Submitted by भास्कराचार्य on 12 September, 2018 - 08:48
Submitted by भास्कराचार्य on 3 November, 2016 - 16:33
क्रिकेटवरील पहिले चार धागे -
http://www.maayboli.com/node/1889
http://www.maayboli.com/node/30450
http://www.maayboli.com/node/51908
https://www.maayboli.com/node/60723
भारत-इंग्लंड मालिका नुकतीच संपली. त्यावर भरपूर खडाजंगी झाली. पुढच्या आठवड्यात आशिया कप आहे. त्यानिमित्ताने अजून घमासान होईलच. आधीच्या धाग्याची प्रतिसादसंख्या भरपूर झाल्याने ह्या पॉझ असलेल्या आठवड्यात हा नवीन धागा काढला आहे.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
गंभीर-सेहवाग चालत होते तो काळ
गंभीर-सेहवाग चालत होते तो काळ सोडल्यास माझ्या हयातीत मी चांगले आणि कंसिस्टंट ओप्नर्स भारताकडे पाहिलेले नाहीत बहुधा. विजय-धवन थोडेफार कदाचित.
तरी 'सुर्या'ला एकदम 'स्काय'
तरी 'सुर्या'ला एकदम 'स्काय' म्हणशील >>
स्काय त्याचे निक नेम आहे रे , त्याची initials घेऊन स्काय म्हणतात त्याला.
सद्ध्याच्या टीम मधे उपलब्ध असलेल्या पर्यायात तो बरा वाटतोय, किंबहूना बाकीच्यांच्या तुलनेत तो यशस्वी व्हायचे चान्सेस जास्त वाटतायत इतकंच >> पटतय. मी वेगळाविचार करतोय. तसा ओपनिंग गंडणार आहे यंदा तेंव्हा कमीत कमी मिडल ऑर्डर फर्म प करता येईल अशा अंगाने. अर्थात जबरदस्त सलामीला पर्याय नाही ह्याबाबत दुमत नाही.
गंभीर-सेहवाग चालत होते तो काळ सोडल्यास माझ्या हयातीत मी चांगले आणि कंसिस्टंट ओप्नर्स भारताकडे पाहिलेले नाहीत >> भा ने तेव्हढ्यात आपण कसे तरूण आहोत हे सटलपणे दाखवून दिलेय.
"स्काय त्याचे निक नेम आहे रे"
"स्काय त्याचे निक नेम आहे रे" - बापरे! ह्यावरून मागे एकदा गौतम गंभीर ने एका टी-२० (इंटरनॅशनल) ला 'गौती' असं नाव असलेला जर्सी घातला होता त्यावरून गावसकर पेटला होता ते आठवलं. (हल्लीच्या पिढीत साली सिन्स्यार्टी नाही धोंडोपंत स्टाईल मधे
भा ने तेव्हढ्यात आपण कसे तरूण आहोत हे सटलपणे दाखवून दिलेय.
भा चा व्यासंग पहाता, खरं तर त्याने, मर्चंट-पंकज रॉय जोडीनंतर.... अशा पद्धतीनं वाक्य सुरू करून गंभीर-सेहवाग पर्यंत यायला हवं होतं. 
त्यावरून गावसकर पेटला होता ते
त्यावरून गावसकर पेटला होता ते आठवलं. (हल्लीच्या पिढीत साली सिन्स्यार्टी नाही धोंडोपंत स्टाईल मधे >> आता गावस्करच्या काळात सिन्स्यार्टी होती कि ड्रॉप केले जाण्याची भिती हे कोणास ठाऊक
मर्चंट-पंकज रॉय जोडीनंतर.. >> म्हाराजांच्या काळात
"आता गावस्करच्या काळात
"आता गावस्करच्या काळात सिन्स्यार्टी होती कि ड्रॉप केले जाण्याची भिती हे कोणास ठाऊक " "म्हाराजांच्या काळात" -

मी क्रिकेट बघायला चालू केले
मी क्रिकेट बघायला चालू केले तेंव्हा सिद्धू, श्रीकांत वगैरे मंडळी ओपन करायची.... त्यामानाने आत्ताचे ओपनर बरेच बरे म्हणायचे
अर्थात श्रीकांत आवडायचा तेंव्हा पण भरवश्याचा वगैरे कधीच नव्हता!
*तेंव्हा सिद्धू, श्रीकांत
*तेंव्हा सिद्धू, श्रीकांत वगैरे मंडळी ओपन कराय* ही यादी खूपच लांबलचक आहे. बुधी कुंदरन, फारूख इंजिनिअर, सय्यद किरमानी.....
