Submitted by स्वरुप on 18 September, 2020 - 06:43

सालाबादप्रमाणे स्पर्धा सुरु होतेय आणि धम्माल करण्यासाठी धागा सुरु करतोय..... स्पर्धा सुरु होईल तशी चर्चा जोर पकडेलच!
हा धागा आयपीएल-१३ वरच्या चर्चांसाठी, आपापल्या टीमच्या समर्थनासाठी, आवडत्या खेळाडूंचे कौतुक करण्यासाठी आणि नावडत्यांना नावे ठेवण्यासाठी, जाणकारांच्या अचूक विश्लेषणासाठी, वादविवादासाठी, चिमटे काढणार्या व्यंगचित्रांसाठी आणि फॅन्टसीलीगच्या चर्चेसाठी सुद्धा!
आता पुढचे दोन-तीन महीने या कट्ट्यावर भेटत राहूयात आणि स्पर्धेचा आनंद लुटत राहूया 
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
*परवा शमीने टाकलेली ओव्हर
*परवा शमीने टाकलेली ओव्हर अफलातून होती. बेस्ट ६ यॉर्कर्स. * 100% सहमत ! >> +१. फक्त समोर शर्मा नि डिकॉक होते म्हणून ऑफ बाहेर सहा ञोर्क केले का असा प्रश्न आहे. समजा एक जण पोलार्ड असता तर लेंग्थ बदलायला लागली असती त्याच्या रीच मधे नि मग लक्षात आले असते. पण एकंदर शमी जुन्या शमी सारखी बॉलिंग करतोय. ताल सूर पेस सगळे परफेक्ट जमलय.
आजची सिराजची बॉलिंग कसली जबरदस्त होती. एकदम टेस्ट च्या दर्जाची. लेंग्थ काय खल्लास होती.
अरे थांबा अजून अर्धी मॅच बाकी
अरे थांबा अजून अर्धी मॅच बाकी आहे. माझं सहावं इंद्रिय सांगतंय मॅच kkr जिंकणार.
८५ धावा कोहली, एबीडी आणि
८५ धावा कोहली, एबीडी आणि कंपनीचे उद्दिष्ट..
Lowest successfully defended
Lowest successfully defended score काय आहे आयपीएल मधला कोणाला माहीत आहे का?
कार्तिकची विकेट बघितलीत का?
कार्तिकची विकेट बघितलीत का?
अनबिलिवेबल बॅटिंग ईन्कॉम्पिटन्सी... बॉल पीच होण्याआधी हा डिफेंसिव शॉट चा स्टान्स घेऊन मोकळा...नजर बॉलऐवजी खाली ग्राऊंडकडे, तो कुठे पीच झाला कसा स्पीन होणार आहे? लेग स्पीन आहे की दुसरा कशाकशाची फिकिर नाही. आणि हे तो सातत्याने चहल, राशिद सारख्या लेग स्पीनर्स समोर करतो आहे. प्रीडीटरमीन्ड अॅग्रेसिव शॉट्स बघितले होते पण प्रीडीटरमीन्ड डिफेन्सिव शॉट्स ह्या कॅलिबरच्या प्लेअरकडून आयपीएल मध्ये पहिल्यांदाच बघितले.
(No subject)
आज kkr 84 डिफेन्ड करणार.
आज kkr 84 डिफेन्ड करणार.
सिनेमे पडल्याने आलेले प्रचंड
सिनेमे पडल्याने आलेले प्रचंड नुकसान भरून काढण्यासाठी शाहरूख खानने पैसे खाऊन मॅच फिक्स केली आहे.
Submitted by हायझेनबर्ग on 21 October, 2020 - 21:14
>>>>
शक्य आहे. तो बिजनेसमन आहे. प्रॅक्टीकल विचार करतो.
मला गंमत याची वाटली की ८५ टारगेट आहे. ६ ओवरमध्ये ४०-४५ धावा बिनबाद होतात.
पण गेल्याच सामन्यात ५ विकेट काढून पदार्पण केलेल्या लौकी फर्ग्युसनला बॉलिंग दिली जात नाही.
अश्यावेळी एखाद्याच्या ईंटेग्रिटीवर संशय घ्यायचा की खेळाच्या समजेवर हे खरेच कळेनासे होते
बोकलत - धन्यवाद
बोकलत - धन्यवाद
फॉर फिक्स' सेक...फर्ग्युसन
फॉर फिक्स' सेक...फर्ग्युसन सारखा हुकमी एक्का सातव्या ओवर पर्यंत बोलिंगला आणत नाहीत आणि लगेच चुकून दोन विकेट्स पडतात..
हि एक सॅम्पल न्यूज आहे
हि एक सॅम्पल न्यूज आहे
कोणालाच ल्हरे कारण माहीत नाही की रैना आयपीएलमधून का बाहेर आहे
त्यामुळे प्लीज अफवा पसरवू नका
सत्य समोर यायचेय तर येईल. नाहीतर राहूद्या गुलदस्त्यात.
