भारतात ज्येष्ठ नागरिकांना खरंच आदर मिळतो का?

Submitted by mrunali.samad on 26 November, 2020 - 09:20

भारतात या घडीला ज्येष्ठ नागरिकांना खरंच आदर मिळतो का? त्यांचे जीवन रिटायरमेंटनंतर कसे असते?
भारतात रिटायरमेंट वय 55 आहे. तेच बाकी देशांमधे 65 आहे.
जपानमध्ये ज्येष्ठ नागरिकांना खूप रिस्पेक्ट आहे.
अमेरिकेत रिटायरमेंटनंतर सरकारतर्फे मेडिकल सपोर्ट आहे. भारतात सरकारतर्फे शुन्य सपोर्ट आहे. जर ज्येष्ठ नागरिकांनी काही सेवींग्ज केले असतील तर काही वर्षे तेच जपून वापरावे लागतात नाहीतर मग त्यांना आर्थिकदृष्ट्या मुलांवर अवलंबून राहावे लागते.
आजच्या पिढीत 75% कुंटुंब ,बर्याच कारणांमुळे ज्येष्ठ पेरेंट्ससोबत राहत नाहीयेत.खुपशा कुंटुंबात मुले आपल्या आजी आजोबांना वर्षातून एक-दोनदा भेटतात.यातून मुले काय शिकतील आणि भविष्यात त्यांची वागणूक कशी असेल जेव्हा आपण म्हातारे होऊ?
आमच्या ओळखीत एका काकांच्या रिटायरमेंटनंतर पीएफ चा पैसा त्यांच्या मुलांनी गोड बोलून, आम्ही तुम्हाला सांभाळू असा विश्वास देऊन ,सगळा पैसा घेऊन दोन-तीन वर्षांत खर्चही करून टाकला आणि आता अशी परिस्थिती आहे कि त्यांना सांभाळणारे कुणी नाहीये.ते एकटे राहताएत आणि आर्थिक अडचणीत आहेत.
मला असे वाटते कि आजच्या वर्किंग जनरेशने भविष्यातील आर्थिक तरतुदी आजच करून ठेवायला हव्यात जेणेकरून कुणावर अवलंबून राहायची वेळ येवू नये.
या विषयावर चर्चा करून तुमचे मतं जाणून घ्यायला आवडेल..

Group content visibility: 
Use group defaults

कृपया शीर्षक नीट लिहा. मायबोलीवर चुकीचे मराठी लिहू नका हो, वाचताना जीव तडफडतो.

भारतात ज्येष्ठ नागरिकांना खरंच आदर आहे का?>>>

भारतात ज्येष्ठ नागरिकांना खरंच आदरपूर्वक वागवले जात आहे का?
भारतात ज्येष्ठ नागरिकांना खरंच आदर मिळतो का?
भारतात ज्येष्ठ नागरिकांचा खरंच आदर केला जात आहे का?

असे काहीतरी करा.

बाकी, आदर कमवावा लागतो. आपण ज्येष्ठ नागरिक झालो म्हणजे आदरणीय झालो असे सगळ्या ज्ये. ना. वाटते. पण लोकांनी आदर द्यावा असे त्यांच्या हातून किंवा तोंडून काही होत नाही हे बघितले आहे.

ज्येष्ठ नागरिक हे प्रचंड hyped प्रकरण आहे. आई म्हटली की थोर तुझे उपकार म्हणत नमन करायचे तसेच.

आजच्या वर्किंग जनरेशने भविष्यातील आर्थिक तरतुदी आजच करून ठेवायला हव्यात

आताचे ज्येष्ठ नागरिक एक हजारात दोन असतील की ज्यांना सरकारी पेन्शन आहे. ते निश्चिंत आहेत कारण पेन्शन काढून घेता येत नाही. पीएफ, पीपीएफ, एफडी यांंची value कमी होत गेली. महागाई फार. शिवाय एकरकमी पैशावर जाण्याचे भय फार.

तर हे आताची पिढी कसं करणार? पेन्शनी २००६ पासून बंद झाल्या. इनवेस्टमेंटसवर काही वर्षांनी अमेरिका/जपान देशांप्रमाणे नेगटिव इंट्रेस्ट लागू होणार हे नक्की.