)
* टेस्ट ओपनर हा स्पेशलाईझ्ड जॉब आहे आणी तो जेणो काम तेणो थाये न्यायानं ओपनरनेच करावा असं मला वाटतं.* -
100% सहमत. पण या वर्गात न मोडणारे कांहीं फलंदाज ओपनर म्हणून चांगलेच यशस्वीही झाले याची कदाचित हीं कारणं असावीत-
1 गोलंदाजांसाठी ते ' surprise element' घेवूनच येत व त्यामुळे त्यांच्यासाठी गोलंदाजीत, विशेषतः क्षेत्ररक्षण लावण्यात, बदल करणं गोलंदाजांना अडचणीचं होतं;
2 कमालीची चांगली दृष्टी, sharpest reflexes व hand- eye co-ordination असेल तर तंत्राचा अभाव पूर्णपणे नसला तरी बर्याच अंशीं भरून निघूं शकतो. फक्त, फलंदाजाला अतयुत्तम लय सांपडलेली असणं अत्यावश्यक. लय जराही बिघडली तर तंत्राचा अभाव त्याला साफ उघडा पाडणारच. !
( *भाने तेव्हढ्यात आपण कसे तरूण आहोत हे सटलपणे दाखवून दिलेय* मला तर इथे आपण वयाने ज्येष्ठ असणंच फायदेशीर वाटतं. आपण इथे कांहीही फालतू मल्लीनाथी केली ( उदा.. हयाच पोस्टचा पूर्वार्ध ) तरी इथले जाणकार दुर्लक्ष करतील पण वयाकडे बघून टर तरी उडवत नाहीत !
एक चांगली बातमी, रोहित शर्मा
एक चांगली बातमी, रोहित शर्मा फिटनेस टेस्ट पास झाला. तो आता शेवटच्या 2 कसोटी सामन्यात खेळू शकेल
काल थोडा वेळ प्रॅक्टीस मॅच
काल थोडा वेळ प्रॅक्टीस मॅच पाहिली. शॉ आणी गिल जरी फास्ट खेळले, तरी त्यांचे शॉट्स छान होते. मागच्या मॅच च्या तुलनेत फूटवर्क आणी शॉट्स दोन्ही जास्त 'अॅश्युअर्ड' वाटलं. good signs for India. गिल ला मधल्या फळीत खेळताना बघायला आवडेल. शॉ ची बॅटींग बघायला मजा येते. त्याने हळू हळू इनिंग बिल्ड करत मोठी इनिग खेळावी अशा त्याला शुभेच्छा. मयंक चं आऊट होणं (पद्धत) बघून 'ouch!' झालं. पण एका प्रॅक्टीस मॅच नंतर शॉ-गिल मधे इतका फरक पडत असेल, तर मयंकही लवकर टेस्ट मोड मधे येईल अशी आशा बाळगायला हरकत नाही. बॉलर्सना मस्त लय सापडली ही गूड न्यूज आहे भारतासाठी. ह्या मॅचमधे भारताने एकही स्पेशलिस्ट स्पिनर खेळवला नाहीये. तिसर्या फास्ट बॉलर ची ऑडिशन चालू आहे का?
" पण या वर्गात न मोडणारे कांहीं फलंदाज ओपनर म्हणून चांगलेच यशस्वीही झाले" - विरेन्द्र सेहवाग!!! त्याने टेस्ट ओपनर ची व्याख्याच बदलून टाकली. ५० च्या आसपास अॅव्हरेज आणी ८०+ चा स्ट्राईक रेट असलेला, ८,५००+ टेस्ट रन्स असलेला आणी १००+ टेस्ट्स खेळलेला सेहवाग हा legendary टेस्ट ओपनर आहे. असं टॅलंट विरळा. (डेव्हिड वॉर्नर चं प्रेरणास्थान!).
"तेंव्हा सिद्धू, श्रीकांत
"तेंव्हा सिद्धू, श्रीकांत वगैरे मंडळी ओपन करायची" - उफ्फ!!
पुढे त्या यादीत देवांग गांधी, विक्रम राठोड, अजय जडेजा वगैरे नावं अॅड झाली. एखाद-दुसर्या मॅचमधे एम एस के प्रसाद, नयन मोंगिया, दीप दासगुप्ता, अभिनव मुकुंद (ह्यात काही प्रॉपर ओपनर्स होते) वगैरे लोकांनी पण ओपन केलंय. मोंगिया ची सेंच्युरी (१५२?) आहे दिल्लीला. त्यातल्या त्यात सदागोपन रमेश-शिवसुंदर दास जोडीला बर्यापैकी यश मिळालं.
