आयपीएल-१३ (२०२०)

Submitted by स्वरुप on 18 September, 2020 - 06:43
cricket IPL 2020

सालाबादप्रमाणे स्पर्धा सुरु होतेय आणि धम्माल करण्यासाठी धागा सुरु करतोय..... स्पर्धा सुरु होईल तशी चर्चा जोर पकडेलच!
हा धागा आयपीएल-१३ वरच्या चर्चांसाठी, आपापल्या टीमच्या समर्थनासाठी, आवडत्या खेळाडूंचे कौतुक करण्यासाठी आणि नावडत्यांना नावे ठेवण्यासाठी, जाणकारांच्या अचूक विश्लेषणासाठी, वादविवादासाठी, चिमटे काढणार्‍या व्यंगचित्रांसाठी आणि फॅन्टसीलीगच्या चर्चेसाठी सुद्धा!
आता पुढचे दोन-तीन महीने या कट्ट्यावर भेटत राहूयात आणि स्पर्धेचा आनंद लुटत राहूया Happy

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

पहिली मॅच बघितली नाही... दुसऱ्या मॅचचा शेवट बघितला!

कमाल झाली मॅच! बुमराह आणि शमीचे कौतुक आहेच पण सगळ्यात जास्त कौतुक वाटले ते मयंकचे!
तो सिक्स वाचवताना त्याने जे प्रसंगावधान दाखवले त्याला तोड नाही.... ती सिक्स गेली असती तर सगळे equation अवघड होउन बसले असते.
आणि त्यानंतर बॅटींग करताना त्याने मारलेले शॉट्स कमाल होते!

एक निरीक्षण: गेल्या काही सामन्यात राहुल आणि श्रेयस मला कप्तानी करताना जरा दडपणाखाली वाटले.... म्हणजे सीझनच्या सुरुवातीला होते तितके बिनधास्त, मोकळे वाटले नाहीत.

दोन्ही सुपर ओव्हर मध्ये रोहीत शर्मा किती कूल होता.... काल आवडलाच तो!
कोहली असता तिथे तर रागीट ऑडिशनसाठी एक आख्खा पोर्टफोलिओ बनेल इतके लूक्स मिळाले असते Wink

पण हे अश्या एकेका दिवशी तीन तीन सुपरओव्हर्सनी सर्वसामान्य प्रेक्षकांच्या अपेक्षा वाढतील नक्कीच.... आता यापुढे एखादी घासून झालेली लास्ट ओव्हर फिनिश पण मिळमिळीत वाटायला लागेल लोकांना.... लोक म्हणतील काय मज्जा नाही आली ब्वॉ! Wink

कालच्या मॅचनंतर काही गोष्टींवर शिक्कामोर्तब करायला हरकत नाही:
सुपरओव्हर मध्ये बोल्टला बॉलींग आणि पूरनला बॅटींग देवू नये!

अर्शदीप सिंग मस्त बॉलर आहे. >> +१ त्यागी पण ईम्प्रेसीव्ह वाटतो.

सुपरओव्हर मध्ये बोल्टला बॉलींग >> दुसरा पर्याय काय होता काल ? नाईल पूर्ण गंडलेला वाटतोय. मूंबई ने जास्त स्मार्ट नेस दाखवत मॅच घालवली हातातली.

चेन्नई चे काय सुरू आहे देवालाच माहित ? जाधव का खेळतोय ? गायकवाड ला अजिबात ट्राय करणार नाही का ? कोहली पड्डिकाल ला मस्त संधी देतोय.

पंत ची मजा आहे. किशन , सॅमसन कोणा लाच इच्छा दिसत नाहीये स्पर्धा द्यायची. रोहित बरोबर मयांक फिट दिसतोय ऑसी दौर्‍यासाठी

आजची मॅच अशा दोन संघात होती की (ह्या सीझन मधे) एक जिंकेल असं वाटत असताना हारून दाखवतो (राजस्थान) आणी एक जो जिंकेल असं वाटत नसताना जिंकून दाखवतो (चेन्नई). पण आज दोघंही जिथे असायला हवे होते, तिथेच राहिले. राजस्थान जिंकले, चेन्नई हारले. बटलर मस्त खेळला. सॅमसन चा २/सीझन चा स्ट्राईक रेट अबाधित राहिला.