"What the BCCI will have to do is evaluate what exactly were the reasons. If it's about his family, it's his personal reason. If it was a rift with MS (Dhoni), then it's CSK's internal issue. If he came back because of depression, then it's a mental issue. We can't let him go if he's depressed. Who'll be responsible if something goes wrong?" an official told TOI.
In an interview with Cribuzz, Raina had said that the cases of COVID-19 in CSK camp played a role in him coming back to India. "When the bio-bubble is not safe how does one take a chance? I have a family with two little kids and elderly parents. For me returning to the family was more important,"
"It was a tough decision. CSK is also like my family but when the face of my kids surfaced in Dubai and the COVID situation was not looking good, I decided to return."
उद्याची गेम म्हणजे "रेस टू द
उद्याची गेम म्हणजे "रेस टू द बॉटम" दिसतीय
आणि परवा सीएसके वाले जंटलमेन सारखे बाहेर जातील, की कधी नव्हे ते चांगले खेळून "मै डुबूंगा तो तुमको भी साथ लेके डुबूंगा" करतील पाहू
पहिल्या गेम मधे मुंबईला हरवले होते. होपफुली रोहित आणि गँग बदला घेतील.
"मै डुबूंगा तो तुमको भी साथ
"मै डुबूंगा तो तुमको भी साथ लेके डुबूंगा" >>
*परवा शमीने टाकलेली ओव्हर
*परवा शमीने टाकलेली ओव्हर अफलातून होती. बेस्ट ६ यॉर्कर्स. * 100% सहमत ! >> * -
'यॉर्कर्स'बद्दल मला एक बाळबोध शंका आहे. माझी टर न उडवतां कुणी तीचं निरसन करेल का ?
मर्यादित षटकांच्या सामनयांमुळे यॉर्कर्सना अधिकाधिक महत्व येत असूनही अगदीं मोजकेच गोलंदाज ( मलिंगा ते बुमराह, शमी इ.) हुकमी यॉर्कर्स टाकण्यात पटाईत का असावेत ? कांहीं गोलंदाज स्वाभाविकपणेच 'ऑफ सपीन', 'इन/ आऊट स्विंग' इ. टाकतात , तसं यॉर्कर्सचं नक्कीच नसावं. म्हणजेच, हे यॉर्कर्स स्पेशालिस्ट गोलंदाज स्वताचं तंत्र मेहनत घेवून विकसित करतात. मग अत्यावश्यक असूनही इतर गोलंदाजांना तें कां जमत नसावं ?
मग अत्यावश्यक असूनही इतर
मग अत्यावश्यक असूनही इतर गोलंदाजांना तें कां जमत नसावं ?>> कारण दोन इंचाच्या फरकाने त्याच फुल टॉस किंवा हाफ व्हाली मधे रुपांतर होते. शिवाय डीपिंग यॉर्कर, स्विंगिंग यॉर्करची कला वेगळीच. वकार झकास. प्रचंड मेहनती नंतरच येणारी हुकमी यॉर्करची कला.
हुकुमी यॉर्कर्स टाकू शकणार्या
हुकुमी यॉर्कर्स टाकू शकणार्या बॉलर्स चे सुद्धा लेंथ चुकून (कधी त्यांच्याकडून, तर कधी बॅट्समन ने स्वतःची पोझिशन बदलल्यामुळे) फुलटॉस पडतात. ह्याचं कायम लक्षात रहाणारं उदाहरण म्हणजे शारजाहच्या ग्राऊंडवरचा चेतन शर्माचा ‘तो’ बॉल आणी जावेद मियांदाद चा ‘तो’ शॉट. हाय रिस्क - हाय रिवॉर्ड ऑप्शन आहे. अर्थात काही बॉलर्स सरावानं, अंगभूत टॅलेंटमुळे इतरांपेक्षा सरस यॉर्कर्स टाकू शकतात.
बॅट्समन ने स्वतःची पोझिशन बदलून यॉर्कर्स चुकवल्याची आणखी काही पटकन आठवणारी उदाहरणं म्हणजे १९९६ वर्ल्डकप क्वार्टर फायनल - जडेजा वि. वकार, मागच्या वर्षीच्या आयपीएलमधला हार्दिक पांड्या आणी धोनीचे हेलिकॉप्टर शॉट्स.
प्रत्येक चेंडू हा फलंदाज व
प्रत्येक चेंडू हा फलंदाज व गोलंदाज यांच्यातलं द्वंद्व असतं . कोणताच चेंडू हा अभेद्य व हमखास विकेट घेणारा नसतो व तो सीमापारही जावूं शकतो . पण यॉर्कर्स हे तौलनिकरित्या खूप परिणामकारक चेंडू असतात हें वादातीत असूनही, गोलंदाज तितकेसे त्याबाबत उत्सुक नसतात, म्हणून शंका आली इतकंच. प्रतिसादाबददल धन्यवाद .
