पछाडलेल्या वास्तूत येणारे अनुभव.

Submitted by अनिळजी on 25 September, 2020 - 12:16

नमस्कार, मी काही दिवसांपूर्वी एक घर घेतलं. साधारण महिना झाला असेल आम्ही म्हणजे मी, पत्नी, आणि दोन वर्षांचा मुलगा या घरात शिफ्ट झालो. जेव्हा पहिल्यांदा हे घर पाहायला आलो तेव्हा मी आणि हिने इथे प्रचंड अस्वस्थता अनुभवली. पण स्वस्त मिळत असल्याने हे घर फायनल केलं. इथे राहायला आल्यापासून आठवड्यात वाईट अनुभव यायला लागले आहेत. आमच्या तिघांशीवाय इतरही कोणीतरी इथे वावरत असल्याचा भास होतो. वारा नसताना दरवाजे जोरात उघडझाप होणे. कोणीतरी हाक मारल्याचा भास होणे, मध्यरात्री भांडी जोरात वाजणे असले प्रकार सर्रास घडत आहेत. पाच दिवसांपूर्वी बाथरूममधला नळ अचानक सुरू झाला होता. मुलाचं वागणही बदलायला लागलंय एकटाच कोणीतरी समोर असल्यासारखा बडबडत असतो. ही या प्रकाराने खूपच घाबरली त्यामुळे सासु सासऱ्यांना काही दिवस बोलावून घेतलं होतं. काही दिवस आधार वाटला पण आता पुन्हा आम्ही एकटे आहोत. सासू सासऱ्यांनाही ईथे विचित्र अनुभव आले. त्यांनी हे घर विकून दुसरं घेण्याचा सल्ला दिलाय. ज्याच्याकडून हे घर घेतलं होतं तो आता हे सगळे आमचे भास आहेत म्हणून हात वर करतोय. सध्यातरी लगेच दुसरीकडे शिफ्ट होणं कठीण वाटतंय.अजून हानी पोहचेल असं तरी काही घडलं नाही. पण सारखे भीतीत वावरत असतो. हा प्रकार कोणी अनुभवला आहे का? आणि अनुभवला असेल तर यातून काय मार्ग काढलात?

Group content visibility: 
Use group defaults

किल्ली Happy

माझ्यावर वेळ आली असती तर काय केले असते ह्याचा विचार करून भावनिक होऊन सल्ला दिला होता. >>>> Exactly ! तू चांगल्या भावनेने लिहिलंस पण याच भावनिकतेचा धागालेखकाने गैरफायदा घेतला . भरत आणि हाब त्यावर बोट ठेवत आहेत.

आता कोण्या ऐऱ्या गैरया समस्यापुढे भावनिक होऊन बळी पडायचे नाही , शास्त्राची कसोटी लावायची . हेच या धाग्याच फलित.

{असेच प्रतिसाद अपेक्षित होते
येऊ द्यात
विज्ञानावर निबंध लिहीन म्हणते}

विवेचन पटले असूनही असा तिरकस प्रतिसाद देण्यामागे काय उद्देश होता किल्ली?

असंच
सगळे मजा घेत आहेत
मीही घेईन
Happy
ह्यात काय तिरकस आहे आणि

भूताची चित्रे प्रकाशित करण्यापूर्वी त्यांच्याकडून कंसेंट फॉर्म भरून घेतला होता का? हल्ली फोटोग्राफी व्यवसायात असे करावे लागते म्हणे. भूताने कोणत्या नावाने सही केली. म्हणजे भूत होण्यापूर्वीचे भौतिक नाव की भूत झाल्यावरचे भूतिक नाव??

च्रप्स, Shamans, Mystics and Doctors by डॉ. सुधीर कक्कर हे पुस्तक वाचा.

मग लोक भगत, मांत्रिक वगैरेंकडे का जातात याचे उत्तर मिळेल, किंवा ती कोंबडी का मेली याचेही कदाचीत. (सगळ्यांचा विश्वास बसायला कोंबडी मरणे आवश्यक आहे, हेतू चांगला असेल त्या मागे).

पण ते काही लॉंगटर्म सोल्युशन नव्हे. यातून हळूहळू बाहेर पडायला हवे.

