि रहाणेला घरी पाठवावे आणि बुमराला विश्रांती घ्यावी.

*पुजारा आणि रहाणेला घरी पाठवावे आणि बुमराला विश्रांती घ्यावी.* - फाॅर्म ही खूप नाजूक बाब आहे व ती हाताळायला
' घरी पाठवणं ' , ' विश्रांती देणं' फक्त हेच रामबाण उपायच आहेत असं नाहीं. खेळाडूशी बोलून, काय चुकतंय हें हेरून व प्रोत्साहीत करूनही त्या खेळाडूच्या प्रतिभेचा , अनुभवाचा संघाला लाभ करून देतां येतो. अर्थात, हें व्यवस्थापन, प्रशिक्षक व नेतृत्व यांची कसोटी घेणारं व कसब जोखणारं काम आहे व तें त्यांच्यावरच सोपवलेलं बरं .

"तस फॅब फोर पण परत कधी मिळतील कुणास ठाउक" - खरं तर ते फॅब फाइव्ह होते असं मला नेहमीच वाटायचं. बहुदा बॅटींग च्या संदर्भात तो वाक्-प्रचार वापरला असावा. पण कुंबळे पण त्याच लीगमधे होता.

इतक्यात हर्षा भोगले च्या साठाव्या वाढदिवसाच्या निमित्तानं त्याचा एक इंटरव्ह्यू पाहिला. त्यात तो फॅब फाइव्ह विषयी बोलताना म्हणाला होता कि खेळाडू म्हणून ते महान होते ह्यात शंकाच नाही, पण व्यक्तिगत पातळीवर ती चांगली माणसं होती.

काल डेल स्टेन रिटायर झाला. बराच काळ तो खेळला नसल्यामुळे त्याचं मैदानावरचं अस्तित्व जाणवलं नव्हतं. पण गेल्या २० वर्षांतल्या सर्वश्रेष्ठ फास्ट बॉलर्सपैकी एक फास्ट बॉलर रिटायर झाला हे नक्की.

*पण व्यक्तिगत पातळीवर ती चांगली माणसं होती.* - आपला संघ देशाचं प्रतिनिधीत्व करत असतो, या संदर्भात ह्या गोष्टीलाही खूप महत्व आहे. आपल्या संघांबद्दल बव्हशी खूप चांगलं मत असतं, हें कौतुकास्पद.
*गेल्या २० वर्षांतल्या सर्वश्रेष्ठ फास्ट बॉलर्सपैकी एक फास्ट बॉलर रिटायर झाला हे नक्की.* +1 ! सलाम व शुभेच्छा !!

शर्माने परदेशात मालिका चालू असताना त्यादरम्यान कोहलीला मागे टाकला हे विशेष.

आज तो जगातला सर्वोत्तम कसोटी ओपनर आहे हे मान्य करायला कोणालाही कसलाही संकोच नको

शर्माने परदेशात मालिका चालू असताना त्यादरम्यान कोहलीला मागे टाकला हे विशेष.>>> +1111 भारतात सामने सुरू असते तर रोहित भारतातच खेळतो म्हणून टीका झाली असती. कोहली फॅन्सनी कितीपण आदळआपट केली तरी हा तो सूर्य हा जयद्रथ या उक्तीवर रोहित शर्मा बेस्ट कॅप्टन आणि बेस्ट टेस्ट प्लेयर आहे हे सिद्ध झालंय. टेस्टमध्ये तर तो एक सर्वशक्तिमान योध्याच्या रुपात मैदानात आलाय. आणि भारत त्याच्या कॅप्टनशीपला मुकला हा भारताचा लॉस असून कोहलीच्या इगोचा विजय आहे. आणि ज्यांनी कोहलीचा इगो विजयी करण्यास मदत केली त्यांना भारतीय क्रिकेट इतिहास कधीच माफ नाही करणार मग ते सिलेक्टर असू दे नाहीतर फॅन्स.

