Submitted by Filmy on 17 January, 2021 - 10:05
क्रिकेटवरील पहिले पाच धागे -
http://www.maayboli.com/node/1889
http://www.maayboli.com/node/30450
http://www.maayboli.com/node/51908
https://www.maayboli.com/node/60723
https://www.maayboli.com/node/67443
भारत-ऑस्ट्रेलिया टेस्ट मालिका संपत आली आहे. जुन्या धाग्यावरील प्रतिक्रिया ओसंडून वाहत असल्याने परंपरेनुसार २K हून अधिक प्रतिक्रिया असल्याने हा नवा धागा. खेळातला रस निघून जातोय असे वाटत असतानाच नवी पिढी वा जनता असा खेळ करते की गोडी पुन्हा क्रिएट होते. आणि म्हणून हा प्रपंच.
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
मुळे चक्क बोल्ड उमेश यादव!!!
मुळे चक्क बोल्ड उमेश यादव!!!
मुळे चक्क बोल्ड उमेश यादव!!!
मुळे चक्क बोल्ड उमेश यादव!!!
*मुळे चक्क बोल्ड उमेश यादव!!!
*मुळे चक्क बोल्ड उमेश यादव!!!* -
उद्या पहिलं सत्र भारतासाठी महत्वाचं. वातावरण ढगाळच असणार आहे !
फेरफटका, माझे क्रिकेटचे ज्ञान
फेरफटका, माझे क्रिकेटचे ज्ञान माझ्या निरीक्षणातून आले आहे. कुठल्या पुस्तकात काय लिहिले आहे वा द्वारकानाथ संझगिरींनी कुठल्या लेखात काय लिहिले आहे ते वाचून नाही.
वर उल्लेखलेले याच धाग्यात मी मागेच लिहिलेले
महेंद्रसिंग धोनी उर्फ माही ... एका पर्वाचा अस्त ??
https://www.maayboli.com/node/54427
तेव्हाही कर्णधारबदल वा सत्ताबदल होताना संघात दुफळी माजलेली. आश्विन रैना हे धोनीच्या बाजूने होते. तर रहाणे हा कोहली-शास्त्री जोडीच्या बाजूने. सारे उल्लेख वरच्या लेखात सापडतील.
जेव्हा कोहली कसोटीचा कर्णधार झालेला तेव्हा कसा कसोटीतच फॉर्मला असायचा आणि कसा वन डे मध्ये विकेट फेकून जायचा जे आपण कित्येक सामने गमावले, अगदी बांग्लादेशशीही मालिका हरलो. अगदी न्यूजमध्येही यायचे की कसोटीत चमकणारा कोहली अचानक वनडे येताच फ्लॉप का जातोय, आणि पुन्हा कसोटी येताच कसा खेळू लागतोय. कारण कसोटीत तो कर्णधार झालेला आणि वन डे मध्ये धोनीचा पत्ता कट करायचा होता. बांग्लादेशशी मालिका हरल्यावर धोनी अखेर नाईलाजाने स्वतः पुढे खेळायला आलेला. आणि स्वतः खेळून एक सामनाही जिंकवलेला. पण किती लढणार यांच्या राजकारणाशी. शेवटी कर्णधारपदावरून पायऊतार झाला.
असो, संघनिवडीत राजकारण होतच नाहीत हा फार भाबडा विचार आहे. राजकारणाने आजवर कित्येकांची कारकिर्द सडवली गेली आहे. तरी ज्याला डोळे मिटून फक्त क्रिकेटचा आनंद घ्यायचा आह त्याने खुशाल घ्यावा. मी तरी एक क्रिकेटप्रेमी म्हणून जिथे राजकारण दिसते तिथे बिनधास्त बोलणार
"वर उल्लेखलेले याच धाग्यात मी
"वर उल्लेखलेले याच धाग्यात मी मागेच लिहिलेले" - हे लई भारी आहे. कुठलाही अभ्यास न करता, स्वतःच मनाचे श्लोक रचायचे आणी मग तेच रेफरन्सेस म्हणून कोट करायचे. मला ते नित्यानंद चं 'me in me telling me to pay respect to me' आठवलं. मग चालू दे! 'ऑम्लेट भी मैं ही बनाऊंगा और वह खाने के लिए ब्रेड भी मैं ही बेचूंगा!
