पछाडलेल्या वास्तूत येणारे अनुभव.

Submitted by अनिळजी on 25 September, 2020 - 12:16

नमस्कार, मी काही दिवसांपूर्वी एक घर घेतलं. साधारण महिना झाला असेल आम्ही म्हणजे मी, पत्नी, आणि दोन वर्षांचा मुलगा या घरात शिफ्ट झालो. जेव्हा पहिल्यांदा हे घर पाहायला आलो तेव्हा मी आणि हिने इथे प्रचंड अस्वस्थता अनुभवली. पण स्वस्त मिळत असल्याने हे घर फायनल केलं. इथे राहायला आल्यापासून आठवड्यात वाईट अनुभव यायला लागले आहेत. आमच्या तिघांशीवाय इतरही कोणीतरी इथे वावरत असल्याचा भास होतो. वारा नसताना दरवाजे जोरात उघडझाप होणे. कोणीतरी हाक मारल्याचा भास होणे, मध्यरात्री भांडी जोरात वाजणे असले प्रकार सर्रास घडत आहेत. पाच दिवसांपूर्वी बाथरूममधला नळ अचानक सुरू झाला होता. मुलाचं वागणही बदलायला लागलंय एकटाच कोणीतरी समोर असल्यासारखा बडबडत असतो. ही या प्रकाराने खूपच घाबरली त्यामुळे सासु सासऱ्यांना काही दिवस बोलावून घेतलं होतं. काही दिवस आधार वाटला पण आता पुन्हा आम्ही एकटे आहोत. सासू सासऱ्यांनाही ईथे विचित्र अनुभव आले. त्यांनी हे घर विकून दुसरं घेण्याचा सल्ला दिलाय. ज्याच्याकडून हे घर घेतलं होतं तो आता हे सगळे आमचे भास आहेत म्हणून हात वर करतोय. सध्यातरी लगेच दुसरीकडे शिफ्ट होणं कठीण वाटतंय.अजून हानी पोहचेल असं तरी काही घडलं नाही. पण सारखे भीतीत वावरत असतो. हा प्रकार कोणी अनुभवला आहे का? आणि अनुभवला असेल तर यातून काय मार्ग काढलात?

Group content visibility: 
Use group defaults

माझ्या एका मित्राच्या घरी सगळे दिवसा झोपतात आणि रात्री जागतात. त्यांचे घर पछाडलेले आहे त्यामुळे असे होते असे त्यांचे म्हणणे आहे. तुम्हाला काय वाटते ह्याविषयी?

त्याच्या घराखालून एक सरळ खाली जाणारे भुयार खोदायाचे, पृथ्वीला आरपार. म्हणजे भुयाराचे दुसरे टोक अमेरिकेत उघडेल. रात्री जाग आली की भुयारात उडी मारायची. जडत्वामुळे ते पृथ्वीचा मध्यभाग ओलांडून भुयाराच्या दुसऱ्या टोकाच्या बऱ्याच जवळ पोचतील. तिथे एक प्लॅटफॉर्म बांधून अमेरिकेच्या टोकाने वर यायला जिना करायचा, आणि अमेरिकेत बाहेर यायचे. तिकडे दिवस असेल. त्यांना तिकडे हवी ती कामे, नोकरी, सामान खरेदी सगळे करता येईल.
तिकडे रात्र झाली की परत तिथून भुयारात उडी मारायची, इकडच्या बाजूनेही प्लॅटफॉर्म , जिना आणि घरात येऊन झोपायचे.
फक्त ही आयडिया जास्त फोडू नका बाहेर. बिना व्हिसा असाच अमेरिकेत फिरून येत असतो, अधुन मधुन. सगळेच करायला लागले तर भुयार शोधून तिथे इमिग्रेशन आणि कस्टम ऑफिसर बसवतील दोन्ही बाजूचे देश.

मानव यांच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नका. असं भुयार समुद्राच्या पाण्याने भरून जातं. पाणबुडी लागते त्या भुयारातून जायला. पण त्यामुळे वेळ खूप लागतो

मानव यांच्या प्रतिसादावरून ( बहुतेक भा रा भागवत यांची) एक कथा आठवली.. पृथ्वीच्या केंद्रापर्यंत भुयार खणून पृथ्वी जिवंत आहे हे सिद्ध करतात..

