Submitted by Filmy on 17 January, 2021 - 10:05
क्रिकेटवरील पहिले पाच धागे -
http://www.maayboli.com/node/1889
http://www.maayboli.com/node/30450
http://www.maayboli.com/node/51908
https://www.maayboli.com/node/60723
https://www.maayboli.com/node/67443
भारत-ऑस्ट्रेलिया टेस्ट मालिका संपत आली आहे. जुन्या धाग्यावरील प्रतिक्रिया ओसंडून वाहत असल्याने परंपरेनुसार २K हून अधिक प्रतिक्रिया असल्याने हा नवा धागा. खेळातला रस निघून जातोय असे वाटत असतानाच नवी पिढी वा जनता असा खेळ करते की गोडी पुन्हा क्रिएट होते. आणि म्हणून हा प्रपंच.
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
मग लॉस कोणाचा झाला ? भारताचा
मग लॉस कोणाचा झाला ? भारताचा की रोहितचा?
अश्विन ला न खेळवणे महागात
अश्विन ला न खेळवणे महागात पडतेय
मॅच फिरवली पोरांनी.
मॅच फिरवली पोरांनी.
मग लॉस कोणाचा झाला ? भारताचा
मग लॉस कोणाचा झाला ? भारताचा की रोहितचा?
>>
अर्थात रोहित चा.
कारकीर्दीतली बहुमूल्य वर्ष बिगर टेस्ट क्रिकेट गेली.
कारकीर्दीतली बहुमूल्य वर्ष
कारकीर्दीतली बहुमूल्य वर्ष बिगर टेस्ट क्रिकेट गेली.>>>टेस्ट न खेळल्याने त्याचा लॉस कसा झाला?
तीन ओव्हर्स मधे तीन बळी...
तीन ओव्हर्स मधे तीन बळी...
१४७ / ६
कम्माल...
मुळे, त्रिफळा!!!! शार्दूल!!!
मुळे, त्रिफळा!!!! शार्दूल!!!
३५ षटके २ बळी हवेत...
३५ षटके २ बळी हवेत...
मला वाटतंय आपण उद्या
मला वाटतंय आपण उद्या संध्याकाळपर्यंत खेळून 400 च्या आसपास टार्गेट देऊ. आणि पाचव्या दिवशी सामना जिंकू.
Submitted by बोकलत on 4 September, 2021 - 12:16>>>> चिते की चाल, बाझ की नजर और बोकलत की भविष्यवाणी पर कभी संदेह नही करना चाहीये. कभी भी मात दे सकती है.
जिथे शर्माने शतक मारले तिथेच
जिथे शर्माने शतक मारले तिथेच विजय पक्का झालेला.
आजवर शर्माने १० वेळा ७५+ स्कोअर केलाय. १० च्या दहा वेळा आपण जिंकलो आहोत. अनिर्णितही नाही हं, जिंकलोच आहोत. त्यामुळे शर्माने ७५ धावा करताच माझी चिंताच मिटली
(No subject)
#शर्मा_द_बॉस_!
After God #शर्मा_द_बॉस_!
After God #शर्मा_द_बॉस_!
मला वाटतंय आपण उद्या
मला वाटतंय आपण उद्या संध्याकाळपर्यंत खेळून 400 च्या आसपास टार्गेट देऊ. आणि पाचव्या दिवशी सामना जिंकू.
हिथे काही लोकांनी बोकलत ची टर उडवलेली होती पण बोकलत चा अंदाजच खरा ठरत आहे. विषय कोणताही असो बोकलत चे प्रतिसाद मजेशीर असतात. बोकलत तेव्हढं अमानवीय धाग्यावर 2-3 करामती येऊ द्या, आजची रात्र अमावसेची आहे.
विजय आणि मालिका पराभव होऊ
विजय आणि मालिका पराभव होऊ नाही शकत!!
आता दडपण इंग्रजांवर!!!
इंग्लंड मधील पहिला विजय ५० वर्षापूर्वी ह्याच मैदानावर!! सुवर्ण महोत्सवी विजय हा!!!
अभिनंदन संघाचे!!!
जिंकलो
जिंकलो
मागे ६० ओवर दिलेल्या तिथे
मागे ६० ओवर दिलेल्या तिथे कोसळलेले.. ते आज काय टिकणार होते..
पीच निर्जीव, हवामानाची साथ
पीच निर्जीव, हवामानाची साथ नाहीं तरीही इंग्लंडच्या 10 विकेटस घेणं गोलंदाजांसाठी कौतुकास्पद. अतिशय अभिमानास्पद विजय ! अभिनंदन !!!