त्यागी खरंच इंप्रेसिव्ह आहे. ह्या सीझनमधे रियान पराग ची बॉलिंग अजिबातच वापरली नाहीये राजस्थान ने.

धोनीमुळे सीएसके आवडायला लागली आणि आताश्या धोनीच आवडेनासा झालाय गेल्या काही मॅचेस मध्ये Wink >> +१
वर्ल्डकप पासून धोनी स्पीनर्सच्या विरूद्ध त्याचा गेम पूर्णपणे हरवून बसलेला दिसतो आहे. फार पथेटिक वाटते त्याला ऑकवर्ड मेक शिफ्ट शॉट्स खेळतांना बघतांना.
वर्ल्डकप च्या आधी आणि नंतर घेतलेले मोठे ब्रेक्स त्याला रिजिड बनवून गेले की काय असे वाटते.

कोहली पड्डिकाल ला मस्त संधी देतोय. >> आणि पडिक्कल मुळे फिंचचे सुरूवातीचे सलग आणि मोठे अपयश तरून गेले. Happy
मी आधीही म्हणालो होतो.... ऊदयोन्मुख खेळाडूंसाठी (खासकरून बॅट्समन) चेन्नई टीम म्हणजे तिचे मॅनेजमेंट ८-९ सीझन्स नंतरही आजिबात सपोर्टिव नाही.

खेळ आहे तो. लोकं जिंकायला खेळतात.
आजवर चेन्नई तीन आयपीएल जिंकलीय. अपवाद वगळता दरवेळी प्लेऑफला असते. विनिण्ग रेशिओ मुंबईसोबत त्यांचाच भारी आहे. त्यामुळे खरे त्यांच्या स्ट्रॅटेजीवर शंका घ्यायला नको. जिंकण्यासाठी मग ते नवीन घोडे वापरतात की जुने हा त्यांचा प्रश्न आहे.

फक्त प्रॉब्लेम असा झालाय की त्या घोड्यांचा जॉकी आता संपलाय. धोनी संपलाय. आजच्या त्याच्या खेळीत शून्य ईण्टेण्ट होते. ईटरनॅशनलमधून निवृत्ती घेतल्याने त्याचे क्रिकेट संपलेय. या वयात शरीर साथ देत नाही. तसेच आता त्याला काही सिद्ध करायलाही उरले नाही असे झालेय. त्यामुळे दिवा विझण्यापूर्वी फडफडाव असेही काही होत नाहीये. चेन्नईलाही हे कळत असावेच. पण सध्या धोनी एक ब्राण्ड म्हणून त्यांना सोबत हवा असेल. कारण शेवटी हा पैश्याचाही खेळ आहे Happy

बाकी सध्या सोशलसाईटवर जे धोनी बॅशिंग बघायला मिळते ते टिपिकल जळकुटे हुमायुन नेचर आहे. ज्यांच्याकडे कालपरवापर्यंत बोलायला फार नव्हते. यंदा मिळालेय तर तुटून पडलेत. जणू काही धोनी सध्या जे खेळतोय तसेच पुर्ण कारकिर्द खेळलाय वा तोच त्याचा दर्जा आहे अश्या आवेशात टिका चालते. सध्याचे ट्रोलिंग कल्चरच झालेय हे.