मानव भन्नाट आयड्या Happy बाकी "पृथ्वीचा मध्यभाग ओलांडून भुयाराच्या दुसऱ्या टोकाच्या बऱ्याच जवळ पोचतील" हे जरा शंकास्पद आहे. पण हि फॅन्टसी आहे. त्यामुळे उगा साखरेची सालं सोलायला नको Lol आयड्या मागची कल्पना बेष्ट!

लहानपणी "पृथ्वीच्या पलीकडे अमेरिका आहे" केवळ इतके ग्यान होते. एकदा गावकऱ्यांनी बोअरवेल काढण्याकरिता मशीन बोलवले. रात्रंदिवस घिर घिर करत जमिनीच्या पोटात पाईपा मागून पाईप खुपसणाऱ्या त्या यंत्राला बघायला त्या काळात हि गर्दी जमायची. काही काळाने ते मशीन थांबवले. पाणी काही लागले नाहीच. मोठी माणसे म्हणाली "ठराविक मर्यादेपेक्षा जास्त खोल जाऊ नये असा नियम आहे म्हणून मशीन थांबवली". माझ्या मनात विचार आला होता, अजून काही काळ सुरु ठेवले असते तर थेट अमेरिकेत पाईप बाहेर निघून तिथे घरे पडली असती म्हणून कदाचित हा नियम केला असेल Biggrin मोठा झाल्यावर ग्यान प्राप्त झाले. अमेरिका म्हणजे पलिकडाचा भाग (प्रत्यक्षात पलीकडे महासागर येतो) तब्ब्ल बारा हजार किमीवर आहे. बोअरवेल जेमतेम १२० मीटर सुद्धा जात नाही Proud

माझ्या माहितीत एक गृहस्त आहेत जे भुतं खेत यांचे जाणकार आहेत.मी या गोस्टि बिलकूल मानत नाही पण अनुभवा वरुण सांगू शकतो की काही शक्ती(एनर्जी) या अबनॉर्मल / विचीत्र पद्धतीने कार्य करत असतात .पण आपल्याला शाळेत शिकत असताना हे शास्त्र शिकवत नाही म्हणुन त्यास भूत ऐसे नाव.

रविवारी दुपारी नॉनव्हेज खाऊन झोपणे म्हणजे स्वर्गसुख.मी पण झोपणार आहे आता. झोपल्यावर आपल्याला हवी ती स्वप्न पडावीत या प्रोजेक्टवर सध्या मी काम करतोय. उठल्यावर एकदम फ्रेश वाटतं मग.

कंटाळा केला. लॉग आऊट करा परत लॉगिन करा, प्रतिसाद देऊन परत लॉग आऊट लॉगिन करा. आयुष्य सिम्पल आहे. कॉम्प्लिकेटेड करण्यात काही अर्थ नाही.

तसे ही आधी ही कुणितरी कुठेतरी guess केलेच होते ना अनीळजी च बोकलत आहेत. Lol
दोंघां ची पुड्या सोडण्याची शैली एक सारखी आहे. Wink

रविवारी दुपारी नॉनव्हेज खाऊन झोपणे म्हणजे स्वर्गसुख.>>श्रावणात नॉनव्हेज खाऊन दुपारी झोपले तर ज्याला गिळले त्याचा आत्मा छातीवर बसुन गळा पकडतो म्हणे. तुम्ही सांभाळा. वाटल्यास गळ्यात चामड्याचा पट्टा घालुन झोपा म्हणजे आत्म्याला गळा पकडता येणार नाही.

गळ्यावर बसणे आणि बसून गळा दाबणे ही खुप मोठी गोष्ट झाली. मी ज्या एरियात राहायला जातो तिथला आजूबाजूचा 10 15 किलोमीटर परिसर मी काहीही न करता पिशाच्चमुक्त होतो.

बोकलत Lol
( अनिळजी म्हणजे तुम्ही नसणार असं मला वाटतं.)

नंतर कधीतरी नवीन धागा घेऊन आलो अनिळजी आयडीने की प्रतिसाद देतो. आता कंटाळा आलाय. पासवर्ड पण विसरलो.

मी ज्या एरियात राहायला जातो तिथला आजूबाजूचा 10 15 किलोमीटर परिसर मी काहीही न करता पिशाच्चमुक्त होतो.>>
किती पुड्या सोडाल?

किती पुड्या सोडाल? >>>
नाही तर काय! ८ किलोमीटरच्या वर शक्यच नाही.

अनिळजी हा आयडी अमानविय शक्तीना घाबरतो आणि बोकलत आयडी शिंगावर घेतो.
अजुन कोणता आयडी आहे का? दोन्हींचा मध्य सांधणारा.... Wink

Pages