भारी मॅच.. आजची बॉलिंग लय
भारी मॅच.. आजची बॉलिंग लय भारी. कुठल्याही फॉर्मॅटमध्ये बुमराह तितक्याच थंड डोक्याने बॉलींग टाकतो !
दुसर्या इनिंगमधली बॅटींग सगळ्यांचीच भारी. रहाणेची शेवटची मॅच ठरणार बहुतेक.
इंग्लंड मधील पहिला विजय ५० वर्षापूर्वी ह्याच मैदानावर!! सुवर्ण महोत्सवी विजय हा!!!
अभिनंदन संघाचे!!! >>>>> अरे वा.. कुठलाही "पण" "परंतु" न येता अगदी निर्भेळ अभिनंदन तुमच्याकडून आलेलं बघून छान वाटलं कृष्णा
कुठलाही "पण" "परंतु" न येता
कुठलाही "पण" "परंतु" न येता अगदी निर्भेळ अभिनंदन तुमच्याकडून आलेलं बघून छान वाटलं कृष्णा Wink>>>>
जबरदस्त झाली मॅच. शेन वॉर्न
जबरदस्त झाली मॅच. शेन वॉर्न म्हणाला तसं बुमराह च्या त्या भेदक स्पेलने पाटा विकेट, स्वच्छ सुर्यप्रकाश वगैरे गोष्टी तथ्यहीन ठरवल्या. पोस्ट-मॅच सेरेमनीमधेसुद्धा कबुली दिली कि त्या स्पेलमुळे इंग्लंडचा टारगेट चेस करण्याची योजना मोडून पडली. अभिनंदन टीम इंडिया!!
जबरदस्त झाली मॅच. शेन वॉर्न
जबरदस्त झाली मॅच. शेन वॉर्न म्हणाला तसं बुमराह च्या त्या भेदक स्पेलने पाटा विकेट, स्वच्छ सुर्यप्रकाश वगैरे गोष्टी तथ्यहीन ठरवल्या. >> +१ वॉर्न च काय, नासीर हुसेन नि आर्थर्टोन सुद्धा एकदम गागा मोड मधे होते बुमरा च्या त्या स्पेलच्या. मी लव्कर उठून आज बघितले त्याचे सार्थक झाले. कसला स्पेल होता त्याचा नि जाडेजा ! ह्या पिचवर २० षटकांमधे २६-२७ धावा हे त्याचा धसका किती घेतलाय इंग्लिश बॅट्समन नी ते दाखवतय. जिमी ला स्ट्राईक वर यायला लागू नये म्हणून रन आउट व्हायची तयारी होती
उमेशचा पण शेवटचा स्पेल एकदम भारी होता. जाडेजा ची बॉलिंग स्कॅनर खाली आली असती आज जर त्याने विकेट्स घेतल्या नसत्या तर. जाडेजाने घेतली पहिली विकेट, बुमराह चा बेअर स्ट्रो ला टाकलेला स्विंगिंग ञोर्कर , उमेश चा ओव्हर्टन ला टाकलेला बॉल नि ठाकूर चा बर्न्स ला टाकलेला जाफ्फा हे भारी प्रकार होते. कोहलि चा प्रत्येक बॉलिंग चेंज परफेक्ट ठरला. एका वेळी मयांक, यादव, अक्षर हे तिघेही बदली खेळाडू म्हणून मैदानामधे होते ( का ते उघडच आहे)
माझ्यापुरता मॅन ऑफ द मॅच ठाकूर ला नि र्होत ला दुभागून द्यायला हवे होते. ठाकूर ने चारही इनिंग मधे काही ना काही मह्त्वपूर्ण केले आहे.
पुढच्या मॅच मधे ग्रीन पिच असेल हे आता उघड आहे. सिरीज ड्रॉ करायचा तो हमखास उपाय आहे. सिराज्च्या जागी शमी नि राहणेच्या जागी यादव असे बदल बघायला आवडतील.
