Submitted by भास्कराचार्य on 12 September, 2018 - 08:48
Submitted by भास्कराचार्य on 3 November, 2016 - 16:33
क्रिकेटवरील पहिले चार धागे -
http://www.maayboli.com/node/1889
http://www.maayboli.com/node/30450
http://www.maayboli.com/node/51908
https://www.maayboli.com/node/60723
भारत-इंग्लंड मालिका नुकतीच संपली. त्यावर भरपूर खडाजंगी झाली. पुढच्या आठवड्यात आशिया कप आहे. त्यानिमित्ताने अजून घमासान होईलच. आधीच्या धाग्याची प्रतिसादसंख्या भरपूर झाल्याने ह्या पॉझ असलेल्या आठवड्यात हा नवीन धागा काढला आहे.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
उद्याचा संघ.
उद्याचा संघ.
पृथ्वी शाॅ खूप आवडत असला तरी
पृथ्वी शाॅ खूप आवडत असला तरी आत्ताची निवड आश्चर्यकारक !
वेंगसरकरचया मतें ऑस्ट्रेलियात ' स्क्वेअर ' ला चांगले खेळणारे फलंदाज धांवा जमवण्यात यशस्वी होतात व शाॅ स्क्वेअरला अप्रतिम खेळतो. पण अनुभवाअभावी शाॅला आतांच खेळवण्याबाबत तोही साशंक आहे.
शाॅला शुभेच्छा!
शॉ ची निवड खरेच आश्चर्यकारक
शॉ ची निवड खरेच आश्चर्यकारक आहे त्याचा सध्याचा फॉर्म बघता, त्याचा आत्मविश्वास पण कमी वाटतोय, Anyways तो चांगला खेळावा आणि सगळ्यांचा शंका दूर कराव्या यासाठी शुभेच्छा
साहा ची निवड बघून छान वाटलं.
साहा ची निवड बघून छान वाटलं. विकेटकीपिंग हा स्पेशलाइझ्ड जॉब आहे. शॉ ने यशस्वी व्हावं असं वाटतं. पण त्याचा सद्ध्याचा फॉर्म, फटक्यांची निवड, आत्मविश्वास डळमळीत आहे. त्याने ह्या सगळ्या गोष्टींवर मात करावी ह्या शुभेच्छा!
शॉ ने यशस्वी व्हावं असं वाटतं
शॉ ने यशस्वी व्हावं असं वाटतं. पण त्याचा सद्ध्याचा फॉर्म, फटक्यांची निवड, आत्मविश्वास डळमळीत आहे. त्याने ह्या सगळ्या गोष्टींवर मात करावी ह्या शुभेच्छा! >> +१ बहुधा मागच्या टेस्ट पासून पुढे सुरू असे करून कसिस्टंसी कायम ठेवणे हा उद्देश असू शकतो.
यादव किती कंट्रोल ठेवेल ह्यावर आपल्या बॉलिंग चे सगळे ठरेल. इशांतचा रोल भरणे अजिबात सोपे नाही.
"यादव किती कंट्रोल ठेवेल
"यादव किती कंट्रोल ठेवेल ह्यावर आपल्या बॉलिंग चे सगळे ठरेल. इशांतचा रोल भरणे अजिबात सोपे नाही." - सहमत! यादव चा हा चौथा ऑस्ट्रेलिया दौरा आहे. त्याने प्रॅक्टीस मॅच मधे दाखवलेलं नियंत्रण आणी भेदकता तशीच पुढे चालू ठेवली तर मजा येईल. सगळ्यात मोठं गॅम्बल अश्विन आहे असं मला वाटतं. जर तो यशस्वी ठरला तर भारताचं पारडं जड होऊ शकतं (जसं २००३ मधे कुंबळे च्या बॉलिंगमुळे झालं होतं). पण जर अश्विन तितका यशस्वी नाही ठरला / संपूर्ण अयशस्वी ठरला तर बॉलिंगची बाजू फारच लंगडी पडेल. एक भेदक स्पिनर आणी एक मोठ्या इनिंग्ज खेळणारा (वेळ आणी रन्स, दोन्ही) मधल्या फळीतला फलंदाज हे निर्णायक भुमिका बजावतील असा माझा अंदाज आहे.