पण यॉर्कर्स हे तौलनिकरित्या
पण यॉर्कर्स हे तौलनिकरित्या खूप परिणामकारक चेंडू असतात हें वादातीत असूनही, गोलंदाज तितकेसे त्याबाबत उत्सुक नसतात, म्हणून शंका आली इतकंच. >> भाऊ, माझ्या खेळण्याच्या अनुभवावरून सांगू शकतो की यॉर्कर टाकणे हे प्रचंड प्रॅक्टिसनंतर येणारे स्कील असले तरी प्रत्यक्ष मॅच मध्ये ती डिलिवरी टाकता येणे हे ईतर कुठल्याही डिईलीवरी पेक्षा फिजिकली आणि ईमोशनली जास्त एंगेजिंग आणि डिमांडिंग असते. ईन दॅट प्रेशर मोमेंट आयदर यू हॅव ईट ईन यू ऑर यू डोंट. यॉर्करच्या परफेक्ट एग्झिक्युशनसाठी जे कन्विक्शन, कोअर एंगेजमेंट, स्ट्रेटनिंग ऑफ बॉडी असा सगळा समन्वय साधणे आवश्यक असते ते टार्गेटेड गूड लेंग्थ किंवा पॉईंटेड फुल पीच डिलीवरी टाकण्यापेक्शा खूपच अवघड जाते... त्यामुळे त्याचा सक्सेस रेटही फारच कमी असतो.
त्यादिवशी बोल्टने सुपरओवर मध्ये गेल ला टाकलेला पहिला बॉल ...असाच फसलेला यॉर्कर होता आणि त्या एकाच बॉलमुळे डील सील झाले.
भाऊ, माझ्या खेळण्याच्या
भाऊ, माझ्या खेळण्याच्या अनुभवावरून सांगू शकतो की यॉर्कर टाकणे हे प्रचंड प्रॅक्टिसनंतर येणारे स्कील असले तरी प्रत्यक्ष मॅच मध्ये ती डिलिवरी टाकता येणे हे ईतर कुठल्याही डिईलीवरी पेक्षा फिजिकली आणि ईमोशनली जास्त एंगेजिंग आणि डिमांडिंग असते >> +१. अजून एक मुद्दा म्हणजे ह्यात मार्जिन ऑफ एरर फार कमी आहे त्यामूळे टाकताना येणारा मेंटल स्ट्रेस मह्त्वाचा ठरतो. प्रॅक्टिस मधे सहज जमले तरी लाईव्ह मॅच मधे जमणे ह्यात जमीन अस्मानाचा फरक पडतो.
हायझेनबर्गजी व असामीजी,
हायझेनबर्गजी व असामीजी, माझ्या शंकेचं पूर्णत: नीरसन केल्याबद्दल धन्यवाद.
*यॉर्करच्या परफेक्ट एग्झिक्युशनसाठी जे कन्विक्शन, कोअर एंगेजमेंट, स्ट्रेटनिंग ऑफ बॉडी असा सगळा समन्वय साधणे आवश्यक असते * हें मला विशेष भावलं. कारण -
मीं थोडंफार क्लब क्रिकेट खेळलो पण फास्ट गोलंदाजी केली नाहीं. गल्ली क्रिकेट खेळताना मात्र यॉर्कर टाईप बाॅल टाकताना मीं स्टंपच्या एका ठराविक उंचीवर लक्ष केंद्रित करून चेंडू टाकायचो ; गुरुत्वाकर्षण व हवा त्या चेंडूचा टप्पा मग स्टंपच्या जवळपास पाडत. माझं हें रांगडं तंत्र आठवून मला यॉर्कर स्पेशालिस्ट गेलंदाजांचं विशेष कौतुक वाटायचं कारण त्याना तर चेंडूचा वेग, चकाकी , हवेची दिशा व आदरता, इ.इ. कितीतरी गोष्टींचा समन्वय साधून अत्युच्च दर्जाच्या सामन्यांत ही किमया करावी लागते !
धन्यवाद.
