भारतात ज्येष्ठ नागरिकांना खरंच आदर मिळतो का?

Submitted by mrunali.samad on 26 November, 2020 - 09:20

भारतात या घडीला ज्येष्ठ नागरिकांना खरंच आदर मिळतो का? त्यांचे जीवन रिटायरमेंटनंतर कसे असते?
भारतात रिटायरमेंट वय 55 आहे. तेच बाकी देशांमधे 65 आहे.
जपानमध्ये ज्येष्ठ नागरिकांना खूप रिस्पेक्ट आहे.
अमेरिकेत रिटायरमेंटनंतर सरकारतर्फे मेडिकल सपोर्ट आहे. भारतात सरकारतर्फे शुन्य सपोर्ट आहे. जर ज्येष्ठ नागरिकांनी काही सेवींग्ज केले असतील तर काही वर्षे तेच जपून वापरावे लागतात नाहीतर मग त्यांना आर्थिकदृष्ट्या मुलांवर अवलंबून राहावे लागते.
आजच्या पिढीत 75% कुंटुंब ,बर्याच कारणांमुळे ज्येष्ठ पेरेंट्ससोबत राहत नाहीयेत.खुपशा कुंटुंबात मुले आपल्या आजी आजोबांना वर्षातून एक-दोनदा भेटतात.यातून मुले काय शिकतील आणि भविष्यात त्यांची वागणूक कशी असेल जेव्हा आपण म्हातारे होऊ?
आमच्या ओळखीत एका काकांच्या रिटायरमेंटनंतर पीएफ चा पैसा त्यांच्या मुलांनी गोड बोलून, आम्ही तुम्हाला सांभाळू असा विश्वास देऊन ,सगळा पैसा घेऊन दोन-तीन वर्षांत खर्चही करून टाकला आणि आता अशी परिस्थिती आहे कि त्यांना सांभाळणारे कुणी नाहीये.ते एकटे राहताएत आणि आर्थिक अडचणीत आहेत.
मला असे वाटते कि आजच्या वर्किंग जनरेशने भविष्यातील आर्थिक तरतुदी आजच करून ठेवायला हव्यात जेणेकरून कुणावर अवलंबून राहायची वेळ येवू नये.
या विषयावर चर्चा करून तुमचे मतं जाणून घ्यायला आवडेल..

Group content visibility: 
Use group defaults

भारतात ज्येष्ठ नागरिकांना खरंच आदर मिळतो का? >> आदर देणे म्हणजे नुसते पोसणे नाही.
खरतर या प्रश्नाचे कुटुंब व समाज असे दोन भाग पडतील.

कुटुंबाबाबत बोलायचे झाले तर सधन घरातही जेष्ठ नागरीकांना सन्मानाने वागवले जाते का हा प्रश्न पाहिला पाहिजे. त्यामुळे हा प्रश्न असेल तर त्याचा ऐपतीशी संबंध नाही, तर मानसिकतेशी आहे. ज्या घरात जेष्ठ नागरीकांना पैसे मिळवत नाहीत म्हणून अनादर पूर्वक वागवले जाते त्या घरात माझी खात्री आहे की न कमावणार्‍या आणि नुसते आयते बसून खाणार्‍या तरूण व्यक्तिसही तसेच वागवले जाईल. पण माझ्यामते सर्वसाधारणपणे भारतात जेष्ठ नागरीकांना सन्मानपूर्वकच वागवले जाते. परिस्थितीनुसार त्यांना उपलब्ध होणार्‍या सुविधा, आहार बदलत असेल पण केवळ जेष्ठ नागरीक म्हणून त्यात भेदभाव होत नसावा. यात "सर्वसाधारणपणे" हा शब्द महत्वाचा आहे. कधी कधी आपण वेगळी उदाहरणे बघतो. पण तीही आपल्याला खटकतात. म्हणजे ते चुकिचे आहे याची आपल्याला जाणीव असते.

