भारतात ज्येष्ठ नागरिकांना खरंच आदर मिळतो का?

Submitted by mrunali.samad on 26 November, 2020 - 09:20

भारतात या घडीला ज्येष्ठ नागरिकांना खरंच आदर मिळतो का? त्यांचे जीवन रिटायरमेंटनंतर कसे असते?
भारतात रिटायरमेंट वय 55 आहे. तेच बाकी देशांमधे 65 आहे.
जपानमध्ये ज्येष्ठ नागरिकांना खूप रिस्पेक्ट आहे.
अमेरिकेत रिटायरमेंटनंतर सरकारतर्फे मेडिकल सपोर्ट आहे. भारतात सरकारतर्फे शुन्य सपोर्ट आहे. जर ज्येष्ठ नागरिकांनी काही सेवींग्ज केले असतील तर काही वर्षे तेच जपून वापरावे लागतात नाहीतर मग त्यांना आर्थिकदृष्ट्या मुलांवर अवलंबून राहावे लागते.
आजच्या पिढीत 75% कुंटुंब ,बर्याच कारणांमुळे ज्येष्ठ पेरेंट्ससोबत राहत नाहीयेत.खुपशा कुंटुंबात मुले आपल्या आजी आजोबांना वर्षातून एक-दोनदा भेटतात.यातून मुले काय शिकतील आणि भविष्यात त्यांची वागणूक कशी असेल जेव्हा आपण म्हातारे होऊ?
आमच्या ओळखीत एका काकांच्या रिटायरमेंटनंतर पीएफ चा पैसा त्यांच्या मुलांनी गोड बोलून, आम्ही तुम्हाला सांभाळू असा विश्वास देऊन ,सगळा पैसा घेऊन दोन-तीन वर्षांत खर्चही करून टाकला आणि आता अशी परिस्थिती आहे कि त्यांना सांभाळणारे कुणी नाहीये.ते एकटे राहताएत आणि आर्थिक अडचणीत आहेत.
मला असे वाटते कि आजच्या वर्किंग जनरेशने भविष्यातील आर्थिक तरतुदी आजच करून ठेवायला हव्यात जेणेकरून कुणावर अवलंबून राहायची वेळ येवू नये.
या विषयावर चर्चा करून तुमचे मतं जाणून घ्यायला आवडेल..

Group content visibility: 
Use group defaults

@ Submitted by mrunali.samad on 27 November, 2020 - 15:11 >>>>>

सगळ्यांकडून अपेक्षित.समाज म्हटले कि हे सगळे घटक आलेच. >>>>
समाजाचे घटक सार्‍यांना माहिती आहेत. प्रत्येक घटकाने, प्रत्येक वेळी मला आदर द्यावाच ही अपेक्षा ज्येनांनी का ठेवावी? हा मुद्दा टाळला गेला..... आदर दिला ठीक नाही दिला ठीक अशी स्थितप्रज्ञ भूमिकाही जमू शकेल या वयात.

बहुतांश ज्ये.ना.आपल्याच मुलाच्या विरोधात कायद्याचा आधार घेत नाहीत जरी असे फसवले गेले असले तरी..पेरेंटस नेहमीच मुलांच्या चुका क्षमा करतात.. >>>>>>
झालं तर मग.... मुलांनी फसवायचा आणि काकांनी क्षमेचा निर्णय घेतला असेल संपले की मॅटर त्यांच्यापुरते.. दोन्ही पार्टी करून-सवरून आणि कळून-सवरून गप आहेत तर त्याबाबतीत काही न करणार्‍या तिसर्‍या पार्टीने चौथ्या समाजगटासमोर.... 'बघा हो ज्येनांना कसे लुबाडतात' म्हणून टिपं का गाळायची?
आपण पुढे होऊन काही योग्य ते करावं, आपल्या ज्येना आस्थेपायी किंवा
त्यातून धडा घ्यावा की आपण आपल्या पालकांशी असे वागायचे नाहीये + आपल्याही मुलांकडून असा अनुभव येऊ शकतो याची खूणगाठ बांधायची.

हा रिस्पेक्ट आहे कि अंधश्रद्धा? >>>>
भले असली अंधश्रद्धा तरी त्या त्या वस्तूविषयीच्या "आदरातूनच" उद्भवली आहे ना?
गोष्टी ज्या नजरेने बघाव्या तशा असतात. आपण ज्याला ज्येनांचा आदर म्हणतो त्यालाच म्हातार्‍यांना डोक्यावर चढवून ठेवणे म्हणणारे कोणी महाभागही असतील.

चर्चेचा उद्देश हा आहे आज ज्ये.ना.ची काय परिस्थिती आहे?
समाजात,नातेवाईकात, मुलांकडून त्यांना कशी वागणूक मिळते,ते कमवते असोत वा नसोत.
यावर उद्याची पिढी कोणत्या विचारसरणीत वाढतीए आणि आजचे तरुण जनरेशन, भावी ज्ये.ना. यांना एकूणच कशा परिस्थितीला सामोरं जावे लागेल? भावनिकद्रुष्ट्या आणि आर्थिकदृष्ट्या सुध्दा. >>>>>>

प्रत्येक ज्ये ना ची परिस्थिती + उपाययोजना वेगळी आहे आणि त्याला त्यांचे त्यांचे असे N घटक कारणीभूत आहेत. सगळ्याची एकत्र मोट वळणे शक्य नाही.
त्यांना मिळणारी वागणूक हा खरोखर अन्याय आहे की त्यांच्या योग्यतेनुसार ( what they deserve ) मिळणारा समाजाचा / आप्तांचा अहेर आहे हेही तटस्थपणे विचारात घ्यावे लागेल. संदर्भ सोडून नव्हे.