ज्याची भीती होती तेच झाले. शॉ
ज्याची भीती होती तेच झाले. शॉ दुसऱ्याच चेंडूंवर शून्या वर बाद झाला
शॉ गेलासुद्धा! स्टार्क गुलाबी
शॉ गेलासुद्धा! स्टार्क गुलाबी बॉल घेऊन सुटतोच एकदम.
भारत टाॅस जिंकून प्रथम
भारत टाॅस जिंकून प्रथम फलंदाजी.
( गंमत -
मयांक म्हणजे चंद्र. पृथ्वी व चंद्र या जोडीने जगाला कायमचीच मोहिनी घातलेली. बघूं आज धांवांची भरती कशी उफाळून येते ! )
भारत, शुभेच्छा !
'डावरा स्टार्क 'ओव्हर द विकेट
'डावरा स्टार्क 'ओव्हर द विकेट' गोलंदाजी करताना उजव्या फलंदाजांसाठी ऑफ स्टंपवरून चेंडू सफाईने आंत आणतो. ... 140+ वेगाचा असा चेंडू खेळणं महाकठीणच !!' -
माझं हें वाचलं असतं तर शाॅ सावध होवून कदाचित आज तसा बाद झाला नसता !
पुढच्या इनिंग ला शॉ कसा खेळतो
पुढच्या इनिंग ला शॉ कसा खेळतो ह्यावर त्याचं करियर (निदान नजिकच्या काळात तरी) अवलंबून असेल असं वाटतं. तो ह्या परिस्थितीला कसा तोंड देतो ह्यावरून त्याचं खेळाडू म्हणून mettle कळेल. दोन्ही ओपनर्स आत येणार्या चेंडूवर बॅट-पॅड गॅपमधून क्लीन बोल्ड झाले (गावसकरने आवंढा गिळला असेल!)
कोहली '२०२० मधे एकही शतक नाही' असा बट्टा लागू नये असा निश्चय करून खेळत असल्यासारखा खेळत होता. त्याची विकेट फारच दुर्दैवी होती. टेस्ट मधे रन-आऊट होणं, स्पिनर ने नो-बॉल टाकणं वगैरे गोष्टी अविश्वसनीय आहेत. अश्विन-साहा जोडी आणी बॉलर्स मिळून अजून ७५- १०० रन्स करू शकले तर इंटरेस्टींग होईल मॅच.
काल पुजारा झुंजार खेळला.
*तो ह्या परिस्थितीला कसा तोंड देतो ह्यावरून त्याचं खेळाडू म्हणून mettle कळेल. * - सहमत. For Shaw, next innings will decide whether he has grown from 'boys' to 'men' category !
काल पुजारा झुंजार खेळला. त्याच्या लेग स्टंपवर उसळत्या चेंडूचा सतत मारा ठरवून केला जात होता, दोन ' शाॅर्ट लेग' क्षेत्ररक्षक लावून. रहाणे पण चिकाटीने खेळला पण कोहली च्या 'रन आऊट' वरच्या प्रतिक्रियेचं नंतर त्याच्यावर जरा प्रेशर आलं असावं.
आपले गोलंदाजही या खेळपट्टीचा चांगलाच उपयोग करून घेऊ शकतील.
अगदीच अँटीक्लायमॅटीक संपली
अगदीच अँटीक्लायमॅटीक संपली आपली बॅटींग.
*आपले गोलंदाजही या खेळपट्टीचा
*आपले गोलंदाजही या खेळपट्टीचा चांगलाच उपयोग करून घेऊ शकतील.* - ऑसीज 65-4 !!
५ बाद झाले तरी शेपूट नको
७ बाद झाले तरी शेपूट नको वळवळू द्यायला आपल्या परंपरे प्रमाणे!
शेपूट वळवळू न देता १९१ मध्ये
शेपूट वळवळू न देता १९१ मध्ये गुंडाळले. तरी शेवटच्या तिघांनी ८० धावा जोडल्या ७ बाद १११ नंतर.
५३ धावांची आघाडी चक्क!
आपली देखिल अपेक्षित सुरुवात.
आपली देखिल अपेक्षित सुरुवात. पृथ्वी अजुनी ह्या डावातदेखिल आपला लौकिक राखून ...
