पछाडलेल्या वास्तूत येणारे अनुभव.

Submitted by अनिळजी on 25 September, 2020 - 12:16

नमस्कार, मी काही दिवसांपूर्वी एक घर घेतलं. साधारण महिना झाला असेल आम्ही म्हणजे मी, पत्नी, आणि दोन वर्षांचा मुलगा या घरात शिफ्ट झालो. जेव्हा पहिल्यांदा हे घर पाहायला आलो तेव्हा मी आणि हिने इथे प्रचंड अस्वस्थता अनुभवली. पण स्वस्त मिळत असल्याने हे घर फायनल केलं. इथे राहायला आल्यापासून आठवड्यात वाईट अनुभव यायला लागले आहेत. आमच्या तिघांशीवाय इतरही कोणीतरी इथे वावरत असल्याचा भास होतो. वारा नसताना दरवाजे जोरात उघडझाप होणे. कोणीतरी हाक मारल्याचा भास होणे, मध्यरात्री भांडी जोरात वाजणे असले प्रकार सर्रास घडत आहेत. पाच दिवसांपूर्वी बाथरूममधला नळ अचानक सुरू झाला होता. मुलाचं वागणही बदलायला लागलंय एकटाच कोणीतरी समोर असल्यासारखा बडबडत असतो. ही या प्रकाराने खूपच घाबरली त्यामुळे सासु सासऱ्यांना काही दिवस बोलावून घेतलं होतं. काही दिवस आधार वाटला पण आता पुन्हा आम्ही एकटे आहोत. सासू सासऱ्यांनाही ईथे विचित्र अनुभव आले. त्यांनी हे घर विकून दुसरं घेण्याचा सल्ला दिलाय. ज्याच्याकडून हे घर घेतलं होतं तो आता हे सगळे आमचे भास आहेत म्हणून हात वर करतोय. सध्यातरी लगेच दुसरीकडे शिफ्ट होणं कठीण वाटतंय.अजून हानी पोहचेल असं तरी काही घडलं नाही. पण सारखे भीतीत वावरत असतो. हा प्रकार कोणी अनुभवला आहे का? आणि अनुभवला असेल तर यातून काय मार्ग काढलात?

Group content visibility: 
Use group defaults

बाबो
हा असला शोपीस बघून रोज सकाळी हार्ट अटॅक येईल

असला शोपीस बघून रोज सकाळी हार्ट अटॅक येईल

Proud

असला शो पीस नुसताच वर लावून ठेवण्यात काय मजा नाही

सकाळी सात वाजले की तो आपोआप वरून सुटून खाली अंगावर पडेल अशीपण कायतरी सिस्टीम पाहिजे

Proud
Rofl

आजकाल लोकांना फसवलं गेल्याचं वाईटही वाटेनासं झालंय.
Submitted by भरत. on 21 October, 2020 - 00:59 >> कोणीतरी आपल्याला फसवले ह्यापेक्षा ही भूतकथा खोटी निघाली (म्हणाजे भूत नव्हते) ह्याचे त्यांना जास्त दु:ख झाले आहे. Proud
फसवा की नका फसवू अमानवीय शक्ती, भूत पिशाच्च्य, पछाडलेले घर त्यातले आवाज तिथे जाणवणारी अस्वस्थता हे सगळॅ खरेच आहे हा जो त्यांचा अट्टहास आहे आणि त्यावर जे विरजण पडले त्याचा त्यांना जास्त सात्विक संताप आलेला आहे. अमानवीय धागा बंद पडला ह्याचे तर त्यांना अतीव दु:ख आहे. Lol
पृथ्वीपासून २२ हजार किलोमीटर दूरवरच्या अर्ध्या किमी व्यासाच्या ६३ हजार माईल्स पर अवर प्रवास करणार्‍या कोट्यावधी वर्षे जुन्या ऊल्केवरून शास्त्रन्यांनी एक दगड अलगद ऊचलून घेतला ह्यात त्यांना भुताटकी वाटत नाही... पण 'काल रात्री आमच्या घरात विचित्र आवाज आला पण बघितले तर तिथे कोणी नव्हते' एवढे एक भोंगळ वाक्य म्हणायचा अवकाश की ह्यांच्या घोस्टमीटरचे काटे ३६० डिग्रीत फिरायला लागतात.... स्त्रोत्रां बित्रांची जंत्री बासनातून बाहेर निघते. फारच मजेशीर आहे सगळे. कधीही न पाहिलेला भूत हा एकच शब्द ह्यांचे सगळे शिक्षण, विचार, तारतम्य रद्दबातल ठरवू शकतो ह्यावरून मला वातावरणापेक्षा निर्वात जागा शास्त्रज्ञांना जास्त का खुणावतात ह्या प्र्श्नाचे ऊत्तर मिळते. Proud

ह्यापेक्षा अशिक्षित, भोळेभाबडे लोक भुताखेतांवर विश्वास ठेवतात ते निदान नाईव तरी वाटतात हे तर तद्दन .. जाऊद्या.