Submitted by मानव पृथ्वीकर on 27 September, 2020 - 00:50
>>>
मानव हे मिस झाले होते.. कोंबडी उतरावणारी तिची सकखी पणजी होती... कोणताही भगत अथवा मांत्रिक नव्हता...

असतात काही गोष्टी दया, तुम नाही समझोगे, तर्काच्या पलीकडे
>>>
तुमच्या या वाक्यात व कृतीत विरोधाभास आहे.
तुम्ही या धाग्यावर धागाकर्त्याला मदत करण्यासाठी काही उपाय सांगितले. ते उपाय सुचवावेसे तुम्हाला का वाटले? कारण तुम्ही लॉजिकली विचार केला, अश्या प्रकारच्या समांतर घटनेत तुम्हाला या पुर्वी त्या प्रकारच्या उपायांचा उपयोग झाला असावा. पण ते उपाय हे लॉजिक/विज्ञान यांच्या कसोटीवर खरे उतरत नाहीत याचीही तुम्हाला कल्पना दिसते कारण तुम्हीच म्हणत आहात की काही गोष्टी तर्काच्या पलीकडे आहेत.
तर या तथाकथीत तर्कापलीकडील गोष्टींचा तुम्ही तर्काचा वापर करून आचरणात आणाव्या असे म्हणत आहात.

इथे विज्ञानवादी म्हणून मिरवण्यासाठी, श्रद्धाळू लोकांना नावे ठेवण्यासाठी म्हणून लिहिले जाते ही समजूत डोक्यातून काढून टाका. पुर्वीच्या काळी जेव्हा विज्ञान - तंत्रज्ञान प्रगत नव्हते तेव्हा अनेक मानव समुहास वा एका व्यक्तीस घातक असलेल्या रुढी-परंपरा पाळल्या जात. त्या रुढींना समाजमान्यता होती. त्यात तुलनेने कमी घात़क अश्या 'मासिक पाळी दरम्यान बाजूला बसणे' ते 'नरबळी, सती, चेटकीण म्हणून जाळून टाकणे, जेनिटल म्युटिलेशन' अश्या जीव घेणार्‍या प्रथा इतका मोठा स्पेक्ट्रम होता. जितक्या ठामपणे आजच्या जमान्यात श्रद्धाळू लोक देव आहे म्हणून सांगतात किंवा इथे भूत्/काळी शक्ती आहे म्हणून सांगतात त्याच ठामपणे समजाचा मोठा भाग या अघोरी प्रथांवर विश्वास ठेवत असे. त्याचे कारण अनेक रोजच्या जीवनातल्या सामान्य घटनांची तर्कसुसंगत कारणीमिमांसा माहिती नसणे हे होते. जस जसे वैज्ञानिक प्रगती होऊ लागली तस तसे या प्रथांवर विश्वास ठेवणे कमी होऊ लागले. पण ते आपोआप झाले नाही. समाजसुधारकांनी या खोलवर रुजलेल्या प्रथांविरुद्ध प्रबोधन केले, त्यामागची कारणे लोकांसमोर ठेवली.
पर्जन्यदेवाच्या कृपेने पाउस पडतो यावर (कदाचित) आज तुम्ही विश्वास ठेवत नाही मात्र केवळ १००-२०० वर्षामागे यावर बहुसंख्यांचा विश्वास होता. मग हळुहळु ढग निर्मिती, वार्‍याने त्यांचे वाहणे यामागचे शास्त्र समजत गेले. गेल्या ५०वर्षात जेट स्ट्रीम, एल निनो वगैरे अजून काही वातावरणातील घटनांचे व त्याचे हवामानावर होणार्‍या परिणामांचे शोध लागले . जस जसे आपल्याला जास्त जास्त शोध लागतात तस तसे आपण कारणीमिमांसा माहिती नसलेल्या बकेटमधल्या गोष्टी कमी करून कारणे माहिती असलेल्या बकेटमध्ये टाकू लागतो.
यात कधी कधी पूर्ण ठाम कारण मिळत नाही, मग प्रोबॅबिलिटी सांगितली जाते. कधी कधी फक्त गणिती मॉडेल असते. हे सर्व खुले उपलब्ध असते. प्रोबॅबिलिटी किती आहे हे सांगितलेले असते. 'यावर विश्वास ठेवा कारण माझ्या आई-वडीलांनी, शिक्षकांनी, समाजातील बहुसंख्यांनी मला लहानपणापासून हे सत्यच आहे म्हणून सांगितले आहे' हे तुम्हाला विज्ञानात कोणीही सांगणार नाही.

