भारतात ज्येष्ठ नागरिकांना खरंच आदर मिळतो का?

Submitted by mrunali.samad on 26 November, 2020 - 09:20

भारतात या घडीला ज्येष्ठ नागरिकांना खरंच आदर मिळतो का? त्यांचे जीवन रिटायरमेंटनंतर कसे असते?
भारतात रिटायरमेंट वय 55 आहे. तेच बाकी देशांमधे 65 आहे.
जपानमध्ये ज्येष्ठ नागरिकांना खूप रिस्पेक्ट आहे.
अमेरिकेत रिटायरमेंटनंतर सरकारतर्फे मेडिकल सपोर्ट आहे. भारतात सरकारतर्फे शुन्य सपोर्ट आहे. जर ज्येष्ठ नागरिकांनी काही सेवींग्ज केले असतील तर काही वर्षे तेच जपून वापरावे लागतात नाहीतर मग त्यांना आर्थिकदृष्ट्या मुलांवर अवलंबून राहावे लागते.
आजच्या पिढीत 75% कुंटुंब ,बर्याच कारणांमुळे ज्येष्ठ पेरेंट्ससोबत राहत नाहीयेत.खुपशा कुंटुंबात मुले आपल्या आजी आजोबांना वर्षातून एक-दोनदा भेटतात.यातून मुले काय शिकतील आणि भविष्यात त्यांची वागणूक कशी असेल जेव्हा आपण म्हातारे होऊ?
आमच्या ओळखीत एका काकांच्या रिटायरमेंटनंतर पीएफ चा पैसा त्यांच्या मुलांनी गोड बोलून, आम्ही तुम्हाला सांभाळू असा विश्वास देऊन ,सगळा पैसा घेऊन दोन-तीन वर्षांत खर्चही करून टाकला आणि आता अशी परिस्थिती आहे कि त्यांना सांभाळणारे कुणी नाहीये.ते एकटे राहताएत आणि आर्थिक अडचणीत आहेत.
मला असे वाटते कि आजच्या वर्किंग जनरेशने भविष्यातील आर्थिक तरतुदी आजच करून ठेवायला हव्यात जेणेकरून कुणावर अवलंबून राहायची वेळ येवू नये.
या विषयावर चर्चा करून तुमचे मतं जाणून घ्यायला आवडेल..

Group content visibility: 
Use group defaults

एक काम करा .
तुम्हीच तुमचे स्वतःचे बलिदान वय वर्ष 60 लागले की ध्या.
एक आदर्श निर्माण होईल आणि तुमचे हे बलिदान बघून अनेक जेष्ठ स्व खुशी नी मरण स्वीकारतील.
फक्त न विसरता 60 वर्ष लागल्या बरोबर जीवन यात्रा संपवा.अगदी न विसरता.
आणि तुमच्या सारख्या विचाराची माणसे पण शोध त्यांना तुमचे लॉजिक सांगा 60 वर्ष वय झालेलं आहे आता मानवी जात टिकावी म्हणून आपल्याला मरणे गरजेचे बघा तुमचे लॉजिक ऐकुन एक व्यक्ती तरी तयार होतोय का..
दोन चार लोक तरी तयार कराच त्यांना पटवून च द्या 60 ब्या वर्षी जीवन संपवणे कसे मानव हिताचे आहे ते.
हे तुम्हालाच करावे लागेल.
सरकार काही असले कायदे करणार नाही कारण सर्व देशांचे राष्ट्र प्रमुख जे 70 च्या आसपास वयाने असतात.

आता तुमचे वय किती आहे त्या नुसार 60 वर्ष च्या अगोदर फक्त अर्थव्यवस्थेत योगदान देत चला.
सर्व टॅक्स डबल भरत जा.
आम्ही तर 100 वर्ष जगणार .मग आमच्या जगण्या मुळे मानव जात nasht झाली तरी चालेल.
परत रिव्हर्स एज चे संशोषधन तेव्हा उपलब्ध झाले तर अजुन 100 वर्ष जगणार.
22 व्यावे शतक संपल्या वर च काय ते निघण्याचा विचार करू.

