भारतात ज्येष्ठ नागरिकांना खरंच आदर मिळतो का?

Submitted by mrunali.samad on 26 November, 2020 - 09:20

भारतात या घडीला ज्येष्ठ नागरिकांना खरंच आदर मिळतो का? त्यांचे जीवन रिटायरमेंटनंतर कसे असते?
भारतात रिटायरमेंट वय 55 आहे. तेच बाकी देशांमधे 65 आहे.
जपानमध्ये ज्येष्ठ नागरिकांना खूप रिस्पेक्ट आहे.
अमेरिकेत रिटायरमेंटनंतर सरकारतर्फे मेडिकल सपोर्ट आहे. भारतात सरकारतर्फे शुन्य सपोर्ट आहे. जर ज्येष्ठ नागरिकांनी काही सेवींग्ज केले असतील तर काही वर्षे तेच जपून वापरावे लागतात नाहीतर मग त्यांना आर्थिकदृष्ट्या मुलांवर अवलंबून राहावे लागते.
आजच्या पिढीत 75% कुंटुंब ,बर्याच कारणांमुळे ज्येष्ठ पेरेंट्ससोबत राहत नाहीयेत.खुपशा कुंटुंबात मुले आपल्या आजी आजोबांना वर्षातून एक-दोनदा भेटतात.यातून मुले काय शिकतील आणि भविष्यात त्यांची वागणूक कशी असेल जेव्हा आपण म्हातारे होऊ?
आमच्या ओळखीत एका काकांच्या रिटायरमेंटनंतर पीएफ चा पैसा त्यांच्या मुलांनी गोड बोलून, आम्ही तुम्हाला सांभाळू असा विश्वास देऊन ,सगळा पैसा घेऊन दोन-तीन वर्षांत खर्चही करून टाकला आणि आता अशी परिस्थिती आहे कि त्यांना सांभाळणारे कुणी नाहीये.ते एकटे राहताएत आणि आर्थिक अडचणीत आहेत.
मला असे वाटते कि आजच्या वर्किंग जनरेशने भविष्यातील आर्थिक तरतुदी आजच करून ठेवायला हव्यात जेणेकरून कुणावर अवलंबून राहायची वेळ येवू नये.
या विषयावर चर्चा करून तुमचे मतं जाणून घ्यायला आवडेल..

Group content visibility: 
Use group defaults

2101 जेव्हा सुरू होईल तेव्हा माणसं समोर असंख्य आव्हान असतील .
आणि ह्याची जाणीव नवीन पिढी ल नक्कीच आहे
1) कृत्रिम बुद्धिमत्तेचा वाढलेला वापर आणि त्याचा परिणाम म्हणून वाढलेली बेरोजगार लोकांची फौज.
2) महाग होत चाललेलं शिक्षण आणि सरकारं नी त्या क्षेत्र मधून काढून घेतलेली जबाबदारी.
सरकारी शाळा कॉलेज दिवसोन दिवस कमी होत आहेत.
3) अतिप्रचंड कार्बन उत्सर्जन आणि त्यामुळे वाढत चालले ल पृथ्वी चे तापमान .
आणि त्याचा परिणाम म्हणून समुद्र ची पाणी पातळी वाढणे.
पावूस कमी किंवा जास्त होणे.
पुढे पाण्या वरून च जीव घेतले जातील ते ह्यासाठी च म्हंटले जाते.
4)जेनेटिक अभियांत्रिकी चा वाढलेला वापर माणसाला नक्कीच संपवेल.
5)रोबोट चा वाढत जाणारा वापर.
रोबोट कित्येक क्षेत्रातील माणसांना replace करतील.

रोबोट निर्मिती मध्ये कोणताच अडथळा येवू नये म्हणून च वृध्द कसे भार आहेत
हे रडगाणे चालू केले असेल .
पूर्व वातावरण निर्मिती साठी.

मी तर तरुण पिढी ला असाच सल्ला देईल मुल जन्माला घालून त्या मुलाला संकटात टाकू नका.
तुम्ही जन्माला आलाच आहात तर मस्त आयुष्य जागा मज्जा करा.
सर्व उपलब्ध पर्याय चा वापर करून 200 वर्ष जगा
पण मुल जन्माला घालू नका.

