पछाडलेल्या वास्तूत येणारे अनुभव.

Submitted by अनिळजी on 25 September, 2020 - 12:16

नमस्कार, मी काही दिवसांपूर्वी एक घर घेतलं. साधारण महिना झाला असेल आम्ही म्हणजे मी, पत्नी, आणि दोन वर्षांचा मुलगा या घरात शिफ्ट झालो. जेव्हा पहिल्यांदा हे घर पाहायला आलो तेव्हा मी आणि हिने इथे प्रचंड अस्वस्थता अनुभवली. पण स्वस्त मिळत असल्याने हे घर फायनल केलं. इथे राहायला आल्यापासून आठवड्यात वाईट अनुभव यायला लागले आहेत. आमच्या तिघांशीवाय इतरही कोणीतरी इथे वावरत असल्याचा भास होतो. वारा नसताना दरवाजे जोरात उघडझाप होणे. कोणीतरी हाक मारल्याचा भास होणे, मध्यरात्री भांडी जोरात वाजणे असले प्रकार सर्रास घडत आहेत. पाच दिवसांपूर्वी बाथरूममधला नळ अचानक सुरू झाला होता. मुलाचं वागणही बदलायला लागलंय एकटाच कोणीतरी समोर असल्यासारखा बडबडत असतो. ही या प्रकाराने खूपच घाबरली त्यामुळे सासु सासऱ्यांना काही दिवस बोलावून घेतलं होतं. काही दिवस आधार वाटला पण आता पुन्हा आम्ही एकटे आहोत. सासू सासऱ्यांनाही ईथे विचित्र अनुभव आले. त्यांनी हे घर विकून दुसरं घेण्याचा सल्ला दिलाय. ज्याच्याकडून हे घर घेतलं होतं तो आता हे सगळे आमचे भास आहेत म्हणून हात वर करतोय. सध्यातरी लगेच दुसरीकडे शिफ्ट होणं कठीण वाटतंय.अजून हानी पोहचेल असं तरी काही घडलं नाही. पण सारखे भीतीत वावरत असतो. हा प्रकार कोणी अनुभवला आहे का? आणि अनुभवला असेल तर यातून काय मार्ग काढलात?

Group content visibility: 
Use group defaults

ग्रहणात मुसळ उभं राहतं. कुणी प्रयोग करून बघितला का रोज मुसळ परातीत उभं करून? माझ्याकडे मुसळ असतं तर मी केला असता. >>

मी मुसळ मिळाले की लगेच करून बघणार आहे. ग्रहणात आणि आधीही. Happy Happy

>> डार्क मॅटरकडे कसं बघायचं याचाही विज्ञानाचा काही दृष्टिकोण आहेच. बरोबर?
नक्कीच आहे. अशा गोष्टींबाबतची विचारपद्धती ठरलेली आहे.

अंनिसने केलाय प्रयोग साधना. भोंदू फॉरवर्ड्सच्या धाग्यावर मी दिली होती बघा बातमी.
जे ग्रहणाच्या दिवशी फॉरवर्ड करत सुटले होते आणि मुसळ उभं राहण्यामागची तथाकथित वैज्ञानिक कारणं सांगत होते त्यांनीही प्रयोग करून बघितला पाहिजे असं मला म्हणायचं आहे.

ग्रहणाच्या दिवशी मुसळ परातीत ठेवा आणि परात वजनकाट्यावर ठेवा.
ग्रहण लागण्याआधी वजनाची नोंद करा आणि ग्रहण पूर्ण लागल्यावर.
म्हणजे वजनात किती फरक पडला त्यावरुन आपल्या चंद्र+सूर्य मिळुन गुरुत्वाकर्षण शक्तीवर किती फरक पडला याचे गणित मांडता येईल.

साधना, मला जे लिहायचे होते ते तू लिहुन नीट उकल केलीस त्या बद्दल मनापासुन अनेक धन्यवाद.

हो, मीच उपाय सुचवला होता स्तोत्रांचा, पोथ्यांचा, पुराणांचा आणी अनेक काही बाही. जेव्हा या धागाकर्त्याने लहान मुलाला मध्ये घुसवले तेव्हा हा धागा जेन्युईन वाटला होता. पण जेव्हा पुढे लक्षात आले की कुठलातरी ड्ञू आय केवळ मजा घेण्यासाठी असले घाणेरडे धंदे करतोय तेव्हा मात्र किव वाटली. ( सॉरी बोकलत, मला आधी वाटले की ते तुम्हीच आहात. तुम्हाला झालेल्या त्रासाबद्दल खरच सॉरी )

