भारतात ज्येष्ठ नागरिकांना खरंच आदर मिळतो का?

Submitted by mrunali.samad on 26 November, 2020 - 09:20

भारतात या घडीला ज्येष्ठ नागरिकांना खरंच आदर मिळतो का? त्यांचे जीवन रिटायरमेंटनंतर कसे असते?
भारतात रिटायरमेंट वय 55 आहे. तेच बाकी देशांमधे 65 आहे.
जपानमध्ये ज्येष्ठ नागरिकांना खूप रिस्पेक्ट आहे.
अमेरिकेत रिटायरमेंटनंतर सरकारतर्फे मेडिकल सपोर्ट आहे. भारतात सरकारतर्फे शुन्य सपोर्ट आहे. जर ज्येष्ठ नागरिकांनी काही सेवींग्ज केले असतील तर काही वर्षे तेच जपून वापरावे लागतात नाहीतर मग त्यांना आर्थिकदृष्ट्या मुलांवर अवलंबून राहावे लागते.
आजच्या पिढीत 75% कुंटुंब ,बर्याच कारणांमुळे ज्येष्ठ पेरेंट्ससोबत राहत नाहीयेत.खुपशा कुंटुंबात मुले आपल्या आजी आजोबांना वर्षातून एक-दोनदा भेटतात.यातून मुले काय शिकतील आणि भविष्यात त्यांची वागणूक कशी असेल जेव्हा आपण म्हातारे होऊ?
आमच्या ओळखीत एका काकांच्या रिटायरमेंटनंतर पीएफ चा पैसा त्यांच्या मुलांनी गोड बोलून, आम्ही तुम्हाला सांभाळू असा विश्वास देऊन ,सगळा पैसा घेऊन दोन-तीन वर्षांत खर्चही करून टाकला आणि आता अशी परिस्थिती आहे कि त्यांना सांभाळणारे कुणी नाहीये.ते एकटे राहताएत आणि आर्थिक अडचणीत आहेत.
मला असे वाटते कि आजच्या वर्किंग जनरेशने भविष्यातील आर्थिक तरतुदी आजच करून ठेवायला हव्यात जेणेकरून कुणावर अवलंबून राहायची वेळ येवू नये.
या विषयावर चर्चा करून तुमचे मतं जाणून घ्यायला आवडेल..

Group content visibility: 
Use group defaults

लेबर तुलनेने सहज मिळतं हो. त्यांच्या कडून काम करुन घ्यायला लागणार्‍या स्किलची वानवा असते. उद्या स्किल्ड लेबर नाही मिळालं तर उद्योगपती स्किल तयार करेल आणि ते ही शक्य नाही वाटलं तर तुमचा देश सोडून जाईल.

नवीन Submitted by अमितव on 30 November, 2020 - 11:10
>>

ते आत्ता मिळतंय हो. उगाच जपान्यांसारखं नाय बाहेरचे मागवावे लागतात. तेही त्यांना बाहेर मिळाले म्हणून ठीक, जर सगळीकडेच कमी झाले तेव्हा हसणार की रडणार?

तरुण लोकांची संख्या वाढावी असे वाटत असेल तर लवकर मुल होणे गरजेचे आहे .
20 वर्ष वय असतानाच मुल जन्माला घातले पाहिजे हा फक्त एकमेव उपाय आहे तो कायमस्वरूपी उपाय आहे.
65 वर्ष वर वय असेल त्यांना ठार केले आणि देशात एक पण व्यक्ती अस्तिवात ठेवली नाही तर तरुण लोकांची संख्या फक्त एकच पिढी वाढल्या सारखी वाटेल .
पुढल्या पिढीत अजुन गंभीर स्थिती निर्माण होईल.
वारस कोण असेल हे वेगळ्या पद्धती नी ठरवावे लागेल.मुल च का वारस असावीत ?
हा प्रश्न उपस्थिती नक्कीच होईल.
65 वर्ष वयाच्या व्यक्ती ला ठार केल्या नंतर त्याची सर्व मालमत्ता सरकार जमा करावी .मुलांना त्या.वर हक्क सांगण्याचा काहीच हक्क नसेल.
Ekadhya व्यक्ती नी उद्योग उभा केला तर त्या उद्योग ची मालकी वारसा हक्क नी मुलांना देता येणार नाही त्या मुलाला परत पहिल्या पासून संपत्ती निर्माण करणे अपेक्षित आहे.
असे समतोल व्यवहार होवू शकतो.