देशांनी किती ही पॉलिसी मध्ये बदल केला तरी.
ना चीन मधील पालक जास्त मुल जन्माला घालून त्यांच्या आयुष्य संकटात टाकतील.
ना जपानी पालक जास्त मुल जन्माला घालण्याची रिस्क घेतली.
शेवटी आपल्या अपत्य ची काळजी ही सर्वात मोठी नैसर्गिक भावना आहे.
मुलांचे आयुष्य सुरक्षित वाटत नसेल तर कोणीच मुल जन्माला घालणार नाही.
अगदी बाकी प्राण्यांचे उदाहरण घेतले तरी जो पर्यंत सुरक्षित वातावरण नसते, अन्न ची उपलब्धता नसेल तर ते पिल्लांना जन्म देणार नाहीत.
हीच तीव्र नैसर्गिक भावना आहे.
आणि त्या साठी च संपत्ती निर्मिती केली जाते अनेक गैर मार्गाचा अवलंब करून

>> पॅसिव्ह इनकम म्हणजे पेन्शन, एफड्या, भाडं हेच ना ? जरा विचार करून सांगा हे सगळं कोण देत?
Irrelevant!
जेव्हा आपण इन्कम आणि कन्झम्शन चा आलेख मांडतो तेव्हा मिळकतीचा एक मुख्य प्रकार नजरेआड करुन चालणार नाही. ते उत्पन्न कोणी कोणाला दिलं याचा ग्राफशी काही संबंध नाही.
शिवाय स्वीडन आणि कोरिया मधला तुलनात्मक आलेख तुम्ही out of context भलतीकडेच वापरता आहात असा मला संशय आहे.

सर्व्हिस टॅक्स पासून रोड tax पर्यंत ते gst
पासून इन्कम टॅक्स पर्यंतत सर्व टॅक्स वृध्द लोक भरतात.
वीज बिल पासून इंटरनेट पर्यंत ची सर्व बिल वृध्द लोक भरतात.
सरकारी तिजोरीत फक्त तरुणच टॅक्स ने पैसा जमा करतात हे साफ चुकीचे आहे.

नवीन Submitted by Hemant 33 on 1 December, 2020 - 06:21
>>

म्हणूनच मी 'बहुसंख्य' म्हणालो, सगळे नाही. अन मोठ्या प्रमाणावर वस्तू तरुण खरेदी करतात, वृद्धांचा कल बचतीकडे जास्त असतो. म्हणून तरुणांच्या तुलनेत त्यांचा gst नगण्यच आहे. टॅक्सचं म्हणाल तर मी खाली एक ग्राफ देतो ज्यात वयोपरत्वे किती रिटर्न्स भरले जातात त्याची आकडेवारी आहे. अमेरिकेच्या कर गोळा करणाऱ्या संस्थेने IRS (Internal Revenue Services) हा डेटा दिलाय -
.
IRS_agewise_tax_contribution.PNG
.
अमेरिकेत वृद्ध आपल्यापेक्षाही जास्त आहे अन टॅक्स भरणाऱ्यांची टक्केवारी ५१% आहे जी भारतापेक्षा (४%) कितीतरी जास्त आहे. इथंही पहा फक्त १८% टॅक्स वृद्धांनी भरलाय बाकीचा ८४% हा तरुणांनीच भरलाय (वय वर्षे २०- ६५)[१], तेव्हा सर्व टॅक्स वृद्ध भरतात हे विधानच मुळात बिनबुडाचं ठरत.

तेव्हा तुम्ही सरसकट विधाने करण्याआधी आपली गृहीतकं जरा तपासून पाहत चला, म्हणजे आपल्या दोघांचाही वेळ वाचेल.

[१] https://taxfoundation.org/which-age-groups-bear-largest-share-tax-burden/

बर्‍याचश्या मध्यमवर्गीय घरात अजूनही असे लोक ( ज्यांना आपण मध्यमवयीन म्हणू जे साठीच्या आत आहेत, रीटायर झालेले नाहीत ) आहेत की मुले शिकुनही त्यांना नोकरी नाही, पण यांची नोकरी वा इन्कम चालू असून हे मुलांना पोसत आहेत. मग यांचे काय करायचे? तरुण वर्ग २० ते ३५ च्या दर्म्यान आहे पण त्यांना नोकर्‍या नाही पण बापाची नोकरी चालूय त्यांचे काय? त्यांनी काय करावे? प्रत्येक ठिकाणी असे होत नाही ना की मी झालो रीटायर, माझ्या मुलाला माझ्या जागी चिटकवा.

