नमस्कार, मी काही दिवसांपूर्वी एक घर घेतलं. साधारण महिना झाला असेल आम्ही म्हणजे मी, पत्नी, आणि दोन वर्षांचा मुलगा या घरात शिफ्ट झालो. जेव्हा पहिल्यांदा हे घर पाहायला आलो तेव्हा मी आणि हिने इथे प्रचंड अस्वस्थता अनुभवली. पण स्वस्त मिळत असल्याने हे घर फायनल केलं. इथे राहायला आल्यापासून आठवड्यात वाईट अनुभव यायला लागले आहेत. आमच्या तिघांशीवाय इतरही कोणीतरी इथे वावरत असल्याचा भास होतो. वारा नसताना दरवाजे जोरात उघडझाप होणे. कोणीतरी हाक मारल्याचा भास होणे, मध्यरात्री भांडी जोरात वाजणे असले प्रकार सर्रास घडत आहेत. पाच दिवसांपूर्वी बाथरूममधला नळ अचानक सुरू झाला होता. मुलाचं वागणही बदलायला लागलंय एकटाच कोणीतरी समोर असल्यासारखा बडबडत असतो. ही या प्रकाराने खूपच घाबरली त्यामुळे सासु सासऱ्यांना काही दिवस बोलावून घेतलं होतं. काही दिवस आधार वाटला पण आता पुन्हा आम्ही एकटे आहोत. सासू सासऱ्यांनाही ईथे विचित्र अनुभव आले. त्यांनी हे घर विकून दुसरं घेण्याचा सल्ला दिलाय. ज्याच्याकडून हे घर घेतलं होतं तो आता हे सगळे आमचे भास आहेत म्हणून हात वर करतोय. सध्यातरी लगेच दुसरीकडे शिफ्ट होणं कठीण वाटतंय.अजून हानी पोहचेल असं तरी काही घडलं नाही. पण सारखे भीतीत वावरत असतो. हा प्रकार कोणी अनुभवला आहे का? आणि अनुभवला असेल तर यातून काय मार्ग काढलात?
पछाडलेल्या वास्तूत येणारे अनुभव.
Submitted by अनिळजी on 25 September, 2020 - 12:16
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
नक्कीच अनु हात लांब करून
नक्कीच अनु हात लांब करून पिझ्झे हाणले आहे हवे तसे..म्हणून पिझ्झ्यासारखेच दिसतंय गोल गोल..
पण केस बाकी स्मूथ दिसतायत..
अॅप्ट प्रतिसाद मानव.
अॅप्ट प्रतिसाद मानव.
अशा स्थितीत कमकुवत मनाचे लोक आहेत तर त्या मनाला उभारी द्यायला स्तोत्रे, मंत्र वगैरे येणार. हे सगळे प्लेसबो आहेत. >> अशा कमकुवत, अवस्थ लोकांना घटना आणि मानसिक स्वास्थ्य ह्यातला कार्यकारण भाव दाखवून मार्गदर्शन करणे योग्य की त्यांच्या कमकुवत मनाला प्लासिबो स्तोत्रांचे डोस पाजणे योग्य?
स्तोत्रांचे ईश स्तुती, देवारधना, भूत भगाव, सुरक्षा कवच, पासून.... प्लासिबो, शारिरिक मानसिक स्वास्थ्य, पाठांतर असे बरेच फायदे असल्याचे दिसते आहे.
पण मला काही पाठांतर करायचे असते तर मी जिंदाल स्टीलचा क्वार्ट्रली आणि अॅन्युअल रिपोर्ट पाठ करून ठेवला असता... जरा कुठे शेअर प्राईस वर खाली झाली की लाँग किंवा शॉर्ट जायला बरे.
अनिळजीने माहिती हवी आहे/कोतबोला चांगलाच शॉक दिला आहे.
त्यांच्या धाग्याला जे लोक घाणेरडी मानसिकता वगैरे म्हणाले मला वाटते त्यांच्यासाठी हा चांगला धडा आणि रिमाईंडर असेल... की माहिती सांगण्याचा/ कोतबोचा हेतू काही कारणाने 'स्ट्रेट थिंकिंग' करू न शकणार्या व्यक्तीला सपोजेडली 'संतुलित' मनाच्या त्रयस्थ व्यक्तींनी अडचण समजून घेऊन सारासार विचारांतर्गत सल्ला देणे असा आहे, ना की आपले समज, बिलिव्ह्ज, मते, बायसेस, रेटणे.