उगाच जपान्यांसारखं नाय बाहेरचे मागवावे लागतात. तेही त्यांना बाहेर मिळाले म्हणून ठीक, >> एक्झॅक्टली! अर्थव्यवस्था खेळती असली की लेबर मिळतंच मिळतं आणि खिळखिळी असली की लेबर मिळुनही चाकं फिरता फिरत नाहीत.
यास्तव कुंभार हो बेमट्या, गाढवांना तोटा नाही. Happy

वृध्द lokana काय विशेष सवलत मिळते?
कोणत्या गोष्टी फुकट मिळतात?
त्यांचा काय बोजा समाज नाही तर सरकार उचलते?
त्यांना काहीच फुकट मिळत नाही.
ते कोणावर च बोजा नाहीत.
उगाच.भ्रम निर्माण करू नका की working population वृध्द लोकांचा बोजा उचलते ते.
मग कोणता बोजा उचलते ते पण सांगा.

@ विलभ,
वयानुसार शारीरीक क्षमता मंदावते हे कोण अमान्य करत आहे.
पण वय हेच एक कारण नसते शारीरीक क्षमता मंदावण्याचे वा नसण्याचे.
त्यामुळे वयाचा निकष न लावता थेट शारीरीक आणि बौद्धीक क्षमताच जोखा असे मी म्हणतोय.

बरं मला सांगा,
स्त्री पुरुष यांच्या शारीरीक क्षमतेमध्ये फरक असतो की नाही?
खरे उत्तर द्या. डिप्लोमॅटीक नको Happy

ऋन्मेऽऽष तुमच्या धाग्याची लिंक द्या, म्हणजे ज्यांना स्त्री पुरुष रवंथ करायचा असेल ते तिकडे करतील आणि तुम्हाला बोनस ट्यार्पी ही मिळेल. तुमच्या धुण्यातला चिखल इथे साफ करायला हा सार्वजनिक नळ आहे का?

वापरा आणि फेकून ध्या गरज संपली की असे विचार त्यांचे आहेत पण ते वस्तू साठी ठीक आहेत माणसं साठी नाही.

नवीन Submitted by Hemant 33 on 30 November, 2020 - 11:27
>>
तुम्हाला आम्हाला लाख भावना असतील हो, अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने तुम्ही फक्त रिसोर्स आहात, बाकी काही नाही. निसर्गासाठीही तुम्ही एक प्राणीच आहात उगाच वाढीव मेंदू मिळाला म्हणून तो डिस्काउंट नाही देणार.

उगाच वाढीव मेंदू मिळाला म्हणून तो डिस्काउंट नाही देणार. >> ऑ??? मेंदू वापरला की मिळतो बाबा डिस्काउंट!

योग्य स्किल असलेली तरुण पिढी निर्माण करण्यास भांडवल लागते ते भांडवल योग्य वेळी गुंतवले नाही तर शिक्षित पिढी निर्माण च होवू शकत नाही जी पिढी उद्याची इकॉनॉमी वाढवणार आहे.
एक डॉक्टर निर्माण करण्यासाठी फक्त त्या कोर्स साठी 1 करोड खर्च होतो.
मुलांना 25 वर्ष पर्यंत जेवण,कपडे,निवारा देण्यासाठी करोड तर नक्कीच खर्च होतात.
तेव्हा डॉक्टर समाजाला मिळतो.

नवीन Submitted by Hemant 33 on 30 November, 2020
>>

हे जे आकडे तुम्ही दिलेत त्या फक्त आत्ताच्या किमती आहेत, they are not values. आज डॉक्टरकीला मागणी/गरज आहे म्हणून किंमत आहे, उद्या डॉक्टरचं काम यंत्रांनी केलं (त्यांचं बरच काम खरोखरच यांत्रिक असतं) तर त्या कोर्सची किंमत शून्य होईल.
तरीही आपण तुम्ही म्हणता तसं भांडवलाच महत्त्व गृहीत धरू.

आता दोन वैचारिक प्रयोग करूयात. पहिल्या प्रयोगात जगातलं सगळं भांडवल, पैसा समुद्रात बुडवून टाकू, डॉलर, रुपया येन सगळ्यांची किंमत शून्य करून टाकू. उद्या काय होईल? लगेचच जागतिक मंदी हाहाकार माजवेल, नव्या उद्योगांना पैसे नसतील, सगळी देवाणघेवाण ठप्प होईल, लाखोंनी-करोडोंनी जीव जातील.अशा वेळी पैशाला नाही तर जो पुरेसं अन्नधान्य, जमिनी, जंगले ताब्यात घेऊ शकेल तोच जगेल . आपण १०००० वर्षे मागं जाऊ. पण या सगळ्यान जग थांबेल काय? जे जे बलवान (यात परत मोठ्या संख्येने शिल्लक उरलेले प्रजननक्षम तरुणच) सुरवातीला जमीन बळकावतील, हळूहळू शेतीला परत सुरुवात होईल. वस्तूंची देवाणघेवाण सुरु होईल. पुढे मागे पैसा पुन्हा वापरात येईल, आणि मग अर्थव्यवस्था पूर्वी होती तशीच पसरू लागेल. थोडक्यात काय तर भांडवल ही व्यापारासाठी केलेली कृत्रिम सोय आहे (currency is an imaginary resource). भांडवल बुडालं तर ते परत निर्माण होऊ शकतं. वस्तू, माणसे एकदा नष्ट झाल्या कि परत येत नाहीत.