नवीन Submitted by रश्मी.. on 1 December, 2020 - 06:55

>>
Absolutes आणि percentage याबद्दल मी आधीच सावध केलेलं तुम्हाला, ज्यामुळे चुकीचं चित्र तयार होतं. चला आपण तुमचा पूर्ण क्लेम देशस्तरावर आकडेवारीने तपासून बघू -
[१] भारतात वय वर्षे ६० च्या वर असणारे लोक संख्येने एकूण १०४ मिलियन (१०.४ करोड) आहेत म्हणजे संपूर्ण लोकसंख्येच्या फक्त ९%
[२] भारताची आत्ताची वर्कफोर्स (एकूण काम करणारे लोक) आहेत - ४७.१२ करोड

आता तुमच्या सोयीसाठी असं समजून चालू का सगळेच्या सगळे वृद्ध कामाला/पेन्शनला आहेत, तरीही एकूण वर्कफोर्स मध्ये त्यांची टक्केवारी किती भरते?
१०.४/४७. १२ = ०.२२ म्हणजे एकूण काम करणाऱ्या जनसंख्येच्या फक्त २२% !
प्रत्यक्षात टक्केवारी यापेक्षा कितीतरी कमी भरू शकते.

शेजारच्यांच्या मुलगा बापाच्या पेन्शनवर जगतो, नातेवाईकाचा मुलगा आईच्या पगारावर आहे अशा आजूबाजूच्या २-३ आउटलायर्समुळे संपूर्ण देशपातळीवर काय ट्रेंड आहे ते आपण जाणू शकत नाही. तात्पर्य जरा आकडेवारी तपासून मग आपली मतं मांडावी.

संदर्भ -
[१] https://timesofindia.indiatimes.com/india/66-of-India-in-15-64-age-group...
[२] https://www.financialexpress.com/budget/economic-survey-2020-no-net-job-...

मला इथे नाझी जर्मनीतला टी फोर हा प्रोग्राम आठवला. एका मित्राने करोना आणि त्याला हाताळण्याचे राज्यकर्त्यांचे मार्ग याबद्दल म्हटले होते की होते सध्याच्या जगातले काही नेते / काही सरकारे करोना पँडेमिककडे अशा कमकुवत मानवांना संपवण्याची आयती चालून आलेली संधी म्हणून पाहतील.- हे आठवले.

Submitted by भरत. on 1 December, 2020 - 07:17
>>
कोविड नंतर जगभरात पेन्शन फंडाची काय हालत होणार आहे, ते बघायचं नाही आठवलं? असो, फायनान्स रिसर्च अमेरिकेतल्या पेन्शन फंडांवर काय परिणाम होणार आहेत याचं एक चित्रंच समोर आणलं -

Those figures rely on optimistic assumptions about healthcare cost increases and discount rates; the true numbers are probably worse. The important statistic is more objective: how many years’ benefits do the pension assets represent? That could be no more than about four years in Illinois if true numbers were public today, five in New Jersey and Kentucky, six in Connecticut. [१]

म्हणजे बहुतेक पेन्शन फंडातन आता फार फार तर पुढची ६ वर्ष पेन्शन देता येऊ शकेल, बस्स त्याहून जास्त नाही. इकॉनॉमीच बसल्यामुळं पैशाची कमतरता आली, आणि साहजिकच पेन्शनच्या ओझ्याने वाकलेली सरकारं अर्थात प्रेफरेन्स कुणाला देणार? अर्थातच उद्योगधंदे आणि तरुणांना, पेन्शन फंडांना नाही.
याचाही पुरावा पाहायचाय?

The level of government debt has increased in many countries following COVID-19. This increased debt is likely to restrict the ability of future governments to support their older populations, either through pensions or through the provision of other services such as health or aged care.[२]

मग आता कुणाकुणाला नाझी म्हणणार? फायनान्स रिसर्चर्सना, सरकारांना, की अर्थव्यववस्थांना? बिनबुडाची लेबलं चिकटवून तुम्ही आपल्या मनाचं समाधान कराल, पण त्यानं प्रश्न सुटत नसतात. ते अजून वाढतच राहतात. अर्थव्यवस्था तुमच्या भावनांना कवडीचीही किंमत देत नाही, संतुलन साधण्यासाठी ती कितीही निष्ठुर होऊ शकते.