अनिलजीने पुढे कोतबो/माहिती द्या धागा ऊघडणार्यांसाठी ईथे सल्ला/मदत मागणे किती फसवे असू शकते आणि सो कॉल्ड काळजी वाटून सल्ला देणारे लोक किती बायस्ड असू शकतात हेच दाखवून दिले आहे.
अशा कमकुवत, अवस्थ लोकांना
अशा कमकुवत, अवस्थ लोकांना घटना आणि मानसिक स्वास्थ्य ह्यातला कार्यकारण भाव दाखवून मार्गदर्शन करणे योग्य की त्यांच्या कमकुवत मनाला प्लासिबो स्तोत्रांचे डोस पाजणे योग्य?>>>>
मुळात हे त्याच्याबद्दल सुरू आहे तो धागाकर्ता मजबूत मानसिकतेचा आणि गम्मत बघण्यासाठी हे सगळे करत असताना हा भुते नाहीतच हे ठसवण्याच्या चर्चेचा रतीब का घातला जातोय??? इथे कोणी विश्वास ठेवलेला त्याच्यावर की खरेच भुते त्याच्या घरात पसारा करून बसलीयेत म्हणून??
पण मला काही पाठांतर करायचे
पण मला काही पाठांतर करायचे असते तर मी जिंदाल स्टीलचा क्वार्ट्रली आणि अॅन्युअल रिपोर्ट पाठ करून ठेवला असता... जरा कुठे शेअर प्राईस वर खाली झाली की लाँग किंवा शॉर्ट जायला बरे.>>>>
तुम्हाला आवडते म्हणून सगळ्यांनीच अन्युअल रिपोर्ट पाठ करायचे हे कंडिशनिंग का करून घेतलेय स्वतःचे?? तुम्ही अन्युअल रिपोर्ट पाठ करा, मी स्तोत्रे करेन. अजून कोणी अजून काय करेल. आपली आपली आवड.
साधना राग मानू नका पण तुम्ही
साधना राग मानू नका पण तुम्ही बेमालूम बीफोर आणि आफ्टर ईफेक्ट फॅक्ट्स मिक्स करत आहात.
मुळात हे त्याच्याबद्दल सुरू आहे तो धागाकर्ता मजबूत मानसिकतेचा आणि गम्मत बघण्यासाठी हे सगळे करत असताना हा भुते नाहीतच हे ठसवण्याच्या चर्चेचा रतीब का घातला जातोय??? इथे कोणी विश्वास ठेवलेला त्याच्यावर की खरेच भुते त्याच्या घरात पसारा करून बसलीयेत म्हणून?? >> हे आता आफ्टर द फॅक्ट नॉलेज आहे. चर्चा आधी अतिशय गांभीर्याने स्तोत्र रिच्युअल रिकमेंड करण्याबद्दल चालू आहे.
तुम्हाला आवडते म्हणून सगळ्यांनीच अन्युअल रिपोर्ट पाठ करायचे हे कंडिशनिंग का करून घेतलेय स्वतःचे?? तुम्ही अन्युअल रिपोर्ट पाठ करा, मी स्तोत्रे करेन. अजून कोणी अजून काय करेल. आपली आपली आवड.>> हो मलाही असे वाटते पण 'मी कोणालाही मी करतो म्हणून तुम्हीही रिपोर्ट्स पाठ करा म्हणून सल्ला दिलेला नाही...'जसा माझा अमूक तमूक स्तोत्रांचा अनुभव आहे म्हणून तुम्हीही वाचा, फोटो लावा असा सल्ला अनिळजींना दिला गेला.
तुम्ही सोयीस्कर की मुद्दाम 'मी सगळ्यांनी पाठांतरासाठी कंपनी रिपोर्ट वाचावे' असे प्रीच करत आहे अशी आपली धारणा करून घेतली' .. होपफुली तुमच्या लक्षात येते आहे की आपण कसे आपल्या बायसेस मधून जग बघतो.
सो कॉल्ड काळजी वाटून सल्ला
सो कॉल्ड काळजी वाटून सल्ला देणारे लोक किती बायस्ड असू शकतात हेच दाखवून दिले आहे.>>>
माझ्या मते प्रत्येकजण बायस्डच आहे. मी सोडून इतरजण मला बायस्ड दिसतात एवढेच.