एक काम करा .
तुम्हीच तुमचे स्वतःचे बलिदान वय वर्ष 60 लागले की ध्या.
एक आदर्श निर्माण होईल आणि तुमचे हे बलिदान बघून अनेक जेष्ठ स्व खुशी नी मरण स्वीकारतील.
फक्त न विसरता 60 वर्ष लागल्या बरोबर जीवन यात्रा संपवा.अगदी न विसरता.
आणि तुमच्या सारख्या विचाराची माणसे पण शोध त्यांना तुमचे लॉजिक सांगा 60 वर्ष वय झालेलं आहे आता मानवी जात टिकावी म्हणून आपल्याला मरणे गरजेचे बघा तुमचे लॉजिक ऐकुन एक व्यक्ती तरी तयार होतोय का..
दोन चार लोक तरी तयार कराच त्यांना पटवून च द्या 60 ब्या वर्षी जीवन संपवणे कसे मानव हिताचे आहे ते.
हे तुम्हालाच करावे लागेल.
सरकार काही असेल कायदे करणार नाही कारण सर्व देशांचे राष्ट्र प्रमुख जे 70 च्या आसपास वयाने असतात.

परत रिव्हर्स एज चे संशोषधन तेव्हा उपलब्ध झाले तर अजुन 100 वर्ष जगणार.
22 व्यावे शतक संपल्या वर च काय ते निघण्याचा विचार करू.

>>
Lol
शेवटी हा तर्क कधी निघतोय याची वाटच बघत होतो. सध्या तरी माझी तर तयारी आहे बुवा इच्छामरणाची, पण पुढचं कुणी पाहिलं ? काय सांगावं उतारवयात जगायची उर्मी पुन्हा उफाळून येईल.

मे बी माणसाच्या मनाची कधीच तयारी होणार नाही स्वतःहून कायमच्या वानप्रस्थाला जायची. असो पण आपल्या इच्छेनं घंटा फरक पडणार नाही, जे काम आपण स्वतःहून करणार नाही ते निसर्गच आपल्यासाठी करेल, Afterall it loves equilibrium. एकतर म्हातारी तरी पर्ज होतील नाहीतर अख्खी मानवजात बुडेल, either way, balance will be restored.

कदाचित माणसाच्या नशिबी अशा प्रश्नांची उत्तर लिहिलेली नाहीत. कदाचित आपण अजूनही तितके उत्क्रांत झालेलो नाही. पुढच्या पिढ्यांकडे याची उत्तरं असतील अशी आशा करूया. तुम्ही बिंदास 'ऋणां कृत्वा घृतम पिबेत' चालवावे, अगदी शंभर का हजार वर्ष जगावे. त्याची किंमत कुणी ना कुणी चुकवणारंच. कोण चुकवणार ते येणारा काळ ठरवेल.

तोपर्यंत माझे मुद्दे तुम्ही कधी खोडून काढताय त्याची वाट बघतो. Happy

विलभ यांच्याशी सहमत आहे.
एखाद्या जंगलात हरणाची संख्या अचानाक वाढली व सर्व हरणांना वीस वीस वर्षे जगावेसे असे कितीही उत्कटतेने वाटले तरी पर्जिंग हे होणारच. मग ते शिंहांची संख्या वाढून होईल किंवा हरणांची उपासमार होउन होईल.

छान चर्चा चालू आहे.

काही ज्येष्ट नागरीक असतात जे आपल्या कलागुण आणि अनुभवामुळे तरुणांपेक्षा उपयुक्त ठरतात. तर कित्येक तरुण असे असतील जे कसलेही कौशल्य आणि ईच्छाशक्ती नसल्याने बिनकामाचे असतील. त्यामुळे कोणाचे वय किती आहे त्यानुसार तो मानवजातीसाठी किती योगदान देतोय हे सरसकट ठरवू शकत नाही.

वर अशी चर्चा चालू आहे का की अश्या बांडगूळांना पोसायचे का नाही?

असो,
मला वाटते आपण वृद्धांचा आणि त्यांच्या गाठीशी असलेल्या अनुभवाचा योग्य वापर करून घेत नाही.

एक मुर्खपणा हा करतो की निवृत्तीचे वय ठरव्तो. खरे तर लॉजिकली फिटनेस टेस्ट असावी, वयानुसार परफॉर्मन्स ढासळला तरच उचलबांगडी व्हावी. एखादा आजारांनी त्रस्त ५० व्या वर्षीच अनफिट होऊ शकतो तर एखादी सुद्रुढ व्यक्ती ७० व्या वर्षीही जगभर उत्साहात फिरून काम करू शकते.