ज्येष्ठ नागरिकत्त्व म्हणजे आपल्या भूत + वर्तमानकाळातील चुका / गैरवर्तन याला रिसेट मारून, वयाची ढाल पुढे करून, स्वतःला सर्वार्थाने गोंजारून घ्यायचे लायसेन्स नव्हे.

उद्याच्या पिढीचे विचार आपण वाचू + बदलू शकत नाही.
आपण सद्य ज्येनांशी कसे वागायचे हेच केवळ आपल्या हातात आहे.
इतरांना सांगणे, लहान मुलांना योग्य-अयोग्यची जाणीव करून देणे, ती चुकीची वागताना त्यांना समजुतीचे चार शब्द सांगणे हे आपण करू शकतो. त्यांना ऐकायला / करायला भाग पाडू शकत नाही. या जाणिवा स्वतःच्या स्वतःच मनातून उमलाव्या, उमजाव्या लागतात. उपदेश ऐकून सोडून देणारे कैक असतात.

आपण ज्येना झाल्यावर आपल्याला काय अनुभवावे लागेल याचा रिमोट आपल्या हातात नाही याचे पूर्ण भान हवे.
कुठल्या वातावरणाचा कोणावर कसा परिणाम होईल नाही सांगता येत. बेडरिडन आजोबांचे करणार्‍या आई-बापांना पाहून मुले सेवाभावच शिकतील असे नाही. ' आयला हे पण करायला लागते होय.... आपल्याच्याने नाही बा होणार' हीदेखील प्रतिक्रिया असू शकते नातवाची. पालकांना अपमानाची वागणूक देणारे आई-बाप पाहून, हे किती चुकीचे आहे....आपण असे कधीही वागायचे नाही हा सुजाण विचारही येऊ शकतो मुलांच्या मनात. हे दुसर्‍याचे मनोव्यापार आपल्या नियंत्रणात नसतात.

परिस्थिती इतक्या वेगाने बदलते आहे की आपण साधकबाधक विचार करेपर्यंत ते कालबाह्य ठरू शकतील कित्येक केसमध्ये. जे जसे पुढ्यात येईल तसे टोलवायला लागेल. व्यवहारीपणे, फार भावनाविवश न होता. मानसिक कणखरपणा आणि जे घडेल ते स्वीकारून पुढे जाण्याची शक्ती / सवय आणावी लागेल स्वतःत.

आदर्शवादी चर्चा / बोलण्या बरोबरच आपले मनातील आदर्श कृतीत आणावे लागतील. स्वता:साठी + इतरांसाठीही. जे योग्य आहे ते करण्यासाठी विरोध, टीका सहन करून; स्वतःला सोयीस्कर निमित्त न देता मातीत उतरून दोन चार जिवांचे भले करावे लागेल. आणि ते करताना आपण कच खाणार असू तर विविधांगी चर्चा तरी काय कामाच्या?

हा माझा दुसरा आणि शेवटचा प्रतिसाद. संदर्भ वगळून वाक्य / शब्द / घटना पाहिली तर त्याला काही अर्थ उरत नसतो. फक्त सोयीचे प्रतिवाद करता येण्यासारखे वाक्याचे भाग उचलून बाकी मुद्द्यांना बगल असे असेल तर मग प्रतिवादांची शटलकॉक टोलवत बसण्यात मजा नाही. ती चर्चा नव्हे.

जिसका कोई नही होता ऊस्का खुदा होता है. म्हतारपणी देव सगळ्याना सांभाळतो. तुमच्या जवळचे पैसे संपले कि तो कुठल्या ना कुठल्या रुपात येउन तुम्हाला दोन तीन हजार देऊन जाईल. तुम्ही काठी टेकत रस्ता पार करत असाल तर तुम्हाला रस्ता पार करायला मदत करेल. जर तुम्हाला पिझा खायची ईच्छा झाली तर आणून देईल. ईथे तुम्हाला जास्त काळजी आहे हे दाखवु नका नायतर कोपायचा. टेक ईट लाईटली.

टेक ईट लाईटली.
Submitted by बोकलत >> प्रतिसाद वाचायला सुरुवात केल्यावर लगेच अंदाज आला हे बोकलत असतील. आणि अंदाज खरा ठरला.

व्यक्ती कडे परफॉर्मिंग आणि नॉन परफॉर्मिंग म्हणून बघणे हे निओलिबरल विचार पटले नाहीत. भांडवलशाहीमध्ये सुद्धा एकट्या व्यक्तीवर, एकट्या व्यक्तीच्या जीवनावर, त्याच्या आशा आकांक्षांवर भर असतो, अस लोकांचे वर्गीकरण क्लास मध्ये करून त्यांना उपयोगी निरुपयोगी म्हणलं जात नाही.