"अगदी न्यूजमध्येही यायचे की कसोटीत चमकणारा कोहली अचानक वनडे येताच फ्लॉप का जातोय" - ह्याला न्यूज नाही, गॉसिप, कॉन्स्पिरसी थियरी ई. म्हणतात. बातम्यांना सोर्स असतात, क्रेडिबिलिटी असते.
"संघनिवडीत राजकारण होतच नाहीत हा फार भाबडा विचार आहे." - जे मी म्हटलंच नाही, ते माझ्या तोंडी घालू नकोस. ह्या विषयावर मी मतंच दिलेलं नाही. स्वतःला हवा तिथे विषय वळवून, स्वतःला म्हणायचं त्याचाच धोषा लावायचा आणि अंगावर बेतलं कि वेड पांघरून पेडगावला जायची तुझी सवय चिरपरिचीत आहे इथे.
असो.. मागे मी ज्या ठिकाणी हे संभाषण सोडलं होतं तेच परत म्हणीन. आपण इथे क्रिकेटवर बोलू. मॅचवर बोलू. प्लेयर्स च्या फॉर्मवर आणि स्किल्स वर बोलू. ह्या गॉसिप्समधून काही साध्य होणार नाही. तू काल टीम काँबिनेशनवर एक कॉमेंट केली होतीस, जी पटल्यावर मी 'makes sense' असा प्रतिसाद सुद्धा दिला होता. पण वादासाठी वाद घालण्यात मला इंटरेस्ट ही नाही आणि तितका वेळही नाही.
उमेश ने रूट ला काढून अचानक
उमेश ने रूट ला काढून अचानक मॅच बॅलन्स मधे आणून ठेवली आहे. उद्या पहिल्या तासात जर इंग्लंड च्या आणखी २ -३ (?) विकेट्स भारताने काढल्या तर game on!! वोक्स मुळे इंग्लंड ची टेल अजूनच भक्कम झाली आहे. त्यामुळे विकेट्स गरजेच्या आहेत.
मला ते नित्यानंद चं 'me in me
मला ते नित्यानंद चं 'me in me telling me to pay respect to me' आठवलं >> खरच भारी आहे हे.
प्रामाणिकपणे मला दर दोन तसांनी ढगाळ हवा नि त्याप्रमाणे नाचणारा बॉल नि मग एकदम सुपर सनशाईन नि पाटा झालेले पिच ह्यांच्यामधली पाठशिवणी बघायचा कंटाळा आलाय. खेळाडूंचा कस लागावा वगैरे ह्याबद्दल दुमत नाही पण कसिस्टंसी एक किमान काही वेळ तरी असावी ना. डाऊन अंडर विकेट्स म्हणूनच भारी वाटतात. बहुतांशी इंग्लिश बॉलर्स जे इथे धुमाकूळ घालतात ते मग ऑस्ट्रेलिया किंवा भारतात आले कि सपशेल नांगी का टाकतात हे उघड आहे.
*बहुतांशी इंग्लिश बॉलर्स जे
*बहुतांशी इंग्लिश बॉलर्स जे इथे धुमाकूळ घालतात ते मग ऑस्ट्रेलिया किंवा भारतात आले कि सपशेल नांगी का टाकतात हे उघड आहे.* - भारतात धुमाकुळ घालणारे फलंदाज व गोलंदाज इथे नांगी टाकतात हेंही उघड आहेच कीं. 'पण कसिस्टंसी एक किमान काही वेळ तरी असावी ना. ', तसंच,' पहिल्या दिवसापासूनच चेंडू फक्त हातभर वळतच रहावा' इतकी कसिस्टंसी पण नसावी ना.
आपण जिथे खेळायला जातो, तिथे तिथल्या परिस्थितीबाबत तक्रार न करतां आपलं कसब दाखवावं, हें उत्तम.
