भारतात ज्येष्ठ नागरिकांना खरंच आदर मिळतो का?

Submitted by mrunali.samad on 26 November, 2020 - 09:20

भारतात या घडीला ज्येष्ठ नागरिकांना खरंच आदर मिळतो का? त्यांचे जीवन रिटायरमेंटनंतर कसे असते?
भारतात रिटायरमेंट वय 55 आहे. तेच बाकी देशांमधे 65 आहे.
जपानमध्ये ज्येष्ठ नागरिकांना खूप रिस्पेक्ट आहे.
अमेरिकेत रिटायरमेंटनंतर सरकारतर्फे मेडिकल सपोर्ट आहे. भारतात सरकारतर्फे शुन्य सपोर्ट आहे. जर ज्येष्ठ नागरिकांनी काही सेवींग्ज केले असतील तर काही वर्षे तेच जपून वापरावे लागतात नाहीतर मग त्यांना आर्थिकदृष्ट्या मुलांवर अवलंबून राहावे लागते.
आजच्या पिढीत 75% कुंटुंब ,बर्याच कारणांमुळे ज्येष्ठ पेरेंट्ससोबत राहत नाहीयेत.खुपशा कुंटुंबात मुले आपल्या आजी आजोबांना वर्षातून एक-दोनदा भेटतात.यातून मुले काय शिकतील आणि भविष्यात त्यांची वागणूक कशी असेल जेव्हा आपण म्हातारे होऊ?
आमच्या ओळखीत एका काकांच्या रिटायरमेंटनंतर पीएफ चा पैसा त्यांच्या मुलांनी गोड बोलून, आम्ही तुम्हाला सांभाळू असा विश्वास देऊन ,सगळा पैसा घेऊन दोन-तीन वर्षांत खर्चही करून टाकला आणि आता अशी परिस्थिती आहे कि त्यांना सांभाळणारे कुणी नाहीये.ते एकटे राहताएत आणि आर्थिक अडचणीत आहेत.
मला असे वाटते कि आजच्या वर्किंग जनरेशने भविष्यातील आर्थिक तरतुदी आजच करून ठेवायला हव्यात जेणेकरून कुणावर अवलंबून राहायची वेळ येवू नये.
या विषयावर चर्चा करून तुमचे मतं जाणून घ्यायला आवडेल..

Group content visibility: 
Use group defaults

कारवी
तरुण पिढी जी संपत्ती निर्माण करत आहे ती पाठच्या पिढी नी निर्माण केलेल्या भांडवल च वापर करूनच.
शिक्षण पासून योग्य संधी असलेले वातावरण निर्मिती ही पाठच्या पीठी ची देणं असते.
तरुण पिढी ल शून्यातून परत सर्व निर्माण करावे लागत नाही.
त्या मुळे
तरुण आणि जेष्ठ नागरिक ह्या दोधांच्या भूमिका महत्वाच्या आहेत.
तरुण पिढी जेष्ठ नागरिकांना सांभाळते असे म्हणता येणार नाही.

सीमंतिनी, तुम्ही विलभ यांच्या पोस्ट वाचल्या तर कळेल की भांडवल वापरायला कोणी नसेल तर त्याचा उपयोग नाही.

थोडं पुढे जाऊन - capital and land providers एका परीने बसून खाणारेच असतात. फक्त त्यांनी आधी कमावलेलं असतं.

दुसऱ्या बाजूने हेही बरोबर की एका पिढीने बचत केली नाही तर पुढल्या पिढीकडे भांडवलाचा स्रोत असणार नाहीत.

म्हणजे दोघांना एकमेकांची गरज आहे आणि त्याचं भान हवं.

काम labour and entrepreneur करतात.

दोन पिढ्यांनी एकमेकांसाठी पैसा पुरवणे, श्रम घेणे, काही करणे या गोष्टी ओव्हरलॅपिंग आहेत. त्याची युनिट बाय युनिट मोजमाप + तुलना / परतफेड नाही होऊ शकणार.
कोणी कोणासाठी काय केले हे दिसून येईल ( quantitative + tangible).
किती केले, कसे केले हे गुणात्मक ( qualitative + intangible ) असेल.