चूक!! धोनी बॅशिंग ह्यासाठी होतंय की जे त्याने preach केलं, ते तो practice करत नाहीये. तरूणांचा खेळ, अचपळता वगैरे कारणं देऊन अनेक चांगल्या खेळाडूंच्या कारकिर्दीला अवेळी नख लावणारा धोनी स्वतःवर वेळ आल्यावर शिंगं मोडून वासरात शिरण्याचा प्रयत्न करतोय ह्या हास्यास्पद कृतीवर टीका होतेय. आयपीएल च्या मूळ उद्देशाप्रमाणे नवोदित खेळाडूंना संधी न देता (त्यांच्यात स्पार्क नाही असं आज तो म्हणालाय), त्याच त्या रिजीड स्ट्रॅटेजीज ना चिकटून बसण्याच्या हट्टीपणावर टीका होतेय. तुझ्याशी वाद वगैरे घालत बसणार नाहीये मी. पण दुसरी बाजू कधीकधी मांडावी लागते, ती मी इथे मांडलीये.

आयपीएल हा पैशाचा खेळ आहे. जे यात पैसा लावत आहेत त्यांच्यासाठी आधी पैसा मग ते नवीन खेळाडूंना संधी वगैरे लोकांना सांगायचे उद्देश.

धोनीला स्वताला खेळायची ईच्छा नाही फारशी हे त्याची बॉडी लॅंगवेज बघून कळते. पण त्याचे आयपीएल खेळत राहणे हे आणखी ईतर कोणासाठी तरी आर्थिक फायद्याचे आहे. वर्ल्डकपनंतर ब्रेक घेणे पण निवृत्ती न घेण्यामागेही हेच ब्रांडींगचे गणित असावे.

असो, मी पाहिलेय ईथे लोकं मैदानावर जे घडतेय जे दिसतेय त्यानुसारच चर्चा करतात. लोकांना फिक्सिण्गची चर्चाही नको असते. क्रिकेट स्पेशली आयपीएल मैदानापलीकडेही आहे. ते समजूनच घ्यायचे नसेल तर या चर्चेला अर्थच नाही.

जेव्हा अझर जडेजा फिक्सिण्ग करत होते तेव्हा त्यात सचिन भले इन्व्हॉल्व्ह नसेल पण मांजरीसारखे डोळे मिटून दूध पित होताच. तो देखील यावर काही कधी बोलला नाही. ना बोलणार. ईतक्या मोठ्या खेळाडूलाही हे शक्य नाहीच. कारण यात त्यापेक्षाही बड्या धेंड्यांचे आर्थिक हितसंबंध गुंतले असतात.

तरी छे असे काही नसतेच म्हणून धोनी बॅशिंग करायचीच असेल कोणाला तर ते आपल्या जागी योग्यच आहेत. खुशल करावी. पण त्यातल्या ज्यांना पटेल त्यांना तरी पडद्यापलीकडची बाजू काय असू शकते हे दाखवणे मलाही गरजेचे वाटते म्हणून हा प्रपंच Happy

असो,
मला यावर वेगळा धागा काढणे अत्यंत गरजेचे वाटते. फुरसतीने काढतो.

नक्की नवीन धागा काढ आणी इथे आम्हा अल्पमती क्रिकेटप्रेमी लोकांना क्रिकेटच्या मैदानावर जे घडतं त्यावर चर्चा करू दे.

बाकी फिक्सिंग बिक्सिंग जाउ दे पण चेन्नईच्या खेळात तो दरवर्षीचा इंटेंट दिसत नाहीये (काही ठरविक खेळाडू वगळता) हे मात्र नक्की!

चेन्नईच्या संघात सगळे आलबेल आहे असे नक्कीच वाटत नाही..... सुरुवातीला रैना आणि भज्जी परत आले त्याची खरी कारणे काय आहेत?

प्रत्येक संघाचे एक कल्चर असते.... जसे राजस्थान पहील्या सीझनपासून रॉ टेलेंटला संधी देत आलाय.... म्हणजे त्या संघात दोन तीन स्टार, दोन तीन बरे नाव असलेले पण फारसे स्टारडम नसलेले गुणी खेळाडू आणि बाकी सगळे नवोदित असा मामला अगदी परवापरवापर्यंत होता.... या स्ट्रॅटेजीचा फायदा राजस्थानला फारसा मिळाला नसला तरी त्या खेळाडूना नाव आणि एक्स्पोजर मिळाले.
चेन्नईचे नेमके याच्या उलट आहे.... त्यांनी सुरुवातपासूनच कायम सीझन्ड खेळाडू खेळवलेत आणि दर सीझनला दोन तीन नव्या खेळाडूना संधी दिलीय.... आणि त्याचा फायदा चेन्नईला आत्तापर्यंत झालेला दिसलाय.

