अमानवीय...? - ३

Submitted by बोकलत on 7 February, 2020 - 23:44
halloween bates hotel

अमानवीय -२ धाग्याने दोनहजारी गाठली. त्यामूळे पुढील चर्चा करण्यासाठी हा धागा.

या पुर्वीचे धागे खालील लिंकवर आहेत.

अमानवीय...?
https://www.maayboli.com/node/12295

अमानवीय...? - १
https://www.maayboli.com/node/49229

अमानवीय...? - २
https://www.maayboli.com/node/66431

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Use group defaults

मानवीय धागा आहे का ? आमचे लोक तिथे अनुभव लिहू शकतील.
Submitted by पारंबीचा आत्मा

त्यासाठी अआत्मीय धागा काढा.

काही दिवसांपूर्वी आम्ही जिथे राहतोय तिथले एक कुटुंब गावी गेले. त्यांच्या एका नातेवाईकाचं निधन झालं होतं. साधारण दोन आठवडे ते घर बंदच होतं. दोन आठवड्यानंतर ते कुटुंब पुन्हा घरी आलं तेव्हा कोणीही त्यांच्याकडे जात न्हवतं. कोणी साधं विचारपूस करायलाही जात न्हवतं. मला आश्चर्य वाटलं. मी जाणार होतो पण कामाच्या गडबडीत तसंच राहून गेलं. शेवटी काल रविवारी वेळ काढला आणि त्यांच्या घरी थोडा वेळ जाऊन आलो. काका काकी दोघांचंच कुटुंब होतं. ते चहाचा आग्रह करत होते पण नातेवाईक गेल्यावर साहजिकच ते दुःखात होते त्यामुळे चहा पाणी न घेता लगेच निघालो. घरी आलो तर शेजारचे काका बोलले कुठे गेला होतास. मी बोललो ते पलीकडे काका राहतात त्यांच्याकडे जाऊन आलो. काका थोडे आश्चर्यचकित झाले. विचारलं कोण होतं घरी? मी घडलेलं सगळं सांगितलं तसं काकांना भोवळ आली. शुद्धीवर आले तेव्हा त्यांना खूप ताप भरला होता. त्यांनी मला जवळ बोलवलं आणि सांगितलं त्या घरातले काका काकी परत येत होते तेव्हा त्यांच्या गाडीचा अपघात झाला आणि दोघेही त्यात गेले. ते ऐकून मला वाईट वाटलं. मी दूरवर त्या घराकडे नजर टाकली तेव्हा काका काकी माझ्याकडे खिडकीतून पाहत उभे होते.

बोकालात तुम्ही काका काकींकडे पुन्हा जाऊन या.. बहुतेक त्यांना तुम्हाला काहीतरी सांगायचे असेल.. म्हणूनच ते तुमच्याकडे खिडकीतून बघत असतील. त्यांचा अपघात कोणीतरी घडवून आणला असेल प्रॉपर्टीसाठी आणि तुमच्यामार्फत त्याना सुड घायचा असेल तर..

खिडकीजवळ बोकलत गेले तेंव्हा काका त्यांना म्हणाले, "अरे मीच माझ्या नातेवाईकांकडून त्याला माझा अपघात झालाय व त्यात आम्ही दोघे मेलोय अशी खोटी बातमी सांगितली होती. वास्तविक असे काही झालेलं नाही तू घाबरू नकोस"

इतकी गोष्ट सांगून वेताळ म्हणाला, "हे विक्रमादित्य, काकांनी आपल्या मृत्यूची खोटी बातमी त्या दुसऱ्या काकांना का सांगितली असेल? की ते खरेच मेले होते व त्याचा आत्मा बोकलत यांना खोटे सांगत होता?"

तुमच्यामार्फत त्याना सुड घायचा असेल तर..>> किंवा त्यांच्या घरात गुप्त खजिना असेल त्याची माहिती द्यायची असेल.

वीरू तुम्ही म्हणत असाल तर तसेही असेल.. किंवा काका काकूंना सुड घेण्यासाठी कोणाचा तरी आत्मा हवा असेल.. ( काकूंना हाडळीचा आशिक यांचा आत्मा चालेल वाटते.. आणि काकांना जागे प्रेत यांचा आत्मा )

पछाडलेल्या फ्लॅटवाले का ? >> ते अनिळजी ना, दिसले नाहीत सध्या.
ताजे प्रेत ही आता शिळे झाले त्यामुळं येत नसावे.