आपल्या कुवतीनुसार, प्रेमाने आणि प्रामाणिकपणाने एकमेकांच्या (पालक <--> मुले) किमान / अत्यावश्यक गरजा पुरवणे -- ज्यामुळे अवलंबून असणार्‍या पार्टीला वर्तमानात जरूरीचे मानसिक, शारीरिक, सामाजिक स्थैर्य मिळेल आणि भविष्याबद्दल उमेद टिकून राहील. इतके करता आले तरी पुरेसे आहे.

पुन्हा कुवत, किमान, अत्यावश्यक, जरूरीचे हे सापेक्ष आहेच -- याचे निकष केसगणिक, काळाप्रमाणे आणि पार्टींच्या स्वभावाप्रमाणे बदलतील.

<< उदा: कोकाकोला कंपनी अनेक तरूणांनी श्रम करून वाढवली तरी वेळीच TIAA-CREF अशा शिक्षकांच्या पेंशन फंडाने गुंतवणूक करून अंशतः भांडवल दिले म्हणून कंपनी वाढली >>
चूक. TIAA-CREF हे सेकंडरी मार्केटमधून शेअर खरेदी करतात, त्यामुळे कोकाकोला कंपनीला भांडवल अजिबात मिळत नाही. बाकी चालू द्या.

कोणी कोणासाठी काय केले हे किती मागे जाऊन शोधणार नि हिशेब मांडणार ?
स्वातंत्र्य मिळवण्यापासून तर सुरूवात नाही करायचीये आपल्याला आता...
जे काही आयते मिळालेय, ज्याच्या पायावर आपण पुढचे रचतोय त्याबद्दल + ते देणार्‍या सर्व ज्ञात-अज्ञात लोकांबद्दल कृतज्ञ रहावे आणि आपली जबाबदारी चोख पार पाडावी.

तसं बघायला गेलं तर कोणीच कोणाला सांभाळत नाही. त्या वादात जाऊच नये. तो अनादि अनंत आहे.

हाडाची काडं केली म्हणताना, मुलांनी काय अर्ज केलेला असतो का "माननीय श्री व सौ क्षयज्ञ, आम्हाला जन्माला घाला"? आपल्या स्वतःच्या निर्णयाच्या परिणामस्वरूप आलेली जबाबदारी आहे ती. निभवा.
पुढे मुलांची नैतिक / माणुसकीजन्य / कृतज्ञता भावाने आलेली जबाबदारी आहे की आईबापांना जपा.

नाही केले दोन्ही पार्टींनी तर तिसरे कोणी काय करू शकणार आहे?
स्वतःच्या विवेकाने आणि रूजलेल्या संस्काराने होणार्‍या कृती आहेत या.
हिशोब आला की प्रेम संपले.
प्रेम आहे तिथे बाकी फिजूल.

कारवी यांचे प्रतिसाद आवडले. पण आत्ता संतुलित विचार करण्याची क्षमता त्यावेळी तशीच राहील याची खात्री नाही. निसर्ग तीच क्षमता वयोमानानुसार शाबुत ठेवेल हे अवघड आहे.

पण आत्ता संतुलित विचार करण्याची क्षमता त्यावेळी तशीच राहील याची खात्री नाही. निसर्ग तीच क्षमता वयोमानानुसार शाबुत ठेवेल हे अवघड आहे.>>>>>>>

सहमत.
वयोमानानुसार शारीरिक क्षमता कमी होत जातात. डिपेन्सन्सी वाढत जाते आणि भावनिक अटैचमेंट वाढलेली असते.अशा परिस्थितीत माणूस समतोल विचार नाही करू शकत.
मला असे वाटते ९५% पुढची पिढी व्रुध्द आई-वडिलांसोबत राहणार नाही..कारणे...
१.पाश्चिमात्य संस्कृती अनुकरण
२.वाढती महागाई
3.प्रायव्हसी ची मागणी वगैरे.
पण हे योग्य असेल का?