मी आधीच्याच भागात लिहीले होते की मंत्र, स्तोत्रे याने भुते वगैरे पळत नसतात तर मन स्थिर व्हावे या करता तो मार्ग आहे. पण पूर्वग्रह दुषीत असेल तर काय करणार? तर मग असल्या अंधश्रद्धाळु आय डींची आम्ही अक्कल काढणार. ( हे भरत यांना उद्देशुन नक्कीच नाही. कारण ते अभ्यासु आहेत )

ठीक आहे. फसलो आम्ही, पुढे ? मलाही काही जेन्युईन प्रश्न विचारायचे होते, सल्ला हवा होता. पण मायबोलीवर टर उडवणारे लोकच जास्त असल्याने या पुढे हे सारे बंद.

रश्मी इथे योग्य सल्ले सुद्धा देण्यात आलेले आहेत.
विनोदी पोस्ट्स सगळ्यांनीच केल्या आहेत.
असो, या धाग्याचे उदाहरण बघुन जर कुणाला कोतबो / माहितीवर जेन्यूइन धागाही काढावा वाटत नसेल किंवा कुणाला तशा धाग्यावर प्रतिसाद सल्ले देऊ नये वाटत असेल तर ज्याची/त्याची मर्जी असेच म्हणावे लागेल.
मला वाटते स्तोत्रांचा धागा. अशा धाग्यांंवर कुणी येऊन स्तोत्र वाचू नका वगैरे म्हणते का?
जर कुणी माहिती हवी आहे मध्ये या धाग्या सारखा प्रश्न विचारून सल्ला मागितला तर दोन्ही बाजूने मते येणार, तिथे एकाच बाजूने मते यावीत अशी अपेक्षा करणे चूक. टिका इथे विज्ञानवादींंवरही झाली आहे.

टवाळकी / टिका बद्दल - ती इतरही धाग्यात होते, कधी धागे कसेही भरकटतात. त्याचे समर्थन नाही करत, पण असे झाल्यामुळे धागे काढणे लोक बंद करत नाहीत.
अर्थात काढावा की काढु नये ही ज्याची त्याची मर्जी. मायबोली किंवा अजुन कुठलीही साईट ही प्रत्येकाच्या दृष्टीने आदर्श साईट नाही बनु शकत.

मानव हे तुम्ही किंवा वावे तसेच इथल्या बर्‍याच् आय डींना उद्देशून नाहीये. उलट वावेचा प्रतीसाद बघुन मला खूप बरे वाटले. तिने योग्य दिशा दिलीय, पण मी स्तोत्रे का वाचते तर त्याला घरातले धार्मिक वातावरण आहेच पण आलेले प्रचंड दैवी अनूभव मला या मार्गाला ओढुन घेऊन गेले. ( भुताखेतांच्या नव्हे )

वावेने खूप सोप्या भाषेत समजावले आहे. सोप्या अश्यासाठी म्हणते की काही जणांना आपले म्हणणे नीट मांडता येत नाही. ( मी त्यातलीच, पण साधना, वावे ला ते सविस्तर लिहीता आले. )

माझा प्रतीसाद अश्या व्यक्तीसाठी आहे की पूर्वी कधीतरी काहीतरी घडले, तरी त्याचा एको आजही येतोय. त्या व्यक्तीला कळेलच.

अनिळजी मायबोलीवरच्या भोळ्या भाबड्या जनतेला फसवून तुम्हाला काय मिळाले? आम्ही सगळे निरागस बालकं, लहान मुली/मुलं देवाघरची फुलं आहोत. आम्ही कधीच कोणाला आयुष्यात फसवले नाही आणि तुम्ही चक्क आमच्यासारख्या निरागस बालकांना फसवलंत? फसवलंत तर फसवलंत त्यात पुन्हा माझी शैली वापरून लोकांत संभ्रम निर्माण केलात. मी एव्हडा निरागस आहे की अजून कुणाला एका पैशाने फसवलं नाही. एकदा दुकानदाराने चुकून मला दहा रुपयांची नोट जास्त दिली तर ती मी प्रामाणिकपणे दुकानदाराला परत केली. त्यावर दुकानदाराने खुश होऊन दोन इकलेअर्स चॉकलेट दिले. तुमच्या या वागण्याने मी डिप्रेशनमध्ये गेलो आहे. कालपासून अन्न पाणी गोड लागत नाही. आता आम्ही कोणावर विश्वास ठेवायचा. मला रडू येतंय खूप. देवा असा कसा फसलो मी. (रडण्याचा आवाज)

तुमच्या या वागण्याने मी डिप्रेशनमध्ये गेलो आहे. कालपासून अन्न पाणी गोड लागत नाही.>>>>>