आता वैचारिक प्रयोग क्रमांक दोन - आपण सगळं भांडवल म्हाताऱ्यांच्या हातात देऊ, पण जगातली सगळी लहानगी, तरुण समुद्रात बुडवून टाकू. आता मला सांगा या भांडवलानं म्हातार्यांना कामाची शक्ती, कल्पकता येईल का ? प्रजनन क्षमता येईल का? या भांडवलाने सगळे वृद्ध पुन्हा पूर्वीसारखी अर्थव्यवस्था तयार करू शकतील का?
याच उत्तर द्या मग आपण पुढं बोलू.

अमितव
तो माझा याच वादातील मुद्दा आहे. तुम्ही चष्मा चढवून त्याकडे बघाल तर समजणार नाही. त्यासाठी माझ्या आणि विलभ यांच्या आपसातील आधीच्याही पोस्ट वाचत या...

जपान मध्ये 65 वर्ष वया पेक्षा जास्त वय असलेल्या लोकांची संख्या 40 टक्के आणि भारताची 5.4 टक्के.
तरी सुद्धा जपान ची अर्थ व्यवस्था भारता पेक्षा उत्तम आहे
राहण्याचा दर्जा भारता पेक्षा किती तरी उच्च आहे.
सर्व सुविधा भारता पेक्षा किती तरी पटीत उच्च दर्जा च्या आहे.
आणि आपल्या कडे प्रचंड प्रमाणात तरुण लोक संख्या असून भारत दारिद्य्र मध्ये खितपत आहे.
सुविधा ची वणवा आहे.
दोन वेळचे जेवण मिळण्याची भ्रांत आहे.
काय दिवे लावले Tarun population ni.
आणि जपान मध्ये फक्त काही लाख लोक च बाहेरच्या देशातील आहेत.
कोणालाही तिथे एंट्री नाही.
दिसला तरुण की ध्या जपान मध्ये प्रवेश असे नाही.
त्यांना गरज पण नाही जास्त तरुण लोकांची .

बरं मला सांगा,
स्त्री पुरुष यांच्या शारीरीक क्षमतेमध्ये फरक असतो की नाही?
खरे उत्तर द्या. डिप्लोमॅटीक नको Happy

Submitted by ऋन्मेऽऽष on 30 November, 2020 - 22:15>>>>>>>>>>>>>>>>

कृपया विषय डायवर्ट करू नका..

एक्झॅक्टली! अर्थव्यवस्था खेळती असली की लेबर मिळतंच मिळतं आणि खिळखिळी असली की लेबर मिळुनही चाकं फिरता फिरत नाहीत.

>>

हे म्हणजे पैसा असले की पोरं होतीलच असं म्हटल्यासारखं आहे. प्रत्यक्षात जसजसे प्रगत होऊ तसतसा जन्मदर मात्र उतरंडीला लागला, त्याचं काय?

आपण सगळं भांडवल म्हाताऱ्यांच्या हातात देऊ, पण जगातली सगळी लहानगी, तरुण समुद्रात बुडवून टाकू. आता मला सांगा या भांडवलानं म्हातार्यांना कामाची शक्ती, कल्पकता येईल का ? प्रजनन क्षमता येईल का? या भांडवलाने सगळे वृद्ध पुन्हा पूर्वीसारखी अर्थव्यवस्था तयार करू शकतील का?
>>>>>>>

जगातल्या सर्व स्त्रिया नष्ट केल्या आणि पुरुष शिल्लक ठेवले तरी हेच होईल Happy

निसर्गाला समतोल अपेक्षित असतो. जो वृद्ध तरुण बालक मिळून देतात.

वृद्ध अनुभव आणतात, तरुण शारीरीक क्षमता, आणि बालक नवनवीन कल्पना वेगळे विचार Happy

स्त्री पुरुष यांच्या शारीरीक क्षमतेमध्ये फरक असतो की नाही?
तो माझा याच वादातील मुद्दा आहे. तुम्ही चष्मा चढवून त्याकडे बघाल तर समजणार नाही. त्यासाठी माझ्या आणि विलभ यांच्या आपसातील आधीच्याही पोस्ट वाचत या...