गुरुत्वाकर्षण व हवा >>
गुरुत्वाकर्षण व हवा >> गुरुत्वाकर्षण तरी सर्वत्र सारखेच असते पण हवा नि बॉल वर होणारा परीणाम हे वेगळेच रसायन ठरते यॉर्क करताना हे मी तुटपुंज्या वैयक्तिक अनुभवावरून सांगू शकतो. नेहमीच्या लेदर बॉल वरून सॉफ्ट लेदर किंवा टेप बॉल खेळताना बॉलचे बदलते वजन नि त्यामूळे हवेचा होणारा परीणाम (विस्शेषतः लॅटरल प्रवाहांचा) हे लक्षात घेऊन सातत्याने यॉर्कर टाकणे प्रॅक्टीस मधेही अशक्य होते. एक गमतीची गोष्ट म्हणजे कमी रनप घेतला तर यॉर्क करणे जास्त सोपे वाटले कदाचित जास्त लक्ष केंद्रित करणे शक्य होते म्हणून असेल. कमकुवत मनगट हे अशा वेळी वरदान ठरते
आजची पांडेची इनिंग एकदम त्याचे पहिले शतक (आयपील मधले ) आठवून गेली. एव्हढा गुणी खेळाडू पण सातत्याचा अभाव असल्यामूळे मिस करून जातो. फिल्डींग तर बहुधा जगातल्या पहिल्या पाचात असावी. जाडेजापेक्षाही अधिक प्रभावी वाटते मला.
पांडे आपल्या वर्ल्ड कपच्या
पांडे आपल्या वर्ल्ड कपच्या अकरामधे पाहिजे होता. तो टीम मॅन नाही, त्याचे कुणाशी जमत नाही अस कुठ तरी वाचल होत. (की कुणीतरी पसरवल होत? ). धोनीने जसे सेहवाग, गंभीरला बाहेर ठेवले तसेच कोहली पांडेचे करत आहे दुर्दैवाने. दर मॅचला टीम बदलायची आयडीया त्यासाठीच. इतर कुणाला स्टॅबिलाइज होउनच द्यायच नाही.
फिल्डींग तर बहुधा जगातल्या पहिल्या पाचात असावी.>> सहमत.
काल मनिष पांडे मस्तच खेळला.
धोनी ने गंभीर आणि सेहवाग ला
धोनी ने गंभीर आणि सेहवाग ला मुद्दाम बाहेर ठेवले नव्हते तर त्या दोघांचा फॉर्म हा खराब झाला होता.
सेहवागचा कदाचित नसेल पण
सेहवागचा कदाचित नसेल पण गंभीरचा फॉर्म होता.
बोकलत, त्या वेळी प्रश्न हा
बोकलत, त्या वेळी प्रश्न हा होता की रोहित शर्मा बरोबर कोण येणार, धवन की गंभीर. गंभीर भरपूर वेळी fail झाला आणि मग 2013 च्या चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये धवन ला चान्स मिळाला त्या मध्ये घावन man of the series घेऊन गेला आणि गंभीर बाहेर गेला तो गेला. धवन शर्मा ही जोडी अजूनही चांगली खेळतेय.
आजच्य सामन्याबाबत काय ठरलं
आजच्य सामन्याबाबत काय ठरलं असावे दोन्ही संघाचे?
वीस तीस रन्स तरी होतील काय
वीस तीस रन्स तरी होतील काय यांना?
अरे काय चाललय चेन्नईचे?
अरे काय चाललय चेन्नईचे?
सेहवागचा कदाचित नसेल पण
सेहवागचा कदाचित नसेल पण गंभीरचा फॉर्म होता.
>>>
नव्हता.
त्याचे दर वर्षाचे रेकॉर्ड चेक केले तरी हे सहज लक्षात येईल.
पण येस्स त्याला जास्त चान्स नंतर मिळाले नाहीत. ईंग्लंड दौर्यावर तो कसोटी मालिकेत फेल गेल्याचे आठवतेय. मग बहुधा एक भारतात चान्स दिलेला.. दोनेक ४०-५० च्या चांगल्या खेळी खेळलेला बहुधा. पण तरी बाहेर गेला. मग हळूहळू त्याचा विचारच होणे बंद झाले.
अर्थात धवन शर्माही फारच चिकटले. आणि कोहली स्वता तिसरा. त्याची मग जागा बनत नव्हती.
बाकी त्याचे भारतीय क्रिकेटच्या सुवर्णकाळातील योगदान मात्र कायम लक्षात राहील. दोन्ही वर्ल्डकप फायनलमध्ये खेळला. आणि जेव्हा धोनी कर्णधार असताना भारत पहिल्यांदा कसोटी क्रमवारीत पहिला आला तेव्हा गंभीरचेच त्या सीजनला रेकॉर्ड रन्स होते. मायदेशात तसेच न्यूझीलंडमध्येही. आणि त्या वर्षी तो आयसीसी टेस्ट क्रिकेटर ऑफ द ईयर सुद्धा होता. कमाल आहेत त्याच्या अचिव्हमेंटस. दुर्दैवाने तितके फूटेज मिळाले नाही जे एखाद्या युवराज वा सेहवागला मिळाले.
मला माहित होतं गंभीरचा फॉर्म
मला माहित होतं गंभीरचा फॉर्म न्हवता ते. मला बघायचं होतं तुम्हाला माहितीये का ते.
Pages