[१] https://www.bloombergquint.com/gadfly/pension-funds-will-take-a-big-coro...
[२] https://www.cfainstitute.org/en/about/press-releases/2020/Global-Pension...

भारतात एकूण लोकसंख्येत वृध्द लोकांचे प्रमाण (,म्हणजे 65 च्या वर) मुळातच कमी आहे 6 टक्के पेक्षा कमी आहे मग त्यांनी 18 टक्के भरला म्हणजे खूपच भरला की.

[१]
ही अर्थव्यवस्था आपणच निर्माण केली ना, बदलता / सुधारता येईलच की.

नवीन Submitted by कारवी on 1 December, 2020 - 07:20
>>
चूक. अर्थव्यवस्थेचे मजले जरी आपण चढवले असले तरी त्याच्या पायाशी एकच नैसर्गिक नियम आहे - डिमांड आणि सप्लाय. निसर्गाचा हा इतका मूलभूत नियम माणसालाच काय कुठल्याही प्राण्यालासुद्धा चुकलेला नाही. जसं हरिणांची संख्या त्या भागात वाढणाऱ्या गवतावर आणि शिकारी प्राण्यांवर अवलंबून असते. गवत वाढलं की हरीण वाढले, गवत कमी झालं की हरीण उपासमारीने कमी होणारच, शेवटी काय संतुलन झाल्याशी मतलब. तेच शिकारी प्राणी वाढले की हरीण कमी होतात and I hope point is clear now. जेवढा गवताचा सप्लाय असेल तेव्हढ्याच प्रमाणात हरीण वाढतात.
काम करणारे हात आणि खाणारी तोंडं यातही असाच सप्लाय डिमांडचा खेळ आहे. जरा सांगा बरं काम करणारे हात कमी झाले अन खाणारी तोंड वाढली तर संतुलन कसं बरं साधलं जाईल ?

[२]
जर माणसाने निसर्गातील नियमाने जावे अशी अपेक्षा आहे + पिल्लांचा जन्म हा incentive वर नसून instinct वर अवलंबून असतो, तर घालतीलच की.

>>
परत चूक. निसर्गनियमात फक्त इन्स्टिंक्ट येतात हे तुम्हाला सांगितलं कुणी ? आजूबाजूची परिस्थिती अन तिथला ताणतणाव हाही त्यात खूप महत्वाचा घटक आहे -
Several recent studies have found links between the women’s levels of day-to-day stress and lowered chances of pregnancy. For example, women whose saliva had high levels of alpha-amylase, an enzyme that marks stress, took 29% longer to get pregnant compared to those who had less.
- https://www.webmd.com/baby/features/infertility-stress#1

अन हे पूर्वापार चालत आलेलं आहे यात आजचं नवीन काहीच नाही.

[३]
तरूण ती नाकारत असतील तर उपाय काय?
>>
तरुण ती का नाकारताहेत, जरा सांगाल का ?

[४]
कष्टाची ताणतणावपूर्ण लाईफस्टाईल असणार्‍यांचा सेक्स हा विरंगुळा पर्यायाने अधिक अपत्यसंख्या हे चित्र का दिसते मग?
>>
म्हणूनच मी स्वेच्छेनं म्हटलं ते नजरेतून सुटलं वाटतं तुमच्या. पूर्वी जी लेकरांची लेंढार लागे, तुम्हाला काय वाटते ती स्वेच्छेनं होत असतील ?
आज पोर कमी होतात कारण किती मुलं जन्माला घालायचा निर्णय बऱ्याच अर्थानं स्त्रीच्या हाती गेलाय.

[५]
such kind of system is inherently inefficient, if you wont kill it, nature will kill it for you.
As I said, निसर्गाला बॅलन्स , संतुलन, ऑप्टिमायझेशन का काय ते आवडतं. >>>>>

अर्थात तुम्ही करा उचापत्या, तेही नैसर्गिकच की. मी फक्त त्या उचापत्यांचे परिणाम काय ते दाखवून देतोय. ते स्वीकारायला तयार राहा. खायला काय आय-पील पण लिम्लेटसारखी खाता येते, पण त्याचे शरीरावर होणारे परिणाम भोगायला तयार राहावे. one way or another, balance will be restored.