Submitted by कॉमी on 26 November, 2020 - 19:57
>>

भांडवलशाहीत नेमकं हेच केलं जातं. नाहीतर तुमचे आमचे अप्रेजल का केलं जातं ? परफॉर्मन्स बघण्यासाठीच ना? आणि जर वयाचा फरक प्रॉडक्टिव्हिटी वर पडत नसेल तर जगात विशिष्ट वयानंतर रिटायरमेंट घ्यावीच का लागते ? माणूस प्रत्येक पोस्टवर मरेपर्यंत काम का करू शकत नाही? वयोवृद्धांपेक्षा तरुण माणसे अधिक कामसू अन नवी स्किल्स आत्मसात केलेली असतात, म्हणूनच तर कंपन्या तरुणांना प्रेफरन्स देत असतील ना?
कोणी थेट तोंडावर म्हणत नसलं तरी सत्य हेच आहे की काही वयानंतर बऱ्याच वृद्धांची अर्थव्यवस्थेत योगदान द्यायची क्षमता शून्य होते. ते नैसर्गिक आहे त्यात कुणी काहीच करू शकत नाही

विलभ चा मुद्धा बरोबर असला तरी.
ज्येष्ठ नागरिक आणि तरुण पिढी ह्यांचा परस्पर संबंध आहे.
ह्या दोन्ही अवस्थेत एकमेकाशी पूरक भूमिका नसेल तर दोन्ही अवस्थेत त्रास होण्याचा संभव जास्त आहे.
आता सरासरी 35 वर्षापर्यंत लग्न होते आणि मुल 36 ते 38 वर्षापर्यंत.
मुल जेव्हा नवीन जॉब स्किल हस्तगत करत असते,शिक्षण घेत असतात तेव्हा त्याच्या पालकाचे वय 56 ते 58 वर्ष पर्यंत झालेलं असते.
मग शिक्षण वरचा खर्च थांबवावा की स्वतः ची म्हातारपण ची तरतूद करावी हा विचार जेष्ठ नागरिक ना येवू शकतो.
पाहिले हा विचार येत नव्हता कारण म्हातारपणी स्वतः कडे बिलकुल पैसे नसले तरी मुल सांभाळत असत त्या मुळे आहे ते सर्व मुलांवर च खर्च केले जायचे.
पण दोन पिढ्या मधील दरी रुंदावत गेली तर म्हातारपणाची तरतूद आणि त्या मधून जमले तसे मुलांचे शिक्षण हा विचार बळावू शकतो.
तरुण पिढी शिक्षित तेव्हाच होईल जेव्हा जेष्ठ नागरिकांना जगण्याची हमी तरुण पिढी कडून मिळेल.

मग शिक्षण वरचा खर्च थांबवावा की स्वतः ची म्हातारपण ची तरतूद करावी हा विचार जेष्ठ नागरिक ना येवू शकतो.
पाहिले हा विचार येत नव्हता कारण म्हातारपणी स्वतः कडे बिलकुल पैसे नसले तरी मुल सांभाळत असत त्या मुळे आहे ते सर्व मुलांवर च खर्च केले जायचे.

<<

शिक्षणाची योग्य प्रकारे विल्हे-वाट लावण्याचे काम आपल्याकडे जोमाने सुरू आहे.

माझ्या लहानपणी ऑल्मोस्ट फुकट मिळणारे शिक्षण आता अमेरिकन स्टाईलने परवडण्याच्या बाहेर नेण्यात आपण यशस्वी होत आलो आहोत. तेव्हा, मुलाचे शिक्षण जाउ द्या उडत, त्याला एज्युकेशन लोन काढून द्या. तो आयुष्यभर फेडत बसेल. आपले पहा, असा कुंपणाच्या इकडच्या बाजूने (म्हणजे म्हातरपणचा) सल्ला.

***

विषय गहन आहे.

खासगी व्यावसायिक, शेती करणारे लोक कधी "रिटायर" होतात असे मला तरी वाटत नाही. झालेच तरी १००% काम थांबवण्याचे वय 'हातपाय काम करायचे बंद होईपर्यंत' किंवा 'स्मृतीभ्रंश होईपर्यंत' इतके असते, असे बहुतेकदा पाहण्यात आहे.

रहिला प्रश्न रिस्पेक्टचा.

वय वाढले किंवा केस पांढरे झाले म्हणजे आपोआप अक्कल येते, माणुस वंदनिय पूजनीय वगैरे बनतो, हे मूर्खपणाचे विचार आहेत. नैसर्गिकरित्या कमकुवत व्यक्तिंना आपण मदत करतो, थोड्या कणवेने वागवतो तितकेच ज्येना यांना वागवायची गरज आहे/असते. मान सन्मान वगैरेचा संबंध नाही.. व्यक्तिसापेक्ष आदर कमवला असेल तितका देणे.

***

एक कॉमी म्हणून आयडि आहेत, त्यांच्या प्रतिसादात 'पेन्शन हा अधिकार, पगार कमी करून पेन्शन हा हिशोब' वगैरे क्लासिकल पेन्शन अनुज्ञेय असलेल्या सरकारी नोकरांचे विचार वाचून फिस्स्कन हसू आलं, इतकेच नमुद करतो.

