भारतात ज्येष्ठ नागरिकांना खरंच आदर मिळतो का?

Submitted by mrunali.samad on 26 November, 2020 - 09:20

भारतात या घडीला ज्येष्ठ नागरिकांना खरंच आदर मिळतो का? त्यांचे जीवन रिटायरमेंटनंतर कसे असते?
भारतात रिटायरमेंट वय 55 आहे. तेच बाकी देशांमधे 65 आहे.
जपानमध्ये ज्येष्ठ नागरिकांना खूप रिस्पेक्ट आहे.
अमेरिकेत रिटायरमेंटनंतर सरकारतर्फे मेडिकल सपोर्ट आहे. भारतात सरकारतर्फे शुन्य सपोर्ट आहे. जर ज्येष्ठ नागरिकांनी काही सेवींग्ज केले असतील तर काही वर्षे तेच जपून वापरावे लागतात नाहीतर मग त्यांना आर्थिकदृष्ट्या मुलांवर अवलंबून राहावे लागते.
आजच्या पिढीत 75% कुंटुंब ,बर्याच कारणांमुळे ज्येष्ठ पेरेंट्ससोबत राहत नाहीयेत.खुपशा कुंटुंबात मुले आपल्या आजी आजोबांना वर्षातून एक-दोनदा भेटतात.यातून मुले काय शिकतील आणि भविष्यात त्यांची वागणूक कशी असेल जेव्हा आपण म्हातारे होऊ?
आमच्या ओळखीत एका काकांच्या रिटायरमेंटनंतर पीएफ चा पैसा त्यांच्या मुलांनी गोड बोलून, आम्ही तुम्हाला सांभाळू असा विश्वास देऊन ,सगळा पैसा घेऊन दोन-तीन वर्षांत खर्चही करून टाकला आणि आता अशी परिस्थिती आहे कि त्यांना सांभाळणारे कुणी नाहीये.ते एकटे राहताएत आणि आर्थिक अडचणीत आहेत.
मला असे वाटते कि आजच्या वर्किंग जनरेशने भविष्यातील आर्थिक तरतुदी आजच करून ठेवायला हव्यात जेणेकरून कुणावर अवलंबून राहायची वेळ येवू नये.
या विषयावर चर्चा करून तुमचे मतं जाणून घ्यायला आवडेल..

Group content visibility: 
Use group defaults

पुढल्या पिढीच्या शिक्षण, आरोग्यासाठी आपण गुंतवणूक करतो तशीच गुंतवणूक वृद्धांसाठी ही होणे आवश्यक आणि सहज आहे.

इथे कोणी कोणाच्या पैशावर डल्ला मारायचा प्रश्र्न नाही. कारण आजचे प्रौढ स्वत:च्या वृद्धत्वासाठी गुंतवणूक करणार.
तसंच ते ज्या समाजाचा हिस्सा आहेत तो समाज करणार आणि ते ज्या देशाचे नागरिक आहेत तो देश, शासन करणार.

आणि याचा लाभ येणाऱ्या पिढ्यांनाही होणार.

पाहिले तर आई वडिलांच्या स्थावर मालमत्तेची हक्क सोडण्याची तयारी असणारी लोक किती निघतील. <<< + 100

हा फक्त (१) सर्व चित्र पूर्ण व्हावे म्हणून मांडायचा मुद्दा आहे की (२) ऐरणीवर घ्यायचा मुद्दा आहे तुमच्या / इतर कुणाच्या मते?
(१) असेल तर ठीक की सगळ्या बाजूंचा विचार हवाच
(२) असेल तर _/\_ त्याला ज्याने हा मुद्दा पहिल्यांदा पुढे आणला.

माणूस प्रजाती इतकी अमानुष होणार असेल तर करोनाने नामशेष झाली तरी दु:ख नको. --- वैयक्तिक मुद्दा.