असो,

@ धाग्याचे शीर्षक

नाही मिळत आदर.
या धाग्यावर सुद्धा तो मिळेल असे वाटत नाही.
काळ खूप बदललाय.
माझ्या लहानपणी आमच्याईथे जो आदर, जो मान ज्येष्टांना मिळताना पाहिला आहे ते संस्कार हल्ली दिसत नाहीत.

त्यांच्या शब्दाला मान असायचा, त्यांना उलट उत्तरे दिली जायची नाही, कोणी ज्येष्ट सामान उचलून जाताना दिसल्यास लगेच पुढे येत मदत केली जायची. घरातही हेच चित्र असायचे. एकत्र कुटुंब पद्धती होती. सर्व मिळून घरच्या ज्येष्टांना मान द्यायचे.

हल्ली घरातल्यांनाच ते नकोसे होतात. स्त्री पुरुष समानता येतेय. कुटुंबपद्धत बदलतेय. कमावणारया सूनेला घरात ज्येष्ट नको असतात. ती असा विचार करण्याची शक्यता असते की मी लग्नानंतर नवरयाच्या घरी जात असेल आणि कमावून माझ्या आईबाबांना पोसू शकत नसेल तर नवरयाच्या आईबाबांना का पोसावे? यात तिची काही चूक नाही. पण यामुळे एकतर वेगळे राहिले जाते वा आपल्या संसारात त्यांची लुडबूड नको म्हणून जास्त मान देऊन डोक्यावर चढवले जात नाही. त्यात ज्येष्ट आर्थिकदृष्ट्या परावलंबी झाला तर त्याचे जिणे कुत्र्याचेच होते. सून वा जावई सोडा, सख्खी मुलेही विचारत नाहीत.. केवळ आम्हाला जन्म दिला आहेस आणि पालनपोषण करून मोठे केले आहेस या क्वालिफिकेशनला हल्ली कुत्रेही विचारत नाही. त्यामुळे एकूणच भावनिक न होता प्रॅक्टीकल विचार करणे ज्येष्टांनाही जमायला हवे.

असो,
मला यात सर्वात वाईट त्या नातवंडांचे वाटते ज्यांना आजीआजोबांचे सुख हल्ली फार कमी मिळते Sad

एक सांगू का? ज्येष्ठांनी ( इथे ज्येष्ठांचा विषय चालू आहे म्हणून ज्येष्ठ अन्यथा कुणीही) आदराची अपेक्षाच करु नये. अपेक्षाभंगाचे दु:ख तरी वाट्याला येणार नाही. हे थिअरी झाली पण प्रत्यक्षात ते आणण अवघड असत हे मलाही मान्य आहे. पण किमान तसा प्रयत्न करावा.

काम करण्याच्या वयात असलेली भारतातील 50 टक्के लोक भारतीय अर्थ व्यवस्थेत सहभागी च नाहीत .
त्यांना सहभागी करून घेण्याची takat भारतीय अर्थ व्यवस्थेत नाही.
16 ते 60 वर्ष वय असलेली 50 टक्के लोक भारतीय अर्थ व्यवस्थेत काहीच भर घालत नाहीत असा अभ्यास आहे .
तरुण लोकांची भारतात बिलकुल कमी नाही जे आहेत ते अर्थव्यवस्था च्या बाहेर फेकले गेलेले आहेत.
आणि त्यांची संख्या 50 टक्के आहे.
आता बोला.

भारतात आहे की उत्तम संख्येत मनुष्यबळ. दिशाहीन आणि ध्येयहीन आहे बहुतांश. जपानबद्दल काही बोलण्याइतका माझा अभ्यास नाही या विषयाचा. पण आपला जपान नाही होणार. अनुत्पादक राहून सगळे लाभ ओरबाडण्याची स्पर्धा असलेल्यांचा देश असे काहीतरी होईल.

+1000
परफेक्ट! भारतात हेच चालू असतं. जपान किंवा युरोप अमेरिकेशी तुलना होऊच शकत नाही.

आणि हो, भारतात जर गृहयुद्ध झालंच तर ते वृद्ध आणि तरुण यांच्यात होणार नाही. आम्हाला पोसलंच पाहिजे असा हट्ट धरलेले सर्व वयोगटातील फुकटे आणि त्यांना पोसून थकलेले सर्व वयोगटातील प्रायव्हेट प्रॉडकटिव्ह रिसॉर्स यांच्यात होईल.