बाकी लिहिण्यासारखं बरंच आहे, पण आजकाल फार लिहावे वाटत नाही..

@आ.रा.रा. छान प्रतिसाद.
तुमची लिहायची इच्छा असेल तर तुमचे पॉईंट्स जाणून घ्यायला खरंच आवडले असते.

बाकी पेन्शनचा भार कोणीही उचलत नाही. हे पेन्शन त्यांनी कमावलेला असते. त्यांचे पेन्शन हे नोकरी देताना ठरले असते. तुम्ही पेन्शनचा अकौंटींग बघितले तरी लक्षात येईल की पेन्शन हे पगार कमी करून साचलेले असते, पण दिसताना उगाच पगाराच्या वरकड मिळालेले सत्पात्री दान असे वाटते. तसे ते नसते.

Submitted by कॉमी on 26 November, 2020 - 19:57

>>
होय हे एका अर्थाने सत्पात्री दानच आहे पुढच्या पिढीनं मागच्या पिढीला केलेलं. कारण पेन्शन देतानाच देणारा भविष्यात अर्थव्यवस्था आणखी मोठी झालेली असेल हे गृहीत धरत असतो आणि ती मोठी करण्यात पुढल्या पिढीचे रोजगारी तरुणच मोठा हातभार लावतात (भले त्याचा कुठेही उल्लेख नसला तरी). Increased economy (by youngs) is an implicit pre-condition for sustained pension promised (for oldies) in past .

समजा तुम्ही ३० वर्षांपूर्वी तुम्ही काम करत होतात, तेव्हा पूर्ण पगार न घेता तुम्ही त्याचा काही हिस्सा बँकेत ठेवू लागलात, जेणेकरून निवृत्तीनंतर ४-५% च्या व्याजावर तुम्ही गुजराण करू शकाल. आता हे व्याज द्यायला बँकेकडे पैसे येतात कुठून ? तर कर्जाच्या माध्यमातून बँकेला जे १०-१५% व्याज मिळते त्यातून.
हे कर्जाचे व्याज नेमाने फेडणारे बहुतांशी रोजगारी तरुण आहेत, ज्यांनी आपल्या गरजांसाठी, उद्योगासाठी पैसे उधार घेतलेत. यातूनच अर्थव्यवस्थेला चालना मिळते. आज जर एका विकसनशील देशातली ६०% जनता अर्थव्यवस्थेत ऍक्टिव्ह आहे, तर साहजिकच त्यांनी काढलेल्या कर्जाच्या व्याजावर बँक तुमचे ४% रिटर्न्स सहज मिळतील.
आता समजा बँकेत कर्जे काढणारी जनता खूप कमी झाली अन बचत खाती वाढली. साहजिकच बँकेचे कर्जाचे उत्त्पन्न गडगडायला लागेल. काल जिथे बचतीवर ४% मिळायचे तिथे १-२% वर व्याज येऊन ठेपेल.परिस्तिथी अशीच राहिली तोच आकडा शून्यावर येईल.

ही बँक म्हणजेच देशाची अर्थव्यवस्था आणि तुमचं व्याज हेच तुमचं पेन्शन असं समजा म्हणजे चित्र स्पष्ट होईल. प्रगत देशात नेमकं हेच होतंय, तरणी मानसे कमी झाल्यानं अर्थव्यवस्था मंदावली, पण म्हातारी वाढल्यानं त्यांच्या पेन्शनचा सगळा भर संख्येनं कमी असलेल्या तरुणांवर आली. ग्रीस डबघाईला गेला, ऑस्ट्रेलिया, इटली चीनच्या कच्छपी लागली, जर्मनी-फ्रान्सने मोठ्या संख्येने इमिग्रण्टस घेतले, जपानच्या सीमा ज्या इतक्या वेळ बाहेरच्यांसाठी बंद होत्या त्या थोड्या ढिल्या केल्या गेल्या ... सगळ्या मागे एकच कारण आहे, घटते तरुण आणि वाढते म्हातारे.
म्हणूनच Increased economy (by youngs) is an implicit pre-condition for sustained pension promised (for oldies) in past . पेन्शन हा हक्काची कमाई नाही तर पुढच्या पिढीनं केलेली मदत आहे तीही तेव्हाच जेव्हा इकॉनॉमी चढती असेल.

विषयात नाविन्य नाही, पण छान चर्चा चालु आहे. मी बरेच प्रतिसाद दुपारी वाचले, त्यामुळे स्पेसिफिक आयडी आठवत नाहीत, पण साधना, विलभ, कारवी, दिगोचि प्रतिसाद विशेष अपील झाले. अमांचा प्रतिसाद नेहमीप्रमाणे मिश्किल Happy

