Submitted by भास्कराचार्य on 12 September, 2018 - 08:48
Submitted by भास्कराचार्य on 3 November, 2016 - 16:33
क्रिकेटवरील पहिले चार धागे -
http://www.maayboli.com/node/1889
http://www.maayboli.com/node/30450
http://www.maayboli.com/node/51908
https://www.maayboli.com/node/60723
भारत-इंग्लंड मालिका नुकतीच संपली. त्यावर भरपूर खडाजंगी झाली. पुढच्या आठवड्यात आशिया कप आहे. त्यानिमित्ताने अजून घमासान होईलच. आधीच्या धाग्याची प्रतिसादसंख्या भरपूर झाल्याने ह्या पॉझ असलेल्या आठवड्यात हा नवीन धागा काढला आहे.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
इंटरनॅशनल. टीम मधले प्लेअर्स
इंटरनॅशनल. टीम मधले प्लेअर्स गेली काही वर्ष डोमेस्टिक बिल्कुल खेळत नाहीत.>>
हे बरोबर आहे.
भारताचे किती आंतरराष्ट्रीय खेळाडू रणजी, दुलीप ट्रॉफी वा देवधर ट्रॉफी खेळतात? बरेचरे आजकाल १९ वर्षाखालील संघातून थेट आंतरराष्ट्रिय खेळातात. नंतर देशांतर्गतकडे ढुंकुन पहात नाहीत. पुर्वी इतर सामने कमी असल्याने देशांतर्गत स्पर्धात चांगले खेळादू गोलंदाज व फलंदाज असत त्यामुळे सर्वांना भरतातील नव्वद अंशात वळणार्या खेळपट्ट्यांवर भयंकर फिरकीचा अनुभवच नाही! त्यामुळे आजकाल फिरकीला बॅकफूट जाणार्यांची संख्या जास्त आहे संघात! आणि असे पायचित जास्त होतात किंवा जवळपास झेल देऊन बाद होतात. रशीदच्या किंवा झंपाच्या गोलंदाजीवर अनेकदा जाणवले.
आणि मर्यादिक षटकांच्या सामन्यांमुळे फ्लायटेडपेक्षा लो ट्रॅजेकटरी चेंडूवर गोलंदाज जास्त भर देऊ लागले. त्यामुळे चांगले फिरकी गोलंदाज देखिल नाहीत.
आणि महत्वाचे म्हणजे रणजीच्या काळात मोठे खेळाडू रिकामे असले कधी तर तो वेळ त्यांना त्यांच्या ब्रँडच्या जाहिरातीसाठी द्यायचा असतो त्यातुन त्यांना कितीतरी पट पैसा मिळणार असतो. उगा रणजी खेळण्यात कुठे पैसे वाया घालवा. आणि तेच ब्रॅण्डवाले बीसीसीआयचे देखिल अन्नदाते असतात मग त्यांच्या खेळाडूंचा खेळ चांगला होवो ना होवो खेळविणे अपरिहार्य असते.
सोपे झेल सोडणं व फिरकी
सोपे झेल सोडणं व फिरकी गोलंदाजी खेळतां न येणं हीं आपली मर्मस्थळं ठळकपणे पुन्हा अधोरेखित करत आपण आजचा सामना हरलो !! सावधान !!!
भाऊ, तुम्ही प्रॅक्टीस मॅच
भाऊ, तुम्ही प्रॅक्टीस मॅच कितपत फॉलो केलीत ते माहीत नाही. पण शॉ आणी गिल चे शॉट्स सिलेक्शन फारच निराशाजनक होतं. आयपीएल च्या धुंदीतून बाहेर आलेच नाहीयेत असं वाटलं.
शेन वॉर्न आजच्या काळात असता तर हजार-पंध्राशे विकेट्स घेऊन गेला असता असं वाटतं हल्लीचं स्पिनर्स ना खेळण्याचं टेक्निक बघून.