>>

ऋन्मेष, तुमचा रोख नेमका कुठं आणि यापुढचा तुमचा रिस्पॉन्स काय असणार आहे ते कळलं बरं Wink but I will play.
होय, स्त्री आणि पुरुषात शारीरिक क्षमतेचा फरक आहे. निसर्गानंच मुळात पुरुषाला स्त्रीपेक्षा जास्त शक्तिशाली बनवलंय. तुमच्या प्रतिसादाच्या प्रतीक्षेत Happy

पोर हवीत कशाला.
सर्व वयोगट एकमेकावर अवलंबून आहेत.
सहजीवन अपेक्षित आहे.
हाच पाया नाकारला आणि समाजाच्या एका हिस्सा नाकारला,त्यांना जगण्याचा हक्क नाकारला तर.
मुल हवीच कशाला.,कशासाठी माणूस अस्तित्वात असावा.
काही गरज नाही पुढच्या पिढीत होवू ध्या पृथ्वी मानव विरहित..
त्या मुळे पृथ्वी वर परत निसर्ग फुलेल आणि पृथ्वी ला मोकळा श्वास घ्यायला मिळेल.

ह्या विश्वाच्या पसाऱ्यात माणूस जगाला काय आणि नाही जगाला काय .
काही फरक पडत नाही.

>> प्रत्यक्षात जसजसे प्रगत होऊ तसतसा जन्मदर मात्र उतरंडीला लागला, त्याचं काय? >> तो का उतरंडीला लागतो बरं? कारण त्याची गरज नसते. पुढच्या काही दशकांत गरज निर्माण होणार आहे असं मॉडेलने सांगितलं की मनुष्यबळ आयात करण्याचे पॉलिसी बदल होतात, देशातील लोकांना जास्त मुलं निर्माण करण्यासाठी उत्तेजन द्यायला पॉलिसी ही निर्माण होतात.
इतके ढिगाने तरुण आहेत भारतात काही होतंय का? सांगा!

उत्तराबद्दल धन्यवाद विलभ.
जसे स्त्री पुरुष शारीरीक क्षमता आणि जडणघडणीमध्ये फरक असतो तरीही एक व्यक्ती म्हणून दोघेही समान हक्क राखून आहेत तेच वृद्ध, तरुण वा बालक यांनाही लागू नको का मग?

तसेच वरच्या एका पोस्टमध्ये मी लिहिलेय की जसे स्त्री पुरुष आपल्यातील भिन्नतेमुळे संतुलन साधतात तसेच वृद्ध तरुण बालकेही साधतात.

..

कृपया विषय डायवर्ट करू नका..
Submitted by mrunali.samad on 30 November, 2020 - 22:31
>>>
आपणही माझी हि आणि वरची पोस्ट वाचा. म्हणजे माझा मुद्द्दा समजेल.

यावर विलभ यांचे मत जाणायला खरोखर आवडेल म्हणून रिपोस्ट.

उत्तम प्रकारे* जीवन जगणे हे माणसाचे ध्येय असेल, (जे आहे असे मला वाटते.) , आणि अर्थव्यवस्था म्हणा, किंवा समाज म्हणा, माणसांचा समूहच असतो, तर

१) संपूर्ण अर्थव्यवस्थेची उत्पादकता सुद्धा समूहाच्या ध्येयाशीच निगडित आहे, म्हणजेच, समूहातल्या व्यक्तीचे जीवनमान सुधारणे.

२) त्यामुळेच, उत्पादकता कमी होते, म्हणून समूहाचा घटक निरुपयोगी आणि बाधा/ओझे आहे असे म्हणणे, ह्यात मला तरी साफ आतार्किकता दिसून येते. Here, the very thing that is to be achieved from greater productivity is being called a deterrent to productivity, while ignoring that that very thing is why we want greater productivity.
म्हणजे, बाळाला जोजवायला पाळणा आणला, आणि बाळामुळे पाळणा खराब होतो म्हणून बाळाला जमिनीवर निजवायला हवे, असे काहीतरी वाटले.
-----------------------------------

*उत्तम जीवन- हे अर्थातच व्यक्तिसापेक्ष असते, तरी काही बाबतीत कॉमन डिनॉमीनेटर असतो असा कयास आहे. उदा- आरोग्य, दीर्घआयुष्य, ईईई.

पुढच्या काही दशकांत गरज निर्माण होणार आहे असं मॉडेलने सांगितलं की मनुष्यबळ आयात करण्याचे पॉलिसी बदल होतात, देशातील लोकांना जास्त मुलं निर्माण करण्यासाठी उत्तेजन द्यायला पॉलिसी ही निर्माण होतात.