योग्य असेल की नसेल हे काळच ठरवेल.
मोडकळीस आलेली.
कुटुंब व्यवस्था,लग्न टिकण्याचे होत चालले ल कमी प्रमाण.
कमी होत जाणारी जमीन ,असुरक्षित आणि अस्थिर नोकऱ्या,वाढते प्रदूषण आणि त्याच्या मुळे वाढलेली रोग राई.
महाग होत चालले शिक्षण आणि महाग होत चाललेल्या आरोग्य सुविधा.
वाढते व्यक्ती स्वतंत्र चे फॅड.
ह्या मुळे पुढच्या पिढी समोर खूप सारी आव्हाने पण आहेत.
आणि हे आव्हान निर्माण करण्यात आताच्या पिढीचा मोठा हातभार आहे.
पुढच्या पिढीची आताची पिढी गुन्हेगार च आहे.
आपण 58 वर्ष पर्यंत स्थिर नोकरी आणि त्या नंतर मरे पर्यंत निवृत्त वेतन अशा सुरक्षित वातावरणात वाढलो पण पुढच्या पिढी च्या नशिबात ते सुख नसणार.
त्यांना च खूप संघर्ष करावा लागणार आहे आपण आताच्या पिढी नी त्यांच्या कडून अपेक्षा ठेवणे गैर वाजवी आहे.

दुसरीकडे- मूल नसणाऱ्या जोडप्यांची वाढती संख्या;
एकेकच अपत्य असल्याने एका तरुण जोडप्यावर आधीच्या पिढीतल्या चार जणांची जबाबदारी येणे
असंही होतंय.

प्रायव्हसीची गरज तरुणांनाच नव्हे, ज्येष्ठांनाही असते.

सीमंतिनी, तुम्ही विलभ यांच्या पोस्ट वाचल्या तर कळेल की भांडवल वापरायला कोणी नसेल तर त्याचा उपयोग नाही.

थोडं पुढे जाऊन - capital and land providers एका परीने बसून खाणारेच असतात. फक्त त्यांनी आधी कमावलेलं असतं.

दुसऱ्या बाजूने हेही बरोबर की एका पिढीने बचत केली नाही तर पुढल्या पिढीकडे भांडवलाचा स्रोत असणार नाहीत.

>>
@ भरत, हो माझ्या म्हणण्याचा गाभा हाच आहे. त्यापुढं जाऊन मी असं म्हणेन का, एकवेळ भांडवल-संसाधनं कमी असली तरी चालतात, पण तरुण मात्र हवेच हवे. त्यांच्या कल्पना, उद्यमशीलतेमुळं अर्थव्यवस्था भरारी घेते. नुसतं ढिगानं पैसे असले म्हणून धंदा चालत नाही, तो चालवायला उद्यमशील माणसेच हवीत.

@सीमंतिनी, actionable फक्त नव्यानं पेन्शन देणं इतकाच नाही, तर दरवर्षी वाढत जाणाऱ्या जुन्यांची विल्हेवाट (चांगला शब्द सुचत नाही) कशी लावावी याचापण आहे. काये, वैद्यकीय शास्त्रात प्रगतीमुळं आपलं सरासरी आयुष्य गेल्या काही वर्षांत सरसर चढत गेलंय. पण त्यामुळे काम करायची शक्ती, कल्पकता काही वाढत नाही, ज्यामुळं त्या वाढलेल्या वयाचा उपयोग अर्थव्यवस्थेला शून्य असतो. एकूण काय तर वाढीव म्हाताऱ्यांना पोसायचे काम आपोआपच घटत्या तरुणांवरच येऊन पडते. त्यामुळं किती ताणतणाव समाजाला भोगावे लागतात याचं उत्तम उदाहरण म्हणजे जपानी वर्किंग कल्चर !

आपली गोची अशी का दूध आटलेली गुरं किमान खाटकाला देऊन वासरांसाठी जागा तरी मोकळी करता येते. पण तसं वृद्धांबरोबर करता येत नाही. जोपर्यंत हयात आहेत तोपर्यंत पोसावं तर लागणारच. पुर्वी ही जुन्यांना साफ करून नव्यासाठी जागा मोकळी करायचं काम रोगराई, दुष्काळ वैगरेतर्फे निसर्ग स्वतःच करायचा. आता ते मुश्किल आहे, आणि उत्तरोत्तर अधिक मुश्किल होत जाणार आहे. खरं actionable हेच की जागा मोकळी कशी करावी ? दुर्दैव हेच की सध्या कुणाकडेही यावर सर्वमान्य उत्तर नाही.