मेक शिफ्ट किपर टू ओपनर मधे
मेक शिफ्ट किपर टू ओपनर मधे पार्थिव नि कार्थिक राहिले . खर्या खुर्या ओपनरमधे जाफर राहिला. आकाश चोप्रा राहिला जो ह्यात सगळ्यात दुर्दैवी म्हणायला हवा. एका बाजूने सेहवाग फास्ट खेळतोय म्हनून चोप्राने पण तसेच खेळायला हवे अशा यावफळ अपेक्षेपोटी एका गुणी ओपनर ला बळी चढवले गेले. विहारी पण ओपन करून गेलाय
आज सराव सामना लिमिटॅड होता का असे पटकन स्कोअर कार्ड बघून वाटूण गेले.
तिसर्या फास्ट बॉलर ची ऑडिशन
तिसर्या फास्ट बॉलर ची ऑडिशन चालू आहे का? >> चौथ्या ची वाटली मला . कोहली ला फॅब फोर चे वेड आहे
वनडे मध्ये सचिन - सौरव जोडी
वनडे मध्ये सचिन - सौरव जोडी जमण्यापूर्वी सचिनने कोणाकोणाबरोबर ओपन केलय ! बरीच नावं वर आली आहेत. एक आठवलेलं म्हणजे सुजित सोमसुंदर ! हा आणि विक्रम राठोड हे तश्या फूटवर्कसह इंटरनॅशल लेवलला कसे पोहोचले काय माहीते !
*..म्हणून चांगलेच यशस्वीही
*..म्हणून चांगलेच यशस्वीही झाले" - विरेन्द्र सेहवाग!!!* - श्रीकांतही बरयापैकी यशस्वी झाला होता.
पण विक्रम राठोड सध्या आपला
पण विक्रम राठोड सध्या आपला batting कोच आहे बहुतेक
संजय बांगर ने पण काही
संजय बांगर ने पण काही सामन्यात बरी केली होती फलंदाजी, त्याच्याकडून अपेक्षा होत्या आणि महत्त्वाचे म्हणजे तो मध्यम गती गोलंदाजी ही करत असे, त्यामुळे टीम चा बॅलन्स चांगला होतो
जाफर, आकाश चोप्रा हे प्रॉपर
जाफर, आकाश चोप्रा हे प्रॉपर ओपनर्स आणी त्यांच्यासह संजय बांगर हे बर्यापैकी यशस्वी झालेले ओपनर्स म्हणून त्यांची नावं वगळली होती.
कार्थिक एके काळी टेस्ट ओपनर होता हे विसरून गेल्यासारखा आयपीएलमधे स्पिनर्ससमोर अजागळासारखा उभा राहिलेला (टप्प्यावरून बॉल खेळताना) बघवत नाही.
'ओपनर' विषयाचा आणखी एक पैलू -
'ओपनर' विषयाचा आणखी एक पैलू -
अगदीं स्पेशालिस्ट, तंत्रशुध्द ओपनरही लय सांपडली नाही तर हतबल होतोच. अशोक मांकड हा अत्यंत अभ्यासू, तंत्रशुध्द असा मुंबैचा भरवशाचा ओपनर. करिअरच्या पहिल्याच दौरयात इंग्लंडच्या पीचेसवरची स्विंग गोलंदाजी खेळताना करावी लागणारी ॲडजसटमेंट करताना त्याची लय बिघडली व नाचक्की होवून त्याची करिअरच अकाली संपलीच. याचा अर्थ ओपनर म्हणून त्याचं तंत्रच चूकीचं होतं असं सहज म्हणतां आलं तरी तें योग्य नसावं. ( मुंबैचे अनेक नामांकित फलंदाज नंतरही त्याचा तंत्रविषयक सल्ला घेत असत ). तात्पर्य- नुसतं तंत्र किंवा फक्त लय असून दीर्घकालीन ओपनर म्हणून, किंवा फलंदाज म्हणूनही, वरच्या स्तरावर टिकणं कठीण आहे. लय बिघडल्याने गावसकरसारखा ओपनरही अत्यंत वाईट व दीर्घकालीन ' बॅड पॅचेस' मधून गेला आहे !
