सुशांतसिंह रजपूत...!श्रद्धांजली!

Submitted by यक्ष on 15 June, 2020 - 11:25

सुशांतसिंह राजपूत.....! एक चटका लावून जाणारी एक्झिट...!!
बॉलिवूडमध्ये हे घडतच असतं..!

पण हा माणूस कुठेतरी स्पर्शून गेला!

त्याचा धोनी पिक्चर मधला आवेगपूर्ण अभिनय आवडला होता.
ताज्या दमाच्या पिढीत तो एक लक्षणीय तारा होता. तरी बॉलिवूडच्या राजकारणाच्या दलदलीत विझून गेला बिचारा..काही संवेदनशील मनं नाही झेलु शकत सततचा संघर्ष..... थकतात धावून धावून ...आणी मग देतात झोकुन झाकोळात अचानकपणे....

विनम्र श्रद्धांजली!

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

हाब +1

सनव आणि साधना यांच्या साठी आणखी एक क्रायटेरिया म्हणजे त्यांची प्रतिक्रिया ही पोलिटिकलही असते. हाथरस धाग्यावरच्या त्यांच्या पहिल्या प्रति सादापासूनच त्यांच्या ऑर्ग्युमेंट्स अत्यंत जहाल विषारी आणि कुठल्याही कचाट्यात सापडू नयेत अशा संदिग्धपणे , पण जर कोणी ओळखून उत्तर दिले तर त्याच्याच मनात चुकीचे विचार आहेत (हा नेहमीचा पॅटर्न, सिंबांना अनुभव आहेच) असा कांगावा करता येतील अशा आहेत.

मराठा समाजाने कोपर्डी बलात्काराचा फायदा घेऊन आरक्षण मिळवलं असं अत्यंत हलकट विधान त्यांनी नाव न घेता केलं आहे. किमान दोनदा.

त्या ए क फेसलेस आयडी आहेत, त्यामुळे कधीच नवल वाटत नाही.

साधना यांच्याबाबतीत नवल वाटायचं थांबलं.>>>>

बायकांनी राजकारणावर मत देणे थांबवा असे स्पष्ट लिहा, उगीच मनात एक आणि बोटात वेगळे असे करू नका.

तुम्ही स्वतः काय करताय हे अर्थातच तुम्हाला दिसत नाहीच.

कोपरडीबद्दल मी कुठे काय लिहिलेय, कुठल्या बलात्कार्याचे समर्थन केले याचे स्क्रीनशॉट द्या. आणि वर जे आरोप केलेत त्याचे स्क्रीनशॉट द्या..

बाकी 2014 नंतर तुमचा तोल ढलायला सुरवात झाली आणि 2019 नंतर तो पूर्ण ढळला हे इथे जगजाहीर आहे. तोंडाने लोकशाहीचा जप करायचा आणि आपल्याला नको असलेला पक्ष सत्तेत आला तर इतका मनस्ताप करून घ्यायचा... असो.

बलात्कार आणि आरक्षणाचा संबंध जोडणारं विधानं सनव यांचं आहे. अर्थात नेहमीच्या चलाखीने त्यांनी स्थळ किंवा समाज यांचं नाव घेतलेलं नाही. हाथरस धाग्यावर तुम्ही बहुतेक फिरकलेला नाहीत. माझी वाक्यरचना अधिक सुस्पष्ट हवी होती.

एका आयडीने लावलेला सूर पकडत सगळ्या जणी आपण बाई असल्याने बोलू दिलं जात नाही असं समूहगान करताना पाहून गंमत वाटू लागली.

२०१४ आणि २०१९ ची टेप जुनी झाली. माझा राजकीय कल आणि विचारांचा प्रवाह २०१४ च्या आधीपासून आहे तसाच अजूनही आहे. आपला राजकीय कल दाखवायला २०१४ किंवा २०१९ उग वायची वाट मला पहावी लागली नाही.

मला एक समजत नाही बाई आहे का पुरुष अशी जेंडर तपासणीची हुक्की काही लोकांना अचानक का येते ?
काय अडचण काय आहे ? स्री ने राजकीय मते व्यक्त केली च नाही पाहिजे का ?
राजकीय विषयावर ' स्री आय डी " म्हणून सतत हीनवणाऱ्याना आजचा मेनू , आजचा ब्रेक फास्ट स्वयंपाकी धाग्यावर कोणी टार्गेट करत नाही मग इथेच स्री आय डी ना टार्गेट करण्याचे कारण काय ?