साधना राग मानू नका पण तुम्ही
साधना राग मानू नका पण तुम्ही बेमालूम बीफोर आणि आफ्टर ईफेक्ट फॅक्ट्स मिक्स करत आहात>>>>
रागाचा प्रश्न येतंच नाही. तुमचे मुद्दे चांगले आहेत.
पण मी स्तोत्रे पाठ करते म्हटल्यावर जर तुम्ही मी त्यापेक्षा अन्युअल रिपोर्ट पाठ करेन म्हटले तर मला तुमच्याबद्दल जे वाटेल ते मी वर लिहिले. बायसबद्दल मला काय वाटते तेही लिहिले. होपफुली तुमच्याही ते लक्षात येईल.
आणि सिरियसली, माझे वाचन तुमच्याइतके नाही किंवा विचारही नाहीत. त्यामुळे मी जास्त चर्चा करू शकत नाही.
पण मला काही पाठांतर करायचे
पण मला काही पाठांतर करायचे असते तर मी जिंदाल स्टीलचा क्वार्ट्रली आणि अॅन्युअल रिपोर्ट पाठ करून ठेवला असता... >>>>
मी संध्याकाळी दिवा लावला की मागे उभे राहून शुभमकरोती, पसायदान मंत्रपुष्पांजली ऐवजी अशी रिपोर्ट पटापट म्हणणारी माझी मुले इमाजीन करून अशक्य हसले
मी संध्याकाळी दिवा लावला की
मी संध्याकाळी दिवा लावला की मागे उभे राहून शुभमकरोती, पसायदान मंत्रपुष्पांजली ऐवजी अशी रिपोर्ट पटापट म्हणणारी माझी मुले इमाजीन करून अशक्य हसले>>>>
तुमचा प्रतिसाद वाचून मी अशक्य हसले. गुड नाईट

Kaypan ,
Kaypan ,
अनिळजी नवीन फोटो टाका की...
अनिळजी नवीन फोटो टाका की...
आता नवीन फोटो टाकायला तेच
आता नवीन फोटो टाकायला तेच भूताच्या मागे लागतील.
बिचरे भूत! ‘सारखे सारखे काय त्याच घरात’ म्हणत वैतागेल.
भुताचा गरबा खेळताना फोटो का
भुताचा गरबा खेळताना फोटो का नाही आलाय अजून
ही चीटिंग आहे..
१००० क्रॉस कसे होणार मग इकडे !!
डिप्रेशनची साधी सरळ व्याख्या
डिप्रेशनची साधी सरळ व्याख्या आहे...मानसिक ताण, दडपण, भिती ह्यातून व्य्क्तीच्या विचार, कृती आणि मुख्यत्वे गोष्टी महसूस करण्याच्या क्षमतेला आलेले अधूपण.
तर मला सांगा... एखाद्या घरात भिती वाटणे, अस्वस्थ वाटणे, भास होणे, कोणीही आसपास नसतांना कोणी तरी असण्याची चाहूल लागणे, आवाज येणे अशा गोष्टी ह्या आंतरिक भिती, ताण ह्यामुळे व्यक्तीने महसूस (मराठी शब्द सुचेना) केलेल्या नसून तिथे अमानवीय, दैवी/सैतानी शक्तीचा वास आहे हे तुम्ही कसे ठरवले?
म्हणजे ही अमूक मनोवस्था म्हणजे मानसिक असंतुलन आणि ती तमूक मनोवस्था म्हणजे अमानवीय, सैतानी शक्तीचा वास असे वर्गीकरण तुम्ही कसे करू शकलात? की जेणेकरून एकाला तुम्ही (आणि अनेकांनी) स्तोत्र वाचा अमूक तमूक रिचुअल्स करा असा सल्ला दिला आणि दुसर्याला काऊंसिलर कडे जा, लॉजिकली विचार करा, दुसर्या व्य्कतीची मदत घ्या असा सल्ला दिलात?
जसे समोरचा व्यक्ती एखाद्या घटनेचा प्रेमिस वर्णन करतो तसे तुमचा त्या गोष्टीकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलतो का?