पण शॉ आणी गिल चे शॉट्स
पण शॉ आणी गिल चे शॉट्स सिलेक्शन फारच निराशाजनक होतं. आयपीएल च्या धुंदीतून बाहेर आलेच नाहीयेत असं वाटलं. > शॉ आधीही लिमिटेड च्या धुंदीतच खेळत असे की. गिल कधी ओपनिंग बॅट्समन वआटला नाही. लिमिटॅद ओव्हर्स मधेही नाही. एक उत्कृष्ट मिडल ऑर्डर होण्याचे गुण त्याच्याकडे आहेत. सध्या फक्त ओपनिंग स्लॉट मोकळा असल्यांमूळे तो ओपन करतो नि सातत्याने शून्य काढतोय. दर वेळी मला लक्ष्मण ची आठवण येते
टेस्ट साठी मयांक बरोबर कोण ओपन करणार हा मोठाच प्रश्न आहे. रोहित तिसर्या सामन्यापर्यंत येणार नाही. परत कोहली पहिल्या सामन्यानंतर नसल्यामूळे मधल्या फळीत एक जागा रिकामी होणार आहे. शॉ नि गिल ला ओपन करायला सआंगून त्यांचा नसला कॉन्फीडन्स खच्ची करू नये. राहुल ला मधल्या फळीतच ठेवावे . तो कोहलीच्या अनुपस्थिती त ती जागा परफेक्ट भरू शकेल. अय्यर ला मधल्या फळीत ठेवणे त्याच्या ऑट होण्याच्या पद्धतीकडून बघून फारसे आशादायक वाटत नाही. एकंदर सलामीची बोंब असल्यामूळे कमीत कमी मधली फळी शक्यतो मजबूत ठेवणे हा एकमेव पर्याय आहे. कन्सीस्टंट ओपनर म्हणून साहाला वर ढकलावे किंवा धवन चा सध्या फॉर्म बघता त्यालाच ठेवून घ्यावे. जेणे करून तीन सामन्यांमधे कमीत कमी बदल होऊन कन्सिसंट युनिट खेळू शकेल.
बॉलिंग बद्दल अश्विनि कि जाडेजा हा प्रश्न जाडेजाने पहिल्य टेस्ट पुरता तरी सोडवून टाकला आहे. तिसरा बॉलर यादव कि सिराज हाच प्रश्न आहे. शर्मा चा सब म्हणून यादव हि कल्पना असश्य होते. सिराज एक एंड होल्ड करण्यासाठी वर्क हॉर्स म्हणून जास्त फिट वाटतो पण त्यापलीकडे काही करू शकेल असे वाटत नाही. बुमरा पहिली इनिंग तरी चाचपडणार त्यामूळे शमी मधेच जागा होउन काही धमाल करेल अशी अपेक्षा ठेवूया.
पुढच्या सराव सामन्यामधे खेळणारी टीम पहिला सामना खेळेल असे धरायला हरकत नाही.
*भाऊ, तुम्ही प्रॅक्टीस मॅच
*भाऊ, तुम्ही प्रॅक्टीस मॅच कितपत फॉलो केलीत ते माहीत नाही.* - आतां मीं टिव्ही पहाण्याचा वेळ खूपच मर्यादित ठेवला आहे. फक्त अधिकृत सामनेच पहातो.
मला वाटतं मयांक व राहूल जोडी सलामीसाठी प्रथम अजमावून पहावी. अनुभव, सातत्य व मुख्यत: टेंपरॅमेंट यात राहूल सरस वाटतो.
राहुलला सलामी ला पाठवण्याचा
राहुलला सलामी ला पाठवण्याचा प्रयोग भरतात चालला पण इंग्लंड, ऑसी मधे गंडला होता. त्यानंतर त्याचा आत्मविश्वास इतका कमकुवत झाला कि तो लिमिटेड ओव्हर्स मधेही बाहेर फेकला गेला होता. एका गुणी खेळाडू वर परत तीच वेळ ये ऊ नये असे वाटते. टेंपरॅमेंट नि फॉर्म बद्दल प्रश्नच नाही तंत्राबद्दल आहे.
मला वाटते की पहिल्या सामन्यात
मला वाटते की पहिल्या सामन्यात मयंक सोबत सलामीला राहुललाच खेळावतील. राहुलचे तंत्र सलामीसाठी फार चांगले नसले तरी शॉ आणि गिल पेक्षा बरे आहे,सहा इंजुरी prone आहे, विकेट किपिंग करून सलामीला खेळणे कठीण आहे
मलाही ओपनिंगसाठी मयंक (तो ही
मलाही ओपनिंगसाठी मयंक (तो ही काही जबरदस्त फॉर्ममधे नाहीये, तरिही) आणी राहूल हेच पर्याय योग्य वाटतात. कोहली गेल्यावर मधल्या फळीत गिल ला संधी देता येईल. टेस्ट मॅच मधे विकेटकिपींग आणी ओपनिंग एकाच खेळाडूकडे देणं शारिरीक आणी मानसिक ताणाच्या दृष्टीनं अवघड वाटतं. तिसरा फास्ट बॉलर म्हणून उमेश च खेळेल - अनुभवाच्या दृष्टीनं आणी फॉर्म (प्रॅक्टीस मॅच मधल्या विकेट्स) च्या दृष्टीनंसुद्धा.