स्त्री आणि पुरुष हा इथे आणि इतर समाज मध्यम वर
फक्त भास आहे.
स्त्री आयडी मागे स्त्री आहे की पुरुष?
पुरुष आयडी मागे स्त्री आहे की पुरुष.?
हे कोणाला माहीत आहे.

ते अनूभवाने कळते मि. हेमंत. तुम्ही आत्ताशीक ४ महिन्याचे झालात, मग तुम्ही नक्की कोण हे आता अनूभवाने कळायला लागेल.

आँ? काही आयडी स्वतःच आम्ही स्त्री असल्याने आम्हांला बोलायला दिलं जात नाही, असा कांगावा करताहेत.
वटवृक्ष स्त्री आहेत, त्यांना अ‍ॅसहोल सारखा अपशब्द वापरू नये असं रश्मी यांनी लिहिलं. त्या स्त्री आहेत हे रश्मी लिहिल्यानंतरच अनेकांना कळलं.
पण त्याच (वटवृक्ष) आपण स्त्री आयडी आहोत हे विसरून स्वतःसाठी पुरुषी क्रियापदे वापरायच्या . त्यांनी हे विसरू नये म्हणून मी त्यांना वटवृक्ष मॅडम असे संबोधतो.

वटवृक्ष स्त्री आहेत, त्यांना अ‍ॅसहोल सारखा अपशब्द वापरू नये असं रश्मी यांनी लिहिलं. त्या स्त्री आहेत हे रश्मी लिहिल्यानंतरच अनेकांना कळलं. >>>>>>

अरे वा !

मी तो शब्द विसरून जायचा प्रयत्न केला तरी तुमच्या सारखे १० वर्ष जुने जाणते ( ? ) वाकडे शेपूट वाले विसरून देणार नाहीत .
Happy
असो ,
राहिला पुरुष क्रियापद आणि स्री क्रियापद तर टायपिंग मध्ये पण चुकू शकते हे मान्य नसेल तर ते तुमच्यात तुमच्या प्रोफाइल प्रमाणेच नॉर्थ कोरिया च्या किम jong सारखी विकृत वृत्तीची झलक दिसत आहे !

आँ? काही आयडी स्वतःच आम्ही स्त्री असल्याने आम्हांला बोलायला दिलं जात नाही, असा कांगावा करताहेत.
वटवृक्ष स्त्री आहेत, त्यांना अ‍ॅसहोल सारखा अपशब्द वापरू नये असं रश्मी यांनी लिहिलं. त्या स्त्री आहेत हे रश्मी लिहिल्यानंतरच अनेकांना कळलं.

>>>>>>>>>>>>>>

अहो म्हणजे पुरुषाणा हा शब्द वापरावा का?

नाही सनव. जे कोणी असं विचित्र लिहितात त्यामुळे आपण का त्रास करून घ्यावा? ज्याची जशी विचारसरणी तसंच ते लिहिणार. आपले मुद्दे लिहिणं का बंद करायचं?//

तुमचं म्हणणं तुमच्यासाठी बरोबरच आहे मामी. तुम्ही तुमची ओळख लपवलेली नाही. अनेक मायबोलीकरांना प्रत्यक्ष आयुष्यातही भेटला असाल. त्यामुळे तुम्हाला तितक्या खालच्या लेव्हलचं ट्रोलिंग होत नाही. तुमचं जेंडर कोणतं हे speculate करण्याची मज्जा घेतली जात नाही. तुम्ही लिहीत राहा.
मला आयडेंटिटी उघड न केल्यामुळे वेगळ्या पद्धतीने ट्रोल केलं जातं. प्रशासनाची भूमिका तटस्थ आहे. म्हणजे मी एकतर पर्सनल अटॅक्स ऐकून घेत लिहीत राहणं, किंवा त्याच लेव्हलला उतरून तसंच लिहिणं (हे मी आधी केलंही आहे, i regret that ) अथवा न लिहिणं हे पर्याय आहेत.
तिसरा पर्याय ठीक वाटतो. व्यत्यय नामक एक आयडी ज्याला मी कधीही रिस्पॉन्ड करत नाही तो माझ्या पोस्टसवर फक्त पर्सनल ट्रोलिंग करायला येतो. माझं इथे लिहिणं म्हणजे म्हणजे अशा लोकांना ट्रोलिंगचं सुख आणि वाचणाऱ्या लोकांना पॉपकॉर्न खात टाईमपास झाल्याचं सुख. अजून कोणाला जुने हिशेब साळसूदपणे चुकते केल्याचं सुख.
प्रशासन ब्लॉक करण्याची सोयही देत नाही.
सो इथल्या स्त्रियांनी मेबी आधारकार्ड अपलोड करून आयडेंटिटी उघड करून लिहावं, अन्यथा ट्रोलिंगला तयार राहावं.