अर्थ व्यवस्था ही अनेक घटका वर अवलंबून असते त्या मध्ये तरुण लोकांची संख्या हा एक अनेक घटका मधील एक घटक झाला.
केनिया,आफ्रिकेतील गरीब देश मध्ये तरुण लोकांची संख्या पुरेशी आहे पण अर्थव्यवस्था
अविकसित आहे.
देशातील काही राज्य,बाजू चे देश तरुण लोकांची संख्या पुरेशी आहे पण अर्थव्यवस्था नाजूक आहे.
फक्त तरुण लोकांची संख्या असली की अर्थव्यवस्था तेजीत येते हे काही सत्य नाही.
1 ते 20 वर्ष वय असलेल्या मुलांचे अर्थ व्यवस्थेत काय योगदान असते.?
अर्थव्यवस्थेत योगदान असणारा वयोगट हा 30 वर्ष वयाच्या पुढील आणि 50 वर्ष वयाच्या आतील च आहे.
म्हणजे 60 ते 80 वयोगट आणि 1 ते 20 वर्ष वयाचा वयोगट ह्यांची तुलना होवू शकते.(आर्थिक क्षेत्रातील योगदान ह्या निकषावर)
जॉब स्किल असलेली नवीन पिढी निर्माण करायची असेल,उच्च शिक्षित तरुण पिढी निर्माण करायची असेल तर त्या साठी गुंतवणूक तर करावीच लागते .
आणि ही गुंतवणूक पाठची पिढी करत असते.
हीच गुंतवणूक महत्वाची असते .
गुंतवणूक हा शब्द आला की गुंतवणुकी मधून रिटर्न किती मिळणार हा व्यवहार आलाच.
मग ती रिटर्न भावनिक स्वरूपात असेल किंवा आर्थिक.

हम्म...
विलभ, धन्यवाद. छान प्रतिसाद.

अर्थ व्यवस्था ही अनेक घटका वर अवलंबून असते त्या मध्ये तरुण लोकांची संख्या हा एक अनेक घटका मधील एक घटक झाला.
केनिया,आफ्रिकेतील गरीब देश मध्ये तरुण लोकांची संख्या पुरेशी आहे पण अर्थव्यवस्था
अविकसित आहे.
देशातील काही राज्य,बाजू चे देश तरुण लोकांची संख्या पुरेशी आहे पण अर्थव्यवस्था नाजूक आहे.
फक्त तरुण लोकांची संख्या असली की अर्थव्यवस्था तेजीत येते हे काही सत्य नाही.

Submitted by Hemant 33 on 27 November, 2020 - 11:27
>>

काम करणारे लोक हाच अर्थव्यवस्था वाढवणारा सगळ्यात महत्वाचा घटक आहे. In fact, it is the only factor that brings prosperity. फक्त तुम्ही त्याला कसं वापरून घेता यावर इकॉनॉमीच भविष्य अवलंबून असतं. छोट्या मोठ्या कंपन्यात एचआर (ह्यूमन रिसोर्स ) डिपार्टमेंट फक्त रांगोळ्या काढायला नाहीये, त्यामागे कंपनीची खूप महत्वाची जबाबदारी आहे. मानवी व्यवस्थापनाचं सगळ्यात उत्तम उदाहरणच द्यायचं झालं तर

इस्राईल- जेव्हा निर्माण झाला तेव्हा फक्त वीतभर लांबीचा वाळवंटी तुकडा होता. चारी बाजूनं सतत आक्रमणाचा धोका. देवाची करणीही अशी का इस्राईलच्या जवळजवळ सगळ्या शेजार्यांकडे तेलाचे मोठे साठे पण यांच्या वाट्याला तेलाचा एक थेंबही नाही. पण केवळ २० वर्षात त्यांनी तरुणांच्या शिक्षणात, तंत्रज्ञानात जी गुंतवणूक केली का तो देश आता अन्नधान्यात, शस्त्रास्त्रांत स्वयंपूर्ण झाला. कारण? कामसू जनतेच (ज्यात आजही बरेच तरुण आहेत) योग्य मॅनेजमेंट.

सिंगापूर - जेव्हा मुक्त झाला तेव्हा 'प्रशांत सागरातलं एक मामुली बंदर' हीच सिंगापूरची ओळख होती. खाण्यापिण्यापासून गाड्याघोड्यापर्यंत सगळं आयात करावं लागे (अजूनही करावं लागतं). संपत्ती म्हणावी तर एकच, सिंगापुरी जनता. पण तिथल्या राज्यकर्त्यांनी आपली मोक्याची जागा ओळखली आणि जनतेच्या शिक्षणात, विशेषतः वित्त उद्योगात गुंतवणूक केली. आज अशी एकही जागतिक बँक नाही जिची शाखा सिंगापुरात नाही, अन असा एकही देश नाही ज्याचं विमान सिंगापुरात उतरत नाही. कारण ? कुशल मनुष्यबळ व्यवस्थापन. आजही सिंगापूर कुशल तरुणांना सामावून घेण्यासाठी विशेष प्रयत्न करतं ते यासाठीच.

जपान - उगवत्या सूर्याच्या या देशाला शापही तितकेच आहेत. सततचे भूकंप, तुकड्यात विभागलेली बेटं, खनिजसंपत्तीचा तुटवडा वर दुसऱ्या महायुद्धात झालेलं अपरिमित नुकसान. पण एचआर मॅनेजमेंटची कमाल बघा, तिथल्या तरुणांनी बघता बघता जपान राखेतून फिनिक्स पक्षासारखा बाहेर काढला. आज तिथली अर्थव्यवस्था मंदावलीय म्हणूनच बाहेरील तरुणांसाठी जपानने आपले इमिग्रेशनचे नियम थोडे शिथिल केलेत. कारण ? youth is the main driver.