वीलभ.
तुम्ही तुमचे मत एकतर्फी मांडत आहात अर्थ व्यवस्थेला तरुण पाहिजेत ठीक आहे.
पण ते तरुण आकाशातून पडले पाहिजेत किंवा कृत्रिम रीत्या प्रयोग शाळेत वाढविलेले पाहिजे .
कसलेच पाश नसलेले.
त्यांचे संगोपन शिक्षण,आर्थिक संस्था नी करायला हवे तेव्हा तुम्ही म्हणता तशी स्थिती निर्माण होईल.
मुल हे जर आधार होणार च नसतील तर त्यांना जन्म का द्यावा असा विचार नक्कीच बळावेल जेव्हा तुमच्या सारखे जेष्ठ ना अडगळ म्हणत असाल तर.
आता च काही प्रमाणात मुल च नको असा विचार लोक करायला लागली आहेत.
एकच फक्त अर्थ व्यवस्था चांगली असली म्हणजे मानव जगेल असे नसते.
सर्व घटक महत्वाचे आहेत.
अडगळ वैगेरे काही नसते.
तुम्ही जगातील अमेरिका,जपान,ह्या दोनच देशाची उदाहरणे का देत आहेत ती उदाहरणे जगाचे प्रतिनिधित्व करत नाहीत.

आधुनिक वैद्यकीय सुविधा उपलब्ध असल्या मुळे जास्त दिवस माणूस जगत आहे हे पण पूर्ण सत्य नाही जे जास्त दिवस जगत आहेत त्यांचे बालपण,तरुण पण नैसर्गिक वातावरणात ,गेलेले आहे.
येथून पुढची पिढी जास्त दिवस जगेल असा अंदाज करू नका.
बापा अगोदर मुलांचे मृत्यू होण्याचे प्रमाण काही वर्षात वाढलेले आहे.
ते तुमच्या आजूबाजूला पण दिसेल एवढे ठळक आहे.

वृद्धांची देखभाल हाच एक उद्योग (industry) होणे क्रमप्राप्त आहे.
वरकरणी, संस्था , समाज आणि शासनाने त्यात गुंतवणूक करायला हवी.
इस्रायल मधील व्यवस्थेबद्दल वाचलंय.

पण आत्ता संतुलित विचार करण्याची क्षमता त्यावेळी तशीच राहील याची खात्री नाही. निसर्ग तीच क्षमता वयोमानानुसार शाबुत ठेवेल हे अवघड आहे.
Submitted by प्रकाश घाटपांडे >>>>>

मान्य आहे पण हा फक्त करायचा, मांडायचा नि सोडून द्यायचा विचार नाहीये. वस्तुस्थिती आहे.
निदान काही जणांसाठी. ती स्वीकारावी + आचरावी लागणार आहे.
आपण अपत्य/नातवंडं म्हणून करतोय, करूया आपल्या आधीच्या पिढीसाठी आवश्यक ते. ती हातातली गोष्ट आहे.
पण आपलं.... ?

पुढे असेल सगळं ठीक तर उत्तमच.
अन्यथा, आताच कळतय तोवर वळवूनही ठेवायला पाहिजे. धरून चाला आत्ताच, आपल्याला नसेल कुणी बघणारं......... तर काय?.... चे पर्यायही शोधून ठेवावे. मनाची तयारी करून ठेवावी. म्हणजे मनाविरूद्ध घडेल तेव्हा हातात काहीतरी प्लॅन / आधार असेल जगायचा. दिशा असेल कृतीची.

ज्येना झाल्यावर आपली विचार करायची, स्वतःचे करायची क्षमता कमी झाली म्हणून कुणी चरणोंका दास बनून येणार नाहीये धावत. नसेल त्यांना यायचं तर नाहीच येणार; आपण गळ्यात नाही ना पडू शकत कुणाच्या.
जसे आहे तसे निभवावे लागेल.
ज्यांना मुले आहेत त्यांना अपेक्षेची चैन शक्य आहे.
मुले नाहीत, पालकांआधी वारली, अविवाहित वृद्ध, जगाचे भान हरवलेले वृद्ध ज्यांना कळतही नाही आपलं-परकं, करणं-टाकणं यातला फरक. त्यांचे काय?
त्यांना दी एंडची पाटी दिसेपर्यंत उपलब्ध आहे त्याच रस्त्यावरून पुढे जावेच लागेल ना?