Submitted by अमितव on 30 November, 2020 - 12:15
>>

मुद्दा हाच की
१) जर भविष्यात सगळीकडेच जन्मदर कमी असतील तर तरुण माणसं एक्स्पोर्ट तरी कोण करणार तुम्हाला ?
२) नुसतं पोरं वाढवा म्हटलं की ती वाढतात का ? एक मूल जन्माला घालायचं तर त्याचं पालनपोषण करण्यासाठी वेळ, शिक्षणाचा खर्च, त्याचा आपल्या जीवनावर, करियरवर होणारा प्रभाव असा सगळा विचार पालक करतात. पालकांसाठी, विशेषतः होणाऱ्या आईसाठी ही खूप मोठी गुंतवणूक असते. ती करायला पालकांकडे नुसता पैसे असून उपयोग नाही, तर वेळ आणि ताणमुक्त जीवनशैलीही हवी, ताणाचा बराच फरक प्रजनन क्षमतेवर पडतो.
जर दिवसेंदिवस संख्येने कमी होणाऱ्या तरुणांवर बाकीच्यांना पेलण्याची जबाबदारी आली, तर त्यांचा बहुतेक वेळ कामातच जाईल. ते मुलं जन्माला घालण्याच्या भानगडीत पडतील का?
त्यांच्याही सहनशक्तीला काही मर्यादा आहे का नाही?

तुम्ही ज्या पॉलिसीज चा उल्लेख करताय त्या सगळ्या अजमावून झालेल्या आहेत. स्वीडन, इटली अन इतर स्कॅन्डेनेव्हियन देशांनी प्रत्येक मुलांमागे कॅश, टॅक्समध्ये सवलत, सुट्ट्या वैगरे सगळं देऊन झालंय. ज्यामुळं सुरवातीला जन्मदरात वाढ झाली, पण काही वर्षानंतर परिस्थिती पुन्हा जैसे थे. या बद्दल bbc ने एक सर्वे केलेला त्याची लिंक डकवतोय त्यात स्पष्ट म्हटलंय -

Anne Gauthier, professor of comparative family studies at the University of Groningen in the Netherlands, told the BBC that such cash policies "usually have very little impact on the fertility rate".

She says that while they may lead to a small increase in birth rates in the short term, with some people choosing to have children earlier, "it doesn't translate at the end of the day to a higher fertility rate. They have been used in a lot of countries and we see the same pattern".

अन शेवटी सगळ्यात महत्वाचं -

But Prof Gauthier does note that even Scandinavia has begun to see a fall in its fertility rates, showing that the real key to higher birth rates remains unclear.

"With Scandinavia we thought they had got it right... until about last year when their fertility rate started to decline," she said.[१]

[१] https://www.bbc.com/news/world-europe-51118616

इतके ढिगाने तरुण आहेत भारतात काही होतंय का? सांगा!

Submitted by अमितव on 30 November, 2020 - 12:15
>>
प्रगतीला तरुणांबरोबरोबरच बेस्ट HR management policy ही लागते. बेस्ट एचआर पॉलिसी पाहायची असेल तर ३० वर्षांपूर्वीचा जपान, सिंगापूर, आणि इस्राएलकडे बघावे, ज्यांनी कुठलेही खास रिसोर्सेस नसताना अर्थव्यवस्था भरभराटीला आणली (तेव्हा या सगळ्यांच सरासरी वय ३० च्या आतच होतं), या सगळ्या गोष्टी तिथल्या म्हातारबांनी केल्या का ? अन सगळ्यात बेक्कार एच आर पॉलिसी पाहायची असेल तर आफ्रिकेकडे नजर फिरवावी, जगभरातली खनिज आणि सुपीक जमीन, सगळ्यात तरुण जनता मिळूनही सदा सर्वदा उपाशीच.
माझ्या आधीच्या पोस्टी वाचाव्या, त्यात याच गोष्टी अगदी डिटेलवार लिहिल्यात मी.

@Hemant 33, तुमच्या वरील पोस्टीला हि हेच उत्तर समजा. आता एकतर याला खोडून काढा नाहीतर ''तरुण काय करतात' हेच तुणतुणं परत परत वाजवणं बंद करा.

जसे स्त्री पुरुष शारीरीक क्षमता आणि जडणघडणीमध्ये फरक असतो तरीही एक व्यक्ती म्हणून दोघेही समान हक्क राखून आहेत तेच वृद्ध, तरुण वा बालक यांनाही लागू नको का मग?