समाजातील वागणुकीमधे आर्थिक ऐपतीचा प्रश्न नसतो. समाजामधे वयस्कर व्यक्तिंना कशी वागणूक मिळते. बस मधे, रेल्वेमधे, सामाजीक समारंभात, बँकेमधे व अशा इतर अनोळखी ठिकाणी, सार्वजनीक ठिकाणी. माझ्यामते समाजात सुद्धा जेष्ठ नागरीकांना भारताततरी "सर्वसाधारणपणे" आदराने वागवले जाते. उदाहरणच द्यायचे झाले तर एखादे आजी आजोबा बस मधे उभ राहून प्रवास करत असतील तर बसमधे बसलेल्या निम्म्या लोकांना तरी अपराधी वाटेल. त्यातील काही आपली जागा ऑफर करतील. रस्त्यामधे पायरी चढायला कठीण वाटत असेल तर पटकन हात देतील. पडले तर उठवतील . अगदी भांडण झाले तरी सर्वसामान्यपणे ओरडून बोलणार नाहीत. तर समाजाची मानसिकता जेष्ठ नागरीकांबद्दल सर्वसाधारणपणे सहानुभुतीपूर्वक आदराची असतेच.
अर्थात प्रत्येक गोष्टीला अपवाद असतातच. वर्तमानपत्रातही आपण या अपवादांची उदाहरणे दररोज वाचतो. पण ते अपवाद असतात म्हणूनच त्यांच्या बातम्या होतात.

सरकारने सुद्धा जेष्ठ नागरीकांसाठी कायदे केले आहेत. ते आपल्याला चुकिचे वाटत नाहीत. हे या समाजाच्या दृष्टीकोनाचेच प्रतिक आहे.

विलभ, तुमचे म्हणणे काही पटले नाही.

व्यक्ती कडे परफॉर्मिंग आणि नॉन परफॉर्मिंग म्हणून बघणे हे निओलिबरल विचार पटले नाहीत. भांडवलशाहीमध्ये सुद्धा एकट्या व्यक्तीवर, एकट्या व्यक्तीच्या जीवनावर, त्याच्या आशा आकांक्षांवर भर असतो, अस लोकांचे वर्गीकरण क्लास मध्ये करून त्यांना उपयोगी निरुपयोगी म्हणलं जात नाही. व्यक्तीने जन्मभर कष्ट करून त्याच्या पुंजीवर जगणे, ह्यात नॉन परफॉर्मिंगचा भाग नाही. जन्मभर केलेले काम बऱ्याचदा ह्या रितायरमेंटसाठीच केले असते. आपल्या साठवलेल्या पुंजीवर त्यांचा हक्क असतोच.

बाकी पेन्शनचा भार कोणीही उचलत नाही. हे पेन्शन त्यांनी कमावलेला असते. त्यांचे पेन्शन हे नोकरी देताना ठरले असते. तुम्ही पेन्शनचा अकौंटींग बघितले तरी लक्षात येईल की पेन्शन हे पगार कमी करून साचलेले असते, पण दिसताना उगाच पगाराच्या वरकड मिळालेले सत्पात्री दान असे वाटते. तसे ते नसते.

आदर आणि मेडिकल सपोर्ट, आर्धिक दृष्ट्या समर्थ असणं या वेगवे गळ्या गोष्टी आहेत.

लेखाच्या विषयाशी शीर्षकाचा संबंध नाही. शीर्षक क्लिकबेट आहे.

<भारतात रिटायरमेंट वय 55 आहे. तेच बाकी देशांमधे 65 आहे.> अगदी सरधोपट विधान. भारतात ५७- ५८ -६० अशीही वयं आहेत. बाकी सगळ्या देशांमध्ये ६५ आहे का?

<आजच्या पिढीत 75% कुंटुंब ,बर्याच कारणांमुळे ज्येष्ठ पेरेंट्ससोबत राहत नाहीयेत.> आकडेवारी लिहिताना आधार द्यावा.

वृद्धपणी आर्थिक स्वावलंबन या विषयावर मायबोलीवरच अनेकवार लिहिलं गेलं आहे. अर्थात नव्या पिढी ने आधीचं वाचलं पाहिजे असा आग्रह धरण्यात अर्थ नसावा.

आपल्यास दिलेल्या आदराचे त्रिकोणी काप करून, त्यात अनुभव रुपी तिखट, प्रेम रुपी मीठ, आशीर्वाद रुपी तेल, उपदेश रुपी मोहरी, मार्गदर्शन रुपी मसाले घालुन लोणचे घाला आणि तरुणांना द्या. Wink

आणि हो... इतर कैरी-बिरीच्या लोणच्यासारखं फक्त चमचाभरच आदराचे लोणचे तरूणांना वाढा बरं... Wink नायतर कराल बरणीभर उपडं...