आयडी बद्दल संशय असेल तर शब्दमर्यादा पाळत तक्रार जरूर करावी.
ज्यांना शब्दमर्यादा पाळता येत नाही त्यांना अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार राहत नाही.

मुळात एखाद्या स्त्रीला सोशल मीडियावर चर्चा करण्यासाठी पुरुष प्रोफाईल का घ्यावी लागते आणि पुरुषाला स्त्री प्रोफाईल का घ्यावी लागते?

इतर सोशल माध्यमात काहीतरी कारण असू शकते(जे चुकीचेच आहे), पण मायबोलीवर चर्चा करण्यासाठी असे करण्यामागे काय मानसिकता असावी?

काय मानसिकता असते यावर चर्चा करण्याची गरज काय? एखादा आयडी स्त्री, पुरुष किंवा LGBTQ कोण म्हणून आयडेंटीफाय करतो ह्यावर फोकस न करता मुद्द्यांवर बोलता येईल की.
स्त्री आयडी असून असं कसं बोलता, नक्की स्त्रीच आहात का- हे stereotype करणारे प्रश्न विचारणं प्रशासनाला खटकत नाही?
मायबोलीवर मारे LGBTQ awareness वर लेख लिहिले जातात. पण विरुद्ध बाजू म्हणजे शिखंडी असं लिहून दात काढले की खरी मानसिकता उघड होते.
भरत यांनी माझ्यासाठी/माझ्या पोस्टसाठी हलकट शब्द वापरला. मराठा आरक्षण आणि कोपर्डी यांचा परस्परसंबंध त्यांना माहीत नाही असं नक्कीच नाही.
https://www.bbc.com/hindi/india-45016578
एक गॅंग रेप ज्याने मराठा आरक्षणाला हवा दिली - ही बीबीसीची हेडलाईन आहे.
https://www.esakal.com/paschim-maharashtra/maratha-reservation-shivendra...
कोपर्डीनंतर काढलेल्या मोर्च्यात आरक्षणाची मागणी केली गेली हे सर्वच मीडिया लिहितो. निर्भया किंवा तत्सम मोर्चामध्ये फक्त रेपवरच फोकस राहिला ही फ़ॅक्ट आहे.
असो. इथे शिखंडी, हलकट , शेणातील प्राणी वगैरे शब्द इथल्या oh-so-liberal रुलिंग पार्टीकडून विरोधकांसाठी वापरले गेले की मायबोलीचं लिबरल असणंही सिद्ध होत असावं. त्यामुळे त्यासाठी प्रशासकांचंही अभिनंदन.

सनव +११११११
अगदी मनातलं बोललात .
पण स्री आय डी ना डायरेक्ट शिव्या देण्यास त्यांना कधी कधी लाज वाटते बरं का !

ह ! आता प्रशासन ला या विषयावर सांगणे म्हणजे आंधळ्या च्या बाजारात चष्मे विकण्याचा प्रकार होईल .
त्या पेक्षा जमेल तितका आपण प्रतिकार करत राहणे , अशक्य झाले की सरळ कायमचे बाहेर पडणे !

..........ह्यावर फोकस न करता मुद्द्यांवर बोलता येईल की.
नवीन Submitted by सनव on 11 October, 2020 - 20:19
>>>>>>

नक्कीच, माझेही तेच म्हणणे आहे की अनावश्यक बाबी सोडून मुद्यावर चर्चा करावी.