ती एकलेअर्स खा की जेवल्यावर.... आपोआप तोंड गोड होईल

मी आधीच्याच भागात लिहीले होते की मंत्र, स्तोत्रे याने भुते वगैरे पळत नसतात तर मन स्थिर व्हावे या करता तो मार्ग आहे. पण पूर्वग्रह दुषीत असेल तर काय करणार? >> स्तोत्रांमुळे भुते पळतात की नाही हा प्रश्न दुय्यम आहे... मुळात ती अस्तित्वात असतात आणि माणसांना, जागांना पछाडतात त्यांना हानी पोहोचवतात हे तुम्ही मानता का हा प्रार्थमिक प्रश्न आहे. Happy
जर तुम्ही भुते/आत्मे आहेत हे मानता आणि त्यावर काही ऊपाय म्हणून स्तोत्रे, रिचुअल्स रिकमेंड करता तर (भुते पळवण्यासाठी नाही तर बाधित मनाच्या शांतीसाठी का असेना) तर तुम्ही भुते ह्या अराऊंड ज्या अंधश्र्द्धा आहेत त्याला खतपाणीच घालतात आणि हा स्टान्स भोंदू, मांत्रिकांपेक्षा फार वेगळा नाही.

तर मग असल्या अंधश्रद्धाळु आय डींची आम्ही अक्कल काढणार. ( हे भरत यांना उद्देशुन नक्कीच नाही. कारण ते अभ्यासु आहेत )
माझा प्रतीसाद अश्या व्यक्तीसाठी आहे की पूर्वी कधीतरी काहीतरी घडले, तरी त्याचा एको आजही येतोय. त्या व्यक्तीला कळेलच.>> ओह मला ऊद्देशून आहे का,मी ईथे जास्तच वोकल आहे म्हणून असे वाटले? मी काही अभ्यासू वगैरे नाही, पण ह्या आणि डिप्रेशनच्या धाग्यावरून लोकांची कनफ्युज्ड आणि काही प्रमाणात दुटप्पी विचारसरणी दिसल्याने मी त्यावर बोट ठेवले. त्याला माझ्या लेखी तरी टर ऊडवणे म्हणत नाहीत. त्यातही मी आणि टवणे सरांनी कोणा एका आयडी चे नाव न घेता... स्तोत्रे, रिचुअल्स रिकमेंड करणारा लोकांचा गट असे जनरल म्हणालो.

आणि खरं सांगू का,
टीका झाली की, 'आम्हाला बोल लावण्यासाठी मुद्दाम धागा ऊघडला','पूर्वी च्या वादाचा एको येतो आहे' असा मानभावीपणा टाळला तरच चर्चा होऊ शकेल. माझ्या लिहिण्यात असा कुठलाही छुपा एको वा अजेंडा नसतो... नाहीये. ज्यांच्याशी पूर्वी वाद झाले आणि ते मी विसरलो नसेल तर त्यांना ऊद्देशून काही लिहिण्याचे मी साफ टाळतो, त्यांनी मला विरोध करू दे नाही तर अनुमोदन देऊ दे.

हायझेनबर्ग चांगला मुद्दा.. पण तुम्ही देव मानता का? तुम्ही देव मानत असाल तर सेलेक्टिव्ह श्रद्धा चा मुद्दा तुमचा चुकतोय...
देव मानणारे, बाळाची नजर काढणारे, स्वतःच्या गर्भारपणात सगळी व्रत वैकल्य पाळणारे दुसर्यांना अंधश्रद्धाळू म्हणतात तर ते चूक आहे..

तुम्ही नास्तिक असाल- तर प्रश्नच नाही...

<<<देव मानणारे, बाळाची नजर काढणारे, स्वतःच्या गर्भारपणात सगळी व्रत वैकल्य पाळणारे दुसर्यांना अंधश्रद्धाळू म्हणतात>>> ही असली माणसे बघितली आहेत, लोका सांगे ब्रम्हज्ञान टाईप्स

जर तुम्ही भुते/आत्मे आहेत हे मानता आणि त्यावर काही ऊपाय म्हणून स्तोत्रे, रिचुअल्स रिकमेंड करता तर (भुते पळवण्यासाठी नाही तर बाधित मनाच्या शांतीसाठी का असेना) तर तुम्ही भुते ह्या अराऊंड ज्या अंधश्र्द्धा आहेत त्याला खतपाणीच घालतात आणि हा स्टान्स भोंदू, मांत्रिकांपेक्षा फार वेगळा नाही>>>>

असे काही औषध आहे का जे ह्या सगळ्या अफूच्या गोळ्या आहेत हे जगातील सगळ्या लोकांच्या मनावर बिंबवेल?? एका देशात, बहुतेक रशियात, असे एक दोन पिढ्या बिंबवले होते, देशातील धार्मिक स्थळे नष्ट केली होती पण बिंबवणारे घटक नष्ट झाल्यावर धार्मिक स्थळे व तिथल्या झुंडी परत आल्या असे वाचले होते. त्यामुळे प्रबोधन करून हा विषय कितपत मार्गी लागेल याबद्दल शंका आहे.