आम्हाला पोसलंच पाहिजे असा हट्ट धरलेले सर्व वयोगटातील फुकटे आणि त्यांना पोसून थकलेले सर्व वयोगटातील प्रायव्हेट प्रॉडकटिव्ह रिसॉर्स यांच्यात होईल.
>>>>

अश्या प्रॉडक्टिव्ह रिसोर्सची बाजू घेणारे ईथे कोणी नाहीये. म्हणून संधी मिळताच येथील होतकरू तरुण परदेशात आपले नशीब आजमवायला जातात. या युद्धात ते प्रमाण वाढत जाणार हेच होणार. जर खरेच अच्छे दिन आले तर हे प्रमाण आपसूक घटेल.

भारतात एकूण लोकसंख्येच्या 67.8 percent लोक ही 15 ते 64 वयो गटातील आहेत.
आणि फक्त 5.4 percent lok hi 65 वर्षाच्या पुढील आहेत.

त्या मध्ये
25 ते 29 वयोगट 9.7
30 ते 34 वयोगट 8.1
35 ते 39 वयोगट 7.1
40 ते 44 वयोगट 6.1
45 ते 49 वयोगट 5.3
50 ते 54 वयोगट 4.3
म्हणजे अगदी तगडे जवान जे शिक्षण पूर्ण करून व्यवसाय नोकरी करण्याच्या वयात आहेत त्यांची टक्केवारी 40 टक्के आहे.
आणि ह्या 40 टक्के मधील च किती बेरोजगार आहेत ह्यांची आकडेवारी माहीतच असेल.
अजुन किती मोठा working force hava तुम्हाला.
आणि तुम्ही ज्या लोकांना जेष्ठ नागरिक म्हणत ज्यांना तुम्ही बोजा समजता त्यांचेच भांडवल,आयते उद्योग घेवून त्यांचे प्रमाण फक्त
5.4 टक्केच आहे.

भरत, मोतीबिंदुवर शस्त्रक्रिया होउ शकते, गुडघे बदलता येतात वगैरे ठीक.
पण होणारे आजार टाळता येउ शकतात अथवा आधीपेक्षा आता ते उशिराने येतात असे काही झाले नाही. उलट ते लौकर येताहेत असे दिसते.
The main drivers of increases in the number of years lived with disability were musculoskeletal, mental, and substance abuse disorders, neurological disorders, and chronic respiratory conditions. There has also been a startling increase in the health loss associated with diabetes (increase of 136%), Alzheimer's disease (92% increase), medication overuse headache (120% increase), and osteoarthritis (75% increase). स्रोत-जो लॅन्सेटवर आधारीत.

लोकसंख्येचं वय वाढलं पण आरोग्य वाढलं नाही:- वयोमानानुसार कमी होणारी शारिरीक मानसीक कार्यक्षमता यात सुधारणा झाली नाही.

भारतातील परिस्थिती: आता ८०+ मध्ये असणारी पिढी बघा, जी २००० च्या आसपास निवृत झाली. यातिल खाजगी क्षेत्रातून जे निवृत्त झाले त्यांना पेन्शन नाही. २००० साली त्यांनी आपल्याला आयुष्यभर पुरेल एवढी पुंजी साठवली होती. पण महागाई एवढ्या झपाट्याने वाढली,( आणि व्याजदर घटला) की ती पुंजी पुरणे अशक्य आहे. ज्यांना अपत्यांकडुन आर्थिक आधार नाही त्यांचे काय हाल झाले असतील?
आताही म्हातारपणी आर्थिक स्वावलंबनासाठी नियोजन करायचे असेल, वाढती महागाई लक्षात घेता जेवढी पुंजी साठवावी लागेल, तेवढी मिळकतही असायला हवी. ५८व्या वर्षांंपर्यंत हे करणे सगळ्यांना शक्य नाही. म्हणजे एकतर अपत्यांवर अवलंबून असणे आले किंवा अधिक वयापर्यंंत काम करत रहाणे आले. आणि अपत्यांकडुन अपेक्षा धरायची नाही म्हटले तर दुसरा पर्यायच उरतो. त्यासाठी शारिरिक व मानसिक कार्यक्षमता हवी. आणि तेही झाले तर तरुण बेरोजगारीचे प्रमाण वाढेल. तेव्हा हे (जननदर कमी झाल्याने) तरुणांचे प्रमाण कमी झाले तरच व्यवहार्य होइल.
म्हणजे वृद्ध आयुष्य वाढवायचे तर तरुणांचे प्रमाण कमी व्हायला हवे. (रिसोर्सेस मर्यादित असल्याने).