माझी अमूक तमूक वर श्रद्धा आहे, ती इल्लॉजिकल आहे तरी मी त्यावर श्रद्धा ठेवणार असे तुम्ही म्हणालात तर हरकत नाही. अर्थात तो पुन्हा आंतर्विरोध होतो कारण श्रद्धा इल्लोजिकल आहे हे मान्य केले तर श्रद्धा ठेवण्यात काही अर्थ नाही हे स्वतःलाच समजते.
माझी श्रद्धा आहे म्हणून दुसर्‍यांनापण त्यावर विश्वास ठेवायला सांगणार हा स्लिपरी स्लोप होतो. कारण तुमची श्रद्धा फक्त देवाला नमस्कार करा म्हणजे तुमचे भले होईल इतपतच असेल पण तिचा नरबळी द्या म्हणजे तुमचे भले होईल या थराला जाण्यात समाजात वेळ लागत नाही.

मला वाटते माझा मुद्दा मी शक्य आहे तेव्हड्या विस्ताराने सांगितले. आता थांबतो.

मस्त प्रतिसाद टवणे सर.

विशेषतः या वाक्याला मनःपूर्वक अनुमोदन
इथे विज्ञानवादी म्हणून मिरवण्यासाठी, श्रद्धाळू लोकांना नावे ठेवण्यासाठी म्हणून लिहिले जाते ही समजूत डोक्यातून काढून टाका.

ते भूत किती वेळा दिसणार आहे? त्याचे दात आणि केस अत्यंत यक्क आहेत.
अजून काही वेळा दिसलं तर मीच एरंडेल, मॅट्रिक्स सिरम आणि एखादा टूथ व्हाईटनर घेऊन घरी जाईन म्हणते. अजिबातच बघवत नाहीये.

त्याला लॉण्ड्रीतूच धुऊन आणावे लागेल आधी.
आणि मग डेंटिस्ट कडुन आणुन परत एकदा ड्रायक्लिनिंंग.
तेव्हा कुठे भुतात आल्यासारखे वाटेल ते.

नानबा, हा तुमचा डिप्रेशनच्या धाग्यावरचा पहिल्याच पानावरचा प्रतिसाद

Depression is real.
You must meet a counsellor.

तुमच्या पुनर्जन्म संकल्पनेमुळे "कधी मरायचं" हा choice तुमच्याकडे नाही .
मग भरपूर आयुष्य असेल , तर पुढे दोन पर्याय राहतात : 1. सतत मरणाची वाट बघत कंटाळवाणा जगणं 2. दुसरा पर्याय म्हणजे योग्य मदत घेऊन शांततेत आनंदात जगण्.
depressed माणसाला कदाचित हा दुसरा पर्याय हे मजेशीर वाटणार नाही. पण logic जरी पटले तर ताबडतोब मदत घ्यायला जा.
बऱ्याच दा हे हार्मोन्स मुळे होते, त्याचा आपल्या परिस्थिती शी संबंध नसतो.
त्यामुळे आपण काही म्हणून परिस्थिती लगेच बदलणार नसते.पण हेच बाहेरची मदत मिळाली, तर फरक पडायला मदत होऊ शकते.

Submitted by नानबा on 14 October, 2020 - 22:45

डिप्रेशनची साधी सरळ व्याख्या आहे...मानसिक ताण, दडपण, भिती ह्यातून व्य्क्तीच्या विचार, कृती आणि मुख्यत्वे गोष्टी महसूस करण्याच्या क्षमतेला आलेले अधूपण.

तर मला सांगा... एखाद्या घरात भिती वाटणे, अस्वस्थ वाटणे, भास होणे, कोणीही आसपास नसतांना कोणी तरी असण्याची चाहूल लागणे, आवाज येणे अशा गोष्टी ह्या आंतरिक भिती, ताण ह्यामुळे व्यक्तीने महसूस (मराठी शब्द सुचेना) केलेल्या नसून तिथे अमानवीय, दैवी/सैतानी शक्तीचा वास आहे हे तुम्ही कसे ठरवले?