मी परवा टीनेज मुलांबरोबर सायकलिंग ला गेलेले. येताना एक प्रशस्त बंगला दिसला पण रया गेलेला . रंग उडालेला, जीवन्त वावर नसावा हे जाणवत होतं, गेटच्या आत भरपूर रान माजलेलं. इथे कोणी रहात की नाही एवढं विचारताच मुलानी एक से बढकर एक माहिती पुरवली. ते भुताळी घर आहे .पहिला झालेला खून की आत्महत्या ,मग नंतर रहायला येणाऱ्यांपैकी एकाचा हमखास खात्मा कसा होतो वगैरे वगैरे. मला गम्मत वाटली ते ऐकून.

इतकी गोष्ट सांगून वेताळ म्हणाला, "हे विक्रमादित्य, काकांनी आपल्या मृत्यूची खोटी बातमी त्या दुसऱ्या काकांना का सांगितली असेल? की ते खरेच मेले होते व त्याचा आत्मा बोकलत यांना खोटे सांगत होता?"

हाहा..

आज दि १८/०७/२०२१ रोजी माझ्यासोबत घडलेल्या दोन घटना ,,
१) वेळ रात्री १०:३० असेल मी मित्रासोबत ट्रिपल सिट येत होतो. नेहमीच्या जागेवर गाडी थांबवली तिथे ते दोघे सिगारेट पित मी नाही घेत,
ऊजव्या बाजुला मंगल कार्यालयाची मागची बाजु डाव्या बाजुला collage चि १ बाजु दोन्हीच्या मधातुन १ अरुन्द बोळ अशी ती जागा एकदम रात्री एकदम सुनसान होते, त्या दोघाच तोंड माझ्याकडे न माझ दोघां कडे तर झाल अस की एकाला कोनीतरी काहीतरी माझ्यामागे फेकल अस वाटल भास म्हनुन त्याने दुर्लक्ष केल परत तसच झाल भितीने त्याने हाततली सिगारेट फेकली न तसाच पळाला, त्याच म्हनण तिथे काहितरी होत, तिथे गेल्या पासुन आमच्या तिघाशिवाय अजुन कोणीतरी तिथे होत अस तिथे गेल्यापासुन फील होत होत अस त्याच म्हनन, अगदी सेम म्हनन दुसर्याच पण आल , दोघांच्या मते माझ्या अंगावर कोनितरी काहीतरी फेकल किंवा उडी मारली पण ते जे काही होत ते माझ्या माग भिंतीवर पडल मला काहिच जानवल नाही. may be माझी तिकडे पाठ होती म्हनुण असेल , लगेच आम्ही तिथून निघालो.
२) अगदी २-३ मिनाटांच्या अंतराने समोर नाक्यावर सिडको corner ला उतरतो न उतरतोच कि १ भरधाव वेगाने मालवाहु Bolero अगदी २-३ ईंचावरुन मला पास झाली. २-३ inch जर उतरताना रोडवर गेलो असतो तर किमान हात - पाय मोडला असता ऑर मी जिवानिशी गेलो असतो इतक होउन पन मी जस काही झालच नाही अश्या अविर्भावात खरच मला काहीच वाटल नाही. निदान थोडी भिती तरी वाटायला पहीजे होती किंवा heart beat तरी जोरत व्हायला पाहीजे होती पण काहीच नाही. माझ्याडोक्यावरुन गेला सगळा प्रकार.
शुध्धलेखनाबद्दल क्षमस्व.

दचकले कि केवढ्याने लाल साडीतली भुतनी बघुन, नेहमी पांढऱ्या साडीतली बघायची सवय आहे ना. बाकी पैलेस भारी आहे.

आपल्यात मृत्यूनंतर कावळा पिंडाला शिवण्याचा कार्यक्रम असतो. माझी यापूर्वी अशी समज होती की मेलेला आत्मा कावळा बनून येतो आणि पिंडाला शिवतो. पण तो कन्सेप्ट तसा नाही.खरा कन्सेप्ट असा आहे की जेव्हा एखाद्या व्यक्तीचं निधन होतं तेव्हा त्या व्यक्तीचा आत्मा पुढच्या प्रवासाला मार्गस्थ होतो किंवा काही ईच्छा मागे राहिल्या असतील तर तो अतृप्त आत्मा पृथ्वीवरच राहतो . कावळ्याला हे आत्मे दिसतात असा एक समज आहे. पिंडाला कावळा शिवला म्हणजे तिथे कोणताही अतृप्त आत्मा नाही. आणि जर पिंडाला शिवायला कावळा येत नसेल याचा अर्थ तिथे अतृप्त आत्मा आहे.