मला पण आधी फसवले गेलेल्यांना दु:ख कसं काय वाटत नाही असं वाटलेलं. पण ते यातुन धडा घेऊन पुढच्या असल्याच भंपक समस्या धाग्यावर पोथ्या घरात ठेवा आणि स्तोत्र म्हणा आणि अंगारे लावा छाप उपाय सुचवणार नाहीत अशी आशा वाटते. याबाबतील 'लांडगा आला रे आला' झालं तर ते फायद्याचंच आहे की!
त्यानिमित्ताने काही लोकांनी (वावे, मानव हे चटकन आठवले) अशा गोष्टी घडल्यावर कारणमिमांसा जाणून घेण्यासाठी काय केले ते लिहिले. ते वाचुन कोणी तरी असं घडल्यावर त्यामागचा कार्यकारणभाव जाणण्यासाठी प्रयत्न करेल कदाचित. Happy

भरत, अमृताक्षर यांना अनुमोदन.

दुसऱ्या एका धाग्यावरती साधना यांनी लिहिलेले होते.की समोरची व्यक्ती खरोखरच काही सल्ला मागत असेल याच विचाराने मी मदतीचा प्रतिसाद देते. त्यांच्या म्हणण्याचा मतितार्थ हा होता.शब्द वेगळे असतील.त्यांचा स्टँड मला पटला, आवडला.

लोकांच्या श्रद्धेला नावं ठेवली की खूप विज्ञानवादी होता येते आणि मिरवता येते.
असतात काही गोष्टी दया, तुम नाही समझोगे, तर्काच्या पलीकडे .
आपला तर्क पटवून द्या पण किमान इतरांना नावे ठेवून बोअर करू नका.
---------
(टीप: माझ्या ह्या वरच्या प्रतिसादामुळे धागा हजारी गाठेल ह्याची खात्री.. मोठेमोठे लांबलचक प्रतिसाद येतील, तेवढीच tp ची सोय, serious वळण लागणार पुन्हा धाग्याला, अरर Happy )

भूत आदि शक्तींशी लढण्यासाठी स्तोत्र वाचून मनाला आधार देणे.

आमच्याकडे आजारपणाचे मानसशास्त्र नावाचे एक पुस्तक आहे. मनोकायिक आजार psychosomatic disorders बद्दल. यात शरीरात कोणताही बिघाड झालेला दिसत नाही तरीही ते नीट काम करत नाही. बिघाड झालाय असे मनालाच वाटत असते. यावरचा एक उपाय म्हणजे पाणी भरलेले इंजेक्शन देणे. त्याचा placebo effect होऊन तो मनोकायिक आजार बरा होतो.

मनाचिया घावावरी मनाचि फुंकर. आता त्यात बिघडलं काय असा प्रश्न पुढे येईलच.

(मी मानसशास्त्राचा किंवा वैद्यकाचा विद्यार्थी नाही.)

ते 'मनाला आधार देणे' पातळीवर असेल तर मला तरी त्यात काहीच बिघडलेलं वाटत नाही. वैयक्तिक पातळीवर समस्येला उत्तर महत्त्वाचं, उकल नाही झाली तरी!
पण उपाय सुचवणारा त्या पोथीला घाबरुन भूत येत नाही, स्त्रोत्रामुळे भूत येत नाही याचा प्रसार करायला लागला की मात्र तो निसरडा रस्ता होतो.
मनाला उभारी येत असेल तर प्लासिबो करायला माझी हरकत नाही.
या वाक्यात थोडा विरोधाभास वाटेल पण त्यात एक स्वच्छ रेघ आहे.

मनाला आधार द्यावा लागतो म्हणजे मन कमकुवत आहे, हे मान्य असूनही पोथी बिथी आणली की ते अमान्य केल्यासारखं होतं.

१ माझ्या मनात भुताखेताचे विचार येतात ते दूर करण्यासाठी मी पोथी वाचतो.

मला भुतेखेते दिसतात. पोथी वाचल्यावर ती पळून जातात. तुला भुते दिसतात का? पोथी वाच. पळून जातील.