सौदीला फक्त तेलांचे साठे मिळून फायदा नव्हता, त्यावर काम करण्यासाठी तरुण हात त्यांना बाहेरून मागवावे लागले.

याउलट आफ्रिकेत पहा, मुबलक सुपीक जमीन, एक तेल सोडलं तर कोळसा, सोन इत्यादी खनिजांचे मोठमोठे साठे. पण तिथल्या माणसात शिक्षणाचा कमालीचा अभाव, भयंकर रोगराई अन सततची यादवी युद्ध, विकास होईलच कसा?

तरुणांचं मॅनेजमेंट असेल तर शून्यातूनही विश्व निर्माण होतं, नाहीतर आफ्रिकेसारखं सगळं असूनही नसल्यासारखंच.

अर्थव्यवस्थेत योगदान असणारा वयोगट हा 30 वर्ष वयाच्या पुढील आणि 50 वर्ष वयाच्या आतील च आहे.
म्हणजे 60 ते 80 वयोगट आणि 1 ते 20 वर्ष वयाचा वयोगट ह्यांची तुलना होवू शकते.(आर्थिक क्षेत्रातील योगदान ह्या निकषावर)

Submitted by Hemant 33 on 27 November, 2020 - 11:27
>>

नक्कीच. मी जेव्हा तरुण म्हटलंय तेव्हा २० ते ६० यादरम्यानच्या लोकांनाच गृहीत धरलंय, जी प्रमुख वर्किंग फोर्स आहे. प्रश्न एवढाच आहे ही जर देशातली सुबत्ता उतरणीला लागली तर ती म्हाताऱ्यांवर खर्च व्हावी का तरुणांवर अन पोरांवर. (मुळात सुबत्ता असती तर हा प्रश्नच उद्भवत नाही, पण वरच्यानं सगळी साधनसंपत्ती लिमिटेड ठेवलीय त्याला कोण काय करणार)

फक्त मला एवढंच सांगा, जेव्हा घरात अन्नानदशा असते तेव्हा जेवणात कुणाला प्राथमिकता मिळते? वृद्धांना कि वाढत्या मुलांना?
लक्षात ठेवा, कुर्हाडीचे पहिले घाव वठलेल्या झाडावर पडतात रोपट्यावर नाही, असं का ?

जॉब स्किल असलेली नवीन पिढी निर्माण करायची असेल,उच्च शिक्षित तरुण पिढी निर्माण करायची असेल तर त्या साठी गुंतवणूक तर करावीच लागते .
आणि ही गुंतवणूक पाठची पिढी करत असते.
हीच गुंतवणूक महत्वाची असते .
गुंतवणूक हा शब्द आला की गुंतवणुकी मधून रिटर्न किती मिळणार हा व्यवहार आलाच.
मग ती रिटर्न भावनिक स्वरूपात असेल किंवा आर्थिक.

Submitted by Hemant 33 on 27 November, 2020 - 11:27
>>

जर ही गुंतवणूक असेल तर चला आपण तिला गुंतवणूक म्हणूनच पकडू. समजा आज तुम्ही सगळीच्या सगळी गुंतवणूक शेतीत लावली. सुरुवातीला सगळे कामसू हात असल्यानं चांगलं उत्त्पन्न आलं. वर्षागणिक कुटुंबाचा पसारा वाढत गेला पण जमीन एका विशिष्ट मर्यादेपलीकडे वाढू शकत नाही, त्यामुळं तीची वाढ थांबली. पुढे भविष्यात अशी वेळ आली का कामाचे हात कमी झाले, पण खाणारी तोंडे मात्र भरमसाठ आहेत.
आता सगळ्यांचं पोट भरायला तुमच्याकडं पर्याय काय?
१) बाहेरून दुसऱ्याची, नव्या दमाची मुलं मागवणे (जर जन्मदर सगळीकडेच कमी होत असेल तर हा पर्याय आपोआप रद्द होतो) aka इमिग्रेशन
२) आहे त्यांच्याकडूनच बळजबरीनं काम करून घेणं, कामाचे भयानक तास (जे जपानमध्ये आजही चालत)
३) आपण आपली खायची गरज कमी करणे, जे उत्त्पन्न आहे ते मुलांसाठी ठेवून काशीयात्रेस निघून जाणे (जे इतर पशुप्रण्यात चालतं)

यातला कुठला पर्याय तुम्ही निवडाल, जरा सांगाल का?

पुढच्या पिढीची तुलना इतर गुंतवणुकीबरोबर करणं हेच मुळात लॉजिकल नाही. कुठलाही सजीव आपल्या पिल्लात गुंतवणूक स्वतःचं पोट भरायला करत नाही, तर आपल्या प्रजातीच्या सर्वायवल साठी करतो.
बाकीच्या लाख गुंतवणुकी बुडाल्या तरी फरक पडत नाही. पण पुढची पिढी गेली का तुमची जेनेटिक लाईन तिथंच संपली समजा.