पण तरीही भारतात त्यामानाने माणुसकी दिसते अजून तरी. जमेल तितके तरी मदतीचे बोट होते पुढे अनोळखी लोकांचेही. काही काळानंतरचे दिसेलच काय ते....

आपली गोची अशी का दूध आटलेली गुरं किमान खाटकाला देऊन वासरांसाठी जागा तरी मोकळी करता येते. पण तसं वृद्धांबरोबर करता येत नाही. जोपर्यंत हयात आहेत तोपर्यंत पोसावं तर लागणारच.
नवीन Submitted by विलभ >>>>>
!!
हा फक्त (१) सर्व चित्र पूर्ण व्हावे म्हणून मांडायचा मुद्दा आहे की (२) ऐरणीवर घ्यायचा मुद्दा आहे तुमच्या / इतर कुणाच्या मते?
(१) असेल तर ठीक की सगळ्या बाजूंचा विचार हवाच
(२) असेल तर _/\_ त्याला ज्याने हा मुद्दा पहिल्यांदा पुढे आणला.

माणूस प्रजाती इतकी अमानुष होणार असेल तर करोनाने नामशेष झाली तरी दु:ख नको. --- वैयक्तिक मुद्दा.
..इति...

जाऊन मी असं म्हणेन का, एकवेळ भांडवल-संसाधनं कमी असली तरी चालतात, पण तरुण मात्र हवेच हवे. त्यांच्या कल्पना, उद्यमशीलतेमुळं अर्थव्यवस्था भरारी घेते. नुसतं ढिगानं पैसे असले म्हणून धंदा चालत नाही,

पाहिले तर आई वडिलांच्या स्थावर मालमत्तेची हक्क सोडण्याची तयारी असणारी लोक किती निघतील.
ज्येष्ठ नागरिक होतो म्हणजे त्याने स्थावर मालमत्ता पण मिळवलेली असते,उद्योग उभे केलेले असतात,बँक बॅलन्स असतो..
अंबानी चा मुलगा स्वतः च्या जीवावर दुसरा अंबानी बनू शकणार नाही जेव्हा त्याला सर्व संपत्ती नाकारली जाईल.
कमावलेली. स्थावर मालमत्ता आणि बाकी संपत्ती ह्याची विल्हेवाट लावली पुढच्या पिढी साठी काहीच शिल्लक ठेवले नाही तर .
पगारी तरुण खूप मिळतील ,नाही तर रोबोट आहेत च..
वृध्द आणि दूध न देणारी जनावरे काय
तुलना .

@विलभ,
>>>आपली गोची अशी .....>>> हे सरकॅस्टीकली लिहीले आहे की खरे मत आहे की उगीच आपलं सनसनाटी?
------------
>>>हिशोब आला की प्रेम संपले.
प्रेम आहे तिथे बाकी फिजूल.>>> सुंदर वाक्य आहे @कारवी

विलभ, तुमचे मत योग्य आहे.

पण माणसाचे आयुष्य फक्त एक प्रॉडक्टिव्ह मशीन म्हणून बघणे मला योग्य वाटत नाही. प्रत्येक व्यक्तीला आयुष्यातील बरीच वर्षे कष्ट करण्यात घालवावी लागतात, ती बहुदा काम करण्याची क्षमता कमी झाल्यावर आत्मनिर्भरपणे जगता यावे आणि आनंद घेता यावा म्हणून घालवली असतात. त्या मूळ उद्दिष्टाला फक्त नॉन परफॉर्मिंग असल्याकारणाने दूर करता येऊ शकत नाही. मुळात आयुष्य विनासायास जगणे हे उद्दिष्टच दूर केलं, तर एव्हढ्या प्रॉफिट मशिन्सचा काय उपयोग ? हे सगळं चाललंच मुळात म्हातारपणात निवांत खाण्यासाठी आहे. कित्येक वेळेस तरुण सुद्धा म्हातारपणात निवांत खाता यावं म्हणून काम करतातच की. आपल्या पगारातला काही हिस्सा साठवतातच. मागील पिढीतील सरकारी नोकरांचे पेन्शन आणि आताच्या इंजिनिअराने केलेली एसआयपी यात फारसा फरक नाहीच.