>>

निसर्ग अमानुषच असतो, आपण, आपली अर्थव्यवस्था त्याचाच भाग आहोत. तुमच्या काळजीनं त्याचा वरवंटा फिरायचा थोडीच थांबणार आहे? त्याचीच करणी आहे का आपल्याकडं सगळे रिसोर्सेस मर्यादीत आहेत. दिवसाला ताससुद्धा २४च आहेत. ९ तास काम करायचे दिवस केव्हाच सरले, आता जमाना १२ तासांचा सुरु झालाय. जर अर्थव्यवस्थेचा भार असाच दिवसेंदिवस कमी होणाऱ्या तरुणांवर पडत राहिला तर १२ चे १४-१६ ही होतील (जपानमध्ये जे आधीच झालंय). अजून किती कामाचे तास वाढावे अशी अपेक्षा आहे ?

देव न करो, पण हीच परिस्थिती तिकडे अजून शंभरेक वर्षे अशीच घसरत राहिली तर दोन पिढ्यांमध्ये गृहयुद्ध सुरु शकतं, अन त्यातून वाचणारे जर संख्येनं मूठभरच असतील, तर ती जपान्यांची शेवटची पिढी समजा. पुनःश्च हरिओम करावं तर जपानी क्लोनिंग करून

निसर्गाला नेहमी संतुलन आवडतं. जेवढं गवत उगवेल त्याच प्रमाणात हरणाचे कळप येतात. म्हाताऱया हरणांना रोग नाहीतर शिकारी प्राणी गट्टम करतात, अन त्यांची जागा नव्यानं जन्मलेली पाडसे घेतात. on an average, नॉर्मल परिस्थितीत तरण्या प्रजननक्षम हरणाची संख्या जवळजवळ सारखी राहते, ना घटते ना वाढते. हेच चक्र पिढी दर पिढी चालत राहत.

माणसानं या संतुलनात हव्या तश्या काड्या केल्याच आहेत, आता एकतर ते कमी करावे नाहीतर परिणाम भोगायला तयार राहावे . तोपर्यंत जीवशास्त्रातल्या क्लोनिंग, इच्छामरण वैगरे काही परिकल्पना प्रत्यक्षात उतरल्या तरच काही आशा आहे . बाकी कुणाला ते सरकास्टिक वाटो सनसनाटी, त्याला माझा नाईलाज आहे.

22 ते 25 वर्ष पर्यंत शिक्षण पूर्ण होते.
12वी(१८ वर्ष) प्लस डॉक्टर,इंजिनिअर ४ ते 5 वर्ष 18 आणि 5 23 वर्षी शिक्षण पूर्ण होणार नंतर तो तरुण अर्थ व्यवस्थेला हातभार लावण्याचा महान कार्यात उतरणार काही 1 वर्षात थोडा फार हातभार लावणार काही ना 5 ते 6 वर्ष जाणार.
म्हणजे वय झाले 28 वर्ष .
मग त्यांना घर हवे ते खरेदी करण्यासाठी लाखो रुपये तरी लागतात 20 टक्के amount paid करण्यासाठी बाकी बँक.
म्हणजे अजुन 5 वर्ष त्या मध्ये गेली 28 अधिक 5 झाले 33 वर्ष मग तो लग्न करणार आणि त्या नंतर 2 वर्षांनी किंवा 5 वर्षांनी मुलाला जन्म देणार .
स्वतः च्याच हिमती वर संसार उभा करायचा असेल तर 38 वया वर्षी मुल जन्माला येईल 10 ते 12 वर्षात बाप म्हातारा होणारा तो तेव्हा मुलगा 14 वर्षाचा असेल तो 25 वर्ष पर्यंत शिक्षण कशाच्या जोरावर पूर्ण करणार .
पाठच्या पिढीची बिलकुल मदत नाही घेतली तर तो शिक्षण च पूर्ण करू शकणार नाही तर अर्थ व्यवस्थेला हातभार कसा लावणार.

1650079537_40728a4501_o.jpg

इथे कोणती चर्चा आहे काही कळतच नाही आहे.
धाग्या चे नाव भारतात जेष्ठ नागरिक असावेत का नसावेत ? असे आहे असे वाटत आहे.