[६]
झालं ते झालं, आता जे कोणी आहेत त्या सर्वांना सोबत घेऊन जाण्याचे एकही मॉडेल सुचत नाही कोणाला?

>>
निदान असा काही पेन्शनरचा प्रॉब्लेम आहे हे तर स्वीकारूद्या आधी. उत्तराचं काय घेऊन बसला ? उत्तर शोधायला अजूनही वेळ आहे . इथं बहुतेक जनता शहामृगासारखी वाळूत डोकं खुपसून बसलेली आहे. काहींना आकडेवारी बघूनच आकडी आलीय, काही जण प्रतिवाद करता न आल्यामुळं तडफडून हवी तशी लेबले लावताहेत, काही जण सुखात पेन्शनची स्वप्न बघत परिस्थिती कधीच बदलणार नाही अशी भाबडी आशा करताहेत, काही जणांच्या भावना दुखावल्यानं अक्षरश मासोळीसारखे तडफडताहेत. त्यांना थोडं सुधरू तर द्या. Wink मग बघू उत्तराचं.

बाकी त्यांच्यासाठी अर्थव्यवस्थेनं वरवंटा तयार ठेवलेलाच आहे -

The level of government debt has increased in many countries following COVID-19. This increased debt is likely to restrict the ability of future governments to support their older populations, either through pensions or through the provision of other services such as health or aged care.
- https://www.cfainstitute.org/en/about/press-releases/2020/Global-Pension...

बस्स आज ना उद्या तो फिरायचाच. As I said before, balance will be restored. आपण फक्त मजा बघायची Happy

अर्थव्यवस्था भावनेला किँमत देत नाही त्या प्रमाणेच जो पर्यंत अपत्य जन्माला घालणे सुरक्षित वाटत नाही तो पर्यंत मुल आता तरी जन्माला घातले जात नाही.
इथे पण भावनेला काहीच किंमत नाही.

भारतात एकूण लोकसंख्येत वृध्द लोकांचे प्रमाण (,म्हणजे 65 च्या वर) मुळातच कमी आहे 6 टक्के पेक्षा कमी आहे मग त्यांनी 18 टक्के भरला म्हणजे खूपच भरला की.

>>
महाशय तो अमेरिकेचा आकडा आहे, इथं भारतात ४% च रिटर्न्स भरतात त्यात वृद्धही १८% भरतात हा जावईशोध आपण कुठल्या आधारानं लावला जरा सान्गाल का?

अर्थव्यवस्था भावनेला किँमत देत नाही त्या प्रमाणेच जो पर्यंत अपत्य जन्माला घालणे सुरक्षित वाटत नाही तो पर्यंत मुल आता तरी जन्माला घातले जात नाही.
>>
भावनेची किंमत माणसाला, अर्थव्यवस्थेला नाही. पोर माणूस जन्माला घालतो, अर्थव्यवस्था नाही.

माणूस आता पोर जन्माला घालण्याच्या भानगडीत पडत नाही दहा पोरं वरून 1 च पोरावर संख्या आली.
1 वरून 0 वर यायला बिलकुल वेळ लागणार नाही.
अपत्य चे भविष्य जर सुरक्षित नसेल तर मुल हवंच कशाला असा विचार सर्व करतात.
ज्या घटकात करत नाहीत ते मुलांचे संगोपन पण नीट करत नाही आणि स्किल असलेली पिढी ते देवू शकत नाहीत.
माणसाची प्रजनन क्षमता आज सुधा दहा मुलांना जन्म देण्याची आहे तरी 1 च मुल का जन्माला घातले जाते.
ह्याचे उत्तर पण शोधा

कोणत्या ही उद्योगातील HR विभागाला काहीच समजत नसते.
तो विभाग म्हणजे असून त्रास नसून खोळंबा असा प्रकार आहे.
कंपनी वाढण्यासाठी कोणते मनुष्य बळ हवे ह्याची काडीची जाणिव त्यांना नसते .
संबंधित विभाग प्रमुख च ठरवतात कसे आणि कोणत्या दर्जाचे मनुष्य बळ हवे आणि किती हवे.
ते जेव्हा शिफारस करतील तेव्हाच HR वाले त्या प्रकारची माणसे शोधतात.
बाकी नवीन तंत्र,व्यवसाय वाढण्यासाठी काय प्रयत्न करायला हवेत ह्या बाबतीत HR वाल्यांना काहीच ज्ञान नसते.
रांगोळी काढायची पण त्यांची लायकी नसते