म्हणजे ही अमूक मनोवस्था म्हणजे मानसिक असंतुलन आणि ती तमूक मनोवस्था म्हणजे अमानवीय, सैतानी शक्तीचा वास असे वर्गीकरण तुम्ही कसे करू शकलात? की जेणेकरून एकाला तुम्ही (आणि अनेकांनी) स्तोत्र वाचा अमूक तमूक रिचुअल्स करा असा सल्ला दिला आणि दुसर्‍याला काऊंसिलर कडे जा, लॉजिकली विचार करा, दुसर्‍या व्य्कतीची मदत घ्या असा सल्ला दिलात?

जसे समोरचा व्यक्ती एखाद्या घटनेचा प्रेमिस वर्णन करतो तसे तुमचा त्या गोष्टीकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलतो का?
डिप्रेशनच्या धाग्यावर 'माझ्याभोवती सतत कोणी तरी आजारी माणसाचा भास होतो, त्याच्या अस्तित्वाने दडपण येते अस्वस्थ वाटते, जीवनातले स्वारस्य त्याने हिराऊन घेतले आहे' असा प्रेमिस असता तर तुम्ही काऊंसिलर ऐवजी स्तोत्रपठण रिचुअल्स ई. चा सल्ला दिला असता का?
अनेकांनी तिथेही असा सल्ला दिलेला आहे.

तुम्ही किंवा कोणीही माझ्या वरच्या प्रश्नाचे ऊत्तर दिले तरी चालेल.

जाताजाता,
हा धागा माझा नाही... असता तर कॉलर ताठ करून सांगितले असते Proud
ऊलट हे होक्स आहे असे मी माझ्या पहिल्याच प्रतिसादात लिहिले होते. Happy

मानवदादा Happy
मानव असून किती विचार करताय भुताच्या मनाचा Lol
असं सारखं खरं भूत(?) दिसलं तरी काही भीती रहाणार नाही.
TRP संभालने का रे बाबा !!!

हायजेनबर्ग,
तुम्ही लिहिलेल्या, तमुक प्रकारच्या मनोवस्थे मागे - भिती ही भावना आहे. दुसऱ्या प्रकारात कॉज डिप्रेशन आहे हे धागाकर्ती ला ही माहीत दिसतंय.
भिती, प्रेम या भावना व्यक्तीसापेक्ष आहेत आणि खरंतर मानवी मेंदू चे खेळ (illusions). प्रत्येकावर यांचे परिणाम आणि प्रत्येकाचं कोपिंग mechanism वेगळं असणार असं मला वाटतं.
काही लोकांना मुळात काही आवाज आले तर भिती वाटणारच नाही. काही जणांना भिती वाटेल पण ते त्यामागचे कारण शोधून काढतील. आणि काही जण श्लोक म्हणून वाटणारी भिती कमी करतील.
यातले कारण शोधायला जाणारे लोक कमीच असतात कारण त्यासाठी तशी वृत्ती आणि हिंमत, दोन्ही लागतं. तसे पण दर वेळेस कार्यकारण भाव शोधणे शक्य होईल च असे नाही.

एखाद्या घरात भिती वाटणे, अस्वस्थ वाटणे, भास होणे, कोणीही आसपास नसतांना कोणी तरी असण्याची चाहूल लागणे, आवाज येणे अशा गोष्टी ह्या आंतरिक भिती, ताण ह्यामुळे व्यक्तीने महसूस (मराठी शब्द सुचेना) केलेल्या नसून तिथे अमानवीय, दैवी/सैतानी शक्तीचा वास आहे हे तुम्ही कसे ठरवले?
>>
Good question.
मी कारण सांगून तुम्हाला पटणार का ?
तुम्ही एक मनोभूमिका घेतली आहे त्यापलीकडे विचार करणे जमणार का?
आमचे आजोबा एक गोष्ट सांगायचे.
अमेरिकेत गुलामगिरी संपली त्याच्या आसपास ची गोष्ट.
आफ्रिकन वंशाचे एकाला वाटते, आपल्या मूळ खेड्यात जावे माणसांना भेटावे..
तसा तो जातो कुणाचा कोण खाणाखुणा सांगितल्यावर त्याचे स्वागतही होते मग रात्री त्याच्या आगमना प्रित्यर्थ मेजवानी असते थोडे पिऊन झाल्यानंतर तो अमेरिकेतल्या एक-एक गमतीजमती सांगायला लागतो.
ट्रांजिस्टर चा/ रेडिओ चा शोध अजून आफ्रिकेतल्या त्या खेड्यापर्यंत पोहोचलेला नसतो. तो सांगायला लागतो, असं उपकरण असतं की लांब बोललो तरी इथे ऐकू येतं . त्यावर लोक त्याला सल्ला देतात सगळे ठीक आहे पण बाबा रे तुला पचत नसेल तर तू इतके पीत जाऊ नको.
माझ्यासमोर हे घडते, त्याची एकापेक्षा अधिक स्पष्टीकरणे असू शकतात आणि "मला मेकॅनिझम कळले नाही म्हणून ते अस्तित्वातच नाहीत, असे नसते" हे तरी मान्य करणारे असल्यास पुढची चर्चा होऊ शकते.