जर कमाइचे आयुष्य न वाढवता वृद्धापकालाची सोय साठवलेल्या पुंजीतून करायची असेल तर देशाची अर्थव्यवस्था कर्तबगारीच्या वयात तेवढा पगार मिळण्याएवढी मजबूत असावी लागेल. यातून वृद्धांकडे असलेला पैसा वाढेल. वृद्धांचा कल सुरक्षीत गुंतवणुकीकडे असतो, म्हणजे त्यातून इतरांना संधी मिळण्याचे प्रमाण कमी आणि त्याने व्याजदरही कमी होइल. महागाई वर नियंत्रण ठेवावे लागेल. जीडीपी वाढणार नाही.

हे सुचलेले विचार आहेत, अभ्यास करुन लिहिलेले नाही. यावरील टिका टिपणीचे स्वागत.

बरचसं पटलं नाही.

<वृद्धांचा कल सुरक्षीत गुंतवणुकीकडे असतो, > गुंतवणूक तरुणपणी करायची असते. तेव्हा जोखीम घेता येते. वृद्धत्वात तिची फळं चाखायची असतात.

बाकी नंतर लिहीन.

हवा प्रदूषण, पाणी प्रदूषण, चुकीचा आहार,बैठी जीवन शैली,व्यायाम चा अभाव,व्यसन,असुरक्षित वातावरण ,जबरदस्त स्पर्था आणि त्या मधून येणारा तणाव,.
संकरित भाज्या आणि फळं,कड धान्य.
जंतू नाशकाचा चा वाढलेला वापर,अशा घटका न च परिणाम म्हणून लहान वयातच bp, मधुमेह,पचन संस्थेचे आजार,लठ्ठ पना
असे विविध आजारांनी आजची पिढी त्रस्त आहे.

भरत जरुर लिहा. हेमंत यांच्याशी मी सहमत आहे. बाकी त्यांच्याशी किंवा इतरांशी माझे कितीही राजकीय मतभेद असतील, आहेत. तरी त्यांची काही मते मला पटलीत पण उतारवयात कितीही नाही म्हणले तरी आई वडील असो वा सासु सासरे यांची काळजी घेणे ज्यांना घेणे शक्य आहे त्यांनी ती जरुर घ्या.

नोकरी लागता क्षणी थेंबे थेंबे तळे साचे या वृत्तीने जमवल्यास पुढे जाऊन आपल्यालाच फायदा होणार आहे. बाकी नंतर लिहीन.

काही ज्येष्ट नागरीक असतात जे आपल्या कलागुण आणि अनुभवामुळे तरुणांपेक्षा उपयुक्त ठरतात. तर कित्येक तरुण असे असतील जे कसलेही कौशल्य आणि ईच्छाशक्ती नसल्याने बिनकामाचे असतील. त्यामुळे कोणाचे वय किती आहे त्यानुसार तो मानवजातीसाठी किती योगदान देतोय हे सरसकट ठरवू शकत नाही.

वर अशी चर्चा चालू आहे का की अश्या बांडगूळांना पोसायचे का नाही?
असो,
मला वाटते आपण वृद्धांचा आणि त्यांच्या गाठीशी असलेल्या अनुभवाचा योग्य वापर करून घेत नाही.

एक मुर्खपणा हा करतो की निवृत्तीचे वय ठरव्तो. खरे तर लॉजिकली फिटनेस टेस्ट असावी, वयानुसार परफॉर्मन्स ढासळला तरच उचलबांगडी व्हावी.

Submitted by ऋन्मेऽऽष on 28 November, 2020 - 16:50

>>

चूक, कुणी कितीही नाकारलं वय हेच मुख्य परिमाण आहे परफॉर्मन्सच, कारण तुमची शक्ती, कल्पकता वयपरत्वे कमी होत जातात. अर्थात जिथं अनुभव मॅटर करतो जसं संशोधन, डॉक्टरकी, उच्च व्यवस्थापन, राजकारण तिकडे वय हा मुख्य पॅरामीटर नसतोच, पण अशा जागा आहेतच मुळी हाताच्या बोटावर मोजण्याइतक्या. बाकीच्या बऱ्याच क्षेत्रात तंत्रज्ञान, कामाच्या पद्धती इतक्या झपाट्यानं बदलत असतात तिथं जुन्या अनुभवाचीही काही किंमत नसते.