फक्त जे आयडी (स्त्री पुरुष आयडी) बदल करतात ते का करतात हे माझ्या समजण्यापलीकडे आहे.
(हा मी कुणावरही आरोप लावत नाही आहे, असे जे करतात ते का करत असावेत एव्हढाच प्रश्न होता)

सनव च्या कांगाव्याकडे दुर्लक्ष करतोय सध्या, नंतर लिहिनच.
प्रोफाइल मधली माहिती (केवळ प्रोफाईलच नव्हे तर सोमी वर लिहिलेली कोणतीही गोष्ट ) डोळे झाकून विश्वास ठेवण्यासारखी नसते हा पहिला नियम आहे,

त्यामुळे प्रोफाइल माहितीवर शंका घेतली तर ऑफेंड होण्याचे कारण नाही

काही जणांचे मुद्दे संपले की ते पर्सनल होतात हे अनेकदा पाहिलंय.

Submitted by साधना on 11 October, 2020 - 21:

खिक्क,
गेल्या 2 पानात टीम सुशांत कडून आलेला नवा मुद्दा सांगा?

त्यामुळे प्रोफाइल माहितीवर शंका घेतली तर ऑफेंड होण्याचे कारण नाही

हो ना. शिखंडी शब्द वापरला , शेणातले प्राणी etc तरी हरकत नाही. बीबीसी , सकाळ वेबसाईटवरील माहितीला अनुसरून पोस्ट लिहिल्यावर हलकट शब्द वापरणं टोटली ओके.

याच लेव्हलच्या पोस्ट मीही कदाचित आधी केल्या असतील आणि त्याही प्रशासनाने चालू दिल्या असतील पण निदान आता मी स्वतः त्या लेव्हलला उतरायचं नाही हे माझ्यापुरतं ठरवू शकते. ज्या 'मॉडरेटेड' फोरमवर एकतर ही भाषा ऐकून घेऊन गप बसा किंवा त्याच लेव्हलला उतरून प्रत्युत्तर द्या हे दोन पर्याय असतील तिथे सुधारणेची गरज आहे.

https://www.ndtv.com/india-news/cbi-warning-to-rhea-chakrabortys-neighbo...

Facing CBI, Neighbour Who Targeted Rhea Chakraborty Fails To Back Claim

रियाचे चारित्र्यहनन नको म्हणार्‍यांत बरेचसे पुरुषही होते आणी तिला चिखलातून फरफटत नेणार्‍यात बर्‍याच महिलाही होत्या हाही दैवदुर्विलासच. असो, तिच्यावर "पब्लिक डोमेन" मध्ये लावलेले दोन आरोप, एक पंधरा कोटींचा व दुसरा त्याचे आजारपण कुटुंबापासून लपवून ठेवल्याचा, दोन्हीही खोटे आहेत हे सिद्ध झाले आहे. निदान आता तरी थोडेसे आत्मपरिक्षण होईल का ?

1) तुम्हाला बाई म्हंटले म्हणून तुम्ही ऑफेंड झालात, झालात ते झालात, मला बाई म्हणू नका, मला आवडत नाही, असे सरळ शब्दात सांगायचे सोडून मी तुमचा अपमान करण्यासाठी तुम्हाला बाई म्हणतोय असा कांगावा केलात. त्यात बाई म्हणणे = बाई वाड्यावर या म्हणणे अशी मानसिकता वगैरे तारे तोडून, माझी नाचक्की करायचा प्रयत्न केलात.

2)"तुमच्या प्रोफाइल मध्ये स्त्री id नोंदवलेले आहे , म्हणून मी तुमच्याशी स्त्री बरोबर बोलावे तसे बोलतो" या सरळसाध्या विधानाचा विपर्यस करून " मला हवे ते म्हणा, स्त्री/पुरुष/हिजडा काय हवे ते म्हणा... " वगैरे त्रागा केलात तुम्हीच स्वतःला हिजडा म्हणून घेतलेत, आणि त्याची रिसीट माझ्यावर फाडताय" वस्तुतः हिजडा हे डिरोगेटरी विशेषण अजिबात नाही, एक लिंग श्रेष्ठ आणि दुसरे वाईट अशी तुमची मेंटलीटी असेल तर त्याचा निषेध.