फक्त आता त्यांचा सिंह म्हातारा झालाय..... आणि स्वताचे वय लोकांच्या डोळ्यावर न येण्यासाठी आजूबाजूला समवयस्क खेळाडूंचा गराडा असणे त्याच्या दृष्टीने फायद्याचे आहे.

कारण काहीही असो.... चेन्नईचा नेहमीचा समतोल ढासळलाय आणि हा संघ आपली विजिगिषू वृत्ति हरवून बसलाय हे नक्की!

त्यात सचिन भले इन्व्हॉल्व्ह नसेल पण मांजरीसारखे डोळे मिटून दूध पित होताच >>> तुला काय म्हणायचे आहे आणि तू लिहीतोस काय! सचिन वर हा आरोप त्याच्या कट्टर विरोधकांनीही कधी केला नाही. तुला म्हणायचे आहे तो याविरोधात बोलला नाही. तू लिहीतोयस डोळे मिटून दूध पित होता - म्हणजे तो ही इन्व्हॉल्व्ह होता!

तुझ्याइतकाच मीही धोनी फॅन आहे. पण भलतीच बिले सचिनवर फाडू नको!

जेष्ठ नागरीक संघ अगदीच केविलवाणा वाटत होता आणि त्यांचा कर्णधार हताश. आता बास म्हणाव. करेलच म्हणा ही आयपीएल संपल्यावर.

हो धोनी स्वतःहून बाहेर झाला नाहीं तर त्याला दूर करतील, हे IPL आहे अत्यंत क्रूर वाटणारे कटु निर्णय लगेच घेतले जातात,

चेन्नई मॅनेजमेंट धोनी म्हातारा होईपर्यंत त्याला खेळवणार आहेत. एकवेळ आपले मायबोलीवर टाईप करणारे हात थकतील पण धोनीचे 100 मीटर सिक्स मारणारे हात कधीच थकणार नाहीत. धोनी म्हातारा झाला तरी व्हीलचेअरवर खेळायला येऊन सिक्स मारणार आणि चेन्नईला जिंकवणार.

अ‍ॅक्चुअली मला धोनीबद्दल वाईट वाटते. त्याला नेहमी सारख खेळता येत नाही हे २ - ३ वर्षांपासूनच दिसत होते. एका वेळचा भारतीय क्रिकेट प्रेमिकांच्या गळ्यातला ताईत असलेला खेळाडू, यशस्वी कर्णधार, दोन वर्ल्ड कप जिंकून देण्यात मोलाची कामगिरी बजावलेला. ज्या मुलांना फक्त गेल्या दोन तीन वर्षातला धोनी माहिती आहे त्यांचे काय मत असेल.

*जेष्ठ नागरीक संघ अगदीच केविलवाणा वाटत होता* -

पूर्वी एक जोक वाचनात आला होता -
एक गृहस्थ झेब्रा क्रॉसिंगमधून रस्ता क्रॉस करत असताना मुलानी भरलेली एक शाळेची मिनी बस त्याच्या अगदी जवळ येवून ब्रेक मारून उभी रहाते. भडकूनच तो गृहस्थ ड्रायव्हरवर ओरडतो, ' कळत नाहीं तुला कुठे थांबायचे तें !'. ड्रायव्हर शांतपणे म्हणतो, ' साहेब, माझी नाहीं,शाळेची मुलं आहेत तीं ! '

त्या गृहस्थाने विचारलेला प्रश्न कुणी धोनीला त्याच्या क्रिकेटबद्दल विचारला, तर धोनीही म्हणूं शकतो, ' माझा नाही, मालकांचा आहे हा संघ !' Wink

