पछाडलेल्या वास्तूत येणारे अनुभव.

Submitted by अनिळजी on 25 September, 2020 - 12:16

नमस्कार, मी काही दिवसांपूर्वी एक घर घेतलं. साधारण महिना झाला असेल आम्ही म्हणजे मी, पत्नी, आणि दोन वर्षांचा मुलगा या घरात शिफ्ट झालो. जेव्हा पहिल्यांदा हे घर पाहायला आलो तेव्हा मी आणि हिने इथे प्रचंड अस्वस्थता अनुभवली. पण स्वस्त मिळत असल्याने हे घर फायनल केलं. इथे राहायला आल्यापासून आठवड्यात वाईट अनुभव यायला लागले आहेत. आमच्या तिघांशीवाय इतरही कोणीतरी इथे वावरत असल्याचा भास होतो. वारा नसताना दरवाजे जोरात उघडझाप होणे. कोणीतरी हाक मारल्याचा भास होणे, मध्यरात्री भांडी जोरात वाजणे असले प्रकार सर्रास घडत आहेत. पाच दिवसांपूर्वी बाथरूममधला नळ अचानक सुरू झाला होता. मुलाचं वागणही बदलायला लागलंय एकटाच कोणीतरी समोर असल्यासारखा बडबडत असतो. ही या प्रकाराने खूपच घाबरली त्यामुळे सासु सासऱ्यांना काही दिवस बोलावून घेतलं होतं. काही दिवस आधार वाटला पण आता पुन्हा आम्ही एकटे आहोत. सासू सासऱ्यांनाही ईथे विचित्र अनुभव आले. त्यांनी हे घर विकून दुसरं घेण्याचा सल्ला दिलाय. ज्याच्याकडून हे घर घेतलं होतं तो आता हे सगळे आमचे भास आहेत म्हणून हात वर करतोय. सध्यातरी लगेच दुसरीकडे शिफ्ट होणं कठीण वाटतंय.अजून हानी पोहचेल असं तरी काही घडलं नाही. पण सारखे भीतीत वावरत असतो. हा प्रकार कोणी अनुभवला आहे का? आणि अनुभवला असेल तर यातून काय मार्ग काढलात?

Group content visibility: 
Use group defaults

साधारण तासाभरात परत आलो तेव्हा घरी सगळा पसारा होता. सगळं सामान इकडे तिकडे पसरलं होतं>>>पुढच्या वेळी पसारा करून जा,आवरून झाला आपोआप तर फायदा पण होईल

घरात गजानन2 विजय असेल तर भूत येणार नाही यावर माझी ठाम श्रद्धा आहे
ते करून पाहायला कंटाळा करू नका
आणि खरंच हे सगळं मजा मस्करी mode मध्ये असेल तर कठीण आहे..

>> आज चेंज म्हणून संध्याकाळी तिघेही बाहेर फिरायला गेलो होतो.

अनिळजी यांच्या शहरात पाऊस किंवा ढगाळ हवा नाहीये बहुतेक. बाहेर फिरायला जाण्यासारखे वातावरण आहे.

आज चेंज म्हणून संध्याकाळी तिघेही बाहेर फिरायला गेलो होतो. जाताना सगळं घर व्यवस्थित आवरून ठेवलं होतं. साधारण तासाभरात परत आलो तेव्हा घरी सगळा पसारा होता. सगळं सामान इकडे तिकडे पसरलं होतं. आताच सगळं आवरून झालं.

Submitted by अनिळजी on 14 October, 2020 - 20:05>>>
पोलिस कंप्लेंट केलीत ना?

पोलिस कंप्लेंट केलीत ना?>>>
बरोबर...

भुतांना सामान इकडे तिकडे करण्याइतकी एवढी पॉवर नसते हो (संदर्भ: घोस्ट. त्याला पॉवर मिळवावी लागते)..

अनिळजी कदाचित खरं बोलत असावेत. खरोखरच त्या दुष्ट शक्तीने घरातलं सामान इकडे तिकडे फेकलं असण्याची शक्यता आहे.
Submitted by बोकलत >> मला वाटलं
तुम्हीच तिकडे जाऊन त्या दृष्ट शक्तींशी तुंबळ युध्द केलं. त्या फायटींगमध्ये साहित्याची फेकाफेक झाली.

मुंजा नसणार

बाई रडल्याचा आवाज आला होता.
मुंजा हा ब्रह्मचारी ब्राह्मण असतो

बिन लग्नाचा बामन मेला की त्याचा मुंजा होतो.