अहो फेरफटका वर कोणीतरी म्हटले
अहो फेरफटका वर कोणीतरी म्हटले की रहाणेला अजूनही का खेळवतात तर त्याला ऊत्तर म्हणून मी त्याला कोहलीचा लाडका माणूस म्हटले यावर आपणच आक्षेप घेत वाद घालायला आलात.
तसेच हे सुद्धा म्हणालात की,
फेव्हरिझम विषयी बोलायचं तर द्वारकानाथ संझगिरी च्या मते रहाणे ला कोहली चा पाठिंबा नाहीये. कोहली ला तो आवडत नाही म्हणून त्याची ही अवस्था आहे...
मग आता द्वारकानाथ संझगिरी आपल्या लेखात कोण कोणाचा आवडता नावडता करत असतील तर मी मायबोलीवर तसे लिहिल्याने काय आभाळ कोसळतेय
बाकी द्वारकानाथ संझगिरींचे म्हणने ऐकून अजून हसायला येते. रहाणे कोहलीचा नावडता म्हणे. अरे कोहलीसारख्या माणसाने नावडत्या खेळाडूला ईतक्या अपयशी काळात ईतके सांभाळून घेतले असते का?
बाकी आवडते नावडते असणे हे कर्णधार नाही तर चाहत्यांनाही लागू. जे ईथेही दिसून येते.
रहाणे ईथे ज्यांचा आवडता आहे त्यांना त्याला अजून संधी द्यावीशी वाटत होती. याऊलट शर्मा नावडता ज्यांचा आहे त्यांना त्याने कितीही यश मिळवले तरी त्यात खुसपट काढण्यातच आनंद मिळतो. अर्थात हे हुमायुन नेचर आहे. यात काही गैर नाही. धोनीनंतर सध्याच्या संघात पंत आणि शर्मा माझे आवडते खेळाडू आहेत तर मलाही त्यांचे एक्स्ट्रा कौतुक आहेच
आज काय म्हणतोय हवामानाचा
आज काय म्हणतोय हवामानाचा अंदाज?
पहिल्या १०-१२ षटकात वर्चस्व गाजवेल तो संघ मजबूत स्थितीत येईल.
*पहिल्या १०-१२ षटकात वर्चस्व
*पहिल्या १०-१२ षटकात वर्चस्व गाजवेल तो संघ मजबूत स्थितीत येईल.* तसं आपण गाजवणार असं वाटत असतांनाच पहिल्या गोलंदाजी बदलामुळे माशी शिंकली ! शारदूल व सिराजचया पहिल्या दोन-दोन बेशिस्त षटकानी आपली खेळावरील पकड ढिली केली.
"मी त्याला कोहलीचा लाडका
"मी त्याला कोहलीचा लाडका माणूस म्हटले यावर आपणच आक्षेप घेत वाद घालायला आलात." - ह्याला कारणं दोनः एक म्हणजे कुठलाही आधार नसलेलं गॉसिप होतं हे. आणि दुसरं म्हणजे, 'म्हातारी मेल्याचं दु:ख नसतं पण काळ सोकावतो'.
"कोहलीसारख्या माणसाने नावडत्या खेळाडूला ईतक्या अपयशी काळात ईतके सांभाळून घेतले असते का?" - परत एकदा, "अॅड सॉल्ट टू टेस्ट' वालं होम-मेड लॉजिक! - ह्यालाच गॉसिप्स म्हणतात. बीसीसीआय चं गेल्या २० वर्षांत (मॅच फिक्सिंग नंतर जेव्हा गांगुली कॅप्टन झाला तेव्हापासून) बदललेलं धोरण आहे हे. खेळाडू जेव्हा इंटरनॅशनल लेव्हल ला इंडियन टीम मधून खेळायला पात्र ठरतात, तेव्हा त्यांना long rope दिला जातो. बॅडपॅच मधे संभाळून घेतलं जातं. ह्यात लाडक्या-दोडक्याचा संबंध नाहीये. ह्या धोरणामुळे कितीतरी चांगले प्लेयर्स इंडियन टीम ला मिळाले आहेत. उदा. युवराज सिंग, रोहित शर्मा, रविंद्र जडेजा, इशांत शर्मा . काही प्लेयर्स ना ह्यामुळे बर्यापैकी इंटरनॅशनल करिअर्स सुद्धा मिळाली. उदा. मोहित शर्मा. आणि काही प्लेयर्स ह्याचा उपयोग नाही करून घेऊ शकले. उदा. वन-डे मधे रहाणे, संजू सॅमसन, दिनेश मोंगिया. पूर्वी असं नव्हतं. एखाद्या खराब सिरीज नंतर प्लेयर्स ना ड्रॉप केलं जायचं किंवा कॅप्टन्सी जायची. तेचा हा धोरणातला बदल आहे. फेव्हरिझम नाही.