वीलभ
आता जी तरुण पिढी आहे ज्यांचे वय 35 च्य आत मध्ये आहे त्यांनाच रोजगार नाही,नोकऱ्या नाहीत ह्या स्थिती चा आणि जेष्ठ नागरीकांच्या संख्येचा काही संबंध आहे का?
तरुण पिढी आहे ना अस्तित्वात पण त्यांना संधीच उपलब्ध नाही अर्थव्यवस्थेत..
यंत्र मुळे मानवी उपयोग कमी कमी होतच जाणार आहे त्या मुळे तरुण च अर्थ व्यवस्थेच्या बाहेर फेकला जाईल ते काय बोजा घेणार जेष्ठ नागरिकांचा..
12 तास काम करावे लागते ह्याचा अर्थ तुम्ही मानवी बळ उपलब्ध नाही असा घेत असाल तर काही तरी चुकतंय.
12 तास काम करावे लागते ह्याचा अर्थ जास्त मानवी बळ नकोच आहे.

विलभ, "निसर्ग क्रूरच असतो" हे आर्ग्युमेन्ट नाही पटले. तो क्रूर असतो, किंवा, निसर्गात काय असत ते अयोग्य वाटतं म्हणूनच तर माणूस समाज आणि कायदा तयार करतो.

ज्येष्ठ नागरिक हा ग्राहक आहे की नाही.
ह्याचे उत्तर नाही असेल तर जेष्ठ नागरिक अर्थ व्यवस्थेवर बोजा आहे असे म्हणता येईल.
ज्येष्ठ नागरिक स्व कमाई च वापर करून
खर्चच करत असेल तर तो अर्थ व्यवस्थेला हातभार लावत आहे की नुकसान पोचवत
आहे.?
तरुणांची संख्या वाढवण्यासाठी जास्त मुल जन्माला घालणे किंवा जेष्ठ नागरिक नष्ट करणे हा उपायच नाही.
उपाय आहे कमीत कमी वयात मुल जन्माला घालणे .
इच्छा मरण.
जगातील सर्वात मोठा त्याग म्हणजे जीवनाचा त्याग .
50 कोट रुपये एकाध्या व्यक्ती कडे असतील त्या मधील स्वतः साठी गरजेचे 10 कोटी,मुलांसाठी 20 कोटी ठेवून राहिलेले 20 कोटी रुपये माझ्या मृत्यू नंतर देशाला अर्पण करत आहे असा किरकोळ त्याग करणारा एक तरी व्यक्ती मिळेल का.
माणूस अनवशक्या संपत्ती मृत्यू नंतर सुद्धा त्याग करण्यास राजी नसतो तो इच्छा मरणाला राजी होईल हे शक्यच नाही.

निसर्ग क्रूरही नसतो व प्रेमळ ही नसतो. त्याचे जे निसर्गनियमाने असलेले आविष्कार आपल्या वाट्याला येतात त्यावरुन आपण असे काही क्रुर सुंदर प्रेमळ वगैरे म्हणतो.

"आपली गोची अशी का" >> Happy विलभ, आपल्या प्रतिसादातील मुद्द्यांपेक्षा ती मांडायची परखड शैली आवडली.
त्रास जर वृध्दांच्या अनुत्पादकतेचा, अकल्पकतेचा, किंवा अशक्ततेचा असेल तरी त्यांना एक नियम व इतर समाजाला एक नियम लावता येत नाही. अनेक तरूणही अकल्पक, अशक्त, व अनुत्पादक आहेत त्यांचीही जागा मोकळी करावी. वृध्दांना जागा मोकळी करायचा आग्रह केवळ ते वृद्ध आहेत म्हणून करायचा हे तर डिस्क्रीमिनेशन झालं. त्यात निसर्गाचा भाग काही नाही.

(अवांतरः आता गोची बद्दलच विचाराल तर, एक ज्येष्ठ नागरिक नाही जिला मी जाऊन सुखाने म्हणेल "तू आता नॉन-पर्फॉमिंग अ‍ॅसेट आहेस". लगेच भाडिपाच्या आईप्रमाणे "लहानपणी ढुं** धुतली तुमची. आमचा पर्फार्मंस-बिर्फांमस बघायचा असेल तर बूड बघा स्वतःच" उत्तर येईल. असो..प्रत्येकाची गोची वेगळी Happy ).