एखादा आजारांनी त्रस्त ५० व्या वर्षीच अनफिट होऊ शकतो तर एखादी सुद्रुढ व्यक्ती ७० व्या वर्षीही जगभर उत्साहात फिरून काम करू शकते.
तर कित्येक तरुण असे असतील जे कसलेही कौशल्य आणि ईच्छाशक्ती नसल्याने बिनकामाचे असतील. त्यामुळे कोणाचे वय किती आहे त्यानुसार तो मानवजातीसाठी किती योगदान देतोय हे सरसकट ठरवू शकत नाही.

Submitted by ऋन्मेऽऽष on 28 November, 2020 - 16:50
>>
अहो, here main thing is potential to work. आज चा २० वर्षे वयाचा तरुण भले पुढली १० वर्ष बेरोजगार राहील, पण त्याच्या हातात ३० वर्ष तरी काम करायचं पोटेन्शियल आहे ना ? ते कसं नाकारता येईल? याउलट वृद्धांची लाख इच्छा असेल काम करायची, त्यांचं आरोग्य, अंगातली शक्ती, कमजोर झालेला मेंदू देणार आहे का साथ त्यांची? (इथं बहुतेक वृद्ध पकडा सगळे नाही, परत परत सांगतो). तसं बघायला गेलं तर लहान मुलंही काही काम करत नाहीत, but the fact is , भविष्यात त्यांच्याकडे कामाचं पोटेन्शियल येतं. वृद्धाचं होतं का तसं वयोमानानुसार ?
तुमच्या तर्कात प्रॉब्लेम absolutes आणि percentages चा आहे. कामसू वृद्धाचं एक उदाहरण दाखवून सगळे वृद्ध कामाचे हे सिद्ध होत नाही अन काही बेरोजगार तरुण दाखवून बरेच तरुण बेरोजगार आहेत हे हि शाबीत होत नाही. मी टोटल पेर्सेन्टबद्दल बोलतोय आणि तुम्ही एक दोन अबसोल्यूट आउटलायर्स दाखवताय. लक्षात ठेवा 'outliers don't define general trend' ! जेव्हा आपण सगळ्या समाजाचं बोलतो तेव्हा टक्केवारीच मॅटर्स, ३-४ उदाहरणे नाही.

याची आकडेवारीच हवीय तर युनायटेड नेशन्सचा एक अहवाल मी डकवतोय. त्याच्यात पान क्रमांक २४ वर एक ग्राफ[१] आहे, वयोमानानुसार पर कॅपिटा उत्त्पन्न आणि भोगवटा याच्यावर वयानुसार कसा फरक पडतो ते २ देशांच्या बाबतीत दाखवलय.

age_vs_per_capita.PNG

.
.
वरील चार्टमध्ये बघितल्यावर सहज कळेल, सर्वसाधारणपणे २० - ६५ याच वयोगटात उत्त्पन्न हे विनिमयापेक्षा वरचढ असतं, म्हणून हाच गट आहे जास्ती कमावून बाकीच्यांना पोसतो, तोच अर्थव्यवस्थाही चालवतो, म्हणूनच तोच सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे. तो बहुसंख्येने नसला तर बाकीच्या गटांना काहीच किंमत नाही.

[१] https://www.un.org/en/development/desa/population/publications/pdf/agein...

विलभ, मग तुम्ही रतन टाटा सारख्या लोकांना रिटायरच समजत असाल, जे करोडोंचे आदर्श व श्रद्धा स्थान आहेत. Uhoh

मिडिअन आणि अ‍ॅव्हरेज नेटवर्थ ज्या गटाची जास्त तो गट इकॉनॉमीत सर्वात महत्त्वाचा. श्रम करणारे नाही तर त्या श्रमांसाठी पैसे मोजायला तयार असलेला गट इकॉनॉमी ड्राईव्ह करतो.
तरुण माणसांकडे त्यांच्या गरजा पूर्ण करायला जेमतेम पैसे असतात तर वय वाढत जातं तशी पुंजी वाढत जाऊन ५५ ते ७५+ गटाकडे सगळ्यात जास्त पैसे असतात.
पैसा असला की काम करायला माणसं सहज मिळतात. ती आकर्षितच होतात. देशातली जनता वृद्ध झाली तर बाहेरच्या देशातुन माणसं मिळतात. मात्र अर्थव्यवस्था कमकुवत असली तर ढीगाने तरुण लोक असुन ढिम्म फरक पडू शकत नाही. पाश्चिमात्य देश आणि भारताचं चित्र डोळ्यापुढे आणा की लगेच दिसेल.
भारतात अर्थव्यवस्था कमकुवत त्यात महाआळशी 'असेल माझा हरी' आणि 'ठेविले अनंते' तरुण. मज्जाच मज्जा!

