आयपीएल-१३ (२०२०)

Submitted by स्वरुप on 18 September, 2020 - 06:43
cricket IPL 2020

सालाबादप्रमाणे स्पर्धा सुरु होतेय आणि धम्माल करण्यासाठी धागा सुरु करतोय..... स्पर्धा सुरु होईल तशी चर्चा जोर पकडेलच!
हा धागा आयपीएल-१३ वरच्या चर्चांसाठी, आपापल्या टीमच्या समर्थनासाठी, आवडत्या खेळाडूंचे कौतुक करण्यासाठी आणि नावडत्यांना नावे ठेवण्यासाठी, जाणकारांच्या अचूक विश्लेषणासाठी, वादविवादासाठी, चिमटे काढणार्‍या व्यंगचित्रांसाठी आणि फॅन्टसीलीगच्या चर्चेसाठी सुद्धा!
आता पुढचे दोन-तीन महीने या कट्ट्यावर भेटत राहूयात आणि स्पर्धेचा आनंद लुटत राहूया Happy

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

शिखर धवन खेळला की संघ बऱ्याचदा हरतो. हे माझे निरीक्षण! आंतरराष्ट्रीय देखील..

आज विकेट स्लो किंवा इतर कारणाने फटकेबाजीला आळा बसला होता, असं वाटतं. धवन त्याच्या 40-50 धांवा झाल्यावरही धांवांचा वेग वाढवूं शकत नव्हता असं जाणवलं.अय्यरचंही तसंच. एकटा डी काॅक अपवाद होता.
*तेवाटीया च्या आत्मविश्वासाला मानले पाहिजे राव.* +1.तसंच स्टोइनिसच्याही .

आज दुखापतीमुळे पंत नसल्याने कॅरीला खेळवावे लागले. आणि तो ओवरसीज प्लेअर असल्याने हेटमायरला विनाकारण बाहेर पडावे लागले. तो बाहेर पडल्याने रहाणे आत आला. गंमत आहे सारी.

@ रियान पराग, गेल्या सीजनलाही त्याने एक मस्त चेस केलेला. तेव्हाच त्याच्या टेंपरामेंटचे कौतुक वाटलेले. चेस करताना असा खेळाडू हवा एखादा संघात.. आता यात सातत्य किती दाखवतो हे पुढे समजेलच.

मुंबईची डेप्थ पुनः उपयोगाला आली. इशान किशन, सूर्यकुमारने ने मॅच फिनिश करायला पाहिजे होती. दिल्लीला गचाळ क्षेत्ररक्षणाचा तोटा झाला.
टेवाटीया आणि पराग ग्रेट फिनिश.

सचिन, ( ट- २०) द्रविड (वन डे) करकिर्दीच्या शेवटी शेवटी जास्त वेळ बॅटींग करून संघाला हरवायचे. औटही व्हायचे नाहीत आणि रन रेटही जमायचा नाही. धवन आणि आख्खी सीएस्के त्या फेज मधे आहे.

भाउंची कंगना आवडती हिरोइन दिसते. Happy सौं. ची नाही. Happy

बातमी बघितलीत काय? मुंबईने भाकीत केलं होतं दिल्लीची धावसंख्या १६३ होईल पाच विकेट जातील. नन्तर ट्विट डिलीट केली.
https://cricketaddictor.com/cricket/ipl-2020-fixed-fans-on-twitter-troll...

*औटही व्हायचे नाहीत आणि रन रेटही जमायचा नाही. धवन आणि आख्खी सीएस्के त्या फेज मधे आहे.* काल रन रेट वाढवणं दोन्ही संघांना कठीण जाणवत होतं . निदान कालच्या पुरतं तरी धवन व सीएसकेला 'संशयाचा फायदा ' द्यायला हरकत नसावी ! Wink
( *भाउंची कंगना आवडती हिरोइन दिसते. सौं. ची नाही. * - सध्या भाऊना सगळ्या आवडत्या भगिनी, स्वत:ची सौ. सोडून ! Wink )

आज आरसीबी चा बॅटींग अ‍ॅप्रोच काय असेल? चारच बॅट्समेन घेऊन खेळताहेत. मॅच सिच्युएशन प्रमाणे ऑल-राऊंडर्स ना मधे घेऊन बॅटींग डेप्थ वाढवतील कदाचित. ह्याच्या बरोब्बर उलट, केकेआर ने नरिन च्या जागेवर बँटन ला खेळवलंय. ह्याचा अर्थ रसेल पूर्ण फिट आहे असा असावा.

एबीडी पेटला की त्यापलीकडे जगात कुठला फलंदाज नाही असे वाटते....
त्याची खेळी दोन संघातील फरक ठरणार वाटते..
दोन ओवर अजून शिल्लक आहेत

आणि आज परत नवीन सलामीवीर KKRकडुन.... RR आणि KKR ने जवळपास प्रत्येक मॅच मध्ये सलामीवीर बदलला आहे....