भारतात रिटायरमेंट वय 55 आहे. तेच बाकी देशांमधे 65 आहे.>> हे साठ आहे ना? काही ठिकाणी 58 आहे.भारतात सरकारी दवाखान्यात उपचार मोफत आहेत. बस, रेल्वे प्रवासात सुट मिळते. FD वर व्याज थोडे जास्त मिळते. सगळीकडे गर्दी असते ह्या सवलती मिळवायला पण त्याला नाईलाज आहे.

७५% मुले सूना वेगळी राहतात कारण त्यांना प्रायवसी हवी असते व झंझट नको असते.पुर्वी घरं मोठी असायची व आई वडील तिथे रहायचे.आता वेगळे राहण्याशिवाय पर्याय नाही.बर्याचदा मुली नवर्याला सांगतात वेगळं राहायला.

ज्येष्ठ नागरिक हे प्रचंड hyped प्रकरण आहे.+++
हो ना..दरवेळी वयाच्या ज्येष्ठत्वचा अथवा तब्येतीचा मुद्दा रेटून आपलेच म्हणणे खरे करणे, भावनिक ब्लॅकमेल करणे असे चालू असते..
आदर हा मिळवावा लागतो....

@साधना
आपण पण ज्ये.ना.बनणार आहोत एक ना एक दिवस, असा विचार करून कसं चालेल??

@mandard
खाजगी कंपन्यांमध्ये रिटायरमेंट वय 55च आहे.

@ आंबट गोड
मे बी त्यांचे अनुभव आपल्यापेक्षा जास्त असतील म्हणून ज्येष्ठत्वाचा मुद्दा आणि त्या वयात खरंच तब्येतीच्या छोट्या मोठ्या तक्रारी असतील म्हणून तो मुद्दा ते रेटत असतील.
आणि ते भावनिक ब्लैकमेल नसून भावनिक अटेचमेंट असु शकते.

>खाजगी कंपन्यांमध्ये रिटायरमेंट वय 55च आहे.>कुठली कंपनी? माझ्या कंपनीत तर 60 आहे. मी आत्ता पर्यंत काम केलेल्या सर्व कंपन्यात 60 होते. असो ते फार महत्वाचे नाही.

ज्यांच्या सेवानिवृत्तीला किमान १० वर्षे बाकी त्यांनी आतापासुन आर्थिक नियोजन केले तर काही फायदा होईल. नाही तर काही खरं नाही.

@Mandard
मी ज्या कॉरपोरेट कंपनी मधे करते तीथे आहे 55. एनीवेज 60 पण असेल.

आदर म्हणजे respect चे भाषांतर आहे। मी एक मत मांडले. आर्थिक दृष्ट्या सबळ नागरिकांना भीतीयुक्त आदराने वागवले जाते. त्यांच्या बोलण्याला वजन 'येते'.

@वीरू
अजून लवकर आर्थिक नियोजन सुरू केले तर जास्त चांगले राहील.

अजून लवकर आर्थिक नियोजन सुरू केले तर जास्त चांगले राहील.>>
नक्कीच, नोकरीला लागल्यानंतर पहिल्या पगारापासुन याचा विचार व्हायला हवा. पण याबद्दल अनेकांना सांगुनही समजत नाही. दर महिन्याला ५०० रुपयांचा मोबाईलला बॅलन्स टाकतील पण दरमहा ५०० रु.ची बचत कर सांगितले तर परवडत नाही असे उत्तर ऐकायला मिळते.

म्हातारपणी कोणी पाहणार नाही हे सत्य आहे...
मुलांवर डिपेंडंसी नको म्हणून आम्ही काही जमीन घेऊन ठेवली आहे..थोडी थोडी विकून पैसे येत राहतील..

सेवानिवृत्तीला किमान १० वर्षे बाकी त्यांनी आतापासुन आर्थिक नियोजन केले तर काही........

१५ वर्षे .
१९७८ मध्ये पीपीएफ योजना सुरू झाली.

मुलांवर डिपेंडंसी नको म्हणून आम्ही काही जमीन घेऊन ठेवली आहे..थोडी थोडी विकून पैसे येत राहतील..>>
तातडीची गरज असेल तेव्हा लगेच जमीन विकली जाईल याची खात्री नसते.