भारता मधील किती तरी क्षेत्र आहेत तिथे 65 वयाच्या पुढच्या व्यक्ती काम करत आहेत.
त्या मधील कृषी क्षेत्र भारताचे अन्न धान्य उत्पादन हे जेष्ठ नागरिक च घेतात ज्यांचे वय 65 च्या पुढे आहे.
तरुण पिढी कृषी क्षेत्रात बिलकुल सहभागी नाही.
तुम्ही म्हणाल यंत्र वापरू .
मुळात यंत्र ही माणसाला replace करतात.
यंत्र ही ग्राहक नसतात .
उत्पादन होणार माल माणसाचं खरेदी करतात यंत्र नाहीत.
डोळे उघडे ठेवले तर तुम्हाला दिसेल जो पर्यंत शरीर साथ देते तो पर्यंत लोक काम करत असतात.
आता जे वृध्द आहेत त्यांचे शरीर 75 वर्ष पर्यंत काम करण्यासाठी साथ देते.
जपान पण तेच करत आहे.
त्यांच्या इथे वृध्द लोक असली तरी निरोगी आहेत काम करू शकतात.
.

>>इथंही पहा फक्त १८% टॅक्स वृद्धांनी भरलाय बाकीचा ८४% हा तरुणांनीच भरलाय (वय वर्षे २०- ६५)[१], तेव्हा सर्व टॅक्स वृद्ध भरतात हे विधानच मुळात बिनबुडाचं ठरत. >> Rofl अहो तुम्ही दिलेला डेटा तरी नीट प्रोसेस करा की!

अमेरिकेत टोटल टॅक्स फायलर्सच्या १४% सिनिअर्स (६५+) आहेत आणि त्यांचं वार्षिक उत्पन्न हे एकूण उत्पन्नाच्या १५% आहे असा त्या टेबल मधल्या माहितीचा अर्थ आहे. तुमच्या टेबल मध्ये टॅक्सचं नावही नाही.

त्याच लिंकमधल्या पुढच्या माहिती नुसार ३५ वर्षाखालील व्यक्ती टोटल टॅक्सच्या फक्त ११% टॅक्स भरतात. ४५ ते ५५ आणि ५५ ते ६५ वयातले लोक सगळ्यात जास्त कर भरतात अनुक्रमे २९ आणि २३ टक्के. रिटायर्ड लोक टोटल कराच्या १६% कर भरतात, त्यांच्या एकूण उत्पन्नाच्या प्रमाणाच्या तुलनेत किंचित जास्त प्रमाणातच.
५५+ वयाच्या लोकांनी एकूण कराच्या ४०% कर भरला. त्यांचे प्रमाण एकूण करविवरण पत्र भरणार्‍यांच्या फक्त २८% आहे, पण एकून कर ४०% आहे. हे बेबीबूमर्स रिटायर होत आहेत तसे हे प्रमाण उत्तरोत्तर वाढतच जाणार आहे. तुमच्या भूमिकेशी १८० अंशात विसंगत डेटा आहे हा!

त्यात हा विदा १० वर्षापूर्वीचा आहे. तो लेख लिहिण्याचं कारण बुश काळातील टॅक्स कट रद्दबातल होऊ लागल्याचा परिणाम अशा धर्तीवर आहे.

तुमच्या अनुमानात तुम्ही चुकीची माहिती तर देतच आहात वर परत डेटा सेट तुलनात्मक आकाराचा नसताना त्याची तुलना करण्याची चूक करत आहात. (उदा. लोकसंख्येच्या/ टॅक्स फायलर्सच्या टक्केवारीचे प्रमाण तरी दोन्ही ग्रूप मध्ये समान ठेवा!)
प्रत्येक लिंकेत जाऊन त्याची चिरफाड (फॅक्टचेक) करायला वेळ मिळतोच असं नाही. यापुढेही वेळ मिळाला की नक्की चेक करेन.