तुझ्या आवडत्या प्लेयर्स चं तू कौतुक कर. ह्यात अनैसर्गिक काही नाही. पण गॉसिप्स / कस्पिरसी थियरीज पेक्षा क्रिकेटची मुद्देसूद चर्चा इथे व्हावी असं वाटलं म्हणून हा इतका मोठा प्रतिसाद लिहीला.
भारतीय क्रिकेटमध्ये धोरण आहे
भारतीय क्रिकेटमध्ये धोरण आहे फेव्हरीझम नाही हाच तो भाबडेपणा.. किंबहुना सध्या सोयीने केलेले विधान. असो
१०० चा लीड आहे. ३५० धावा हव्या आहेत. त्यासाठी १०० ची सलामी गरजेची. शर्मा राहुल तयार व्हा...
आघाडी 99 ची आहे, 78 पेक्षा
आघाडी 99 ची आहे, 78 पेक्षा बरीच जास्त, डावाने पराभव शक्यता नाकारू शकत नाही
*बहुतांशी इंग्लिश बॉलर्स जे
*बहुतांशी इंग्लिश बॉलर्स जे इथे धुमाकूळ घालतात ते मग ऑस्ट्रेलिया किंवा भारतात आले कि सपशेल नांगी का टाकतात हे उघड आहे.* - भारतात धुमाकुळ घालणारे फलंदाज व गोलंदाज इथे नांगी टाकतात हेंही उघड आहेच कीं. 'पण कसिस्टंसी एक किमान काही वेळ तरी असावी ना. ', तसंच,' पहिल्या दिवसापासूनच चेंडू फक्त हातभर वळतच रहावा' इतकी कसिस्टंसी पण नसावी ना.
आपण जिथे खेळायला जातो, तिथे तिथल्या परिस्थितीबाबत तक्रार न करतां आपलं कसब दाखवावं, हें उत्तम. >> तसे नाही भाऊ. जी काही कसिस्टंसी असेल ते अतिशय कमी वेळेपुरती नसावी नि दोन्हीस अंघांना सारखीच मिळत राहावी असे माझे म्हणणे आहे. इंग्लंडच्या दर दोन तसागणीक बदलत्या हवेनुसार बॉलर ची भेदकता एकदम ह्या टोकापासून त्या टोकापासून बदलतेय. ह्याउप्पर मी पहिल्या दिवशी हातभर वळणारा बॉल नक्कीच प्रीफर करेन. किमान तो चारी डाव तसाच वळत राहतोय. प्रश्न बॅटसमन ची क्वालिटी फक्त कसब हाच नाहीये तर किमान एक कसिस्टंट बेसलाईन प्रत्येक बॅट्समन ला मिळावी हा आहे. ह्यासाठीच मी ऑस्ट्रेलियाचा उल्लेख केला होता. असो, आपले ह्या विषयावर एकमत होणे अशक्य आहे.