भाउ Happy

तू लिहीतोयस डोळे मिटून दूध पित होता - म्हणजे तो ही इन्व्हॉल्व्ह होता!
>>>>

याचा अर्थ तो इन्व्होल्व्ह होता असे नाही. अन्यथा मी सचिनचेही कधी तोंड बघितले नसते. पण त्याला बरेच माहीत असूनही तो कधी त्याविरोधात बोलला नाही. अर्थात हा देखील त्याविरोधात आरोप नाहीये तर सत्यपरीस्थितीचे मला भान आहे की हे त्याच्यासारख्या दिग्गज खेळाडूलाही धोकादायक होते.

@ फेरफटका
जे मैदानाबाहेर घडते त्याचे पडसाद मैदानावर उमटत असतात
मैदानाबाहेरच मैदानात काय घडवायचे हे ठरले असल्यास ते साधारण तसेच घडते. तिथे टेक्निकल चर्चा कामाची नसते. चर्चा सर्व अनुषंगाने झाली पाहिजे.

जसे वर कोणीतरी म्हटल्याप्रमाणे रैना आणि भज्जीचे असे बाहेर पडणे. येस्स नक्कीच झोलमाल आहे या मागे...

जसे वर कोणीतरी म्हटल्याप्रमाणे रैना आणि भज्जीचे असे बाहेर पडणे. येस्स नक्कीच झोलमाल आहे या मागे... >> दादारे... रैनाच्या सख्या काकांच्या पूर्ण फॅमिलीचा पंजाबात खून झाला म्हणून तो लगोलग निघून आला. भज्जीच्या घरात कोविड संदर्भात मेडिकल केस होती म्हणून तो आला.
आयपीएल संदर्भात फिक्सिंग बाबतीत श्रीसंत, अंकित चव्हाण ई. लोकांचे करियर संपले....चेन्नई सारखी पैसा, यश आणि मॅनेजमेंट अशी सगळ्या बाबतीत धाकड टीम बरखास्त केली गेली.... आणि आता तू म्हणतो आहेस सगळ्यच टीम्स मॅच फिक्स करत आहेत...लोढा साहेब तू आहेस तिथे येऊन बडवणार आहेत तुला. Proud

आणि आता तू म्हणतो आहेस सगळ्यच टीम्स मॅच फिक्स करत आहेत.
>>>>

मी शक्यता दाखवत आहे. जी दर सामन्यागणिक स्ट्राँग होत आहे.
एक गंमत सांगू का
अझर जडेजा जेव्हा पकडले गेले तेव्हापासून आमच्या गल्लीतील पोरांना माहीत होते की हे दोघे फिक्सर आहेत. कट्ट्यावर खुली चर्चा व्हायची. कोणी कोणाला मुद्दाम का रन आऊट केला. कोणी मुद्दाम बॉल खाऊन का खेळळे. कप्तानाने एखादा चुकीचा निर्णय का घेतला आणि पाणी घेऊन आलेल्या पोराने काय निरोप पाठवला जे त्यानंतर मॅच फिरली अशी सर्व अंगाने चर्चा व्हायची. हसणारे हसायचे. चिडणारे चिडायचे. इग्नोर करणारे इग्नोर करायचे. पण पुढे काय समोर आले ते सर्वांना ठाऊक आहे. जर ईथे आयोजकांचाच हेतू स्पर्धा रंगतदार करणे असेल तर मात्र कोणीही पकडले जाणार नाही.

आजवर चेन्नई तीन आयपीएल जिंकलीय. अपवाद वगळता दरवेळी प्लेऑफला असते. विनिण्ग रेशिओ मुंबईसोबत त्यांचाच भारी आहे.>>
खरंच? मला वेगळे मॅच दाखवले मग tv वर आणि नेट वर पण वेगळं दाखवतात नेट आणि tv पण फिक्स निषेध

Pages