अशा स्थितीत कमकुवत मनाचे लोक आहेत तर त्या मनाला उभारी द्यायला स्तोत्रे, मंत्र वगैरे येणार. हे सगळे प्लेसबो आहेत.

हे चांगले किंवा वाईट याबद्दल माझे काहीही मत नाही. मी स्वतः एखादे स्तोत्र आज पाठ करायचा प्रयत्न करेन ते माझी स्मरण शक्ती या वयात शाबूत आहेत का की आतापासूनच विस्मरण होतेय का हे बघायला. बाकी मला या गोष्टीत रस नाही.

मानवी मनाला कुठल्याही एका विचारात कंडिशन करणे गेले हजारो वर्षे कोणाला जमले नाही. देव व भुते आहेत असे कंडिशन केलेच की असे तुम्ही म्हणाल तर इथे या धाग्यावरच चार पाच आईडी असे मिळतील जे असे काहीही नसते हे सप्रमाण सिद्ध करतील. त्यामुळे एकूणच घाऊक रित्या मानवी मन कुठल्याही एका विचारात कंडिशन होणारे नाही. त्यामुळे ज्या मनांना स्तोत्रांचा आधार हवा, त्यांना तो उपलब्ध आहे, त्यांना तो वापरूदे की.

अ - भुतांना पळवायला आम्ही चांगलं रामनामाचा जप आणि मारुतीचं स्तोत्रच तर म्हणायला सांगतोय. कुठे कोंबडं , बकरं कापा असं सांगतोय?

क्ष - पण कोंबडं , बकरं कापलं तर बिघडलं कुठे? त्यामुळे आमच्या मनाला, जिभेला आणि पोटालाही छान वाटतं.

साधना हजार वर्षांपूर्वीच्या काळाच्या तुलनेत आजच्या काळातील अंधश्रद्धा बऱ्याच कमी आहेत की नाही? शंभर वर्षांपूर्वीच्या काळाच्या तुलनेतही. हे कसे झाले? त्या अंधश्रद्धांंविरुद्ध प्रबोधन करणारे लोक होते म्हणुनच ना? अशा पूर्वीच्या काही अंधश्रद्धा मानणारे काही लोक आजही आहेत ज्या ऐकल्या तर तुम्हीही विरोध कराल. पटकन आठवलेले उदाहरण: काही मंदिरात स्त्रियांना प्रवेश नाही कारण पाळी असेल तर विटाळ होतो.

हा जो काळानुसार बदल घडला आहे तो अशा प्रकारच्या चर्चा घडून /शिक्षणातून /वाचनातून हळूहळू प्रबोधन होऊनच. इथल्या अथवा कुठल्याही चर्चेत सगळ्यांचे एकदम प्रबोधन होणार नाही, कुणाचे कदाचित होईल, कुणाच्या मनात याचे बीज रुजेल आणि त्यांचे हळुहळु प्रबोधन होईल.

वर हाबने स्पष्ट केले आहे की हे प्लासीबो तेव्हाच होईल जेव्हा ते सुचविणारी व्यक्ती भूते खरंच असतात आणि वास्तू पछाडून त्यांना त्रास वगैरे देतात असे न मानता विचारपूर्वक तो प्लासीबो सुचवते आहे.
असा प्लासीबो सुचवणाऱ्या किती जणांनी सोबत त्याची कारण मीमांसाही करा असे सुचवले आहे?
धाग्याच्या शिर्षकातच "पछाडलेल्या" वास्तूत येणारे अनुभव असे लिहिले आहे आणि वास्तू अशी पछाडलेली असणे किती सहाजिक/नेहमीच्या जीवनात घडणारी घटना आहे असे समजून उपाय सुचवले आहेत. हे प्लासीबो आहेत हा आफ्टरथॉट आहे.

श्रद्धा, देव मानता की नाही, स्तोत्र वाचून मनोबल मिळते वगैरे मुद्दे इथे गैरलागु आहेत.
अशा प्रकारे वास्तू पछाडल्या जाऊ शकते, भूते त्रास देऊ शकतात हे मानता का, हा मुद्दा आहे.

