Submitted by स्वरुप on 18 September, 2020 - 06:43

सालाबादप्रमाणे स्पर्धा सुरु होतेय आणि धम्माल करण्यासाठी धागा सुरु करतोय..... स्पर्धा सुरु होईल तशी चर्चा जोर पकडेलच!
हा धागा आयपीएल-१३ वरच्या चर्चांसाठी, आपापल्या टीमच्या समर्थनासाठी, आवडत्या खेळाडूंचे कौतुक करण्यासाठी आणि नावडत्यांना नावे ठेवण्यासाठी, जाणकारांच्या अचूक विश्लेषणासाठी, वादविवादासाठी, चिमटे काढणार्या व्यंगचित्रांसाठी आणि फॅन्टसीलीगच्या चर्चेसाठी सुद्धा!
आता पुढचे दोन-तीन महीने या कट्ट्यावर भेटत राहूयात आणि स्पर्धेचा आनंद लुटत राहूया 
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
आर्चिची एक ओव्हर बाकी असताना
आर्चिची एक ओव्हर बाकी असताना जयदेवला कोणी ओव्हर देऊच कशी शकतो. ही फिक्सिंग आहे.
आणि हो, एक स्पोट फिक्सिंगही
आणि हो, एक स्पोट फिक्सिंगही असते, कोण फलंदाज कोणत्या नंबरवर फलंदाजीला येणार, पहिली आणि लास्ट ओवर कोण टाकणार वगैरे.
या अनुषंगाने एबीडीचे मागे येणे, मॅक्सवेलची पहिलीच ओवर, चहलची लास्ट ओवर, सुंदरचे पॉवरप्लेमध्ये न येणे वगैरे नेहमीपेक्षा वेगळ्या गोष्टी घडल्या असू शकतील.
येनीवेज,
एबीडी विरुद्ध राजस्थान
एबीडी जिंकला
*ह्या क्षणी कशाला फिक्सिंग
*ह्या क्षणी कशाला फिक्सिंग च्या भानगडीत पडेल ? * -
निकालाचं 'फिकसींग' नसेलही पण सामने शक्यतो रंगतदार करण्याची आयपीएलची अलिखीत योजनाही कदाचित यामागे असूं शकते. कांहीं अनाकलनीय घडताना दिसलं, तर असे अंदाज मनात येणारच.
आर्चिची एक ओव्हर बाकी असताना
आर्चिची एक ओव्हर बाकी असताना जयदेवला कोणी ओव्हर देऊच कशी शकतो. ही फिक्सिंग आहे.
>>>
तो अधीच्या ओवरला आर्चरला एक कडक सिक्सर मारला ना एबीडीने, शॉट ऑफ द डे, त्यामुळे हा निर्णय घेतला असेल.
प्लेन सामना झाला आज, फार काही गंमतीशीर पक्षी संशयास्पद घडले नाही.
धोनी टॉस जिंकलाच कसा. ही
धोनी टॉस जिंकलाच कसा? ही फिक्सिंग आहे.
त्या रहाणेला कशाला खेळवताहेत
त्या रहाणेला कशाला खेळवताहेत काय माहित. त्याला घेऊन खेळणे म्हणजे संघात दहाच गडी असल्यात जमा आहेत.
मस्त आहे हा तुषार देशपांडे
मस्त आहे हा तुषार देशपांडे
त्या दिवशीही छान टाकलेली. आणि आजही छान सुरुवात. सॅम करनला घेतला त्याने
पेस आहे वेरीएशन आहे.. टिकू शकतो या फॉर्मेटमध्ये
भाऊ, तुमच्या क्रिकेटच्या
भाऊ, तुमच्या क्रिकेटच्या जाणकारीवर शंका नाही घेतली मी. एक निरीक्षण नोंदवलं. माझ्या लिहिण्यातून तसा अर्थ निघाला असला तर क्षमस्व!