भारतात सामने सुरू असते तर रोहित भारतातच खेळतो म्हणून टीका झाली असती.
>>>>
सध्याच्या भारतीय फलंदाजांचे फिरकी खेळायचे तंत्र पाहता भारतात खेळणारा शर्मा नसता तर आपण ईंग्लंडशी भारतातही हरलो असतो. टेस्ट चॅम्पियनशिप फायनलला बिलकुल पोहोचलो नसतो. जो संघ चांगले फिरकी गोलंदाज घेऊन येईल तो आपल्यालाही नाचवू शकतो अशी स्थिती आहे सध्या. ते पाहता शर्माचे भारतातील महत्वही फार वाढते. ईंग्लंड आलेली तेव्हा त्याने बरेचदा एकटे खेळत हे सिद्ध केले आहे. वाटल्यास रात्री मॅच बाय मॅच ते आकडे आणतो.

आणि जे परदेशात खेळणारे आहेत ते देखील फार तीसमारखान आहेत अश्यातला भाग नाही. वासरात लंगडी गाय आहेत. वेळोवेळी एकेकाचे तंत्र उघडे पडतेच. सचिन दादा द्रविड त्रिकूटानंतर ईंग्लंडमध्ये स्विंग खेळायला जे तंत्र लागते त्यात कोणीही सातत्य दाखवले नाहीये या संघात.

सर्वात महत्वाचे - आज जिथे सारे जग आयपीएल आणि २०-२० मध्ये पैश्याच्या मागे धावत आहे तिथे शर्माची लिमिटेडमधील जागा पक्की असूनही या वयातही कसोटीत स्वत:ला सिद्ध करायला तो ईंग्लण्डमध्ये ज्या मानसिक कणखरतेने खेळतोय त्या जिद्दीसाठीच त्याला एक सलाम ठोकावासा वाटतोय.

*गेल्या २० वर्षांतल्या सर्वश्रेष्ठ फास्ट बॉलर्सपैकी एक फास्ट बॉलर रिटायर झाला हे नक्की.* >> हो मार्शल नंतर स्टेन परीपूर्ण फास्ट बॉलर वाटला जो सातत्याने सर्व काही करू शकत असे. त्याचे सब काँटिनेंटल मधले आकडे इतके सरस आहेत कि दुसर्‍या क्रमांकावरचा अँडरसन निम्म्यामधे आहे.

इंग्लिश लोक फारच सुरेख गोलंदाजी करतात त्यांच्या वातावरणात व पीच वर. आपल्या स्पीडचा काही उपयोग झाला नाही तशाच वातावरणात. >> हो पेस मागे लेंग्थ वर गडबड झाली तिसर्‍या टेस्ट मधे सुरूवातीला. प्रसिध कृष्णा दोन्ही दिशांनी बॉअलमूव्ह करतो तेंव्हा बहुधा तो आत येईलच.

'फॅब फोर' हा एक दुर्मिळ योगच असतो व आपण तो अनुभवला हें भाग्य समजायचं. हा संघ देखील समतोल आहे, जिद्दी आहे व फलःदाजीतला फाॅर्मचा लपंडाव जरा कमी झाला तर जबरदस्त पण आहे >> प्रामाणिकपणे हा संघ फॅब फोर/फाईव्ह पेक्षा गुणवत्तेमधे भरपूर कमी असला तरी अधिक जिद्दी आहे असे वाटते. अधिक फायटिंग स्पिरीट आहे असे वाटत राहते. फॅब फोर्/फाईव्ह च्या काळात मॅच चा एक पॅटर्न असायचा त्यावरून शेवटी काय होईल ह्याचे भाकीत बहुतांशी करता येत असे (कलकत्त वगैरे अपवाद सोडून द्या). ह्या संघाबाबत असे भाकीत अजिबात करता येत नाही . निकाल दोन्ही बाजूंना कधी स्विंग होईल सांगता येत नाही Happy आपल्या बाजूने बरेचदा अधिक स्विंग होतो हे नेमके आहे.

Pages