डिप्रेशनच्या धाग्यावर 'माझ्याभोवती सतत कोणी तरी आजारी माणसाचा भास होतो, त्याच्या अस्तित्वाने दडपण येते अस्वस्थ वाटते, जीवनातले स्वारस्य त्याने हिराऊन घेतले आहे' असा प्रेमिस असता तर तुम्ही काऊंसिलर ऐवजी स्तोत्रपठण रिचुअल्स ई. चा सल्ला दिला असता का?
अनेकांनी तिथेही असा सल्ला दिलेला आहे.
>> खरेतर मधे दोन दिवस गेल्याने आणि दोन दिवसात पहिली वाफ गेलीये. पण तुम्हाला लिहिते म्हणाल्याने सव ड मिळाल्या मिळ्याला लिहितेय.
कदाचित टप्प्या टप्प्यात लिहावे लागेल. (लेक उठल्यास).
डिप्रेशन बद्दलः
हे कशामुळे आले आहे? काही घ टना कारणीभू त आहेत का केमिकल लोचा? हा प्रश्न येतो.
मला स्वतःला वाटते, तुम्ही नामजप, ध्यान करत असाल तर तुम्ही स्वतःला दोन्ही परिस्थिती येण्यापासून वाचवू शकता.
अर्थातच तहान लागल्यावर विहिर खणायला घेण्या त अर्थ नसतो. अशा वेळेस काय करावे?
मी आजूबाजूला मदत मिळतेय का पहिल्यांदा बघेन आणि लाँग टर्म करता विहीर खणायला घेईन. त्यामुळे तज्ञांची मदत हा पहिला उपाय असावा. तोच मी सजेस्ट केलाय.
ह्या धाग्यातल्या माझ्या प्रतिसादात पण मी कु ठे हे स्तोत्र म्हणा, कुलदेवाचे करा, बाहेरचे उपाय करा, नारळ फोडा सांगितले आहे का?
मी तज्ञ नाही. त्यामुळे असे उपाय सांगणे योग्य नाही.
पण माझा ह्या गोष्टींवर विश्वास आहे का?
अर्थातच! त्यात शंकाच नाही.
मी ग्रहण बघितल्याने मुलाचा ओठ फाटतो, सत्यनारायणाची पूजा न घातल्याने देव रागवतो, अमुक तमुक केल्याने मुसळ उ भे राहिले, पाताळात राक्ष स तप करताहेत, इतके % आध्यात्मिक प्रगती झाली वगैरे गोष्टींवर विश्वास ठेवते का?
अजिबात नाही. केवळ करमणू की करता ही मी अशा पोस्ट वाचू शकत नाही.
मग एका गोष्टीवर विश्वास आहे, एकावर नाही असे का?
मला वाटते, देव/ इतर शक्ती आ हेत का नाहीत ह्यात दोन शक्यता : आहेत ही पहिली, नाहीत ही दुसरी.
प्रत्येकाने विचार करून , अनुभव घेऊन ठरवावे.
दोन्ही विचार केवळ तार्किक कसोटीवर अॅक्सेप्ट करणे शास्त्रिय दृष्टिकोनाला धरून नाही ह्यावर विश्वास ठेवा. त्या करता अनुभव येण्याकरता प्रयत्न करावा.
मला ह्या १५-२० वर्षात जाणवलेली गो ष्ट म्हणजे: ह्या शक्तिंवर वि श्वास असणारे आणि नसणारे दो घेही आपलेच ब रोबर आणि समोरचा अजून प्रगल्भ नाही ह्यावर ठाम असतात. कुणाच्याही म्हणण्याने फारसा फरक पडत नाही.
वि श्वास असणारे, प्रत्येक अनुभ व हा दैवी आहे ह्याची खात्री बाळगतात आणि वि श्वास नसणारे प्रत्येक अनुभव हा योगायोगच आहे ह्यावर श्रद्धा ठेवून असतात.
त्यामुळे दोघांच्यात प्रॉडक्टिव चर्चा होऊ शकत नाही. काचा बंद केल्यावर ऐ कू येणे बंद होते.
वैयक्तिक स्कोअर्स डो क्यात धरले तर जग जामच पिवळे दिसते.