राजस्थान नव-नवीन मार्ग शोधतात जिंकत असलेली मॅच हारण्याचे. ह्यातला बराचसा दोष मी स्मिथ च्या कॅप्टन्सीला देईन. १९ वी ओव्हर आर्चर ला द्यायला हवी होती. रियान परागची बॉलिंग अजिबात न वापरणं हे सुद्धा चमत्कारिक आहे. एखाद-दुसरी टीम इतकी सातत्यानं वाईट परफॉर्म करत राहिली तर टूर्नामेंटमधली चुरस कमी होते.
दोन लेफ्टी असताना लास्ट ओवर
१ ओवर १७ धावा.....
आणि
दोन लेफ्टी असताना लास्ट ओवर जडेजाला
आता देत बसा कारणे असे का केले असावे
पण अपुन पब्लिक है.. सब जानता है
हरले पुनः धोनी शिलेदार.
हरले पुनः धोनी शिलेदार.
आधी दिल्ली ची टीम खाली असायची
आधी दिल्ली ची टीम खाली असायची आणि चेन्नई वर ...या वेळेस पलटी
जे क्रिकेटचे जन्मजात पंखे
जे क्रिकेटचे जन्मजात पंखे असतात असतात ते आयपीएलच काही गल्ली क्रिकेटचा देखिल मन लावून आनंद लुटतात!
त्यामुळे असले काही पाहिले की वाईट नक्की वाटते पण क्रिकेट बघणे सुटत नाही. >>> टोटली!
आजची मॅच मस्त झाली. धवन शेवटी शेवटी नर्व्हस वाटत होता. नाहीतर इतकेही क्लोज आले नसते.
आधी दिल्ली ची टीम खाली असायची
आधी दिल्ली ची टीम खाली असायची आणि चेन्नई वर ...या वेळेस पलटी Happy
>>>>
कारण पहिल्याच पानावर आप्ल्या पहिल्याच पोस्टमध्ये ऋन्मेषने दिल्लीला आपला सपोर्ट दिला होता.
ज्यांचा अश्या गोष्टींवर विश्वास नाही त्यांनी हि पोस्ट इग्नोर करा
धोनीच्या ज्येष्ठ खेळाडू
धोनीच्या ज्येष्ठ खेळाडू संघाला आता सर्व अनुभव पणाला लावावा लागेल बाद फेरीत येण्यासाठी...
ऋन्मेऽऽष भाऊ विश्वास आहे
ऋन्मेऽऽष भाऊ विश्वास आहे तुझ्यावर मुंबई कोलकाता मॅच तु बघितली असती तर निकाल नक्कीच वेगळा लागला असता कारण शाखा ची जादू नाही चालली ना पुन्हा एकदा.
एव्हडी मोठी मांत्रिक मालकीण
एव्हडी मोठी मांत्रिक मालकीण मुंबईच्या साईडने असल्यावर शाखाची जादू फेलच होणार

हा हा हा
हा हा हा
कोणी पाहिली का आताची कलकत्ता हैदराबाद मॅच
ठरवून सुपर ओवर केली
हा हा हा
६ बॉल १८ ला सामना
लास्ट ओवर रसेलला दिली.
पहिला बॉल मोठा वाईड आणि सोबत मोठा नो बॉल.
त्यानंतर तो शॉर्ट रन अप घेऊन बॉलिंग टाकत होता. काय कारण बनवले याचे मला माहीत नाही..
पण
४ ४ ४ मस्त मारले त्या फुसक्या बॉलवर वॉर्नरने
लास्ट बॉलला २ हवे असताना अगदी दिसून येते की ठरवून बॅट फिरवलीच नाही. आणि सिंपल बॉललाही एक रन काढला..
मॅच सुपर ओवर हा हा हा
मजा म्हणजे रसेलला फोर पडत असताना कलकत्तावाले काही ॲक्टीण्गही बरोबर करत नव्हते मॅच हातातून जातेय याची
कारण शाखा ची जादू नाही चालली
कारण शाखा ची जादू नाही चालली ना पुन्हा एकदा.
Submitted by pravintherider on 18 October, 2020 - 09:06
>>>>
मुंबई मायानगरी बॉलीवूड शाहरूख खान त्याची कर्मभूमी रोजीरोटी तो कधीच ज्या थाळीत खातो त्यात छेद करणार नाही
मस्त झाली कोलकता वि.