अॅक्च्युअली, कोहली भारतात
अॅक्च्युअली, कोहली भारतात परतल्यावर त्याची जागा विहारी घेईल असं वाटतंय. राहूल, मयंक, पुजारा, कोहली (विहारी), रहाणे, पंड्या/जडेजा, साहा, अश्विन, उमेश, शामी, बुमराह असा लाईन-अप असेल.
विहारी कोहली असताना सुद्धा
विहारी कोहली असताना सुद्धा खेळेल, पंड्या टेस्ट टीम मध्ये नाहीये. जडेजा injured आहे, तसेही भारत सहाव्या क्रमांकावर फलंदाज च खेळवेल alounder नाही, टीम अशी असेल पहिल्या टेस्ट साठी
राहुल, मयंक, पुजारा, कोहली, राहणे, विहारी, सहा, अश्विन, शमी, उमेश, बुमराह. कोहली गेल्यावर गिल
श्रेयस अय्यर सध्या ' ऑफ कलर'
श्रेयस अय्यर सध्या ' ऑफ कलर' वाटला तरिही कोहलीच्या गैरहजेरीत तो संघात असावाच असं वाटतं.
माझा असाही कयास आहे कीं पृथ्वी शाॅ हा अतिशय प्रतिभावान आहे . पण काही आवश्यक त्या तांत्रिक सुधारणा करण्याआड कांहीं ' मेंटल बलाॅक' नाहीं ना, अशी शंका येते. गावसकर, द्रविड सारख्या कुणीतरी त्याच्याशी बोलून त्याला सल्ला देणं अत्यावश्यक आहे. त्यामुळे, सलामीचा प्रश्न सुटेल व एक शैलीदार, भरवशाचा फलंदाज संघाला मिळण्याची दाट शक्यता आहे.
माझ्या आठवणीप्रमाणे शॉ च्या
माझ्या आठवणीप्रमाणे शॉ च्या नावाचा जेंव्हा पहील्यांदा बोलबाला सुरु झाला तेंव्हाच द्रवीड म्हणाला होता की शॉ नक्कीच गुणवान आहे.... पण त्याला अजुन बरेच शिकायचे आहे.
Its too early for him!
मी क्रिकेट बघायला सुरुवात
मी क्रिकेट बघायला सुरुवात केली तेंव्हा भारतात दर्जेदार जलदगती गोलंदाज तयार होत नाही.... देशांतर्गत सामन्यातल्या खेळपट्ट्या, इथली इकोसिस्टिम जलदगती गोलंदांजासाठी पोषक नाही वगैरे चर्चा खुप व्हायच्या.... आता भारतात दर्जेदार फिरकी गोलंदाज तयार होत नाहीत हे वाचून त्या चर्चा आठवल्या!
अय्यर ला मधल्या फळीत ठेवणे
अय्यर ला मधल्या फळीत ठेवणे त्याच्या ऑट होण्याच्या पद्धतीकडून बघून फारसे आशादायक वाटत नाही.
>>
अय्यर टेस्ट टीम मधे नाहिये ना??
रच्याकने,
परवा ६ डिसेंबरला अय्यर, जडेजा, बुमरा, करुण नायर आणि आर पी सिंग चा वाढदिवस होता...
"पंड्या टेस्ट टीम मध्ये
"पंड्या टेस्ट टीम मध्ये नाहीये." - अरे हो. हे विसरलो होतो. कोव्हिड बबलमुळे उपलब्ध खेळाडूंमधे इतके फेरबदल होतायत की पटकन लक्षातच आलं नाही.
शॉ विषयी सहमत. गुणवत्तेविषयी शंकाच नाही, पण मेंटल मॅच्युरिटीसाठी थोडा वेळ द्यायला हवा.
अय्यर टेस्ट टीम मधे नाहिये ना
अय्यर टेस्ट टीम मधे नाहिये ना?? >> कोहली ला बॅकप म्हणून ठेवलाय न त्याला ?