विलभ, आपल्या पोस्टीत "अ‍ॅक्शन आयटम" काय ते नक्की समजले नाही. ज्या वृद्धांनी तरूण असताना अमुक ढमुक इतके पेन्शन मिळेल म्हणून नोकरी स्वीकारली त्यांना आता पेन्शन नाकारायचे? ही तर फसवणूक होईल. त्यांनी कुठे जायचे? ह्या पुढे तरूण लोकांना पेन्शन देवू नये असा मुद्दा असेल तर तसे होतच आहे.

ज्या देशांचे सरासरी वय लहान आहे (उदा: भारत २६.८ वर्षे वि अमेरिका ३७.९ वर्षे) तिथेही पेन्शन मोडीतच निघत आहेत. तरूणाई असूनही काही उपयोग दिसत नाही. मला खरंच कळलं नाही की नेमके काय म्हणायचे आहे. (माझ्या बुद्धीचा दोष, पेशंस दाखवावा ही विनंती).

विलभ म्हणताहेत त्या लॉजिकने वीसच्या आतले सगळेही नॉन प्रॉडक्टिव्ह असेट्स ठरतात. किंवा आपण त्यांना मोठा जेस्टेशन पीरियड (प्रतीक्षा कालावधी) असलेल्या इन्व्हेस्टमेंट म्हणू.
ज्यांनी यांत गुंतवणूक केली नाही त्यांचं स्वतःचं भवितव्यही धोक्यात येतं.

मात्र त्यांच्या मांडणीतून एक लक्षात आलं की पुढल्या पिढीने आपली (म्हणजे आताच्या पिढीची) जबाबदारी घेण्याची अपेक्षा आपण वैयक्तिक पातळीवर ठेवली नाही, तरी समाजाच्या पातळीवर ठेवण्याला पर्याय नाही.

@विलभ
माहितीपूर्ण उत्तम प्रतिसाद!!

एक पॉइंट तर क्लिअर झाला की तरुण लोकांची संख्या ही जेष्ठ नागरिकांना आर्थिक सुविधा देण्यासाठी गरजेची आहे .
फक्त तरुण नागरिकांची संख्या च नाही तर ते तरुण योग्य स्किल असणारे हवेत आणि त्यांना योग्य संधी उपलब्ध हवी.
.म्हणजे ही एक प्रकारची साखळी च आहे संधी निर्माण होणारी स्थिती निर्माण करणे हे मिडल एज ग्रुप चे काम आहे आणि स्किल develop करणे हे तरुण वयातील नागरिकांचे काम आहे.
दोघांच्या जबाबदाऱ्या एकमेकास पूरक असायलाच हव्यात.
हाच विचार पुढे नेला तर तरुण आणि वरिष्ठ नागरिक हे परस्पर वर अवलंबून आहेत.
म्हातारपण सर्वानाच येणार आहे ते स्किप करायची सोय नाही.
ज्येष्ठ नागरिक ची काळजी घेणे ही योग्य वातावरण निर्मिती साठी गरजेचे आहे ते टाळता येणे शक्य च नाही ती टाळू न एकच पिढी जबाबदारी मधून मुक्त होईल पण दुसरी उत्तम पिढी निर्माण होण्यावर त्याचा परिणाम होईल.
ज्येष्ठ नागरिकांना आदर नको पण आधार हवा असतो.
आणि ह्या आधाराची गरज शरीर पूर्णतः अशक्त झाल्यावर लागते.
शारीरिक हालचाली साठी दुसऱ्या व्यक्ती वर अवलंबून असण्याचा काळ हा कमीत कमी 6 महिने ते जास्तीत जास्त 10 वर्ष पर्यंत असू शकतो.
आताच्या लाइफ स्टाइल मुळे मुलांना ही जबाबदारी घेणे अवघड वाटत असेल तर सार्वजनिक स्वरूपात यंत्रणा निर्माण करावीच लागेल.
ज्येष्ठ नागरिकांना जास्त व्याज देणे ही पद्धत आपण सध्या वापरात च आहे.
त्यांना आर्थिक स्थैर्य साठी ते आवशकय आहे.
टॅक्स मधून सवलत.
आरोग्य सुविधा कमीत कमी खर्चात उपलब्ध करून देणे .
आणि घरातून हॉस्पिटल पर्यंत ambulance सुविधा तत्काळ उपलब्ध करून देणे कमी किमतीत.
अशा विविध मार्गे आपण हा प्रश्न हलका करू शकतो पण टाळू शकत नाही.

ज्येष्ठ नागरीकांना जास्त व्याज हे ते ज्येष्ठ आहेत म्हणून नव्हे तर त्यांनी आयुष्यभर कमावलेली पुंजी आकर्षीत करण्यासाठी बँकांनी टाकलेला फास आहे हे अनेकांना लक्षात आलेले नाही.

वृध्द आश्रम हा पर्याय योग्य वाटत नाही.
माणसाची एक उपजत च वृत्तीच असते की त्याला स्वतःच्या मनासारखं राहण्यात आनंद मिळतो.
दुसऱ्याच्या सल्ल्याने स्वतः चे आयुष्य जगण्यास कंटाळा येतो.नकोस वाटते.
वृध्द आश्रम मध्ये जेवणा पासून झोपण्या पर्यंत च्या क्रिया ह्या दुसऱ्या व्यक्ती नियंत्रित करत असतात त्या मुळे तेथील जीवन नीरस वाटण्याची शक्यताच जास्त आहे.