आधीच्या लोकांनी किती अंधश्रद्धा, कुप्रथा मोडीत काढल्या म्हणून त्यांचे कौतुक करू.
आज कोणी अंधश्रद्धा आणि कुप्रथेविरुद्ध बोलत असेल तर त्याला दगड मारू.

भुतं खरोखरच असतात. कितीतरी निर्जन जागा अशा आहेत की त्या ठिकाणी अमानवीय शक्तींचं वास्तव्य आहे. तुम्ही जर त्या ठिकाणी गेलात तर तुम्हाला गूढ अनुभव येतील. हे अमानवीय अनुभव काही मोजक्या लोकांना येत असल्याने बाकीचे जे उरलेले लोक्स आहे त्यांना या गोष्टी खोट्या वाटतात आणि ते या प्रकरणाची चेष्टा करतात. मी अनेक असे लोक्स बघितले आहेत की जे बोलतात भूत वैगरे सगळं खोटं आहे प्रत्यक्षात जेव्हा दिसेल तेव्हा आम्ही विश्वास ठेवू असा त्यांचा स्टँड असतो. याबाबतीत एक उदाहरण द्यायचं झालं तर घोस्ट हंटर गौरव तिवारीच देता येईल. त्याचासुद्धा या असल्या गोष्टींवर विश्वास न्हवता. पण तो जेव्हा शिक्षणासाठी परदेशी गेला तेव्हा त्याला काही अमानवीय अनुभव आले आणि मग त्याने उर्वरित आयुष्य या कामासाठी झोकून दिले. त्यामुळे ज्यांचा असा स्टँड आहे की भूत वैगरे जेव्हा दिसेल तेव्हा विश्वास ठेवू किंवा भूत नसतंच ते आपल्या जागेवर योग्य आहेत असं मला वाटतं. पण त्यांनी ज्यांचा असल्या गोष्टीवर विश्वास आहे त्यांची चेष्टा करणे किंवा जर एखादा घरचं वातावरण प्रसन्न राहणार असेल म्हणून पोथीपाठ वाचत असेल त्याला विरोध करणे हे चुकीचे वाटतंय. त्याचबरोबर जे टोकाचे उपाय आहेत जसे की बळी वैगरे देणं हे चुकीचेच आहेत त्याचा विरोध व्हायला हवाच.

अखेर अनिळजी दोन्ही बाजूंची जुंपून देण्यात यशस्वी झाले आणि निवांत सोफ्यात पडून इथल्या कमेंट वाचत असतील. मी सुरुवातीला लिहिल्याप्रमाणे कोणी कितीही प्रयत्न केला तरी ज्यांची त्यांची मते ठाम राहतील. कशाला उगाच कटुता घेता? चांगली चर्चा होते वगैरे फक्त म्हणायला आहे आणि राजकारणाप्रमाणे इथेपण वादावादी सुरु झाली आहे विनाकारण.

मला असं वाटतंय आपण इथे भुतांवर विश्वास असलेले आणि नसलेले अशा दोन टीम तयार करू. ज्यांचा भुतांवर विश्वास आहे ते सिद्ध करतील की भुतं असतात. आणि ज्यांचं नाही ते सिद्ध करतील भुतं नसतात. हे सिद्ध करण्यासाठी दोन्ही टीममधले सदस्य अमावस्येला पौर्णिमेला निर्जन ठिकाणी जाऊन घोस्ट हंटिंगचा व्हिडिओ इथे शेअर करतील. दूध का दूध और पानी का पानी.

अनु भुताचा मेकओव्हर तू केलास का बाई. ? अजिबात जमले नाही.. आधी कोणीतरी डाएटिशिअन हवी भुतासाठी..जिम पण लावावी लागेल.. भूत शेपलेस आहे अगदी..

सध्या जो दुसरा 'कंटाळा आलाय' धागा सुरू आहे तोही मला अटेंशनसिकिंगच वाटतोय.>>>चला माझ्या मनातलं कोणीतरी बोललं!
तिथे खरमरीत प्रतिसाद द्यायचा मोह आवरला पण लोक इतकं सिरीयसली घेत असलेले पाहून हसू आवरत नाहीये.
वाईट याचं वाटतं की यामुळे depression सारख्या गंभीर आजारांचे trivialization होतं. असो.

भूताचा वेट गेन कसा झाला कळत नाही.
डबल चीज पिझ्झे बिझ्झे हाणले असणार घरातून पैसे घेऊन. मी फक्त हेअर कंडीशणिंग दिले आणि निघाले.

Pages