माझी यापूर्वी अशी समज होती की मेलेला आत्मा कावळा बनून येतो आणि पिंडाला शिवतो.>>>> मी पण असच समजायचे. नवीन माहिती बद्दल आभार!

माझ्या मैत्रिणीने सांगितलेला किस्सा.
तीच्या कॉलनीत घडलेला,असं ती म्हणते.
एक कुंटुंब त्यांच्या शेजारी राहत होते.त्यातल्या सासुबाई कैन्सर होऊन गेल्या. त्यांना दोन मुलगे,एक त्यांच्या जवळ राहायचा एक वेगळा राहायचा.जवळ राहणाऱ्या मुलगा आणि सुनेची सारखी भांडणं होत. एके दिवशी भांडणात सुनेने विष घेऊन आत्महत्या केली. सासरे म्हातारे होते, मुलगा काही त्यांची नीट काळजी घ्यायचा नाही ते पण एके दिवशी गेले.मुलगा एकटाच राहायचा. दुसरा मुलगा आणि त्यांचे कुटुंब त्या घरात राहायला आले. त्या सुनेला सारखा भास व्हायचा आजुबाजुला कुणीतरी वावरतंय..
नंतर नंतर सुनेला हुंदके देऊन रडल्याचा आवाज यायचा..मग भिंतीवर चालताना सासु सासरे दिसु लागले.
त्यांनी एका मांत्रिक काकूंना बोलवलं तर त्या काकुंचे केस धरून भुताने बाहेर काढले कि आमच्या घरातून तु आम्हाला हाकलू शकत नाही असं कानात पुटपुटत.

आम्ही सध्या जिथे राहतो तिथे जवळच वीसेकवर्षांपूर्वी एकाने स्वतःच्या बायको मुलीला मारून टाकले होते. त्याची आईसुद्धा सामील होती त्यात. पुढे त्याने दुसरे लग्न केले पण ती बाई लवकरच आजारपणातच गेली. तिला सुद्धा त्रास द्यायचा तो. नंतर त्याने ते घर सोडले पण त्याची आईही वर्षातच गेली. ज्याने ती जागा घेतली होती त्याने तिथे रिडेव्हलप करून तीनमजली इमारत बांधली आहे. या बांधकामात त्याला काही विघ्ने आली नाहीत पण त्याच्या घरात गृहकलह सुरु झाला आणि व्यवसायात बराच फटका बसला. मागच्या वर्षीच त्याने ती इमारत खर्च वसुल होईल एवढ्या किमतीत विकून टाकली. अजून तिथे कोणी आलेले दिसत नाही. जो खुनी माणुस होता त्याची सध्याची परिस्थिती माहित नाही. यात कुठेही भुतप्रेत दिसल्याचे कधी ऐकले नाही. आजुबाजूला चिटकून जी घरे आहेत त्यांनाही काही त्रास नाही.

माझ्या गावात घडलेली ही घटना
तीन भाऊ होते तिघांचीही लग्ने झाली होती. मोठे दोघे शेतकरी होते तर तिसरा दिल्लीच्याही पुढे कुठेतरी नौकरीला होता. अचानक मधला भाऊ वारला. बाकी सर्व नातेवाईक जवळच होते पण लहान भाऊ लांब असल्यामुळे पहिल्या दिवशी त्याला यायला जमणारच नव्हते. त्याकाळी मोबाईल ही नव्हते. लोकांनी त्याला तार पाठवून झालेली घटना सांगितली. तिसऱ्या दिवशी नैवैध दाखवायचा होता. आमच्या गावाकडे हे लवकरात लवकर उरकले जाते. तरी पण लहान भाऊ येईल म्हणून मुद्दाम उशिरा कार्यक्रम चालु केला. पण तरीही वाट बघून नैवैध ठेवला गेला. कावळे होते पण जवळ यायला एक पण तयार नव्हता. १ तास होऊन गेला पण कावळे काही जवळ येत नव्हते. अशावेळी गायीला नैवैध दाखवला जातो, म्हणून गाय आणली पण गाय सुद्धा नैवैधला तोंड लावायला तयार नव्हती. शेवटी गावातील लोक वैतागून जाऊ लागले. पण त्याचवेळी रस्त्याकडून कावळ्याचा एक थवा येताना दिसला, आणि त्याचवेळी तिसरा भाऊ आणि त्याची बायको पळत येत होती. St स्टँडवर उतरल्यावर तिथल्या हॉटेल वल्याने त्याला घरी न जाता थेट नदीकाठी जायला सांगितले होते. त्याने कसे बसे दर्शन घेतले आणि जवळ ही न येणारे कावळे नैवैधवर तुटून पडले.

Pages