Submitted by ऋन्मेऽऽष on 30 November, 2020 - 12:19
>>
डिस्क्लेमर - माझं उत्तर हे पूर्णपणे अर्थव्यवस्थेच्या, रिसोर्स ऑप्टिमायजेशनच्या दृष्टिकोनातून असणार आहे, तेव्हा त्याला मानवनिर्मित समानतेच्या फूटपट्ट्या लावू नयेत, कारण निसर्ग स्वतःच त्या लावत नाही !

समान हक्क तो समाजानं दिला हो, उत्तरोत्तर कामात, जगण्या-वागण्यात जस जसं आपण प्रगल्भ (हा ही आपलाच शब्द) निसर्गानं ती आणलीच नाही. शारीरिक पातळीवर निसर्गानं स्त्रीला कमी ताकत दिली असेल, पण सोबत एक अशी शक्ती देऊन ठेवलीय ज्यामुळं ती अधिक महत्वाची ठरते ती म्हणजे - जननक्षमता.
एक पूर्ण माणूस शरीररुपानं ९ महिने वाढवणं, नंतर काही वर्ष त्याला सक्षम करणं यात तिची बरीच शक्ती खर्च होते. तिच्यावर आणखी भार पडू नये म्हणून निसर्गाने स्त्रीबीज निर्मितीत व्यवस्थाच अशी करून ठेवलीये. पुरुष एका मिनिटात लाखो शुक्राणू सोडू शकतो, स्त्रीबीज मात्र महिन्यातून एकच येतं. पुरुष आयुष्यभरात हजारोंना गर्भवती करू शकतो, स्त्री मात्र आयुष्यात मोजक्याच मुलांना जन्म देऊ शकते.

When it comes to survival of mammalian species, Men are expendables, Women are not. लाखो पुरुष मेले तरी फरक पडत नाही, मोजक्या पुरुषांच्या जीवावर जन्मदर आरामात चढा राहू शकतो, लाखो स्त्रिया मेल्या तर जन्मदर इतका झपाट्यानं उतरेल का मानवजाती मेलीच म्हणून समजा. म्हणून युध्दात स्त्रिया अन बालकाचे जीव घेऊ नयेत असा अलिखित नियम आहे. आपले पूर्वज चिंपँझी, apes मध्ये जेव्हाही वर्चस्वासाठी लढाया होतात, तेव्हा फक्त प्रमुख चिम्पाझी अन त्याची मुलं मारली जातात, प्रजननक्षम स्त्रियांना काहीही दुखापत केली जात नाही, त्यामागंही हेच कारण आहे.

आता तुम्ही म्हणाल अर्थव्यवस्था यात कुठ बसते? तर प्रजननक्षम स्त्री हाच एकच घटक असा जो अर्थव्यवस्थेचं इंधन तयार करतो - future young workforce. पण जेव्हा स्त्री पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून उतरली तेव्हा उलट तिच्या कामाचा बोजा वाढला. तिला एकाच वेळी बाहेरची स्पर्धा आणि मुलांचा जन्म हा दुहेरी बोजा येऊन पडला.
आज एखादा महिना घरी बसलं तर करियर बरबाद व्हायची भीती असते, नवजात बाळ आणि करियर अश्या कठोर निर्णय तिला घ्यावा लागतो. आता तुम्ही इथं म्हणाल आई अन बाबा दोघेही वेळ काढून बाळाचं संगोपन करू शकतात. एकदम उत्तम विचार. अहो पण त्यासाठी वेळ नको का त्यांच्याकडं ? त्यांचे बरेच तास अनुत्पादक लोकांचा बोझा वाहण्यातच चाललेत. विशेषतः आपल्याकडं, सध्या तरी हा बोझा थोडाच आहे, जेव्हा बुड्ढे तरुणांपेक्षा संख्येने जास्त होतील तेव्हा विचार करा हा बोजा केव्हढा असेल ? उगाच नाही प्रगत देशात जन्मदर घटायला लागले.

स्त्रीची मुलामध्ये असणारी शारीरिक अन मानसिक गुंतवणूक बघता, एकही मूल जन्माला घालण्याआधी ती शंभरदा विचार करते. जर परिस्थिती कष्टाची ताणतणावपूर्ण असेल, तर ती स्वेच्छेनं अधिक मुलं जन्माला मुळीच घालत नाही. (बाय द वे, sustainable population साधायची असेल तर जन्मदर साधारण २.१-२.४ मुलं प्रति स्त्री असा असावा लागतो, आज एकाच करता करता टाके ढिले होतात पालकांचे, दोघं तिघांचं कुठून करणार)

उद्या सिंहांनी ठरवलं आपल्या सगळ्या म्हाताऱ्या सिंहांना (जे प्रजोत्पादन किंवा शिकार यातलं काहीही करू शकत नाहीत) जगवायचं अन पोसायचच, तर एक वेळ अशी येईल का तरुण सिंह-सिहिणींचा सगळा वेळ अख्ख्या कळपासाठी शिकार मारण्यातच जाईल. प्रजोत्पादन करणार कधी अन बछड्यांना वाढवणार तरी कधी ? such kind of system is inherently inefficient, if you wont kill it, nature will kill it for you.