नुसती आकडेवारी देवून "अ‍ॅक्शन आयटम" काय ते खरच कळत नाही. वृद्धांना कसं काढायचं असा काहीसा विचार आधी कुणी मांडला होता. हे डिस्क्रीमिनेशन आहे. उलट वृद्धांना समाजधारेत समरस कसे करून घेता येईल अशी धोरणे हवी. ६०व्या वर्षी रिटायर माणूस जर ८५व्या वर्षी मरणार असे गृहित धरले तरी २५ वर्ष ती व्यक्ती 'बेडरिडन', अकल्पक इ नसते. झेपेल तशी कामे उपलब्ध व्हायला हवी. एक-दोन आउटलायर्सचे महत्त्व खूप असते. समोर 'रोल मॉडेल' असेल तर तिथेपर्यंत कसे जायचे हा विचार इतर करू लागतात. मानसिकता बदलू लागते. एक आजी मॉडेलिंग करते म्हणल्यावर बाकीच्या आज्या/ आजोबा ह्यात काही वावगे नाही इ विचार करू लागतात. असं आउटलायर्सचे महत्त्व कशाला कमी करायचे? प्रेरणा मिळते...
https://www.youtube.com/watch?v=xZVicxLnn6Y

विलभ, मग तुम्ही रतन टाटा सारख्या लोकांना रिटायरच समजत असाल, जे करोडोंचे आदर्श व श्रद्धा स्थान आहेत. Uhoh

नवीन Submitted by रश्मी.. on 30 November, 2020 - 10:32
>>

he is an exception (like I said outlier). याचा अर्थ असा नाही की सगळेच म्हातार्यांना रतन टाटा सारखे काम जमू शकतं (अगेन absolutes are not percentages !).
आणि कंपनी एकट्या टाटांच्या जीवावर नाही तिथं बाकी काम करणाऱ्यांच्या (त्यातही बरेच तरुण आहेत बरका) जीवावर चालते. त्यातही असं बघा उद्या रतन टाटा बाजूला झाले तर मिस्त्री किंवा आणखी कुणी कंपनी सहज चालवेल, पण तिथले कामसू तरुणच गेले तर टाटा एक दिवसतरी चालेल का ? सांगा बरं जरा.

एकच माणसं भोवती वलय असते .
.मुकेश अंबानी बाजूला झाले तर कंपनी चे शेअर तळ गाढतील किती तरी भांडवल बुडेल.
तिथे चांगली लोक काम करतात म्हणून कंपनी चांगली विश्वासू आहे असे कोणी समजत नाही तर मुकेश अंबानी आहेत म्हणून कंपनी चांगली परफॉर्म करते आहे असेच समजले जाते आणि हेच खरे असते.
नेतृत्व महत्वाचे असते आणि ते काहीच लोकात असते सर्वांना ते जमत नाही.

विलभ यांची मत फक्त सनसनाटी आहेत. त्यातुन वर सीमंतिनीने म्हटल्याप्रमाणे 'बरं मग?' अशीच प्रतिक्रिया आली.
त्यांची मतं पशूंना अर्थातच तंतोतंत लागू होत आहेत. पण सुदैवाने (कोणाला दुर्दैवाने वाटेल) मानव पशू नाही. तो समाज निर्माण करतो. सर्वायवल ऑफ फिटेस्ट या निसर्गाच्या चाळणीला बर्‍यापैकी छेद देत त्याने सुसंकृत व्यवस्था निर्माण केली आहे. त्यात दुर्बलांना (आर्थिक, सामजिक, बौद्धिक, शारिरीक इ. इ.) मदत करण्याची व्यवस्था ही अंतर्भूत आहे. माझ्या माहितीत तरी संपूर्णपणे भांडवलशाही असा एकही देश अस्तित्वात नाही.