युरोप, अमेरिकेच्या तुलनेत भारतात अपत्यांंकडुन पालकांची म्हातारपाणी घेतल्या जाणाऱ्या जबाबदारीचे प्रमाण जास्त असेल असे वाटते. हे नुसतं एक फिलिंग आहे याला कसलाही सांख्यिकी आधार नाही. चूकीचे असु शकते. कुणाला याबद्दल माहिती असल्यास सांगावे.
पण हे प्रमाण कमी होत जाणार, झपाट्याने. आपण ते गृहीत धरू नये.

समाजात वावरताना इतरांना सन्मानाने वागवण्याबाबत आपण बरेच कमी पडतो, मग लहान मुलं असो की ज्येना. सन्मान सगळ्यांच्याच बाबतीत वाढवायला स्कोप आहे.

"वृद्धपणी आर्थिक स्वावलंबन" हा शब्दप्रयोग आवडला. त्यासाठीचे आर्थिक नियोजन जमेल तेवढ्या लौकर सुरू करणे, निवृत्ती नंतर आपापल्या फिल्ड, स्किल्स प्रमाणे काय इन्कम सोर्स असु शकतील याचा विचार करणे, तो शक्य असल्यास निवृत्तीपूर्वीच डेव्हलप करणे.

जास्त वय झालं की / काही तसे आजार जडले तर घरातील कामं होणार नाहीत, वृद्धाश्रमात जाण्याचा ऑप्शन खुला ठेवणे, त्यासाठीचे आर्थिक नियोजन करणे.

त्याबदल्यात पेन्शन देणार्याला त्याचा डायरेक्ट इन्डायरेक्ट काहीच फायदा नसतो. अर्थशास्त्रात यालाच नॉन परफॉर्मिंग ऍसेट/ अनुत्पादकता असं म्हणतात. >> सरकारी नोकरी व्यतिरिक्त अन्य क्षेत्रात पेन्शन मिळते का? आतातर २००५ नंतर लागलेल्या सरकारी कर्मचाऱ्यांनाही पेन्शन योजना लागू नाही.
आणि मिळणाऱ्या पेन्शनमधुन जर पेन्शनर दैनंदिन गरजेपोटी म्हणा की अन्य कारणास्तव जी खरेदी, सेवा घेतात त्यावर त्यांना जीएसटी सेवाकर इ.भरावाच लागतो ना की सवलत मिळते?

युरोप, अमेरिकेच्या तुलनेत भारतात अपत्यांंकडुन पालकांची म्हातारपाणी घेतल्या जाणाऱ्या जबाबदारीचे प्रमाण जास्त असेल असे वाटते. हे नुसतं एक फिलिंग आहे याला कसलाही सांख्यिकी आधार नाही>>>>

ही जबाबदारी कित्येक वेळा नाईलाज म्हणून घेतली जाते. अजूनही ग्रामीण भागात लोकसंख्या जास्त आहे आणि तिथे आईवडील व मुले एकत्र राहतात, जबाबदारी घेतली जाते ती सामाजिक बंधनांमुळे.

आदर,आर्थिक स्वावलंबन हे ज्ये.ना.साठी इंटरलिंक्ड आहे..
रिटायरमेंटनंतर पैसा असेल तरच समाजाकडून, कुटुंबाकडून त्यांना रिसपेक्ट मिळतो..
वरील एका कमेंट नुसार ज्ये.ना. NPA आहेत असे जर आजची पिढी समजत असेल तर पुढची पिढी काय शिकणार यातून?आपण NPA बनल्यावर पुढच्या पिढीची विचारसरणी आणि वागणूक कशी असणार? म्हणजेच वी हैव टु बी रेडी फॉर इट.

जबाबदारी घेतली जाते ती सामाजिक बंधनांमुळे. >>> कित्येक लग्नेही सुरवातीचे काही वर्षे सोडली की पुढे सामाजिक बंधनांंमुळे सुरू रहातात.

रिटायरमेंटनंतर पैसा असेल तरच समाजाकडून, कुटुंबाकडून त्यांना रिसपेक्ट मिळतो..>>>>

असे अजिबात नाही.

कित्येक वृद्ध अनुभवाने येणारे शहाणपण वापरून पुढच्या पिढीला 'आवश्यक तिथे व तेवढेच' मार्गदर्शन करतात. कित्येक घरात आजी आजोबा नातवंडांच्या जास्त जवळ असतात, नातवंडे त्यांच्याशी मनातले बोलतात..