Vilabh
ह्यांची मत काही अर्थ शास्त्र चे न्यूज paper असतात त्या मधील लेखावरून तयार झालेले आहे.
असे लेख कधीच सर्व बाबी चा विचार करून
लीहले जात नाहीत ज्या विषयात त्यांना संभ्रम निर्माण करायचा असतो त्याच विषयाला अनुसरून लिहले गेलेले स्पॉन्सर केलेले लेख असतात.
Working age मधील population कशी कमी होत आहे.
Worker च नसल्या मुळे कसे उत्पादन कमी होत आहे हे रडगाणे गाताना.
रोबोट,कृत्रिम बुद्धिमत्ता,यंत्र हे किती कामगार लोकांना replace करत आहेत ह्या विषयी एक शब्द पण त्या लेखात वापरला जात नाही.
ह्यांचे खरे दुखणे वेगळेच असते.

बाप रे, केवढी ती चर्चा?

माझे आई वडील ज्येना आहेत आणि आम्ही तिघी बहिणी आणि ते एकमेकांची काळजी घेतो. आई बाबांना नाममात्र पेन्शन आहे. पण त्यांची स्वतःची घरे आहेत जी रेंटवर ठेऊन ते माझ्या घरी बहिणींबरोबर रहातात. मी भारतात असले की मी ही तिथेच रहाते. माझे सासुसासरे किंवा बहिणीचे सासुसासरे आले की तेही तिथेच रहातात. माझ्या आई वडीलांनी आणि सासु सासर्‍यांनी त्यांच्या आई वडिलांची नीट काळजी घेतली होती आणि आता ते त्यांच्या भावंडांची पण घेत आहेत. सगळे ज्येना सुदृढ आहेत पण टिपिकली हट्टीपणा देखिल करतात, वाद घालतात, लुडबुड करतात, पण कधी दुर्लक्ष, कधी डोळे वटारुन तर कधी थोडं महत्त्व देऊन त्यांची काळजी घेतली जाते. आम्ही लहान असताना त्यांनी घेतली होती असं आम्ही म्हणतो आणि विशेष मनावर घेत नाही.

आम्ही बहिणी त्यांच्यासाठी मेडीक्लेम वै. काढतो, ते आमच्यासाठी कसल्या कसल्या गुंतवणुकी करतात त्यांच्यापरीने. ते आहेत, काही बाही मदत करतात, मुलांच्या मागे पुढे करतात, मुलं त्यांच्याशी कधी भांडतात, कधी गळ्यात पडतात, ह्या सगळ्याबद्दल आम्ही स्वतःला लकी समजतो आणि जे पटत नाही ते सोडुन देतो, कधी सांगण्याचा प्रयत्न करतो, त्यांनी काही सल्ले दिले तर त्यावर निदान एक शक्यता म्हणुन चर्चा तरी करतो.

बाकी आत्त्या, काका, मामा सगळ्यांकडे थोड्याफार फरकाने अशीच परिस्थिती आहे. एक तरी भाऊ किंवा बहीण त्यांच्या आदल्या पीढीची काळजी घेतच आहेत. पैसे आहेत की नाही हे त्यांनी पाहिलेले नाही. जे कोणी आपल्या आदल्या पीढीशी नीट वागत नसेल किंवा काही कारणाने काळजी घेऊ शकत नसेल त्यांची काळजी बाकीचे नातेवाईक घेतात. तु तु मैं मैं करून काय फायदा?

ते काय रिसोर्स कंझ्युम करत आहेत आणि काय परफॉर्म करत आहेत असा विचार आम्ही करत नाही. मी/नवरा/बहिणी आज जे परफॉर्म करत आहोत त्यालायक बनवण्यासाठी त्यांनी कष्ट जे काही घेतले आहेत आणि त्याबद्दल मी ऋणी आहे. बाकी भारतात काय होतंय ते मी कंट्रोल करु शकत नाही आणि ट्रोल करु इच्छित नाही. त्यापेक्षा माझ्या घरात काय जमेल ते करत रहाते.

खूप नाही वाचले ...

आम्ही स्वतःला लकी समजतो आणि जे पटत नाही ते सोडुन देतो, कधी सांगण्याचा प्रयत्न करतो, त्यांनी काही सल्ले दिले तर त्यावर निदान एक शक्यता म्हणुन चर्चा तरी करतो. ++++

त्यापेक्षा माझ्या घरात काय जमेल ते करत रहाते.++++

Pages