बीसीसीआय चं गेल्या २० वर्षांत (मॅच फिक्सिंग नंतर जेव्हा गांगुली कॅप्टन झाला तेव्हापासून) बदललेलं धोरण आहे हे. खेळाडू जेव्हा इंटरनॅशनल लेव्हल ला इंडियन टीम मधून खेळायला पात्र ठरतात, तेव्हा त्यांना long rope दिला जातो. बॅडपॅच मधे संभाळून घेतलं जातं >> +१
भारतीय क्रिकेटमध्ये धोरण आहे फेव्हरीझम नाही हाच तो भाबडेपणा. >> मी मागे म्हणालो तसे कसलाही काडीचाही पुरावा नसताना, केवळ आपल्या कल्पना रंजनामधून (इथे अजून कडक शब्द घालायचा मोह आवरतोय) इतरांच्या कॅरॅक्टरवर अकारण संशय घेण्याच्या मनोव्रुत्तीपेक्षा हा भाबडेपणा चांगला गुण आहे रे नक्की.
बुमरा ची इंजरी सिरीयस नसावी अशी आशा धरूया. अजूनही तो आला कि विकेट कधीही पडेल असे वाटत राहते. क्लासिक फास्ट सीम बॉलर च्या व्याख्येमधले काही नसताना तो जे काही करून दाखवतोय ते अचाट आहे. व्हॉट अ प्लेयर.
"भारतीय क्रिकेटमध्ये धोरण आहे
"भारतीय क्रिकेटमध्ये धोरण आहे फेव्हरीझम नाही हाच तो भाबडेपणा.. किंबहुना सध्या सोयीने केलेले विधान. असो" - तुला ऐकून, समजून घ्यायचंच नाही असं तू ठाम ठरवलं आहेस. त्यामुळे नाइलाज आहे. ह्या गोष्टी डॉक्युमेंटेड आहेत, पण तू तुला सोयिस्कर असेल तेव्हा 'मी बाकी वाचत नाही, माझं माझं ठरवतो' असे सोयिस्कर पवित्रे घेतोस. तेव्हा तुझा आडमुठेपणा तुला लखलाभ. तुझा दोष नाही ह्यात. प्रत्येकाचे अनुभव असतात, आकलनशक्ती असते, मतं असतात, दॄष्टीकोन असतात. ह्या सगळ्याचा आदर आहेच. एन्जॉय!
"बुमरा ची इंजरी सिरीयस नसावी
"बुमरा ची इंजरी सिरीयस नसावी अशी आशा धरूया. अजूनही तो आला कि विकेट कधीही पडेल असे वाटत राहते. " - बुमराह ने नंतर पण बॉलिंग केली. त्यामुळे तो ठीक असावा अशी आशा आहे. तू म्हणतोस ते खरं आहे. तो बॉलिंग ला आला कि कधीही विकेट पडेल असं वाटतं.
एखादे धोरण डोक्युमेण्टेड आहे
एखादे धोरण डोक्युमेण्टेड आहे म्हणजे तसेच घडते हाच तो भाबडेपणा.
त्यानुसार भारतात भ्रष्टाचार शून्य असायला हवा नाही
द्वारकानाथ संझगिरींनी कोण कोणाचे आवडते नावडते ठरवताना काही पुरावे दिलेले की ते सुद्धा माझ्यासारखे आहेत
*आपले ह्या विषयावर एकमत होणे
*आपले ह्या विषयावर एकमत होणे अशक्य आहे.* ह्यावर मात्र एकमत !
आतां विकेट बरी आहे, चेंडू कमी स्विंग होतोय, आऊटफिलड फास्ट आहे त्यामुळे आपली मजबूत पण काहीशी हादरलेली व मरगळलेली फलंदाजी बहरात यावी ही सार्थ व वाजवी अपेक्षा. 33 -0ची सुरवात याचे संकेत देतेय असं समजायला हरकत नसावी.
असामी सहमत. बुमरा एकच बॉलर
असामी सहमत. बुमरा एकच बॉलर असा आहे, की जो इंडिपेंडंटली ऑफ द सरफेस ऑपरेट करतो. त्यामुळेच तो कुठेही विकेटटेकिंग वाटतो. ही खूप ग्रेट एबिलिटी आहे, पण जिथे सरफेस/वातावरण असिस्ट करतात तिथे कधीकधी इतर लोक (अँडरसनसारखे किंवा रॉबिन्सनसारखे) पेस ॲडजस्ट करून स्किड/स्विंग वगैरे करून भाव खाऊन जातात.