पण त्याचवेळी कित्येक ज्ये ना त्यांच्या रोलमधून बाहेर पडतच नसल्याचे बघितले आहे. मुलांसाठी रांधा वाढा, जागत बसा करणारी आई सून आल्यावरही हे सुरूच ठेवते, सुनेला तिची स्पेस देत नाही. स्वतः सून होती तेव्हा सासूला नावे ठेवणारी बाई स्वतः सासू झाल्यावर तशीच वागते. रिटायर झालेले पुरुषही घरात ढवळाढवळ करत बसतात.

यामुळे घरातील वातावरण बिघडते, तरुण पिढीच्या मनातून आधीची पिढी पार उतरते आणि केवळ सामाजिक बंधनांमुळे घरे एकत्र नांदतात. शहरात निदान जागा पुरत नाही हे निमित्त करून नवी पिढी वेगळी चूल मांडून रोजच्या कटकटीतून सुटका करून घेते पण गावी हे शक्य होत नाही. हीच सून परत सासू बनते तेव्हा हीच स्टोरी रिपीट.

आपल्या समाजाला अध्यात्माचा इतका वारसा आहे, शहरात/गावात मंदिरांमध्ये सोहळे होतात, प्रवचने ठेवली जातात. सुखी व समाधानी जीवन जगण्यासाठी काय करावे याच्या पोथ्या संतांनी आपल्या अभंगातून लिहून ठेवलेल्या आहेत. हे सगळे मनोभावे करणारे / वाचणारे ज्ये ना प्रत्यक्षात यातली एकही ओळ आचरणात आणत नाहीत. वृत्तीची निवृत्ती साधून सगळ्यांनाच समाधानी ठेवण्याचा मार्ग अनुसरत नाहीत याचे वाईट वाटते. आपल्याकडे लोकांच्या थियऱ्या तोंडपाठ आहेत पण अप्लिकेशन शून्य Happy Happy

थोडी लवचिकता दाखवली तर ज्ये ना आदर मिळवून आरामात राहू शकतात पण त्यांची ताठरता कमी होत नाही. एकूणच सारासार विचारांचा पूर्ण अभाव हा मोठा प्रश्न आहे.

खरं तर ज्ये ना नी कसं वागावं याबद्दलही 2 प्रवाह आहेत.सर्व सून मुलांच्या मनाप्रमाणे करू देणाऱ्या, 'तू ठरव, तुमच्या मनाप्रमाणे करा' म्हणणाऱ्या सासुबद्दल मागे 'आमच्या आईंना ना कसली हौसच नाही, कश्यातलं काही माहिती नाही, पुढे होऊन काही करायला नको.सर्व मलाच ठरवावं लागतं' म्हणतात.जवळपास पाहिलं आहे.अर्थात हे बोलणारा आणि समोरचा ऐकणारा यांच्या वेव्हलेंथ वर आहे.
ढवळाढवळ करणारी आणि शिव्या खाणारी उदाहरणे 80% असतील तर न्यूट्रल राहून शिव्या खाणारी 20% आहेत.
सून जावई सासू सासरे ही नाती इतर नात्यांपेक्षा किमान 26 वर्षे उशिरा चालू झाल्याने थोडा फार रेझिस्टन्स नॉर्मल आहे.

ज्ये ना झालो म्हणजे सगळे संपले, आता परमार्थ करून वर जायची वाट बघा असे अजिबात नाही, नसावे. परदेशात वयाच्या सत्तरीत नवे जोडीदार शोधणारे, नव्या वाटा धुंडाळणारे लोक आहेत असे कित्येकदा वाचायला मिळते. हे लोक असे असतात याचे कारण ते कुठल्याही एका जागी अडकून पडत नाहीत हे असावे असे मला वाटते. ती फेज जगून झाली, तो रोल संपला की बाजू व्हा, नवे रोल शोधा. पण आपल्याकडे असे होत नाही. प्रेमळ आईच्या रोलमधून, सोल ब्रेडविनरच्या रोलमधून बाबा बाहेर पडत नाहीत. आपली मुले आता आपल्या रोलमध्ये यायला उत्सुक आहेत हे त्यांच्या गावीही नसते, कळले तरी दुर्लक्ष. त्यामुळे पुढच्या पिढीची घुसमट. पुढची पिढी जे करू पाहते ते यांना पटत नाही म्हणून यांची घुसमट.