शॉ पुन्हा एकदा casually बाद
शॉ पुन्हा एकदा casually बाद झाला, तो इंनिंगस बिल्ड करण्याचा थोडासाही प्रयत्न करताना दिसत नाहीये, चुकांमधून काही शिकायची तयारी नसेल तर मग कठीण आहे
शुभमन गिलने आज क्लास शॉट
शुभमन गिलने आज क्लास शॉट मारले. मजा आली बघायला. ऑक्चुअल मॅचमध्ये स्टार्क कमिन्स हेझलवूडला मारेल तर आणखी मजा येईल.
पंत आज स्टेडीयमच्या बाहेरच मारत होता. विचार करतोय की या २०२० वर्षात बुमराहचे अर्धशतक पाहिल्यानंतर आता साहा विकेटकीपर आणि पंत फलंदाज म्हणून दोघांना एकाच वेळी संघात बघायचा योग येतोय का
विहारी पण ओपन करून गेलाय
विहारी पण ओपन करून गेलाय
>>
गेल्या ऑस्ट्रेलिया दौर्यातच.
त्या टीम मधे रोहित शर्मा पण होता (पण अजून देशातल्या पाटा विकेट्सवर ओपन करताना खोर्यानी रन्स न केल्यानी त्याला क्लास ओपनरचा दर्जा मिळायचा होता. तसंच तो टेस्टमधे हवाच वगैरे मतप्रवाह ही जन्मायचे होते.) करंट फॉर्म अन करिअर स्टॅट्स बघता त्याला मधल्या फळीत थोड्याफार धावा गोळा करता आल्या तर डोक्यावरून पाणी असा विचार करून कोहली-शास्त्री मॅनेजमेंटनी शर्मा ला मधल्या फळीत लपवलं अन नवख्या विहारीला सलामीला पाठवलं...
शर्मानी ही एक ५० करून लाज राखली...
कीपर्सना ओपनर करायचाही ट्रेंड
कीपर्सना ओपनर करायचाही ट्रेंड होता आपल्याकडे.
मोंगिआ, दासगुप्ता, रात्रा, पार्थिव, कार्तिक... यातल्या पहिल्या तिघांनी तर १०० पण केली आहेत ओपन करताना (की रात्राचं वेस्ट इंडीज विरुद्धचं १०० मधल्या फळीत होतं??)
*कीपर्सना ओपनर करायचाही
*कीपर्सना ओपनर करायचाही ट्रेंड होता आपल्याकडे.* वर मीं उल्लेखिलेले बुधी कुंदरन, फारूख इंजिनिअर, किरमानी.. हेही सुरवातीचे त्याच ट्रेंडमधले. यक्षीरक्षकांची चेंडूवर चांगली नजर बसलेली असते, असाही त्यामागचा एक भ्रामक विचारप्रवाहही होता.
"रात्राचं वेस्ट इंडीज
"रात्राचं वेस्ट इंडीज विरुद्धचं १०० मधल्या फळीत होतं??" - हो. मधल्या फळीत होतं. त्या मॅच मधे जो येतो तो रन्स करत होता. ('त्या नाटकात, काय जो येतो तो गात होता. मधे एक मांजर स्टेजवरून गेलं तर ते सुद्धा 'म्या SSS व' करून गेलं'
) मला वाटतं वेस्ट-इंडीज ने काहीतरी ८-९ बॉलर्स वापरले होते आणी भारताकडून तर सगळ्या ११ खेळाडूंनी बॉलिंग केली होती.
असो.. दुसरी प्रॅक्टीस मॅच संपल्यावर ऑस्ट्रेलियासमोर जास्त प्रश्न उभे राहिले आहेत. बर्न्स - हॅरीस बहुदा ओपन करतील अॅडलेड मधे आणी दोघंही फारसे फॉर्म मधे नाहीयेत. ग्रीन आणी अॅबोट इंज्युअर्ड आहेत. भारताकरता कदाचित पंत चा फॉर्म ही सुखद बातमी आहे. पण ही फसवी असू शकते. कारण ज्या परिस्थितीत आणी ज्या पद्धतीनं पंत ने शतक ठोकलं ते दोन्ही फारसं प्रॉमिसिंग नव्हतं. पण भारताबाहेर टेस्ट खेळताना पंत ला प्राधान्य मिळतं, त्यामुळे अशी आशा करू या की तो यशस्वी होईल. शामी-बुमराह ला चांगली लय सापडली आहे. आता भारत शामी-बुमराह-उमेश-अश्विन असं बॉलिंग काँबिनेशन खेळवणार की शामी-बुमराह-उमेश-सिराज/सैनी ह्याची उत्सुकता आहे. विहारी पार्ट टाईम पाचवा बॉलर असेल. दुसरी मोठी उत्सुकता म्हणजे मयंक-शॉ ओपन करतील की मयंक-गिल? गिल-शॉ अशी ओपनिंग असण्याची शक्यता कमी वाटते. राहूल खेळेल असं वाटत नाहीये.