हा फिलॉसॉफिकल अनुभव सांगितल्यावर वैयक्तिक अनुभव सांगते. हा पब्लिक फोरम आहे आणि लोक वेड्यावाकड्या चर्चा करणार, हे गृहीत धरूनही माझा अनुभव सांगतेय. माझ्या प्रा माणिक पणावरच तुम चा विश्वास नसेल तर मात्र आपल्या बेसिक म धेच लोचा आहे आणि ह्या बाबतीत आपण काहीच करू शकत नाही.
माझ्या घरात माझ्या आईचा पूर्ण विश्वास आणि बाबांचा काही नसते ह्यावर पूर्ण विश्वास.
त्यामुळे दोन्हीही वातावरण उपलब्ध होते.
माझा नै सर्गिक कल आई च्या विचारांकडे होता. हे मी कबूल करते.
माझा नवराही असे काही नसते ह्याची खात्री असलेल्यांपैकी आहे.
मी अनेक प्रकारची पुस्तके वाचते. त्यात मी नरेंद्र दाभोळकरांची पुस्तकेही वाचत असे. अर्था तच त्यांचे लिहिलेले पट ण्यासारखेच आहे. त्यातून जगात विविध प्रकारचा केऑस दिसतो, तो कसा काय? मग देव काय करतो? असेही अनेक प्रश्न पडत गेले.
साधारण तिसाव्या वर्षाच्या आसपास मला हे खरेच असेल का नसेल ह्यावर प्रश्न पडा यला लागले.
देव अर्था त च लहानपणापासून आवडता असल्याने हा प्रकार फारच त्रासदा यक झाला.
अनेक वर्षे ह्या विषयांवर विचार करून आणि भावनिक दृष्ट्याही त्रासातून गेले. लंबक दुसरी कडे गेलेला. दोन अधिक दोन = ४ असा अनुभव आला तरच विश्वास ठेवायचा अशा टोकाला मी आलेले.
पण मग आलेल्या अनुभवांतून मी पुन्हा अस्तित्व मानण्याच्या टोकाला आले.
हे अनुभव मला भौतिक जगात त्रास झाला आणि देवाने मदत केली अशा स्वरुपाचे नाहीत.
पण माझ्या करता हे अ नुभव सत्य आहेत आणि मला अस्तित्वाची खात्री पटवण्याकरता पु रेसे आहेत.
ते इथे देत नाहिये.
ह्या शिवाय अमानवीय मधे मोडतील असे दोन अनुभव प्रत्यक्ष बघितले आहेत.
१. एक मोठा मा णूस अनेक महिने त्रासातून गेल्यावर (ही स्किझोफ्रेनियाची केस आहे का अशी शंका यावी) - एके रात्री "उपाय" के ल्यावर ( ह्या उपायां मागे कोंबडे बकरे वगैरे कुणाचाही जीव गेला नाही) उपाय करणार आहे, केलेला आहे हे ह्या व्यक्तीला माहित नव्हते) -सकाळी तो माणूस नॉर्मल ला आला आणि २ दशकांहून अधिक काळ तो पूर्णतः नॉर्मल आहे
२. असाच अ नुभव एका लहान मुलाबद्दल पाहि ला आहे. (व य वर्षे४ , सो उतरवून टाकणे वगैरे काहीही कळायचे वय नव्हते. झालेला त्रास १=२ आठवडे चाललेला) . ५ मिनिटामध्ये फरक पडलेला प्रत्यक्ष डोळ्याने पाहिले आहे.
तुम्ही देव/भूत माना न माना, त्याने त्याला काहीही फरक पडत नाही. फरक पडतो तो आपल्याला.
त्यातही रे ग्युलर भौतिक जगात जगण्या मध्ये काहीही फरक पडत नाही.
ह्या अमानवीय घटना ही अॅनॉमली आहे.
देवावर चा विश्वास आणि त्याकरता काही म्हणणे करणे, हे रेग्युलरली केल्याने आपली आत्मिक ताकद वाढणे, आपल्याला बेटर माणूस व्हावे असे वाटणे ह्याकरता मदत करते. इतरही अने क गोष्टी लिहिण्यासारख्या आहेत , पण आता बास.
जर तुम्ही मुळातच बुद्ध असाल तर काहीही न केले तरी तुम्ही ऑल्रेडी पोचलेले असू शकता. पण तसे नसेल तर ह्या गोष्टी मदत करतात.