Most 100s in SENA in Won
Most 100s in SENA in Won matches(Test,ODI,T20I)
(Among Asian Players)
10 - Rohit Sharma
9 - Sachin Tendulkar
9 - Sanath Jayasuriya
9 - Kumar Sangakkara
7 - Sourav Ganguly
7 - Virat Kohli
6 - Saeed Anwar
पण एकंदरीतच आपली लोक नेहमी
पण एकंदरीतच आपली लोक नेहमी मॅच इंटरेस्टींग करण्यात पटाइत असतात. खूपच वरचढ होतोय वाटल की दोन तीन विकेट देउन परत ठोके वाढवायचे. त्यांची बोलिंग बंडल असेल तर मग रन आउट पण चालतो. अस काही करू नका रे बाबांनो.>> अस केलच. शर्दूल आणि पंत खेळले नसते तर मॅच गेलीच होती. जिंकलो तरी दोन्ही जिंकलेल्या कसोटीमधे आपली परिस्थिती एका वेळेस हरल्यातच जमा होती . आपल्या टीमला साबा करीम योयो टीम म्हणाला ते काही चुकिचे नाही.
आपण ३५० करू शकू आणि २५० डिफेंड करू असे मी म्हणालोच होतो.
, शार्दूल नेहमी ब्रेक थ्रू मिळवून देतो असही मी म्हणल होत. काल पहिली विकेट आणि रूटची विकेट टर्निंग पॉइंट होते. माझ्या दृष्टीने पण शार्दूल मॅन ऑफ द मॅच होता. वेल डन टीम इंडिया. रहाणे सोडून सगळ्यांनी कॉन्ट्रीब्यूट केले. तरी रहाणेला शेवटची टेस्ट खेळू द्यावी अस मला वाटत. पण सेंकंड इनिंगला शून्य कॉन्फिडन्ट वाटला. आंधळ्यासारखा सोडत होता आणि पाय पुढे टाकत होता. पण प्रतिकूल परिस्थितीत नविन खेळाडू घ्यायचा म्हणजे रिस्क आहे.
मँचेस्टरला ग्रीन टॉप तर असेलच. अश्विन परत बाहेर बसणार. नाईलाज आहे. हॉर्सेस फॉर कोर्सेस. पण कोण फिट आहे कोण नाही अजून बाहेर आले नाही. रोहित, पुजारा जखमी होते. दोन दिवसात बरे होवोत. शमीच काय करायच. कुणाला काढणार.
*पुढच्या मॅच मधे ग्रीन पिच
*पुढच्या मॅच मधे ग्रीन पिच असेल हे आता उघड आहे.* - पण भारताच्या सध्याच्या 'पेस अटॅक'मुळे इंग्लंडसाठीं तें दुधारी हत्यारही ठरणार आहे. शिवाय, इंग्लंडची फलंदाजी बव्हंशी एकखांबी तंबू झालाय तर आपलं शेपूटही फाॅर्मात येतंय. एकंदरीत, ' ग्रीन पिच ' असलं तरीही भारतापेक्षा इंग्लंडच अधिक दबावाखाली असणार .
*...तरी रहाणेला शेवटची टेस्ट खेळू द्यावी अस मला वाटत. * - तसंच होणार, असं मलाही वाटतं. व तो धाडसी निर्णय कौतुकास पात्र ठरेल, असंही वाटतं. ( पण रहाणेला संधी दिलीच, तर त्याला त्याच्या नेहमीच्या क्र. 5वरच खेळवावं असं मात्र निश्चितपणे वाटतं )
तरी रहाणेला शेवटची टेस्ट खेळू
तरी रहाणेला शेवटची टेस्ट खेळू द्यावी अस मला वाटत>>>>

चौथी कसोटी जिंकलो म्हणूनच
चौथी कसोटी जिंकलो म्हणूनच रहाणेला अजून एखादा चान्स द्यावा अस वाटण्याची शक्यता आहे. परंतु रहाणेला भरपूर चान्स मिळाले आहेत, कसोटी मालिका जिंकण्याची संधी असताना रहाणेला बसवणेच योग्य आहे. एक तर रहाणे धावा तर करतच नाही पण खेळताना त्यामध्ये जरासुद्धा आत्मविश्वास दिसत नाही. सुर्यकुमार राहानेच्या जागी योग्य वाटतोय.
रहाणेला अंतिम कसोटीत खेळवावं
रहाणेला अंतिम कसोटीत खेळवावं कीं नाहीं यावर तीव्र मतभेद असणं अपरिहार्य आहे. माझं म्हणणं त्याला खेळवावाच असं नसून, त्याला बहुदा खेळवतीलच असं आहे व त्याचं कारण *चौथी कसोटी जिंकलो म्हणूनच रहाणेला अजून एखादा चान्स द्यावा अस वाटण्याची शक्यता आहे* हें नसेल. अंतिम कसोटीत मालिका बरोबरीत संपवण्यासाठी इंग्लंड शर्थीचे प्रयत्न करणार व सर्व प्रकारचीं दबावतंत्र वापरणार हें निश्चित. अशा परिस्थितीत नवीन खेळाडूपेक्षा अनुभवी खेळाडू अधिक उपयुक्त ठरण्याची शक्यता अधिक. फाॅर्म नसूनही याच कारणासाठी रहाणेला खेळवण्याचा धोका पत्करला जाण्याची खूप शक्यता वाटते. तसं झालंच, तर मात्र तो प्रयोग यशस्वी व्हावा अशी मनोमन इच्छा आहे, हें मान्य.