*एबीडी पेटला की त्यापलीकडे जगात कुठला फलंदाज नाही असे वाटते....* +1. कोहली व तो 26 चेंडूत अनुक्रमे 30 व 50 ! कोणताही चेंडू कुठेही खेळायची असामान्य कुवत आहे एबीडी कडे !

ऋन्मेऽऽष भाऊ शाखा ची जादू आज नाही चालली....
>>>>
आज होता का तो?
लाईट गेल्याने पुर्ण बघता आली नाही मॅच
कदाचित शाहरूखचे नुसते असणे पुरेसे नसावे.. मला दिसणेही गरजेचे असावे Happy

कदाचित शाहरूखचे नुसते असणे पुरेसे नसावे.. मला दिसणेही गरजेचे असावे
>> एस आर के अनसर्टिन्टी प्रिन्चिपल.

आज सीएसके जिंकले की एसआरएच हारले, तेच कळलं नाही. सीएसके ने जिंकण्यासाठी बरेच पॉझिटीव्ह चेंजेस केले, पण एसआरएच कडून विल्यमसन ला कुणी साथच देत नव्हतं.

एकोणिसाव्या ओव्हरचा दुसरा बॉल:
Thakur to Rashid Khan, no run
Full yorker floating away from him outside off. Reiffel shaped to call it a wide, hands half out. Then the bowler protested and, so did Dhoni. And suddenly he rethinks it. Replays show it had curved past the line.

वॉर्नरने पण नाराजी व्यक्त केली!

धोनीचे आज एक हीच मारा पर षॉल्लिड मारा बघायला मिळाले...

एक छक्का जो काही प्रकाशवर्षे दूर जाऊन आदळला Happy

अहो, लाळ गळत होती तोंडातून फोनवर तुम्ही हें बोलताना, " बहरात असलेल्या 'ए', 'बी', 'डी' ला बघणं खरं सुख ! " . मग मीं कोण, ती वगळलेली 'सी' ? कीं, ती पण आहे आणखी भलतीच कुणी !!! 20201014_110840.jpg

भाउ c for cangana. Happy तुमच वर्तन फारच संशयस्पद दिसत आहे वाटत वहिनींना. Happy
काल जेष्ठ नागरीक संघ जिंकला, माझ्यामते त्याला करन आणि करण चा पर्फॉर्मन्स कारणीभूत होता. धोनीचा षटकार त्याच्या पूर्वीच्या जोषाची चुणुक दाखवणारा होता. ब्रावोला खूप खाली पाठवल्यामुळे त्याने रागाने विकेट टाकली अस वाटल. तस नसेल तर बर.

*धोनीचा षटकार त्याच्या पूर्वीच्या जोषाची चुणुक दाखवणारा होता* - अगदीं खरं ! 'धोनी स्टॅप'च होता त्या सिक्सवर , अनेक आठवणीना उजाळा देणारा !!

( *तुमच वर्तन फारच संशयस्पद दिसत आहे वाटत वहिनींना* - नाहीं हो ! उलट , ' घरात कटकट करत बसतां त्यापेक्षा बाहेरच्या कांहीं भानगडी तरी करा ', हें सतत ऐकावं लागतं मला ! : डोमा: )

आर्चर चा पहिला बॉल खतरनाक होता आज. एकतर गल्फची ग्राउण्ड्स स्विंग ला फार मदत करत असतील असे वाटत नाही. त्यात फास्ट बोलरची नॅचरल अ‍ॅक्शन ही सुरूवातीला आउटस्विंगला जास्त सुटेबल असते. अगदी पहिला बॉल असल्याने दोन्ही बाजूची चकाकीही सेम असते. अशा वेळी इतका खतरनाक इनस्विंग केवळ शिवणीच्या पोझिशन वर जमणे फार अवघड आहे.

मी एकच रिप्ले पाहिला पण स्विंग वाटला पूर्ण. टप्पा पडल्यावर पिच कडून काही मदत झाली का कळाले नाही. आपल्याकडे शामी असे टाकतो बॉल्स अनेकदा.

आर्चर चा संपूर्ण स्पेलच खतरनाक होता. त्याने घेतलेला कॅचही मस्त होता अय्यर चा. दिल्लीकडून अय्यर आणी धवन सही खेळले.

विशेष प्रयोग न करतां शक्यतो लेंगथ पकडून सातत्याने गोलंदाजी केल्यास टी20 मधेही प्रभावी ठरतां येतं, यावर माझा अधिकाधिक विश्वास बसतोय !
जिःकले दिल्ली!

Pages