जेष्ठ नागरिकांचे केवळ वय वाढले म्हणून त्यांनी इतरांकडून आदराची अपेक्षा करणे चुकीचे. आदरणीय होण्यासाठी तसे वर्तन हवे. जेष्ठ नागरिकांना डिग्नीटीने(सन्मानाने?) वागवले गेले पाहिजे असे म्हणणे असेल तर मी सहमत आहे. मात्र तसे डिग्नीटीने तर प्रत्येकालाच वागवायला हवे.
अमेरीका- जेष्ठ नागरिक आणि हेल्थकेअर याबद्दल खूप गैरसमज आहेत. इथेही जवळ जवळ १/३ जे. ना. ना हेल्थ केअरचा खर्च परवडणे आणि दोन वेळचे जेवण, रेंट वगैरेचा ताळमेळ घालणे कठीणच जाते.
आर्थिक तरतूदीचे म्हणाल तर ती प्रत्येकानेच करावी. जितके लवकर सुरवात करता येइल तितके चांगले. सुरवातीला बाजूला टाकता येइल अशी रक्कम लहान असली तरी हाताला सवय लागणे महत्वाचे.
कुटुंब एकत्र आहे की न्युक्लिअर यापेक्षा एकमेकांशी संबंध किती प्रेमाचे आहेत, जिव्हाळ्याचे आहेत, अडीअडचणीला एकमेकांशी मोठी माणसे कशी वागतात यातून मुलं बरेच काही शिकतात. एकत्र कुटुंबात रहाताना हेवेदावे असतील तर मुलं काय शिकणार? एकत्र रहात नसलात तरी तुम्ही नात्यातील जे. ना. च्या संभाळाबाबत जी धडपड करता, काळजी घेण्याचा प्रयत्न करता, प्रसंगी तुमच्या आसपास रहाणार्‍या एकट्या जे.ना. ना मदत करता , त्यातून मुले योग्य वर्तन शिकत असतात.
तुम्ही जे ओळखीच्या काकांचे उदाहरण दिले तो चक्क एल्डर अ‍ॅब्युझ! भारतात कायदा केला आहे ना - Maintenance and Welfare of Parents and Senior Citizens Act, त्या अंतर्गत त्यांना काय मदत मिळू शकते याची चौकशी तुम्ही करु शकता.

रोखठोक प्रतिसाद साधना +१

भारतात सरकारतर्फे शुन्य सपोर्ट आहे.
>>

भावी पिढ्यांचं भविष्य पाहता हे तसंच राहिलं तर उत्तम. जरा बारकाईने नजर फिरवली तुम्हाला दिसेल की सगळेच प्रगत देश आता पेन्शनच्या ओझ्याखाली दबलेले आहेत. कारण त्यांची बदलती डेमोग्राफिक्स.

आदर वैगरे जरा बाजूला ठेवलं तर मुळात बहुतेक वृद्ध लोकं ही आजघडीला तरी (फक्त) अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने NPA (non performing assets) आहेत, कितीही कटू असलं तरी सत्य हेच आहे.
पेन्शनचा भार नक्की कोण सोसत? तर सध्या चालू असलेली अर्थव्यवस्था जी प्रामुख्याने तरुण चालवतात. एकदा रिटायरमेंट झाली, अन दुसरं कामधंदा नसेल तर साहजिकच त्याचं देशाच्या अर्थव्यवस्थेत योगदान शून्य, पण राहण्याचे खाण्याचे , मुख्य म्हणजे आजारांचे खर्च मात्र वयोमानानुसार वाढलेले. त्यामुळं पेन्शन त्याच देशात शक्य आहे जिथे तरुणांची संख्या म्हातार्यांपेक्षा जास्त आहे. जेव्हा वृद्धांची संख्या जास्त होते तेव्हा त्यांना पोसायचा बराच खर्च तरुणांच्या खांद्यावर पडतो.

प्रगत देशांची गोची नेमकी इथेच झालीय. घटलेले जन्मदर, आणि प्रगत आरोग्यव्यवस्थेमुळे तरुण कमी झाले आणि वयोमान वाढल्यामुळं वृद्ध वाढले. त्याचबरोबर पेन्शनच बजेट सुद्धा चढत्या भाजणीने फुगत गेले. पण मुळात तरुणच कमी असल्यामुळे economy वाढली नाही, आणि आता हा वाढीव खर्च त्यांच्या गळ्याचा फास होऊन राहिलाय.