मी कारण सांगून तुम्हाला पटणार का ?> जरूर सांगा. पटले तर नक्कीच कबुली देईन.
ट्रान्झिस्टर च्या कथेतून नक्की काय सुचवायचे आहे? आफ्रिकन लोकांना ती भुताटकी वाटली तरी ते शास्त्रीय उपकरण आहे.. असे? मी ही तेच सांगतो आहे त्या घडीला आवाजाचा उगम कळला नाही तरी त्यामागचे शास्त्रीय कारण तपासाअंती विशद करता येते.
मला मेकॅनिझम कळले नाही म्हणून ते अस्तित्वातच नाहीत, असे नसते> कुठले मेकॅनिझम. अमानवीय की शास्त्रीय. एखाद्या गोष्टीमागचे मॅकॅनिझम कळले नाही की ते बाय डिफॉल्ट अमानवीयच असते असे तुमचे मानणे आहे का?
अशा मेकॅनिझम न कळालेल्या गोष्टींमागे ती घडवण्यात अमानवीय शक्तीचा हात होता असा तुम्हाला कधी प्रत्यय आला आहे का? आला असल्यास त्याबद्दलही जरूर सांगा.

आफ्रिकन लोकांना जसे ट्रांजिस्टरचे अस्तित्व कळेल पण मर्यादित ज्ञानामुळे त्याची कारणमीमांसा करता येणार नाही. अगदी तसेच सध्याच्या विज्ञानाच्या दृष्टीने सध्या "डार्क मॅटर" आहे ज्याचे अस्तित्व विश्वात 80% हून जास्त आहे असे पण लक्षात आले आहे. इतरही खूप गोष्टी आहेत. त्यांची उकल होईल भविष्यात. पण जोपर्यंत ती होत नाही तोवर अशा गोष्टींबाबत कुणी कसे रिऍक्ट व्हावे... हा कळीचा मुद्दा Wink

उदाहरण ट्रान्झिस्टरचं द्यावं लागलं ! >>
German manasashi German language madhe bolav lagel na.
Tithe marathit bolun kase chalel?
Haburg cha soor charchecha ahe, mhanun charchechi tayari dakhavalee.
Tumacha soor upahasacha ahe ho bharat.

ब्बरोबर.हा धागा हायझेनबर्ग यांनीच डुप्लिकेट आयडी घेऊन काढला असा आरोप करणार्‍या व्यक्तीशीही चर्चा करू करणार्‍या हायझेनबर्ग यांच्याकडून मला खूप काही शिकण्यासारखं आहे, याची मला कल्पना आहे.

असो. आणखी भरकटवत नाही.

डार्क मॅटरकडे कसं बघायचं याचाही विज्ञानाचा काही दृष्टिकोण आहेच. बरोबर?

मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्रात म्हटली जाणारी ही प्रार्थना आहे. (मुळात ती AA ची आहे. मराठी रूपांतर देवदत्त दाभोलकरांचं आहे. )
जे टाळणे अशक्य, दे शक्ती ते सहाया
जे शक्य साध्य आहे, निर्धार दे कराया |
मज काय शक्य आहे, आहे अशक्य काय
माझे मला कळाया, दे बुद्धि देवराया ||