पुढल्या पिढीने आपली (म्हणजे आताच्या पिढीची) जबाबदारी घेण्याची अपेक्षा आपण वैयक्तिक पातळीवर ठेवली नाही, तरी समाजाच्या पातळीवर ठेवण्याला पर्याय नाही. >> Happy I am struggling with this piece. वृद्धांकडून/पेशंन फंडांकडून उद्योग चालवायला भांडवल घ्यायचं पण परत द्यायची वेळ आली की तरूण पिढीने वृद्धांची जबाबदारी घेतली असं म्हणायच. स्वतः आधी भांडवल घेतलं मग ते परत करायची जबाबदारी नको? पैसा आणि श्रम हे परस्परपूरक आहेत. पैसा वाढवायला श्रम लागतात तसेच श्रमाचा वेळेवर मोबदला द्यायला पैसा लागतोच, थोडीच चिंचोके चालतात.
असो. ह्या विषयावर माझे वाचन फार नाही तसेच इथली माहिती समजत नाहीये. म्हणून माझी शेवटची पोस्ट.

@ नवीन Submitted by सीमंतिनी >>>>
पुढल्या पिढीने आपली (म्हणजे आताच्या पिढीची) जबाबदारी घेण्याची अपेक्षा आपण वैयक्तिक पातळीवर ठेवली नाही, तरी समाजाच्या पातळीवर ठेवण्याला पर्याय नाही.
--- याचा मला लागलेला अर्थ : एका क्ष मुलाने त्याच्या आईवडिलांची उपेक्षा केली / त्यांनी मुलाकडून सांभाळले जाण्याची वैयक्तिक पातळीवर अपेक्षा ठेवली नाही, तर कुटुंबातील दोन पिढ्यात आर्थिक देवाण-घेवाण / जबाबदारी उचलणे हा सीन दिसणार नाही. (= मुलगा बापाला विचारत नाही)

पण देश पातळीवर असे अनेक क्ष मुलगे नोकरी/व्यवसय करून संपत्ती निर्माण करतायत. ती संपत्ती आता अनुत्पादक असलेल्या आणि पेन्शन घेणार्‍या आईवडिलांपर्यंत पोचतेच आहे. म्हणजे अप्रत्यक्षपणे आजोबा-आजी लोक अनेक क्ष मुलांच्या समुदायाकडून "सांभाळले" जातच आहेत.

************

दोन पिढ्यांनी एकमेकांसाठी पैसा पुरवणे, श्रम घेणे, काही करणे या गोष्टी ओव्हरलॅपिंग आहेत. त्याची युनिट बाय युनिट मोजमाप + तुलना / परतफेड नाही होऊ शकणार.
कोणी कोणासाठी काय केले हे दिसून येईल ( quantitative + tangible).
किती केले, कसे केले हे गुणात्मक ( qualitative + intangible ) असेल.

आपल्या कुवतीनुसार, प्रेमाने आणि प्रामाणिकपणाने एकमेकांच्या (पालक <--> मुले) किमान / अत्यावश्यक गरजा पुरवणे -- ज्यामुळे अवलंबून असणार्‍या पार्टीला वर्तमानात जरूरीचे मानसिक, शारीरिक, सामाजिक स्थैर्य मिळेल आणि भविष्याबद्दल उमेद टिकून राहील. इतके करता आले तरी पुरेसे आहे.

पुन्हा कुवत, किमान, अत्यावश्यक, जरूरीचे हे सापेक्ष आहेच -- याचे निकष केसगणिक, काळाप्रमाणे आणि पार्टींच्या स्वभावाप्रमाणे बदलतील.

धन्यवाद कारवी. आधीच्या ही पोस्टी नेमक्या होत्या. ह्म्म... तुझ्या पोस्टीने मुद्दा जरा कळला असं वाटतंय... पण जे कळलं ते पटत नाहीये आता Happy (शेवटची पोस्ट म्हणाले मगाशी पण कारवीच्या स्पष्टीकरणानंतर एक अजून लिहून जाते.)

देशपातळीवर क्ष तरूण व्यक्ती नोकरी/व्यवसाय करून संपत्ती वाढवत असल्या तरी ती नोकरी/व्यवसाय उभे करायला जे भांडवल लागले ते आधीच्या पिढीकडूनच आले. उदा: कोकाकोला कंपनी अनेक तरूणांनी श्रम करून वाढवली तरी वेळीच TIAA-CREF अशा शिक्षकांच्या पेंशन फंडाने गुंतवणूक करून अंशतः भांडवल दिले म्हणून कंपनी वाढली. त्यांनी गुंतवणूक वेळेवर केली नसती तर वृद्धांना जसे पेशंन मिळाले नसते तसेच तरूणांना वेळेवर पगार मिळाले नसते. आपल्याला वेळेवर पगार मिळावा ह्याची किंमत म्हणून वृद्धांना पेशंन आहे. ह्यात जबाबदारी उचलली असे असेल तर ज्याने त्याने स्वतःचीच जबाबदारी उचललेली आहे.

Pages