मनाला उभारी येत असेल तर प्लासिबो करायला माझी हरकत नाही. >> 'तुझ्या मनातली भिती वा नैराश्य' हे खरे नाहीत हा पॉईंट प्रुव करेपर्यंत प्लासिबो चा वापर ठीक आहे... पण हीच अ‍ॅडिक्शन्ची पहिली पायरी असू शकते किंवा पॉईंट प्रुव होऊनही ते सत्य स्वीकारायची तयारी नसेल तर प्लासिबो जस्ट बीकम्स रिअ‍ॅलिटी. ऊदा. स्तोत्रांनी भुताखेतांचा नाश होणे.
आणि ईथे असेच दिसून येतआहे.. भुते ही रिअ‍ॅलिटी मान्य केल्याने त्यावर तोडगा म्हणून सुष्ट शक्तीला आवाहन करणारी स्तोत्रे, रिचुअल्स ह्या समीकरणात स्तोत्रे हा प्लासिबो न राहता रिअल फॅक्टर झाला आहे.

भुतांवर श्रद्धा ? धिस ईज अ न्यू वन Lol

हो. प्लासिबोचे अ‍ॅडिक्शन होऊ शकतेच.
लहानपणी परिक्षेला जाताना आजी देवाला आणि मोठ्या माणसांना नमस्कार कर सांगे. त्याने पेपरात चांगले मार्क मिळतील अशी पुसटशी आशा ही मनात निर्माण होणार नाही याची काळजी घेऊन सांगत असे की काय हे आज वाटते. परिक्षेला अभ्यास केला असेल तरच चांगले मार्क मिळतील पण देवावर बाकीच्या अनसर्टंटी टाकून त्याचं ओझं मनातून काढ असं काही असेल का? काय माहित!
कदाचित परंपरा इतकं बाळबोध कारण असेल.
पण प्लासिबो हा अक्सिर इलाज नाही हे ध्यानात ठेवून ही स्टीअर करता यावं असं वाटतं. अगेन तो स्लिपरी स्लोप आहे यात वादच नाही.

खरेच भास होणाऱ्या लोकांना वेळीच डॉक्टरकडे न घेऊन जाता, पूजा, अर्चा, धुपारे, मांत्रिक वगैरे करत बसणारे कित्येक उदाहरणे सापडतील ज्याने मानसिक रुगणाचे अतोनात नुकसान होते.
आमच्याकडे एक हेल्थ केअर अटेंडट होता अगदी तरुण. त्याला मानसिक प्रॉब्लेम आहे हे लक्षात आले. त्याला आवाज ऐकू यायचे. विचारले असता तो माझ्याशी मला कंट्रोल करण्याचा प्रयत्न करतो, मी एकटा असताना मला जास्त सतावतो वगैरे तो सांगायला लागला. तो मला शिव्या घालतो माझ्या वाईटावर टपला आहे असेही नंतर येऊन सांगायला लागला. हा गंभीर प्रकार होता, स्किझोफ्रेनिया / बायपोलर डिसऑर्डर सारख्या आजाराची शक्यता होती.
मी आधी त्याला विश्वासात घेऊन त्याला डॉक्टरची गरज आहे हे सांगायचा प्रयत्न केला आणि मी घेऊन जातो म्हणुन सांगितले. त्याने हा तसा प्रॉब्लेम नाही डॉक्टर काही करू शकत नाही, मला कुणी जाणकार माहीत असेल तर सांगा नाही तर मी गावी जाणार आहे तेव्हा जाईन मांत्रिकाकडे सांगायला लागला, कितीही सांगितले तरी ऐकेना. मग मी त्याच्या मोठ्या भावाला फोन करुन बोलवून घेतले आणि त्याला समजावून सांगितले. वाटल्यास तुमच्या फॅमिली डॉक्टरकडे न्या आधी आणि त्यांना सगळे सांगा ते पुढे गाईड करतील सांगितले. पण त्याचाही कल "जाणकाराकडे" जाण्याचा दिसला. तो त्याला घेऊन गेला आणि दोन दिवसात हा परत आला "जाणकाराला" भेटून. त्याचे प्रॉब्लेम्स वाढत होते, आणि नाईलाजाने मला त्याला रिप्लेस करावे लागले.
नंतरही त्याने एक दोन दा मेसेज केले होते, अगदी विचित्र
त्यावरून त्याचे प्रॉब्लेम्स अजून वाढले आहेत हे लक्षात आले.
नंतर तो गावी निघुन गेला आहे कळले पुढे काय झाले माहीत नाही.