>>>निसर्ग क्रूरच असतो" हे निसर्ग भावुक नसतो या अर्थाने घ्या.

हो, मान्य आहे.
पण उत्तम प्रकारे* जीवन जगणे हे माणसाचे ध्येय असेल, (जे आहे असे मला वाटते.) , आणि अर्थव्यवस्था म्हणा, किंवा समाज म्हणा, माणसांचा समूहच असतो, तर

१) संपूर्ण अर्थव्यवस्थेची उत्पादकता सुद्धा समूहाच्या ध्येयाशीच निगडित आहे, म्हणजेच, समूहातल्या व्यक्तीचे जीवनमान सुधारणे.

२) त्यामुळेच, उत्पादकता कमी होते, म्हणून समूहाचा घटक निरुपयोगी आणि बाधा/ओझे आहे असे म्हणणे, ह्यात मला तरी साफ आतार्किकता दिसून येते. Here, the very thing that is to be achieved from greater productivity is being called a deterrent to productivity, while ignoring that that very thing is why we want greater productivity.
-----------------------------------

*उत्तम जीवन- हे अर्थातच व्यक्तिसापेक्ष असते, तरी काही बाबतीत कॉमन डिनॉमीनेटर असतो असा कयास आहे. उदा- आरोग्य, दीर्घआयुष्य, ईईई.

म्हणजे, बाळाला जोजवायला पाळणा आणला, आणि बाळामुळे पाळणा खराब होतो म्हणून बाळाला जमिनीवर निजवायला हवे, असे काहीतरी वाटले.

फक्त analogy आहे.

वैद्यकीय शास्त्रात प्रगतीमुळं आपलं सरासरी आयुष्य गेल्या काही वर्षांत सरसर चढत गेलंय. पण त्यामुळे काम करायची शक्ती, कल्पकता काही वाढत नाही>>>
बरोबर. सरासरी आयुष्य वाढलं. पण आरोग्य सुधारलं असं म्हणता येणार नाही.
वृद्धांंची संख्या वाढली. लोकसंख्या वाढली. पण रिसोर्सेस नाही वाढले, ते कमी होत आहेत. त्यामुळे रिसोर्सेस वरील बोझा वाढला.
(या वाढलेल्या आयुष्यामुळे सगळ्यात जास्त वाढलेला खर्च हा वैद्यकीय खर्च असावा.)

एकीकडे लोकसंख्या कमी करण्याचे आव्हान दुसरीकडे वृद्धांची वाढणारी संख्या ज्यांंचे आयुष्य वाढले आहे पण आरोग्य नाही.

सरासरी आयुष्य वाढवायचे आणि लोकसंख्या मात्र कमी करायची म्हणजे सध्याचा वृद्ध / तरुण रेशो चांगलाच वाढणार. हे तेव्हाच सस्टेनेबल होईल जर काम करत रहाण्याचं वयही त्या प्रमाणात वाढलं (शारीरिक आणि मानसीक आरोग्य टिकवून आयुष्य वाढलं) तर.

Submitted by विलभ on 28 November, 2020 - 20:24 >>>>
अवांतर होईल खूप पण थोडक्यात लिहीते.
निसर्गाच्या अंकुशाबद्दल / संतुलनाबद्दल काही म्हणायचे नाही. ते काटेकोर नियमाने आणि सर्वांना एका तागडीत तोलून होते. त्यात मानव प्रजातीचा हिशोब झाला तर योग्य तर्‍हेनेच होईल.
जर वृद्धांच्या संख्येवर अंकुश ठेवण्यात मानवी हस्तक्षेप, निर्णय, कायदे, आले तर मात्र तो फक्त स्वार्थांध पॉवरगेम असेल.
आपलं जे झालंय ते आपणच केलंय आपल्या हाताने, निसर्गाला आणि संयमाला, मर्यादेला दुय्यम स्थान देऊन. फक्त स्वतःच्या हव्यासापायी. आता भोगा किंवा निस्तरा नि सुधारा. त्यातही आम्ही बरोबर आहोत तुमच्यामुळेच हे सगळे असे दुसर्‍याकडे बोटे दाखवणे आहेच.