>>रतन टाटा बाजूला झाले तर मिस्त्री किंवा आणखी कुणी कंपनी सहज चालवेल, पण तिथले कामसू तरुणच गेले तर >> हसावं का रडावं? Biggrin
लेबर तुलनेने सहज मिळतं हो. त्यांच्या कडून काम करुन घ्यायला लागणार्‍या स्किलची वानवा असते. उद्या स्किल्ड लेबर नाही मिळालं तर उद्योगपती स्किल तयार करेल आणि ते ही शक्य नाही वाटलं तर तुमचा देश सोडून जाईल.

पैसा असला की काम करायला माणसं सहज मिळतात. ती आकर्षितच होतात. देशातली जनता वृद्ध झाली तर बाहेरच्या देशातुन माणसं मिळतात. मात्र अर्थव्यवस्था कमकुवत असली तर ढीगाने तरुण लोक असुन ढिम्म फरक पडू शकत नाही. पाश्चिमात्य देश आणि भारताचं चित्र डोळ्यापुढे आणा की लगेच दिसेल.

Submitted by अमितव on 30 November, 2020 - 10:45
>>

यात 'तरुण माणसांची संख्या ही नेहमी कुठं ना कुठं जास्तच राहणार' हे बिनबुडाचं तकलादू विधान गृहीत धरलेलं आहे. पण प्रत्यक्षात ट्रेंड्स वेगळंच सांगताहेत.

.
world_age_trends.PNG
.

Vilabh
हे वस्तू आणि सजीव ह्याच्या मध्ये फरक करत नाहीत.
वापरा आणि फेकून ध्या गरज संपली की असे विचार त्यांचे आहेत पण ते वस्तू साठी ठीक आहेत माणसं साठी नाही.
एका प्रश्न चे उत्तर ते एक सविस्तर देत नाहीत किंवा टाळतात .
योग्य स्किल असलेली तरुण पिढी निर्माण करण्यास भांडवल लागते ते भांडवल योग्य वेळी गुंतवले नाही तर शिक्षित पिढी निर्माण च होवू शकत नाही जी पिढी उद्याची इकॉनॉमी वाढवणार आहे.
एक डॉक्टर निर्माण करण्यासाठी फक्त त्या कोर्स साठी 1 करोड खर्च होतो.
मुलांना 25 वर्ष पर्यंत जेवण,कपडे,निवारा देण्यासाठी करोड तर नक्कीच खर्च होतात.
तेव्हा डॉक्टर समाजाला मिळतो.
मग हे 2 करोड गुंतवणूक करणाऱ्या लोकांनी सत्पात्री दान का करावे .
हा विचार नक्कीच येणार.
आपल्या देशात 20 ते 65 वर्ष वय असलेली 40 टक्के लोक आहेत .
आणि फक्त 5 टक्के 65 च्या पुढचे आहेत.
लोकसंख्या चा हा पॅटर्न पुढे 100 ते 200 वर्ष तरी जास्त बदलणार नाही.

The Problem of an Aging Global Population

The impact of an ageing population on the economy

थोडक्यात देशांना याची विचारपूर्वक तयारी करावी लागत आहे / लागेल असं दिसतंय.

भारतात सोशल सिक्युरिटी नाही आणि इन्फलेशन जास्त आहे. ८५ ते ९० पर्यंत जगायचं म्हणजे निवृत्ती नंतर २७ ते ३२ वर्षे इन्फ्लेशन बीट करू शकेल एवढी बचत ५८ व्या वर्षी करून ठेवणे सामान्यांना शक्य आहे का? त्यांना अपत्यांचा आधार लागेल. आपल्याकडे तसा कायदाही आहे त्याचा लाभ घ्यावा लोकांनी.

केवळ आहे व्यक्तीस्वातंत्र्य म्हणून अशी डिस्क्रीमिनेशन करणारी किंवा टोन-डेफ मते मांडू नयेत ही विनंती आहे ..... असल्या मतात सनसनाटी काही नाही.

(आता ह्या पोस्टीवरून उगाच कुणी फालतूच मला पर्सनलाईज्ड प्रश्न "तुमच्या आयुष्यात कोण अशी वृद्ध व्यक्ती आहे... याडा याडा" विचारू नका..डिस्क्रीमिनेशन काय असतं ते ओळखायला शिकवणारे वृद्ध आहेत माझ्या आयुष्यात आणि मी त्यांची रूणाईत आहे!!! )

Pages