पण प्रतिकूल परिस्थितीत नविन
पण प्रतिकूल परिस्थितीत नविन खेळाडू घ्यायचा म्हणजे रिस्क आहे.
>>>>>
नवीन नका घेऊ, जुनाच घ्या. विहारी वा मयंक घ्या. रहाणे प्रतिकूल काय अनुकूल काय, अगदी पाटा विकेट दिली तर काहीतरी गबाळ्यासारखा खेळून बाद होणार असे वाटते. नेहमी तो फलंदाजीला आल्यावर आता कधीही बाद होणार या धकाधकीत अजून आयुष्य जगावेसे नाही वाटत आता.
आणि त्याला ब्रेक देणे खरेतर त्यासाठीच चांगले आहे. त्याचे नशीब चांगले आहे की हा सामना जिंकलो. जर हरलो असतो तर विचार करा त्याने किती शिव्या खाल्या असत्या. जर पाचव्या सामन्यात पुन्हा असाच त्याचा फ्लॉप शो झाला. पण तो सामना आपण न जिंकता हरलो तर आतापर्यंत न पडलेल्या शिव्या बिचारा एकत्रच खाईल.
भारतात एखाद्या लिजंडसारखा कसोटी खेळणारा शर्मा जेव्हा या ईंग्लंड दौर्यात सुरुवातील थर्टीजमध्ये बाद होता, जो सुद्धा एक चांगला परफॉर्मन्स होता, कारण नवीन बॉल व्यवस्थित खेळून काढायचा, तरीही याला अजून ओपनर म्हणून किती चान्स देणार, याकडे तंत्र आणि टेंपरामेंट वगैरे नाही म्हणून ओरडा व्हायचा. पण प्रत्यक्षात त्या खेळींचीही वॅल्यु अशी होती की शर्माने कोहलीला देखील कसोटी मानांकनात मागे टाकले.
आणि आज रहाणे टोटल फ्लॉप जात आहे हे समजून ऊमजूनही केवळ वैयक्तिक आवडीपोटी त्याची पाठराखण करण्यात काही अर्थ नाही.
बर्र त्याला असेच खेळवतच राहिले तर कधी ना कधी तो खेळणारच. पण त्याला खरेच काही अर्थ आहे का? कन्सिस्टन्सी नावाचा प्रकार रहाणेला माफ का? जे शर्मा दर चौथ्या पाचव्या सामन्याला शतक मारूनही त्याचे ते सामने वगळता उरलेल्या सामन्यांचा एवरेज ३२-३४ आहे म्हणत तो कन्सिस्टंट नसल्याचा त्यावर आरोप होतो
मराठी माणूस आहे, वैयक्तिक आवडीचा आहे, ठिक आहे. पण हे संघहिताच्या कधीच आड आले नाही पाहिजे.
*मराठी माणूस आहे, वैयक्तिक
*मराठी माणूस आहे, वैयक्तिक आवडीचा आहे, ठिक आहे. पण हे संघहिताच्या कधीच आड आले नाही पाहिजे.* निवड समिती त्याला या कारणासाठी संघात घेईल किंवा त्याला अजून संघात ठेवलं असं वाटतं का ? आणि, संघहित कळणं ही कुणाची मक्तेदारी आहे का ? आपल्यापेक्षा वेगळं मत असणं म्हणजे सघहिताशी गद्दारी होते का ?
रहाणेला आतां संघात घेणं साफ चूकीचं वाटणः, यांत कांहींच गैर नाहीं. पण समजा निवडसमितीने वेगळा विचार करून जाणीवपूर्वक त्याला संघात घेतला, तर तो वेगळा विचार काय असूं शकतो, हें समजून घ्यायलाही आक्षेप कां असावा.
निवडसमिती पार्शिअल नसतेच वा
निवडसमिती पार्शिअल नसतेच वा संघनिवडीत राजकारण होतच नाही, कर्णधाराचे आवडते नावडते असे कोणी नसतेच वगैरे वगैरे हे गृहीतक असेलच पुन्हा
Pages