भारतात आहे की उत्तम संख्येत मनुष्यबळ. दिशाहीन आणि ध्येयहीन आहे बहुतांश. जपानबद्दल काही बोलण्याइतका माझा अभ्यास नाही या विषयाचा. पण आपला जपान नाही होणार. अनुत्पादक राहून सगळे लाभ ओरबाडण्याची स्पर्धा असलेल्यांचा देश असे काहीतरी होईल.

आता जी तरुण पिढी आहे ज्यांचे वय 35 च्य आत मध्ये आहे त्यांनाच रोजगार नाही,नोकऱ्या नाहीत ह्या स्थिती चा आणि जेष्ठ नागरीकांच्या संख्येचा काही संबंध आहे का?
तरुण पिढी आहे ना अस्तित्वात पण त्यांना संधीच उपलब्ध नाही अर्थव्यवस्थेत..

>>
संधी आकाशातून पडत नाहीत, त्या निर्माण करणारे आपलेच तरुण असतात. स्टार्टअप पासून वडापावच्या गाडीपर्यंत जो जो तरुण स्वतःचा धंदा उभा करतो, तिथूनच संधी तयार होतात. आपल्याकडं त्यात शिक्षण, लाल फीत कारभार, उद्योगाप्रती आपली मानसिकता असे बरेच अडथळे आहेत, इन शॉर्ट तो मॅनेजमेंट इश्यू आहे.
पण जरा विचार करा ही तरुण पिढीचं नसेल तर? नोकऱ्या काय म्हातार्यांनी निर्माण करायच्या? त्यांची इच्छा असली सगळ्या वयोवृद्धांना शक्य आहे का ते ?

यंत्र मुळे मानवी उपयोग कमी कमी होतच जाणार आहे त्या मुळे तरुण च अर्थ व्यवस्थेच्या बाहेर फेकला जाईल ते काय बोजा घेणार जेष्ठ नागरिकांचा..
>>
यंत्र फक्त लेबर देऊ शकत, कल्पना नाही. म्हणून लाकूड ,कोळसा, तेल यासारखंच यंत्र एक रिसोर्स आहे. ते बिझनेस उभा करू शकत नाही, त्याला माणसाचं डोकंच पाहिजे.

12 तास काम करावे लागते ह्याचा अर्थ जास्त मानवी बळ नकोच आहे.

Submitted by Hemant 33 on 28 November, 2020 - 10:12
>>
मग जपानला २०१९ मध्ये आपल्या सीमा का उघडाव्या लागल्या? (https://foreignpolicy.com/2020/06/23/japan-immigration-policy-xenophobia...)
जर्मनीला तरुण सीरियन नागरिक का घ्यावे लागले?

संध्या आकाशातून पडत नाहीत, त्या निर्माण करणारे आपलेच तरुण असतात. >>>

संधी हा शब्द अनेकवचनातही संधी असाच राहतो, त्याचे संध्या होत नाही.

चांगली चर्चा सुरू आहे. जपानी लोक असे घाण्याच्या बैलासारखे काम करतात हे माहीत नव्हते.

आपला जपान नाही होणार. अनुत्पादक राहून सगळे लाभ ओरबाडण्याची स्पर्धा असलेल्यांचा देश असे काहीतरी होईल.>>>>

आपल्या देशातील लोकांच्या वर्णनाशी सहमत.