@ मूळ पोस्ट ---
सार्‍या वाक्यात / मुद्द्यात ज्येष्ठ नागरिकांचा उल्लेख आहे पण या मुद्द्यांचा आणि आदराचा काय संबंध ते नाही कळले. प्रत्येक मुद्दा वेगळा आहे. भेळेसारखे एकत्र झालेत फक्त. प्रतिसादही तसाच होतोय, माफ करा.

कोणाकडून आदर अपेक्षित आहे ? मुले - नातवंडे, नातेवाईक, शेजारी, समाजातले अनोळखी लोक, सरकार?
का द्यावा आदर यांनी? साठी उलटली, केस पिकले, रिटायर झालो की आदराचे हप्ते बाय डिफॉल्ट सुरू व्हायलाच हवेत? काय गुडविल आपले?

आदर, प्रेम ही प्रत्येकाने प्रत्येकाला आवर्जून द्यायची गोष्ट आहे, आयुष्यभर, विनाअट. होतं का तसं?

श्री रतन टाटा आहेत की या सर्वात न बसणारे.... अजूनही काहीजण असतील वेगवेगळ्या सामाजिक स्तरातले.
धनाढ्य असूनही कोणालाही कणभर आदर नाही असे नमुने आहेत आणि जवळ काहीही नसूनही फक्त त्यांचे नाव घेतल्यावर जगाचे मस्तक झुकावे असेही आहेत.

आदर आणि प्रेम हे कमवावे लागेल स्वतःच्या आयुष्यभराच्या वागण्यातून.
स्वतः आधीच्या पिढीशी, भावंडांशी आणि नवरे/बायका-मुलांशीही अरेरावीने वागलेल्यांनी ज्येना झाल्यावर काय परतफेडीची अपेक्षा करावी?

या गोष्टी व्यक्ती आणि कुटुंब सापेक्ष असतात. एखाद्याने आपल्या पालकांचे खूप केले म्हणून त्यांची मुले तेच करतील असे नाही. शक्यता आहे, खात्री नाही. कदाचित करतील कदाचित नाही. पेरलेले उगवते, न पेरलेलेही उगवते आणि पेरलेले वायाही जाते.

तेव्हा, अपेक्षा ठेवा एकवेळ पण विसंबून राहू नये / जबरदस्ती करू नये. जर आपले आपण करायची वेळ आली तर मानसिक + आर्थिक तयारी हवीच. ती पुरेशी आधीपासून करावी हे बरे.

तुमच्या उदाहरणातील काकांनी चूक केली. व्यवहार आणि भावनांची गल्लत केली, अशा लोकांसाठी ज्यांना त्यांच्या भावनांची कदर नव्हती. पुढ्यातले ताट द्यावे, बसायचा पाट देऊ नये हे आपले जुने शहाणपण आहे. आदरापोटी, तुम्ही त्यांना कायदा आणि पोलिसांच्या मदतीने न्याय मिळवून देऊ शकता. करा आणि कळवा इथे, पुढे काय झाले.

देश-विदेश ज्येष्ठ नागरिक सिनॅरिओतून काय सुचवायचे आहे?
जपानमध्ये ज्येष्ठ नागरिकांना खूप रिस्पेक्ट आहे. --- म्हणजे नेमके काय आहे / नाही?
आपल्याकडेही दगडात, झाडात देव आणि कुमारिकेत / स्त्रीत देवी वगैरे असते. पैरी पौना, माथा पल्लू, मांजी सुन लेंगी इत्यादि? .... आहे की रिस्पेक्ट इथेपण.
जिथे सरकारं वृद्धांना सपोर्ट करतात, तिथे कामकाजी माणसं त्यांच्या उत्पन्नाचा हिस्सा सरकारजमा करतात स्वतःच्या म्हातारपणासाठी / त्या फंडसाठी. त्यातून होते सगळे. कोणी वेगळ्या नोटा छापत नाही ६०+ लोकांकरता.

आणि असेलच भारत इतका गयागुजरा तर इच्छुक आजी / भावी ज्येनांनी नीट अभ्यास करून जगातील वृद्धांचे नंदनवन शोधावे आणि तिकडे जावे वाटल्यास. गेल्यावर कळेल काय आहे ते.

म्हणणे मांडा, फिलॉसॉफी सांगा, निरीक्षणे नोंदवा --- जरूर, स्वागत आहे. पण सुसंगत, मुद्देसूद, विचारपूर्वक असेल तर त्यातून काही निष्पन्न होईल. आता जे काही आहे त्यात तुम्हाला काय म्हणायचेय आणि लोकांनी काय चर्चा करणे अपेक्षित आहे कळत नाही.