As I said, निसर्गाला बॅलन्स , संतुलन, ऑप्टिमायझेशन का काय ते आवडतं. अशात एकतर तरणे सिंह म्हातार्यांना काढून तरी टाकतील नाहीतर शिकारीच्या तुडवडा व बोझ्यानं सगळे सिंह विलुप्त तरी होतील. One way or another, balance will be restored!

तुम्ही लाख म्हणा हो सगळ्यांना समान हक्क द्या, समान हक्क द्यायला संसाधन (यात काम करणारे तरुण हे सगळ्यात महत्वाचं संसाधन आहे) अमर्याद/पुरेशी असावी लागतात.आजी-आजोबा,आई वडील, नाती गोती, समानता, न्याय या सगळ्या गोष्टी पोट भरल्यावर येतात. जेव्हा दुष्काळ असतो तेव्हा एकच नियम आणि एकच नातं - बळी तो कान पिळी. तुमचे आजी आजोबा असतील कुणी तर जरा त्यांना विचारा दुष्काळाच्या झळा काय असतात ते. तेव्हा कळेल कुणी कुणाला किती आदर दिला ते.

वृद्ध अनुभव आणतात, तरुण शारीरीक क्षमता, आणि बालक नवनवीन कल्पना वेगळे विचार Happy

Submitted by ऋन्मेऽऽष on 30 November, 2020 - 12:04
>>

बिनपुराव्याचं, कुठलीही आकडेवारी नसलेलं अत्यंत गुड गुडी वाक्य आहे हे. भाषणात ठोकायला उत्तम, पण economics मध्ये फक्त आणि फक्त आकडेवारीच महत्वाची. तेव्हा तुमच्याकडं काही पुरावा आहे का हे खरं असल्याचा ?

तुमच्या या स्टेटमेन्टला छेद देणारा पुरावा मी आधीच दिलाय, इथं पुन्हा देतो. तुमच्याच म्हणण्यानुसार इथं आपण वृद्धांचा अनुभव नीट वापरत नाही, म्हणून २ प्रगत देशाचीच आकडेवारी दिलीय. आता तिकडे सरासरी वयच इतकं जास्त आहे किमान तिथेतरी थोडा म्हातारबांचा अनुभव वापरत असावेत असं मानू.

age_vs_per_capita.PNG
.
यात स्पष्ट दिसतंय खर्चापेक्षा जास्त कमाई फक्त २० ते ६५ (त्यालाच मी रूढार्थानं तरुण कामसू माणसं म्हणतो) याच वयोगटात आहे. बाकीचे दोन्हीही वयोगट अधिकची dependency आहेत, त्यांचं अर्थव्यवस्थेत योगदान जवळजवळ शून्य आहे.

१) संपूर्ण अर्थव्यवस्थेची उत्पादकता सुद्धा समूहाच्या ध्येयाशीच निगडित आहे, म्हणजेच, समूहातल्या व्यक्तीचे जीवनमान सुधारणे.

Submitted by कॉमी on 30 November, 2020 - 12:50
>>

ही आत्ता तयार झालेली व्याख्या आहे उद्पादकतेची, तीही थोडीशी अप्पलपोटीच आहे. जरा मागे जा अन विचार करा मुळात आपण जीवनमान सुधारायच्या मागेच का लागलो ? तर आपल्या प्रजातीचे सर्वायवल वाढवण्यासाठी. शेती सुरु झाली कारण अन्न मिळवणे सोपे झाले (इथं जास्ती अन्न == जास्ती ऊर्जा == जास्ती पोरं == जास्ती सर्वायवल चान्सेस). बाकीच्याही सुधारणा आपण स्वतः, अन त्यापरासही स्वतःची मुलं अधिक चांगली जगावीत म्हणूनच केल्या. आजही आपण ग्लोबल वॉर्मिंगविरोधात हाक देतोय ते का आपल्यासाठी ? आपल्या पुढच्या पिढीच्या अस्तित्वासाठीच ना ? आजवरच्या प्रगतीने आपली संख्या वाढलीच आहे, उगाच नाही आपण ८ बिलियन झालो. पण आता तेच चक्र थोडं उलटं फिरवायची गरज आहे, कारण नुसत्या मागच्यांच्या भारानं जर पुढच्यांच अस्तित्वच धोक्यात आलं तर काय फायदा या प्रगतीचा ?