जगात देशाचे पंतप्रधान/अध्यक्ष ह्या पदावर आम्हाला तर जेष्ठ नागरिक च दिसत आहेत.
जागतिक बँकेचे अध्यक्ष,संयुक्त राष्ट्र संघटनेचे अध्यक्ष जेष्ठ नागरिक च आहेत.
विविध मोठमोठ्या कंपन्यांचे मालक तर जेष्ठ नागरिक च आहेत.
तज्ञ doctors,,संशोधक हे पण जेष्ठ नागरिकच आहेत.
तुमची तरुण मंडळी 9 ते 12 हफ्फिसात काम करताना फक्त दिसत आहे.
देश,कंपन्या,आरोग्य,सर्वच क्षेत्र जेष्ठ नागरिक च चालवत आहेत.
कुठे आहे तरुण मंडळी.

{बरोबर. सरासरी आयुष्य वाढलं. पण आरोग्य सुधारलं असं म्हणता येणार नाही.}
असहमत.
Life expectancy is one of the measures of health.
जगण्याचा दर्जा नक्कीच सुधारायला. साधन मोतीबिंदूचं उदाहरण चर्या.
आधी लोक आंधळे होतं, आता होत नाहीत.
शिवाय स्वावल़ंबी असे अनेक अतिवृद्ध पाहण्यात आहेत. त्यांनी कमावत राहायला हवं असं आहे का?
ज्यांचे श्रम मोजले जात नाहीत किंवा जे पगारी नाहीत असे बहुसंख्य लोक म्हातारपणातही कार्यरत असतात.

चर्चेचा ओघ - लोकसंख्येत तरुणांचं प्रमाण जास्त राहण्यासाठी वृद्धांनी मरणे आवश्यक आहे असा का होतोय?

यूरोपीय देशांत जन्मदरही घटले आहेत.
जपानमध्येही वेगळं नसावं.
तिथे लग्नाचं वय वाढतंय, मुलांची गरज, संख्या घटतेय.
वृद्धांचं प्रमाण वाढण्याचं हेही एक कारण आहे.

ज्येष्ठ नागरिक हा ग्राहक आहे की नाही.
ह्याचे उत्तर नाही असेल तर जेष्ठ नागरिक अर्थ व्यवस्थेवर बोजा आहे असे म्हणता येईल.
ज्येष्ठ नागरिक स्व कमाई च वापर करून
खर्चच करत असेल तर तो अर्थ व्यवस्थेला हातभार लावत आहे की नुकसान पोचवत

>>

स्वकमाई =/= पेन्शन, बेनिफिट्स. अर्थव्यवस्था ही नेहमी संतुलित असते (Always in state of equilibrium). इथं जसे प्रोड्युसर असतात तसं ग्राहकही असतात.
तरुण जेव्हा काही खरेदी करतो तेव्हा तो ग्राहक असतो, जेव्हा तो कामाला जातो तेव्हा तो निर्माता असतो. हे ग्राहक, निर्मात्याचे रोल आपल्या कामानुसार सतत बदलत असतात. पण ओव्हरऑल, निर्मात्यांचं प्रोडक्शन आणि ग्राहकांची मागणी जेव्हा समान पातळीवर असते तेव्हा अर्थव्यवस्था स्थिर असते. जे लोक काम करून व्हॅल्यू कमावतात, तेवढीच व्हॅल्यू ते आपल्या गरजांवर खर्च करू शकतात.

पण काम न करणाऱ्या ज्येष्ठांचं(इन फॅक्ट कुठल्याही माणसाचं) तसं नाही, ते फक्त ग्राहक आहेत. त्यांना जे बेनिफिट्स दिलेले असतात ते टॅक्समधून, म्हणजेच तरुणांच्या कामातून दिलेले असतात.
आणि हे ज्येष्ठ नागरिक जेव्हा ग्राहक होतात तेव्हाही त्या प्रॉडक्टमागे तरुणांनीच मेहनत असते. म्हणजे वृद्धांच्या खिशात पैसे टाकणारेही तरुणच आहेत आणि त्यांच्यासाठी प्रॉडक्ट तयार करणारेही तरुणच. इन शॉर्ट इथे तरुणांनाच डबल मेहनत करावी लागते. हा सगळा प्रकारच मुळी फुटक्या टायरमध्ये (दुसरी तुलना सुचत नाही, म्हणून आधीच माफ करा) हवा भरण्यासारखा आहे, फक्त भरणाऱ्याला घाम फुटतो बाकी साध्य काही होत नाही.