आपण NPA बनल्यावर पुढच्या पिढीची विचारसरणी आणि वागणूक कशी असणार? म्हणजेच वी हैव टु बी रेडी फॉर इट.

Submitted by mrunali.samad>> everyone should be ready for it.
1. आपल्या भविष्यासाठी आपणच आर्थिक तरतूद करायची.
2. जिवंतपणी कोणतीही स्थावर/ जंगम मालमत्ता मुलांच्या नावे करायची नाही.

आता या विषयावर लिहिण्यासाठी मला स्वानुभव नाही, पण खालील मुद्दे मांडतो.

१. मुळात ज्येष्ठ कुणाला म्हणावे? कारण फक्त रिटायर्ड लोकांना ज्येष्ठ म्हणता येणार नाही तर यात व्यावसायिक लोकांचाही विचार व्हावा. आणि हेसुद्धा वय स्पेसिफिक नाही. काही लोक वयाच्या पन्नाशीत स्वेच्छारिटायर होऊन मोकळे होतात, तर काही ६० - ६२ पर्यंत एक्सटेन्शन घेत असतात.
२. आदराची व्याख्या काय हे आधी स्पष्ट व्हायला हवं. घरातली एक वडीलधारी व्यक्ती म्हणून त्यांची योग्य काळजी, विचारपूस / भावनिक जवळीक इथपर्यंत ठीक. सतत 'जी बाबूजी' करणं, घरातील सर्व निर्णय त्यांना विचारूनच घेणं, आणि बाहेरच्या प्रत्येक माणसाकडून ही अपेक्षा करणं चूकच.
३. घरातल्याना वेळ देणं, आणि घरातल्यांचा वेळ खाणं, या दोन्ही गोष्टीतला फरक समजून घ्यावा. घरातल्याना मदत करणं, आणि घरातल्या कामात ढवळाढवळ करणं, यातलाही फरक समजून घेतला, तर आयुष्य सुखी होईल.
४. सत्तेच किंवा निर्णयप्रक्रियेचं विकेंद्रीकरण वेळीच जमायला हवं. नाहीतर घरात असंतोष वाढू शकतो.
५. जर दोन अपत्ये असतील, आणि आपण ज्याच्या घरी राहतो, त्याच्यासमोर दुसऱ्याचं कौतुक करणं टाळावं. (हे कदाचित क्षुल्लक वाटेल.)
६. आणि वेळीच थांबणं जमायला हवं. आपल्या संपत्तीची विल्हेवाट लावायची नसून, योग्य तजवीज करायची असते हे ध्यानात यायला हवं.

असो, आता थांबतो.
आंतरराष्ट्रीय स्तरावर ज्येष्ठांची परिस्थिती हा मोठा मुद्दा आहे. त्यावर आता बोलणं योग्य होणार नाही.
एक चांगला विषय तुम्ही मांडलात मृणाली. साधकबाधक चर्चेची अपेक्षा!!!

कोणाकडून आदर अपेक्षित आहे ? मुले - नातवंडे, नातेवाईक, शेजारी, समाजातले अनोळखी लोक, सरकार?>>>>>>>>>>>>>
सगळ्यांकडून अपेक्षित.समाज म्हटले कि हे सगळे घटक आलेच.

आदरापोटी, तुम्ही त्यांना कायदा आणि पोलिसांच्या मदतीने न्याय मिळवून देऊ शकता. करा आणि कळवा इथे, पुढे काय झाले.>>>>>>>>>>
बहुतांश ज्ये.ना.आपल्याच मुलाच्या विरोधात कायद्याचा आधार घेत नाहीत जरी असे फसवले गेले असले तरी..पेरेंटस नेहमीच मुलांच्या चुका क्षमा करतात..

आपल्याकडेही दगडात, झाडात देव आणि कुमारिकेत / स्त्रीत देवी वगैरे असते. .... आहे की रिस्पेक्ट इथेपण.>>>>>>>>>>
हा रिस्पेक्ट आहे कि अंधश्रद्धा?