एक वेळ आपण असेच समजू की वृध्द हे बोजा आहेत .
जग हे वृध्द मुक्त केले तर आर्थिक स्थिती जगाची कशी असेल.
60 वर्ष वयावरील सर्व लोकांना गोळ्या घालून ठार करण्याचा नियम केला तर काय होईल.
1) लोक पैसे जमा करण्या ऐवजी खर्च करतील.
2) मोठं मोठे उद्योग निर्माण करण्याच्या भानगडीत कोणच पडणार नाही जेवढे पैसे कमावले तेवढे सर्व च 60 वर्षाच्या आत खर्च केले जातील.
उद्योग उभा केलाच असेल तर त्याची पूर्ण विल्हेवाट 60 वर्ष पूर्ण होण्याच्या आत च लावली जाईल.
3)मोठमोठे आजार 60 वर्षाच्या पुढेच जास्त जोर पकडतात त्या मुळे 60 वर्षांवरील कोणी हयात नसेल तर अर्ध्या औषध कंपन्या आणि हॉस्पिटल बंद पडतील.
4) अन्न धान्य,मोटारी,टीव्ही,मोबाईल,कपडे,वीज,इंटरनेट ,ह्या वर खर्च करण्याची कुवत असणारा 60 वर्ष वरील वर्ग अस्तित्वात च नसेल तर हे सर्व उद्योग मंदी मध्ये जावून बंद पडतील.
मग तरुण कशाची निर्मिती करणार आणि कोण खरेदी करणार.
फक्त वृध्द लोकांच्या जीवावर म्हणजे ते ग्राहक आहेत म्हणून जगातील अर्ध्या पेक्षा जास्त उद्योग व्यवसाय चालू आहेत ते बंद पडतील.
हलक्या त घेवू नका जेष्ठ नागरिक हा खूप मोठा ग्राहक आहे जागतिक बाजारपेठेत .
त्यांच्या कडे पैसा आहे खर्च करण्यासाठी..
त्या पेक्षा जेष्ठ नागरिक सांभाळण्याचा उद्योग उभा रहावा हे भरत ह्यांचे मत अतिशय योग्य आहे.
त्या उद्योगात तरुणांना पैसे कमविण्याची संधी मिळेल.

तुम्ही तुमचे मत एकतर्फी मांडत आहात अर्थ व्यवस्थेला तरुण पाहिजेत ठीक आहे.
पण ते तरुण आकाशातून पडले पाहिजेत किंवा कृत्रिम रीत्या प्रयोग शाळेत वाढविलेले पाहिजे .
कसलेच पाश नसलेले.
त्यांचे संगोपन शिक्षण,आर्थिक संस्था नी करायला हवे तेव्हा तुम्ही म्हणता तशी स्थिती निर्माण होईल.
मुल हे जर आधार होणार च नसतील तर त्यांना जन्म का द्यावा असा विचार नक्कीच बळावेल जेव्हा तुमच्या सारखे जेष्ठ ना अडगळ म्हणत असाल तर.

Submitted by Hemant 33 on 28 November, 2020 - 06:22
>>

भावनिक दृष्ट्या अर्थात विचार वेगळे असू शकतात, मी फक्त अर्थव्यवस्थेचा दृष्टिकोन मांडला. आणि त्या दृष्टीने होय बहुतेक ज्येष्ठ हे अडगळच आहेत. यात वाईट वाटायचं काहीच कारण नाही, इट्स टोटली नॅचरल. कपडे विटतात, भांडी गंजतात, तसंच माणसाचंही . अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने तुम्ही फक्त एक रिसोर्स आहात, बाकी काहीही नाही. आता उपयोगी आहात, भविष्यात नसणार. माणूस आहात म्हणून निसर्गाचे कायदे बदलत नाहीत.