ही प्रचंड मोठी समस्या आहे अन ती लवकरात लवकर सोडवायला हवी. नाहीतर तो दिवस दूर नाही जेव्हा साठीनंतर जगण्यासाठी वर्षसुद्धा सरकारकडून पेन्शनीत घ्यावी लागतील.

बहुतेक वृद्ध लोकं ही आजघडीला तरी (फक्त) अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने NPA (non performing assets) आहेत, कितीही कटू असलं तरी सत्य हेच आहे.>> रिटायरमेंटनंतर देखिल काही ना काही उद्योग व्यवसाय करणारे, शेतीचे व्यवस्थापन पहाणारे अनेक जेष्ठ नागरिक पहाण्यात आहेत. वाढलेल्या बेरोजगारीमुळे अनेकांना तुटपुंज्या पगारावर काम करावे लागते. अशावेळी आईबापाचे पेन्शन त्यांच्यासाठी मोठा आधार असतो. ज्यांच्यावर फारशी जबाबदारी नाही असे अनेक पेन्शनरही आपल्या पेन्शनमधुन थोडीफार रक्कम मुलानातवंडांसाठी बचत करताना दिसतात. अशावेळी सरसकट सगळ्या जेष्ठ नागरीकांना अर्थव्यवस्थेवरील बोजा समजणे चुकीचे होईल.

रिटायरमेंटनंतर देखिल काही ना काही उद्योग व्यवसाय करणारे, शेतीचे व्यवस्थापन पहाणारे अनेक जेष्ठ नागरिक पहाण्यात आहेत.
>>

म्हणूनच मी बहुतेक म्हटलंय, "सगळे" नाही. जे रिटरमेंट नंतरही काम करतात ते अर्थात अर्थव्यवस्थेला हातभार लावतात, पण याचा अर्थ असा नाही की सगळीच वडीलधारी माणसं असं करू शकतात. प्रॉडक्टिव्ह काम करण्यासाठी आरोग्य, स्किलसेट आणि काही प्रमाणात नवीन तंत्रज्ञानसुद्धा गरजेचं आहे, आणि बऱ्याच वृध्दांकडे या तीनही गोष्टी नसतात, त्यामुळं गरज असलीच तरी त्यांना रोजगार मिळण्याची शक्यता आपोआपच कमी होते.

वाढलेल्या बेरोजगारीमुळे अनेकांना तुटपुंज्या पगारावर काम करावे लागते. अशावेळी आईबापाचे पेन्शन त्यांच्यासाठी मोठा आधार असतो. ज्यांच्यावर फारशी जबाबदारी नाही असे अनेक पेन्शनरही आपल्या पेन्शनमधुन थोडीफार रक्कम मुलानातवंडांसाठी बचत करताना दिसतात.
>>
ही पेन्शन सगळीच्या सगळी रक्कम मुलाला किंवा नातवंडाला मिळते का? अर्थातच नाही. आई वडिलांचे (म्हणजे पेन्शनर्स ज्यांना दुसरा रोजगार नाही ते) स्वतःचे खर्च असणारच ना? त्याबदल्यात पेन्शन देणार्याला त्याचा डायरेक्ट इन्डायरेक्ट काहीच फायदा नसतो. अर्थशास्त्रात यालाच नॉन परफॉर्मिंग ऍसेट/ अनुत्पादकता असं म्हणतात.

आपण एक सोपं उदाहरण घेऊ म्हणजे हा प्रकार काये तो जरा स्पष्ट होईल. समजा एका वाड्यात १० माणसं राहतात, त्यापैकी ३ अकार्यक्षम वृद्ध, ४ रोजगारी तरुण, अन ३ लहान मुलं आहेत. साहजिकच घरातल्या दहाही माणसांना पोसायचे जबाबदारी चार जणांवर येते. अशातच जर समजा मंदी आली, आणि चौघातले दोघे बेरोजगार झाले तर सगळ्या कुटुंबाचा भार दोघांवर येऊन पडेल. पर्यायाने उत्त्पन्न कमी झालं पण खाणारी तोंडे आहे तेवढीच आहेत. अशा परिस्थितीत घरात जर अन्नान्न दशा झाली, तर जेवणाचा प्रेफरेन्स कुणाला द्यायचा? छोट्यांना, तरुणांना कि वृद्धांना ?
उत्तर सरळ आहे - पहिले लहानांना , नंतर तरुणांना अन नंतर काही उरले तर वृद्धांना.

