पछाडलेल्या वास्तूत येणारे अनुभव.

Submitted by अनिळजी on 25 September, 2020 - 12:16

नमस्कार, मी काही दिवसांपूर्वी एक घर घेतलं. साधारण महिना झाला असेल आम्ही म्हणजे मी, पत्नी, आणि दोन वर्षांचा मुलगा या घरात शिफ्ट झालो. जेव्हा पहिल्यांदा हे घर पाहायला आलो तेव्हा मी आणि हिने इथे प्रचंड अस्वस्थता अनुभवली. पण स्वस्त मिळत असल्याने हे घर फायनल केलं. इथे राहायला आल्यापासून आठवड्यात वाईट अनुभव यायला लागले आहेत. आमच्या तिघांशीवाय इतरही कोणीतरी इथे वावरत असल्याचा भास होतो. वारा नसताना दरवाजे जोरात उघडझाप होणे. कोणीतरी हाक मारल्याचा भास होणे, मध्यरात्री भांडी जोरात वाजणे असले प्रकार सर्रास घडत आहेत. पाच दिवसांपूर्वी बाथरूममधला नळ अचानक सुरू झाला होता. मुलाचं वागणही बदलायला लागलंय एकटाच कोणीतरी समोर असल्यासारखा बडबडत असतो. ही या प्रकाराने खूपच घाबरली त्यामुळे सासु सासऱ्यांना काही दिवस बोलावून घेतलं होतं. काही दिवस आधार वाटला पण आता पुन्हा आम्ही एकटे आहोत. सासू सासऱ्यांनाही ईथे विचित्र अनुभव आले. त्यांनी हे घर विकून दुसरं घेण्याचा सल्ला दिलाय. ज्याच्याकडून हे घर घेतलं होतं तो आता हे सगळे आमचे भास आहेत म्हणून हात वर करतोय. सध्यातरी लगेच दुसरीकडे शिफ्ट होणं कठीण वाटतंय.अजून हानी पोहचेल असं तरी काही घडलं नाही. पण सारखे भीतीत वावरत असतो. हा प्रकार कोणी अनुभवला आहे का? आणि अनुभवला असेल तर यातून काय मार्ग काढलात?

Group content visibility: 
Use group defaults

रंगाऱ्याच्या हाताचे ठसे असतील घाईघाईत रंग देताना. पाऊस पडून ओल वगैरे आली म्हणून उठून दिसत असतील आणि गारवा ही त्यामुळे जाणवत असेल.

तुम्हाला इथे काही मदत मिळत नाहीये तर तुम्ही इंटरनघलवताय?आवर्जुन, वेळ का घलवताय? घाटपांडे सांगतायत त्याप्रमाणे अनिसना का नाही काँटॅक्ट करत? तुम्ही आत्तापर्यंत काय काय उपाय केलेत?

बऱ्याच वर्षांंपूर्वी टिव्हीवर कोणी ज्योतिषी लोकांनी फोन वरून विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे देतो असे कुठल्याशा बातमीच्या चॅनलवर मध्येच सुरू झाले.
पहिल्याच कुणी विचारलेल्या प्रश्नावर त्या ज्योतिष्याने अमुक वारी की तिथीला सकाळी गावा बाहेर वडाच्या की पिंपळाच्या झाडाखाली फ्यु्ज्ड बल्ब नेऊन फोडावा आणि कसलासा मंत्र की स्तोत्र म्हणावे असा काही सल्ला दिला होता.

दूरदर्शन, संगणक, स्मार्टफोन आणि अजून कसलेही शोध लागोत काही लोक त्याचा वापर असल्या भोंदूगिरी कार्यक्रमास करणारच, मिळतात त्यांना गिऱ्हाईक.

म्हणजे त्या माध्यमांचा असा (गैर/बिनडोक) वापर करणारच काही लोक असे म्हणायचंय.

आणि फ्यूज्ड बल्ब प्रमाणे निकामी स्मार्टफोनच नव्हे तर एक नवा घेऊन फोडायला सांगितला आणि ऐकणाऱ्याने तो फोडला तरीही काही आश्चर्य वाटणार नाही मला Lol

आणि फ्यूज्ड बल्ब प्रमाणे निकामी स्मार्टफोनच नव्हे तर एक नवा घेऊन फोडायला सांगितला आणि ऐकणाऱ्याने तो फोडला तरीही काही आश्चर्य वाटणार नाही >>> बल्ब, स्मार्ट फोन तर निर्जीव वस्तू झाल्या. निर्मलबाबाचा दरबार आठवला Happy
मांत्रिक लोक काहीही सांगतात आणि बिंडोक लोक तसे करतात सुद्धा Sad

हो

त्या 13 बी सिनेमातही आहे , मॉडर्न भूत मोबाईल से संपर्क करते है

इतक्या सगळ्या भयानक गोष्टी घडत असतील तर कोणीच रिस्क घेऊन राहणार नाही ,,तरीही तुम्ही राहताय म्हणून शंका येते....