जेव्हा जेष्ठांची संख्या कमी असते, तेव्हा हा बोजा तरुण सहज पेलू शकतात. पण जेव्हा फक्त ग्राहक ज्येष्ठांची संख्या तरुणांच्या तुलनेत प्रमाणाबाहेर वाढत जाते, तेव्हा काय होत? फुटके टायर प्रमाणाबाहेर वाढले आणि हवा भरणारे कमी... मग साहजिक आहे हवा भरणार्यांना डबल मेहनत घ्यावीच लागणार. तर आता यावर पर्याय काय ?
१) हवा भरणारे वाढवणे - उपाय सोपा पण आज सगळी संसाधनं मर्यादित असताना संख्या वाढली तर संतुलन बिघडतं
२) फुटलेले टायर कमी करणे - संतुलन पूर्ववत होईल पण मांजराच्या गळ्यात घंटा बांधावी कुणी ?

लोकसंख्येत तरुणांचं प्रमाण जास्त राहण्यासाठी वृद्धांनी मरणे आवश्यक आहे असा का होतोय?

>>

कारण संसाधन मर्यादित आहेत, आणि सगळ्यात महत्वाचं संसाधन - "प्रजननक्षम तरुण जनता" तीही कमी होत आहे.अशात जर कुठल्याही प्रजातीला आपलं अस्तित्व टिकवायचं असेल तर संसाधनाच्या तुलनेतच संख्या (त्यातही जास्ती तरुणच) राखावी लागेल. Its all about optimization, if we wont do it nature will do it for us - the only issue with natural action is there is no guarantee of survival.

पण काम न करणाऱ्या ज्येष्ठांचं(इन फॅक्ट कुठल्याही माणसाचं) तसं नाही, ते फक्त ग्राहक आहेत. त्यांना जे बेनिफिट्स दिलेले असतात ते टॅक्समधून, म्हणजेच तरुणांच्या कामातून दिलेले असतात.
आणि हे ज्येष्ठ नागरिक जेव्हा ग्राहक होतात तेव्हाही त्या प्रॉडक्टमागे तरुणांनीच मेहनत

तुम्हीच एकच पॉइंट घेवून बसला आहात.
ज्येष्ठ कडे असलेला पैसा हा त्यांनीच बचत केलेला असतो त्यांच्याच कमाई चा भाग असतो.
स्थावर मालमत्ता खरेदी केलेल्या असतात त्यांचे येणारे भाडे हा त्यांचा इन्कम असतो.
कोणी कोणाला काहीच फुकट देत नाही.
ज्येष्ठ नागरिकांनी त्यांच्या तरुणपणी केलेली बचत ही त्यांची नाहीच हे कोणते लॉजिक.
त्यांनी खरेदी केलेली स्थावर मालमत्ता आणि त्याचे मिळणारे भाडे हे त्यांचे नाहीच.
हे कोणते लॉजिक.
तुमचे मत पेन्शन घेणाऱ्या व्यक्ती ला सुद्धा लागू होत नाही.
पेन्शन ची रक्कम सुद्धा. पगारातून वसूल केलेली असते .म्हणजे बचत च असते.
व्याजाचे म्हणाल तर करा 0 टक्के व्याज ठेवी वर बघा गमंत बँका चे भाग भांडवल कसे रोडवते आहे ते .
ज्येष्ठ बचत मधूनच खर्च करतील.
20 वर्ष पुरेल ह्या हिशोबाने च व्यक्ती पैसे जमवून ठेवत असतो.
मग व्याज मिळाले तर ती रक्कम मुलाकडे जाते.
व्याज नाही मिळाले तर मुलाकडे काहीच जाणार नाही.