बरीचशी माण से सुरु वात देवाने मदत करावी म्ह णून करतात. का हीजण भितीने. पण पुढे तसेच रहात नाही. सातत्या ने प्रेम्/आत्मियता निर्माण होऊ शकते.
आता ह्या धाग्याविषयी:
एखाद्या घरात भिती वाटणे, अस्वस्थ वाटणे, भास होणे, कोणीही आसपास नसतांना कोणी तरी असण्याची चाहूल लागणे, आवाज येणे अशा गोष्टी ह्या आंतरिक भिती, ताण ह्यामुळे व्यक्तीने महसूस (मराठी शब्द सुचेना) केलेल्या नसून तिथे अमानवीय, दैवी/सैतानी शक्तीचा वास आहे हे तुम्ही कसे ठरवले?
>> १ माझ्या एकाही प्र तिसादात मी त्यांना उपाय सुचवले नाहीत.
मी त्या जागी नाही, त्यामुळे तो अनुभव माझा नाही. पण असे अनुभव येऊ शकतात हा मात्र माझा अनुभव आहे. आ णि त्यांच्याबाबतीत असेच आहे, ह्यावर माझा वि श्वास नसला तरी अ से असू शकते ही शक्यता मात्र मला माहित आहे.
तसेच त्यांचा अनुभव हा त्यांनी त्यांनाच नव्हे तर इतर कु टुंबीयांनाही येतोय असे सांगितले. त्यामुळे हा वैयक्तिक भास असू शकत नाही.
(खोटारडे पणा हा त्यांचा वैयक्तिक चॉईस आहे. इट रिफ्लेक्ट्स ऑन हिम. )
हे खरे असले असते, तरी - ह्याला वावे ह्यांनी दिलेल्या उदाहरणाप्रमाणे इतर साधी एक्स्प्ल्नेशन्स असू शकतात का?
अर्थातच.
मी दोन्ही शक्यता माझ्या मनात कधी ही नाकारल्या न व्हत्या. मी कुठ्लेही उपाय सुचवले ना हीत.
त्यांची आयडेंटिटी अॅनोनिमस आहे, जगात हर तर्हेची लोक असतात. ह्याची कल्पना असल्या ने भावनिक गुंतवणूक वा राग यायचा प्रश्णच नाही!
नानबा, तुम्ही देवनागरीत
नानबा, तुम्ही देवनागरीत टंकलिखित केलेल्या प्रदीर्घ प्रतिसादाबद्दल धन्यवाद. तुमची भुमिका यातून सुस्पष्टपणे मांडण्याचा तुम्ही यत्न केला आहे.
मला एका वाक्याचा अर्थ लागला नाही. ते वाक्य या पूर्ण प्रतिसादाला समजण्यासाठी महत्त्वाचे आहे माझ्या मते. याची अजून फोड कराल का?
>>> दोन्ही विचार केवळ तार्किक कसोटीवर अॅक्सेप्ट करणे शास्त्रिय दृष्टिकोनाला धरून नाही ह्यावर विश्वास ठेवा. >>>
खुप दिवसांनी ईथे फिरकले आणि
खुप दिवसांनी ईथे फिरकले आणि घाबरलेच. अत्ता पर्यन्त नुसत भुत माणसला पकडत एवढच माहित होत. पण ईथे तर अनिळजींचे घरचे भुत स्वताच त्यांच्या आयडी वापरुन माबोवर लेखन करत आहे आणी माबोकरांनाच धरत आहे.
एक घटना, माझ्या कलीग ने
एक घटना, माझ्या कलीग ने सांगितलेली, तो मुळचा मुरुडचा, तो 20-22 वर्षांचा असताना त्याच्या बहीणी आणि जिजू सोबत जंजीरा फिरायला गेलेला..तसा तो नेहमीच किल्ल्यावर जायचा. गाईड-ग्रृप पासून वेगळा फिरत होता...वेळ दुपार २ च्या आसपास...अचानक त्याच्या पाठीत कुणीतरी जोरात धपाटा घातला, ऑलमोस्ट तो जमीनीवर पडणार होता....त्याने आजुबाजुला पाहिले कुणीच नव्हते...तो भुतं खेत मानत नाही पण काय झालं ते त्याला ही समजलं नाही...भास म्हणावा तर पाठीवर पाच बोट उमटलेली....कुणी स्पष्टीकरण देउ शकेल याचे? मला फक्त तो धादांत खोटी गोष्ट सांगत होता हेच कारण रिझनेबल वाटलं. आजुन कुणाला काही सुचतं आहे का??