(अनिल अवचटांप्रमाणे, देवावर ज्यांचा विश्वास नाही त्यांनी देवाच्या जागी आपापल्या विश्वासाप्रमाणे कल्पना करावी. मग ती आपली सद्सद्विवेकबुद्धी, आपलं अंतर्मन, वैज्ञानिक दृष्टिकोन असं काहीही असू शकतं)
मुद्दा असा की आपल्याला ज्याचं कारण कळत नाही अशा अनेक गोष्टी असतात. ही कारणं शोधण्याचा प्रयत्न विज्ञान सतत करत असतं. वर टवणे सरांनी हेच लिहिलंय. त्यामुळे मी अधिक लिहीत नाही. ज्याचं कारण तरीही कळत नसेल, त्रास होत असेल आणि तो दूर करता येत नसेल तर त्याचा स्वीकार करावा. पण 'कारण कळत नाही' असं म्हणताना आपण कारण शोधायचा प्रामाणिक प्रयत्न केलाय का, हे स्वतःला विचारायला तर हवं. मज काय शक्य आहे, आहे अशक्य काय, हे तपासून तर बघायला हवं.
उदा. ग्रहणात मुसळ उभं राहतं. कुणी प्रयोग करून बघितला का रोज मुसळ परातीत उभं करून? माझ्याकडे मुसळ असतं तर मी केला असता. प्रयोग करून समजलं असतं खरं काय आहे ते. पण आपल्याला जर अशा तथाकथित गूढ गोष्टींचंच आकर्षण वाटत असेल तर आपण तिथेच थांबून राहतो.

आफ्रिकेतल्या त्या खेडेगावात राहणाऱ्या लोकांना ट्रान्झिस्टर माहिती नसेल, म्हणून ते तसं म्हणाले असतील. पण ट्रान्झिस्टरबद्दल माहिती झाल्यावरसुद्धा ते तसं म्हणणार का? हा मुद्दा आहे.

फसवले गेलो हे लोकांना उशिरा कळले आणि तरीही राग आला नाही याचे काहींना आश्चर्य वाटले हे वाचून मला आश्चर्य वाटले. कोतबोत राग येण्यासारखे काय हेच कळले नाही. कोतबोतल्या कित्येक धाग्यांवर फेक आहे हे आरोप याआधी झालेत. ह्या धाग्यावरही पहिल्यापासून संशय घेतला गेलाय.
ह्या धाग्याच्या पहिल्या प्रतिसादापासून अर्धे लोक थट्टा करत होते व उरलेले अर्धे एका बाजूने थट्टेचा आनंद घेत होते व त्याचवेळी त्यांना जे सुचत होते ते सल्ले देत होते. ज्यांनी सगळे प्रतिसाद वाचलेत/दिलेत त्यांना पहिल्यापासूनच अंदाज होता की हे खोटेही असू शकेल, खरेही असू शकेल. मग राग कसला??

बरे, राग जरी आला तरी काय करणार? एखाद्याने तुमची गम्मत म्हणून फसगत केली आणि त्यावर तुम्ही रागावला तर फसगत करणारा खजील होणार की त्याचा गम्मत करण्याचा हेतू साध्य झाला म्हणून तो खुश होणार? आणि रागावून नक्की काय करायला हवे होते? लाल इमोजींनी पाने भरायला हवी होती की अडमिन कडे तक्रारींचा पाऊस पाडायला हवा होता? राग आला म्हणजे इंटरनेटवर फेसलेस आईडींकडून प्रामाणिकपणाची अपेक्षा करण्याइतके गाढव तुम्ही आहात असा अर्थ होतो. इथे साहित्यचोरीबद्दल कोणी गळा काढला की नेटवर चोरी होणारच असे त्याला समजावले जाते, तसेच हे आहे. अटेंशनसिकिंगचे अनेक प्रकार आहेत त्यातला मायबोली कोतबो एक प्रकार आहे. सध्या जो दुसरा 'कंटाळा आलाय' धागा सुरू आहे तोही मला अटेंशनसिकिंगच वाटतोय.

ह्या सदरात लिहिणारे आईडी नेहमी नवीन असतात, ते नवेच असतात की कुणी माहितीतील आईडी ड्यु आई घेऊन लिहीत असतो माहीत नाही.

कुणी प्रश्न विचारला आणि आपल्याला उत्तर सुचले तर ते द्यावे. विचारणारा कसाही असो, आपल्या हाती वेळ होता, वेळ द्यायची इच्छा होती म्हणून आपण तो इथे दिला.

इथे फसवले जाण्याबद्दल राग करायचा आणि इतर धाग्यांवर एकमेकांवर चिखलफेक करायची - मला दोन्ही सारखेच वाटते.

Pages