राहुल, मयंक, पुजारा, कोहली, राहणे, विहारी, सहा, अश्विन, शमी, उमेश, बुमराह. कोहली गेल्यावर गिल >> हे मलाही वाटतेय पण ह्यात राहुल ची विकेट जाणार लगेचच हे मागच्या सिरीज बघितल्या तर लक्षात येईल
*राहुल ची विकेट जाणार लगेचच
*राहुल ची विकेट जाणार लगेचच हे मागच्या सिरीज बघितल्या तर लक्षात येईल * - ऑसीजही इतकं खात्रीने नाहीं हें सांगू शकणार. नवीन मालिका आहे, त्याचा अनुभव वाढलाय व सध्या त्याला लय सांपडलयाचं दिसतंय. आशा करूंया ना तो यशस्वी होईल अशी.
*आता भारतात दर्जेदार फिरकी गोलंदाज तयार होत नाहीत हे वाचून त्या चर्चा आठवल्या!* - तेंव्हा मर्यादित षटकांच्या सामनयांचं प्रस्थ वाढलं नव्हतं, इतर देशांत फिरकी गोलंदाजी विकसित झाली नव्हती व आपणाला जिंकायची संवयही लागली नव्हती!
भाऊ दुर्दैवाने आधीच्या सिरीज
भाऊ दुर्दैवाने आधीच्या सिरीज आधीही तो असाच फॉर्म मधे होता, त्याला लय सापडली होती. सिरी मधे त्याने अगदी स्टान्स ही बदलून पाहिला होता स्कोर करता याव म्हणून. तेंव्हाही हि चर्चा झाली होती. फे फ ला आठवत असेल कदाचित.
गैर समज नको, त्याला यश मिळावे अशी माझी पण इच्छा आहे पण त्याचे तंत्र ही ओपनिंग साठी फारसे परफेक्ट आहे असे मी तरी छातीठोकपणे म्हणू शकत नाही. उसळत्या चेंडूवर हूक मारताना तो पडलेला मी पाहिले आहे. त्यामूळे त्याचा बळीचा बकरा होउ नये अशी इच्छा आहे. मधल्या फळीत कोहलीच्या अनुपस्थितीमधे तो अतिशय चपखल फीट झाला असता. असो.
असामीजी, राहूलबद्दलच्या
असामीजी, राहूलबद्दलच्या आपल्या मताशी मीं असहमत आहे असं मुळीच नाहीं. पण सध्या उपलब्ध असलेल्या फलंदाजांत त्याला सलामीला खेळवून पहाणं हा पर्यायच बरा वाटतो व म्हणून त्याला शुभेच्छा देणंच उचित . ( आपण कधीही केवळ आकसाने कोणत्याही खेळाडूबद्दल लिहीत नाहीं, यामुळेच तर मला आपल्याविषयी आत्यंतिक आदर आहे ! )
२०००
२०००
ऋतुराज गायकवाड डोमेस्टिक
ऋतुराज गायकवाड डोमेस्टिक मध्ये सलामीला खेळत असेल तर त्याला try करून बघायला हवे या series नंतर
आजकाल चे भारतीय खेळाडू फिरकी
आजकाल चे भारतीय खेळाडू फिरकी गोलंदाजी फार चांगली खेळत नाहीत आणि 2021 मध्ये T20 विश्वचषक भारतात आहे म्हणून सुर्यकुमार यादव ला लवकर संधी द्यावी संजू किंवा अय्यर च्या जागी, यादव फार चांगला खेळतो फिरकी गोलंदाजी
तसा अय्यर सुद्धा चांगला खेळतो
तसा अय्यर सुद्धा चांगला खेळतो फिरकी. हातातून टर्न ओळखतो तो. आणि सिक्स मस्त मारतो. हेड पोजिशन पर्रफेक्ट असते उचलून मारताना. त्याच्या फलंदाजीची ती स्ट्रेंथ वाटते.
ऑस्ट्रेलियन बाऊन्सला गंडला मात्र बिचारा. २०-२० वर्ल्डकप ऑस्ट्रेलियातच आहे ना?
बाकी मुंबईच्या संघात मोठ्या पॉवर हिटरच्या मध्ये जी भुमिका सुर्यकुमार निभावत होता ती भारताच्या संघात आधीच एक कोहली स्वत: असताना तो टिम कॉम्बिनेशनचा विचार करता सुर्यकुमारलाही सोबत खेळवणे पसंद करेल का हा मला प्रश्न वाटतो.