अनिळजीने लोकांना तुच्या बनवलं
अनिळजीने लोकांना तुच्या बनवलं आहे व लोकही बनत आहेत.
आजून एका मित्राने सांगितलेली
आजून एका मित्राने सांगितलेली गोष्ट आठवली. त्याच्या घरी कुत्रा होता , जेंव्हा कधी तो कुत्रा दंगा करत असे तेंव्हा माझा मित्र न्यूज पेपरचा रोल बनवून त्याला दाखवत असे आणि त्याचा कुत्रा शांत होई. मी त्याला विचारले तेव्हा तो म्हणाला मी त्याला तो पिल्लू असल्यापासून तशी सवय लावली आहे...माझ्या मनात विचार आला काय कमाल आहे, याच पेपर रोलला दुसरा कुत्रा भीक पण घालणार नाही. असो तर प्रत्येकाने आपल्या मनाचा कुत्रा कशाने शांत होतो याचा मागोवा स्वतःच घेणे इथे आवश्यक वाटते...कुत्रा शांत करायचे आणखी कोणते उपाय आहेत आणि कोणते आपल्याला लागू पडतील याचा शोध घेणें तर सोन्याहून पिवळे...पण लक्षात असूद्यात दुसऱ्याच्या मनातला कुत्रा त्याच उपायाने शांत होईल याबद्दल खात्री बाळगणे म्हणजे काही शहाणपण नाही.
सगळ्यांचे आभार आणि धन्यवाद
सगळ्यांचे आभार आणि धन्यवाद
आता कसे आहात आणि कुठे राहताय
आता कसे आहात आणि कुठे राहताय अनिळजी. तुम्ही आहात बघून बरं वाटलं
मी छान आणि मजेत आहे.
मी छान आणि मजेत आहे.
मगर याच घरात पाळणार आहात का ?
मगर याच घरात पाळणार आहात का ?
मगरीला तुमच्या घरातील भूतं त्रास नाहीत देणार का ?
वन्यजीव संरक्षण कायद्यांतर्गत मगरीला भूतांच्या घरात नेणे कायदेशीर आहे का ?
ते घर मी सोडलंय. त्या दुष्ट
ते घर मी सोडलंय. त्या दुष्ट शक्तीने तसं करण्यास भाग पाडलं.
त्या घरातल्या मूळ रहिवाशांचे
त्या घरातल्या मूळ रहिवाशांचे तुमच्याबद्दलचे अनुभव पण वाचायला आवडले असते.
दोन्ही पक्ष ऐकायला पाहीजेत ना ?
त्या घरात सध्या माझं वास्तव्य
त्या घरात सध्या माझं वास्तव्य आहे.
भूतबाळ तर माझ्या पेक्षाही एक
भूतबाळ तर माझ्या पेक्षाही एक वर्ष एक महीन्याने मोठे आहे वयाने.

मी तर तुम्हाला सरच म्हटले पाहीजे.
तुमचे पालक तुमच्या पेक्षा किमान चार पाच मिनिटांनी तरी मोठे असतील ना हो सर ?
अनिळजी पण माझ्या आधीचे आहेत.
अनिळजी पण माझ्या आधीचे आहेत.
भूतबाळजी पण. यांचे पालक जुने असल्याने त्यांनी ठरवले तर योग्य ग्रुपात असे धागे उघडतील. मनोरंजन सर्वांचे व्हायला हवे.
जी जी...
तुमचे पालक तुमच्या पेक्षा
तुमचे पालक तुमच्या पेक्षा किमान चार पाच मिनिटांनी तरी मोठे असतील ना हो ?>>>
पालक वयानं मोठेच असतात. वयानं लहान पालक मी तरी कुठे बघितले नाहीत. माझे बाबा माझ्यापेक्षा अठ्ठावीस आणि आई चोवीस वर्षांनी मोठी आहे.
वयानं लहान पालक मी तरी कुठे
वयानं लहान पालक मी तरी कुठे बघितले नाहीत >> मी पाहिले आहेत. हिरव्या रंगाचे असतात. पॉपाय त्यांना खूप आवडीने खातो.
Pages