Vilabh
साधी गोष्ट आहे तरुण लोकांची संख्या वाढवायची असेल तर कमी वयात च म्हणजे 20 वर्ष वयाच्या आतच मुलाला जन्म द्यावा लागेल.
हाच एकमेव उपाय आहे.
बाकी तुमची कोणतीच मत मान्य करण्या सारखी बिलकुल नाहीत.
ज्येष्ठ नागरिक ना मारले की माणूस अनंत काळ पृथ्वी वर राहील हे पण शक्य नाही.
शेवटी मानवी जीवन टिकावे की नष्ट व्हावे हे माणसाच्या इच्छे वर बिलकुल नाही.
असंख्य बाकी फॅक्टर आहेत ते फॅक्टर काही क्षणात माणसाला पृथ्वी वरून विलुप्त करण्याची क्षमता राखून आहेत.

तुम्हीच एकच पॉइंट घेवून बसला आहात.
ज्येष्ठ कडे असलेला पैसा हा त्यांनीच बचत केलेला असतो त्यांच्याच कमाई चा भाग असतो.
स्थावर मालमत्ता खरेदी केलेल्या असतात त्यांचे येणारे भाडे हा त्यांचा इन्कम असतो.
कोणी कोणाला काहीच फुकट देत नाही.
ज्येष्ठ नागरिकांनी त्यांच्या तरुणपणी केलेली बचत ही त्यांची नाहीच हे कोणते लॉजिक.

>>
अहो मी असं म्हटलंच नाही. ज्येष्ठाचीं मिळकत त्यांचीच तर आहे. माझा मुद्दा दुसराच आहे .
मला फक्त एकच सांगा जर तरुण पिढी प्रमाणापेक्षा खाली आली तर अर्थव्यवस्थाच आक्रसून जाईल. मग
१) तुमचे पैसे कोण उधार घेईल ? आणि त्यावर व्याजतरी कोण देईल?
२) तुमच्या जमिनीला, घराला कोण भाडं देईल ? आपले ज्येष्ठ पेन्शनर देतील का ?

एकच गोष्ट परत परत सांगतोय, लक्षात ठेवा कुठल्याही गुंतवणुकीची किंमत ही अर्थव्यवस्था ठरवते, जी तरुण माणसं चालवतात. तुम्ही भले टनाने सोनं खरेदी करून गुंतवणूक केली असेल .. पण आज जर त्या सोन्याला बाजारात मागणीच नसेल तर त्या सोन्याची किंमत शून्य आहे, मग ते किती का दुर्मिळ असेना.
माझं एकच म्हणणं आहे, रिटर्न्स हवे असतील तर अर्थव्यवस्थेचं संतुलन राखलं पाहिजे. अर्थव्यवस्था तरुण चालवतात. साहजिकच त्यांच्या वाढीसाठी स्पेस वेळोवेळी खाली करावीच लागेल.

शेवटी मानवी जीवन टिकावे की नष्ट व्हावे हे माणसाच्या इच्छे वर बिलकुल नाही.
असंख्य बाकी फॅक्टर आहेत ते फॅक्टर काही क्षणात माणसाला पृथ्वी वरून विलुप्त करण्याची क्षमता राखून आहेत.

Submitted by Hemant 33 on 28 November, 2020 - 13:28
>>
जे हातात आहे ते केलंच ना आजवर आपण ? पूर्वी रोगाने जायचो आपण औषधं, लशी शोधल्या. अन्न वेळेवर मिळायचं नाही म्हणून शेतीला सुरुवात केली. इतकच काय उद्या कुणी धूमकेतू, उल्का आपल्या दिशेने आली तर त्याला पालटवून लावायला रॉकेट्स सुद्धा बनवायचं चालू आहे.
त्यामुळं जे वय वाढलं ते आपल्याच इच्छेनं वाढलं ना ? मग आपण काय आपल्या इच्छेने फक्त वयच वाढवत राहायची? पुढच्यांचा विचार करायचाच नाही ?
आजवर आपण सर्वायवलसाठी जे जे आवश्यक होत ते सगळं केलं, तसंच आणखीही एक. जे फॅक्टर्स हाताबाहेर आहेत त्यावर सध्या काहीच उपाय नाही? पण म्हणून जे हातात आहेत ते का करू नयेत ?

Pages