हो , ते पूर्ण सिनेमाभर

मग शेवटच्या सीन मध्ये त्याला लिफ्ट मध्ये मोबाईल मध्ये भुताचा फोन येतो आणि तो भूतरुपी सचिन खेडेकर बोलतो , आजकल भूतभी मोबाईल युज करते है

आणि मग एकदम लिफ्ट खाली जोरात जाते

तो मरतो का माहीत नव्हते , पण विकिपीडियावर दिले आहे की लिफ्ट तुटून खाली पडून तो त्यात मरतो

काय चाललयं इथे. घाबरायचं सोडुन जनता सिनेमांवर चर्चा करते आहे. निदान त्या अनिळजींच्या घरातल्या हडळीच्या मनाचा तरी विचार करा.
अनिळजी तुम्ही वाईट नका वाटुन घेऊ. किस्से टाकत रहा.

स्तोत्रं, मंत्र, उपाय याने भूतखेतं जातात हे माझे म्हणणे नाही, तर या उपायांनी माणसाचे मन शांत होते. हा तात्पुरता ईलाज आहे. उगाच मांत्रिक - तांत्रिक यांच्या नादी लागुन पैसा, मनःशांती हे वाया घालवण्यापेक्षा देवाचे नाव घेणे कधीही सोयीस्कर ठरते हे माझे ठाम मत आहे.

जसे पोट भरल्यावर माणुस आनंदाने वाटेल तितकी मेहेनत घेतो. तसेच मनाचे आहे. जर मन अशांत असेल, तर माणसाचे विचार भरकटतात. मग अस्तित्वात नसलेला खेळ सुरु होतो. कामे राहिली बाजूला, भलतेच उद्योग सुरु होतात, यातुन अंधश्रद्धा जन्माला येते. देवाचे नाव घेणे ही श्रद्धा आहे, अंधश्रद्धा नव्हे.

आईची शप्पथ! मी किती सिरीयसली वाचत होते सगळं.
मग भुत आवरलेल्या घरात पसारा करुन गेलं आणि माझा वेळ, मनाला लागलेली काळजी, थोडी थोडी वाटलेली भिती सगळं फुकट गेलेलं लक्षात आलं.

अनिळजी, थोडे दिवस दम धरा मी बाबा झाल्यावर बघतो तुमच्याकडे ...म्हणजे तुमच्या घराकडे >> This is too much. Are you married? केव्हा बाबा होणार मग मदत करणार. अनीळजीच काही खर नाही Happy

Deepdown everyone know reality of this thread but still they enjoy this Lol

अनिलजी , तुमची समस्या सर्वाना कळली आहे, सुरवातीला लोकांनी पोट तिडकीने प्रतिसाद दिले. (अध्यात्मिक, विज्ञानवादी ). पण समस्ये वर उपाय न शोधाता किंवा काहीही न ठरवता रोज नवीन काय घडले हेच फक्त update करत आहात. त्यामुळे हि चर्चा थट्टे च्या दिशेने चालली आहे. एकतर उपाय करून पहा (अध्यात्मिक, विज्ञानवादी ) किंवा मग सहन करत राहा. पण मला असे वाटते कि आपण हि चर्चा थांबवू आता . ते काही झाले तर update देतील.

This is too much. Are you married? केव्हा बाबा होणार मग मदत करणार. अनीळजीच काही खर नाही>> ओ त्यांना बाळाचे बाबा नाही, भक्तांचे बाबा व्हायचे आहे. Lol

काल खूपच भयानक अनुभव आलेत पण इथले लोक कितपत विश्वास ठेवतील माहित नाही त्यामुळे इथे न लिहिलेलंच बरं.> >>> धन्यवाद. नका लिहु. लिहिण्यात वेळ घालवण्यापेक्षा तुमच्या समस्येवर उपाय शोधा.
कारण आता इथे तुम्हाला माबोकर असे एकेक उपाय सांगु लागतील की भुत परवडलं पण उपाय आवर असं म्हणाल. जर तुम्हालाही मजा येत असेल तर चालुद्या.

मानवा (हे आचार्य बाबा बर्वेंच्या चालीवर).....फेकुदे
त्यातच त्यांचे जीवनाचे सार ("माहेराहुन काय आणले ? राज्याचे सार आणले..... शुक्रवारच्या संतोषीमाता व्रतातुन साभार) सामावले आहे.
"जबतक धागा चलेगा इसकी जिंदगी चलेगी"...चढो दीवारपे भुतो"

बरं....बोकलत म्हणतच आहेत तर मी वर लिहीलेय ते थोडावेळ विसरुन लिहाच अनुभव.

मला असं वाटतंय आपण खूप घाई करतोय त्यांना खोटं ठरवण्यात. कदाचित ते मोठ्या संकटात सापडले असतील. अनिळजी तुम्ही अनुभव लिहा.

Pages