3) दिशा वर बलात्कार झाला नाही असे मुपो, तिचे घरचे यांचे स्टेटमेंट असून सुद्धा एका राजकीय नेत्यांच्या स्टेटमेंट चा उल्लेख करून तो झाला असलाच पाहिजे अशी सूचक स्टेटमेंट केलीत, ही तुमची ट्रिक उघड केल्यावर as usual कांगावा मोड मध्ये गेलात.

4) भीष्माशी लढताना अर्जुनाने शिखंडीच्या मागून बाण चालवले, आणि आता (लोकांच्या विरोधाची धार कमी व्हावी म्हणून) लोक स्वतः ला स्त्री id जाहीर करतात,

हे जनरलीस्टिक स्टेटमेंट तुम्हाला चांगलेच टोचले.यात शिखंडी बद्दल काहीही डिरोगेटरी नाही, आणि स्त्री id घेणाऱ्या लोकांबद्दल सुद्धा नाही. पण तुम्ही मलाच शिखंडी म्हंटले असे नार्हेटीव्ही बनवून रडायला सुरवात केलीत. वर माझे इतर लिखाण मध्ये आणून, माझ्यावर हिप्पोक्रसी चा नाव न घेता आरोप केलात.

5) काल वटवृक्ष id ने सुद्धा मी सर्व स्त्री id ना हरामखोर म्हणालो अडा भूमका उठवायचा प्रयत्न केला, नशिबाने ओरिजिनल प्रतिसाद मागच्याच पानावर असल्याने खरे काय ते लगेच दाखवता आले, (निदान त्यांनी आरोप मागे घेण्याचा मनाचा मोठेपणा दाखवला)

बाई, या सगळ्या गोष्टींनी गेल्या 15 दिवसात मला भरपूर मनस्ताप दिला आहात, माझ्या साध्या साध्या विधानांचे विपर्यस करून, जी मूल्ये मी कायम शिरोधार्य मानली, त्याच मूल्यांच्या मी कसा विरोधी आहे हे सांगायचा प्रयत्न तुम्ही आणि काही स्त्री id नि केलात/करता आहात.
त्यामुळे मायबोलीवर एक वाक्य लिहिताना सुद्धा मला खूप असुरक्षित वाटते, 10 वेळा विचारकरून प्रत्येक वाक्य लिहायला लागते.कारण संदर्भ सोडून हे वाक्य कसे , कुठे वापरले जाईल आणि मला डिफेम करायला वापरले जाईन, याचा प्रचंड मानसिक तणाव सध्या मी अनुभवत आहे.

बाई माझा का छळ करत आहात असा?
Plz plz leave me , तुम्ही हे प्रकार तात्काळ थांबवले नाहीत तर मला प्रशासनाकडे औपचारिक तक्रार करायला लागेल.

सिम्बा,
सोमी वर पुरुषांचे सुद्धा ट्रोलिंग होते, आणि ते ट्रोलिंग करणारी स्त्री असेल तर तिचे आरोप जास्त सिरिअसली घेतले जातात. केवळ याचा फायदा मिळावा म्हणून लोक स्वतःला स्त्री id जाहीर करतात. या केस मध्ये तसे असेलच असे नाही, पण सोमी वर काय खरे नि काय खोटे याची खात्री कुणी देऊ शकत नाही.
मायबोलीवर वर लिहिण्याचे दडपण येणे ही दुर्दैवी गोष्ट आहे, मी पण यातून गेलो आहे, so i can relate, but stay strong. अश्या लोकांकडे दुर्लक्ष करत, आपण आपले म्हणणे मांडत राहायचे,
Big hug to you!

सिंबा दुर्लक्ष करा. आणि आकांडतांडवाची भाषा तुम्ही वापरलेली नाहीत, यापुढेही वापरु नका. त्याची आवश्यकताच नाही आणि नसते. तुम्ही दिलेले स्पष्टीकरण पुरेसे आहे.