आणि जगातली इतर कुठले प्राणी म्हातारपणाचा आधार म्हणून पिलं जन्माला घालतात? निसर्गात कुठलाही पशु प्रजनन स्वप्रजातीच्या अस्तित्वासाठी करतो, म्हातारपणात आधाराला काठी असावी म्हणून नाही. आपणही त्याच उत्क्रांतीतून आलो आहोत. सर्वायवल इन्स्टिंक्ट आपल्यातही आहे आणि त्यामुळेच आपण मुलं जन्माला घालतो.

तुम्ही जगातील अमेरिका,जपान,ह्या दोनच देशाची उदाहरणे का देत आहेत ती उदाहरणे जगाचे प्रतिनिधित्व करत नाहीत.

Submitted by Hemant 33 on 28 November, 2020 - 06:22
>>

या अन इतर देशांची उदाहरणं मी अशासाठी दिली की आज तिकडे डेमोग्राफिक बॅलन्स बिघडलाय किंवा (जेव्हा म्हाताऱ्यांची संख्या तरण्यापेक्षा जास्त होते) त्याच्या वाटेवर आहे. फरक इतकाच की आज ते जात्यात आहेत आणि आपण सुपात आहोत.
त्यांच्या स्थितीवरून आपण आत्ताच सावध व्हावं एवढयासाठीच तो प्रपंच.

येथून पुढची पिढी जास्त दिवस जगेल असा अंदाज करू नका.

Submitted by Hemant 33 on 28 November, 2020 - 06:22
>>

हे कुठल्या लॉजिकच्या आधारावर बोलताय जरा सांगाल का ?

वृद्धांची देखभाल हाच एक उद्योग (industry) होणे क्रमप्राप्त आहे.
वरकरणी, संस्था , समाज आणि शासनाने त्यात गुंतवणूक करायला हवी.

Submitted by भरत. on 28 November, 2020 - 06:39
>>

हे म्हणजे असं झालं का मल्ल्याने एसबीआय लुटत राहावी आणि सरकारनं जनतेच्या टॅक्समधून बेल आऊट देत जावं . NPA जेवढा वाढवावा तेवढा तो बोजाच आहे.
पण तुम्ही जो इस्राएलच्या व्यवस्थेचा उल्लेख केला त्याची अजून माहिती द्या म्हणजे कमीत कमी ती व्यवस्था इकोनॉमिकल आहे का नाही ते तरी कळूदे.

दहा दहा मुल जन्माला घालणार माणूस एकच मुल जन्माला घालू लागला.
तोडले ना निसर्गाचे नियम.
कुत्री,मांजरी,उंदीर किंवा बाकी प्राणी असे माणसं सारखे नाही वागत एक जोडी आयुष्यात जेवढे पुनरुत्पादन करायची तेवढेच आता पण करते.
मुल एकच का तर त्याचे संगोपन नीट व्हावे म्हणून जगाची काळजी आहे म्हणून नाही.
त्या एक वरून शून्यावर यायला माणसाला विशेष कष्ट पडणार नाहीत मानवी जात टिकावी म्हणून कोण मुलांना जन्म देण्याच्या भानगडीत कशाला पडेल .
मानव जात जगातून विलुप्त होईल म्हणून कोणी मुल जन्माला घालत नाही.
माझ्या इस्टेट ला वारस हवा ही भूमिका असते.
मुलांना जन्म देण्याचे वय 16 वरून 35 वर गेले आहे .
कुठे आहे प्रजोउत्पदान करण्याची नैसर्गिक ऊर्मी ते 35 वरून 45 वर पण जावू शकते .
म्हणजे तरुण लोकांची संख्या पुढे कमी होणारच आहे.
तरुण लोकांची संख्या वाढावी म्हणून जास्त मुलांना जन्म देणे आणि 22 वर्षाच्या आत मध्ये देणे गरजेचे आहे .
हे शक्य आहे का आता.

त्यांना दी एंडची पाटी दिसेपर्यंत उपलब्ध आहे त्याच रस्त्यावरून पुढे जावेच लागेल ना?

पण तरीही भारतात त्यामानाने माणुसकी दिसते अजून तरी. जमेल तितके तरी मदतीचे बोट होते पुढे अनोळखी लोकांचेही. .......
अगदी अगदी झाले.

Pages