बरोबर मानव
माझ्या बहिणीचे मानसशास्त्र या विषयावर येरवडा मेन्टल हॉस्पिटलमध्ये प्रैक्टिकल्स असायचे, तेव्हा ती पेशन्टसचे एक एक किस्से सांगायची.कुणाला कुणी बोलवायचे, कुणाला कुणी मारायला येताएत असे वाटायचे..कुणी आत्ताच जेवलेले असुनही काहिही खायला प्यायला मागायचे..

Richard Feynman
@ProfFeynman
Science doesn't care about what you believe.

Beliefs don't change facts!

स्तोत्र म्हणणं वगैरे उपाय हे क्रोसिनसारखे असतात आणि ते तसेच वापरावे. क्रोसिनने तात्पुरता ताप उतरतो किंवा डोकेदुखी थांबते. पण वारंवार ताप येत असेल किंवा डोकं दुखत असेल तर डॉक्टरांकडे जाऊन याचं कारण तपासलं पाहिजे.
इथे वर बहुतेक अजिंक्यराव पाटील यांनी रात्री अचानक कावळे ओरडल्याची घटना लिहिली होती. अपरात्री आपण घरात एकटं असताना अशा वेळी आपण घाबरणं स्वाभाविक आहे. तेव्हा मारुतीस्तोत्र किंवा तत्सम काहीही उपाय करणं म्हणजे क्रोसिन घेण्यासारखं आहे. जरूर घ्या. पण नंतर गुगल करून किंवा एखाद्या पक्षीतज्ज्ञाला विचारून यामागची कारणं शोधण्याचा प्रयत्न केला तर पुढच्या वेळी क्रोसिन घ्यायची वेळच येणार नाही.
@ अजिंक्यराव, तुमचं उदाहरण चटकन आठवलं म्हणून लिहिलंय.

किल्ली , हे तू पर्सनल घेऊ नयेस असे वाटते. हाब आणि भरत हे भोळ्या लोकांच्या इमोशनल पॉईंटला हात घालून त्यांच्या फायदा घेण्याच्या वृत्तीवर बोट ठेवत आहेत असे वाटते. त्यात त्यांचा सूर कडक लागला आहे एवढंच. ह्यातून धडा घेऊन पुढील वेळी आपली इमोशनल फसवणूक होऊ द्यायची नाही हे ठरवले आणि वागलं हे ह्या बाफच फलित म्हणता येईल .

बोरकरांनी म्हटलं आहेच की भावनेला येऊ दे गा
शास्त्र-का​ट्याची कसोटी.

आपल्यासारखी लोकं भोळी असतात , मुळातच इमोशनल असल्याने साहजिकपणे येण्याऱ्या समस्येला मदत करायचा हेतू असतो. धागा लेखकाने लहान मुलांचा प्रश्न आहे असे सांगितले त्यामुळे लोकांनी इमोशनल होऊन प्रतिसाद दिलेत. त्याचा गैरवापर केलाय ह्या माणसाने.

Anilaji = hab Wink
Tyanna bolayala chance milava mhanun dhaga kadhalay.
Lol

Ase maze
Mhanane nah.i Wink

जाई+१.
पोथी, स्तोत्र वाचणं हा उपाय सांगितलेला दिसला. म्हणून त्यावर लिहिले. तो कोणी सांगितला याच्याशी देणंघेणं नाही.

Beliefs don't change facts! >> exactly.
One may believe this doesn't make sense.
Doesn't matter.

It was interesting experiment HBurg.
If manav, HB, vave, Bharat, amitv ever change ur opinion on d topic, do write here again.

आपल्यासारखी लोकं भोळी असतात , मुळातच इमोशनल असल्याने साहजिकपणे येण्याऱ्या समस्येला मदत करायचा हेतू असतो. धागा लेखकाने लहान मुलांचा प्रश्न आहे असे सांगितले त्यामुळे लोकांनी इमोशनल होऊन प्रतिसाद दिलेत. >> ise sharafat kahete hai. Happy

Okay Happy
प्रतिसाद वैयक्तिक घेत नाहीये (आधीच ofc ने वात आणलाय, हे कुठे मनावर घेत बसू Lol ),
हाब आणि भरत , वावे ह्यांचे विवेचन मलाही पटले आहे , बुद्धीला Happy
....
Come on, logic लावूनच पोट भरते मी Happy
....
पण मन तसे नाही ना!
..
माझ्यावर वेळ आली असती तर काय केले असते ह्याचा विचार करून भावनिक होऊन सल्ला दिला होता. मी स्वतः धार्मिक वगैरे आहे, जे इतरांना non sense वाटू शकतं. तसं वाटण्याला काहीच हरकत नाही Happy

Pages