बुमराह गोलंदाजीला आला कि
बुमराह गोलंदाजीला आला कि विकेट कधीही पडेल असे वाटत राहते.
+७८६
रहाणे फलंदाजीला आले की हल्ली सेम वाटते
जोक्स द अपार्ट, या इनिंगला रहाणे खेळावा. पण ती इनिंग मॅच जिंकवण्यास हातभार लावणारी असावी अशी ईच्छा. जर सामना हरलो आणि रहाणेने वैयक्तिक अर्धशतक करून जागा वाचवली तर झाले कल्याण...
दिवसाखेरीस ४३-०
दिवसाखेरीस ४३-०
शर्मा आणि राहुलने अपेक्षेप्रमाणे दिवस खेळून काढला. शर्मा नाबादच जाणार याची तर खात्रीच होती.
जोपर्यंत आपली सलामी जोडी फुटत नाही, स्पेशली शर्मा बाद होत नाही तोपर्यंत मॅच फार आश्वासक वाटते. या दौऱ्यावर शर्माला खेळताना बघताना हा कधीही आऊट होईल असे वाटत नाही. एखादा लूज शॉट खेळला तर ती नाराजी दिसते त्याच्या चेहऱ्यावर. आपल्या पुलशॉट फटक्याच्या ईगो वरही नियंत्रण मिळवलेय असे वाटते. कमालीच्या निग्रहाने खेळतोय तो ही मालिका. दुर्दैवाने तो असताना आपण डॉमिनेटींग सिच्युएशनला असे फार गेलोच नाही. त्यामुळे त्याची मुक्त फटकेबाजी मिस होतेय. पण ओवरऑल शर्मा जे टेकनिक आणि डेडीकेशन दोन्ही दाखवतोय ते एक रोहीतप्रेमीच नाही तर एक कसोटीप्रेमी म्हणून फार आवडतेय. शर्माचे शतक व्हावे आणि भारत सामना जिंकावा. तो हे डिजर्व्ह करतोय.
"एखादे धोरण डोक्युमेण्टेड आहे
"एखादे धोरण डोक्युमेण्टेड आहे म्हणजे तसेच घडते हाच तो भाबडेपणा." - तुला खरंच समजत नाही, कि तू वेड पांघरून पेडगावला जातोस हे तुलाच ठाऊक. धोरण डॉक्युमेंटेड आहे, केसेस सुद्धा डॉक्युमेंटेड आहेत.
"त्यानुसार भारतात भ्रष्टाचार शून्य असायला हवा नाही" - तुलाच माहित असेल. तू सरकारी नोकरीत होतास ना.
"द्वारकानाथ संझगिरींनी कोण कोणाचे आवडते नावडते ठरवताना काही पुरावे दिलेले की ते सुद्धा माझ्यासारखे आहेत " - शोध बाबा तुझं तूच. तुला उदाहरण, अॅनलॉजी वगैरे कसं सोयिस्कररित्या समजत नाही हे पाहून मजा येते.. पण ह्या निमित्तानं, तू पुरावे न देता बोलतोस हे कबूल केलंस हे ही नसे थोडके.
जिथे सरफेस/वातावरण असिस्ट
जिथे सरफेस/वातावरण असिस्ट करतात तिथे कधीकधी इतर लोक (अँडरसनसारखे किंवा रॉबिन्सनसारखे) पेस ॲडजस्ट करून स्किड/स्विंग वगैरे करून भाव खाऊन जातात.>> अँडरसन ची भारतातली बॉलिंग बघून त्याच्यात नि बुमरा मधे ओव्हरलॅप आहे असे पण वाटते.