बॉलिंग जबरदस्त झाली काल. अजून
बॉलिंग जबरदस्त झाली काल. अजून थोडी फिल्डिंगची साथ मिळाली असती तर लीड वाढू शकला असता. असो. हे ही नसे थोडके. आता दुसर्या इनिंग ला मोठा (२५०+?) स्कोअर करायला हवा. कारण भरपूर वेळ शिल्लक आहे ह्या मॅच मधे. अर्थात लो-स्कोअरिंग मॅचेस थरारक होतात.
पुढच्या मॅच मधे ओपनर बदलणार का हा कळीचा मुद्दा आहे.
*पुढच्या मॅच मधे ओपनर बदलणार
*पुढच्या मॅच मधे ओपनर बदलणार का हा कळीचा मुद्दा आहे* - निदान शाॅला तात्पुरतं बदलणं हें त्याच्याच हिताचं असावं; त्याला तंत्र व आत्मविश्वास या दोन्हीवर पकड मिळवायला कांहीं वेळ देणं आवश्यक वाटतं.
झेल सुटले हें काळजी करणयासारखंच पण कोहलीने सूर मारून घेतलेला झेल मात्र अफलातून होता !
शॉने लबुशेनचा सोडलेला झेल आणि
शॉने लबुशेनचा सोडलेला झेल आणि धावांचा दुष्काळ ह्यापेक्षा वेगळं तर काही केलेलं नाही (करणार नाही). ह्याहून किती वाईट दुसरा कोणी करणार आहे? पुढच्या सामन्यात कोहली नसणार, तेव्हा फलंदाजीमध्ये हयगय चालणार नाही. चूक त्याची नाही, तर निवडसमितीची आहे. त्याला थोडा वेळ त्यांनीच द्यायला हवा, ह्याशी सहमत.
१ बाद १३ नंतर ५ बाद १५.....
१ बाद १३ नंतर ५ बाद १५.....
काय अंदाज??
सोडलेल्या ४ सोप्या झेलांचे मौल्य समजेल असे दिसतेय!
६ बाद १९ कोहलीसह ... निचांक पार करेल??
बोंबला!
बोंबला!
शनिवार म्हणून जरा उशीरा उठलो.
शनिवार म्हणून जरा उशीरा उठलो... डोळ्यासमोर कोहली बाद होताना दिसला.. आणि स्कोअरबोर्डवर नजर जाताच मटकन खालीच बसलो
१९-६ आई ग्ग ..
साहा विहारी.. मॅच जाऊ द्या... आधी ईज्जत वाचवा
साहा गेला आश्विन गेला २६-८ ..
साहा गेला आश्विन गेला २६-८ ... एका ऐतिहासिक सामन्याचे आपण साक्षीदर होतोय.. अंगावर काटा आलाय
२६ सर्वात कमी आहे तो पार
२६ सर्वात कमी आहे तो पार झाला कसाबसा. ४२ होतोय का बघायचं.
हे लिहिता लिहिता ९वा गेला!
हेजलवूडने येऊन ५ षटकात केली
हेजलवूडने येऊन ५ षटकात केली दांडी गुल..
९-३१
१२ धावा निचांक मोडायला~
९ बाद ३६ वर शामी जखमी संघ
९ बाद ३६ वर शामी जखमी संघ आटोपला..
जिंकण्यासाठी केवळ ९० धावा शामी जख्मी.
आज माझ्या जन्मानंतरचा नीचांक
आज माझ्या जन्मानंतरचा नीचांक झाला

आयर्लंडच्या ३८ ला मागे टाकले.. आय मीन त्याच्याही मागे राहिले .. पोरांना सॉरी नातवंडांना सांगायला एक स्टोरी मिळाली
सर्वबाद ३६. (शामी रिटायर्ड
सर्वबाद ३६. (शामी रिटायर्ड हर्ट.) ४-० होणार असं दिसतंय.
४६ वर्षांपूर्वी केलेला ४२
४६ वर्षांपूर्वी केलेला ४२ धावांचा निचांक ३६ धावा करून मोडीत काढल्याबद्दल संघाचे अभिनंदन!
पहिल्या डावात पेन, आणि लाबु का कोण त्याचे नांव नाही लिहता येत. ह्यांना दिलेल्या जीवदानाची आणि फलंदाजांच्या अत्यंत बेजबाबदार कामगिरीची किंमत गोलंदाज मोजणार.
Pages