मुसलमान मेला की खविस होतो , तो दुष्ट असतो , हायला , भुतातपण आमचे मुसलमानच व्हिलन

https://marathi.popxo.com/2019/06/classic-ghost-story-in-marathi/

हे सगळं मजा मस्करी नसेल असे मानून सांगतो कि घरात ताबडतोब गुरुचरित्र आणून ठेवा व जर शक्य असेल तर गाणगापूरचे भस्म मिळते का पहा. भस्म मिळाले तर घरात सगळीकडे ते उडवा,नक्कीच प्रॉब्लेम सुटेल.

माझं मन अस्थिर असलं तर मी "बरसात की रात" या चित्रपटातल्या "ना तो कारवां की तालाश है" या गाण्याची पारायणं करतो.
कृष्ण, राधा, मीरा, अल्लाह, रसूल, गौतम यांचे उल्लेख ऐकून मन शांत होतं. गाण्याचे शब्द डोळ्यासमोर असले तर ते वाचून विशेष फायदा होतो असा अनुभव आहे.

ज्यांचा विश्वास नाही त्यांनी कृपया इग्नोर करा पण टीका करू नका.

व्यत्यय खूप छान युक्ती उपाय सांगितला. कधी असली काही वेळ आली की युट्युब हे गाणे सबटायटलस् सुरू ठेवून ऐकेन, धन्यवाद.

मी इथे जे काही लिहितोय ते खरोखर आमच्यासोबत घडतंय. काल खूपच भयानक अनुभव आला. मध्यरात्री जाग आली तेव्हा हि बाजूला न्हवती. बाहेर हॉलमध्ये गेलो तर हि सोफ्यावर बसून छताकडे एकटक पाहत कोणत्यातरी अगम्य भाषेत बडबडत होती. विशेष म्हणजे तिने जी साडी नेसली होती ती मी प्रथमच पाहत होतो. तिला हाक मारल्या जोरात हलवलं तरी काय फरक न्हवता पडत. शेवटी देवाचा अंगारा लावल्यावर एकदम भानावर आली. भानावर आल्यावर नक्की काय घडलं हे तिलाही आठवत न्हवतं. तसेच ती साडी तिला कुठून मिळाली हे हि आठवत न्हवतं.

अनिळजी,
तुमचे अनुभव वाचून काळजी वाटते.ही जेन्यूईन पोस्ट असेल तर सध्या रेंट वर कुठेतरी राहायला जा.
'एका ब्लेअर विच प्रोजेक्ट' सारख्या घरात राहण्याच्या अनुभवावर प्रेक्षकांची प्रतिक्रिया असा काही नवा लेखन प्रयोग असेल तरी कथेतल्या पात्राना तेच सांगेन: स्वतःला सूट होत नाहीये तर अंबियन्स बदला.

Submitted by अनिळजी on 15 October, 2020 - 09:39>>
मानसोपचारतज्ज्ञ किंवा निदान तुमच्या नेहमीच्या डॉक्टरांची अपॉईंटमेंट घेतलीत ना?
आणि पोलिस काय म्हणाले?

एकंदरीत त्या शक्तीने हळूहळू आपले रंग दाखवण्यास सुरवात केली आहे. अनिळजी काळजी घ्या. काही मदत लागली तर सांगा.

अनिलजी क्या चल रहा है? तुम्हाला देवाचे उपाय करायला सांगीतले तर तुम्ही त्याच्या बद्दल काहीच सकारात्मक किंवा नकारात्मक बोलत नाही, तुम्हाला भूतांचे उपाय करायला सांगीतले तर तुम्ही त्याच्या बद्दल काहीच सकारात्मक किंवा नकारात्मक बोलत नाही. येह बहुतही नाइन्साफी हय !

अजुन रात्री टि.व्ही. अचानक सुरु होणे, बेसीनच्या नळातुन लाल पाणी येणे,
रात्री पहाटे मेणबत्ती घेऊन गाणे म्हणत फिरणारी बाई.. हे प्रकार बाकी आहेत.
सो मायबोली वालो दिल थामके बैठो.

https://antisuperstition.org/

इथे तात्काळ संपर्क साधा. दोघांनाही लाभ होईल. एकतर तुमची भुते खोटी आहेत हे सिद्ध होईल व तुमची जागा मुक्त होईल किंवा अंनिसला आयुष्यात पहिल्यांदा भूतभेटीचा आनंद मिळेल.

ते हे धागा विसरलेही होते.
लोकांनी धागा वर काढून काय झालं, काय झालं करत विचारायला सुरवात केली.
मग घ्या आता स्टोऱ्या.

Pages