मस्त झाली कोलकता वि. हैद्राबाद मॅच. रसेल पूर्ण फिट असता तर कदाचित शेवटच्या ओव्हर ला १८ डिफेंड करू शकला असता. पण आजचा दिवस फर्ग्युसन चा होता. हैद्राबाद विल्यमसनला द्यायला हवी तितकी व्हॅल्यू देत नाहीत हेच खरं. सुपर ओव्हरला त्याने बॅटींग करायला हवी होती.
आज मुंबईची बॅटींग डेप्थ टेस्ट होईल. अर्शदीप सिंग मस्त बॉलर आहे. खलील आणी उनाडकट पेक्षा जास्त चतुर बॉलिंग करतो.
एका दिवसात दोन सुपर ओवर ::D
एका दिवसात दोन सुपर ओवर
इथेही सुपर ओव्हर!
इथेही सुपर ओव्हर!
फिक्स असतात सामने. 100%
फिक्स असतात सामने. 100% खात्री पटली आता.
पण हि मॅच मस्त झाली.
पण हि मॅच मस्त झाली.
आधीसारखी नाटकी वाटली नाही...
फक्त शेवटी दुसरा रन घ्यायला तो कसा वळला .. गोलाकार पाथ धावला कुठच्याकुठे. उगाच लांब केला तो रन.. ते फक्त संशयास्पद वाटले.
आता सुपर ओवर बघूया कशी होते...
फिक्स असतात सामने. 100%
फिक्स असतात सामने. 100% खात्री पटली आता.
>>>
अगदी अगदी बोकलत
दुपारच्या सामन्यात आधी ६ ओवर ५७-० अश्या स्थितीतून सामना लास्ट ओवरला १८ गेला..
तिथे जेव्हा रसेलने पहिलाच बॉल हातभर वाईड आणि लाईनचा नो बॉल तो देखील ईतका पुढे पाय टाकला तिथेच मी समजून चुकलो चला हे प्रकरण फिक्स आहे..
मग काय शॉर्ट रन अप आणि दे वॉर्नरला मारायला..
पण तेच लास्ट बॉललाही असाच साधा बॉल असूनही वॉर्नरने अगदी ठरवून सिंगल काढला.
बाकी आताही मुंबईच्या सामन्यात लास्ट बॉल पुन्हा पाहिला. कसा धावला तो दुसरया रनला. जणू काही मंग्ळयानच
सुपरओवरला १ बॉल २ हवेत
सुपरओवरला १ बॉल २ हवेत
आजची तिसरी सुपर ओवर?
येस तिसरी सुपर ओवर आजची....
येस तिसरी सुपर ओवर आजची....
पण मस्त झाली ही क्लॅश.
काय यॉर्कर टाकलेत दोघांनी...
बुमराह आणि शमी.. दोघे भारतीय बॉलर.. मजा आली..
आणि राहुलची किपिंगही कमाल लाजवाब... रन आऊट
झोपा आता. याना काय कामधंदे
झोपा आता. याना काय कामधंदे नाहीत . हे रात्रभर सुपर ओव्हर खेळत बसतील.
मुंबईने पोलार्डला पाठवायला
मुंबईने पोलार्डला पाठवायला हवे होते
तो यॉर्करच्या नादात लो फुलटॉस झाला तर त्यालही सिक्स मारतो
आता आधीचे बॉलर आणि बॅटसमन
आता आधीचे बॉलर आणि बॅटसमन वापरू शकत नाही.
धमाल आहे आता
जॉर्डन दुसरी धाव कसा धावला ते
जॉर्डन दुसरी धाव कसा धावला ते पुन्हा दाखवत आहेत. दुसरया पिचवरच धावला. ५ मीटर एक्स्ट्रा धावला. ५ मीटर. लास्ट बॉलला २ धावा असताना. टोटल फिक्सींग
नजर आहे बॉस आपली... रिप्ले बघून जाणकारांनी विश्लेषण करायच्या आधीच लाईव्हमध्ये पकडला
Pages