चर्चेचा उद्देश हा आहे आज ज्ये.ना.ची काय परिस्थिती आहे?
समाजात,नातेवाईकात, मुलांकडून त्यांना कशी वागणूक मिळते,ते कमवते असोत वा नसोत.
यावर उद्याची पिढी कोणत्या विचारसरणीत वाढतीए आणि आजचे तरुण जनरेशन, भावी ज्ये.ना. यांना एकूणच कशा परिस्थितीला सामोरं जावे लागेल? भावनिकद्रुष्ट्या आणि आर्थिकदृष्ट्या सुध्दा.
त्यासाठी आजपासून काय तरतुदी करून ठेवल्या पाहिजेत?

साधना प्रतिसाद आवडले>>>>

मी फक्त प्रतिसादच देऊ शकते. Sad

घरी व आजूबाजूला नात्यात सध्या 7 ज्ये ना आहेत त्यापैकी 4 सत्तरीतली भावंडे आहेत. तरी त्यांचे पटत नाही Happy मला यांचे रडगाणे ऐकावे लागायचे, मी कंटाळून उलट सल्ले द्यायला लागले म्हणून माझ्याकडे रडगाणे गाणे बंद झाले, गुपचूप कुचुकूचू चालते. अधूनमधून यांच्या मुलांचे रडगाणे ऐकावे लागते, मीही कधीकधी माझे रडगाणे त्यात घुसडून देते. ज्ये ना खरेच अशक्य आहेत.. Lol

खरे तर हा प्रश्न तात्पुरता आहे.
आत्ता चा विचार केला तर आता ची स्थिती 40 वर्ष च्या बिल्डिंग मध्ये राहणाऱ्या लोकं सारखी आहे .
बिल्डिंग पडली तर घर राहील का ह्याचे कन्फर्म उत्तर नाही .
बिल्डर येईल आणि नवीन बिल्डिंग बांधून फुकट घर देईल अशी आशा ठेवून आहेत.
पुढील काही वर्षातच ज्येष्ठ नागरिक अस्तित्वात असेल असे वाटत नाही.
30 ते 40 वर्षात च ब्लड प्रेशर पासून अनेक रोग लागत आहेत ती पिढी 60 वर्ष पूर्ण करू शकणार नाहीत.
आता जे ज्येष्ठ आहेत त्यांची व्यवस्था कशी असेल ते त्या संबंधित कुटुंब शी च संबंधित आहे.
अजुन खुप सारी कुटुंब ज्येष्ठ लोकांची काळजी घेतात.
Mulach नको,कुटुंब च नको,व्यसन आणि aarbat charbat आहार हवा ह्या मुळे असे पण पुनरुत्पादन होणे मुश्किल आहे .
आणि ही नैसर्गिक भावना च आहे काळ नुसार निर्माण झालेली आहे.
येथून पुढे कोणतेच संशोधन मानव हितासाठी नक्कीच असणार नाही तर फक्त पैसे मिळवण्यासाठी साठीच असेल.
त्याची तुलना करायची झाली तर.
बिल्डर येईल आणि माझी 40 वर्षाची बिल्डिंग तोडून फुकट नवीन घर देईल ही भावना .
आणि
.
संशोधन होवून नव नवीन औषध निघतील आणि मी 50 वर्ष काय 210 वर्ष जगेन ही आशा.
दोन्ही एकच आहेत.

मला तर कधी कधी असही दिसत की आदरास पात्र नसणार्‍या व्यक्तीस सुद्धा केवळ वयाच्या ज्येष्ठत्वामुळे आदर मिळतो. सर्व ज्येष्ठ हे एका प्रकारात मोडत नाहीत. केवळ वयाने ज्येष्ठ एवढेच साम्य असत त्यांच्यात. वय वाढल्याने येणार्‍या शारिरिक व मानसिक समस्यांमुळे त्याच्या व्यक्तिमत्वात बदल होत असतो.त्या बदलामुळे इतरांकडून मिळणार्‍या आदरात फरक पडू शकतो. तुमचे संबंधिताला उपयुक्तता मूल्य किती यावर तुम्हाला मिळणार आदर ठरतो.

आदर आणि प्रेम हे कमवावे लागेल स्वतःच्या आयुष्यभराच्या वागण्यातून.
स्वतः आधीच्या पिढीशी, भावंडांशी आणि नवरे/बायका-मुलांशीही अरेरावीने वागलेल्यांनी ज्येना झाल्यावर काय परतफेडीची अपेक्षा करावी?>>>>>>>अगदी योग्य मुद्दा. कधी कधी आपल्याला दुसरी बाजू माहित नसते.

Pages