बाकी मुंबईच्या संघात मोठ्या
बाकी मुंबईच्या संघात मोठ्या पॉवर हिटरच्या मध्ये जी भुमिका सुर्यकुमार निभावत होता >> मला वाटते स्काय ने सुरूवातीपासून अधिक आक्रमक खेळण्याची कॅपॅसिटी कोहली पेक्षा अधिक दाखवली आहे नि त्याचे ईम्प्रॉव्हायझेशन स्टँडर्ड कोहलीपेक्षा अधिक सरस वाटलेले आहे. कोहली ह्याबबतीमधे थोडा रिजिड वाटतो. अर्थात कोहली आयपील बाहेरही प्रोव्हन आहे हा मह्त्वाचा फरक आहे.
सलामीला खेळवून पहाणं हा पर्यायच बरा वाटतो व म्हणून त्याला शुभेच्छा देणंच उचित >> हो भाऊ. बघूया, घोडा मैदान जवळच आहे.
शास्त्री प्रभुतींनी जरा ते
शास्त्री प्रभुतींनी जरा ते फिल्डींग प्लेसमेंट चे बघायला हवे. मॅक्स्वेल बॅटींग करत असताना चहल फ्लाय स्लिप, पॉईंट अशा जागेवर काय करत असतो नक्की ? कोहली डीप मधे का असतो ? तिथे असणारच असेल तर रिव्ह्यूचा निर्णय राहुल घेईल असे का सांगून जात नाही
* तसा अय्यर सुद्धा चांगला
* तसा अय्यर सुद्धा चांगला खेळतो फिरकी* +1 . सध्या तो ' ऑफ कलर' आहे इतकंच.
*कोहली ह्याबबतीमधे थोडा रिजिड वाटतो. * कारण असावं कीं तो जात्याच ' perfectionist' च आहे. घोटून चोख खेळता येणार्या फटकयांशिवाय इतर कांहीं करणं त्याची वृत्तीच नसावी. त्याच्याकडून सुरेख, नेटक्या, दीर्घ खेळीची अपेक्षा ठेवावी , 'फिनीशर' म्हणून अफलातून फटकेबाजीची नाही. नविन फलंदाजांना मात्र अप्रचलित फटकेबाजीचं बाळकडूच मिळालेलं असतं.
असामी, राहूल चा इतिहास
असामी, राहूल चा इतिहास त्याच्या ओपनिंगबद्दल जरा मिक्स्ड सिग्नल्स देतो. कारण डोमेस्टिक सर्किटमधे तो ओपनिंग बॅट्समन च आहे. ऑस्ट्रेलियात त्याच्या आंतरराष्ट्रीय करियरची सुरूवात ओपनर म्हणूनच झाली होती आणी दुसर्याच मॅचमधे त्याने सेंच्युरी मारली होती. ओपनिंग ला त्याचा अॅव्हरेज सगळ्यात जास्त आहे आणी त्याच्या पाचही टेस्ट सेंच्युरीज ओपनिंग रोलमधेच आहेत. पण मागच्या ऑस्ट्रेलिया सिरीजमधे तो ओपनर म्हणून पूर्ण फसला होता आणी त्यातूनच मयंक आगरवाल ला संधी मिळाली. पण तरिही टेस्ट ओपनर हा स्पेशलाईझ्ड जॉब आहे आणी तो जेणो काम तेणो थाये न्यायानं ओपनरनेच करावा असं मला वाटतं. Let's hope he succeeds this time.
दुसर्या अँगलने विचार करता गिल ह टॉप मिडल ऑर्डर बॅट्समन आहे. त्याला कोहली गेल्यावर चौथ्या पोझिशन ला खेळवता येईल. जर राहूल, मयंक, पुजारा बर्यापैकी यशस्वी झाले तर गिलवर दडपण पण कमी असेल.