सगळ्यांसारखंच आजही आपलं सर्वायवल इन्स्टिंक्ट खूप मजबूत आहे. उगाच नाही महागाईत आई वडील आपल्या पोटाला चिमटा काढून पहिल्यांदा पोरांना जेऊ घालतात, उरलेलं आपण खातात. जेव्हा वेळ येईल तेव्हा ते परत उसळी मारणारच, आत्ता भले लाख म्हणत असतील १०० वर्ष जगू, हजार वर्ष काढू जेव्हा आपल्याच पोरांच्या पोटावर पाय येईल तेव्हा पहा.

Here, the very thing that is to be achieved from greater productivity is being called a deterrent to productivity, while ignoring that that very thing is why we want greater productivity.

Submitted by कॉमी on 30 November, 2020 - 12:50
>>
मी आधीच म्हटलंय मुळात 'सुखाने रिटायरमेंटसाठी कमावणं' हाच मुळी माणसाचा अप्पलपोटी अन शॉर्ट-सायटेड गोल आहे. जगातला कुठलाही प्राणी म्हातारपणाची काठी म्हणून कधीच पिल्लं ही काढत नाहीत अन प्रॉपर्ट्याही जमवत नाहीत, जी काही जमवाजमव असते ते नव्या पिढीसाठी. ते मजा करतात ते तरुणपणी, म्हातारपणी नव्हे. आपणच भलभलत्या चक्रात अडकून पैसे, प्रॉपर्टी च्या मागे लागून आयुष्यभर काम करतो अन वेळेवर जागा खाली करत नाही.

अन उत्क्रांती साक्षीदार आहे का आजवर ज्या प्रजातींनी आपल्यापेक्षा आपल्या प्रजातीचे सर्वायवल पाहिलं, तेच राहिले, बाकीचे कालौघात गडप झालेत.

इमिग्रेशन आणि जन्मदर वाढवा हे सध्या तरी (पुढची काही दशके) शॉर्ट टर्म उत्तर आहे.
त्यानंतर इतर अनेक उत्तरे असू शकतात. पण तुम्ही लिहिताय ते कधिही होणार नाही, त्याची अनेक कारणे आहेत.
फक्त त्यात स्त्रीयांचे शिक्षण बंद होणे आणि कॉन्ट्रासेप्टिव्ह उपलब्ध नसणे /प्रो चॉईस ची गळचेपी हे उत्तर असू नये इतकी मनोमन इच्छा. विज्ञान आणि तंत्रज्ञान लवकरच सॅपिअन उत्तर शोधेल. ते पशूगत उत्तर नक्की नसेल.

विलभ, खूप flawed arguments करत आहात. सगळी arguments खोडून काढायला वेळ नाही आत्ता. पण एक बेसिक फ्लॉ लिहीते. You are using examples from 2 systems to support your opinions.
A. Nature
B. Economics
माझ्या मते निसर्गातील उदाहरणे मानवाच्या बाबतीत बाद आहेत कारण आपण त्या व्यवस्थेपासून बरेच दूर गेलो आहोत already.
आणि सध्याच्या ज्या भांडवलशाही अर्थव्यवस्थेचे नियम तुम्ही तुमच्या मुद्द्यांच्या समर्थनासाठी मांडता आहात ती अर्थव्यवस्थाच मुळात कृत्रिम आहे. त्यामुळे तिच्यातले नियम अपरिवर्तनीय नाहीत. शिवाय भांडवलशाही अर्थव्यवस्था यशस्वी देखील नाही. In fact it has brought the human race on the verge of extinction in just a couple of centuries. तेव्हा तिचे नियम हट्टाने पाळावेत असा दुराग्रह कशाला?
So basically you are trying to mix up 2 vastly different systems that operate on very different principles to prove a point that is neither relevant nor necessary.
रच्याकने, स्त्रीची शारिरीक क्षमता पुरूषापेक्षा कमी आहे हे मान्य करणाऱ्या व्यक्तीला शारिरीक क्षमता म्हणजे काय याचे संपूर्ण आकलन नसावे हा एवढाच benefit of doubt मी देऊ शकते.

जिज्ञासा, सहमत.

विलभ यांचे प्रतिसाद वाचले. कारखान्यात वापरात असलेल्या यंत्राच्या जागी माणसांना कल्पून पाहिले तर त्यांचे प्रतिसाद योग्य आहेत. पण माणसे यंत्रे नाहीत.

Pages