Haris शिइल्ड क्रिकेट मध्ये
Haris शिइल्ड क्रिकेट मध्ये चांगल्या फॉर्म मध्ये आहे, वॉर्नर ची अनुपस्थिती त्यांना जाणवेल. त्यांचे bowling युनिट फिक्स्ड आहे आणि फॉर्मात आहे. Starc, हेजलवूड, कमिन्स आणि lyon, ग्रीन मध्यामगती गोलंदाजी करतो म्हणून पाचवा गोलंदाज म्हणून त्याला सहाव्या क्रमांकावर खेळवायचे होते आता हेन्रीके खेळू शकतो
पिंक बॉल जो धुमाकूळ घालतो तो
पिंक बॉल जो धुमाकूळ घालतो तो बघता ऑसी पण सहा पेक्षा अधिक बॅटस्मन्स घेऊन खेळतील असे वाटते. आपण स्पिनर हवा असेल तर अश्विन ऐवजी कुल्दीप चा विचार करायला हवा, पिंक बॉल रात्री हातातून पिकप करणे कठीण जाऊ शकते. चार फास्ट बॉलर जे करू शकतील ते तीन पण सहज करू शकतील असे मला वाटते. थोडक्यात काय तर ७ बॅट्समन खेळवणे जास्त श्रेयस्कर आहे. बुमरा ला ओपन करायला सांगा बॅटींग, काय कचकचित हूक्स मारलेत त्याने
*आपण स्पिनर हवा असेल तर
*आपण स्पिनर हवा असेल तर अश्विन ऐवजी कुल्दीप चा विचार करायला हवा* - आधीच्या सामन्यांत कुलदीपच्या गोलंदाजीवर ऑसी फलंदाज सुरवातीपासूनच आक्रमक होवून , पुढे येवून चेंडूचा टप्पा पकडून खेळण्याचा अट्टाहास करत होते. त्यावरून, कुलदीप त्याना अधिक फसवा स्पीनर वाटत असावा असं मलाही वाटतं.
*चार फास्ट बॉलर जे करू शकतील ते तीन पण सहज करूशकतील* - सात फलंदाज करूं शकतील ते सहा पण करूं शकतील, असंही म्हणता येईलच ना !
सात फलंदाज करूं शकतील ते सहा
सात फलंदाज करूं शकतील ते सहा पण करूं शकतील, असंही म्हणता येईलच ना ! >> हो नक्कीच म्हणता येईल फक्त मागच्या दौर्यांच्या इतिहासावरून बॅटींग पहिल्या टेस्ट्स मधे बरेचदा माती खाते ह्याउलट बॉलर्स बर्यापैकी लवकर ट्युन्ड असतात असे वाटते. परत पिंक बॉल, डे नाईट सामना, ऑस्ट्रेलिया तली पिचेस बघता बॉलर्स चे पारडे जड वाटते.
गावस्कर नि बॉर्डर ने गिल ने ओपन करावे शॉ ऐवजी नि पंट ला सहा ऐवजी घ्यावे असे सुचवले आहे. पंत चे समजू शकतो, स्टंप ला चिकटून कमी वेळ राहावे लागणार असल्यामूळे किपिंग चा कस कमी लागणार नि आत्तापर्यंत तरी बाहेर तो चांगला बॅटींग करून घेलाय.
*गावस्कर नि बॉर्डर ने गिल ने
*गावस्कर नि बॉर्डर ने गिल ने ओपन करावे शॉ ऐवजी * - कसोटी मालिका ' बाॅर्डर - गावसकर' ट्राॅफीसाठी आहे म्हणून ते सांगतील त्यांनाच खेळवायचं असं थोडंच आहे ?
कर्नलसाहेब माझ्या बाजूने आहेत; वेंगसरकरने सलामीला राहूललाच पसंति दिली आहे.
जास्त विचार करू नका.
जास्त विचार करू नका. सर्वांच्या ईच्छा पुर्ण होणार... सर्वांना ओपनिंग करायला मिळणार
Pages