अर्थात कोहली आयपील बाहेरही
अर्थात कोहली आयपील बाहेरही प्रोव्हन आहे हा मह्त्वाचा फरक आहे. >>>> हा फरक महत्वाचाच नाही तर फार मोठा आहे, पण अर्थात सुर्या खेळलाच नाही देशासाठी त्यामुळे हा फरक दाखवण्यात अर्थही नाही. पण याच लाईनवर बोलायचे झाल्यास फरक हा आहे की सुर्याचा हा ड्रीम सीजन होता, कोहलीचे ईंटरनॅशनल लेव्हलला दर सीजनला हेच चालते. सुर्या अधिक आक्रमक दिसला यावेळी त्यामगचे कारणही त्याचा आणि एकूणच त्यामागे येणार्या पांड्या आणि पोलार्डचाही फॉर्म यंदा जबरा होता. उद्या मुंबईला चार प्लेअर रिटेन करायचे झाल्यास ते शर्मा, बुमराह, पांड्या, पोलार्ड यांना पहिले करतील, कारण सुर्याची जागा भरून काढायला कोणीतरी मिळेलच या हिशोबाने ..
आणि कोहलीचे रिजिड अस्ण्याबद्दल म्हणाल तर त्याची जी लेव्हल आहे त्यानुसार त्याची प्राथमिकता अश्याच फटक्यांना राहणार जे त्याला कमी रिस्क मध्ये तुलनेत जास्त धावा देतील. तरी त्याने मागच्या सामन्यात एक एबीडी शॉट मारलेलाच. त्याने असे फटके अधूनमधून जरूर मारावेत आणि बॉलरच्या डोक्यात किडा सोडावा असे मला वाटते.
असो, कोहली सुर्या तुलना करून सुर्या तुझी गरज नाही असे म्हणायचा हेतू नाही. पण हा एक मुद्दा आहे जो टीम कॉम्बिनेशनच्या दृष्टीने सिलेक्टरच्या डोक्यात असू शकतो.
तरिही टेस्ट ओपनर हा
तरिही टेस्ट ओपनर हा स्पेशलाईझ्ड जॉब आहे आणी तो जेणो काम तेणो थाये न्यायानं ओपनरनेच करावा असं मला वाटतं. >> मान्य फक्त राहुल हा ओपनर म्हणून हवे असलेले तंत्र असलेला प्लेयर नाही असे मला प्रामाणिकपणे वआटते. त्याच्या उणिवा भरतीय खेळपट्ट्यांवर खपुन जातात पण बाहेर गेले कि उघड्या पडतात. निव्वळ ऑस्ट्रेलिया च नव्हे तर इंग्लंड मधे शेवटची इनिंग्वगळता (जि पाटा पिच वर)_ होती तो पूर्णपणे फसला आहे. निवाळ फसणे हा प्रॉब्लेम नाही तर तो कशा प्रकारे बाद होते गेला हे चिंतादायक होते. अर्थात तेव्हढे इतर केपेबल ओपनर इतर आहेत का ? हा प्रश्न होउ शकतो. असो, कळेलच. चुकीचा ठरलो तरी मला आनंदच ( बरोबर ठरण्याच्या आनंदापेक्षाही अधिकच) होईल.
भाऊ, कोहली बद्दलचे माझे पोस्ट फक्त स्काय च्या तुलनेसाठी होते. कोहली जे करतो त्यापेक्षा वेगळे करावे अशी माझी अजिबात इच्छा नाही. मी जे आहे त्यावरच खूश आहे.
पण हा एक मुद्दा आहे जो टीम कॉम्बिनेशनच्या दृष्टीने सिलेक्टरच्या डोक्यात असू शकतो. >> स्काय अय्यर किंवा पाडे ह्यांबा सब म्हणून जास्त योग्य ठरतो. कोहलीची जागा घेणारे कोणीच सध्या तरी नाही.
असामी, सूर्य जरी आकाशात तळपत
असामी, सूर्य जरी आकाशात तळपत असला, तरी 'सुर्या'ला एकदम 'स्काय' म्हणशील हे अगदीच अनपेक्षित होतं.
"तो कशा प्रकारे बाद होते गेला हे चिंतादायक होते." - बरोबर आहे. ह्या बाबतीत मागच्या ऑस्ट्रेलिया दौर्याच्या वेळी झालेल्या चर्चेत सुद्धा आपलं एकमतच होतं. सद्ध्याच्या टीम मधे उपलब्ध असलेल्या पर्यायात तो बरा वाटतोय, किंबहूना बाकीच्यांच्या तुलनेत तो यशस्वी व्हायचे चान्सेस जास्त वाटतायत इतकंच. शॉ - आगरवाल जोडी फॉर्म आणी कॉन्फिडन्स मधे वरचढ असती तर हा प्रश्नच उद्भवला नसता. गिल अजून झाकली मूठ आहे त्यामुळे त्याच्याबद्दल काही बोलण्यात अर्थ नाही.
Pages