त्यामुळे मायबोलीवर एक वाक्य लिहिताना सुद्धा मला खूप असुरक्षित वाटते, 10 वेळा विचारकरून प्रत्येक वाक्य लिहायला लागते.कारण संदर्भ सोडून हे वाक्य कसे , कुठे वापरले जाईल आणि मला डिफेम करायला वापरले जाईन, याचा प्रचंड मानसिक तणाव सध्या मी अनुभवत आहे.>> I suggest you to take break from Maayboli for at least a month. It is not that important to write here if it is stressful. There are lot of other good things to do in life rather than fighting here. Happy

थँक्स व्यत्यय आणि हिरा,
Your support means so much to me,
मी माबो वर खऱ्या नावाने वावरतो, माबोवर ओळख झालेले बरेच लोक ( स्त्री, पुरुष दोन्ही) माझ्या वैयक्तिक संपर्कात आहेत, मी मायबोली वर जे लिहितो त्यांचे पडसाद आमच्या प्रत्यक्ष संवादात उमटत असतात.

आपली ओळख लपवून फिरणाऱ्या व्यक्तीला तसे काही लिमिटेशन नसते, तोंड लपवून ती कोणावरही, कोणतेही आरोप करू शकते, त्याबद्दल तिला प्रत्यक्ष आयुष्यात कोणाला जाब द्यावा लागणार नसतो.

मायबोलीवर भेटलेल्या या सगळया लोकांनी माझे आयुष्य समृद्ध केले आहे and i really value their friendship.
इकडे माझ्या विरुद्ध होणाऱ्या विखारी अपप्रचाराचा परिणाम त्यांच्या माझ्या वैयक्तिक संबंधांवर होऊ शकतो,
रादर , तो तसा व्हावा, मला वैयक्तिक आयुष्यात त्रास व्हावा या एकाच हेतूने ही नाचक्की मोहीम काही id नि चालवलेली आहे, त्यांचा मोटिव्ह काय? हे तेच सांगू शकतील.

पण हिरा तुम्ही म्हणता ते बरोबर आहे,
ओळख लपवून फिरणाऱ्या id च्या वैयक्तिक कमेंट्सकडे दुर्लक्ष करणे शिकले पाहिजे.
धन्यवाद.

There are lot of other good things to do in life rather than fighting here. >>> पते की बात! हेच लक्षात येत नाही अनेकांच्या मग बाचाबाची करत, दुसर्‍यांवर डाफरत, आपण म्हणू तसंच इतरांनी वागलं पाहिजे असा अट्टाहास करत थयथयाट करत राहतात.

@सिम्बा, मी आता इथे इतर धाग्यांवर लिहिणं ऑलरेडी थांबवलं आहे. या धाग्यावरही चर्चेला पूर्णविराम द्यायला हरकत नाही. द फोरम इज ऑल युअर्स!
राजकारणी स्वतः वेगळ्या पक्षात असले आणि जगासमोर भांडत असले तरी प्रत्यक्षात पर्सनल रिलेशन, बिझनेस पार्टनर्स असतात.
माझ्या आसपास तर कुटूंबीय, मित्रमैत्रिणी वेगवेगळ्या राजकीय विचारांचे असतात. पण त्यावरून आई-मुलगा, भावंडं, नवरा- बायको एकमेकांची डोकी फोडत नाहीत.

त्यामुळे इथे सतत पर्सनल विखारी होऊन लिहिलं जातं त्याचं आश्चर्य वाटतं. इथल्या अनेकांना पर्सनल लाईफमध्ये ओळखत असूनही मी माझी आयडेंटिटी उघड करणारही नाही कारण भारतातील इश्यूजवर लिहिण्यासाठी उगाचच इथल्या 'आयडीज' कडुन अपमान करून घेतले आणि स्वतःही काही not-so-nice पोस्ट्स केल्या ही लपवण्यासारखी व लाजिरवाणीच गोष्ट आहे.
असो, तुम्ही किंवा भरत. याना आपल्या सर्व पोस्ट्स अगदी योग्यच होत्या आणि सनव आयडी फुकटचा कांगावा करत आहे हे अगदी मनापासून वाटतंय ना, मग झालं तर! शेवटी तेच महत्वाचं आहे.
@व्यत्यय, तुम्ही आज माझ्या पोस्टवर नेहमी लिहिता तसं स्ट्रोमॅन वगैरे नेहमीचं ट्रोलिंग का नाही केलं?
करून घ्या ते. परत परत संधी नाही मिळणार!

Pages