*आपले ह्या विषयावर एकमत होणे अशक्य आहे.* ह्यावर मात्र एकमत ! >>
पिंडे पिंडे मतिर्भिन्नता असे म्हणूया
(हा एकदम चपखल बसत नाही हे मान्य)
द्वारकानाथ संझगिरींनी कोण कोणाचे आवडते नावडते ठरवताना काही पुरावे दिलेले की ते सुद्धा माझ्यासारखे आहेत >> किती रे "उचलली जीभ, लावली टाळ्याला" करतोस ? तू नि ते सारखेच का ? क्रिकेट ची तुझ्यापेक्षा अधिक समज आहे त्यांना, तू जेंव्हा जन्माला आला नव्हतास तेंव्हापासून क्रिकेट कव्हर करत आले आहेत ते. भल्या भल्या क्रिकेटरांशी पर्सनल इंटरअॅक्शन असलेला माणूस आहे. अगदी त्यांच्या प्रत्यक्ष भेटी मधे त्यांनी सांगितलेले किस्से तर अधिकच खुमासदार होते. तुझ्यासारखे 'मै बोले सो' लिहित नाहित ते. अर्थात वाचन हा तुझा प्रांत नसल्यामूळे तुला माहित नसणे समजू शकतो. पण कमीत कमी नाव तरी माहित असेल अशी अपेक्षा होती
ओके. म्हणजे द्वारकानाथांच्या
ओके. म्हणजे द्वारकानाथांच्या लेखातही कोण कोणाचा आवडता नावडता करताना पुरावे नसतात हे समजले. फक्त ते मोठे माणूस आहेत म्हणून त्यांनाही वेगळा न्याय आणि मला वेगळा न्याय
आता मला संझगिरीच कोण हे माहीत नाही हे आपले बळंच. किंबहुना फेरफटका यांच्या उपमांनी भरलेल्या पोस्ट पाहता मी त्यांना दोनेक वेळा मायबोलीचे द्वारकानाथ संझगिरी असेही म्हटलेय. हवे तर शोधून देतो त्या पोस्ट
असो, हातच्या कांकणाला आरसा कश्याला, तसे जे निरीक्षणातून सामान्य जनतेला कळते त्याला पुरावा लागत नाही. जसे की धोनी कर्णधार असताना त्याचेही काही लाडके खेळाडू होते ज्यांना तो फेव्हरीझम करायचा आणि काही नवडते होते ज्यांचा पत्ता कट होईल हे त्याने पाहिले. पण आता माझ्याकडे पुरावे नसल्याने मी नाव घेत नाही
अरे हो, विजेटीआयला असताना
अरे हो, विजेटीआयला असताना द्वारकानाथ संझगिरी यांनी एक्स्टर्नल म्हणून माझी वायवा घेतली आहे.
मायबोलीवर तो धागाही आहे. बहुधा अर्धवटच लिहिलेला तो किस्सा. मिळाल तर शोधतो
मला पण वाटतंय रहाणे कोहलीचा
मला पण वाटतंय रहाणे कोहलीचा आवडता असावा. नाहीतर इतक्या संधी त्याला मिळाल्या नसत्या. गेली चार पाच वर्षे सातत्याने फ्लॉप होत आहे तो. आणि रहाणे जाता जाता त्याचा फॉर्म कोहलीला देऊन जातोय. एकंदर कठीण आहे. यावर एकच उपाय तो म्हणजे रोहितला कॅप्टनशीप देणे.
जर भारतीय क्रिकेट संघाचा
जर भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार कोण हे क्रिकेटप्रेमींच्या मतदानावर निवडले गेले असते तर कसोटीची कल्पना नाही पण लिमिटेडमध्ये नक्कीच शर्मा कर्णधार असता.
मी असे पोल पाहिले आहेत.
मॅच कोण जिंकणार हेही
मॅच कोण जिंकणार हेही क्रिकेटप्रेमींच्या मतदानावर निवडले गेले असते तर भारताला फार फायदा झाला असता.
आपण महाराष्ट्राचा
आपण महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आणि देशाचा पंतप्रधान सामान्य लोकांच्या मतांवरच निवडतो. पुढे राज्य आणि देश चालवायचे काम त्यांचे.
तसे कर्णधार क्रिकेटप्रेमींच्या मतावर निवडावा, पुढे संघाला जिंकवून द्यायचे काम त्याचे. आणि शर्मा तर यात एक्स्पर्ट आहे
Pages