याचा अर्थच असा की जेव्हा रिसोर्सेस कमी असतात तेव्हा आपण सर्वात आधी तरुण पिढीला ते देतो 'कारण तेच आत्ताचे किंवा नंतरचे उत्पादक असतात', ते कमजोर झाले तर अख्ख्या घरावरच वरवंटा फिरेल. वृद्ध अनुत्पादक असल्यानं त्यांची पोट जरी भरली असली तरी त्याचा कुटुंबाला काहीच फायदा होणार नसतो, साहजिकच त्यांचा क्रमांक शेवटचा येतो.

फार दूर कशाला जा, प्रत्येक मध्यमवर्गीय घरात आपण कधी ना कधी पोराच्या शिक्षणासाठी कधी पोट मारून जगणारा बाप, आजार अंगावर काढणारी आई बघितली असेल, त्यामागे हेच तर लॉजिक आहे.

हा वाडा म्हणजेच देश आणि त्यातली माणसं हे देशाचे नागरिक, अशी तुलना करा. आता मला सांगा कर्जबाजारी देशांत (यात सध्या प्रगत आणि प्रगतिशील दोन्ही देश येतात, सगळ्यांवरच काही ना काही कर्जे लागलेली आहेत) कुण्या वित्तमंत्र्यांनी बजेट मांडलं, तर त्यांनी प्रामुख्याने खर्च कशावर करावा ?
लहान्यांच्या शिक्षणावर, आरोग्यावर, देशाच्या मूलभूत सुविधांवर, तरण्याच्या भत्त्यावर की म्हातार्यांच्या पेन्शनीवर?

माझ्या म्हणण्याचा पुरावाच हवा असेल तर, गेल्या वर्षी युरोपीय युनियन ने ग्रीसवर मोठमोठी कर्जे काढल्यामुळं आर्थिक निर्बंध लावले होते. त्यामागचं नेमकं कारण आणि परिणाम काय ते जरा विकिपीडिया वर पहा (https://en.wikipedia.org/wiki/Public_pensions_in_Greece). म्हणजे माझ्या बोलण्यातला नेमका रोख तुम्हाला कळेल.

रिटायरमेंट ही एक मध्यमवर्गीय संकल्पना आहे. गरीब माणसाला रिटायर होणे परवडत नाही. दुखलं खुपलं तरी ते भाजी विक, प्लॅस्टीक गोळा कर असली कामे करत राहतात. कोट्याधीश लोकं (उदा: वॉरन बफेट इ) आवडतं ते काम करायला परवडतं, जमतं म्हणून काम करत राहतात. मध्यमवर्गीय रिटायरमेंटची स्वप्ने बघतो. पण हल्ली बहुतेक देशात मध्यमवर्गीयाला रिटायर होणे परवडत नाही. Grass is always greener on the other side.

रिटायरमेंट व आदर याचा संबंध काय ते लक्षात आले नाही. त्यामुळे त्याबद्दल अजून ऐकायला आवडेल.

नोकरीला किंवा कामवायला लागल्यापासून आर्थिक नियोजन सुरू करायला हवे. स्वता:च्या मुलामुलींना चांगले शिक्षण द्यावे त्यांना वाढवत असताना त्यांच्याशी चांगले वागावे. तसेच आपण एकत्र राहुया असा आग्रह धरू नये. व स्वत:चे राहते घर वा प्रोविडेंट फंड मुलांच्या नावे करू नये जसे वर केले तर वर लिहिल्यासारखी वेळ येऊ शकते. जर एकत्र राहुया असा मुलांनी आग्रह धरला तर त्यांच्या संसारात ढवळाढवळ करू नये व त्यांनी आज काय केले पैसे जास्त खर्च का केले असे प्रश्न अजिबात विचारू नयेत. म्हणजे मुले आदर करतील.

Pages